चलो कुछ तूफानी करते हैं Gajendra Kudmate द्वारा हास्य कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

चलो कुछ तूफानी करते हैं

एके दिवशी अचानक मस्तकात विचार येऊ लागले. काय साली ही जिंदगी रोज तेच सकाळी उठणे, रोजचाच नित्यकर्म करणे. त्यानंतर आंघोळ करून देवपूजा करणे, मग भूख लागली कि पोटभर जेवणे. पोट भरले कि सुस्तावून झोपणे, झोप झाली कि उठणे चहा पिणे आणि मित्रांशी गप्पा गोष्टी करणे. रात्र झाली कि तेच रात्रीचे जेवण करणे आणि मग निवांत झोपणे. साला कंटाळा आलाय अशा या निष्कामी जीवनातून म्हणत आजोबांनी चादर झटकली आणि बेडवर चिंतन करत बसले. आमचे आजोबा शिक्षक म्हणून शाळेत नौकरीला होते. तो त्यांचा नौकरीचा काळ छानरीत्या पार पाडून त्या नौकरीतून ते सेवानिवृत्त झाले. आता फक्त आराम आणि आराम, अरे आराम तो किती तरी करायचा. आजोबांची सवय म्हणा कि वृत्ती ती सर्वथा चंचल आणि खोडकर वृत्तीची होती आणि आहे. ते शिक्षक म्हणून होते त्यामुळे त्यांचा या खोडकर वृत्तीला काहीतरी बंधने त्यांनी लावली होती. आता तर त्या बंधनातून ते मुक्त झाले होते, त्यामुळे त्यांचा तो चंचल स्वभाव त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता.
त्यांचा नौकरीचा काळात ते तितक्या व्यस्त अशा दैनंदिन कामातून वेळ काढून काही ना काही उचापती करत असायचे, ते ही फक्त आणि फक्त त्यांचा एकांतात. त्यांचा मनात राहून राहून काही तरी करावे आणि स्वतःला व्यस्त करावे, परंतु त्यांचा सुनेचं आणि मुलाचं स्पष्ट आणि कठोर असे सांगणे होते, कि बाबा आता तुम्हाला फक्त आणि फक्त विश्राम करायचा आहे. यामुळे ते मनातल्या मनात कुचंबळून हे दिवस काढत होते. तर चिंतन करता करता आजोबांचा मेंदूत जणू काही वीजच कळाळली आणि त्यांचा मस्तकात विचार आला आपण काहीतरी करायचे. त्याबद्दल ते आणखी विचार करू लागले करायचे तर काय? मग त्यांचा मनाने म्हटले आपण काही वेगळे करायचे म्हणजे सगळ्यांपासून काही तरी हटके करायचे. याचा अर्थ एकच तो म्हणजे काही तरी तुफानी करायचे. आता तुम्ही म्हणाल कि तुफानी करायचे आहे, म्हणजे नककी काय करायचे आहे. मला माझे अपूर्ण असे स्वप्न पूर्ण करायचे आहे. तर आजोबांनी ठरवले कि उद्यापासून या कामगिरीला लागायचे.
तसे म्हटल्या तर मनुष्याचा अनेको इच्छा आकांक्षा आणि स्वप्न असतात. त्यातील काही न म्हणता निवडक ज्या अनावश्यक आणि अनमनाने, नावडत्या पूर्ण होणाऱ्या इच्छा असतात त्याच पूर्ण होतात. असे नाही कि आवडत्या इच्छा पूर्ण होतच नाहीत, अहो होतात परंतु त्यासाठी ही प्रबळ असे नशीब लागते, जे प्रत्येक मनुष्याचा नशिबाला लाभत नाही. मनुष्याला संपूर्ण आयुष्य भर तडजोडच करावी लागते. तर ते सगळ मरू देत मी आपलं पुढे सरकतो कि मी तुम्हाला आजोबांचे एक गुपित रहस्य सांगू इच्छितो आणि मला संपूर्ण खात्री आहे कि त्यांचा मनात त्यांची ती अपुरी इच्छा पूर्ण करायची असेल. अरे मी पण काय बोलत बसलो, तुम्हाला तर त्यांची इच्छा, त्यांचे स्वप्न तर मी सांगितलेच नाही. तर आजोबांचे एकच स्वप्न होते कि त्यांना एका तरी मुलीसोबत प्रेम करायचे होते. आयुष्यात त्यांना एक तरी मुलगी पटवायची होती. ते स्वप्न त्यांचे आधीच तरुणपणी साकार झाले असते परंतु त्या स्वप्नाला आडे आले ते त्याचा वेंधळेपणा आणि सर्वात मुख्य म्हणजे त्यांचे कमकुवत नशीब.
तर दुसरा दिवस उजाडला आणि आजोबा सकाळी उठून थेट संडासाचा दिशेने जाऊ लागले, तेच अचानक थांबले आणि स्वतःशीच विचारू लागले. अरे मी काय करून राहिलो आहे, मला तर आज काही तुफानी करायचे आहे, तर मी त्या कंटाळवाण्या दिवसाप्रमाणे संडासाकडे कशाला चाललो आहे. मला आजपासून नवीन काही करायचे आहे, मला ते जुणे दिवस विसरायचे आहे. मला तुफानी करायचे आहे, म्हणता म्हणता त्याचा पोटाला जोरात कळा येऊ लागल्या आणि आजोबा त्यांचा धोतर हातात घेऊन ते थेट संडासात घुसले याप्रमाणे आजोबाचा तुफानी ची पहिली विकेट पहिल्याच चेंडूत पडली आता उरलेल्या विकेट दिवसभरात पडतात किंवा काय होते ते देवालाच माहित आहे. नित्यकर्म आटपून आजोबा संडासातून बाहेर आले आणि म्हणाले, याला काही अपवाद नाही आहे. काहीतरी तुफानी करण्यासाठी मनुष्याला संडासात जावे लागते नाहीतर कुठे ही फजिती होते, असे अबोध पणे उच्चारता धोतराचा काष्ठा बंधू लागले. आज आजोबांचा डोक्यात तुफान दाटून आलेला होता तो काही त्यांना विसावा घेऊ देत नव्हता. ते आपल्या तुफानाचा नादात लगबगीने घराकडे जाऊ लागले कि कुणीतरी आजोबाना आवाज दिला आणि त्यांचाबरोबर राम राम घेतला. आजोबा चालता चालता मागे वडून त्या व्यक्तीसोबत राम राम घेता घेता शेणावर जाऊन पडले. अरे राम, या राम रामचा नादात आता मला अंघोळ सुद्धा करावी लागेल. त्यांचा हा वेंधळेपणा त्यांचा साथ काही सोडत नाही, असे वाटते कि तो त्यांचा बरोबरच जाईल.
तर तशाच अवस्थेत आजोबा आंघोळीला बाथरुममध्ये गेले. छान आंघोळ करून त्यांनी नवीन धोतर परिधान केले आणि त्यांचा मुखातून त्यांचा दुसरा डायलॉग निघाला कि काहीतरी तुफानी करण्यासाठी मनुष्याला आंघोळ ही करावी लागते. घरातील मंडळी म्हणजे आजोबा ,त्यांचा मुलगा आणि सुनबाई. आजी तर काही वर्षांपूर्वीच आजोबांना आणि सगळ्यांना सोडून देवाघरी निघून गेली. त्यामुळेच तर आजोबांची दबलेली न म्हणता जबरदस्तीने हृदयातील मातीत पुरलेली इच्छा बेडकाप्रमाणे उडया मारू लागली आहे. तर आंघोळीनंतर नवीन धोतर आणि सदरा नेसून तयारी करून आजोबा आपल्या मिशन वर निघाले तोच नितारोजचा प्रमाणे देवाला नमस्कार करण्यास देवार्‍यात गेले तर त्यांचा निष्पाप मनाला अपराध्यासारखे वाटू लागले. माझ्या देवाची मी पूजा नाही केली त्यांचा आशीर्वाद नाही घेतला. तर ते पूजा करण्यास बसले, त्यांनी दिवा वाती केली आणि देवाचा निरोप घेऊन तुफानी करण्यास निघाले. देवाकडे पाठ फिरवून दाराकडे जातांना त्यांनी पुन्हा डायलॉग मारला कि काहीतरी तुफानी करण्यासाठी मनुष्याला देवाची पाठ पूजा आणि त्यांचा आशीर्वाद घेण्याची आवश्यकता असते.
तर अखेर आजोबा आपल्या मिशनवर जाण्यास निघाले तोच पुन्हा त्यांना कुणीतरी आवाज दिला यावेळेस त्या आवाजाला दुर्लक्ष करून पुढे निघाले तर तो आवाज पुन्हा आला. यावेळेसचा आवाजाची तीक्ष्णता इतकी जास्त होती कि नाईलाजास्तव आजोबांना त्या आवाजाला प्रतिउत्तर द्यावेच लागले. तो आवाज दुसऱ्या कुणाचा नव्हे तर त्यांचा पोटाचा आतड्यांचा होता. आजोबांचा पोटाला फार जोराची भूख लागलेली होती, त्यामुळे ते पोट आजोबाना जोरात आवाज देत होते. शेवटी आजोबांना पोटाचे ऐकावे लागले आणि जेवण करण्यास थांबावे लागले. सुनबाईने छान स्वयंपाक केला होता तर पोटभर जेवण केले आणि हाथ धुवून आल्यावर हाथ पुसतांना त्यांनी पुन्हा डायलॉग दिला काहीतरी तुफानी करण्यासाठी मनुष्याला जेवणही करावे लागते कारण याला काहीच अपवाद नाही. अशा प्रकारे एक एक करून आजोबांचा तुफानाचा विकेट पडतच होत्या.
आता आजोबांनी विचार केला कि आता विलंब करून चालणार नाही, आधीच फार विलंब झाला आहे. तर आजोबा घराजवळचा कॉलेजकडे जाण्यास निघाले. आता तुम्ही विचार करत असाल कि आजोबांचा स्वप्नाचे आणि कॉलेज यांचा संबंध काय? तर याचे उत्तर असे आहे कि आजोबांना एका तरुण मुलीला प्रपोस करायचा आहे आणि हेच त्यांचे तुफानी मिशन आहे. तर मग तुम्ही विचाराल कि असे वेंधळे विचार त्यांचा डोक्यात आले तरी कसे. तर आजोबा टीव्हीवर चित्रपट बघतात, तर त्याच एका नवीन चित्रपटात आजोबांनी बघितले कि त्यांचासारख्या एका आजोबांनी एका तरुण मुलीला फुल देऊन प्रपोस केला. तेथे सत्याची गोष्ट अशी होती कि ते दुसरे आजोबा श्रीमंत होते आणि सगळ्यात जास्त सत्य म्हणजे तो फक्त आणि फक्त चित्रपट होता सत्य परिस्तिथी नव्हती. यामध्ये आजोबांचा अट्टहास हाच आहे कि मी जसा आहे त्याच स्थितीत मला ते कार्य करायचे आहे. म्हणून ते आपल्या पारंपारिक पोशाखात ते तुफानी कार्य करण्यास गेले. आजोबा कितीही वेंधळे असतील तरीही कुठल्याही आणि कसल्याही परीस्थित ते सत्यच बोलतात.
कॉलेजकडे जातांना एका फुलाचा दुकानात थांबून त्यांनी एक फुल खरेदी केला, तर तेथील एका महिला दुकानदाराने त्यांना सहजच विचारले कि हे फुल कुणाला दयाल. तर आजोबांनी सत्य सांगितले ते ऐकून ती दुकानदार उच्चारली म्हातारा येडा तर नाही झाला. आजोबांचा काही विकेट तेथेही पडल्या. कारण कि तिने त्यांना एकतर म्हातारा म्हटल आणि दुसर म्हणजे वेडा म्हटल. तरीही आजोबा आपल्या तुफानाचा नादात कॉलेजसमोर जाऊन ठेपले. त्यांनी चहूकडे नजर फेरली तेथे सर्वत्र मुली मुल बसलेली, इकडे तिकडे वावरत होती. त्यांना कुठल्याही घोळक्यात जायचे नव्हते. एखादी निवांत ठिकाणी एकटी बसलेली मुलगी दिसेल तर तीला फुल दयायचे होते आणि प्रपोस करायचे होते. त्यांचा नजरेत एक मुलगी दूर एका कोपऱ्यात एकटीच बसून दिसली. सकाळी उठल्यापासून आजोबांची विकेट वर विकेट पडत होती आता शेवटली विकेट उरली होती. तीला कसे बसे सांभाळून ते त्या मुलीचा जवळ जाऊ लागले. ती मुलगी सगळ्यांपासून एकांतात घनदाट फुलांचा रोपट्यांचा मध्ये बसलेली होती. आजोबा आता आपली हिम्मत एकजूट करत होते आणि तीचाजवळ जाण्याचा मार्गही काटेरी होता. आता त्यांचा मनातील तुफान त्यांना अस्वस्थ करत होता आणि तोच त्यांनी निर्धार केला आता काहीही झाले तर मी एकाच झटक्यात त्या मुलीसमोर जाणार आणि तीला प्रपोस करणार.
तेच ते तेथून निघाले आणि त्या काटेरी रोपट्यातून त्या मुलीसमोर जाऊन उभे राहिले. अचानक आजोबांना हातात फुल घेऊन समोर बघताच त्या मुलीला आश्चर्य वाटले त्याहून जास्त आनंद त्यांचा हातात फुल बघून झाला. परंतु काही क्षणात ती मुलगी बेशुद्ध पडली. आजोबांना काही कडेनासे झाले होते कि छान हसणारी मुलगी असी का बरे बेशुद्ध झाली. तेच कुणी आस पास आहे काय बघण्यास त्यांनी मागे बघितले तर त्यांचे धोतर त्यांना त्या काटेरी झुडपात अडकले आढळून आले. ते धोतर बघून आजोबा मनात उत्तरले कि कोण मूर्ख येथे धोतर वाळवत घालून गेला. परंतु नंतर त्यांचा लक्षात आले जेव्हा त्यांनी खाली बघितले. ते धोतर त्यांचेच होते आणि ते स्वतः निर्वस्त्र उभे होते. आता त्यांचा लक्षात सगळी गोष्ट आणि त्या मुलीचा बेशुद्ध होण्याचे कारण कळून चुकले. त्या मुलीला भर दिवसा साक्षात गजानन महाराजांचे दर्शन झाले होते आणि तेथेच आजोबांची शेवटची विकेटही पडली होती. म्हणून ती मुलगी अनायास बेशुद्ध झाली. ही बाब लक्षात आल्याच आजोबा आपले धोतर घेऊन तेथून लपत छपत घराकडे निघाले. त्यांनी एका शेताचा आडोशाला जाऊन धोतर पुन्हा नेसलं आणि घरी परत आले. घरी आल्यावर निश्चिंततेचा श्वास सोडला आणि अबोधपणे तेच डायलॉग दिला काही तरी तुफानी करण्यासाठी गजानन महाराज ही व्हावे लागते. अशा प्रकारे आजोबांचे तुफानी कार्य संपुष्टात आले.
स्वलिखित
गजेंद्र गोविंदराव कुडमाते