नरकपिशाच - भाग 7 jay zom द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नरकपिशाच - भाग 7




द अमानविय..सीजन 1
आग्यावेताळ भाग 7

पाषाणवाडी महांक्राल आश्रम :

पाषाणवाडी गाव तस म्हणायला शहरातल्या वस्तुस्थितीपासून , सोयी-सुविधांपासुन खुपच दुर होत. त्या सैतानाच्या श्रापाने जणु लोक पाषाणवाडीत एका कैद्यासारखे जीवन जगत होते. बाहेरच्या सुखाचा बिचा-या गावक-यांना काडीमात्र आनंद घेता येत नव्हता. परंतु अस काय घडलेल? काय रहस्य दडलेल त्या पाषाणवाडीतल्या ह्या अशा ..असुखी नियमाच ....? का जगत होते... ते पाषाणवाडीतले रहिवाशी ह्या अशा बिन सोई-सुविधा असलेल्या गावी ? महांक्राल बाबा एक अघोरी होऊन सुद्धा अंगावर चितेची राख न फासता भगवे वस्त्रे का घालत होते ? स्मशानात न राहता आश्रमात का राहत होते ? अशा कित्येक तरी नाना.. त-हेच्या रहस्यांचा भेद वेळ आल्यावर होणार होता.महांक्राल बाबांच्या आश्रमाबाहेर रात्रीच्या अंधारात एक मांजर चार पायांवर चालत चाललेली .विघ्नेशची ती मांजर होती... तीच नाव मनु होत.सफेद रंगाच्या केसांची , निळ्या डोळ्यांची मनु बघताक्षणीच कोणाच्याही मनावर भुरळ घालणारी होती .मनूला पाहिल की कोणीही तिला आपल्या हाती उचलून घेत लाडाने , प्रेमाने तिच्या सफेद र्ंगाच्या केसांवरुण हात फिरवल्या बगेर राहत नव्हता .निळ्या रंगाचे डोळे ही नजरेस पडता मनशांती होत खुप छान दिसायचे. गावातली लोक महांक्राल बाबांच्या आश्रमात गेल्यावर त्यांना मनु दिसायची. ज्याने गावातल्या लोकांना ही मांजर महांक्राल बाबांची किंवा विघ्नेशची आहे हे कळलेल .हे सर्व सांगायच मुख्य कारण म्हंणजेच मनुला दिवसभर बाहेर असताना उपाशेपोटी रहायला लागत नसे. कोणी- ना- कोणी गावकरी जे काही घरात भाकर-भाजी असेल ते तिला खायला देत असत.दिवसा गावात तर , रात्री आश्रमात असा तीचा दिनक्रम नेहमीप्रमाणे चालू होता. आज सुद्धा ती अशाच प्रकारे दिवसभर गावात हिंडत राहीलेली . मग ज्यासरशी रात्र झाली गेली ...मनु आश्रमात परतु लागली. परंतु मनुच अस भटकन पाषाणवाडीत घडणा-या घटनांना पाहता योग्य होत का? कोण सांगणार होत त्या मुक्या जिवास.. की रात्रीच्या अंधारात कोणीतरी फिरत आहे ..! ज्यास ना आकार आहे, ना उकार आहे! मांसाच्या चटकेने.. रक्ताच्या वासाने ते कोणाच ही असो (मनुष्य, मुक प्राणी, पक्षी भुकेल आहे ! आपले लहाण -लहाण पाय वाढवत मनु पुढे-पुढे चाललेली तिच सर्व लक्ष पुढे होत . मुक पक्षी, पाखर ,प्राण्यांच्या शरीरात- शरीराच्या प्रत्येक अवयवात . हात , पाय डोळे, कान , नाक ,पंख इत्यादी ..! एका वेगळ्याच निसर्गशक्तिने भरलेलेआहेत . प्ंखांमार्फत पक्षी हवेत उडतात लांबच अंतर कमीवेळात पार पाडतात. डोळ्यांचा उपयोग गडद अंधारातल निट पाहण्यास मदत करत .दुर्बिण प्रमाणे लांब-लांबच दिसुन येत. अमानविय शक्तिंना सुद्धा पाहु शकतात ....! हाता- पायांमार्फत लांब - उड्या मारत अफाट वेगाने पळू शकतात. कानांमार्फत आतीसूक्ष्म आवाज सहज रित्या ऐकतात .
अशा कित्येकतरी निसर्गा जवळून मिळालेल्या शक्तिंचा ठेवा त्यांच्या शरीरात , देहात आहे. मला कधीकाळी एक प्रश्ण पडतो की .. निसर्गाने ह्या सर्व अद्भूत शक्ति प्राण्यांनाच का दिल्या आहेत? मनुष्यास का नाही दिल्या ? अस असत तर.. मनुष्य सुद्धा मग हवेत उडाला असता, वेगाने पळाला असता..! डोळ्यांमार्फत दुर-दुरच पाहु शकला असता! परंतु कलियुगातला लोभ, मोह, हव्यास , वासना,लालच कुविचाराने सडलेल्या मेंदुच्या ह्या मनुष्याने आपल्या शक्तिंचा वापर सत्यकर्मा करीताच केला असता ह्याची शाश्वती , जबाणी कोणी दिली असती?
म्हणुनच देवाने ह्या सर्व शक्ति मुक्या प्राण्यांना दिल्या.
कारण त्या मुक्या प्राण्यांकडून आपल्या शक्तिचा वाईट वापर करण असंभव आहे हे देवाला सुद्धा माहिती होत . नाहीतर वाघ , सिंह, मोठ-मोठाले सर्प , हत्ती, ह्या सर्वांनी मिळून आजपर्यंत मनुष्याच्या लोकवस्तीत शिरकाव करत आपल स्व्त:च राज्य केव्हाचच प्रस्थापित केल असत.असो आपण पुढे पाहुयात =>
मनु जस-जस पुढे जात होती तिच्या पाठीमागुन रात्रीच्या अंधारात एक काळ्या रंगाची आकार-उकार नसलेली सावली जीवघेना पाठलाग करत येत होती.त्या काळ्या रंगाच्या सावलीला ना आकार होत नाही उकार .
एकापातळ कापडा सारखी हवेत उडणारी तिची आकृती काळ्या रंगाच्या धुरासारखी होती. स्मशानभूमित चिता पेटल्यानंतर निघणा-या प्रेताच्या चामडी जळालेल्या, केस जळालेल , करपट वास तिच्या शरीरातुन बाहेर येत होत. लहान मुलांना जत्रेतल्या बाजारात मिळणारी लेजरच जस लाल रंगाचा ठिपका असतो .त्याच प्रकारचे त्या काळ्या रंगाच्या सावलीचे मोठे लाल रंगाचे चमकणारे रक्तंनेत्र होते जे मनुवर खिळलेले .मनुला कसलीतरी चाहूल लागली . मोठ-मोठे कान एंटीना प्रमाणे वाकडे-तिक्डे फिरु लागले मनुने थांबुन मान गर्र्कन वळवत मागे पाहिल . कि तोच.. ! दोन्ही कानांत हेडफोन घालुन पटरी क्रोस कराव आणी त्याचक्षणी एक मोठा कानठल्या बसवणारा विशिष्ट प्रकारचा ( पोंँ..पों.....)आवाज यावा आणि एक मोठी अजस्त्र राक्षसमुखी ट्रेन त्रिफाट वेगासरशी येत डोळे मोठे व्हावे, हदयात कळ मारावी , व एक वेगवान धडक बसवुन शरीराच्या रक्त,मांस , हाड सर्वांचा अक्षरक्ष भुगा करुन जावी . सेम -हुबेहुब त्याच प्रकारे त्या काळ्या सावलीच्या तोंडून एक भयंकर हास्य रुपी किंकाळी निघाली पुर्णत पाषाणवाडी काहीक्षणापुरती का असेना अक्षरक्ष खालून वर पर्यंत अंगावर सरकन काटा येत थर-थरुन निघाली. अफाट वेग घेत त्या काळ्या सावलीने मनुच्या दिशेने मुखातुम गलणा-या काळ्या रंगाच्या लालेने चाल केली .मनुने त्या काळ्या रंगाच्या, लाल अंगार भरलेल्या डोळ्यांच्या सावलीला आपल्या दिशेने येताना पाहुन पळ काढण्याच ठरवल. परंतु वेग अमानविय होत. निसर्गशक्तिला किंबहुना 10 टक्केवरचढ, टक्कर देणार होत. त्या शक्तिपुढे त्या बिचा-या प्राण्याच काय चाललं असत. तरी सुद्धा मनुने आपल्या पुर्ण शक्तिनीशी धाव घेतली. छोट्या पावलांनी अक्षरक्ष खालची जमिनीतली माती काहीक्षणापुरती 25x च्या गतीने वर उडाली गेली .परंतु पुढच्या क्षणीच
जस गरूड पक्षी आपल्या शिकाराला हवेतून वेगाने खाली झेप घेत . आप्ल्या प्ंज्यांत पकडून घेऊन जातो .त्याच प्रकारे मनुला त्या काळ्या सावलीने आपल्या काळ्या हातांनी पकडल . मनुच्या तोंडून एक बचावाचा आवाज निघाला ( म्यांव्व्व्व.....) आणि पुढच्या क्षणी तिच्या मानेच लचका तोडला गेला .
पुर्णच्या पुर्ण गोल तोंड त्या काळ्या सावलीने आपल्या काळ मुखात घुसवल आणि एक चावा घेत मोडून काढल .कट, कट आवाज करत डोक्याची हाड तूटली , .बाकीच बिनधडाच हातात राहिलेल ते मनुच देह थोडफार हालचाल करत काहीवेळाने कायमच निर्जीव झाल .विघ्नेश आश्रमात आपल्या खोलीत जमिनीवर अंथरूण टाकून शांतपणे डोळे मिटुन पहूडलेला. तो जागाच होता डोळे मिटुन निद्रा देवता प्रसन्न होण्याची वाट पाहत होता . परंतु बाहेरुन अचानक आलेल्या मनुच्या आवाजाने. त्याच्या डोळ्यांची पापण्यांमधुनच डावी-उजवीकडे हालचाल झाली व विघ्नेशने खाडकन उघडले .
" मनु....?" विघ्नेशच्या मुखातुन आवाज निघाला .
□□□□□□□□□□□□□□□□□
आज कलियुगात जगणारा मनुष्य प्राणी पैश्यांसाठी हपापला गेलाय.
पैशांचा नाद, नशा इतका भयंकर आहे..... की एकवेळ विषारी प्राण्यांच्या डसलेल्या विषावर औषधांमार्फत काहीतरी टोटका, मार्ग, उपाय काढला जाऊ शकतो...परंतू मनुष्याच्या अंगात पैशांच्या बाबतीत जी लालसा, मोह , कृल्पतीचा विष संक्रमित झालेला आहे....त्यास अद्यापही कोणतच औषध अस्तित्त्व नाही. ज्या मनुष्यास हा पैशाचा किडा डसतोय...त्या विषाने मनुष्याला आपल्या समोरच्या मित्र, भाऊ, बहिण, आई-वडिल नात्यांची जरा मात्र जाण राहात नाहीये व ती इतकी.. की एकवेळ त्यास तो मारण्यास ही मागे-पुढे पाहत नाही !
हीच आजच्या कलियुगातली खरी सत्यता - खरी दृश्यफीत आहे .
गंग्या,भग्या, परश्या, कमल्या -हे चौघेजण त्याच पैशाच्या विषाच्या प्रभावा खाली चेपले जात ,आपल्यावर जिवापाड प्रेम करणा-या, आपल्या भविष्याहिताचा भल्याचा विचार करणा-या बिचा-या फुग्याचा खुन करुन बसलेले. त्या बिचा-याचा खून करुन सुद्धा त्या चौघांच्या चेह-यावर निराशेचा,पश्चात्तापाचा लवलेशही नव्हता ! उलट चौघांच्या चेह-यावर क्षणार्धात बक्कल पैसे मिळणार ह्या आनंदाच्या आविर्भावात चेह-याव4 एक विशिष्ट प्रकारच तेज पसरलेल. डोळ्यात एक चमक आलेली, असुरी चमक .

जंगलातील अंधा-या पायवाटेने मोबाईलच्या थोड्याफार प्रकाशात एक -एक पाऊल वाढवत भग्या, ग्ंग्या, परश्या, कमल्या स्टेशनच्या दिशेने निघालेले. त्या चौघांच्याही डावी-उजवीकडे हिरव्या रंगाची झाड होती .जी की कालोखात काळ्या रंगाने माखुन निघाल्या सारखी ,करपल्या सारखी भासत होती. एकक्षण अस वाटायचं की त्या झाडांच्या फांदीवर काले कपडे घालून कोणीतरी बसले आहे .त्यांची संख्या हाताच्या बोटांवर न मोजता येण्या इतपत आहे व एकटक- टकमक ते आपल्या पिवळ्या, निळ्या, लाल गोटी येवढ्या डोळ्यांनी त्या चौघांकडेच पाहत आहे . एका झाडाच्या फांदीवर पाठीकडून सोनेरी-बदामी आणि त्यावर काळ्या-पांढर्‍या रंगाचे पट्टे असलेली, पोटाकडे मुख्यत्वे रेशमी पांढरा रंग त्यावर बदामी रंगाची झाक आणि गडद तपकिरी रंगाची ठिपके . गोलसर आकारचे डोके , काहीसे माकडासारखे . चेहर्‍याचा रंग पांढरा-बदामी आणि चोच बाकदार असलेली घुबड बसलेली .(अपशकुनी घुबड) आपल्या पिवळ्या टपो-या डोळ्यांनी ती एकटक आजुबाजुलाच अंधारात पाहत होती. जणु तिची ती भेदक नजर अंधारात कोणाकडे तरी स्थिरावली होती. तेवढ्यातच झाडाखालुन चार माणसांच्या आकृत्या चालत -चालत थोड पुढे निघुन गेल्या. त्या घुबडेने एकवेळ त्या माणसांच्या पाठमो-या आकृतीकडे आपल्या वटारलेल्या पिवळ्या डोळ्यांनी, गोल डोक फिरवत वळुन पाहील . चारही माणसांच्या शरीरांवर..... शर्ट व खाली पेंट होती .प्रत्येका कडे वेग-वेगळ्या रंगाची बैगपैक आहे .चारही जनांच्या हातात फोनच्या टॉर्चचा उजेड होता...आणि ती सर्व मांणस म्हंणजेच भग्या, गंग्या, परश्या , कमल्या हे होते .चारही जनांच्या आकृत्या जस पूढे-पुढे जात अंधारात गडप झाल्या. त्यासरशी ती घुबड ज्या झाडावर बसली होती...त्या झाडापासुन 50 मीटर अंतरावर कलोखात कसलीतरी हालचाल होऊ लागली. काहीक्षण ती हालचाल होत राहिली आणि अचानक त्या जागी कालोखात दोन पिवळ्या रंगाचे डोळे चमकले .
" फिस्स्स्स्स्स्स्स.......! " विशिष्ट प्रकारचा आवाज झाला... नी डोळ्याची पापणी लवण्या अगोदरच त्या कालोखातुन एक सर्पपिशाच्चा चा अजस्त्र काळ्या रंगाचा चेहरा बाहेर आला. पिवळ्या रंगाचे डोळे त्यात एक काळी चीर ! दोन भागांत विभागलेली तोंडातुन क्षणा-क्षणाला बाहेर येणारी जीभ.! त्या सर्पपिशाच्चा च्या ओठांवर एक भयंकर भीतीने हदयाचा थरकाप उडाव अस छद्मी हास्य होत.जे पाहुन ती घुबड घुत्कारु लागली आपले पंख फांदीवरच दोन पायांवर उभ राहुन फड, फडू लागली. फड,फड आवाज होऊ लागला रात्रीची स्मशानशांतता मोडली जाऊ लागली .



" फीसस्स्स्सस्सस्स्स....! " त्या अजस्त्र सर्पपिशाच्चाने आपला काळ्या रंगाचा खवले असलेला हात उंचावला .व धार-धार नखांच एक बोट तोंडावर ठेवत पिवळ्याजर्द डोळ्यांनी त्या घुबडाकडे पाहिल.
" गप्प बस्स्सस्स्स्स्स्स्स्स्स ........! नाहीतर कच्चा खाईहिल..सससस्स्स...... स्स्स्स.स.स.....!"
खवखणारा आवाज बाहेर पडला आणि त्या प्रत्येक आवाजातल्या शब्दासरशी ती काळ्या रंगाची जीभ बाहेर येत स्स्स्स्स आवाज काढु लागली. सर्पपिशाच्चा च्या चेह-यावर एक छद्मी हास्य पसरल . त्या घुबडाला ही एकक्षण त्या सर्प पिशाच्चाची भीतीच वाटली की काय क्षणातच घुबडाची हालचाल थांबली ... व एकटक ते घुबड आपल्या मोठ-मोठाल्या डोळ्यांनी त्या सर्पाच्या शारीरीक रचनेकडे पाहू लागल...काय ते भलमोठ डोक छद्मी हास्य करत असलेल तोंड ज्याचा जबडा वासला गेल्यास कस दिसेल ह्याची कल्पना करताच अंगावर सर्र्कन काटा येतो! पिवळ्या रंगाचे अंधारात चमकणारे खूनशी डोळे, आणि खाली दोन काळ्या रंगाचे धार-धार नख असलेले खवल्यांनी भरलेले हात जे मृत्युची मिठी मारण्यास तत्पर आहे. खाली जमिनीवर रेंगाळणारी सापासारखी शेपूट ... परंतु सामान्य सर्पा सारखी नाही. अवाढव्य आकाराची मोठ्या झाडाच्या लाकडासारखी जाडजुड त्यावर धार-धार टोस्कुले काटे असलेली! जर कोणी त्या शेपटीत अडकला तर त्याच्या शरीराची काय हालत होईल ?विचारच भयंकर आहे !
. " सर्प पिशाच्च!" अचानक जंगलातल्या झाडांच्या फांदयामधुन, हवेतुन...रात्रीच्या अंधारातुन वेताळाचा घोगरा-भरडा मिश्रित आज्ञाधारक आवाज आला .
" जी मालक !" सर्पपिशाच्चाने आपले पिवळ्या रंगाचे डोळे आजुबाजूला फिरवले . परंतू त्याच्या पिवळ्या रंगाच्या डोळ्यांना अंधारात पाहण्याची शक्ति असुन सुद्धा काहीही दिसल नाही .
" काय पाहतोयेस..? " पुन्हा एकदा वेताळाचा तोच घोगरा-भरडा मिश्रित आवाज घुमला.
" आपल...." मुखातुन जीभ बाहेर आली." स्स्स्स्स्स्स्स्स..
दर्शन घ्यायच मालक ...!.."
" हिहिहिहीहिहि...., ....खिखिखिखिखी...! चार भिंतींमध्ये मधोमध उभ राहून शब्द उच्चारावे आणि तेच शब्द भिंतींवर आपटले जात काहीक्षण खोलीत घुमावे त्याच प्रकारे हे हास्य पुर्णत जंगलात घुमले .हास्याचा आवाज थांबला .वेताळाचे शब्द उच्चार बाहेर पडले
" मिळेल .......! काहीक्षण शांतता पसरली पुन्हा आवाज आला " माझ्या प्रिय भक्ता..! ...मिळेल....तुला दर्शन ! प्रथम माझ शस्त्र मला आणुन दे ? त्या चारही हरामखोरांच्या रक्तानी अंघोल घाल आणि माझ्या शस्त्रास इथे ह्या मंदिरात घेऊन ये..! मी वाट पाहतोय...! तुझी...वाट पाहतोय..ये .ये .ये ये.............." आवाज कमी-कमी होत जात कायमचा बंद झाला .आणि आकाशात एक वेडीवाकडी विज चमकली जात थेट जंगलातच कोठेतरी कोसळली... मोठा जमीन फाटल्याचा आवाज झाला. ती घुबड अद्याप सुद्धा आपल्या खूनशी नजरेनेत्या सर्पपिशाच्चा कडेच पाहत होती.कारण ते पिशाच्च सुद्धा घुबडाकडेच छद्मी हास्य करत पाहत होत. पुढच्याक्षणीच त्या पिशाच्चाने पापणी लवण्या अगोदरच आपल पुर्णत शरीर कालोखात मागे झोकून दिल व शेवटला अंधारात त्याची भलीमोठी अवाढव्य शेपुट त्या घुबडाला दिसली ....
□□□□□□□□□□□□□□□□ʼ
गंग्या, भग्या, परश्या, कमल्या चौघेजन गप्पा -गोष्टी करत चाललेले .पैसे मिळाल्यावर हे करु- ते करु..... अस- वागु नाना त-हेची बडबड चौघांच्या मुखातुन बाहेर पडत होती . की अचानक आकाशात एक लाल रंगाची सर्प मुखी विज कडाडली सर्व काही उजळून निघाल .सापाच्या शेपटी प्रमाणे सळसळ करत आकाशातल्या विजेचा प्रवाह थेट वेडेवाकडे आकार घेत जमिनीच्या दिशेने भिरकावला आणि त्या चौघांपासुन ठिक 100 मीटर अंतरावर जिथे एक 60-70 फुट ऊंचीचा- पूल होता खालून नदीच पाणी जात होत त्या पुलावर ती सर्पमुखी विज दंश केल्यासारखी कोसळली . काहीक्षण एक विशीष्ट प्रकारचा कानठल्या बसवण्यासारखा आवाज झाला. सर्वजन ह्या धोक्यापासुन अजाण होते. अस काही घडेल ह्याची काडीमात्र कल्पना कोणालाही नव्हती . ज्याने प्रत्येकाच्या हदयाचे ठोके वाढले होते. आयुष्यात पाहिल्यांदाच अशी समोर विज पडताना त्या सर्वांनी जणु पाहिली आहे की काय . कारण भीतीची लहर खाली पायांपासुन ते वर मस्तकापर्यंत सर्रकन भिन-भिनलेली. काहीवेळ ह्या अनपेक्षित घडलेल्या घटनेस वेळ जाऊन देत ते सर्व त्या पूलाच्या दिशेने निघाले .पुलाच्या दिशाने चालता-चालताच गंग्याने आपल्या खिशात हात घालून एक चपटी बाहेर काढली (देशी दारुची बाटली) .
तीच झाकण खोलुन त्याने 100 मीटरच अंतरपार करेपर्यंत ती सर्व आपल्या देहात उतरवली आणि एका गारुडयाच्या बिनवर नाचणा-या सापासारखा डुलत-डुलत चालू लागला. त्या सर्वांच्या चोरुन त्याने ही दारु पेली होती . परंतू वारा जस डोक्यात शिरु लागला तस गंग्याची चाल बदलू लागली आणि त्याच्या ह्या बदललेल्या चालेस पाहुन सर्वांना कळून चुकलं होत.... परंतू कोणीही एक शब्द सुद्धा उच्चारला नाही ! काहीवेळातच ते सर्वजन त्या पुलापाशी येऊन पोहचले तस त्यांना तो दुर्घटनाग्रस्त पूल दिसला. 80-90 मीटर अंतरापर्यंतचा पुल होता-तो.त्याच्या खालून एक नदी वाहत होती नदीच पाणि काळ्या रंगाच दिसुन येत पाणि मंदगतीने पुढे -पुढे जात होत. विज कोसळल्याने पुलाचा नेमक मध्येभागच तूटला होता . चौघेजण त्या तुटलेल्या भागापासुन 10 मीटर अंतरावर उभे राहीले.
" आईची××××ड ! ..ह्या पुलाला पन आताच तुटायच होत..!"
परश्या आपल्या मोबाईल मध्ये वेळ पाहत म्हणाला. 10:00वाजलेले आणि 10: 40 वाजता स्टॉपवर शहरात घेऊन जाणारी शेवटची बस होती.
" ए ..य......पयश्या..! " दारुच्या नशेत असल्यागत गंग्या लहानमुलासारखा बोबडा बोलू लागला. " टू घाबलू नको ले ..! गंग्याने आपल तोंड विशिष्ट प्रकारे हळवल व पुढे उच्चारला .
" मी ना..! तुला खांद्यावल बशुन नेईल..!" ग्ंग्या आपले दोन्ही पाय खाली वाकवत पाठ परश्याचे दिशेने करत खाली नदीच्या पाण्यात पाहु लागला. तो काय करत आहे एकवेळ त्याला सुद्धा कळालं नाही.
" घालू का लाथ आईघाल्याच्या पाठनात ? इथ परिस्थिति काय आहे आणि हा दारवा पेईत बसलाय मा×××त !" परश्याने एकवेळत्या बाकीच्या तिघांकडे पाहील.
" अरे सोड त्याला.. नको टेंशन घेऊ ....? " परश्याने बिडी पेटवली .
........" आता काय करायच ..! "...भग्या उच्चारला
" हो ना! लवकरात लवकर स्टेशनवर पोहचायला
हव! न्हाय तर बस निघुन जायची..!" परश्याने पुन्हा फोन मध्ये पाहिल तिघांचीही पुढे काय करायच पुल कस पार करायच ह्यावर चर्चा सुरु झाली. इकडे गंग्या अद्याप सुद्धा दारुच्या नशेत त्याच अवस्थेत बसुन खाली नदीच्या काळ्या रंगाच्या पाण्याकडे पाहत होता.
न जाने कित्येक ऊशीर झाला असेल...... ह्याची त्याला नशेत काडीचीही कल्पना आली नाही . तो एकटक तंद्री लागल्या सारखा खालीच पाहत होता.की अचानक त्या काळ्या रंगाच्या पाण्यात दोन पिवळ्या रंगाचे डोळे चमकले. त्या पिवळसर गोल प्रकाशाला पाहताच एकवेळ गंग्याने आपले डोळे बारिक-बारिक करत मान पुढे-पुढे घेऊन जाण्यास सुरुवात केली. पुन्हा एकदा आकाशात विजेचा झटका बसला , मोठा आवाज होत सर्वकाही लक्खपणे उजळून निघाल आणि त्याचक्षणी त्या पाण्यात गंग्याला अस काही भयंकर अमानवीय दृश्य दिसल की त्याची दातखीळी बसली जात दारुचा एकनी-एक घोट घेतलेल्या विषाची नशा धाडदिशी उतरली. भग्या, परश्या, कमल्या ते तिघेही आप-आपल्यात पुल कस पार करायच ह्या विषयावर चर्चा करत होते . की अचानक एक मोठा दगड पाण्यात पडल्यासारखा विशिष्ट प्रकारचा( धप्प) आवाज झाला . सर्वांनी एकदाच गंग्या ज्या दिशेला बसला होता त्या दिशेला पाहिल .परंतू आता तिथे कोणीही नव्हत.... होती ती फक्त ...रीकामी जागा . सर्वांनी पुढे होतच... एक कटाक्ष तुटलेल्या पुलाच्या भागून खाली नदीत टाकल तस त्या सर्वांच्या नजरेस प्रथम काल्या रंगाच अंधार , व गरम झालेल्या पाण्यातुन ज्याप्रकारे वाफा निघाल्या जातात त्याप्रकारे नदीच्या पाण्यातुन हळूवारपणे निघणार सफेद रंगाच वाफांरुपी धुक दिसून आल. काहीक्षण ते सर्वजण फक्त नुसते पाहतच होते की अचानक त्या पाण्यातुन एक मानवी हात झप दिशी पाणि उडवत बाहेर आला व काहीक्षण हाताच्या बोटांची हालचाल करत अलगद पुन्हा पाण्यात निघुन गेला.
............




क्रमश : ...

भाग 9 -10 पासुन ह्या कथेचा नवा अध्याय सुरु होईल..🙏🏼
हो एक कथा नाही चेटक्याच जंगलच लास्ट पर्व सुद्धा आहे.
जय आणि अनिशाच .......!