नरकपिशाच - भाग 8 jay zom द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

नरकपिशाच - भाग 8

द -अमानविय सीजन 1.
आग्यावेताळ..भाग 8

महाएपिसोड...1) .

...प्रथम अध्याय समाप्ती प्रारंभ

" अर ह्यो ..बेवडा मरायच्या अगोदर काय तरी
कराला पाहीजे..!"

भग्या धांदळ उडाल्या सारखा खाली पाण्यात पाहात म्हणाला .
त्याच सर्व लक्ष पुढे पाण्यात होत. कालपट रंगाच पाणी ते रात्रीच्या अंधारात अक्षरक्ष विंचु काट्यांनी भरलेल्या जंगलातल्या दल-दली सारख भासत होत त्यासोबतच पाण्यामधुन सफेद रंगाच्या वाफा निघाल्या जात पाणी किती थंड असेल याची शाश्वती देत होत. भग्या अद्याप सुद्धा खाली पाहत होता ... त्याच्या पाठिमागे कमल्या आणि परश्या उभे होते . परश्याच्या हातात एक स्मार्टफोन व कमल्याच्या हाती एक चार्जिंगवाली टॉर्च होती .टॉर्चचा गोल पिवळा प्रकाश पाण्यात फेकुन कमल्या गंग्याचा शोध घेत होता.
" मरु दे साल्याला..!" परश्याने ओठ चावले ! त्याच्या ह्या वाक्यावर भग्या ने मागे वळुन पाहिल.
" ए परश्या तु गप रे.! " भग्या हे वाक्य उच्चारुन काहीक्षण थांबला मग पुन्हा म्हणाला ." तुम्ही थांबा !.... म्या उडी मारतु !" ..अस म्हंणतच जाड्या भग्याने पुलावरुन शर्ट पेंट कपड्यांसहितच 50-60 फुटांवरुन पाण्यात खाली उडी घेतली . पाण्याचा विशिष्ट प्रकारचा ( ध्प्प्प) आवाज झाला हवेत पाणि उडाल गेल .भग्याच्या शरीरास पाण्याचा स्पर्श खुपच थंड जाणवला अगदी हिमालयात असलेल्या बर्फाच्या पाण्यासारखा .काहीक्षण त्याच्या पुर्णत शरीरावर थंड पाण्याचा स्पर्श पुर्णत अंग शहारुन गेला... तरी सुद्धा भग्याने पाण्यात हात-पाय हळवत आपला तोल सांभाळत गंग्याला शोधण्यास सुरुवात केली. परंतू त्याचा थांगपत्ता काहीकेल्या लागत नव्हता. भग्याने हात-पाय हलवत आपल डोक पाण्याबाहेर काढल.. काहीक्षण गुदमरायला जे झालेल त्याला ...तो कोणी मासा थोडी ना होता जो पाण्यात श्वास घेऊ शकत होता! भग्याने तोंडावाटे एक मोठा श्वास घेत तोंडात हवा कोंबली.त्यासरशी त्याचे गाल एका बेडका सारखे फुगले व पुन्हा तो पाण्यात निघुन गेला. पुलावरुण कमल्या, परश्या पाण्यात पाहत हातामध्ये टॉर्च पकडून टॉर्चचा प्रकाश पाण्यात फेकत होते .तो प्रकाश पाण्यात पडला जात त्या दोघांच्या आकृत्या पुलावर आहेत हे कळून , दिसुन येत होत. नदीची खोली खुप होती काळ्या रंगाच्या पाण्यात खाली हिरव्या रंगाचशेवाळ , छोठ-मोठ्या काळ्या रंगाच्या दगडी , लहान -मोठे मासे सर्वकाही थोड-फार दिसुन येत होत. भग्याच्या तोंडावाटे श्वास सोडताच बुड, बुडे विशिष्ट प्रकारचा (बुड-बुड)आवाज करत पाण्यात आपल चित्र तैयार करत होते. भग्याने पुन्हा श्वास घेण्याकरीता पुन्हा एकदा हातपाय हलवत आपल डोक पाण्याबाहेर काढल.
" ए भग्या ? भेटल का नाय त्यो.?" भग्या बाहेर आला आहे हे पाहुन कमअल्या मोठ्याने ओरडतच म्हणाला . भग्याने हलकेच वर पाहत डोळ्यांवरुन हात फिरवत पापण्यांना लागलेले द्रव बिंदू पुसले व म्हणाला .
" अर पाण्यात काय दिसत नाय हाय ..!××××× " भग्याने एक विशिष्ट प्रकारची
शिवी हासडली !
" ओय भग्या थांब ! " परश्याने आपल्या ह्या वाक्यासरशी बैग-पेकची चेन खोलुन आतमधुन एक वॉटरप्रुफ हेड टॉर्च बाहेर काढली " ही घे !" म्हंणतच त्याने ती पुलावरुण थेट भग्याच्या दिशेने फेकली. भग्याने सुद्धा मग अचूक अंदाज घेत ती आपल्या हाती झेलली..मग स्विच ऑन करत डोक्याला ती टॉर्च अडकवत तो पुन्हा पाण्यात निघुन गेला .
□□□□□□□□□□□□□□□
वेताळ मंदिर - सिद्धांतच फार्म हाऊस

सिद्धांतच फ़ार्म हाऊसच काम अद्याप पुर्ण झाल नव्हत !काम पुर्ण होण्यासाठी जेमतेम माहिना तरी लागणार होता. त्यासाठी सिद्धांतने खुप सारे पैसे खर्च करण्याच ठरवुन घेतलेल ! राकेशने सुद्धा बिगारी- मेस्त्री जास्ती -जास्त कामावर रुजू केलेले ज्याने काम फटा-फट होत होत.सिमेंट, भुसा, , खडी, विटा इत्यादी बांधकामाच सामान सुद्धा मग कामगार जास्त असल्याने आधीच मागवुन ठेवलेल..ते ही मोठ्या प्रमाणात!. कारण सिद्धांतला ह्या जागेत लवकरात-लवकर रहायला यायच होत .पैश्याची बिल्कुल कमी नव्हती की सामान फुकट गेल तरी
काही प्रोब्लेम, त्रास होणार नव्हता.
दिवसा -उजेडी फार्म हाऊस बांधण्यासाठी मजुरांची धावपळ सुरु असायची! ज्याने हे जंगलातल वातावरण काहीक्षण का असेना शांततेत जगत नव्हत! म्हंणजेच मजुरांचा, मशीनचा, हातोड़यांचा इत्यादी आवाज घुमला जात शांतता भंग पावत होती. परंतु जस-जस पाच साडे पाच व्हायला सुरुवात व्हायची त्यासरशी मजूर लोक आप-आपल्या घरी निघुन जायचे. हा तस म्हणायला कै:ग्ंग्या , भग्या, कमल्या, फुग्या,परश्या ते पाच जण इथे राहात होते . परंतु ते सर्व आप-आपल्या पत्र्याच्या घरात बसुन जेवण करुन लवकर निजुन जायचे. मग त्यानंतर दिवसा उजेडी शांततेला भंग पावणारे आवाज थांबले जाऊन ....तिथे एक विशिष्ट प्रकारची भीतियुक्त स्मशान शांतता पसरायची. टाचणी पडली तरी मोठा आवाज व्हावा अशी भयाण शांतता पसरायची.जंगली भाग असल्याने मेलेल्या मनुष्याच्या प्रेतावर ठेवल्या जाणा-या पांढ-या कापडा सारखा पातळ नपारदर्शक धुकपसरायच .प्रेताच शरीर जस थंड पडाव तशी अंगावर काटा उभा राहिल अशी थंडी पडायची! रात्री-अपरात्री जंगलातुन कोल्हा, लांडगा जंगलातले इतर प्राणि पक्ष्यांचा,, रडण्या-ओरडण्याचा भेसूर आवाज थंड हवेत पुर्णत फार्म हाऊसला रात्रभर वेढा घालत असे.सिद्धांत त्याची family ह्या जागेत रहायला येईण... त्यावेळेस त्या सर्वांना काय पाहायला, अनुभवायला मिळेल ते नियती ठरवणार होती का? की तो सैतान ठरवणार होता?
वेताळाच्या मंदिरापासुन ठिक 30-40 मीटर अंतरावर फुग्याच शरीर जमिनीवर पालथ पडल होत. पाठीमागुन-पोटातुन भोसकलेल्या तलवारीने पांढ-या रंगाच शर्ट लाल रक्ताने माखुन निघालेल. शरीरातुन रक्त बाहेर येत रक्ताचा सडा असा काही जमिनीवर पसरलेला .... की आजुबाजूला रक्ताचा चिखल तैयार झालेल . जंगलातुन हलके-हलके ढोल बदडवण्याचे आवाज येत होते . काहीक्षणातच वेताळाची भुतावळ मंदिराजवळ पालखी सहित पोहचणार होती .
फुग्याच शरीर रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पालथ पडलेल . चेह-याला लाल रंगाच रक्त लागल जात चेह-यावर माती चिकटलेली .
जंगलातुन हलके-हलके येणा-या ढोल-ताशांचा आवाज आता जोर घेत आणखी-आणखी जवळ येत फुग्याच्या कानात शिरु लागलेला .वाचक मित्रांनो तुम्ही सर्वांनी एक म्हण नक्की ऐकलेली असेल ....की देव तारी त्यास कोण मारी ! भग्याने वेताळाच्या तलवारीने फुग्याच्या देहावर
जरी प्राणघातक वार केले असले... तरी सुद्धा तो त्या वारांनी बचावला होता . काल आला होता परंतु वेळ आली नव्हती..सृष्टीच्या अनोख्या नियमां मधला नियतीचा एक विशिष्ट प्रकारचा मेलेल्या ही मणुष्यास कधी-केव्हा पुनरजीवन मिळाला जात !
असा हा नियम फुग्यास प्राप्त झाला होता. एक शेवटच अमरत्व जणु देवाने त्यास दिल होत. परंतु फुग्याच हे अस पुनरजिवित होण देवाची काही खेळी, माया तर नव्हती ना? की फुग्या पुढे होणा-या एका नव्या युद्धाचा साक्षीदार तर होणार नव्हता ना ? नाना त-हेच्या प्रश्णांची उत्तर एक-एक करत पुढे येत होती.
(ज्याप्रकारे एका हदय बंद पडलेल्या पेशंटच्या शरीरास.... छातीवर एक डिफिब्रिलेटर मशीन ने झटका द्यावा..आणि त्या पेशंटचे डोळे विस्फरले जात तोंडावाटे एक मोठा श्वास भरला जात तो पुन्हा एकदा जिवंत व्हावा. त्याच प्रकारे फुग्याच्या शरीरास एक झटका बसला..धाडदिशी डोळे उघडले गेले तोंडावाटे मोठा श्वास भरला गेला.
□□□□□□□□□□□□ʼ
" ...मनु.....??" विघ्नेशच्या मुखातुन वाक्य निघाल ..! दोन्ही हात जमिनीवर टेकवतच तो आपल्या अंथरूणात उठुन उभ राहीला .
मनीचा आवाज आला होता ! परंतु रोजच्या प्रमाणे येणारा हा आवाज नव्हता. कोण्या प्राण्याने हल्ला करताच क्षणी बचावाचा , लढाऊचा पवित्रा पत्कारताक्षणी मुखातुन निघणारा हा आवाज होता. याचा अर्थ मनु संकटात असुन कोण्या प्राण्याने तिच्यावर हल्ला तरी केला होता ? किंवा प्राण्यांच्यातच लढाई झालेली असेल ! विघ्नेशच्या मनात हे सर्व विचार येत ...दोन्ही डोळे डावी-उजवीकडे फिरत होते.
"आवाज जवळूनच आला आहे! ह्याचा अर्थ मनु नक्कीच आश्रमाबाहेरच कोठेतरी असायला हवी ! आपल्याला लवकरात-लवकर तिच्या सोबतकाही अघटित , घडण्याअगोदर तिला आश्रमात घेऊन यायला हवं! " विघ्नेशने आपल्या मनातच काय तो निर्धार केला व लागलीच आराम खोलीतुन बाहेर पडला मग आरामखोलीचा दरवाजा हळुच कसलाही आवाज न करता आपल्या मागे ओढून घेत ..! तो आश्रमाबाहेर घेऊन जाणा-या दरवाज्याच्या दिशेने निघाला .पाषाणवाडी गावात लाईट नव्हती... त्याकारणाने आश्रमातल्या प्रत्येक खोलीसहित पुर्णत गावात मशाली, टीटव्या, कंदील , जळत होते. पुर्णत आश्रम तांबड्या प्रकाशाने भरुन निघालेल ! त्याच तांबड्या प्रकाशात चोरपावलांनी विघ्नेश आश्रमाबाहेर निघालेला . चोरपावलांनी म्हंणजेच महांक्राल बाबांनी दिलेल्या ताकीद नियमांप्रमाणे पाषाणवाडीत रात्री काहीतरी अमानविय फिरणार होत किंवा फिरत असेल. विघ्नेशला सुद्धा नियमांबदल माहीती होत ..परंतु आपल्या लाडक्या मनुला आश्रमात घेऊन येण्यासाठी तो निघालेला.
आजता-गायत त्याने ह्या सर्व गोष्टिंबदल थोडफारच ऐकलेल. ज्याने ह्या सर्व गोष्टी आस्तित्वात असतील किंवा नसतील ह्यावर त्याचा विश्वास किती होता हे त्यालाच ठावुक होत.एकवेळ आपण महांक्राल बाबांनी सांगितलेले नियम तोडत आहोत ! हे विचार मनात येताच पाउले मागे फिरत होती .परंतु पुढच्याक्षणीच डोळ्यांसमोर मनुचा हसरा चेहरा उभा राहिला जात मागे जाणारी पाउले पुढे पडत होती. अशातच 20 -25 पावल चालून झाली जात ! तो आश्रमाबाहेर जाणा-या दोन झापांच्या
दरवाज्याजवळ येऊन पोहचला. एकवेळ त्याने मागे -वळून महांक्राल बाबांच्या आराम खोलीच्या दरवाज्याकडे पाहील. दोन झापांचा दरवाजा होता तो ..! दरवाज्याच्या बाजुलाच भिंतीवर अडकवलेल्या अवस्थेत एक कंदील जलत होता .कंदिलाचा तांबडा प्रकाश दरवाज्यावर पडला जात दरवाजा बंद आहे हे कळून येत होत. पुर्ण खात्री करुन झाल्यानंतर
त्याने हळूच पुढे पाहत आश्रमाबाहेर जाणा-या दरवाज्याच्या कडीवर हात ठेवला.
□□□□□□□□□□□
महांक्राल बाबा आपल्या आराम खोलीत मांडी घालून ध्यानास्थ बसलेले . त्यांच्या पुर्णत शरीरातुन सफेद-चांदेरी असा मिश्रित रंगाचा प्रकाश बाहेर पडत होता . त्यांच्या पुढ्यात एक रुद्राक्षधारी माळ अक्षरक्ष कोणत्याही आधाराशिवाय हवेत तरंगत होती.त्या रुद्राक्ष माळेत एकुण एकवीस रुद्राक्ष होते. त्यातला एक रुद्राक्ष सोडून बाकीचे रुद्राक्ष विशिष्ट प्रकारच्या रंगाने चमकत होते . पाच रुद्राक्ष -निळ्या रंगाने .. व बाकीचे प्ंधरा - पिवळ्या , लाल , हिरव्या रंगाने चमकत होते. काहीवेळा अगोदर बाबांच शरीर जे की सफेद-च्ंदेरी मिश्रित रंगाने चमकत होत. ते आता ह्याक्षणी प्रखर सुर्याच्या तप्त गोळ्या प्रमाणे तापु लागल. तांबडा प्रकाश शरीरातुन बाहेर निघाल जात पुर्णत खोली तांबडया प्रकाशाने भरुन निघाली जात, केसांच्या जटा सुटल्या व हवेत तांबड्या प्रकाशाने चमकुन सापासारख्या वळवळु लागल्या.कपाळावर लावलेला महादेवाच्या कुंकवामधुन सफेद रंगाच प्रकाश निघाल जात..
तोंडावाटे महामृत्युंजय मंत्र बाहेर पडू लागल .

" !ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् !" प्रथम मृत्युंजय मंत्राची ओळ आश्रमातल्या चारही भिंतीवर आदळली जात एकप्रकारे एकच ओळ चारवेळा उच्चारली अस भासल आणि पुर्णत पाषाणवाडीत लाल रंगाचे ढग जमा झाले . रात्रीचा अंधार धुळ साफ करावी तस बाजुला सारला गेला .ते जे काही वेताळाच्या हुकूमावरुन अमानवीय रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत शिकारीच्या उद्देशाने पाषाणवाडीत घुसलेल. ज्यास ना आकार होता नाही उकार ! कोणाच्या घरावर बसलेल, झाडावर बसलेल, कालोखातल्या फटीत लपलेल त्यांच्या शरीरावर चाबकाने प्रहार कराव्या तसे विजा बरसू लागल्या ..व त्या काळ्या सावल्या फट, फट फटाक्यांची माल फुटावी तस विशिष्ट प्रकारचा आवाज होत फुटून जात मरण पावू लागल्या . घरांवर , जमिनीवर , झाडांवर सफेद काळ्या रंगाची राख पसरु लागली. कुजलेला, सडका, घाण वास वातावरणात घुमू लागला .
2 )उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात् ||"

महांक्राल बाबांच्या मुखातुन शेवटची ओळ ज्यासरशी बाहेर निघाली . त्यासरशी कपाळावर पडलेल्या त्या पांढ-या प्रकाशातुन एक लाल रंगाचा मृत्युंजय मणी बाहेर येऊ लागला. त्या मणीचा तेज इतका प्रखर होता की त्या मण्याकडे डोळे उघडे ठेवुन पाहान असंभव होत . हलके-हलके सुक्ष्म गतीने तो मणी हवेत आपल्या लाल रंगाचा तेजोमय प्रकाश फेकत त्या रुद्राक्ष माळेतल्या 21 व्या रुद्राक्षात जाऊन गडप झाला...ती पुर्णत रूद्राक्ष माल काहीक्षण लाल रंगाने चमकली , त्तक्षणी आकाशात एक कानठळ्या बसवणारी लाल रंगाची विज वेडे-वाकडे आकार उकार धारण करत आकाशात चमकली ...की साक्षात महाकालचा रौद्ररुप त्या ढगांत तैयार होऊ लागल . क्रोधहिंत डोळे..सापा सारख्या हवेत ऊडणा-या जटा ...गळ्यात असलेला फुत्कारणारा नागराज ..आग ओकणारा त्रिनेत्र.. सर्व काही आकळनक्षमतेच्या पलिकडच होत . आता ह्या क्षणी जर कोणि महादेवाच्या रौद्रवतारा समोर उपस्थीत असेल तर त्याची राख रांगोळी निश्चिंत होती .
□□□□□□□□□□□□□□□□
कपाळावर हेड टॉर्च बसवुन भग्या त्या टॉर्चच्या पिवळ्या प्रकाशात पाण्यात ग्ंग्याचा शोध घेत होता. टॉर्चच्या पिवळ्या प्रकाशात सर्वकाही पहिल्यापेक्षा चांगल दिसुन येत होत. टॉर्चचा गोल प्रकाश दुर-दुर पर्यंत पोहचत आजू-बाजुच सर्वकाही द्रुश्य नजरेस आणुन देत होत. हात- पाय हलवत भग्या आजुबाला ग्ंग्याचा शोध -घेत होता . अशातच भग्याच्या हेड टॉर्चचा प्रकाश एका मोठ्या काळ्या दगडावर जाऊन पडला ...
भग्याच लक्ष सुद्धा त्या दगडाकडे गेल ..त्यासरशी त्याला त्या काल्या दगडावर एक मोठा गुफेला असतो तसा होल दिसला...आणि त्या होलमधुन किंचीत हिरव्या रंगाचा प्रकाश बाहेर येताना दिसला ..
ज्याप्रकारे काल्या ढगांच्या आतून सुर्याची एक, दोन प्रकाश किरणे विशिष्ट प्रकारे बाहेर निघतात ..त्याच प्रकारे तो हिरवा प्रकाश त्या होलमधुन बाहेर येत होता. भग्याने त्या हिरव्या प्रकाशाकडे पाहत नाकावाटे थोडी हवा सोडली विशिष्ट (बुड, बुड) आवाज होत बुड-बुडे निघाले ..व भग्या हिरव्या रंगाच्या त्या प्रकाशाच्या दिशाने निघाला .
□□□□□□□□□□□□□□□□
विघ्नेश हलकेच आश्रमाचा दरवाजा उघडून बाहेर आला. बाहेरयेताच पुढील द्रुष्यपाहून एकवेळ त्यास आश्चर्याचा धक्काच बसला...! डोळ्यांना जे काही दिसल ते पुढील प्रमाणे होत.पाषाणवाडीतल्या आकाशात लाल रंगाचे ढग जमा झालेलें..आजूबाजूला लाल रंगाचा प्रकाश पसरलेला सर्वकाही रक्तासारख लाल झालेल ! सेकंदाच्या पुढे-पुढे सरकणा-या काट्यासरशी लाल रंगाची विज -लाल रंगाच्या ढगांमध्ये चमकत होती. कधीही न अनुभवलेले -पाहिलेले आकळनक्षमतेच्या बाहेर विचार केलेले हे दृष्य पाहून एकवेळ
विघ्नेशच तोंड वासल गेल..डोळे मोठे झाले. आपण स्वप्नात आहोत की सत्ययुगात हे सुद्धा काहीक्षण त्यास कळेना..! जागेवरच लोटाँगन घालत
तो चारही बाजूच दृष्य पाहु लागला! विघ्नेशने ज्यासरशी जागेवर फिरत मागे वळून पाहिल त्यासरशी त्याची नजर लाल रंगाच्या आकाशात गेली आणि पुढील द्रुष्य पाहुन त्याचे दोन्ही हात आपो-आप जोडले जात ओठांवर मंद हसू पसरल जाऊन मुखातुन उच्चार बाहेर पडला..

......." महादेव ..."
लाल रंगाच्या आकाशात महादेवाची रौद्र-रुप धारण केलेली..त्रिनेत्र रुप
अवतारी आकृतीपाहुन विघ्नेशच्या मुखातुन निघालेल्या वाक्यासरशी!
महादेवाच्या गळ्यात असलेल्या नागराजने फुत्कार सोड़ला..आणि त्याच क्षणी नागराजच्या फुत्कारणा-या मुखातुन एक वेड्या वाकड्या आकाराची वीज अशीकाही वेडे-वाकडे वळण घेत विघ्नेशच्या दिशेने निघाली की विघ्नेश सुद्धा भांबावुन गेला ! पुढील येणा-या त्या लाल रंगाच्या विजेला पाहुन एकवेळ विघ्नेशची पाचावरण धारण बसली. विचारही न केलेली क्रिया घडल्याने त्यास एक धक्का बसला ! आपल्यावर का वार होत आहे? समोरुन आपल्याकडे काय झेपावत आहे.? नागराज आपल्याकडे असे पाहुन फुत्कारले का? त्यांच्या मुखातुन हे काय निघाल ? ते आपल्या दिशेने का येत आहे ..? नाना त-हेचे विचार मनात घोळू लागले की पळायला सुद्धा वेळ मिळु शकला नाही! आणि तसही का पळायच ? इतक्या वर्ष विघ्नेशने महांक्राल बाबांसमवेत महादेवाची पुर्णत नेक मनाने , भक्तिभावाने भक्ति केलेली! महांक्राल बाबांप्रमाणे महादेवास आपला पिता मानलेल. ते अस आपल्या प्रिय भक्तावर वार करण असंभव होत.! परंतु विघ्नेशला एक गोष्ट ठावुक नव्हती.? महादेवांचा
हा रुप महा-रौद्र अवतार होता. त्रिनेत्र उघडल जाऊन त्यातुन लावह्या सारखी आग बरसणार होती आणि जो कोणी त्या लाव्ह्याच्या आगी समोर येणार होता त्याची राख होणार होती. विघ्नेशचे दोन्ही हात जोडले गेले होते ..महादेव आपल्या प्रिय भक्तांवर कधीच वार करत नाही अस त्यास वाटत होत! परंतु तस होणार होत का?
मग या पाहुयात पुढे =>
विघ्नेशचे दोन्ही हात जोडले जात डोळे त्या लाल रंगाच्या वेडेवाक्डया आकाराच्या विजेवर स्थिरावलेले. पुढच्याच क्षणी 25×चा व्हिडिओ चा मोड जसा ऑन व्हास तस घडू लागल. लाल रंगाच्या प्रकाशाने विघ्नेशचा पुर्णत चेहरा चमकुन निघाला आणि पुढच्याच क्षणी त्याच्या दोन्ही विस्फारलेल्या डोळ्यांच्यात ती नागराजच्या मुखातुन निघालेल्या विजेच छोठस चित्रफित दिसुन आल. नागराजचा डंखरुपी ती वीज अशी काही विघ्नेशच्या शरीरावर डसल्या सारखी बसली.! की क्षणार्धात त्याच्या पुर्णत शरीराची राख झाली ! वेदना सुद्धा त्याच्या शरीरास मिळाली नाही इतका भयंकर अंत विघ्नेशला मिळाला.
□□□□□□□□□□□□
आश्रमातला महादेवाच्या मूर्तीसमोर छोठासा दिवा तेवत होता की अचानक बिना हवेच्या झोताने तल दिवा झपदीशी विझला.तसे महांक्राल बाबांनी आपले दोन्ही डोळे झपदीशी उघडले .
" बाळ विघ्नेश..!!!" महांक्रल बाबा मोठ्याने ओरडलेच
व आपल्या जागेवरुन उठुन खोलीच दार उघडून आश्रमाबाहेर जाण्यासाठी निघाले! जणु त्यांना आपल्या लाडक्या विघ्नेशचा अंत
कळाला होता .!
□□□□□□□□□□□□□□□□□
रात्रीची थंडी अंगाला झोंबत होती! काळ्या कुट्ट रंगाचा कालोख मनात भीती उत्प्पन्न करत होता. जंगलातल्या झाडांवर बसलेले पक्षी टक लावुन त्या विचीत्र आकाराकडे पाहत बसलेले तर काही त्यास पाहुन आकाशात उडून जात होते.
" स्स्स्स्स्स्स...! स्सस्स्स्स्स्स्स! फीससससस्स्स!"
भलमोठ चॉकलेटी रंगाच फणा काढलेल डोक आणि त्यावर खवले.
पिवळ्याजर्द रंगाचे खूनशी डोळे ज्यांचा रंग सावजाला घाबरवण्याकरीता कधी हिरव , लाल , पिवळ अस होत असे. दोन खवले असलेले हात ज्यांना दोन पंजे असुन धार-धार नख होती ..सावजाच शरीर फाडण्यासाठी ते उपयोगी होत असे. भलीमोठ्ठी झाडाच्या लाकडासारखी काटे असलेली कमरेपासुन कितीतरी लांब पर्यंत वळ-वळनारी काटेरी शेपुट ..ज्यात न जाणे कित्येक जण अडकली असावी कारण त्या काट्यांची धार जराही कमी झालेली नव्हती .
आणि असाहा सर्प पिशाच्च एका झाडामागुन आपल्या पिवळ्याजर्द खुनशी डोळ्यांनी परश्या -कमल्या दोघांच्या पाठमो-या आकृतीकडे
जिभळ्या चाटत पाहत बसलेला .त्याला हव असत तर आता ह्याक्षणी सुद्ध तो त्या दोघांच्या शरीराचा एक-नी -एक हाड चावुन खात बसला असता परंतु सावजा सोबत खेळ -खेळुन त्यास मारण्यात ह्या सर्पपिशाच्च प्रजातीला एकवेगळच आनंद मिळायच म्हणूणच तो सर्पपिशाच्च असा झाडामागुन त्या दोघांकडे विकृत-खुनशी नजरेने पाहत बसलेला .परश्याला न राहून -राहुन अस वाटत होत ! की कोणीतरी आहे जो आपल्याकडे ह्या अंधारातुन कशाचातरी फायदा घेत लपून बसत आपल्याकडे पाहत आहे.परश्याने एकवेळ कमल्या कडे पाहिल तो एकटक नदीच्या पाण्यात पाहत होता . जणु त्यास कसलीही जाणीव ,चाहूल लागली नव्हती ! परश्याने एक गिरकी घेत हाता असलेला टॉर्चचा पिवळा प्रकाश जंगलातल्या झाडांवर फिरवला ! पिवळ्या रंगाचा गोळ प्रकाशा तो एका पट्टया-पट्यात प्रत्येक झाडांवर पडला जात त्या आजुबाजुच सर्वकाही नजरेस आणून देऊ लागल .
की तोच एका झाडावर टॉर्चच्या प्रकाशात परश्याला मानवी-हात दिसला ! त्यासरशी त्याने आपले दोन्ही डोळे छोठे करत एक-एक पाऊल वाढवत आपला मोर्चा त्या झाडाच्या दिशेने वळवळा.मनुष्याच मन कस चंचल असत . जिथे जायला नको तिथे सुद्धा घेऊन जात -जे करायला नको ते करुन घेत ! आणि मग धोक्यात फसत... परश्या एकुन 30-35 पावल चालून झाल्यावर त्या झाडाजवळ पोहचला. फक्त 10 पावलांवर त्या झाडाच्या मागच्या बाजुस कोण असेल हे दिसणार होत .
परंतु परश्या ते 10 पाऊल चालणार होता का? की पुन्हा आल्या पाऊले मागे फिरणार होता? परंतु त्याकरीता परश्यास धोका कळायला हवा? नाही का ? तो तर पुढील धोक्यापासुन अनभिज्ञ, न जाणता होता .
तरीसुद्धा त्याने आजुबजुला शोधा-शोधत करुन जंगलातल्या एका झाडाच तुटलेल लाकूड हाती घेतल! जंगलातल काही जनावर असल तर
बचावा करीता ! एका फटक्यात त्या जनावरास तरी माराव नाहीतर आपण तरी मराव अस विचार करुन परश्याने ते 10 पावलाच अंतर एका बेडका सारख्या लांब उड्या मारत एक यु-टर्न घेत थेट तो लाकूड तीव्र वेगाने हवेत उंचावला आणि पुढच्याक्षणी तीव्र वेगाने खाली न आणता मंद गतीने खाली आणला आणि एकटक आ-वासुन समोर त्या झाडा-जवळ चेह-यावर दोन्ही हात ठेऊन उभ्या असलेल्या आदीवासी स्त्रीकडे पाहू लागला. कारण त्या स्त्रीच्या शरीरावर कपडेच त्या बरोबरीचे शोभेल अशे होते .कपडे म्हंणजेच एक साडी गुंडाळलेली होती शरीरास त्या व्यतिरीक्त जर काही असेल तर तिचे शारीरीक सौंदर्य !
इतक्या कालोखात त्या पिवळ्या रंगाच्या टॉर्चच्या उजेडात सुद्धा तीच्या गो-यापान शरीराच , मादक अवयवांचा दर्शन घडून येत परश्याच तिच्या
विषयी वासना निर्माण होऊ लागली जी की डोळ्यात दिसुन येत होती.
" कोण.. तुम्ही ? आण इतक्या रातच्याला....ह्या जंगलात काय
करताय? "
परश्याने हातातला लाकूड दुर झाडा-झुड़पात भिरकावला.
दोन्ही हात चेह-यासमोर धरुन बसलेल्या त्या स्त्रीने ह्या आवाजासरशी
आपले दोन्ही हात चेह-यासमोरुन बाजुल सारले. तसे त्या स्त्रीच्या चेह-याकडे परशा एकटक पाहु लागला ! गोल -गोरापान चेहरा टपोरे डोळे , गुलाबी रंगाचे ओठ! आणि त्या ओठांखाली एल काला तील..
अशा त्या रुपाण देखणी सुपान चिकणी एका कोवल्या किशोरवयीन
वयात आलेल्या मुलीला पाहून परश्या वेडाझाला .
" अहो! .....म्या शिवन्या ...ह्या जंगलात असलेल्या एका वाडीत
राहती..!"
मंत्र मुग्ध करणारा आवाज होता त्या स्त्रीचा !त्यासोबतच 40-45 वय असलेल्या परश्याला त्या किशोर-वयीन मुलीने अहो म्हंटल जे वाक्य ऐकुन परश्याला आपण जास्त वय नसुन तरुण असल्यासारख वाटल व तो पुढे म्हणाला .
" अंग शिवन्या ! मग तु इथ जंगलात काय करु राहीली..? ते बी इतक्या रातच्याला ..!" परश्याने आपला हात पुढे केला ! त्यासरशी शिवन्याने आपला गोरा-पान कापसा सारखा मऊ हात परश्याच्या जाड-जुड हातात दिला ज्याकडे एक-दोन सेंकंद पाहून आपला अंगठा फिरवत त्यावर फिरवत परश्याने शिवन्याला जोरात आपल्याकडे खेचल. शिवन्या जोरात परश्याच्या गळ्यात जाऊन पडली त्यासरशी तिचे दोन्ही डोळे क्षणार्धात लाल विस्तवासारखे तापळे तोंडातुन दोन भागांत विभागलेली जीभ बाहेर आली .गो-यापान चेह-यावर सोनेरी रंगाच्या खवळ्या उमटू लागल्या . आणि तीची नजर दुर-एका झाडावर जाऊन खिल्ली जिथे तिचा पिता सर्पपिशाच्च उभा होता . आणि नाही-नाही अस करत डोक हलवत होता. जणु परश्याच अंत इतक्यात निश्चित नव्हत. विस्तवसारखे चमकणारे डोळे पुर्व-पदावर आले .चेहरा पहिल्या सारख झाला ... जीभ आत गेली. शिवन्याने कशीतरी परश्याची मीठी सोडून ..लाजतच कपाळावर आलेली एक केसांची बट बाजुला सारली व जमिनीकडे खाली पाहतच हसू लागलो. तिच ते हसू पाहुन परश्या पुर्णत वेडा झाला , भान हरपून बसला .
" अहो ! काही माणस माझ्या मागे ! लागली होती ..!
म्हणूण मी अस ह्या झाडामागे लपून बसले ..!"
शिवन्या पुन्हा आपल्या गोड आवाजात म्हणाली . परश्या फक्त तिच्या चेह-या कडे पाहत बसलेला ! त्याने तिच्या ह्या वाक्यावर कसलीही प्रतिक्रिया दिली नाही. तसे ती पुन्हा म्हणाली .
" अहो ! तुम्ही सोडाल का मला आमच्या वाडीवर ?
तुम्ही खुप सज्जन माणूस वाटता .! "
शिवन्याने अस म्हंणतच परश्याचा हात आपल्या हाती घेतला ! व त्याच्या डोळ्यात -डोळे घालून पाहु लागली . परश्याचा हात शिवन्याने हाती घेतला त्यासरशी त्याच्या मनात न जाणे किती उकळ्या फुटू लागल्या !
" व्हय..! व्हय..! म्या सोडतु की तुला..! "
परश्याने शिवन्याचा हात आपल्या जाड-जुड हातात धरुन ठेवला .
आणि शिवन्याकडे पाहत कसतरीच हसला. कारण त्याच्या कालमनात तिच्या शरीराशी खेळून, तिला मारुन टाकायच षडयंत्र जे चालू होत.
" चला ..मंग..!"
शिवन्या परश्याकडे गालात हसत पाहत म्हणाली. तिच ते हसन परश्याच्या काळजात जाऊन अस काही भिडल की..कमल्याला निरोप कळवायच सुद्धा तो विसरुन गेला. तरी सुद्धा त्याने विचारळ्ं
" वाडी किती लांब हाय तुमची?"
" अहो ..!जवळच हाय की..!"
" हा ठीके चल मग..?"
परश्या म्हणाला .तसे ते दोघे जंगलात शिरलें...! इकडे झाडा-आड लपून हे सर्व दृश्य पाहून सर्पपिशाच्चा च्या चेह-यावर एक भयंकर छद्मी हास्य पसरल ..

क्रमश:

पुढील भाग लवकराच.


Happy diwali..