द-अमानविय सीजन
आग्यावेताळ..अध्याय समाप्त
आग्यावेताळ भाग 11
कारण हवंय..?" मंद स्मितहास्य करुणीया धवलयोगी महांक्राल यांस उद्दारीले. तसे महांक्राल यांनी होकारार्थी मान हळवली .
तसे धवलयोगी बोलू लागले..
"ठिके ऐक तर.." असे म्हणतच धवलयोगी सांगू लागले.
आता पुढे पाहुयात.=>
......
भाग 11
सत्ययुगातल्या वेळची कथा...आहे ! ...
ज्याकाळी लोक सत्याच्या मार्गाखाली जगत असंत.मनुष्याच्या मनांत शुद्धता होती. कोणीही कोणाच्या सुखावर जलत नव्हत.मनुश्याच्या मनात चांगुलपणा जणू ठोसूण-ठोसूण भरला होता.आणी दुस-याच्या मनात विषकालवण-या कट, कारस्थानी ,महापापी , कलियुगाचा निर्माणकरता कलिची इतकी काही उत्तपत्त झाली नव्हती.त्याकारणाने स्वर्गातले देव आपल्या भक्ताच्या दुख:निवर्णाकरीत्क़ साक्षात पृथ्वीवर राहत असंत..येत असंत..! "
धवलयोगींच्या मुखातुन शब्द बाहेर पडत होते.आणी एका लहान मुलासारखे ते महांक्राल बाबा लक्ष देऊन नीट ऐकत होते...!
पुढे पाहुयात
" त्याकाळी सतीयुगात विघ्नेश चा प्रथम जन्म झाला होता. "
महांक्राल बाबांनी ह्या वाक्यावर आपले डोळे छोठे करत धवलयोगींकडे पाहील व फक्त हो असा इशारा केला.
" सतीयुगात विघ्नेशचा जन्म हा इक्त्रांड एका काळ्या जादूचा मांत्रीक आणि सैतानाचा कट्टर उपासक म्हणून झाला होता. त्याकाली सतियुगात इक्त्रांडला अमर होऊन पृथ्वी आणि पृथ्वीबाहेर असलेल्या देवांच्या नगरीवर कालोखाच साम्राज्य प्रस्थापित करुन..सैतानाच राज्य वसवायचं होत.आणि इक्त्रांडकडे हे सर्व करण्याकरीता स्व्त:कडे पुरेशी शक्ति नसल्याने एक पंचमहाभुतांची शक्ति असलेला मणी हवा होता. ज्याच नाव होत" धवलयोगी काहीक्षण थांबून म्हणाले.
" मृत्युंजय मणी." धवलयोगींच्या मुखातुन हा वाक्य निघाला त्यासरशी आकाशात एक लाल रंगाची विज कडाडली .!
" कारण मृत्युंजय मण्यात देवांचे देव महादेव यांची पंचमहाभुतांची शक्ति होती. त्यासमवेतच मणीवापरकरत्यास ते मणी अमर व्हायचं वरदान प्राप्त करुन देत होत. त्याकरीता इक्त्रांडरुपी विघ्नेशने आप्ल्या गुहेत असलेल्या भल्यामोठ्या सैतानी मुर्तीची उपासना केली. सैतानास जागवण्याकरीता त्याने 100 लहान मुलांच बळी देऊन आपल्या सैतानी देवास रक्ता मांसाचा नैवेद्याचा चिखल चढवुन खुश करत मृत्युंजय मण्याची विद्या जाणून घेतली,
कारण मृत्युंजय मणीची विद्या फक्त काहीक जणांनाच ठावुक असते.प्रथम साक्षात मृत्युंज मणीचे साक्षात्कारी महादेव , द्वितीय सैतान आणि त्रितीय अघोरी-पंडित व अंतिम महादेवाच एक प्रिय भक्त...! इक्त्त्रांडच्या नैवेद्यावर खुश होऊन नरकातला पिशाच्चदेव कै:-कृलाकने त्यास मृत्युंजय मण्याची विद्या सांगितली.की मृत्युंजय मिळवण्याकरीता तुला साक्षात महाशिवरात्री दिवशीच 100 सर्पांचा बळी द्यावा लागेल. कारण त्या दिवशी नागमणीची शक्ति किरणे काहिवेळां करीता आकाशात गगणास भिडली जातात .ज्यावेळेस नागमणीतुन ती किरणे बाहेर पडतील त्याचक्षणी 100 सर्पांची आत्मे ती किरणे थेट मृत्युंजय मण्यात शोषून घेतील. आणी तुला तत्क्षणीच एक लाल रंगाचा मणी मृत्युंजय मणी मिळाला..जाईल.!" इतके बोलुन धवलयोगी थांबले .व त्यांनी आपले डोळे मोठे करत महांक्राल बाबांकडे पाहत पुन्हा बोलायला सुरवात केली.
" सैतानाने विद्या सांगितल्यावर इक्त्रांड भलताच खुश झाला होता. आपण अमर होऊ ह्या हेतूने त्याचा आसुरी आनंद जणू उफाळून आला होता. आप्ल्या आनंदात तंद्री लागलेल्या अवस्थेत असतानाच इक्त्रांडला तो सैतानाचा घोगरा भरडा मिश्रित खोल खर्जातला आवाज पुन्हा ऐकू आला.
" इक्त्रांड ..! भलेही मी तुला मृत्युंजय मणीची विद्या सांगितली असेल.परंतु एक गोष्ट निट लक्षात ठेव ?जर का बळीदेताक्षणी 100 सर्पांमधला एकही सर्प कमी पडला ! तर विद्या पाळटेल..आणि त्यात तुझा अंत निश्चिंत असेल. त्या आत्मरुपी सर्पांच्या विषाने तुझ शरीर सडून जाईल कोप बसेल.."
आपल शेवटच वाक्यरुपी सूचना सांगुन तो सैतान गायब झाला.
परंतू इक्त्रांडला आपल्या कार्यावर पुर्ण विश्वास होता.ज्याकारणाने सैतानाने सांगितलेल्या सूचनेवर त्याने इतके काही लक्ष दिले नाही. आप्ल्या स्व्त:च्या कार्यावर जणू त्याचा आंधळा विश्वास होता. इक्त्रांड़ने लागलीच विद्येच्या कृतीनुसार आपले कार्य चक्र फिरवण्यास सुरवात केली , कारण येत्या 5 दिवसांवर महाशिवरात्री होती."
येवढ बोलुन धवलयोगी थांबले व त्यांनी महांक्राल बाबांकडे पाहिल.
आणि आपला एक हात वर आकाशात करत म्हणाले
"सत्ययुगात त्याकाळी जमिनिवर जगणा-या मनुष्यांपासुन!" महांक्राल बाबांचा वर गेलेला हात आता खाली जमिनीकडे म्हणजेच खाली आला " ते जमिनिवर जगणा-या लहान-लहान किड्यांपासुन ते ! पाण्यात ..आकाशात ऊडणा-या प्रत्येक पशु-पक्ष्यांचे जीवन-जग,होते" धवलयोगी महांक्राल बाबांकडे पाहत म्हणाले.त्यांच्या ह्या वाक्यावर महांक्राल बाबांनी फक्त होकारार्थी मान हळवली.तसे धवलयोगी पुढे सांगू लागले.
" इक्त्रांडला 100 सर्प मिलवण्याकरीता गावोगांव जंगल फिराव लागलं असतं! मग अशातच 5 दिवस निघुन गेले असते ? नाही का?."
धवलयोगींनी महांक्राल बाबांन कडे पाहिल तसे बाबांनी फक्त होकारार्थी मान हळवली.
" परंतु इक्त्रांड कोणी साधा-सुधा मांत्रीक नव्हता.शकुनी प्रमाणे त्याची बुद्धी चाल,रचन आणी त्यात आपल्या सावजाला फसवण हे त्यास लहानपणापासुनच ठावुक होत. त्याने एक क्प्टी चाल रचली. सायंकाळच्या सुमारास गरूडयाण टेकडीवर जाऊन तिथल्या सर्व गरुडांना संमोहीत करुन त्यांची मदत घेतली. कारण गरुड हे शरीराच्या आकाराने मोठे..व बुद्धीने चाल-बाज असतात आप्ल्या धार-धार पंजानी ते सापांना आप्ल्या भक्ष्यास अलगद पकडू श्कतात.आणि हे इक्त्रांडला ठावुक होत.
गरुडयान टेकडीवरच्या संमोहित केलेल्या गरुडांमार्फत इक्त्रांडने एका-पाठोपाठ सलग 40-50वारुळांवर हल्ला चढवला. चार दिवसांत 100 सर्पांची टन-टन मिटली गेली. ते 100 सर्प इक्त्रांडने एका मोठ्या
जाळ्यात ठेवलेले व आजुबाजूला पाहारा म्हणुन ते गरूड होते.
.परंतु इक्त्रांडची वेळ खराब होती.त्या रात्रीच्या अंधारात जाळ्यातुन एक सर्प कसाबसा पळण्यात यशस्वी झाला..आणि त्याचवेळेस इक्त्रांडची वेळ खराब निघायला सुरुवात झाली. कारण वाचलेला निसटलेला हातावर तुरी देऊन पळालेला..तो सर्प नागराज महादेवाचे परम भक्त वासुकी यांचा भक्त होता.वाचलेल्या त्या सर्पाने रात्रभर वासुकी देवांची एका झाडाखाली प्रार्थना केली..परंतु वेळ काळ जलद वेगाने पुढे-पुढे सरकत होता. शेवटी महाशिवरात्रीचा तो काळ आला गेला.इक्त्रांडने 100 सर्पांचा बळी देण्यास सुरुवात केली.
परंतु मणीच्या हव्यासापोटी वेडा झालेल्या इक्त्रांड मांत्रिकाला आप्ल्याकडे 100 सर्प नाहीत हे ठावुकच राहिल नव्हत .एक-एक सर्पाच डोक मोडुन तो तांबड्या रंगाच्या पेटलेल्या आग्निरुपी हवनकुंडात टाकत होता.पुर्णत गुहेत मांस -जळाल्याचा ओकारी आणणारा वास आणि काळ्या रंगाचा धुर पसरलेला.इक्त्रांडने काहीवेळाने सर्व सर्पांचा बळी दिला परंतु 100 सर्प नसल्याने ती विधी पाळटली गेली. सैतानाच्या सांगण्या नुसार कोप बसला..गेला..इक्त्रांडच ..शरीर शंभर सर्पांच्या विषाचा मारा होऊन acid ओताव त्याप्रमाणे नष्ट झाल गेल इक्त्रांडची गुहा ढासळली गेली.
त्यानंतर त्या सर्पाची प्रार्थना.वासुकी देवांनी ऐकली .परंतु वेळ निघुन गेली होती..त्या सर्पाच्या परिवारासहित सर्व सर्पांचा दुखी अंत झाला .वासुकी देवाने आपल्या प्रिय भक्तास त्याच्या प्राथनेवर प्रसन्न होऊन वर मागण्यास सूचवल..परंतु त्या अगोदरच त्या सर्पाने वासुकी देवांना सर्वकाही हकीकत सांगितली.ते ऐकुन वासुकी देवांना खुप वाईट वाटल आपल्या प्रिय भक्ताने आपणास मदतीसाठी बोलावल परंतु आपण येऊ शकलो ..नाही !
तत्क्षनी कैलास पर्वतावर डोळे मिटुन बसलेल्या महादेवांना वासुकी देवाची घालमेळ समजली.
तसेही वासुकी महादेवांच्या गळ्यात असल्याने ते जाऊ शकले नाहीत..म्हणुनच त्या सर्व सर्पांचा बळी गेला .आणि त्याचक्षणी महादेवांनी एक भविष्यकाळवाणी केली..
" इक्त्रांड़च पुन्हा एकदा कलियुगात..जन्म होईल ! आणी त्याच्या एकविसाव्या जन्मदिवशी त्याच अंत नागराज ..( वासुकी ) करतील.. ते ही माझ्यासमवेत"
येवढ बोलून धवलयोगी थांबले. कारण महांक्राल बाबांनी एक प्रश्ण केला होता.
" हे योग पुरष त्याच्या जन्मदिवशीच ?अस का?"
तसे धवलयोगी म्हणाले .
" कारण विघ्नेश एकवीस वर्षांचा होताचक्षणीच त्याला त्याच्या मागील जन्माची सर्व हकीकत कळनार होती.! आणि जर का असं झाल असत तर पुढे जे काही घडल असतं ते भयानक, ह्या पृथ्वीच्या नियमाप्ल्याड घडल असतं! साक्षात कल्कि अवताराच क्षणवेळ येण्या अगोदरच त्याने त्या अघोर दैत्यास जागवल असतं साक्षात कलीस मुक्त केल असत .!"
कलि हा शब्द ऐकताच महांक्राल बाबांची वाचाच बसली गेली..
मनात तो क्ल्की युद्ध नी त्या कलिच भयंकर रुप चित्रफित डोळ्यांसमोर तरंगता अंगावर अक्षरक्ष 100 विंचवांचा काटा एकाचवेळेस टोचला जावा तसे त्यांना झाल गेल.मनावर जणु काहीक्षण मलभ पसरल गेल
अजिब शक्ति होती त्या कलि राक्षसाच्या नावात ...उगाच त्यास कालोखाचा , अंधकाराचा राजा म्हंणत नव्हते.
" काय ..?"
महांक्राल बाबा मुखाचा आ वासुन इतकेच म्हणाले.
" होय..! महांक्राल ...हे महादेवांनीच मला सांगितल..आहे ! "
धवलयोगींच्या ह्या वाक्यावर महांक्राल बाबा फक्त त्यांस पाहतच राहिले .त्यांच्या मुखातून एक शब्दही बाहेर पडत नव्हता. तसेही धवलयोगी साक्षात महादेवांचे रुप होते....त्यांच्या मुखातून निघणा-या प्रत्येक शब्दांत एक सत्यता होती.असत्य हा शब्द त्यांस किंवा त्यांच्या चारित्र्यास शोभुन दिसत नव्हता आणि नाही दिसन शक्य होत.
त्या योग पुरुषांच्या ह्या वाक्यावर महांक्राल बाबांच्या चेह-यावरचे भाव अजुनच दुखी झाले गेले .
महांक्राल बाबांनी विघ्नेशला लहानपणापासुन आपल्या मायेच्या छायेखाली वाढवल होतं.तो वाईट असो किंवा नसो..परंतु त्याचा स्वभाव कसा होता हे महांक्राल बाबांना ठावुक होत. आपल आपत्य म्हणून त्यांनी त्यास स्विकारल होत ....मुलासारखी माया केली होती.इतक्या वर्षाच्या आठवणी अशा काहीक्षणांतच विसरण त्यांस शक्य नव्हत.?
धवलयोगी महांक्राल बाबांपासुन काही अंतरावर पाठवळवुन उभे होते.
त्यांच्या दिव्य शक्तिने त्यांनी महांक्राल बाबांच्या मनातली घालमेल ओळखली व म्हणाले
" महांक्राल..! मनातली गोष्ट नेहमी बाहेर काढावी..?मनात ठेवु नये.. अन्यथा आयुष्यभर ती बोचत राहिल..निवडुंगाच्या काट्या सारखी..! " धवलयोगी हे वाक्य उच्चारुन काहीक्षण थांबले व पुन्हा बोलू लागले
" तुझ्या मनात प्रश्णांच जे काहूर माजल आहे..! ते खाली कर..! सांग मला......! तुझ्या प्रश्नांच निरुसरण सुद्धा आहे..माझ्याकडे! तुझ्या प्रश्नांची उत्तर आहेत..?..बोल? "
धवलयोगी पाठमो-या अवस्थेत म्हणाले.तसे त्यांच्या ह्या वाक्यावर
महांक्राल बाबांनी होकाराथी मान हळवली व म्हणाले.
" मग वेताळाच अंत जर का विघ्नेशच्या हातुन नव्हत!
..मग ..वेताळाच अंत होणार कस ..?आणि कोण करणार? "
महांक्राल बाबांच्या ह्या वाक्यावर धवलयोगी पाठमोरे उभे राहातच म्हणाले.
" वेताळाच अंत होणे शक्य नाही महांक्राल..! तो कोणी भुत-पिशाच्च,आत्मा नाही ..! तो एक आतिशक्तिशाली बुद्धीमय, क्प्टी , नीच,वाईट हेतुने नढलेला पिशाच्च सैतानी देव आहे ..! पाताळाचा राजा आहे..भुतांचा..विघ्नहर्ता आहे.! त्यास अंत नाही! त्यास फक्त आणि फक्त पाताळास धाडता येऊ शकत.त्याची फक्त हाकलपट्टी करता येऊ शकते..!अंत हे त्यास लागू होत नाही.."
" मग वेताळाला पाताळात धाडण्याच कार्य कार्य कोण करेल..?"
महांक्राल बाबा अचानकपणे म्हणाले.आणि धवलयोगी पुन्हा एकदा
त्याच अवस्थेत म्हणाले.
" कार्य खुप मोठ आहे..! वेग-वेगळे रक्षक योजले आहेत त्याकरीता आणि त्यात तु सुद्धा आहेस..!
आज आता ह्याक्षणीच तुझ्याकरीता एक कार्य आहे..! लक्ष देऊन ऐक..! तुला आता ह्या क्षणी वेताळाच्या मंदिराजवळ जाऊन ..मृत्युंजय मणी त्या मंदिराच्या दरवाज्याच्या चौकटीवर बरोबर मधोमध बसवायचा आहे! ज्याने तो वेताळ आपल्या मंदिरातच अडकुन राहिल.! आणि तत्क्षणी पाषाणवाडी त्याच्या श्रापातुन मुक्त होईल..!
" पर्ंतू अस केल्यावर ! मृत्युंजय मणी वेताळास जेम-तेम महिन्याभराच्या कालावधी इतकच रोखु शकत..कारण मृत्युंजय मणीची शक्ती त्याच्या प्रहाराने कमी-कमी होत जाईन आणि सरत्या शेवटी तो मुक्त झाल्यावर त्याच क्रोध सुड त्या सिद्धांतच्या परिवारावर निघेल.! आणि हे माझ्यामुळेच होणार नाही का? " महांक्राल बाबांनी आपली चिंतेची भावना व्यक्ती केली.
" मला तुझ्या ह्या प्रश्नरुपी चिंतेची जाणीव होतीच महांक्राल!
... तुला जस वाटत आहे महांक्राल ! की वेताळ सिद्धांतच्या
परिवारावर सुड उगवेल..तर त्या सुडास ..रक्तरंजित खेळास
.. केव्हाच सुरुवात झाली आहे..! वेताळाने आपल्या पिशाच्चसेने
मधल्या एका सर्वशक्तिशाली पिशाच्च मांत्रिक चेटक्याच्या रुपात वावरणा-या बाहुलीस त्यांच्या घरी धाडल आहे.!त्याचा इतिहास फार भयंकर आहे..! " धवलयोगी म्हणाले .
" मग आपल्याला त्यांची मदत करायला हवी योगपुरुष .?"
महांक्राल म्हणाले..
" नाही महांक्राल मी आताच म्हंटल ना ह्या कार्यात खुप सारे रक्षक योजले आहेत ! त्या परमेश्वराने प्रत्येकास जन्मातच एक कार्य ध्याय, पवित्रा , सोपवल आहे..! जे कार्य मिळाल !तेच कराव लागत!जे ध्याय आहे तेच साध्य कराव लागत..आणि जो पवित्रा मिळाला आहे त्यानुसार वागायचं असतं .आता तुला जे ध्याय,कार्य पवित्रा, मिळाल आहे .ते मी तुला कळवल आहे. त्यानुसार तुला तुझी कृती करायची आहे .सिद्धांतच्या परिवारास आणि वेताळास पाताळात धाडण्याकरीता त्या परमेश्वराने दुस-या रक्षकांची निवड केली..आहे..! ज्याक्षणी ती वेळ येईल तसे त्यांच्या हातुन ते कार्य घडल जाईल." धवलयोगी इतके बोलुनच थांबले गेले .तसे महांक्राल बाबांनी सुद्धा एकही शब्द पुढे उच्चारला नाही..त्यांच्या चेह-यावर काही निराशेचे , शोकहिंत असलेले भाव अद्याप सुद्धा शिल्लक होते.ह्याचा अर्थ त्यांनी मनातले सर्व प्रश्न धवलयोगींना विचारले नव्हते.काही प्रश्न होते जे निवडुंगा सारखे त्यांच्या मनास टोचत होते .आणी त्याच आविर्भावात त्यांनी पाठमो-या धवलयोगींकडे पाहत आपले दोन्ही हात जोडले व म्हणाले.
" ठिक आहे योग पुरष..! मी तैयार आहे त्या लढ्यासाठी !"
महांक्राल बावांच्या ह्या वाक्यावर धवलयोगी हळुच मागे वळले..तसे त्यांच्या नजरेस हात जोडून उभे असलेले धवलयोगी दिसले.
धवलयोगींना त्यांच्या मनात काय चालू आहे हे कळाल होत.
त्यांच्या दिव्य शक्तिने ते जाणल होत.बाबांच्या मनात काही प्रश्न शिल्ल्क होते..जे ते विचारण्यास , बोलण्यास चाचरत होते.म्हणूनच धवलयोगींनीच पुढाकार घेतला व ते हळुच बाबांजवळ चालत आले व हळुच त्यांच्या खांद्यावर हात ठेवला तसे बाबांनी धवलयोगीं
कडे पाहिल.
" महांक्राल ह्या अव्स्थेत जर का तू युद्धास गेलास. तर ते युद्ध तु
नक्कीच हारशील..! वेताळ तुझ्या ह्या भावनेचा तुझ्या..त्या
दुखाचा फायदा घेईल..चित्र-विचित्र दृष्य दाखवेन तुला फसवण्याचा
जाळ्यात ओढून घेण्याचा तो पुरे-पुर फायदा करेल..!आणि मी ते कदापी होऊ देणार नाही..! " धवलयोगींचा स्वर उंचावला होता त्यातच ते म्हणाले.
" तुला जर असं वाटत असेल? की महादेवांनी पृथ्वीवर करोडो
कुटूंब आहेत..त्या कुटूंबात..खुप सारी मुल आहेत..त्या मुलांमधल्याच एका मुलाच प्राण का घेतले नाही..! माझ्याच पदरातल..मुल का हिरावुन
घेतल..! तर त्या मागे...एक उद्देश्य आहे..! "
" उद्देश्य..!" महांक्राल बाबा इतकेच म्हणाले.
" होय उद्देश्य..! कल्कि अवताराची वेळ ही येऊन ठेपली आहे..!
एक मोठ प्रलय ..विध्वंसक..कलिविरुद्ध महायुद्ध घडणार आहे ..!
आणी त्या महायुद्धात..देवांनी तीन रक्षकांची निवड केली गेलीये...!
त्या तीन रक्षकांन मधलाच ..विघ्नेश..जयविक..आहे..!
महादेवांनी विघ्नेशच रुपी इक्त्रांडच अंत केल. त्याचक्षणी
त्याच त्रिकाळ..सत्यगुणांत जन्म झाल गेलय..! तुझी आणि त्याची
भेट लवकरच घडेल..भलेही ती भेट काहीक्षणांपुरती मर्यादीत का असेना परंतु घडली जाईल..!"
धवलयोगींनी महांक्राल बाबांना हि माहीती देताच ..बाबांच्या चेह-यावर काहीक्षणात सुखाचे भाव उमटले ..दुख कुठच्या कुठे पळाल गेल.
" विघ्नेशची ..आणि माझी भेट होणार योगपुरूष..? "
महांक्राल म्हणाले. तसे त्यांच्या ह्या वाक्यावर धवलयोगींनी जमिनीकडे पाहतच निराशजनक चेह-यानेच हो असा इशारा केला.
महांक्राल बाबांना धवलयोगींच्या ह्या वाक्यावर शब्दांत न मांडता येणारा आनंद झाला ! आणि त्यांच्या चेह-यावरचे दुखाचे भाव क्षणार्धत मावळले गेले..व त्या जागी सुखाचे भाव उमटले..धवलयोगींच्या ह्या वाक्यासरशी त्यांच्या मागे असलेला तो सर्व द्वार विजेच्या बल्ब प्रमाणे चर,चरु लागला...प्रकाश कमी जास्त होत -होता.
" माझ्या जाण्याची वेळ झालीये..महांक्राल..! परंतू एक गोष्ट लक्षात असूदे ..ह्यावेळेस वेताळ गेल्यावेळेस झालेल्या तुम्हा दोघांच्या त्या युद्धाचा बदला नक्की घेणार ..कारण त्या युद्धात तुझ्यामार्फत त्यास
त्याला हार मिळाली होती.! एक गोष्ट लक्षात असुदे...वार कोठुन कसा ही होऊ शकतो..! समोरुन ही आणि अंतर्गत मनातुन ही..!"
अस म्हंणतच धवलयोगी..त्या सर्वद्वारात घुसले .आणि तो प्रकाश खिडकी बंद करावी त्या प्रमाणे हवेतच विझला गायब झाला गेला.
एक गोष्ट मात्र होती..धवलयोगींच्या चेह-यावर जाताक्षणीच निराशजनक भाव होते परंतू का हे मोठ कोड होत..जे फक्त त्या परमेश्वरालाच ठावुक होत? .
□□□□□□□□□□□ʼ□ʼʼʼ
" आर.. अजुन कस आला नाय रे हे दोघ?"
कमल्याने अस म्हंणतच पाठिला लटकवलेली बैग काढली व आपल्या हाती घेत ..बैगची विशिष्ट प्रकारचा आवाज होत चैन खोल्ली .
मग बैगेत हात घालुन काहीवेळ चाचपडत परश्याकडे पाहत म्हणाला.
" आर माझ्या बेगेतल पाणी संपल हाय वाटत
! तुझ्या बैगेत पाणि हाय का ? ये इकड..?" कमल्याने आपली हातातली बैग खाली खाली ठेवली व त्याच्या ह्या वाक्यावर परश्या हळूच एका जिवंत प्रेतासारखा चालत कमल्याच्या पुढ्यात येऊन पाठमोरा उभा राहिला. तसे कमल्याने आजुबाजूला पाहत हलुच आपल्या खाली ठेवलेल्या बैगेत हात घालुन वेताळाची सोन्याची चार हिरे असलेली धार-धार पातीची तलवार बाहेर काढली आणी पाठमो-या कमल्याकडे रागात पाहत दात ओंठ खातत अंगारभरलेल्या डोळ्यांनी जलद वेगाने ..हवेलाही लाजवेल अशा गतीने परश्याच्या पाठीत ती धार-धार पात असलेली तलवार घुसवली.तत्क्षणी विशिष्ट प्रकारचा कातडी फाटल्याचा आवाज झाला .आणि त्या झालेल्या प्रहाराने परश्या रुपी सर्पपिशाच्चाने भयंकर कानठळ्या बसवणारी घसा फाडून टाकणारी आर्तकिंकाळी ठोकली. पुर्णत रात्रीच्या अंधारात तो आवाज ट्रेनच्या हॉर्न प्रमाणे घुमला. झाडांवरची झोपलेली पक्षी-पाखर अर्धनिद्रेतल्या अवस्थेतच हवेत उडाली.फड-फड करत विजेच्या उजेडात सैरभैर वाट मिळेल तिकडे पळू लागली.
वार झाला त्यासरशी परश्याच्या रुपात आलेल्या सर्प-पिशाच्चाच रुप-काळ पाळटत त्याच खर अ-मानवी रुप दर्शन समोर येऊ लागल.
सर्व प्रथम पायांपासुनची मानवाच्या शरीराची नक्कल केलेल्या हाडांची कट-क्ट आवाज करत चुराडा व्हायला सुरुवात झाली. आणि मग मानवाची कॉपी केलेली चामडी फाटून त्यातुन भलीमोठ्ठी जाड लाकडासारखी काटेरी वळ-वळवणारी शेपुट क्षणांत अमानवीय दृष्यांसहीत तैयार झाली. मग हळू-हळू शरीरावरचीही कातडी कोस काढावी त्याप्रकारे खाली गळून पडू लागली.आणि ह्या सर्व क्रियेत त्या सैतानाच्या मुखातून अशा काही मन-भेदरवणा-या काळीज जोरात दोन हातांनी पिळवतुन टाकणा-या किंकाळ्या बाहेर पडत होत्या की त्या मानवाने आजपर्यंत उभ्या आयुष्यभरात न ऐकल्या असतील आणि नाही
त्यांची विचारणा,कल्पना केली असेल.टीवीवर ज्याप्रकारे भारीतला vfx तंत्रज्ञाना मार्फत भारीतले सीन क्रियेट केले जातात त्याच प्रकारे ह्या सर्पपिशाच्चाच शरीर अमानवीय शक्तिने पुर्व-पदावर येत होत. कमल्या डोळे-फाडून-फाडून पाठि-पाठीमागे सरकत हे विचित्र कल्पनेपलिकडच न कल्पना केलेल दृष्य पाहत होता.
काहीक्षणातच सर्प-पिशाच्च आपल्या मुळ रुपात अवतरला गेला.
भल्यामोठ्या फणा-वासलेल्या त्याच्या खवलेअसलेल्या अभद्र मुखातुन क्षणाला-क्षणाला बाहेर येणा-या" फीस्स,फिस्स "आवाजाच्या जिभेसरशी
हिरव्या रंगाच रक्त बाहेर पडत होत, खाली नदीत मिसळुन नदीच पाणी दुषित करत होतं.
जर शस्त्र सामान्य मनुष्याच असतं. तर वार होन...ती जाड-जुड कातडी चिरुन शस्त्र शरीरात मार्गक्रमण करण असंभव होत.परंतु कमल्याने वापर केलेल्या शस्त्र रुपी तलवारीचा वार साक्षात वेताळाच्या तलवारीचा होता....अमानविय शक्तिच्या राजाच्या वापरकर्त्याची साक्षात वेताळाची तलवार होती ती, त्यात वेताळाची शक्ति होती ज्या कारणाणे ती तलवार सर्प-पिशच्चाच्या हदयास कापुन त्यात रुतली गेलेली.कमल्याने मागचा पुढचा विचार न करता हदयात रुतललेली ती तलवार धीर धरत एक उंच उडीमारत स्प्पकन बाहेर काढली.त्यासरर्शी त्या तलवारीसहित सर्पपिशाच्चाच धड-धडणार ह्दय बाहेर आल आणि क्षणार्धात सर्प-पिशाच्चाच्या मुखातुन हिरव्या रंगाची रक्ताची गुळनी बाहेर पडली व पिवळेजर्द डोळे अशे काही विस्फारले की पाहाणारा क्षणात
ह्दयाचा तीव्रझटका येऊन मरण पावेल. डोळे वटारले जात त्याच भलमोठ्ठ निर्जीव देह पुलावरुन खाली नदीत कोसळल .त्यासरशी पाण्यावर काहीतरी मोठ दगड आपटलल्यासारख विशिष्ट आवाज होत पाणि वर हवेत उडाल गेल.आणि त्या कालोखाच्या काळ्या रंगाच्या सफेद धुक निघणा-या पाण्याने सर्प-पिशाच्चाच देह गिळुन टाकल.
कमल्याने पुलावरुन खाली नदीच्या पाण्यात पाहिल तसे त्यास पाण्यावर ऊठणारे तरंग आणि एक भलीमोठ्ठी काटेरी शेप दिसुन आली. कमल्या खाली पाण्यात पाहत असतानाच वर आकाशात एक वेडे-वाकडे आकार घेत विज कडाडली आणि त्याला त्या पाण्यात आपल प्रतिबिंब दिसल आणि लागलीच डोळ्यांसमोर काहीक्षणा अगोदरचा प्रसंग आठवला ज्याक्षणी तो पाण्यात पाहत होता .तत्क्षणी आकाशात चमकलेल्या विजेसरशी त्याला परश्याच्या रुपात आलेल्या सर्प-पिशाच्चाच खर रुप पाण्यात दिसल होत .सर्व प्रथम त्यास ते दृष्य पाहून आश्चर्यकारक, नवल,भीतीने झपाटून टाकलेल परंतु.मृत्युच्या भीतीवर मात करण्यासाठी त्याने धीर हा शब्द जणू अंगी बाळगला, हिम्मत अंगात संचारुन घेतली व ह्या दोन गोष्टींची ताकत गोळा करुन त्याने हे युद्ध जिंकल होत..जिव वाचवला..होता .त्याने नदीच्या पाण्यावरुन लक्ष बाजुला काढून घेतल आणि
त्याची भिर-भिरणारी नजर हलकेच तलवारीत अडकुन बसलेल्या सर्पपिशाच्चाच्या धड-धडणा-या हदयाकडे गेली .कारण त्या हदयामधुन हिरव्या रंगाचा प्रकाश बाहेर जो येत होता.कमल्याने हलकेच त्या हदयातुन तलवार काढली आणि पुन्हा एकदा हातातली ती तलवार त्या धड-धडणा-या हदयात खूपसली आणि ते धड-धडणार ह्दय कापुन टाकल .ह्दय चीरताच त्यातुन एक हिरव्या रंगाची विषधारी रक्ताची चिलकांडी उडाली जाऊन त्याच्या अंगठ्यावर पडली आणि क्षणार्धात न सांगता येणा-या अश्या भयंकर अंगावर काटा आणणा-या वेदणा त्यास झाल्या गेल्या मुखातुन गुरासारखा हंबरडा बाहेर पडला आणि तो हाताचा अंगठा हाडासहित ऐसिड टाकल्या सारखा सडुन जाऊ लागला. पुढच्या क्षणालाच त्याच्या वेदनारहीत चेह-यावर एक हिरव्या रंगाचा चम-चमता प्रकाश पडला त्या प्रकाशाने डोळे काहीक्षण दीपले गेले..आणि पुढील दृष्यपाहताच त्याच्या सर्वकाही वेदना कुठच्या कुठे पळाल्या गेल्या आणि त्याच्या वेदनांरुपी चेह-यावर एक आसुरी छद्मी हास्य पसरल ..जात ती वेताळाची सोन्याची तलवार.. हातातुन खाली निसटून पडली .कारण त्याच्या पुढ्यात हिरव्या रंगाचा प्रकाश फेकणारा नागमणी जो होता. जो त्याने आपल्या हाती घेत ..आजुबाजूला पाहतच वेताळाची तलवार पुलावरच सोडून तिथून पळ काढला.आप्ल्या मित्रांचा विचार त्याच्या मनात आला होता.परंतु आता ते जिवंत असण्याची शक्यता शुन्यात होती.
□□□□□□□□□□□□□□□
पाषाणवाडीत स्मशान शांतता पसरली जात सर्व गावकरी निद्रेच्या आधीन झालेले..जणु ते झोपले नसावेच ..बेशुद्धवस्थतेची मोहिनी त्यांच्यावर घातली असावी ज्याने..बाहेर काय रण-संग्राम घडत आहे ह्या पासून ती पुर्णत पाषाणवाडी अनभिज्ञ होती. महांक्राल बाबा आपल्या
आश्रमात असलेल्या शंकराच्या मूर्ती पुढे उभे होते.त्यांच्या शरीरावर भगवे वस्त्र परिधान केलेले होते.गळ्यात एकवीस मण्यांची पंचतारांकित महांभुतांची शक्ति असलेली मृत्युंजय मणीरुपी रुद्राक्षमाळ होती.
त्यांचे दोन्ही हात शंकराच्या मूर्तीसमोर जोडलेले व डोळे बंद होते त्यातच ते म्हणाले.
" महाकाल ! आज कित्येक वर्षानंतर शेवटी तो दिवस माझ्या पुढ्यात येऊन ठेपला आहे. कालोखात सजवलेल्या लढाइच्या रंगमंच्याचा बार ऊडणार आहे.आणि ह्या सत्याच्या विरुद्ध असलेल्या असत्याच्या युद्धात एकतर त्या कालोखातल्या काळ रंगमंचावर त्या सैतानाचा तरी विजय होईल , अन्यथा तुझ्या सत्याचा तरी..आणि त्या सत्याला वाचवण्याकरीता तुझ्या जवळून मला जी संधी मिळाली आहे,त्या संधीचा मी पुरेपुर लाभ ह्या सृष्टीस आणि ह्या सृष्टितल्या लहाण-थोर-प्रौढ जणांना माझे प्राण देऊन ही करण्यास मागे-पुढे पाहणार नाही ! " महांक्राल बाबांनी आपला एक हात समोर जळणा-या समईच्या वर ठेवला व पुढे म्हणाले.
" आणि आज आता ह्याक्षणी मी शपथ घेतो! माझ्या ज्या चुकीमुळे
तो सैतान ह्या जगात अवतरला गेला, आणि त्या सैतानाने ज्या लोकांची हत्या केली..त्या सर्व आत्म्यांच्या ह्त्येचा बदला..आणि पाषाणवाडीला त्या सैतानाच्या श्रापापासुन मी माझ प्राण देऊन मुक्त करेल..!" महांक्राल बाबांचे शेवटचे शब्द उच्चारले गेले आणि तत्क्षणी
आकाशात विजांचा हल्ला होऊ लागला..जणु होणा-या युध्दाची रणशिंग
फुंकली जाऊ लागली होती. युद्धाची वेळ जवळ-जवळ येत होती.त्यासरशी घों-घों करत वारा वाहू लागलेला..अंधकारची ती काळी घोंगडी पृथ्वीच्या चारही बाजुंना पसरली जात सुर्याचा प्रकाश रोखुन धरत होती .काजळापेक्षाही कालपट कालोखालाही लाजवेल असा अंधार चारही बाजुंना पसरलेला. आणि ह्या अंधाराला हरवण्यासाठी एक प्रकाश किरण गरजेचा होता..सूर्यनारायण गरजेचे होते.
एक आगीची ठिणगी ज्याप्रकारे उत्पन्न होऊन वणवा लागताच लाखो अंतरापर्यंतचा जंगलाचा भाग जाळुन -राख करुण टाकते..त्याच प्रकारे ह्या अंधाराला त्या अंधकारच्या कालोखी घोंगडीला फाडत तिला जाळुन
खाक करण्यासाठी एक ठिणगी हवी होती.आणि त्या ठिंणगीच प्रतिसुर्याचा रुप घेऊन ..त्या कालोखावर मात करण्यासाठी महांक्राल बाबा शंकराचा आपल्या महाकालच दर्शन घेऊन निघाले होते.
महांक्राल बाबा जर लढाईत जिंकणार असतील तर उद्याच दिवस पाषाणवाडीतल्या गावक-यांकरीता एक नवा दिवस ठरणार होता.परंतु जर वेताळ ही लढाई जिंकणार असेल तर मात्र तो नवा दिवस कालोखात बुडाला जाणार होता.सत्यावर -असत्याचा विजय मिळुन कालोखाच साम्राज्य पसरणार होत.
पण माझ्या मनात एक प्रश्न उभ राहत आहे? वेताळास बंदी बनवण महांक्राल बाबां इतक सोप जाणार होत का? पाताळातला देव म्हणून ख्याती असलेला वेताळ असंच सहज हरणार होता का?ज्याच्या हुकूमाचा आदर अखंड काळ्या साम्राज्याची पिशाच्चवळ, भुतावळ करते..त्यावरुन त्याच्या शक्तिची मर्यादा किती असेल ? वेताळाच शस्त्र त्यास मिळेल का? आणि समजा नाहीच मिळाल शस्त्र तर त्याची अखंड काळसेना आप्ल्या धन्यासाठी दोन हात करु शकणार होती का?
असो पुरे झाले माझे प्रश्ण पुढे पाहुयात=>
महांक्राल बाबांनी आश्रमातुन निघताचक्षणी महादेवांच दर्शन घेतल.आणि त्या समवेत मृत्युंजय मणी सुद्धा !
रात्रीच्या अंधारात पाषाणवाडीतली जी काही मोजकी वस्ती रुपी घर होती ..त्या सर्व घरांना मागे सोडून महांक्राल बाबांनी पाषाणवाडीतली
वेस गाठली. काहिक्षण महांक्राल बाबा आपल्या जागेवरच थांबले व पुढील दृष्य पाहु लागले . त्यांच्या 20-25 पावलांवरच पाषाणवाडीची हद,वेस संपत होती .आणि पुढे एकघनदाट जंगल सुरु होऊन एक छोट-छोठ्या गवतांनी वेढलेली जेम-तेम एकमाणूस चालत जाऊ शकतो अशी पायवाट दिसुन येत होती.त्या पायवाटे रुपी वेसेकडे आणि त्या कालोखाच्या काल रंगाने रंगलेल्या जंगलातल्या झाडांना पाहुन महांक्राल बाबांना वेताळाचा भारदस्त, घोगरा, भरडा,किन्नरि असा मिश्रित आवाज ऐकू आला आणि त्याच्या त्या श्रापानुसार उच्चारलेले नियम सुद्धा " जर कोणी सामान्य मनुष्य प्रथम पावसा नंतर ह्या गावाची वेस ओलांडेल तर त्याच्या शरीराची राख निश्चिंत असेल. ना त्या मनुष्यास कधी स्वर्ग प्राप्त होईल नाही नरक प्राप्त होईल. त्या मनुष्याची आत्मा ह्या वेसेभोवती प्रेत:दुख योनीत कायम मोक्ष मुक्ती साठी भटकत राहिल. हा श्राप आहे वेताळाचा..हिहिही हाहाहा हा खिखिखिखी...! "
महांक्राल बाबांच्या कानांत ज्यासरर्शी हा आवाज घुमला त्यासरशी त्यांच्या पुर्णत शरीरावर खालून वरपर्यंत सर्रकन काटा आला. अंग काहिक्षण भीतीच्या प्रभावाने शहारल गेल .
.महांक्राल बाबांनी आप्ल्या रुद्राक्ष माळेवर हात ठेवला तसे त्यांच भय थोड कमी झाल आणि महादेवांच नाव घेत रुद्राक्षमाळेवर हात ठेवतच त्यांनी एक-एक पाऊल वेशीकडे वाढवायला सुरुवात केली.
दहा,मग वीस,एकवीस,बावीस,तेवीस,चोवीस, आणि अचानक वेळ अगदी सेकंदा काट्याच्या गतीने धावू लागला.महांक्राल बाबांनी आपला
डावा पाय वेशेपलिकडे ठेवण्यास वाढवायला सुरुवात केली.आणि पुढच्या क्षणाला महांक्राल बाबांनी ती वेस ओलांडली .नी त्याचक्षणी आकाशात एक चांदेरी रंगाची विज कानाचे पडदे फाटतील अशी चमकुन निघाली. व तो विजेचा चंदेरी रंगाचा प्रकाश सिद्धांतच्या फार्महाऊसपाशी असलेल्या वेताळाच्या फौजेवर मग चौकटरुपी दरवाज्याच्या आतघुसली आणि वेताळाची काळ्यापाषाणाच्या वटारलेल्या खुनशी रक्तपिपासु डोळ्यांच्या मूर्तीवर पडली .तसे ते त्या वेताळाचे डोळे क्षणार्धात गरम विस्तवाप्रमाणे तापले जात तांबड्या रंगाने चमकले गेले. आणि ज्यासरशी ते दोन मोठ-मोठाले वटारलेले डोळे जळ-जळत्या विस्तवासारखे चमकुन निघाले.त्याचवेळेस त्या पाषाणातल्या वेताळाच्या काळ्या मूर्तीला ज्याप्रकारे भुकंप आल्यावर वेडे-वाकडे आकार घेत जमीन फाटली जाते, त्याचप्रकारे त्या वेताळाच्या काल्या पाषाणस्वरुपी मूर्तीला ..ढगांमधुन होणा-या गडगडाटां सहित व चंदेरी रंगाच्या प्रकाशासहित तडा जाऊ लागल्या.
तड-तड आवाज करत मूर्ती फुटण्याच्या मार्गाने मार्गक्रमण करु लागली
आणी त्या तड-तडणा-या मूर्तीला पडणा-या भेगांमधुन साक्षात
लाव्ह्यासारख काहीतरी दिसु लागल. जणु वेताळ साक्षात पाताळाच द्वार खोलुन ,फाडून पृथ्वीतळावर येत आहे .फटाक फुटाव आणि त्या जागेवर काहीसेकंद सफेद धुर दिसाव तसे वेताळाची मूर्ती फटाक्या प्रमाणे फुटली गेली .असा काही मोठा धडाड आवाज झाला की मंदिरा बाहेर उभ्या असलेल्या भुतावलीने तो आवाज ऐकताच तोंडावर हाताची पाचही बोट आपटत, ढोल बदडावायला सुरुवात केली .इतक वेळ गप्प असलेल वातावरण (विशिष्ट प्रकारच्या धडाड, , धम, धडाड, धम ) ढोल बदडवण्याच्या आवाजात पुर्णत पाषाणवाडीतल्या जंगलात घुमून निघाला ...व.त्या आवाजाने ती मृत्युमय शांतता भंग पावली .
ढोलच्या आवाजाचे तरंग उठु लागले व हवेत ते तरंग एका लहरीत हवेमार्फत दुर-दूर जात महांक्राल बाबांच्या कानांवर पडले .आवाज कानांवर पडताच महांक्राल बाबांच्या कानसुळ्या गरम झाल्या..भीतीने
त्यांनी एक आवंढा गिळला .
वेताळ आता पाताळातुन बाहेर आला आहे म्हंणजेच याचा अर्थतो कधीही कोठून कसाही आपल्या सैन्यांमार्फत हल्ला चढवेल
प्रथम तो आपल्या सैन्यास आपल्या शत्रुवर हल्ल चढवण्यास पाठवेन मग ती सेना तो पर्यंत पर्यंत लढा देत राहतील जो पर्यंत पुढील रक्षक थकला जात नाही .त्याची अर्धी निम्मी शक्ति वापरली जात नाही..आणि एकदा की तो शत्रु थकायला सुरुवात झाली की..मग हा वेताळ एका चोरा सारखा मागुन येत त्या रक्षकाच्या पाठीत सूरा खुपसुन लढा जिंकेल. त्याची ही क्प्टी आयत खाव खेळी महांक्राल बाबांना माहीती होती .आणि तेच झाल..महांक्राल बाबांनी ज्यासरशी वेस ओलांडली त्याचक्षणी आजुबाजुचा अंधार गडद झाला अगदी आंधळ्या माणसाच्या डोळ्यांसमोर पसरणा-या अंधारासारखा तो काळोख पसरला.काहीक्षण महांक्राल बाबांना अस वाटल की आपण आंधळे झालो आहोत की काय..! अचानक काजळीफासलेल्या अंधारात महांक्राल बाबांच्या थोड दुर मागे सफेद रंगाच धुक येऊ लागल.कृत्रिम अमानवी धुक . धुक्यांमध्ये अचानक तीन लाल रंगाचे दरवाजे तैयार झाले.
महांक्राल बाबांना आपल्या मागे काहीतरी क्रिया घडत आहे ह्याची जाणीव होऊ लागली होती.किंवा त्यांच्या मानवी इंद्रियांनी तशी जाणीव चुणूक करुन दिली होती.तसे त्यांनी हळूच मागे वळून पाहिल .त्यासरशी त्यांच्या दृष्टीस ते तीन लाल रक्तासारखे जणु रगतानेच रंगवले असावे अशे द्वार दिसुन आले.त्या तीन दरवाज्यांकडे पाहतच महांक्राल बाबांनी डावी आणि उजवीकडे एक तिरकस कटाक्ष टाकला.सर्वीकडे काजळीफासलेला काळोख ...ना कसले गवत झाड दिसुन येत होती....आणि नाही आकाश ...होता तो फक्त काळोख आणि ते तीन दरवाजे व त्या दरवाज्यांसमोर उभे असलेले महांक्राल बाबा.
महांक्राल बाबा एकटक त्या लाल रंगाच्या दरवाज्यांकडे पाहत होते.
काहीक्षण महांक्राल बाबा फक्त त्या दरवाज्यांकडे पाहतच राहिले.लाल रंगाचे दरवाजे होते ते.व त्या तिन्ही दरवाज्यांसमोर अमानविय शक्तिच्या
मार्फत सफेद रंगाच धुक वाहत होत. त्या दरवाज्यांसमोर हलकासा चंदेरी रंगाचा प्रकाश पसरलेला. ज्याने ते लाल भडक एका लाईनीत असलेले मोठे चार फुट दरवाजे दिसुन येत होते.महांक्राल बाबांनी हलकेच आपले पाउल त्या दरवाज्यांच्या दिशेने वाढवायला सुरुवात केली. दहा '-बारा पाउल चालून महांक्राल बाबा त्या दरवाज्यांसमोर पोहचले.व त्यांनी आपला डावा हात वाढवुन तीन दरवाज्यांन मधला
बरोबर दोन नंबरचा मधला दरवाजा उघडला.तसे त्या दरवाज्याच्या बिजाग-यांचा कर-करण्याचा आवाज झाला.चारही दिशेना अंधाराच्या भिंती-जणु अमानवी शक्तिने उभारल्या होत्या की त्यांच्यावर तो आवाज आदळून एकमेकांत मिसळून सर्व दिशेला..गुंजळा गेला.
महांक्राल बाबांनी दरवाचा किंचीत उघडलेला ..म्हंणजेच हात लावला आणि अचानक पुढील दरवाजा आपोआप बिना-स्पर्श करताच बिजाग-यांच्या आवाजा सहित उघडला .कर-करत काळिज पिळवटुन टाकणा-या खोळ खर्जातल्या आवाजा सारखा उघडला .दरवाजा पुर्ण उघडला गेला त्यासरशी महांक्राल बाबांना आपल्या पासुन ठिक साठ-सत्तर मीटर अंतरावर वेताळच निर्मनुष्य असलेल मंदिर दिसुन आल.त्या मंदिराकडे पाहताच महांक्राल बाबांनी त्या दरवाज्यात आपल पाउल ठेवण्यास एक पाय उंचावल तस वातावरणात एक खोल खर्जातला
आवाज घुमला .
" ये भट्या....पाय ठेवु नकोस आत! येऊ ,य्वू ,येऊ.. येऊ,येऊ...हिहिहिजी,खिखिखी...!" आवाज आला त्यासरशी महांक्राल बाबांनी आपले दोन पाऊल मागे ओढले.तसे बाकीचे दोन्ही दरवाजे सुद्धा कर-करत उघडले..! आवाज भयंकर होत-होता ..कर-करण्याचा.
तिन्ही दरवाजे उघडले गेले..त्यासरशी महांक्राल बाबांना तो दिसला..
इतक्या वर्षांची दुश्मनी असलेला..तो दिसला..मानवाच्या रक्तमांसासाठी
आसुसलेला..हवरट महा-पाताळयंत्री तो..दिसला..ज्याला पाहातच महांक्राल बाबांच्या मुखातुन शब्द निघाले
" आग्यावेताळ.....!"
" हो मीच म्हाता-या..! हिहिहिही..येऊ , येऊ,येऊ.!खिखिखी..फिफिफी..! महांक्राल बाबांपासुन ठिक साठ-सत्तर मीटर अंतरावर असलेल्या वेताळाच्या दरवाज्याच्या कालोख्या चौकटीत
वेताळ उभा होता..वरची त्वचा..प्रेतासारखी पांढरट होती..डोक्यावरचे पांढरट केस गळ्यापर्यंत सापासारखे येत वळ-वळत होते.पांढरट बुभळ नी त्यात काला ठिपका वसलेला होता.धार-धार रक्ताने भिजलेले सुळ्यासारखे दात होते ज्याला नुकतच रक्त लागल होत. गळ्यात काही -बाही चांदयाचे दागिने होते ...जे त्या अंधारात लकाक होते ..आणि खाली एक काळ्या रंगाची लुंगी होती. एका म्हाता-या सारखा पाठवाकवुन एका वेड्या सारखा दाराच्या चौकटीत फिरत तर कधी
बाबांकडे पाहत खोल खर्जातल्या आवाजात तो वेताळ बोलत होता..
परंतु महांक्राल बाबांना एक कळत नव्हत..की तो बाहेर का येत नाहीये.
अस आत घुटमळत फे-या का मारत आहे? आणि पुढ़च्या क्षणीच महांक्राल बाबांना काहीतरी आठवल.
" शस्त्र...... !.अच्छा .. म्हंणजे ..नक्कीच ह्या वेताळाची तलवार. अजुनही त्याला मिळाली नाहीतर....! " महांक्राल बाबांच्या मनात उच्चारलेल्या ह्या वाक्यासरशी त्यांनी त्या दरवाज्यामधुन मान हलवत
वेताळाकडे हसत पाहिल..आणि आपल पाऊल त्या द्वारात टाकणार की तोच ..एकाचवेळेस ते तिन्ही दरवाजे बंद झाले. वेगाने..पापणी लवण्याचाही वेळ मिळाला..नाही बाबांना.
" मनातले ...भाव ओळखले..वेताळ..! मनातले भाव ओळखले..!
आता जो पर्यंत ..तुझी तलवार तुला मिळत नाही .तो पर्यंत तू काहीतरी मायावी खेळ माझ्यासमवेत खेळणार.परंतु मी हे कदापी होऊ देणार नाही..! तुझी तलवार मिळण्या अगोदरच..! मला..तुला कैद.कराव लागेल..! " महांक्राल बाबा आपली मान हलवत आजुबाजुला पाहत म्हंणाले.
त्यांनी हळुच आपला एक हात त्या लाल रंगाच्या चार फुट दरवाज्यावर ठेवला.तसे त्यांच्या हाताला एक झटका...बसला..! विजेचा..झटका! त्या विजेच्या झटक्याने महांक्राल बाबांच्या हाताला थोड्या वेदना झाल्या ! हात झटकुन ते काही पावले मागे सरकले.तसे वातावरणात त्या कालोखात फ़िदिफ़िदि हसण्याचा आवाज घुमला.
" खिखिखिखिखी...! फिफिफीफीफी,खिखिखिखी...! हाहाहाहाहाहाह ...! हे भटूरड्या..डब्बू..! निघुन जा..इथुन...! ..
तुझी लायकी नाही ..हे द्वार..पार करण्याची ..!
..हिहिहिहिही...खिखिखिखी..! ...!" खोल खर्जातला आवाज आणी त्या आवाजाला जोड म्हणून एक पाश्वी हास्य.
" खर आहे तुझ..वेताळ! खर आहे तुझ..! मी म्हातारा झालोय नाही..का? "महांक्राल बाबा निराशरुपी केविलवाणा चेहरा करत म्हणाले.त्यांच्या ह्या शब्दात सांगायचं झालं तर काहीतरी चाल होती.तसे ते त्या चार फुट दरवाज्या पुढे पाहत म्हणाले.
" अरे वेताळ...? मी म्हातारा झालोय..म्हंणजे माझ्या शक्तिही कमी झाल्या अशनार नाही का ? आणि बघ केसही पिकलेत माझे..! मग माझ्या सारख्या म्हाता-याला , तु जगातला शक्तिशाली पाताळाचा राजा सैतानी देव काहीक्षणात एका वारातच हरवु शकतोस! मग अस दार लावून स्त्रियांसारख घरात लपून बसलायेस..! " महांक्राल बाबांच हे वाक्यपूर्ण होताक्षणी तो दरवाजा धाड-धाड करत वाजू लागला..अक्षरक्ष थर-थरु लागला तो दरवाजा आणि एक खोळ खर्जातला वेताळाचा आवाज आला.
" ए भटू..! मी नाही लपून बसत बायकांसारख..? पाताळाचा राजा आहे मी .! सैतानांचा सैतानी देव आहे मी..! वेताळ आहे मी वेताळ..! "
" हे मुळीच शक्य नाही वेताळ! तु जर का स्वत:ला सैतानांचा, ह्या जगभरातल्या भुत,पिशाच्च सर्वांचा स्व्त:ला देव समजतोस ! तर मग अस द्वार लावून लपून का बसला आहेस.!" महांक्राल बाबा वेताळास भडकवत म्हणाले.
" घे थेरड्या . ! आता तुझ मढ पाडल्याशिवाय मी काय गप्प नाय बसत..!"
वेताळाचा भरडा, घोगरा,मिश्रित खोळ खर्जातला आवाज धाड-धाड करत त्या दरवाज्यावर आदळला आणि शेवटच्या वाक्यासरशी तो लाल रक्तरंजित दरवाजा कर-करत उघडला. तसे बाबांच्या चेह-यावर तांबड्या रंगाचा प्रकाश पडला.डोळ्यांच्या दोन्ही बुभळांत आग दिसु लागली.समोर त्या दरवाज्यापल्याड पाताळाची दुर-दुर पर्यंत पसरलेल्या कायेची सीमा अवतरली होती.
त्या चार फुट दरवाज्या आतुन तांबड्या रंगाचा प्रकाश आणि वाफाळणारी हवा महांक्राल बाबांच्या शरीरास लागत होती. वर तांबड्या आकाशातुन आगीचे गोळे गारांप्रमाणे खाली कोसळत होते.त्यांचा तो विस्फ़ोट्क आवाज होत-होता.कानठळ्या बसवणारा बहिरा करुन सोड़णारा आवाज होत -होता.चारहि दिशेंना खुप सा-या
ज्वालामुखींच्या टापू होत्या, त्या सर्व टापूंन मधुन लाव्हाबाहेर पडला जात त्यांची एक भलीमोठ्ठी नदी दुर-दुर पर्यंत वाहत जात होती.
आणि त्या नदी मधल्या लाव्ह्यात पाताळेश्वर राक्षसांची झुंड-नी-झुंड सावजाच्या येण्याची वाट पाहत ट्पुन बसलेले.त्यांची ती कंकाळ स्वरुपी देहयष्टी लाव्ह्याने ढवळून निघालेली .
महांक्राल बाबा हे सर्व दृश्य डोळे मोठे करत पाहत असतानाच अचानक जोरात त्या दरवाज्याची झाप हवेच्या वेगासरशी धाड-दिशी बंद झाली.
वेग इतक अफाट होत.की बाबांचे केस काहिक्षण गरम हवेने उडाले गेले.आणि तोच पुन्हा फ़िदिफ़िदि हसण्याचा आवाज घुमला.
" फिफिफीफीफी..! हिहिहिहिही...काय रे भटा..! हुशार समजतोस स्व्त:ला ! हुशार समजतोस..! मला येड्यात काढतोस?
माझ्या शस्त्राविना माझी शक्ति वाढत नाही ! म्हणूनच मला येड्यात काढायला बघतोस.! " तो खोळ खर्जातला आवाज धाड धाड करत त्या दरवाज्याव आपटला आणि बंद झाला.तसे महांक्राल बाबांनी पुढील वाक्य उच्चारल
" हा वेताळ अस ऐकणार नाहीच ! शक्ति वापरावीच लागेल..!
त्याच शस्त्र मिळण्या अगोदर त्यास मंदिरात कैद कराव लागेल.
अन्यथा प्रलय युद्धाची सुरुवात होईल..!" महांक्राल बाबांनी अस म्हंणतच आपली हाताची एक मुठ गच्च आवळली..मुखातून मंत्र म्हणु लागले.
" ऊँ ऐं हीं श्रीं हीं हूं हैं ऊँ नमो... भगवते महाबल.. पराक्रमाय भूत-प्रेत पिशाच-शाकिनी-डाकिनी यक्षणी-पूतना-मारी-महामारी, यक्ष राक्षस भैरव बेताल ग्रह राक्षसादिकम क्षणेन हन हन भंजय भंजय मारय मारय शिक्षय शिक्ष्य...रूद्रावतार हुं..द्वार.. फट स्वाहा।" महांक्राल बाबांची मुठ उघडली तसे मुठीत एक सफेद रंगाचा स्फटिकप्रभेत गोळा निर्माण होऊ लागला.लहान-लहान करत तो प्रकाश गोळा अगदी स्फटीकायेवढा मोठा झाला. महांक्राल बाबांनी आपला तो हात वर हवेत नेत पुढच्याक्षणाला जोरात खाली आणला तसे तो पांढराशुभ्र गोल त्या दरवाज्याच्या दिशेने भिरकावला जात आतीवेगाने विशिष्ट स्फोटकासारखा आवाज करत सफेद धुर उडवत आदळला आणि पुढच्याक्षणाला तो दरवाजा उघडला गेला............नाही.
हो मित्रांनो त्या शक्तिशाली प्रहाराने सुद्धा तो दरवाजा उघडला गेला..नव्हता .वेताळाची शक्ति जिंकली होती.आणी बाबांची शक्ति हारली होती..परंतु ते इतक्यात हार मानणार नव्हते.त्यांनी पुन्हा एकदा आपली मुठ गच्च आवळली आणि डोळे बंद केले .
कि तोच त्यांच्या मागो-माग अंधारात ज्याप्रकारे एका रसायन कंपनीच्या मोठ्या पायपामधुन ज्याप्रकारे काळा कुट्ट धुर निघाला जातो तस अंधारातुन कालाकुट्ट धुर बाहेर येऊ लागला.तो धुर कस निघाला जात होता हे मात्र ठावुक नाही ! विशिष्ट प्रकारच्या व्हू,व्हू,व्हू आवाजासरशी तो धुर वेगाने येऊ लागला.आणी पुढच्याक्षणाला त्या
काळ्याकुट्ट धुरामध्ये दोन पिवळेजर्द डोळे चमकले.
महांक्राल बाबा हाताची मुठ गच्च आवळून मुखावाटे मंत्र म्हंणत होते.
त्यांच्या कानामागुन पंधरा-वीस मीटर अंतरावर हा विलक्षण अमानवी प्रकार घडत होता..नक्कीच त्या घडणा-या अमानवी क्रियेतुन त्या काळ्याधुरातुन कोणितरी बाहेर येणार होता..मागुन हल्ला चढवणार होता.त्याचे पिवळेजर्द डोळे फक्त चमकलेले दिसले गेलेले ..परंतु त्याच शरीर अद्याप त्या काळ्या धुक्यातच होते. महांक्राल बाबांच्या हाती मायवी शक्तिने पुन्हा एकदा एक स्फटिकासारखा गोळा तैयार झालेला.
फरक इतकाच होता ..की प्रथम गोळा सफेद होता.आणी हा गोळा दुसरा गोळा आगीसारखा होता...तांबड्या रंगाचा होता.पुन्हा एकदा बाबांनी आपला हात वर हवेत उंचावत तो हात असाकाही खाली आणला की त्या हातात असलेला तो गोळा बंदुकीतुन गोळी झाडून सुटावी तसे त्या द्वारावर आदळला.आणी ज्यासरशी त्या दरवाज्यावर आदळला गेला त्यासरशी जस चेंडू भिंतीवर आदळून फेकणा-याच्या हाती पुन्हा मार्गक्रमण करत , तसे महांक्राल बाबांच्या दिशेने निघाला..
कोणत्याही क्षणी तो गोळा महांक्राल बाबांच्या देहावर आदळणार की तोच महांक्राल बाबांनी प्रस्ंगसावधान दाखवत विरुद्ध दिशेला उडी घेतली.तसे तो आगीचा गोळा मागे -मागे जात त्या काळ्या रंगाच्या धुरात जाऊन सामावळा..व फुटला गेला तसे ..काळ्या धुरात त्या तांबड्या रंगाची आगीच्या प्रकाशाची वीज जणु कडाडल्या सारखा भास झाला आणि त्या प्रकाशात एक सात फुट दैत्याची काळ्या रंगाची आकृती दिसुन आली. टक्कल पडलेल डोक नी त्या डोक्यावर दोन धार-धार शिंग...बलाढ्य..अस अमानवी शक्तिचा ठेवा असलेल धार-धार नख्यांचे हात-पाय फुगलेल बलाढ्य धृष्ट-प्रुष्ट शरीर .
महांक्राल बाबा वार चुकवून जमिनीवर पडले गेलेले.त्यांच सर्व लक्ष त्या लाल दरवाज्यावर टिकून होत.मागे काय ब्याद येऊन ठेपली आहे ह्या पासुन ते अनभिज्ञच राहिलेले ...की तोच मगाच सारखा हसण्याचा आवाज आला..परंतु हा आवाज मागुन आला गेलेला हे मात्र बाबांच्या कानांनी बरोबर टीपल आणि त्यांनी आपली मान जोरात मागे वळवली..त त्यांना तो काळोख दिसला..आणी त्या कालोखात चमकणारे दोन पिवळेजर्द डोळे....व त्या कालोखातुन फिदीफिदी हसण्याचा आवाज.महांक्राल बाबा एकटक त्या काळ्याधुक्यातल्या पिवळेजर्द डोळ्यांना टक लावून पाहत होते .की तोच क्षणार्धात सेकंदाच्या काट्याप्रमाणे हालचाल झाली..फुंकर मारावी तसे ते काळधूर बाजुला सारल गेल..आणी त्या धुरात लपून बसलेल ते अघोर अमानवी मानवाच्या रक्तासाठी आसुळलेल जनावर, पिशाच्च,सैतान जे काही होत
मोकळ सुटल गेल.धाड-धाड करत जमीन भुंकप यावी तशी हादरु लागली . महांक्राल बाबांसमोरुन ठिक वीसमीटर अंतरावरुन एक सात फुट उंच सैतान की राक्षस आपली भलीमोठ्ठी काया घेऊन धावतच त्यांच्या दिशेने येऊ लागला.रेल्वे रुळात पाय अडकुन ...अटकलेल्या मणुष्यासारखी महांक्राल बाबांची अवस्था झालेली ..आणि त्यांना एक मृत्यूची धडक देण्यासाठी तो सैतान बुलेट ट्रेनच्या वेगाने धाड-:धाड करत पाय जमिनीवर आपटत त्यांच्या दिशेने येत होता.महांक्राल बाबांनी जमिनीला दोन्ही हात टेकवत आपल पुर्ण शरीर वर उचल्ल आणि पुढच्याचक्षणाला त्यांच्या समोर पाहणा-या नजरेस अगदी वीतभर अंतरावर तो सैतान दिसला.एक जोरदार आतिशक्तिशाली धडक महांक्राल बाबांच्या छातीवर बसली नी ते त्या मागे असलेल्या दरवाज्यावर उडाले जात तो दरवाजा धाडदिशी उघडला.वार इतक अफाट शक्तिशाली होत.की बाबांच्या पाठीची हाड जणु तुटली असावीत..काहीक्षन कट-कट आवाज जो झालेला...त्यासोबतच महांक्राल बाबांच्या नाका-तोंडावाटे रक्ताची धार लागलेली.
" हिहिहिही! ए भटा ..आता कसा वाचशिल..! समोर बघ कोन आलाय..! हिहिही.." खोळ खरजातला आवाज .
दरवाजा उघडला गेलेला आणि महांक्राल बाबांपासुन पुढे 20 मीटर अंतरावर तो लाल द्वार होता..आणि मागे 50 मीटर अंतरावर वेताळाच मंदिर होत...त्या मंदिराच्या चौकटीत पाठवाकवुन एका शंभर वर्षाच्या मांस गळून गेलेल्या म्हाता-या सारखा वेताळ फे-यामारत हि सर्व मायावीनी खेळ-आप्ल्या सैन्या मार्फत खेळत होता.महांक्राल बाबांच्या कानावर वेताळाचा आवाज पडत होता...परंतु लक्ष मात्र पुढे त्या चार फुट दरवाज्यावर स्थिर होत.सात फुट उंच त्या राक्षसाची वर खाली होणारी छाती त्या दरवाज्याबाहेरुन दिसत होती...महांक्राल बाबा एकटक भेदरलेल्या अवस्थेत त्या दरवाज्याकडेच पाहत होते..डोळे मोठे झालेले तोंडावाटे रक्ताची लाल बाहेर पडत होती...नाकांतुन थेंब-थेंब रक्त बाहेर येत होत.भीतीने विस्फारलेले डोळे त्या सैतानाची पुढची खेळी काय असेल ह्याचा अंदाज घेत-होती.अचानक त्या लाल रंगाच्या दरवाज्याच्या चौकटीतुन एक धार -धार नख असलेला काळाकुट्ट हात बाहेर आला..अगदी पिसाळलेला सापाचा मूख जणु...हात बाहेर आला तसे त्या सैतानाने आपल शरीर झुकवत त्या दरवाज्यामधुन एक कटाक्ष महांक्राल बाबांच्या जमिनीवर पडलेल्या देहावर टाकला आणि कुत्सिक हसला..ते हसण पाहुन..महांक्राल बाबांनी आपल्या शरीरात होती तेवढी ताकत लावुन ..जमिनिवर हात ठेकवुन शरीर मागे-मागे घ्यायला सुरुवात केली..तस ते दैत्य सैतान त्या दरवाज्यातुन आपल शरीर आत काढू लागल सर्व प्रथम त्याने आपल काळा-कुट्ट पाय आत ठेवला मग..आपल
काळ कुट्ट शरीर आत घेतल. धड-धड करत छाती वाजु लागली..
बाबांनी कस-बस आपल शरीर उभ केल.आणि तोंडावाटे मंत्र म्हणायला..सुरुवात केली ..तसे एका पिसाळलेल्या बैला सारख त्या सैतानाने आपला एक पाय जमिनिवर मागे घासायला सुरुवात केली आणि एक भयंकर कानठळ्या बसवणारी गर्जना करत महांक्राल बाबांच्या दिशेने धाव घेतली.प्रत्येक पावलासरशी जमीनिवरचे खडे थर-थरत उडू लागलेले.महांक्राल बाबांनी आपला एक हात छातीवर ठेवलेला व मुखातून मंत्र उच्चारत होते. तसे त्यांच्या हाताची मुठ तांबड्या रंगाच्या प्रकाशाने चमकायला सुरुवात झालेली....की तोच
पुन्हा एकदा त्या सैतानाने महांक्राल बाबांना एक शेवटची त्रिफाट शक्तिशाली धडक छाताडावर बसवली..वार असा काही अमानविय होता.की त्या धकक्याने महांक्राल अक्षरक्ष हवेत उडाले ..अमानविय शक्ति मानवी शक्तिच्या दहा टक्केवरचढ असते.
मानवाच्या आकळन क्षमतेपलिकडचे विचारही न केलेले दृश्य ती शक्ति घडवत असते..त्याच प्रकारे महांक्राल बाबांना त्या अमानवीय शक्ती रुप असलेल्या दैत्याने दिलेल्या धडकेने ते 40 मीटर अंतरापर्यंत अक्षरक्ष हवेत उडून मग जमिनीवरुन सरपटत वेताळाच्या मंदिरापासुन ठिक दहा मीट अंतरापर्यंत पोहचले होते. हाता पाय पाठीची हाड अक्षरक्ष तुटली गेलेली..कपडे जागो-जागी फाटले जात त्यातुन लाल रक्त बाहेर पडत होत.
दोन परस्पर दैवी विरुद्ध कालोखी शक्तिंच युद्ध सुरु झालेल..आणि दैवी शक्तिवर कालोखाची शक्ति वर-वर चढत एकावर-एक प्रहार करत जात होती.महांक्राल बाबांच्या मुखातून रक्ताच पाणि बाहेर पडत होत.
जागो-जागी शरीरातुन खरचटलेल्या भागांमधुन रक्त बाहेर पडत होत.
त्यांच्या ह्या अवस्थेवर तो वेताळ "खिखिखी" करत हसत होता..
खुप मज्जा येत होती..त्याला अस महांक्राल बाबांना मरताना पाहुन आनंद होत-होता.
अमानवी शक्तिला न जाणे का?परंतु दिव्य शक्तिसमवेत लढा देण्यास व त्यास मारण्यास एक आसुरी आनंद मिळत असतो..ते फक्त त्या सैतानालाचा ठावुक असतं की ते आनंद कसल असत?वर्षोनूवर्ष चालत आलेली द्रुढ परंपराच जणु असावी ही..
एका मेलेल्या प्रेतासारख महांक्राल बाबांच डोळे बंद असलेल देह जमिनिवर पालथ पडलेल. की तोच वातावरणात एक आवाज घुमला...
ढोलताशे वाजवण्याचा आवाज ! आवाज आला त्याचक्षणी वेताळाने हळुच दरवाज्याच्या चौकटीतुन समोर पाहिल तसे त्या सैतानाला आपली ..नाचत-गाजत येणारी भुतावळ दिसली आणि त्या भुतावळीत असलेली ..आपली पालखीत असलेली तलवार .ज्या तलवारीला पाहताच वेताळाचे डोळे चांदिसारखे लकाकले ...व त्याच्या त्या पांढ-या फट्ट चेह-यावर एक छद्मी हास्य पसरल.
"....रक्ताचे वाहिले तिने..कित्येक..पाट..!
कालोखाचा...सम्राट.वेताळ.... पाहत होता..तीची..वाट...!
वेताळाचा खोळ खर्जातला आवाज निघाला..आणि त्याच्या ह्या वाक्यासरशी त्या पालखीत असलेली ती चार हिरेजडलेली तलवार
काहीक्षण एका प्रखर तेजाने चमकली आणि अमानविय शक्तिने एका चुंबका प्रमाणे हवेत उडून वेताळाच्या दिशेने जाऊ लागली. कोणत्याही क्षणी ती तलवार वेताळाकडे पोहचणार होती ..मग वेताळाला..शक्ति मिळुन..तो बाहेर पडणार होता..कलियुगात सैतान साक्षात पृथ्वीतळावर राज्य वसवण्याकरीता सज्ज झालेला..आतिशय वेगाने ती तलवार हवेला चीरत वेताळाच्या दिशेने निघालेली.तो धृष्ट-प्रुष्ट दैत्य सुद्धा आसुरी आनंद व्यक्त करत हा अमानवी चमत्कार पाहत होता..आकाशात वर एका-पाठोपाठ विजाकडाडत होत्या...त्यांचा प्रकाश खाली जमिनीवर बाबांच्या चेह-यावर पडत होता..की तोच त्या विजांच्या कडाडण्यासहित महांक्राल बाबांनी आपले दोन्ही डोळे खाडकन उघडले..आणि आपला एक हात थेट रुद्राक्षमाळेवर घेऊन जात ती..माळ बाहेर काढली...
आणि हळकेच आप्ल्या जागेवर उभे राहिले.इकडून हवेलाही लाजवेल अशी ती तलवार वेताळाच्या दिशेने येत होती....कोणत्याही क्षणी ती तलवार वेताळाच्या हाती येणार होती...
□□□□□□□□□□□□□□□□
.0:25x चा विडीयो मोड ऑन झालेला. सर्व काही अगदी स्लोमोशनने घडत होत..
महांक्राल बाबा येवढ वेळ आपल्याकडे ती पंचमहाभुतांची शक्ति असलेली माळ आहे हे विसरुनच गेलेले..त्यांनी ती माळ आपल्या गळ्यामधुन काढत जागेवर उभे राहिले..आणि उभ रहाताक्षणीच त्यांनी ती माळ आपल्या उजव्या हातात पाचही बोटांना अशी काही गुंडाळली..
की ज्याने प्रत्येक बोटावर पाच-पाच रुद्राक्षमणी चिकटले गेले..आणि एकविसावा तो म्रुत्युंजय मणी हाताच्या बोटांवर बरोबर मधो-मध थोडवर राहिला..महांक्राल बाबा पुन्हा आपल्या जागेवर उभ राहीले आहेत हे पाहुन तो राक्षस पुन्हा एकदा चवताळला.त्याने अपल्या मुखातुन अशी काही आरोळी ठोकली ...की जी वेताळाच्या कानांवर पडताच ..
त्यांच लक्ष महांक्राल बाबांकडे गेल..नी त्याचक्षणी..त्या माळेतले पाचही मणी वेग-वेगळ्या रंगाने चमकुन निघाले..पाच रुद्राक्ष -निळ्या रंगाने .. व बाकीचे प्ंधरा - पिवळ्या , गुलाबी , हिरव्या रंगाने चमकत होते.
हळू-हलू तो प्रकाश त्या एकवीसाव्या मण्यात शिरला ..आणी म्रुत्युंजय मणी कार्यरत झाल..! आणि त्याचक्षणी महांक्राल बाबांच्या शरीराभोवती विशिष्ट प्रकारची किरणे पुर्णत शरीराभोवती फिरु लागली.
मृत्युंजय मणीला पाहाताच वेताळाची गाळण उडाली..चेह-यावरच हसु आटल..गेल. इतकी त्या मण्याची शक्ति कालोखाच्या सम्राटास हि घाबरवण्याच्या वरचढ होती..धाड-धाड पायआपटत तो राक्षस महांक्राल बाबाच्या दिशेने पाय आपटत येत होता की तोच..त्याने धावताक्षणीच जागेवरुन एक झेप महांक्राल बाबांच्या शरीराच्या दिशेने घेतली. आणि पुढच्याच क्षणाला ज्यासरशी महांक्राल बाबांच्या शरीराचा स्पर्श त्या राक्षसाच झाला गेला..तसे..त्याच्या बलाढ्य शरीरास..महांक्राल बाबांच्या शरीरातुन निघणा-या त्या तेजमय प्रकाशाने ज्याप्रकारे लाल रंगाच्या मुंग्याच्या वारुळात हात घालाव आणि त्या वारुळातल्या मुंग्या एकापाठोपाठ हातावर चढायला सुरुवात व्हावी तसे त्या शक्तिने राक्षसाला पकडून घेतल..व त्याच्या पुर्णत शरीरावर ती लक्खपणे उजळणारी शक्ति काहीसेकंद पुर्णत शरीरावर फिरु लागली व पुढच्याचक्षणाला त्याच्या जबडावासलेल्या मुखात शिरली तसे त्याच्या मुखातुन एकापाठोपाठ विव्हळ फुटू लागल्या जणु ती दैवी शक्ति त्याच शरीर आतमधुन उद्धवस्त करत आहे .पुढच्याक्षणाला त्याच्या मुखातुन .. डोळ्यांतुन गाडीची पुढची हेडलाईट पेटाव तसे तोंड,डोळे अगदी लक्ख प्रकाशीत झाले गेले..आणि तत्क्षणी ..कलिंगड फुटाव तस त्याच बलाढ्य शरीर रक्ताचा थारोळा उडवत फुटल गेल.
त्या सैतानाचा आपल्या समर्थकाचा अंत झाला हे पाहुन वेताळ चवताळला, क्रोधिंत झाला...त्याच क्रोधिंत नजरेने अगदी जलजलत्या निखा-यांनी पेटलेला कटाक्ष वेताळाने एकवेळ महांक्राल बाबांवर मग त्यांच्या हाती असलेल्या मृत्युंजय मणीवर टाकला.
व पुढे आप्ल्या तलवारीकडे पाहतच मुखातून हा...!" असा आवाज काढल..तसे ती तलवार हवेत अक्षरक्ष हवेला चीरत त्याच्या दिशेने अमार्गक्रमण करु लागली..तीची ती सोनेरी पात लाव्ह्यासारखी तापु लागली.
आणि पुढच्याक्षणाला ती तलवार वेताळाच्या मंदिराच्या दरवाज्यातुन अगदी 25x च्या गतीने आत शिरताना बाबांना दिसली तसे त्यांनी अगदी वेगाने मायावी शक्तिने हालचाल करत त्या तलवारीचा पुढील दांडा आप्ल्या हाती पकडला.वेताळाच्या हाती शेवटची धार-धार कर्सर सारखी पात तर इकडे बाबांच्या हाती तलवारी पुढील पकड होती.
अमानवी शक्ति विरुद्ध दैवी शक्ति आपल्या पुर्णत मुळरुपात अवतरली होती.वेताळ दरवाज्यातुन अमानवी शक्तिने तलवार आपल शस्त्र बाबांच्या हातुन हिसकावुन घेण्याचा पुरेपुर प्रयत्न करत होता..आणि तेवढ्याच वेगाने बाबा ती तलवार बाहेर खेचत होते.
"सोड ...! भटा......! सोड़.....!"
विस्तवासारखे तापळेले दोन वटारलेल्या डोळ्यांनी खोळ खर्जातला आवाजांनी वेताळ बाबांना धमकी देत होता..त्याच्या ह्या वाक्यासरशी
त्याच्या पांढरट हातांमधुन काळ्या रंगाची शक्ति तलवारीला खालून वर-वर पर्यंत गिळायला येऊ लागली.तसे महांक्राल बाबांच्या उजव्या हातातुन ही त्या पाचही वेग-वेगळ्या चमकणा-या रुद्राक्षांमधुन ..एक लक्ख प्रकाशीत शक्ति बाहेर पडु लागली ...व हलके -हलके गतीने त्या काळ्या शक्तिच्या दिशेने पातीवरुन घसरत-घसरत पुढे जाऊ लागली.
काहिसेकंदातच त्या दोन्ही शक्ती एकमेकांस भिडल्या गेल्या..
तसे वेताळ..महांक्राल बाबांनी खाली पाहिल ! जणु कोणाची शक्ति वरचढ होईल त्यालाच ही तलवार मिलणार होती.पाहता पाहता वेताळाकची कालि शक्ति त्या पाच रंगावर वरचढ व्हायला सुरुवात झाली...तसे ती पात काल्या रंगात तबदील होऊ लागली..
वेताळाने हलकेच जळजळीत कटाक्षासहित महांक्राल बाबांकडे पाहिल. बाबांचे हे डोळे लक्ख प्रकाशीत झालेले ..त्यांनी ही त्याच डोळ्यांनी वेताळाकडे पाहिल व वेताळ त्यांच्याकडे पाहुन हसला..
तसे महांक्रल बाबांनीही त्या सैतानाकडे पाहुन मंदस्मितहास्य केल..आणि तोच आपला माळेतला एकवीसावा रुद्राक्ष मणी अगदी
जलद गतीने त्यांनी उपटून काढला..व त्याच वेगाने त्या दरवाज्याच्या चौकटीवर बसवला..तसे तो म्रुत्युंजय मणी रुपी रुद्राक्ष त्या चौकटीवर
अगदी जळजळीत लाव्ह्यासारखा तापला जात फ्स्स आवाज करत चिकटला गेला. मृत्युंजय मणी दरवाज्याच्या चौकटीवर बसताच ..त्याचक्षणी त्या चौकटीवरुन खाली एक लाल रंगाचा पारदर्शक पडदा जणु एका कवचाप्रमाणे खाली आला आणि त्या वेताळाच्या हातात असलेल्या पातीला स्पर्शूनखाली गेला..तसे वेताळाच्या कालोखाच्या ,अंधकाराच्या सम्राटास एक आतिशक्तिशाली धडक बसली.दैवी शक्तिने साक्षात पंचमहाभुतांच्या मृत्यूंजय मणीच्या
प्रहाराने बसली की वेताळ थेट हवेत उडाला..तसे वेताळाच्या मागो -माग एक गोळ काळ्या रंगाचा वर्तुळ निर्माण झाला..
" ए भटा..! परत येईल..मी...बदला..बदला...!
बदलाऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ"शेवटचा स्वर मंदावला तसे.वेताळ त्या कालोखात सामावुन गेला आणि त्याचा हा खोळ खर्जातलाआवाज सुद्धा एका लयीत कमी-कमी ऐकू येत कायमचा बंद झाला.त्यासरशी थकव्याने महांक्राल बाबांच पुर्ण शरीर मागे पडल..! पुर्णत शरीरातुन शक्ति वाहुन गेलेली.मृत्युंजय मणीची शक्ति जी वापरली होती..त्यांनी ! त्या शक्तिचा उपयोग करणे म्हंणजे आपल्या शरीरातील अर्धी निम्मी शक्ति शक्ति सुद्धा निघुन जाणे होय. जमिनिवर पडताक्षणी महांक्राल बाबांचे डोळे मिटले गेलेले . बंद पापण्यामधोमध खोळ अंधार दिसुन येत होत..
की तोच त्यांच्या दोन्ही पापण्यांवर एक उबदार किरण पडली..मग हळु हळु तो स्पर्श शरीरास ही जाणवु लागला. तसे बाबांनी अलगद आपले दोन्ही डोळे उघडले .तसे त्यांच्या नजरेसमोर झाडांतुन डोकावून पाहणारा.
सकाळचा सूर्यनारायण दिसला..जो की असत्याला पुरवुन सत्यासाठी एका नव्या दिवसाची सुरुवात घेऊन आला होता. वेताळाच्या श्रापातुन पाषाणवाडी मुक्त झालेली..! वेताळास कालोखाच्या सम्राटास बाबांनी पुन्हा एकदा पाताळात धाडलेल..
दैवी शक्ती नेहमी प्रमाणे असत्यावर हुकूमत गाजवून आली होती..
असत्याचा चकना-चूर झाला गेलेला..!
काहीक्षणा नंतर..
महांक्राल बाबांना वेस ओलांडून गावात येताना..पाहताच गावक-यांनी त्यांच्या भोवताली गराडा घातला..तसे..बाबांनी गावातल्यांना वेताळाच अंत झाल हे कळवल . त्यासरशी पुर्णत पाषाणवाडी त्याचक्षणी आनंदाने नाचू लागली..! जल्लोष सुरु झाला...व त्या सर्व गावक-यांनी आपल्या एका नव्या दिवसाची सुरुवात केली.
□□□□□□□□□□□□□□□□□
सर्प पिशाच्चाच निर्जीव देह .त्या गुहेतल्या मशालींच्या तांबड्या प्रकाशात जमिनिवर पडलेल..आजुबाजूला छोठ-छोठे सर्प रेंगाळत होते..! की अचानक दुरुन एक स्त्रीसदृश्य
.आकृती..येताना..दिसु लागली..! ती हळू-हळू चालत त्या भयानक दिसणा-या सर्पपिशाच्चा च्या निर्जीव देहाकडे चालत आली..व गुढघ्यांवर खाली बसुन तीने आपला एक हात वाढवत सर्पपिशाच्चाची खवल्यांची पापणी वर केली. व त्या डोळ्यांत पाहिल..तसे तिला..
त्या पिवळेजर्द डोळ्यांत कमल्याचा चेहरा..दिसला.....जात मुखातून..
तीन शब्द बाहेर पडले
" बदलासस्स्स्स्स्स्स..."
समाप्त.:
.अध्याय 1..
सर्पपिशाच्च , जयविक ह्या दोन्ही ही कथा वेगवेगळ्या आहेत.😊
..! मी ..2 आठ्वडे घेऊन..येवढ भाग लिहिलंय तर तुम्ही 2 मिनीट काढून समीक्षा नक्की द्या..प्रिय वाचकांनो...
लवकरच भेटू....
पुढील सीजन मध्ये...