Chetuk - The real story....Part -1 books and stories free download online pdf in Marathi

चेटूक - एक सत्य घटना... - भाग 1

कथा लेखक :- पौर्णिमा कांबळे.
 
सूचना - वाचक मित्रांनो...ही कथा आपल्या वास्तविक जीवनाशी याचा काहीही संबंध नाही.जात,पात,धर्म यांच्या कोणाच्याही भावना धुखावत नाही.अधश्रद्धेला प्रोत्साहन देत नाही...या कथेत उच्चारण करणारे नाव, गाव, ठिकाणं सर्व काही काल्पनिक असून याचा कशाशीही संबंध आल्यास निव्वळ योगायोग समजावा. ह्या भयकथेच्या सादरीकरणासाठी वापलेले आहेत......
 
कोल्हापूर मधील एक गाव माळावरची वाडी पण मी मूळची पुण्याची माझा जन्म पुण्याचाच पण गावाला येणे जाणे होतच राहायचे.६ वी मध्ये होते मी.....एक दिवस मी उन्हाळयांच्या सुट्टीमध्ये गावी आले तिथे माझ्या मैत्रीणी झाल्या पण त्यामधील एक मैत्रीण आली नव्हती.मधू नाव होते तिचे खूप हुशार,हसमुख चेहरा,रंग सावळा होता.बाकी मैत्रिणींना विचारले, " सरू " मधुला काय झाले आहे ! सरू म्हटली काही नाही प्रिया तिची काही दिवसापासून तब्येत ठीक नाहीये म्हणून ती बाहेर येत नाही घरातच असते.मी काही न बोलता तिथून निघून गेले.एक दिवशी ठरवले की मधूच्या घरी जाऊन तिला भेटून यावे.......
रविवार होता मी माझ्या काकीला सांगितले की मधुच्या घरी जाऊन भेटून येते तिची तब्येत काही बरी नाही तेव्हा काकीने मला सांगितले की ७ च्या आत घरी यायचे दिस मावल्यावर बाहेर थांबणे बरे नाही मी मान डोलावली आणि तिच्या घरच्या दिशेला जायला निघाले.......काही मिनिटानंतर तिचे घर आले आणि तिच्या दरवाज्या बाहेर उभा राहून मधुला आवाज दिला........ " मधू ".....' ये मधू '.......कुठे आहेस......." मी प्रिया ".........तेवढ्यात तिची आई आली मला आतमध्ये बोलावले तेवढ्यात मधू आली मी तिला मिठी मारली आणि विचारले, कशी आहेस ग ? ती बोलली मी बरी आहे. दबक्या आवाजात बोलली.....आम्ही बसलो गप्पा मारत कधी दिवस मावळाला कळलंच नाही.मी घरी आले घडयाळात 6.50 pm झाले होते आणि ते पाहून मी मोकळा श्वास घेतला.....हुसश्श.....बरे झाले लवकर आले नाहीतर काकूने खूप रागावले असते......रात्रीचे जेवण केले आणि अंथरून टाकून झोपायची तयारी सुरु होती...अचानक आठवले मधूने बोलता बोलता असे काही सांगितले ते ऐकून मी भारवून गेले.माझ्या मनात सारखा तोच विचार येऊ लागला.....
 
मधूने सांगितले ती तिच्या मामा बरोबर त्यांच्या गावाला गेली.त्यांचा संपूर्ण परिवार होता.सांगली मध्ये एक छोटेसे गाव तिथे सुट्टीच्या दिवसात गेले होते.पण........तिच्या मामाला अश्या काही नकारात्मक ऊर्जा दिसायच्या त्यामुळे त्यांची मानसिक संतुलन बिघडले होते पण त्यांना सर्व काही समजत होते.नंदकुमार नाव होते पण त्यांना नंदू मामा म्हणतात..त्यांचे वयाच्या 21 व्या वर्षी लग्न झाले अनिता नावाच्या मुलीशी दोघेही त्यांच्या संसारात खुश होते...एक दिवस त्यांची बायको म्हणजे अनिता स्वयंपाक करत होती...तेवढ्यात नंदकुमार आले त्यांनी अनिताला हाक मारली " अनिता ".......अग ये "अनिता" हे ग कोणाला बोलावलेस तु घरी कोणाचे मुल आणले आहे तु.....? ती स्वयंपाक घरातून धावत बाहेरच्या खोलीत आली....." काय हो ! आवाज दिला होता का तुम्ही ........? धाप टाकत म्हणाली....
नंदूमामा बोलले " हे ग कोणाचे मूल फिरत आहे घरात ? हे ऐकताच अनिता घाबरली आणि इकडे तिकडे पाहू लागली... आणि बोलली " अहो ! तुम्ही हे काय बोलत आहात.... "तुमचं डोस्क तर फिरल नव्ह ना " ! तेव्हा नंदू मामा बोलले..... " अग..! " हे काय तुज्या साडीच्या पदरा सोबत खेळत आहे "....!!!! तेवढ्यात तिने पदर झटकला आणि हे बोलत स्वयंपाक घरात निघून गेली " ह्या माणसाला खुळ लागलंय वाटत"......!! पण नंदूमामा यांना काही कळेना कारण लहानपणापासून त्यांच्यासोबत असे काही घडले नव्हते.....
पण त्यांना जे दिसत होते ते काही साधे नव्हते ते कोकण या भागात जास्त प्रमाणात आढळून येतात......काही लोकांना सवय असते दुसऱ्यांचे चांगले झालेले त्यांना बघवत नाही आणि त्याच दृष्टिकोनातून त्या लोकांचे वाईट कसे होईल ह्याचाच विचार करत असतात आणि जादूटोणा,भानामती,करणी असे मार्गाच्या नादी लागतात त्यातला हा एक प्रकार म्हणजे " चेटूक "...........!

इतर रसदार पर्याय