चेटूक - एक सत्य घटना... - भाग 2 Pournima kamble द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • अनुबंध बंधनाचे. - भाग 18

    अनुबंध बंधनाचे.....( भाग १८ )एक दिवस प्रेम च्या ऑफिस मधे त्य...

  • रहस्य - 4

    सकाळी हरी आणि सोनू गुजरात ला पोचले आणि पूढे बस ने संध्याकाळ...

  • आर्या... ( भाग १ )

    आर्या ....आर्या ही मुलगी तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी...

  • गया मावशी

    गया मावशी ....    दिवाळी संपत आली की तिची आठवण हमखास येते…. ...

  • वस्तीची गाडी

    वसतीची  गाडी     

       
                 जुन 78 ते  जुन 86 या  का...

श्रेणी
शेयर करा

चेटूक - एक सत्य घटना... - भाग 2

चेटूक - एक सत्य घटना...भाग - २

कथा लेखक :- पौर्णिमा कांबळे.

सूचना - वाचक मित्रांनो...ही कथा आपल्या वास्तविक जीवनाशी याचा काहीही संबंध नाही.जात,पात,धर्म यांच्या कोणाच्याही भावना धुखावत नाही.अधश्रद्धेला प्रोत्साहन देत नाही...या कथेत उच्चारण करणारे नाव, गाव, ठिकाणं सर्व काही काल्पनिक असून याचा कशाशीही संबंध आल्यास निव्वळ योगायोग समजावा. ह्या भयकथेच्या सादरीकरणासाठी वापलेले आहेत......

अनिताने नंदूमामाला हाक मारली.......अहो....चला वाईच जेवण करून घ्या...तेव्हा नंदूमामाने आवाज दिला.....हो ! येतोच बघ लगेच......असे बोलून स्वयंपाक घरात गेले तेवढ्यात त्यांच्या पाठोपाठ ते चेटूक ही त्यांच्या मागे गेले.. त्यांच्यासोबत जेवायला बसले....तेवढ्यात नंदूमामा म्हटले....अग....ह्याला पण वाढ जेवायला माझ्या शेजारीच येऊन बसला आहे...सगळे जण त्यांच्याकडे आश्चर्याने पाहू लागले....तेवढ्यात मधुची आई बोलली......ये..नंदू ....वेडा झालास काय तु.......हे काय बडबड करतूयास....गप गुमान जेव बघू.......!!! असे बोलताच नंदूमामा काही न बोलता गपचूप जेऊ लागले पण ते चेटूक मामाच्या ताटात जेवण करू लागले......आणि नंदूमामा काही न बोलता जेवण करून उठले. सगळे जण हॉल मध्ये येऊन बसले पण ते चेटूक मामांच्या जवळ जाऊन बसले.....आणि मधुच्या आईने नंदूमामाला विचारले....काय र.......जेवताना कोणाला वाढ म्हणत व्हतास.....कोण होते बाजूला ? तेव्हा नंदूमामा बोलले..अग....ताई एक छोट मुलासारखे दिसत आहे...तुम्हाला नाही दिसत आहे का ? माझ्या बाजूला आहे आत्ता तेव्हा मधुची आईने विचारलं कसं दिसतंय रे ते ?
तेव्हा नंदूमामा त्याचे वर्णन सांगू लागले........१ फूट उंची, रंगाने सावळा, डोक्यावर टोपडे, पोट जरा बाहेर आलेलं आणि विचित्र चेहरा..........असे सांगितल्यावर सगळ्यांना भीती वाटू लागली की हा नेमका काय प्रकार आहे तो कोणाला काहीच कळेना......सगळे नंदूमामा कडे एकटक पाहू लागले......नंदूमामा बोलले.....अरे ! असे काय पाहताय सगळे माझ्याकडे ? तेव्हा कोणीच काही बोलले नाही.......कारण त्यांना असे नकारात्मक ऊर्जा दिसत आहे ह्याचा कोणाला विश्वास बसेना......तेवढ्यात अनिता बोलली......अहो ! ताई त्यांना मस्करी करायची सवय आहे तुम्हाला माहित आहे ना....?? तेव्हा मधुची आई बोलली......हो.....हो.....होना....!! पण त्यांना कळले होते की त्यांच्या जन्माच्या वेळी गुरुजींनी नंदू ची जन्मपत्रिका पहिली त्यावेळेस सांगितले होते की त्याला असे काही दिसेल की ते आपल्याला नाही दिसू शकणार....कारण नंदूचे मनुष्य गण आहे...आणि जसे त्याला समजायला चालू होईल तेव्हा अशा गोष्टी त्याला दिसतील.....तो म्हणजे नकारात्मक शक्तींचे झाड आहे कोणीही त्याच्या शरीरात प्रवेश करू शकतो पण त्याच्या मर्जी नुसार आणि त्या गोष्टी त्याला दिसुही लागतील......मधुची आई हे आठवतच होती त्यात अनिताने हाक मारली.....अहो ताई......जरा इकडे येता का? हो म्हणून मधुची आई गेली असता अनिताने विचारले.....यांना काय झाले आहे अचानक का असे करतात ?
तेव्हा गुरुजींनी सांगितलेला प्रकार हा अनिताला सांगितला...तेव्हा ती खूप घाबरली पण तिने स्वताला सावरले.....रात्रीची वेळ होती नंदूमामा घराजवळच्या दुकानात गेले..8 वाजताची वेळ होती..तिथेच एक 45 वर्षाची एक महिला आली.नंदूमामाने तिच्याकडे पाहिलं....तेवढ्यात तिच्या पदर धरून ते चेटूक उभे होते...त्या महिलाने मामाला विचारले.....काय रे नंदू.....काय झाल तुला ?
नंदूमामाने विचारले......हे तुमच्या पदराशी काय करत आहे? तेवढ्यात ती महिला डचकली आणि म्हणाली.....को..को..को.....कोण? नंदू हे काय बोलतोस ? तेव्हा नंदू मामा बोलतात हो मी हे सगळं पाहू शकतो!!! तेवढ्यात ती महिला तिथून निघून जाते....
जाता जाता बोलते.....
मी पाठवलेलं मूल कसे वाटले नंदू....!!! आणि तीक्ष्ण आवाजात हसत गेली.....हा.......हा......हा.....!!!

नंदू मामा विचार करतात ह्या बाईला काय माहित माझ्या घरी पण असच एक छोटेसे मुलासारखे दिसणारे चेटूक आहे ते........विचार करू लागतात मामा घरी जाताना की मी तिला ओळखत नाही आणि माझे नाव तीने बऱ्याच वेळा घेतले मला कसे कळले नाही....
ती कोण होती ??? कुठून आली..?? पहिल्यांदा गावात पाहतो आहे मी...!!!
असे अनेक विचार करत नंदूमामा घरी पोहचले.........


चेटूक - एक सत्य घटना....भाग - १ ला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला आहे....भाग ३ लवकरच प्रकाशित करेल.....धन्यवाद 🙏🙏