१ तास भुताचा - भाग 2 jay zom द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

१ तास भुताचा - भाग 2

लेखक.!- जयेश.. झोमटे..
नवरात्रीचा गोंडा...

रात्रीचा किरर्र काळोख पसरलेला . जंगलातले रातकीडे
विशिष्ट प्रकारच्या आवाजाने किर्र, किर्र्त मृत्युगीत गात होते. पिवळ्या रंगाच चमकणा-या काजवाच प्रकाश जणु हडळीच्या पिवळ्याजर्द डोळ्यांप्रमाणे भासून येत होत. कोकनातल्या जंगलात आज जाड धुक पसरलेल, त्यासमवेतच वातावरणात पसरलेली निरव शांतता ह्या सर्व वातावरणातल गुढपण आणखीणच वाढवत होती . चंद्राची सावली झाडांवर पडली जात , फांद्याच त्या सावलीत अक्राल-विक्राळ भयंकर रुप तयार झालेल. दुर कोठून तरी एका पुरुषाची आकृती धावतच चंद्राच्या उजेडात जंगलात शिरुन आली. त्या पुरुषाच्या चेह-यावर वाढलेली दाढी, मोठ्या भुवया होत्या . अंगावर एक काळ्या रंगाचा सदरा व खाली एक सफेद रंगाचा धोतर घातलेला . त्याच्या हातात एक धार-धार पात असलेली कु-हाड होती जिला लाल रंगाच ताज रक्त लागलेल . त्या अनोलखी इसमाला पाहुन एकवेळ अस वाटत होत.की कोणी चोर, दरोडेखोर असावा, चोरीच्या उद्देश्याने त्याने काहीतरी विपरीत केल असाव . कारण त्या इसमाच्या चेह-यावर भयंकर भितीजनक भाव होते . तो इसम जस च्ंद्राच्या प्रकाशात थोड पुढे निघुन गेला .त्यासरशी 8-9 पेटलेल्या मशाली घेऊन 10 -12 माणस अंधारातुन वाट काढत जंगलात शिरले.
" गावक-यांनो घोळक्या, घोळक्यान जंगलात शीरा..? तो गंग्या
डाकु इथच कुठ तरी दबा धरुन बसला असल.! सोडू नका
त्यास्नी?!.."
गावचा सरपंच त्या सर्व गावक-यांकड्या पाहत म्हणाला .मग सरपंचा च्या वाक्यावर हाती काठ्या-कुठ्या घेतलेले दहा बारा गावकरी घोलक्या -घोलक्यानेच मशाली , टिटव्यांच्या तांबड्याप्रकाशात जंगलात घुसले. गंग्या डाकु एक दरोडेखोर होता. रात्री -अपरात्री तो आप्ल्या टोळीसहित गावांवर दरोडा टाकायचा. चोरी करतावेळेस कोणि मध्ये आलच तर तो आपल्या धार-धार पात असलेल्या कु-हाडीने त्या समोरच्या मनुष्याच मढ पाडण्यास सुद्धा मागे-पुढे पाहत नसे. अशातच त्याने कित्येक तरी खून केले होते. गंग्या डाकु नाव ऐकल तरी लोकांच्या अंगावर सर्रकन काटा उभा राहत होता. अशातच गंग्या डाकुची खूनखराब्या कारनाम्यांची खबर पोलीसांना लागली. गंग्याने व त्याच्या टोळीने आतापर्यंत कित्येक तरी निष्पाप लोकांच दरोडा घालतावेळेस
बळी घेतलेल. ज्या कारणाने पोलिसांनी त्याला जिवंत पकडण्यासाठी 2 हजार रुपयांच बक्षिस ठेवलेल. त्यासमवेतच पोलीसांनी ही हे सुद्धा सांगितलेल! जर का कोणत्याही गावात गंग्याने रात्री -अपरात्री दरोडा
घातला , तर आपल शरीर रक्षण करण्यासाठी त्याचा जिव सुद्धा घेऊ शकता . सरकार कडुन तशी एन्काउंटरची परवानगी मिळालेलीच परंतू गंग्या काही सापडत नव्हता दरोडा, खुन करुन तो पसार व्ह्ययचा . ज्याने पोलीसांकडे रामबाण असुन सुद्धा तो उपयोग शुन्य होता .
अशातच पोलिस यंत्रणा सुद्धा थकलेली. ज्याने पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी एक ऑप्शन तैयार केलेल. 2 हजार रुपयांच बक्षिस, गंग्यास मृत किंवा जिवंत आणून द्या. परंतू ज्या-ज्या गावात दरोडा पडलेला. त्या -त्या घरातल्या लोकांच जिव गंग्याने घेतलेल त्या लोकांच्या मनात बदल्याची भावना उत्पन्न झालेली लोकांना पैसे नको हवे होते त्यांना फक्त मेलेला गंग्या हवा होता.म्हणूनच गावातल्यांनी
रात्र -अपरात्र जाग राहुन गावात पाहारा देण्याच ठरवला. टोळ्या-टोळ्यांनी लोक गावभर हातात, काठ्या, कोयत्या घेऊन फिरु लागले. आणि त्याच लोकांच्या जाळ्यात आज गंग्या अडकला होता.
मृत्युच्या भीतीपोटी तो जंगलात शिरलेला.आणि ती 10-12 माणस म्हंणजेच त्याला मारण्यासाठी पिच्छा करत आलेली. सरपंचाच्या वाक्यावर सर्व गावकरी टोळी-टोळीने आत शिरले. अक्षरक्ष एक-दीड तास तपास सुरु राहीला पुर्णत जंगल छप्पा -छप्पा छानुन झाल. परंतु ग्ंग्याच काही केल्या पत्ता लागला नाही.
" भेटला का..! ग्ंग्या..? " समोरुन आपल्याकडे येणा-या 3-4 गावक-यांकडे पाहत सरपंच म्हणाले. परंतु सरपंचांच्या वाक्यावर मात्र गावकरी निराशाच्या सुरात म्हंणाले.
" न्हाय ओ सरप्ंच ! पुर्ण जंगल पाहायला बघा पण त्यो हरामखोर
. ......कुठ गेल कुणास ठावूक..!" तो गावकरी म्हणाला . तस त्याच्या ह्या वाक्यावर अजुन एका गावक-याचा सरपंचांना साद घालण्याचा आवाज आला.
" ओ सरप्ंच! ओ सरपंच. ! इकड इहिरी जवल या ..?"
गावातल्या लोकांना पाणी पिण्यासाठी एकच साधन होत. ती म्हंणजेच जंगलातली एकमेव विहीर. विहीरीला खाली जमिनीतुन पाणी यायच
ज्याने विहीर बाराही महिने भरलेली असायची. त्या गावक-याच आवाज आल तस सरपंच धावतच त्या गावक-याच्या दिशेने पोहचले.
" काय रे काय झाल.? " सरपंच म्हणाले. सरप्ंचांच्या वाक्यावर त्या
गावक-यान फक्त भित-भितच विहीरीकड बोट दाखवल . तस सरपंचांनी एका गावक-या कडून एक मशाल आपल्या हाती घेतली व पेटलेल्या मशालीच्या तांबड्या उजेडात विहीरीत डोकावुन पाहिल. तस त्यांच्या कपाळावर आठ्या पसरल्या , चेह-यावर थोडे भयग्रस्त भाव पसरलें. रातकिंड्याची किर्र, किर्र आता वेग घेऊ लागली. विशिष्ट प्रकारच्या आवाजात घुबड घुत्कारु लागलेल . सरपंच विहिरीत डोकावुन मागे- सरले . तस एक -एक गावक-यांने सरपंच व आपल्या मित्राने अस काय पाहिल ह्यावर प्रश्न न विचारता विहीरी आत पाहायला सुरुवात केली .
त्यासरशी एक गौप्यस्फोट झाला . कारण प्रत्येक गावक-याच्या नजरेस त्या विहीरीत गंग्याच फुगलेल पाठमोर पाण्यावर तरंगणार प्रेत दिसुन आल. काहीक्षण स्मशान शांतता पसरली. ही स्मशान शांतता दुख:व्यक्त करण्यासाठी नव्हती. गंग्या ड़ाकू मेला हे पाहुन गावक-यांच्या उलट चेह-यावर थोड़फार आनंदच झळकू लागला. तसही त्याने पुर्णत आयुष्यात वाईट कामच केले होते. गावक-यांन मार्फत लागलीच गंग्या डाकूच प्रेत बाहेर काढण्यात आल. सरपंचांनी गावातल्या ओळखीच्या पोलिस पाटलास गंग्याची मृत्युची वार्ता कळवली.तस ते लागलीच घटनास्थळावर दाखल झाले . मग त्यांनी टेलीफोनवरुण आप्ल्या पोलिस चौकीत फोन लावला तसे काहीवेळांनी 4 -5 पोलिस गावात हाजीर झाले . पोलिसांनी गावक-यांना कसलीही माहीती विचारली नाही. तसही गंग्या मेला ह्याचा फायदा त्यांना झाला होता. पोलिसांनी त्या काळी असलेल्या शवगाडीत गंग्याच प्रेत न जाने कोणत्या स्मशानात जाळल की हॉस्पीटलच्या मुर्दाघरात पाडून ठेवल ते त्यांनाच माहीत . कारण गंग्या डाकूला बायको, मुल असतील हे पोलिसांना माहीती नव्हत. गंग्या डाकुला मरुन एन आठवडा उलटून गेला असेल, की अचानक गावातल्या विहिरीवर सकाळी पाहाटे पाणी भरायला जाणा-या बायकांना , विहीरीवरच्या वाटेने रात्री पायवाट करणा-या वाटसरुंना विचित्र अमानविय , कल्पनेशक्तिच्या पलिकडचे अनुभव येऊ लागले.
कोणीतरी झाडांवरुन, विहीरीच्या पाण्यातुन पिवळ्याजर्द चमकणा-या डोळ्यांनी आप्ल्याकडे पाहत आहे. पाणी भरायला जाणा-या बायकांना पहाटे पसरल्या जाणा-या जाड धुक्यात मेलेल्या गंग्या डाकुच अंगावर काला सदरा, खाली सफेद धोतर , खांद्यावर घोंगडी, हातात कु-हाड लाल इस्तवासारखे चमकणारे अंगारभरलेले डोळे असा खवीसा सारखा गंग्या दिसू लागला.ठिंणगी उडावी आण वणवा पेटावा अशी भुतासारखी बातमी गावात पसरली . जो तो म्हणे गावची विहिर झपाटली गेलीये, गंग्या खवीस झालाय, बदला घ्यायला आलाय .नाना त-हेच्या चर्चेना उधाण आल. एके दिवशीतर भयंकर कृत्य घडल. नायकांची सुन सकाळी पाणि भरायला विहीरीवर गेली ती थेट मृत अवस्थेतच परत आली. विहीरीत तीच मेलेल प्रेत जे सापडल. त्यादीवशीपासुन मग गावातल्या बायका विहीरीवर पाणि भरायला जायला घाबरु लागल्या .
शेवटी विहीर बंद पडली . गावक-यांच्या मते गंग्या खवीस विहीरीच्या आतुन बाहेर येत लोकांच जिव घेतो, म्हणूनच विहीरीच्या कठड्याला जोडुन एक मोठ गोल लाकडाचा दरवाजा व दरवाज्याला एक अघोरीविद्या जाणणा-या बाबांमार्फत आभीमंत्रित केलेला टाळा बसवला . ज्याकारणाने गंग्याच प्रेत बिलातच अडकल गेल, म्हंणजेच विहिरीत अडकल गेल. आभिम्ंत्रित केलेल्या टाळ्याच पुर्णत गावाला फायदा झाला. गंग्याच खवीस योनीत गेलेल भुत त्यानंतर कधीच कोणाला दिसल नाही, नाही पेरानॉर्मल ऐक्टिविटी झाली . महिने- वर्ष उलटून गेले. त्यासरशी पुर्णत गाव गंग्याखवीसाबदल विसरुनच गेल.

7 वर्षानंतर
□□□□□□□□
नवरात्रीचा सन आलेला , गावा-गावांत देवी बसल्या जात .
सर्व प्रजातीच्या भुतांना सुट्टि मिळालेली.
सरपंचांचा एकुलता एक 20 वर्षाचा मुलगा राघव सुद्धा मग नवरात्रीकरीता शहरातुन 8-९ वर्षानंतर प्रथमच गावात आलेला. शहरात तो सरपंचाच्या मेव्हण्याकडे म्हंणजेच आपल्या सख्ख्या मामाकडे रहायचा. का तर गावात शिक्षणाची तंटा होती. राघवच शिक्षण शहरात झाल्याने त्याचा आपल्या शिक्षाणावर गर्व होता. विचार करण्याची, वागण्याची पद्धत मॉडर्न होती.
" ए राघव....... ! ए राघव???" सरपंचाच्या घराबाहेर उभे राहुन राघवला त्याचे गावातले मित्र आवाज देत होते . का तर ते सर्वजन दुस-या गावात गरबा पाहायला चाललेले. परंतू गम्मंत म्हंणजे ते सर्वजन गरबा कमी आणि नटलेल्या पोरी जास्त पाहाणार होते .मित्र आवाज देतायेत हे पाहून राघव लागलीच घरातुन बाहेर आला व म्हणाला .
"हो -हो चला ..!" राघव अस म्हंणतच आप्ल्या मित्रांसहित जाऊ लागला. तस मागुन राघवच्या मातोश्रींच आवाज आल.
" ... राघव ......थांब बाळा !." राघव च्या मातोश्री त्याच्या जवळ आल्या.व त्याला आपला उजवा हात पुढे करण्यास सांगू लागल्या.
राघवने आपला उजवा हात पुढे केला तसे राघवच्या मातोश्रींनी एक गोंडा म्हंणजेच लाल पिवळ्या रंगाचा धागा त्याच्या हाती बांधण्यास
सुरुवात केली .सर्व प्रथम राघवने हा गोंडा ( धागा) बांधण्यास नकारच दर्शवला होता . परंतु गोंडा (धागा) बांधला नाहिस तर गरबा पाहायला जायची परवानगी मिळणार नाही राघवच्या मातोश्री त्यास म्हणाल्या.
" काय ग आई.! हा गोंडा (धागा)का बांधतेस माझ्या ? "
राघव जरा नाखुषीतच म्हणाला.
" अरे बाळा..! आता नवरात्री आहे की नाही ..! मग आता नऊ
दिवस पिशाच्च , हडल, जखीण अशी विविध प्रकारची भुत बाहेर
फिरतात, म्हणूनच देवांजवळून हा गोंडा आपल्या रक्षणकरीता
हाती बांधला जातो. .." राघवच्या मातोश्री म्हणाल्या .
" पन माझा ह्या सर्व गोष्टींवर विश्वास नाहीये ..! "
राघव आप्ल्या मातोश्रीं कडे पाहत म्हणाला.
" हे बघ ..! तुझा विश्वास असो! .. किंवा नसो !परंतू जर का तु हा धागा बांधून जाणार नसशील..! तर तुला..गरबा पाहायला जायची परवानगी मिळणार नाही!" राघवच्या मातोश्री म्हणाल्या . तस त्यांच्या ह्या वाक्यावर राघवने गप्प गुमान तो धागा आपल्या हाती नुसताच नावापुरता बांधुन घेतला व जंगलाच्या वाटेने ज्या गावात गरबा खेळत होते त्या गावी जायला निघाले.एक दीड तासात ते सर्व त्या गावी पोहचले. गरबा कमी आणि तिथे नटूण थटून आलेल्या पोरींना पाहण्यात ह्या चार मुलांचा वेळ न जाणे कसा निघुन गेला ते त्यांनाच कळाल नाही .
" ओय राघव ! निघायच का आता..? " कृष्णा म्हंणजेच राघवचा गावातला मित्र म्हणाला.
" अरे किशन ! थांब ना यार..! ती पोर बघ ना माझ्याकडे बघतीये..?" राघव किशनकडे गालात हसत तिरकस नजरेने पाहत म्हणाला .
" अबे राघव .. ! उद्या येऊ ना आपण वापस..? पन आता ले येळ
झालीये..! 12 वाजलेत..!" राघवच्या वाक्यावर कृष्णा म्हणाला.
तस त्याच्या ह्या वाक्यावर राघवने मान हलवतच जाऊयात असा इशारा केला. 5 मिनिट अजुन थांबुन ते सर्वजन घरी जाण्यासाठी निघाले. रात्रीचे 12:30 वाजलेले ,व हे चारही जण त्या जंगलातल्या काळ्या कुट्ट अंधा-या स्मशान शांततेतुन पिवळसर टॉर्चच्या उजेडात गप्पा-गोष्टी करत प्रत्येकाची मज्जा -मस्ती टर उडवत निघालेले.
" किशन मला ती पोर खुप आवडली यार ..!" राघव पुन्हां म्हणाला.
" राघव नक्की आवडले का..?भावा " जयदीप राघवचा मित्र म्हणाला.
" हो जया..!" राघव ने इतकेच प्रतिउत्तर दिल .राघवच्या ह्या वाक्यावर जयदीप ने किशनला डोळा मारत टाळी दिली व पुढे म्हणाला.
" अरे राघव! मग एक काम करना..? तुझ्या बाबांना उद्या मागण
घालायला घेऊन जा तिच्या घरी..! हा, हा, हा, हा ." जयदीच्या ह्या वाक्यावर राघवसहीत बाकीचेही हसू लागले . एव्हाना 1 वाजुन गेलेला.
1 तासाच अंतर कापून झालेला .आता फक्त अर्धातास चालून झाल्यावर ते सर्वजन आप-आप्ल्या घरी गावी पोहचणार होते .
" भाईलोक! आता काही बोलू नका..! जोरात चाला ..!"
कृष्णा म्हणाला. परंतू त्याच्या ह्या वाक्याचा अर्थ राघवला कळाल नाही की हा असा का बोलत आहे.
" काय रे किशन ! काय झाल ..? असा का बोलतोयस..? " राघवने न राहुन विचारल . तस त्याच्या ह्या वाक्याच समर्थन जयदीपने केल .
" अरे राघव ! आता 10 मिनींटांनावर एक विहीर लागेल..! गंग्याखवीसाची विहीर म्हंणूणच जोरात चाला म्हंणतोय तो..! "
" तोच का तो गंग्या डाकु? खुप ऐकून आहे त्या भुताबदल "
राघव जयदीप कडे पाहत उद्दारला .
" अरे भावा ..! तू फक्त ऐकुन आहे ..रे ! पन आपल्या गावातल्या प्रत्येक माणसानी पाहलय राव त्याला..!" जयदीपने पुन्हा तोंड उघडल.
" पन माझ नाहीयेरे ह्या भुता-खेतांवर विश्वास..! ह्या सर्व भाकड .
..... कथा आहेत..!" राघवने आपल मत मांडल .
" ओय राघव ! तुझा नाहीये ना..विश्वास ..! मग जाऊदे ना, सोड तो
विषय! पन आता गप्प बस्स..! ती विहीर जवळ आले!"
कृष्णाची नजर हे वाक्यउद्दारताक्षणी, कुठेतरी दुसरीकडेच होती. जे की राघवने हेरल व त्याच दिशेने पाहु लागला ज्या दिशेने कृष्णा पाहत होता.
राघवने ज्यासरशी कृष्णा पाहत आहे त्या दिशेला पाहील त्यासरशी त्याच्या नजरेस 100 मीटर अंतरावार चंद्राच्या उजेडात, झाडांच्या चित्र-विचित्र आक्राल विकाळ फांद्याच्या सावलीत एक विहीर दिसली.
विहीरीच्या आजुबाजुला खाली जमिनिवर खुप सारी झाडांची पान गळून पडलेली, जी की अंधारात विंचू -काट्या सारखी वळ-वळतायेत अस भासून येत होत. राघव , जयदीप , कृष्णा सर्वांच्या नजरा त्या विहीरीकडे होत्या. की अचानक एक स्त्रीची मदतीची हाक त्या सर्वांच्या कानी ऐकू आली .
" वाचवा ....! ... कोणीतरी .वाचवा..मला! मी ह्या विहीरीत
आहे ..!".... एका स्त्रीचा आवाज , पुर्णत वातावरणात घुमला जात
त्या तिघांच्याही कानी पडला. धड-धड करत छाती वाजू लागली. काय करु काय नको त्या किशोरवयीन मुलांच्या मनात विचार येत मेंदू बधिर व्हायची पाळी-आली. सर्वांनी स्त्रीचा आवाज येतो आहे तिला आपल्या मदतीची गरज आहे , हा विचार तिघांनीही पक्का करुन घेत विहीरीच्या दिशेने पोहचले .
" कोण आहात तुम्ही..? आणि अशा आत कशा काय गेलात..?"
जयदीप विहीरीवर बसवलेल्या त्या गोल लाकडाच्या मोठ्या दरवाज्याकडे पाहत म्हणाला
" वाचवा ..! ...मला ....वाचवा...! " पुन्हा एकदा तीच हाक ऐकू आली
" जया ! वेळ काहीही प्रश्न विचारण्याची नाहीये..! ह्या बाईंना लवकरात लवकर टाळा फोडून बाहेर काढाव लागेल..!नाहीतर त्यांच्या जिवास धोका निर्माण होऊ शकतो...!" अस म्हंणतच राघवने लागलीच आजुबाजूला पाहण्यास सुरुवात केली. टाळा फोडण्याकरीता काहीतरी साधन हव होत तेच तो अंधारात शोधत होता , कि त्याला एक मोठा दगड मिळाला. जो राघवने आपल्या हाती घेत लागलीच लाल-पिवळे
-घागे- गुंडाळलेल्या मंत्र बधीत टाळ्यावर मारण्यास सुरुवात केली .घाव जस टाळ्यावर बसत होता, त्याक्षचणी अंधारात ठिंणग्या उडाल्या जात
विशिष्ट प्रकारचा ठन, ठण, आवाज वातावरणातली स्मशान शांतता मोडून काढत होता . झाडांवर झोपलेले पक्षी रात्रीच्या अंधारात कसली
तरी अघटिताची चाहूल लागावी आण घर सोडून पळून जावे तसे थव्या-थव्यांनी आकाशात उडून जावू लागले.
एकावर एक घाव जसा बसत होता . धागे दोरे तुटले जात होते .
शेवटीला आंतिम क्षण आला क्प्टी नियतीने घात केला , शेवटचा वार
राघवने करण्याकरीत दगड हवेच्या वेगाने वर नेला, आणि त्याच वेगाने खाली आणला जात एक मोठा आवाज होत टाळा तुटला गेला.
राघवने व त्याच्या मित्रांनी लागलीच तो विहीरीवरचा गोल दरवाजा
उघडुन टाकला.तस त्याचक्षणी आतुन सफेद रंगाच धुक बाहेर
पडू लागल,
."..हिहिही, खिखिखी , फसले रे फसले ..! पोर जाळ्यात फसले हिहिही, खीखी..!" एक भयंकर ,घोगरा स्त्री,पुरुष हास्य मिश्रीत आवाज त्या विहीरीतुन येऊ लागल. त्या तिघांनीही एकवेळ विहीरीत डोकावून पाहिल . तस त्या विहीरीत त्या तिघानाही एक -दोन सेकंदाकरीता कालसर्पासारखा काळोख दिसला , आणी पुढच्या क्षणीच त्या कालोखात दोन अंगार भरलेले विस्तवासारखे डोळे चमकताना दिसले. पाण्यातुन जस बेडूक उडी मारुन बाहेर पडाव,त्याच प्रकार ते अमानविय ध्यान विहीरीतुन आपल्या, चित्र विचित्र वेष भुषेने
बाहेर पडल व विहीरीच्या कठड्यावर उभ राहील . पांढरा फट्टचेहरा , , अंगार भरलेले विस्तवासारखे चमकणारे डोळे, व अंगावर काल्या नागासारखा सदरा, खांद्यावर घोंगडी , खाली सफेद धोतर, हातात धार-धार पात असलेली कू-हाड असा गंग्याखवीसाच भुत त्या तिघांच्या डोळ्यांसमोर प्रकट झाल गेल. हे अस आकलन क्षमतेच्या पलिकडच दृश्य पाहुन. 120 चा ताप भरलेल्या रुग्णाप्रमाणे तिघांचीही हालत झाली . थर-थर करत शरीर काफू लागल ,
" हिहिही, खिखिखी, आता तुम्ही सगळे मरणार..! म्या मारुन तुम्हाला
माझ्या संग इहिरीत घेऊन जाणार ..!" भीतीने थर-थरणा-या त्या तिघांच्याही आकृतीकडे पाहत घोग-या आवाजात गंग्याखवीस म्हणाला. आणि त्याचक्षणी त्याने आपल्या धार-धार पात असलेल्या कु-हाडी सहित विहीरीच्या कठड्यावरुन हवेत एक अमानविय झेप घेतली जी की राघवच्या दिशेने होती . कोणत्याही क्षणी वार होणार होता. कु-हाडीची धार-धार पात रक्ताचा पाट व्हाणार होती.
शेवटी नियतीची वेळ कोण जिंकणार ह्या क्षणावर पोहचली गेली , चेह-यावर भयंकर आसुरी हास्य आणुन ग्ंग्याने कु-हाड हवेच्या वेगाने राघवच्या डोक्याच्या दीशेने उगारण्या करीता घेऊन आणली.
की तोच राघवच्या तोंडून महाशक्तिशाली देवीचा उच्चार बाहेर पडला .
" एकवीरा ..........आई ..!!!!" एकवीरा देवीच नाव उच्चारल गेल .त्याचक्षणी राघवच्या हाती असलेला गोंडा ( धागा ) क्षणार्धात एक तप्त लाव्ह्यासारखा तापला जात त्यातुन एक तांबड्या रंगाचा कवच निर्माण झाला. आणि त्याच तप्त कवचावर गंग्या खवीसाची कु-हाड जाऊन आदळली. माणवाच्या शरीराचा स्पर्श ज्याप्रकारे std पावरफुल व्होलटेज असलेल्या लाईनला व्हाव आणि शरीराच्या चिंधड्या उडाव्या . सेम -हुबे-हुब त्याच प्रकारे गंग्याखवीसाची एक भयंकर आर्तकिंकाळी बाहेर पडली जात शरीर एका फटाक्या सारख पांढरा रंग उडवत फुटल गेल . हवेत काहीक्षण सफेद रंगाची धुळ उडाली , गंग्या खवीसाचा कायमचा अंत झाला. काहीक्षण निरव शांतता पसरली कोणताही घात पात नाही, वार नाही ! हे पाहुन राघवच लक्ष अचानक आप्ल्या हाताततल्या तांबड्या प्रकाशाने चमकणा-या त्या गोंड्या धाग्यावर गेल . आणि त्याने लागलीच त्या गोंड्या ( धाग्याच) एकवीरा आईच नाव उच्चारत चुंबण घेतल . दुस-या दिवशी पुर्णत गावात राघव ने गंग्या खविसाचा अंत केला ही बातमी वा-यासारखी पसरली. संपूर्ण गावात आनंदाच वातावरण पसरल जात, गावातल्यांनी पुन्हा एकदा विहीरीच पाणि पिण्यास सुरुवात केली. राघवला सुद्धा ह्या घटनेतुन एक चांगला बोध मिळाला , देव आहे व तो मदतीच्या वेळेस आपल्या भक्तास वाचवण्यासाठी धावून येतो ह्यावर त्याचा विश्वास बसला ...
चेटक्याच जंगल भाग 1.....

S.....1 ..- चेटक्या .

[मित्रांनो चेटक्याच जंगल हे एक अशाप्रकारच भयानक जंगल आहे .ज्या जंगलात विविध प्रकारच्या भुतांचा वास आहे .
आणि त्यासोबतच जो कोणी मनुष्य चेटक्याच्या जंगलाची अमावास्याच्या दिवशी , वेस ओलांडून आत जातो तो पुन्हा कधीच परत येत नाही . ....... ] साध त्याच मढ सुद्धा..




पाहिल्या सीज़न मधल भुत
खुद: चेटक्या

चेटक्याच जंगल - 1] चेटक्या ...

काल्पनिक भयकथा

वेळ रात्रीची 8 :30 अद्यात सोसायटी...


आकाशात काल मिटट काळोख पसरल होत .ह्याच रात्री आज चंद्र मात्र गैरहजर होता .जणू ती अपशकुनी अमावस्या आजच्या दिवशी आली असावी.
हे तो भासवून देत होता.अमावस्या असल्याने अंधाराने पुर्णत काजळ फासल होत.प्रकाश नसणा-या जागेला जणू त्याने घट्ट मिठी मारत काजळी रुप दिल होत.शहरातली रस्त्यांवर मोकळी ,हिंडणारी कुत्री-मांजर आज गळाफाडून
रडत, विव्हलत होती . काळ्या रंगाचे ते ढग धोक्याची जाणीव करुन देत होते. ........
बाजूलाच एक 20 मजली मोठी बिल्डींग दिसुन येत होति. मोठ्या गेट बाजूला एक watchman साध्या प्लास्टीकच्या खुर्चीत बसला होता .निला शर्ट ,काळी पेंट असा त्याचा पेहराव होता . राहुन राहुन तो आपले टपोरे लाल डोळे घेऊन एका ,सायको सारखा आजुबाजूला पाहत होता .
त्याच बिल्डींगच्या flat नं: 103 मध्ये
" अपर्णा ? अग झाल की नाही , किती उशिर ?"
विजय म्हणाला .विजय ने आपल्या घड्याळाकडे व एकदा त्या बंद दरवाज्याकडे पाहिल .
" अरे आले ना "? थांब ना जरा ,पायी जातोय का आपण" !
त्या बंद दरवाज्यामागुन एक स्त्रीचा आवाज आला .तस थोड वाकड तिकड तोंड करत व मान हलवत विजय बाजूलाच असलेल्या आपल्या घरातल्या सोफ्यावर बसला. काहिवेळानेच आवाज होत.दार उघडल गेल. गोल गोरापान सुंदर चेहरा त्यावर छान अशी मेकअप.लाल रंगाची साडी ,हातात हीरव्या बांगड्या , गळ्यात मोठ मंगळसूत्र व काही बाही मोठ मोठे दागिने होते . तिला पाहताच विजयचा त्रासिक भाव जागीच बदलला .तोंड मोठे करतच तो अपर्णा कडे पाहु लागला.त्याच्या अश्या पाहण्याने मात्र अपर्णा लाजली गेली.गाळावर एक लाली उमटत ,ती विजय कडे गाळात हसत पाहु लागली. मित्रहो अपर्णा विजय देशमुख काही महिन्यांन अगोदरच दोघांच लग्न झाल होत.अरेंज मेरेज होत.तरी सुद्धा दोघांच मन जुळून त्यातून एक प्रेमाची पाळवी फुटली होती .नात्याला नव रुप दिशा मिळाली होती .
विजय हा गावचा होता . शहरातल्या मोठ्या कंपनीत कामाला असल्याने तो शहरात राहायचा आपल्या फ्लैट मध्ये .त्याच्या जोडीला आता अपर्णा सुद्धा होती.गावातच लग्न करुन तो तिला शहरात आपल्या सोबत राहण्यासाठी घेऊन आला होता. आता सुद्धा ते एका नातेवाईकाच्या लग्न्समारंभासाठी पुन्हा गावाला चालले होते .प्रवास पुर्णत 6 तासांचा होता.
तीन साडे तीन तासांचा प्रवास एका जंगलातून सुरु होणार होता.त्या जंगलाचा नाव प्रसिद्ध होत. चेटक्याच जंगल. भुता-खेतांच्या नावाखाली जंगल अक्षरक्ष बदनाम होत .अर्ध्यातासातच विजय व अपर्णा सामान वगेरे
आपल्या चार चाकी गाडिच्या डिकीत ठेवत प्रवासाला निघाले.शहरी हाईवेची ट्राफीक पार करत शहरी वर्दळी पासुन विजयची कार एकदाची जंगलाच्या हायवेला लागली.गरमीचे दिवस असल्याने विजयने गाडीची ac ऑन केली होती .थंड अशी हवा अंगाला झोंबत होती
दोन हेडलाईटचा प्रकाश त्या जंगलातल्या हायवेवर दुर दुर पर्यंत जात होता.
विजय ने आपल्या गाडीचा चौथा गियर शिफ्ट करत 80-90 च्या वेगाने पळवायला सुरुवात केली.का तर हायवेवर काही मोजक्याच गाड्या पुढुन येत होत्या. गाण लावुन विजय गाडी पुढे पाहत वेगाने पळवत होता.बाजूलाच अपर्णा आपल्या भयकथा लिहिण्यास व्यस्त होती.
भयकथेच वाचण्याच -लिहिण्याचा तिला खुप वेड होत .
"अपर्णा....? काय ग.... काय टोपीक आहे मग तुझ्या भयकथेच ह्या वेळेस ?"
विजय पुढे तर कधी अपर्णा कडे पाहत म्हणाला.!
"चेटकिन.......!" अपर्णा इतकेच म्हणाली.
तिच्या ह्या वाक्यावर विजय थोडे वेगळेच भाव चेह-यावर आणत म्हणाला.
" काय?चेटकिन......!? "
" मस्त आहे ना ! मी खुप दिवसापासूनच विचार करत होते ह्या स्टोरीचा पण घरातल्या कामा मुळे वेळ नव्हत मिळत !आणि आज फ्री आहे तर म्हंटल लिहुन घेते.!"
अपर्णा विजय कडे हसतच पाहत म्हणाली ."
अपर्णा तुला माहितीये का? "
जय पुढे पाहतच म्हणाला .
"काय हो बोलाना ! "
अपर्णा म्हणाली.
" अपर्णा पुढे जाऊन 15 मिनिटानी एक जंगल सुरु होतो.हा जंगल चेटक्याच जंगल म्हनुन प्रसिद्ध आहे.एक खुप मोठी दंतकथा सांगितली जाते ह्यावर!"
विजय पुन्हा पुढे पाहतच म्हणाला .
" वॉव इंटरेस्टिंग सांगाना प्लीज मला मग! "
अपर्णा आपल्या आग्रहाखातर म्हणाली
" .नको... मी अस ऐकलय की त्याच नाव त्याची हद म्हणजेच पुढच्या लागणा-या ह्या जंगलात घेत नाहीत ?! "
विजय अपर्णा कडे तर कधी पुढे पाहत गंभीरतेने म्हणाला . "अहो अस काहीही नसत बर मी एक भयकथा लेखक आहे !हे फक्त आपल्या मनाचे खेल असतात पाहा! तुम्ही सांगाना मला" !
अपर्णा आपली बाजू मांडत म्हणाली. तिला एक उत्कंठा लागुन राहीली होती .ते सत्य ऐकून घेणयची. विजय ने एकवेळ अपर्णा कडे पाहिल.हळुच आपल्या गाडीचा एक 5 गियर चढवत गाडी 90 वरुण-120 ची गतीवर्धक वेग पकडत धावू लागली . हवा त्या काचेच्या खिडक्यांवर आदलत होती. हेडलाईटचा प्रकाश जस जस पुढे सरकत होता पुढे येणारी झाड त्याच वेगाने पाठिमागे अंधारात गुडूप होत जात होती.
झाडांची सुखून वालुन पाडलेली पान त्या गाडीच्या वेगाने थोडी फार वर उडली जात होती .
" ठीके सांगतो ऐक ! "
विजय ने लावलेला तो रेडीयो बंद केला . अपर्णाने सुद्धा आपला मोबाइल बाजूलाच ठेवुन दिला.व उत्सुकतेने आपले कान विजयचय दिशेने पाहत टवकारले .
तस विजय ने एक सुस्कारा सोडला व पुढे तो सांगू लागला,

क्रमश :

चेटक्याच जंगल भाग 2




विजयची चार चाकी गाडी भरधाव वेगाने त्या जंगलाच्या हायवे वरुन जात होती .बाजुच्या सीट वर अपर्णा आणि ड्राइव्ह सीटवर विजय बसला होता. विजय ने हलकेच एकावर एक गियर कमी करत गाडीचा वेग धीमे करण्यास सुरुवात केली.पुढे रस्त्यावर एक चहाचा स्टॉल दिसून येत होता.थोडवेळ थांबून चहा घ्याव अस त्याच्या मनात आल पुढच्या प्रवासाला पोट रिकाम नको म्हणुन .गाडी रस्त्याच्या बाजूला थांबवुन.एका दरवाजा मधुन विजय व दूस-या बाजुनी अपर्णा उतरली.
पुढे एक छोठीशी चहाची टपरी दिसुन येत होती. त्यात एक माणुस उभा होता.पुढे एका लाकडी टेबलावर स्टो,व त्यावर मोठी गोल टोपशी होती . प्रवास्याना बसण्यासाठी बाजूलाच एक टेबल आणि दोन खुर्च्या मांडल्या होत्या. त्याच एका खुर्चीत अपर्णा बसली ,चहावाल्याला 2 कटिंग सागुन विजय पुन्हा अपर्णा कडे आला , व बाजूलाच खुर्चीत बसला .तस अपर्णा विजय कडे पाहत म्हणाली .
" अहो आता तरी सांगा ना तुम्ही काय सांगणार होतात ?"
अपर्णा उत्सुकता पोटी पुन्हा म्हणाली.
"काय सांगणार होतो ...? "
विजय न समजल्या सारखा म्हणाला .
"अहो तेच मगाशी गाडि मध्ये सांगणार होतात. "
अपर्णा म्हणाली."अच्छा ते होय ! चे.... "
विजय पुढे काही बोलनार की तोच एक आवाज आला.
" चहा घ्या पोराना !"
तो टपरी वाला पुढे आपल्या हातात दोन गरम वाफाललेले चहाचे काचेचे ग्लास घेउन येत म्हणाला.
"काका .... ,?बिस्किट नाहीयेत का..?"
विजय त्या चहावाल्याला म्हणाला.
"आहेत की पोरानो" !"
अस प्रेमाने म्हणतच जाउन त्या चहा वाल्याने 2 बिस्किटचे पोकिट आणुन टेबलावर ठेवले.
" काय पोरानो नविन लग्न झालय वाटत.,?"
! तो चहावाला अपर्णा व विजय कडे पाहत म्हणाला .
"हो ! ,नविनच लग्न झालय काका उद्या हिच्या मावशीच्या मुलीच लग्न आहे तर गावाला निघालोय ."
विजय चहाच एक झुरका घेत म्हणाला .
"अस व्हय .!"
तो चहावाला म्हणाला .
"अहो काका ह्या अगोदर कोणी हया टपरीवर होत का? चहा बनवायला? !"
विजय म्हणाला ."व्हय पोरा !माझा बा...व्हता." !
तो चहावाला म्हणाला .
"होता म्हणजे ? "
विजय प्रश्नार्थक नजरेने पाहत म्हणाला .
"आता तीन दिवसा अगोदरच, वारला बघा"
.! तो चहावाला आपल्या काळजावर दगड ठेवुन म्हणाला.
"कस, काय झाल हो काका हे" ?
विजय त्या चहावाल्या कडे पाहत म्हणाला
"आजारी होते पोरा," वय बी झालत नव्ह ! ".चला सोडा ते पोरानो,"देवाच्या पुढ "कोणाच इलाज नाय" आज नाय उद्या सगळ्यांची येळ ठरलीच हाय पोरानो!
तो चहावाला अस म्हणतच पुन्हा आपल्या टपरीत निघुन गेला.काहिवेळाने चहा पिल्यावर पैसे देऊन विजय अपर्णा आपल्या पुढच्या प्रवासा साठी निघणार होते.की तोच पाठिमागून त्या चहा वाल्याने त्या दोघाना एक आवाज दिला.
" एक लक्षात ठेवा .? काय बी झाल तरी आता पुढच्या वाटेला गाडी थांबू नका? त्यो आज अमुश्या हाय फिरतो आज तो त्याच्या हदीत .!?"
तो चहावाला गंभीरपणे आपल्या बारिक नजरेने दोघांकडे पाहत म्हणाला .
"का हो काका?अस काय आहे पुढे ?"
अपर्णा म्हणाली.
"नाय नाय पोरी त्याच नाव घेत नाय कोणी अमुश्याला?! त्याला ऐकू जातू? त्याची हद इथूनच सुरु होईल आता 100 -150 मीटर वर गाडी संभालून चालवा बाबानु . "
तो चहावाला म्हणाला .त्याच ते गुढ बोलन अपर्णाला आतिशय उत्कंठमय,उत्सुकता वाढवणार वाटत होत . एक भयकथा लेखकाला अजुन काय हव पण तिने सुद्धा जास्ती काही विचारल नाही.! तिच्या प्रश्नाची उत्तर
विजय जो देनार होता. विजयने हळूच एक सिगारेट बाहेर काढली.व काडीपेटीत ओढून शीलगावली गाडीची चावी फिरवून गाडी चालू केली.एक खिडकी खालीच होती.विजयने हलूच पाहिला गियर टाकला व गाडी वीस च्या स्पीड ने हायवे वर धावू लागली. "अहो.... ? मी एक बोलू का..? "
अपर्णा विजय कडे,पाहत म्हणाली.
"हो बोलणा "! "
विजय ने अर्धी सिगारेट बाहेर फेकून दिली.. व काच बटन दाबत वर केली.व पुन्हा गाडीचा एक दुसरा गियर चढवला.!
"मला सांगाना त्या चेटक्याची स्टोरी....? "
अपर्णा पुन्हा म्हणाली.
"ये वेडे ती काय स्टोरी नाहीये...? ती एक सत्यकथा आहे समजल.! आणि आता त्याच जंगल सुरु होईल! ते बघ पुढे स्पीड ब्रेकर दिसतोय तिथून ! "
अस म्हणतच विजय ने एक गियर पुन्हा कमी केल.अपर्णा ने पुढे पाहिल खरच पुढे एक स्पीड ब्रेकर होता .व रस्त्याच्या बाजूला एक फला लावला होता .निळ्या रंगाचा ज्यावर लिहिल होत .

चेटक्याच जंगल प्रारंभ......................

Witch forest start ......................

क्रमश :

चेटक्याच जंगल भाग 3



विजयच्या ,चारचाकी गाडीने स्पीड ब्रेकर वरुण जात,चेटक्याच्या जंगलाची हद ओलांडणी! हद ओलांडताच गाडी मागचा काळोख अजुनच,काजळी फास्ल्या सारखा काळाकुट्ट झाला ! अपर्णा ने एकवेल गाडिच्या काचेच्या
खिडकीमधुन आजुबाजुला पाहायला सुरुवात केली ! दुर-दुर पर्यंत घनदाट झाडे पसरली होती,!रातकिड्यांचा भेसूर आवाज वातावरणात जणू ,भयपद्य संगीत गात होता! एका भयकथेच्या लेखकाच उत्सुक ,उत्कंठा वाढवणार वातावरण होत हे, जे पाहून अपर्णा भलतीच खुश झाली होती.
" अहो !आज इतक काळोख का पडलय "
.कारच्या खिडकी मधुन बाहेर पाहात असतांना अपर्णा म्हणाली! विजय ने पुन्हा गाडीचा दुसरा गियर चढवला .व तिच्या कडे पाहत म्हणाला .
!" कारण , आज अमावास्या आहे अपू ! "
अहो ! हे तर विसरलेच मी"
अपर्णा विजय कडे हलकेच हसुन पाहत म्हणाली.
अपर्णाच्या ह्या प्रतिक्रियेवर कसलेही उत्तर न देता , विजयने सुद्धा फक्त तिच्याकडे पाहत एक मंद हस्य केल.
" अहो! मला आता तरी तुम्ही त्या चेटक्याची स्टोरी सांगा ना प्लीज". ?
अपर्णाच्या ह्या प्रतिक्रियेवर विजय पुढे पाहतच म्हणाला.
" बर ! ठीके ऐक " !
अपर्णाला तर हे, ऐकून खुपच आनंद झाला. तिचा आनंद गगणाला भीडला होता. हे तिच्या चेह-या कडे पाहूनच समजून येत होत.विजय ने पुन्हा तिसरा गियर शिफ्ट करत, गाडी पळवायला सुरुवात केली. चेटक्याच ते भयानक जंगल पुर्णत सुनसान होत , त्याच जंगलातून ह्या दोघांचा जिवघेना प्रवास सुरु झालेला !
विजय ने आता चौथा गियर शिफ्ट केला, गाडी ने 80 चा वेग घेत पळण्यास सुरुवात केली.
" अपर्णा !तू घाबरणार नाहिस तर सांगतो हा मी बर "?
विजय अपर्णाला पाहत म्हणाला. त्याच्या ह्या वाक्यावर अपर्णा थोड हसुन म्हणाली.
" अहो ! मी एक लेखक आहे भयकथेची , आणि मला भीती नाही वाटत बर का"? " तुम्हाला सांगायच नसेल, तर जाऊद्या केव्हापासुन सांगा,सांगा म्हणतीये मी "
अपर्णा थोड रागावून म्हणाली.तिचा हा राग उसणा होता.एकप्रकारे फसवा . तिला अस रागावलेल पाहून विजय तिच्या कडे पाहत म्हणाला
." अगं अपु! तू रागू नकोस ना....यार, ? मी सांगतो , बर ऐक"!
तस अपर्णाने मनमूराद हसून विजय कडे पाहिल. ति हे नाटक करत आहे हे त्याला पुर्णत ठावूक होत.
" 100 वर्षा पाहिल्याची गोष्ट आहे, ह्या जंगलात एक छोटस गाव वसलेल होत!"
विजय ने ड्राइव्ह करत पुढे पाहत बोलायला सुरुवात केली.
" गाव जेमतेम 20 -25 लोक असतील इतकेच होत ", सर्व गावकरी बांधव मिळुन -मिसळून राहायचे " !" त्याकाळी गावात एके रात्री एक गावक-याची मुलगी जिच नाव छकु होत ,ती रात्रीच आक्समिक रीत्या गायब झाली " ! " काय ?...अस अचानक कस गायब झाली छकु "?
अपर्णा मध्येच मोठ्याने ओरडतच म्हणाली . तिच्या ह्या वाक्यावर अजय म्हणाला
."अगं तेच तर सांगतोय ना मी ",? " तू मध्येच , बोलू नकोस बर, नाहीतर मी सांगणार नाही हा "?
अजय थोड चिडूनच म्हणाला. तस अपर्णा ने हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवल, जंगलाच्या हाईवेवरुण रस्त्यावरचा पाळापाचोला उडवत गाडी वेगाने पुढे निघुन गेली.की तोच बाजूला एका झाडावर एक सडलेल्या हाताचा काळाकुट्ट पंज्या ज्याला मोठ मोठी धार धार नख होती , तो अमानविय पंजा झाडाला चिटकल्या सारखा दिसून आला ..... ?.....







क्रमशः....

चेटक्याच जंगल भाग 4 ....






















































रात्री 11:30


रात्रीचे 11:30 झालेले , चेटक्याच्या जंगलातला जिवघेना प्रवास सुरु झाला होता . हेडलाइटच्या च्या प्रकाशात गाडी वेगाने रस्ता कापत निघालेली, घरच्यांना भेटण्याची ,एक आपुलकीची आस मनाला लागून राहीली होती , परंतू नियतीने आपल्या नशिबात पुढे काय वाढुन ठेवले होते, ह्यापासुन ते दोघे पुर्णत अनभिज्ञ होते. अपर्णा आपल्या तोंडावर बोट ठेवुन एका लहान मुलासारखी गप्प बसली होती .पुढे काय घडल ह्याची उत्सुकता तिच्या सुद्धा मनात हूर-हूर माजवत होती. विजय ने एकवेल
अपर्णा कडे पाहिल , अपर्णाच हे अस वागण त्याला खूप आवडायच.
लव्ह- मेरेज नसल ,तरी सुद्धा तो तिच्या गोड स्वभावाने आणखीच जवळ-जवळ खेचल जात होता . एकवेळ विजय तिच्या ह्या अशा वागण्यावर नेहमी प्रमाणे दिलखूलास हसला ! अपर्णा सुद्धा त्याला अस हसताना पाहून खुदकन हसली . काहिवेळाने अपर्णा कडे पाहून विजय म्हणाला.
" ऐकायचय !पुढे "
त्याच्या वाक्यावर अपर्णा हसुन म्हणाली.
" हो ! ऐकायचय करा लवकर सुरुवात "
" सांगतो हा ! पण एका अटीवर "
विजय पुढे पाहत म्हणाला.
" कोणती अट ?"
अपर्णा न ,समजल्यासारखी म्हणाली .
" हेच की मी बोलतावेळेस, मध्ये बिलकुल बडबडायच नाहीस?"
विजय अपर्णा कडे पाहत म्हणाला.
" हो ! मंजूर "
अपर्णा......, विजय कडे पाहत म्हणाली .
" तर ! कुठे होतो मी ? "
विजय अपर्णा कडे, पाहत म्हणाला .
" छकीच अपहरण "
अपर्णा इतकेच म्हणाली.
" बर ठीके ऐक "
विजय म्हणाला व त्याने ते रहस्य सांगण्यास सुरुवात केली.जे त्या दोघांच अंत ठरणार होत!


●●●●●●●●●●●●●●●●●
100 वर्षांन अगोदर..... !

20 - 25 लोकवस्ती असलेल्या त्या गावात ,छकीच्या अपहरणाची वार्ता
रात्री वा-या सारखी पसरायला वेळ लागली नाही ,छकीच्या झोपडी बाहेर लोक जमा होऊ लागली.छकी च्या आईने पोरीच्या आठवणीने हंबारडा फोडलेला , तिच्या बाजूलाच बसलेल्या 2-3 बायका तिला धीर देत होत्या. काहिवेळाने जमावात चर्चा सुरु झाली.
7-8 लोक मिळुन छकीला शोधण्यासाठी जंगलात जायच अस ठरल गेल ,उजेडा साठी ,मशाली -टिटव्या तांबडा प्रकाश फेकत पेटु लागल्या. जंगलात काही संकट ओढवलाच तर हातात शस्त्र म्हणुण काठ्या व कंबरेला एक धार धार कोयता लावलेला होता . हातभर 7-8 लोक ती , रात्रिच्या भयान अंधारात छकिला शोधण्यासाठी रवाना झाली. रात्रीच ते जंगलाच भयान रुप मनात धडकी भरवत होत. अधून -मधुन जंगलात्या रानटी श्वापदांचे आवाज कानावर पडले जायचे . अशातच एक गावकरी म्हणाला .
" बाळ्या ! आज अमुश्या हाय अस वाटतय लेका "
बाळ्या हा छकीचा बाप मित्रानो, त्या गावक-याच्या वाक्यावर बाळ्याने एकवेळ आकाशात पाहिल , कारण वर चंद्र दिसुन येत नव्हता .
" व्हय चांगो ! खर हाय तुझ , "
बाळ्या छकिचा बाप त्या गावक-याला म्हणाला,ज्याच नाव चांगो होत,
" आर बाळ्या ! मंग तुला काय इचीत्र नाय वाटत व्हय?"
चांगो आपल्या पुढे चालत जाणा-या बाळ्या कडे पाहत म्हणाला .
तस एक वेळ बाल्या आपल्या जागेवरच थांबला. व त्याने चांगो कडे पाहिल आणि म्हणाला.
" बळी ! "
बाल्या इतक म्हणाला खरा परंतु पाठिमागे सर्वांच्यात कुजबुज सुरु झाली.
" व्हय बाळ्या! तस बी आपण मसनात पाहिलय व्हय छकिला शोधुन ?"
चांगो बाळ्या कडे पाहत म्हणाला.त्याच हे बोलन सर्वांना पटल होत
" व्हय की चांगो खर हाय तुझ ! मंग चला लेकहो , वळवा आपला मोर्चा मसनात"
" व्हय,व्हय "
म्हणतच सर्वांनी आपल मत एक केल, व मशाली ,टिटव्या घेऊन गावक-यानी मसनाची वाट धरली. अमावास्याची रात्र होती ,त्यातल्या त्यात स्मशानात जायच म्हंटल्यावर 1-2 गावकरी भीतिने घाबरले होते.
चांगो च्या संशयाने बाजी मारली , खरच इकडे स्मशानात एक भगत कवट्या,लिंबू ,हळद ,कुंकू ,बुक्का , आग्नि हवनकुंड पेटून बसला होता.
बाजूलाच त्या भगताने बेशुद्ध करुन सरळ प्रेता सारखी छकिला झोपवली होती .डोळे बंद करुन तो मानवाला न समजण्यासारखे मंत्र उच्चारत होता.
काहिवेळाने त्याने आपले डोळे हलकेच उघडले. खाली एक मोठा धारधार सुरा ठेवला होता.तो त्याने आपल्या हातात घेतला व ऊठून उभा राहिला. हलकेच छकि जवळ चालत येत ,तो छकि जवळ खाली बसला .खाली बसुन त्याने छकिच डोक आपल्या मांडीवर ठेवल, व त्या धारधार सू-याने त्या छकिचे केस कापण्यास सुरुवात केली.छकि चे कापलेले केस घेऊन तो पुन्हा आप्ल्या जागेवर परतला . ज्या हातात केस होते ,तो हात आपल्या कपाळावर गच्च मुठ आवलून त्याने पुन्हा काही मंत्र म्हणण्यास सुरुवात केली. तसे ते केस हिरव्या रंगाने चमकू लागले , ते चमकणारे केस त्याने त्या पेटत्या हवनकुंडात फ़ेकले,त्यासरशी एक अदभुत दृश्य घडल ,
त्या तांबड्या आगीचा रंग काही क्षणापूरता का असेना हिरवट रंगात परावर्तित झालेला , त्या बदलणा-या दृश्याला पाहताच त्या भगताच्या चेह-यावर कृर अस हसु उमटल एक पाश्वी हस्य . थोड्याच तो हीरवट रंग जाउन पुन्हा त्या हवनकुंडात तांबडा प्रकाश दिसू लागला,व त्या हवनकुंडामधुन एक भरडा असा आवाज आला.
" ये भगत्या काप ,तिच शिर , भोग चढव ,भोग दे " काप , रगत,रगत ,कवळ मांस.हिहिहिही ,हिहिहिही .... !
आतिशय क्रुर व किनन्नरी अस हसु आणत ते सैतान गरजल ज्याला ना कसले आकार होते ना कसली काया होती.
" देइन ! तुला तुझ भोग , पण मला काय देशील तू? काय देशील मला "
तो भगत सुद्धा आपल्या मोठ्या आवाजातच म्हणाला ज्यात एक जरब होती.
" बोल काय पाहिजे तुला ? भगत्या "?
पुन्हा हवनकुंडा मधुन तो आवाज आला. त्या आवाजा सरशी तो बघत म्हणाला .
" सैतानी ताकत ! अमरत्व आणि कलियुग हवय मला , बोल देशील ",?
" दिल समज भगत्या दिल ,!आता तो भोग दे मला दे कच्चा मांस खावूक दे ताज रगत पिवू दे... हिहिहिही ,हिहिही !
आतिशय भयानक असा तो आवाज आला ज्यात एक आदेश होता .छकि च्या शरीरा कडे ती हवनकुंडातली आग राहुन-राहुन भडकत तिच्या दिशेने जाण्याचा पुरेपुर प्रयत्न करत होती. चेह-यावर आसुरी हस्ये घेत त्या भगत्याने आपले पाऊल छकि च्या दिशेने वाढवायला सुरुवात केली.एका हातात सुरा घेत त्याने दुस-या हातात छकिची मान पकडली व काही कळायच्या आत अलगद तो सुरा तिच्या मानेवरुन फिरवला ! पाण्याचा फवारा उडाव तस रक्त उडू लागल जे थेट त्या हवनकुंडात जात होत.जणू तो सैतान ते रक्त प्राशन करत आहे. अचानक त्या हवनकुंडात छकिच शरीर खेचून आत नाहिस झाल हे सर्व दृश्य पाहून तो भगत खिदळत हसत होता. पण त्याच ते हसु काही क्षणात बदलून गेल.
" छके............. .." !!!!
छकिचा बाप बाळ्या आपल्या लेकीला त्या हवनकुंडात जाताना पाहून मोठ्यानेच ओरडला!आवाज ऐकून ती 7-8 गावकरी सुद्धा बाळया जवळ धावूनच आली व रागातच येऊन गावातल्या 7-8 लोकांनी भगत्याला चांगलाच चोप द्यायला सुरुवात केली.तेवढ्यात सुद्धा त्या गावक-यांच
मन भरल नाही.कंबरेला लावलेला कोयता काढत त्या सर्वांनी त्या भगत्याच्या हाता पायांवर वार करण्यास सुरुवात केली, व त्याच्या त्या शरीराचे तुकडे त्याच प्रकारे हवनकुंडात फेकून दिले.काहि दिवसांनी ज्या भगताला त्या 7-8 लोकांनी मारल होत .ती माणस अचानक अमावस्या च्या रात्रीच एक-एक करत गायब झाली कायमची . भितीपोटी गावातल्या लोकांनी हे गाव सोडल व दुसरीकडे राहू लागले तो भगत कोण होता.
कोठून आला हे गावातल्या कोणालाही माहिती नव्हत.ते एक रहस्यच राहिल . त्या भगताला पुढे जाउन ह्या लोकांनी एक नाव दिल होत.चेटक्या आणि त्याच नावाने पुढे हे जंगल सुद्धा....ओळखल जाऊ लागल
चेटक्याच जंगल !!. .....






क्रमशः

चेटक्याच जंगल ... भाग 5.... आंतिम....

" मग अपर्णा कशी वाटली स्टोरी ? "
अस म्हणतच विजयने अपर्णा कडे पाहील , पण त्या सीटवर आता कोणीही नव्हत!
" अपर्णा , ?"
एक -दोन वेळा पुढच्या मिरर मध्ये पाठिमागे पाहत सुद्धा विजय ने हाक दिली पण व्यर्थ,शेवटी विजयने आपली चार चाकी कार रस्त्याच्या आडबाजूला थांबवली ,व कारचा दरवाजा उघडून तो बाहेर आला .पुर्ण जंगलात अंधार पसरला होता . चेटक्याच्या जंगलात विजय एकटाच त्या रस्त्यावर उभा राहुन अपर्णाला हाका देत होता ,
" अपर्णा ? यार बस झाल ना आता , हे बघ मला भिती वाटतीये हा! तू . प्लीज ..बाहेर येणा.....! किती ही मस्करी पुरे आता चल पाहु घरची वाट पाहत असतील ? "
विजय आता रडकुंडीला आलेला ,पुर्ण रस्त्यावर त्याच्या शिवाय कोणीही नव्हत ,दुर-दुर पर्यंत स्मशान शांतता पसरली होती , त्यातच हे जंगल विचीत्र अशा कारणाने बदनाम होत, आता विजय च्या मनात तेच विचार येत-जाऊ लागले , त्यातच तो लहान मुला सारखा रडू लागला .
" अपर्णा ? मला भिती वाटतीये! चल ना ग....! आहा,आह,आहा, अपर्णा..., ? ये.....अपर्णा ?"
हूंदके देतच विजय अपर्णाला ओरडून हाका मारत होता.रस्त्याच्या आडबाजुला असलेल्या एका झाडावर बसलेला तो घुबड, मगाचपासून हे दृश्य एखाद्या चित्रपट पाहणा-या प्रेक्षका प्रमाने पाहत होता.
की तोच विजयला एक आवाज येतो ,
" वि.....ज......य.... "
हा आवाज खुपच लहान व अशक्त असा होता, तरीसुद्धा विजयने आपले कान टवकारले व पुन्हा तो आवाज आला.
" वि.....ज..........य...." हिहिहि ,हिहिहिही ,खिखिखी
ह्या आवाजा सोबतच एक हसू सुद्धा बोनस म्हनुन आल होत ,मृत्यूच बोनस ,
जे विजय ऐकू शकला नाही!
" अपर्णा....!कुठे आहेस तू ? हे बघ पुरे हा आता तुझा मस्तीपणा चल पाहु उशिर होतोय आपल्याला? घरची वाट पाहत असतील? "
विजयला वाटल की तो आवाज आपल्या प्रिय पत्नीचा आहे, आपल्या अपू चा आहे , पण विजय एक गोष्ट विसरला तो म्हणजे त्या आवाजाच प्रकार एक सामान्य मणुष्याचा आवाज तो बिल्कुल नव्हता एक खोट, नकली आवाज होत ते
ज्यातला फरक तो विजय प्रेमा पोटी समजू शकला...नाही!
" वि...ज....य... ! ? मी ईथे आहे ? झाडा मागे ! ये पाहु इकडे !
हिहिही,हिहिही, ये ये विजय लवकर ये.... हिहिही, याव ,याव ,याव "
आतिशय भयानक असा आवाज होता तो , परंतु विजय तर संमोहित झाला होता ना...त्याला..त्या आवाजातला .फरक कसा कळणार मित्रानो ....ज्या दिशेहून आवाज येत होता त्या दिशेने हलके-हलके पाऊल टाकत विजय निघाला. आपण काय करतोय , कुठे जातोय ह्या बदल त्याला काहीच ठावूक नव्हत ! काहिवेळ असच काट्या कूट्यातुन चालत जात तो एका मोठ्या वडाच्या झाडाखाली आला! वडाच्या झाडाखाली त्याला अपर्णा
पाठमोरी ऊभी दिसली. तिच्या चारी बाजुने अनैसर्गिक धुक पसरल होत ,
" अपर्णा ? अगं इथे काय करतेस , चल पाहु... उशिर होतोय आप्ल्याला !?"
विजय पाठमो-या उभ्या अपर्णाला म्हणाला .पण तीच प्रतिउत्तर काही केल्या आल नाही! तस तो पुढे सरसावळा व विजय ने आपला हात वाढवतअपर्णा च्या खांद्यावर ठेवला! व लगेच एक झटका बसाव तस काढून सुद्धा घेतला,का तर तिच शरीर एखाद्या मेलेल्या जिव नसलेल्या प्रेता सारख थंड पडल होत.
" अपर्णा " तु.... तुझ शरीर इतक थंड का पडलय "? "
विजय ची बोबडीच वळली होती,घाबरतच एका बोबड्या मणुष्या सारखा
तो उच्चार करत म्हणाला.त्याच्या ह्या वाक्यावर पाठमो-या अपर्णाने हलकेच आपला एक हात त्या वडाच्या झाडावर केला. जणू ती वर पाहण्यास खुणावत होती.! तस हळुच विजय ने एकवेळ अपर्णा कडे पाहिल व त्याने वडाच्या दिशेने वर पाहण्यास सुरुवात केली.!
जस विजय वर बघतो त्या क्षणी त्याला एक जीवघेणा हादरा....बसतो . भीतिने बोबडी वळली जाते , हात पाय जागीच गोठले जातात, मेंदू बधिर होतो , डोळे खोबणीतून बाहेर येतील इतके मोठे होतात, वर झाडाच्या फांदीवर अपर्णाच प्रेत फास लावून लटकलेल असत ,डोळे मोठे वटारलेले,जिभ बाहेर आलेली , एकटक ते निर्जीव प्रेत विजय कडेच पाहत असत, की तोच अचानक विजयच्या मनात भीतिने गोळा येत जस विजय पुढे त्या आकृती कडे पाहतो त्या क्षणी ती अभद्र आकृती विजय कडे पाहत त्यांच्या अंगावर एक काळ झडप घेते ............ .... उरते ती....फक्त...... .विजयची......शेवटची..रहस्यमय .किंकाळी......
आ....आ.....आ.....आ......!

: समाप्त:

मग येताय ना...अमावास्याला चेटक्याच्या....जंगलात हिहिहिही,हिहिही
नक्की या बर का..तो वाट पाहतोय.... 👿 नव्या सावजाची .....

.

फॉलो,समिक्षा नक्की करा 🤟🙏🏾😇

🙏🏾😇
चेटक्याच जंगल s....2 प्रकाशित केला आहे

समाप्त: