१ तास भुताचा - भाग 5 jay zom द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

१ तास भुताचा - भाग 5

भाग 5

तो दिवस होता 28 -11- 1996 चा ,

निताबाईंना त्यांच्या माहेरला सोडुन आल्यावर विलासराव आता ह्या क्षणी त्या घरात एकटेच होते . आपल्या घरातल्या आराम खोलीत असलेल्या खाटेवर डोळे मिटुन शांत पहुडले होते . विलासरावांच्या घराभोवती एकही घर नव्हत ...आजुबाजुचा पुर्णत परिसर रिकामा होता. विलासराव डोळे बंद करूण शांत पडले होते. की तोच त्यांच्या कानावर एक आवाज आला, टाळ वाजावे असा, ठण, ठण, आवाज , त्या निर्मनुष्य शांततेत हा आवाज विलासरावांच्या कानांवर पडताक्षणीच त्यांनी आपले डोळे खाडकन उघडले ... बेडवर ऊठून बसले .की तोच त्याचवेळेस किचनमध्ये सुद्धा भांडी पडल्याजा आवाज आला पुर्णत घर रिकाम होत . शांतता जणू इतकी पसरली होती , की टाचणी पडल्याचा आवाज सुद्धा कानांना स्पष्ट ऐकू येऊ शकत होता .त्यामुळे त्या भांड्यांचा आवाज चोरी करतावेळेस वाजणा-या सायरन प्रमाणे पुर्णत घरात घुमला. आवाजाने विलासराव थोडे सतर्क झाले बाहेरच्या सर्व खोल्यांच्यात मृत्युंजयमय काळोख पसरला होता .रातकिंडयाची कीर्र, कीर्र , बाहेरुन कानावर ऐकू येत होती आजुबाजुल 10 -15 मिनिटांच्या अंतरावर एकही घर नव्हत ...जर काही विपरीत घडलं तर मदत मिळण असंभव होत . विलासराव किचनमधुन कसला आवाज आला हे पाहण्यासाठी खाटेवरुन खाली उतरले . त्यांनी भिंतीवर असलेल्या स्विचबोर्डचे खटके एकदाच खाली ओढले त्यासरशी एकापाठोपाठ बल्बचा पिवळा प्रकाश सर्व खोल्यांच्यात पसरला .त्याकाळी आता सारखी कमी लाईट खाणारी ट्यूब वापरत नसत ..जुनी लोक बल्ब वापरायची कारण बल्बला प्रकाश खुप असायचा .सर्व खोल्यांच्यात एक कटाक्ष टाकुन विलासराव हळूच किचनच्या दिशेने निघाले एकवेळ तर त्यांच्या मनात हा विचार सुद्धा आला ..की निताच्या म्हणण्यानुसार खरच ती काली साडी नेसलेली बाई असेल तर.." हा विचार करता क्षणीच विलासरावांच्या पुर्णत शरीरावर सर्र्कन शहारा आला दोन्ही हातांवरचे केस काहीक्षणापुरते उभे राहीले ....भीतिने एक आवंढा गिळत एक -एक पाऊल पुढे टाकत विलासराव किचनच्या दीशेने निघाले .किचनमध्ये पोहचल्यावर त्यांना खाली पडलेली टोपशी दिसली . त्यासरशी विलासराव एका गोष्टीचा विचार करु लागले . घरात आपल्याशिवाय कोणीही नाही त्यासोबतच घर नविन असल्याने उंदीर सुद्धा नव्हते मग ही टोपशी पडली कशी ? आजुबाजुला संशयित नजरेने पाहत असलेल्या विलासरावांच्या नजरेस जेव्हा किचनजवळ असलेली उघडी खिडकी दिसली त्यावेळेस ते त्या खिडकीच्या दिशेने निघाले .एक -एक पाऊल उचलत विलासराव खिडकीच्या दिशेने निघाले होते , निताबाईंच्या म्हणण्यानुसार ती बाई त्यांना खिडकीतूनच प्रथमदर्शनी नजरेस पडली होती, खिडकीपाशी उभ राहून विलासरावांनी बाहेर एक ओघळता कटाक्ष टाकला किचनच्या आत असलेला बल्बचा प्रकाश काय तो बाहेर थोड अंतरा पर्यंत जाउन तितकाच भाग नजरेस पाडून देत होता .बाकी सर्व काही अंधाराने आपल्या आत भुगर्भात सामावुन घेतल होत रातकिंडयाची कीर्र, कीर्र आता जास्तच जवळून ऐकू येत होती .रात्रीचा अंधार त्यासोबतच, गावाबाहेर निर्मनुष्य जागी असलेल आपल घर कोण कधी ह्या अंधारातुन चोर-दरोडेखोर बाहेर येऊन आपला घात करतील सांगता येत नव्हत.नाना त-हेचे भयभीत करणारे विचार मनातल्या भितिच्या गाभा-यात उत्प्न्न होत-होते . विलासरावांनी पुन्हा एकदा आजुबाजुल्क़ पाहिल, काळ्याकुट्ट सर्प सारखा अंधार त्या व्यतिरिक्त काही असेल तर रातकिंड्याची किर, कीर्र बस्स त्या व्यतिरिक्त काहीही नव्हत बाहेर . आपल्या दोन्ही हातांनी खिडकीची एक-एक झाप हाती घेत विलासरावांनी खिडकी बंद केली. एक उसासा टाकला आणि पुन्हा आपल्या रुमच्या दिशेने जाऊ लागले, किचनच्या दरवाज्या पर्यंत ते पोहचले असतील की तोच त्यांच्या कानावर पुन्हा खिडकी उघडण्याचा आवाज पडला.एकक्षण ते आपल्या जागेवरच थबकले.हळूच त्यांनी मागे वळून पाहिल तस त्यांना उघडी खिडकी दिसली . त्यासरशी विलासराच पुन्हा एकदा खिडकीपाशी पोहचले पुन्हा बाहेर पाहिल कोणिही नव्हत मंग खिडकी उघडली कशी हा एक प्रश्न मनात उसळी घेऊ लागला होता , पुन्हा एकदा हात वाढवुन विलासरावांनी खिडकीची झाप बंद केली,व आरामखोलीत जाण्यासाठी निघाले, .............विलासराव 4-5 पावल चालुन झाले असतील की तोच पुन्हा एकदा त्यांच्या कानावर खिडकी उघडल्याचा भयउत्पन्नीत करणारा विशिष्ट प्रकारचा आवाज घुमला, त्या आवाजासरशी विलासराव थंडीत गोठल्या गेलेल्या मनुष्या सारखे जागेवरच थांबले , भीतिने डोळे मोठे झाले, कपाळावर आठ्या जमा होऊ लागल्या , आणि कपाळावरुन घामाचा एक ओघळता द्रव बिंदू खाली येऊ लागला , जो विलासरावांनी आपल्या हातानेच पुसला, व एक आवंढा गिळून पुन्हा एकदा खिडकी बंद करण्यासाठी जाऊ लागले,मनात भिती निर्माण होत-होती, धड-धड करत ढोल बदडावे अशी छाती भीतिने बदडली जात होती, इच्छा नसताना सुद्धा विलासराव पुन्हा एकदा खिडकीपाशी पोहचले , तसही खिडकी उघडी ठेवुन चालणार नव्हत , चोर -दरोडेखोरांची भिती होतीच, मनात कुठूनतरी सकारात्मक विचार आणून विलासराव पुन्हा एकदा खिडकीशेजारी पोहचले , ह्यावेळेस खिडकीची झाप बंद करुन विलासराव आपल्या जागेवरुन.... इंचभरही हलले नाहीत , कारण विलासरावांना पाहायच होत, की खिडकी आपोआप ऊघडली जातीये , की कोणी मुद्दामून हे येडचाळे करत आहे , काहिवेळ निघुन गेला , मात्र खिडकी काही केल्या उघडली नाही, विलासराव एकटक खिडकीकडे पाहत होते, की तोच किचनमधला पिवळ्या रंगाचा बल्ब चर-चरु लागला त्यासरशी विलासरावांनी त्या चर-चरणा-या बल्ब कडे पाहिल , आणि नजर हटताक्षणीच पुन्हा एकदा विचित्र आवाजासरशी खिडकीच्या दोन्ही झापा स्लोमोशनन3 उघड़ल्या गेल्या , ह्या सर्व घटना इतक्या जलद वेगाने घडल्या की जणू कोणीतरी विधिलिखित लिहिल्या होत्या किंवा कोरून ठेवल्या होत्या, 120 चा ताप भरलेला रुग्ण जस तापाने थर-थरला-फण-फणला. जातों, हुबे-हुब त्याच प्रकारे विलासरावांची अवस्था झाली , थर - थरत्या नजरेने विलासरावांनी खिडकीच्या दिशेन पाहिल , त्यासरशी विलासरावांच्या चेह-यावर तांबडा प्रकाश पडला ,व त्या तांबड्या प्रकाशाने पुर्णत चेहरा उजळून निघाला , कारण त्यांच्या नजरे पुढे आता ह्या क्षणी कित्येक तरी चिता पेटल्या होत्या , चौही दिशेना चितेची आग पसरली होती, जणू पाताळातल नरक समोर अवतरल होत , त्याच पेटत्या चितेंजवळून एक प्रेतयात्रा मोजून 7-8 माणस टाळ वाजवत रांगेत पुढे -पुढे चालली होती, ग्रामीण, खेड भागात त्याकाळी रात्री -अपरात्री एक भुताटकीचा प्रकार नजरेस पडायचा (ईणवा), हा प्रकार विलासराव फक्त ऐकुन होते , परंतू ऐकण्यात आणि अनुभवण्यात जमिन आसमानाचा फरक असतो , ती प्रेत-यात्रा हळू-हळू पुढे-पुढे जात होती , विलासराव कसलीही हालचाल न करता हा अघोरी , अमानवीय प्रकार आपल्या उभ्या डोळ्यांनी पाहत होते ,
ईणवा पाहताना कसलीही हालचाल झाली तर ईणवा आपल्या दिशेने येऊ शकतो ह्या भीतीपोटी विलासराव एका पुतळ्यासारखे उभे राहीले होते, परंतु विलासरावांच नशीबच फुटक होत , इकडे तो चर -चरणारा पिवळ्या रंगाचा बल्ब जो खिडकी उघडताक्षणीच चर-चरायचा थांबला होता, तो पुन्हा एकदा चर -चरु लागला , पिवळ्या रंगाचा प्रकाश कमी जस्ट होत-होत, शेवटी आंतिम क्षणी एक मोठा आवाज होत फुटला , आणि त्या सायलेंट किलर night मध्ये तो आवाज असा काही घुमला, की वणव्याच्या रुपात असलेला तो फ़ेरा प्रेतयात्रा जागीच थांबली , म्हणजेच पुढे-पुढे जाणारी, ती माणस जागेवरच थांबली ,टाळ वाजवण्याचा आवाज सुद्धा बंद झाला गेला, इकडे विलासरावांच्या तोंडच पाणि केव्हाचच पळाल होत , इकडे आड़ तिक्डे विहीर अशी परिस्थिती उद्भवली जाऊ लागली , , त्या प्रेतयात्रेतल्या सर्व माणसांनी तिरकस पणे पाहत विलासरावांकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला, आणि त्याचक्षणी त्या प्रेतयात्रेतल्या तिरडीवरच्या प्रेताची हालचाल होऊ लागली आणि ते प्रेत पांढ-या रंगाच्या कापडात ऊठून बसल , व कट-कट हाड मोडावी असा आवाज होऊ लागला जणू ते जे काही अनामिक, अघोरी , ह्या सर्वांच्या पलिकडच अवतरल होत , ते आपल भयानक रुप समोर आणत रुप -काया -वाढवू लागलेल , साधारण ऊंची असणार ते प्रेत काहीक्षणात 10-12 फुट इतक मोठ झाल , आणि मोठ होता क्षणीच एका झटक्यात तिने 360° च्या अंशात आपल डोक वळवुन विलासरावांकडे पाहिल डोक वळताक्षणीच त्या प्रेताच्या वर असलेला सफेद रंगाचा कापड फाटला गेला व त्याचक्षणी विलासरावांच्या नजरेस त्या अमानवीय, ध्यानाच व कायेच दर्शन घडल , जे मनुष्याच्या आकळन क्षमतेच्या आवाक्याबाहेरच होत , विलासरावांची आतापर्यंत 2 वेळा पेंन्ट ओळी झाली होती, भीतिने पाचावर धारण बसली जात शरीर कापू लागल होत , आता काय ते शुद्ध हरपण्याची वाटच विलासराव पाहत होते, दिवाळीत पेटवला जाणारा
हिरव्या रंगाचा सुतली बोंम्ब जस एक मोठा आवाज होत, फुटला जातो त्याच प्रकारे त्या सर्व चिता फुटू लागल्या, आजुबाजुला रक्त मांसाचा वास पसरला गेला, काहिवेळाने जमिनिवर पसरलेल्या त्या रक्त मांसात विचित्र हालचाल होऊ लागली, आणि त्या रक्तापासुन एक स्त्रीची आकृती तैयार होऊ लाग ली, जिच्या शरीरावर काळ्या रंगाची साडी होती, चेहरा पांढराफट्ट राखफासल्या प्रमाणे होता, आणि तिच्या तोंडात ती काहीतरी चाऊन खात होती, व खातावेळेस काळ्या रंगाची लाल बाहेर पडली जात होती ,
" तुला आण तुझ्या बायकोला सोडणार नाय म्या ........ !
हिहिहिही ..खीखीखि..
आण तुझ्या होणा-या..पोराला...कच्चा खाईल मी...हिहिही,
खीखी..खी....!" पुरुषी आणि माहिला-स्त्रीच्या मिश्रीत आवाजात ते
पिशाच्च म्हणाल.
इकडे विलासरावांना तिच ते भेसूर रुप पाहुन भोवळ यायला लागली, डोळे वर -वर जाऊन सफेद होत विलासराव जागीच बेशुद्ध झाले,
दुस-या दिवशी कामावर विलासरावांनी ही सर्व हकीकत माझ्या आजोबांना
सांगितली, तस आजोबांचे ओळखीचे एक इसम होते, ते सर्व भुत -विद्या
जाणून होते, भुत उतरवण्याच काम ते करायचे, त्याच दिवशी कामावरुन
सुट्टि झाल्यावर विलासराव व माझे आजोबा त्या इसमांच्या घरी गेले,

क्रमश :
🙏🏾😊❤