1 Taas Bhutacha - 3 books and stories free download online pdf in Marathi

१ तास भुताचा - भाग 3

लेखक : jayesh.. झोमटे...✍
....................................

सत्यघटनेवर प्रेरित

...भयकथा
काहीक दृष्य ( climax) काल्प्निक भय .मनोरंजन व्हाव ह्या हेतुने घेतली आहेत..!

सुड भाग 1

मित्रांनो ज्यासरशी सत्याचा सतियुग समाप्त झाल गेल , त्यासरशी कर्मकांड, कारस्थानी , कप्टी-नीच , वासनांधीश, लोभ -मोही कलिच कलियुग सुरु झाल...कलियुग सुरु होताक्षणीच सत्ययुगातली देव माणस- कलियुगात एका राक्षसा सारखी वावरु लागली . हम रस्त्याने जाणा-या मुलींची छेड काढणारे राक्षस आपल्या वृध्दधारी आई-बापाला वृद्ध आश्रमात पाठवणारे राक्षस दुस-याच्या घव-घवीत यशावर जळणारे राक्षस ....अशा कित्येक तरी कलिच्या सवयींने नढलेले मनुष्य आज ह्या कलियुगात राक्षसा सारखी वावरु लागलीयेत . आज ह्या क्षणी मी त्यांच एका कलिच्या सवयीने नढलेल्या कलियुगी माणसांची कथा सांगणार आहे. आज कलियुगात जो तो आपल्या आजुबाजुच्या प्रगती करणा-या मणुष्याच्या घवघवीत यशावर जळत आहे...हे जरी तुम्हाला माहीती नसल तरी ते सत्य आहे .सत्य हे अकल्पित सत्यापेक्षा कित्येक तरी पटीने वेगळ असत .समाजात चांगुलपणाचा मुखवटा घालून वावरणा-या ह्या माणसांना आपण योग्यवेळीच ओळखायला हव ....अन्यथा परिणाम किती घातक होऊ शकतात हे ह्या कथेत मी तुम्हाला दाखवुन देणार आहे!


□□□□□□□□ʼ□□□□□□□□□□□□□□

हि घटना 1996 साली घडली होती . त्याकाळी माझे आजोबा रामचंद्र तरुन असुन रेल्वेत कामाला होते . आजोबांच्याच एका सहकारी विलास नामक मित्राच्या परिवारा समवेत ही अनैसर्गिक घटना घडली होती .पाहुयात काय घडल होत.......त्यांच्यासोबत =>

त्याकाळी विलास वय 25 हे नवखेच रेल्वेत कामाला रुजू झाले होते .त्यांच्या परिवारात आई -वडिल 2 मोठे भाऊ - दोघे सुद्धा बिगारी काम करायचे ..दोघांचही लग्न झाल होत.
विलास हे त्या दोघांमध्ये सर्वात लहान अविवाहित होते, परंतु नौकरी लागताक्षणीच घरातल्यांनी लग्नाचा प्रस्ताव त्यांच्या समोर मांडला होता .स्थळ पाहीलेली मुलगी( निता ) तशी स्वभावाने शांत बोलायला प्रेमळ व दिसायला सुद्धा छान होत्या. विलास रावांनी सुद्धा त्या प्रस्तावाला स्व:मनाने होकार दर्शवला ...कारण मुलगी त्यांना सुद्धा आवडलेली ...पसंत पडलेली होती .त्याकाळी आजच्या सारखे लग्न जमल्यावर फोन गिफ्ट देऊन तासंतास बोलत बसन गप्पा मारण्यासाठी चेट वगेरे करन.... अशा प्रथा नव्हत्या आणि नाही तसे साधन उपलब्ध होते . म्हणूनच विलासराव निता ह्यांना कधी-कधी लपून छपून कामावरुन सुट्टि घेत भेटत असत... ज्याने त्या दोघांच प्रेम दिवसेंदिवस वाढत चालल होत. घरातल्या कोणालाही ह्या दोघांच अस चोरुन भेटन माहीती नव्हत. माझे आजोबा रामचंद्र ह्यांना मात्र हे सर्व माहीती होत .कारण ते विलास रावांचे जिवलग मित्र होते.6 माहिन्यांनी दोघांच रीतिरिवाजा नुसार लग्न झाल.लग्न झाल्यानंतर एक दीड वर्षांनी दोन भावांच्यात प्रोपर्टी साठी खटके उडू लागले...दिवसेंदिवस वाद शिंगेला पोहचला जात होता. विलासरावांना भांडण नको हव होत .ज्या कारणाने विलास रावांनी आपल घर गावाबाहेर स्व: मालकी हक्काने विकत घेतलेल्या शेतात बांधायच ठरवल . सरकारी नौकरी असल्याने पैशाची कमी नव्हती . त्या काळी बांधकाम साहित्य सुद्धा स्वस्तात होत . परंतु मेस्त्री. बिगारी यांची ओळख मात्र विलासरावांशी नव्हती .त एके दिवशी विलासराव माझ्या आजोबांकडे ह्या विषयावर बात-चीत करण्यासाठी आले होते .एकंदरीत प्रोपर्टी विषयीच दोन भांवडान मधला सर्व काही प्रकरण आजोबांना माहीतच होत . विलासरावांच घर बांधण्याच प्रकरण मात्र आजोबांना ठावुक नव्हत.परंतु ज्यावेळेस विलासरावांना आजोबांन समोर घराबदलच विषय काढल त्यावेळेस विलासराव म्हणाले.

" रामचंद्र...! माझ्या घरी दोन्ही मोठ्या भावांन मध्ये प्रॉपर्टी
....... बदल रोजचे खटके उडतायेत...! "
विलासराव माझ्या आजोबांना म्हणजेच रामचंद्र यांना म्हणाले.

" हो माहीतीये... मित्रा ...! आणि मला हे पन माहितीये..की तुला त्या प्रॉपर्टी मधला काडीचाही हिस्सा नकोय !"
रामच्ंद्र म्हणाले .

" अरे रामचंद्र....! मला त्या प्रॉपर्टीत काय इंटरेस्ट नाही रे..! माझी नोकरीच बस्स आहे..माझ्यासाठी....! मला फक्त एकच हवय... माझी बायको आणि होणार मुल....सुखात रहाव...
बस्स !"
विलासराव नेक मनाने म्हणाले .

" अरे व्वा विलास ! तू मला हे सांगितल नाहीस ? की
निता वहिनी प्रेग्नेंट आहे ते..?"
माझे आजोबा म्हणजेच रामचंद्र खुश होत म्हणाले.त्यांचा आनंद जणू आज गगणात भिडेनासा झाला होता .माझ्या आजोबांनी तर एकक्षण राजनला उभे रहात मिठीच मारली व खुश होत पाठ थोपटली..... व पुन्हा आपल्या जागेवर बसत म्हणाले .

" विलास.! मला ह्या खुश खबरीवर.पार्टी पाहिजे !"
रामचंद्र आपले दोन्ही हात एका विशीष्ट प्रकारे वर करत
म्हणाले .

" अरे नक्की देणार ..ना...! ..ते पन माझ्या नव्या घरी ...!"

" नव्या ...घरी...! ......म्हणजे ....? मला काही समजल
नाही ?"
माझे आजोबा न समजल्या सारखे म्हणाले.

" हो रामचंद्र नव्या घरी! त्यासाठीच तर आलोय मी इथे...!"
विलासरावांनी अस म्हणतच . घर बांधण्याच्या कल्पनेबदल रामचंद्र ना सर्वकाही सविस्तर सांगितल तस सर्व माहिती ऐकल्यानंतर रामचंद्र म्हणालें.

" जागा ठिक आहेना....? जंगलात वगेरे नाही ना..?

" जंगलात तर नाहीये..! पन गावापासून जरा बाहेर आहे..!"
" घर आहेत का आजुबाजुला....? " रामचंद्र म्हणाले.
" सद्या तर नाहीये..! पन नंतर-नंतर लोकवस्ती होईल
तिथे....! अस मला वाटतं ...!"

" हम्म ....ठिक हे..मग ! माझ्या ओळखीचा एक बिल्डर
आहे मी बोलुन बघतो त्याच्याशी"
माझ्या आजोबांचे म्हणजेच रामचंद्र यांचे हे बोल ऐकून विलासरावांना खुपच आनंद झाला . घराच प्रोब्लेम मिटल्याने ते थोडे सुखावले गेले . काहिवेळ मग इकडच्या-तिकडच्या गप्पागोष्टी झाल्या. मग विलासराव त्यांच्या घरी निघून आले .घरी आल्यानंतर त्यांनी ही खुशखबर आपल्या दोन्ही भाऊंना व आई-वडिलांना कळवली .खुशखबर कळवताक्षणी विलासरावांनी एक पेड्यांचा मिठाईचा बॉक्स बरोबर आणला होता.... प्रत्येकाला एक -एक पेडा देत त्यांनी आनंद व्यक्त केला .दोन -तीन दिवसांन नंतर विलासरावांच्या घराच काम जोरात चालू झाल गेल . घड्याळाचे काटे पुढे-मागे होत - होत काळाचे चक्र फिरु लागले .त्यासरशी वेळ पुढे सरकत जाऊ लागली . आणि मग 3 -4 महिन्यांनी तो सोन्याचा दिवंस उगवलां .विलासरावांना स्व्त: च्या हक्काचा घर मिळाल गेल .
गृहप्रवेश च्या दिवशी विलासरावांच्या व निताबाईंच्या परिवाराततले अस मिळून सर्व जण त्यांच्या नव्या घरात जमले होते . एकंदरीत विलासरावांच्या व त्यांच्या पत्नी निताबाई यांच्या आयुष्यातला हा विलक्षण आनंदाच क्षण होता !त्या कारणाने माझे आजोबा सुद्धा कामावरून सुट्टि घेत पुजेसाठी आले होते.पुजा झाली त्यासरशी विलासरावांच्या परिवारातले सर्वजन हॉल मध्ये बसले होते. फक्त निताबाई विलासरावांच्या पत्नी सोडुन... निताबाई 8 महिन्याच्या गरोदर होत्या .त्या आता ह्याक्षणी किचनमध्ये सर्वांसाठी शिरा बनवत होत्या. त्यांच्या समोरा-समोरच
एक खिडकी होती. त्या खिडकीतून बाहेरच सर्व दृश्य नजरेस पडत होत .आजुबाजुला गावातल्या लोकांची शेत होती .उन्हाळा असल्याने शेतातल गवत सुखल होत , तांबड्या प्रकाशात जणू सोन रोवल होत अस वाटत होत .घरापासुनच 150-200 मीटर वर काही झाड़ - झुडप वगेरे एका भिंतीप्रमाणे उभी होती, म्हणजेच त्या झुडपांमुळे पलिकडच काही दिसत नव्हत, निताबाई आपल्या मंद स्मित हस-या चेह-याने शिरा बनवत होत्या .की अचानक त्या झाडा-झुडपांमधुन एक काळी साडी घातलेली पांढराफट्ट चेहरा असलेली स्त्री बाहेर आली ... व एकटक आपल्या पांढ-या डोळ्यांनी किचनच्या खिडकीतून दिसणा-या निताबाईंच्या आकृतीकडे पाहु लागली .मित्रांनो प्रत्येक मणुष्याकडे एक वेगळीच शक्ति असते ...आपल्या मागो -माग जर कोणि उभ असेल व एकटक ते आपल्याकडेच पाहत असेल .तर त्याक्षणीच आपल्या मेंदुला त्याची चाहूल लागते एकप्रकारे आपला मेंदू त्याक्षणीच एका विशिष्ट पद्धतीने चेतातंतुना संकेत देतो .व आपन मनुष्य त्या संकेतासरशी सभोवताली एक कटाक्ष टाकतो, सेम -हुबे -हुब त्याच प्रकारे निताबाईंना आपल्याकडे कोणीतरी पाहत आहे ह्याची जाणीव होऊ लागली .तस त्यांनी एकदोनदा खाली डावी उजवीकडे पाहत आपले डोळे मिचकावले ...व थेट एक कटाक्ष त्या खिडकीतून बाहेर टाकला, तस त्यांना दुर एक काळी साडी घातलेली बाई दिसून आली, जिचा चेहरा उन्हात सफेद रंगाने चमकत होता .जणू पुर्णत चेह-याला चुना फासला असावा . तिचे केस विस्कटलेले होते जे दोन्ही खांद्यावरुन खाली लोंबकळत होते . त्या स्त्रीच्या डोळ्यांखाली काळ्या रंगाची मोठ-मोठाली डार्क सर्कल्स होती .ओठ सुद्धा काळ्या रंगाचे होते. व तोंडातुन काळ्या रंगाची लाळ बाहेर पडत होती,निताबाई एकटक त्या स्त्रीकडे संमोहित झाल्या सारख्या पाहु लागल्या . तस त्या स्त्रीने आपले दोन्ही हात एका विशीष्ट पद्धतीने वर केले . निताबाईंना आपल्याकडे बोलावू लागली . मागे-मागे जात त्या झुडपांत दिसेनाशी झाली,
" निता..वहिनी....??"
अचानक आलेल्या ह्या आवाजासरशी निताबाई जणू त्या संमोहित क्रियेतुन. तंद्री भंग पावल्या सारख्या एक विजेचा झटका बसावा त्याप्रमाणे बाहेर आल्या त्यांनी लागलीच समोर पाहिल व म्हणाल्या .

" भाऊजी तुम्ही...! ....काही हवंय का तुम्हांला..?"

" अंग्ग वहिनी.....मला काही नको ...! पन हा शिरा जल्ला असताना..तर तुला मात्र ताने खावे लागले असते .. ! "
माझे आजोबा रामचंद्र असे म्हणताच निताबाई हसु लागल्या तस काहीवेळाने आजोबा म्हणाले.

" ते सगळं जाऊदे...! पन तुझं लक्ष कुठे होतं, नाही म्हंणजे मी तुला तीन -चार हाका दिल्या...? तरी तू एकटक समोरच पाहत...होतीस..." माझे आजोबा रामचंद्र निताबाईंकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहत म्हणाले .

" अहो भाऊजी...! ते तिकडे एक..." निताबाईंनी ह्या वाक्यासरशी खिडकी च्या दिशेने हात केला व पुढे बोलू लागल्या

" एक काली साडी घातलेली बाई ऊभी होती...! तिने मला हात पन
केला ...! "

" काय ....! "
अस म्हणतच रामचंद्र यांनी किचनच्या खिडकीतुन बाहेर पाहत दुर -दुर पर्यंत एक कटाक्ष टाकला परंतु त्यांच्या नजरे समोर कोणिही नव्हत,

" अंग्ग वहिनी....तुला ना भास झाला असेल...! तिथे तर कोणीच
नाहीये..! "
रामचंद्र म्हणाले.

आणि त्यांच्या ह्या वाक्यासरशी निताबाईंनी सुद्धा पुन्हा किचनच्या खिडकीतुन बाहेर पाहिल , परंतु दुपारच्या उन्हा व्यतिरिक्त बाहेर काहीही नव्हत ,

" हे बघ..वहिनी ..! मला वाटतय..तुला नक्कीच भास झाल असेल ...! जास्त विचार नको करुस...., बाळा साठी चांगल नाहीये
ते..!"

" हो भाऊजी...! बरोबर आहे..तुमच...! तुम्ही बसा मी शिरा
घेऊन येते"
निताबाई म्हणाल्या.
व त्यांच्या ह्या वाक्यासरशी माझे आजोबा रामचंद्र सुद्धा बाहेर निघुन गेले,
□□□□□□□□□□□□

अर्धा- एक तास पाहुणचार झाल्यानंतर,माझे आजोबा रामचंद्र सगळ्यांचा निरोप घेऊन घरी जाण्यासाठी निघाले . तस विलासराव सुद्धा आपल्या मित्राला सोडण्यासाठी अंगणापर्यंत आले .

" अरे एकदिवस राहिल असतास...तर काय झाल असत..!"
विलासराव रामचंद्रना म्हणालें.

" अरे विलास आता नको ..! नंतर येइण मी ..! " माझे आजोबा
रामचंद्र आपल्या स्कुटीवर बसत म्हणाले.

" बर बाबा..! चल मग भेटू उद्या..! "विलासराव अस म्हणतच घरात वापस जाण्यासाठी वळले तस रामचंद्र यांनी विलासरावांना एक हाक दिली ...जणू त्यांना काहीतरी विचारायच होत

" अरे विलास एक मिनिट इकडे येतोस..का..?"
रामचंद्र यांनी पुढे जाणा-या विलासरावांच्या आकृतीकडे पाहत हे वाक्य उद्दारल . त्यासरशी ह्या वाक्यावर विलासराव पुन्हा रामचंद्र यांच्या जवळ चालत आले व म्हणाले .
" काय रे रामचंद्र...? काय झालं...!"
" अरे तिकडे बघ....!" रामचंद्र यांनी अस म्हणतच ,
आपला हात त्या झाडाझुडपांच्या दिशेने केल ... जिथे निता बाईंना ती काली साडी नेसलेली बाई दिसली होती. आता ह्या क्षणीत्या झाडाझुडपांन पलिकडुन सफेद रंगाच धुर निघत होत आणी वर - वर आकाशात जात होत .
" हा काय रे...?" विलासराव सुद्धा त्याच दिशेने पाहत म्हणाले .
" अरे काय....काय बोलतोस ...? येवढ धुर का निघतोय
तिकडून ...? शेता आहेत का खाली ..."
रामचंद्र यांनी विलासरावांना प्रश्न केला . तस विलासराव पुढे म्हणाले...आणि त्यांचे पुढचे शब्द जणु रामचंद्र यांना एक धक्का बसल्या सारख्या लागले .

" अरे शेत वगेरे नाही ..! आमच्या गावच स्मशान आहे तिथे....! आणि कोणीतरी वारल वाटतय गावातल ...! आणि प्रेत जलत
असेल म्हणुन येत असेल धुर...!"

"काय...! अरे मग तु मला हे...अगोदर का नाही सांगितलस..!?"
रामचंद्र थोडे चिडतच म्हणाले.

" अरे त्यात येवढ ...चिडण्यासारख काय आहे..भावा..? " विलासराव अगदी सहजपणे म्हणाले.

" हे बघ ...विलास ! ..तुला माहीतीयेना......? की मी एक वास्तुशात्रावर विश्वास ठेवणारा माणुस आहे...! आणि हे काय...मसनवाट ठेवलिय...! मला ..... जर तु कधी .....ह्या बाबतीत ....अगोदर सांगितल असतस...ना तर मी तुला इथे....कधीच घर बांधून दिल असत...!"
रामचंद्रराव म्हणाले.

" अरे पन..."
विलासराव इतकेच म्हणाले असतील की तोच त्यांच पुढच वाक्य अडवतच रामचंद्रराव म्हणाले.

" तु मला संगायला हव ...होतस ... मित्रा. ....." रामचंद्र राव थोडे
उदास होत म्हणाले,

" अरे मित्रा...! आज.. ना... उद्या..आपली वेळही ठरलेलीच हे...,
काय नाय होत त्यात...!"
विलासराव रामचंद्र यांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले ,त्यासरशी रामचंद्र यांनी विलासरावांकडे एक नाखुषीच मंद स्मित-हास्य करत पाहील व पुढे म्हणाले.

" hmm.......वहिनीची काळजी घे....!"
माझे आजोबा रामचंद्र थोडे नाराजीच्या सुरात म्हणाले .जणु त्यांना ही जागा बिल्कुल पसंद पडली नव्हती, . पुन्हा एकदा स्कूटर ला किक देत. ते तेथुन निघुन गेले .विलास व त्यांच्या पत्नी निताबाई यांच आपल्या नव्या घरात पाहिला दिवस खुप छान आनंदात निघुन गेला . दुस-या दिवसापासून विलासराव नेहमीप्रमाणे आपल्या कामावर निघुन गेले . विलासराव आता संध्याकाळीच येणार होते .
आता त्या पुर्णत घरात निताबाई एकट्याच होत्या. दुपारचे दोन वाजले होते..पोटात बाळ असल्याने उपाशी रहाण ठिक नव्हत
म्हणूनच निताबाई किचनमध्ये स्व्त:साठी काहीतरी बनवत होत्या .
, त्यांच्या समोरा-समोर तीच किचनची खिडकी होती .खिडकीतून दुपारचा प्रकाश आत येत होता .निताबाई खाली पाहतच सुरीने कांदा कापत होत्या.. मणुष्य हा प्राणी कोणतही काम जर पुर्णत नेक मनाने करत असेल .तर आपल्या आजुबाजुला घडणा-या घटनांच प्रभाव त्याच्या मनावर पडत नाही .त्याचप्रकारे निताबाई आपल्या कामात इतक्या गर्क झाल्या होत्या. की आजुबाजुला त्यांच बिल्कुल लक्षच नव्हत. काहीवेळाने
न - जाणो एक थंड हवेचा झोत बाहेरुन येत त्या खिडकीतून आत शिरला निताबाईंच्या पुर्णत शरीराला काहीक्षणा पुरता स्पर्शुन गेला. त्या थंड स्पर्शाने एकवेळ त्यांच अंग शहारल गेल जात , त्यांनी हळुच खिडकीबाहेर एक ओघळता कटाक्ष टाकल परंतु बाहेर काहीही नव्हत . पर ज्यारशी त्यांची नजर त्या झुडपांजवळ थांबली गेली. त्यासरशी काल-पर्वा घडलेला तो काळ्या साडी घातलेल्या बाईचा प्रसंग क्षणात एका चित्रफिती प्रमाणे.डोक्यात तरळून गेला . मनात नाना त-हेच्या प्रश्नांची सरबत्ती चालू झाली . का खरच तो भास होता की खरच तिथे कोणी होत ! कोण होती ती बाई! आणि आपल्याला तिकडे स्मशानात का बोलावत होती " निताबाईंच्या मनात एकापाठोपाठ अशा कित्येक प्रश्णांनी
तोंड बाहेर काढायला सुरुवात केली होती .की तोच एक ओळखीचा आवाज त्यांच्या कानी पडला... .

निता..........,???????????

 

 

 

सत्यघटनेवर प्रेरित......
नरक..राक्षस ... कैकृलाक ......

क्रमश:
🙏🏾😊

 

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED