अंगडिया स्टोरी - भाग २ Dilip Bhide द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

अंगडिया स्टोरी - भाग २

अंगडिया स्टोरी

भाग  २

भाग १ वरुन पुढे वाचा ......  

एक ऑटो रिक्शा जवळ आली, शेजारीच अजून एक माणूस उभा होता त्याने किटबॅग ऑटो रिक्शा मध्ये  टाकली आणि तो पण बसला. ऑटो रिक्शा अतिशय वेगाने तिथून निघून गेली. द्वारका आणि रिक्षावाला ओरडत त्या ऑटो रिक्शा च्या मागे धावले, पण तो पर्यन्त तो दिसेनासा झाला होता. ऑटो रिक्शा तूफान स्पीडने धावत होती. कोणी आपल्या मागावर तर नाही या भीतीने, गल्ली बोळातून रिक्शा धावत होती. शेवटी, आपला कोणी पाठलाग करत नाहीये, याची खात्री झाल्यावर, रिक्शावाल्याने रिक्शा सुभाष रोडवरती घातली.

सुभाष रोड हा पूर्व नागपूर आणि पश्चिम नागपूरला जोडणारा मेन रोड. नागपूरातला अतिशय गजबजलेला रस्ता, गल्लीतून रस्त्यावर प्रवेश घेतांना सुद्धा रिक्शाची स्पीड खूप होती. तो रस्त्यावर यायला आणि एक सायकल रिक्शा समोर यायला एकच गांठ पडली. ऑटो रिक्शाची सायकल रिक्षाला धडक बसली. सायकल रिक्शा मधे एक वृद्ध जोडपं बसलं होतं ते दोघंही आणि रिक्षावाला पण खाली पडले. बाईला बऱच लागलं होतं आणि रक्त वाहत होतं. ऑटो रिक्शा पण आडवा झाला होता. लगेच लोकं धावत आले आणि त्यांनी सर्वांना उठून बसवलं. लोकांनी पाहीलं होतं की ऑटोची स्पीड खूपच जास्त होती, त्यांनी ऑटो वाल्याला पकडलं आणि मारायला सुरवात केली. पाहता पाहता बरीच गर्दी जमली आणि रस्त्यावरची वाहतूक थांबली. गर्दीचा आणि गोंधळाचा फायदा घेऊन ऑटोत बसलेला माणूस किट बॅग घेऊन हळूच सटकला.

गणेश पेठ पोलिस स्टेशन तिथून हाकेच्या अंतरावर होतं. त्यांना या अपघाताची बातमी लागली आणि पोलिस लगेच तिथे पोचले. जखमी झालेल्या वृद्ध जोडप्याला त्यांनी जवळच्या एका दवाखान्यात प्राथमिक उपचार करण्या साठी पाठवलं, आणि जमलेल्या लोकांकडे चौकशी करायला सुरवात केली. नेमकं काय घडलं असावं याचा अंदाज आल्यावर, ते ऑटो रिक्शा चालवणाऱ्याला पोलिस स्टेशन मधे घेऊन गेले. आधी कानाखाली दोन आवाज काढल्यावर मगच बोलायला सुरवात केली.

थोडी दमदाटी आणि मधूनच चौकशी असा प्रकार थोडा वेळ चालला.

“नाव काय तुझं?” – पोलिस.

“भास्कर” –

“ऑटो कोणाची आहे?” – पोलिस.

“माझीच आहे साहेब. लोकांना हवं तिथे घेऊन जातो.” – भास्कर.

“कोणची सवारी घेऊन चालला होतास?” – पोलिस.

“पॅसेंजर चं नाव कोण विचारतो साहेब? जिकडे चला म्हंटलं तिकडे घेऊन जायचं एवढंच आमचं काम. आपल्याला भाड्याशी मतलब.” – भास्कर.

“ओके, कुठून कुठे जात होता?” – पोलिस.

“स्टेशन च्या बाहेर सवारी भेटली साहेब, कुठे जायचं ते सांगतो म्हणाले. पण अपघात झाला आणि सवारी उतरून चालली गेली साहेब, भाडं पण दिलं नाही.” – भास्कर.

कुठे जायचं हे सांगितलं नाही म्हणतोस मग गणेश पेठेत कसा आलास? आपणहून? किती भाडे ठरले होते?” – पोलिस.

“साहेब, मिटर प्रमाणे देऊ म्हणाले होते.” – भास्कर.

“मिटर प्रमाणे? आणि ते ही नागपूरात? आणि तू ही कबूल झालास? खरं बोल, नाहीतर...” – पोलिस.

“खरंच बोलतो आहे साहेब.” – भास्कर.

“करपे, रिक्शाचं मिटर चालू केलं आहे का बघा.” – चौकशी करणारा पोलिस.

“नाही, मिटर बंद आहे.” – करपे.

हे ऐकल्यावर पोलिसांनी अॅक्शन रीप्ले केला. भास्कर गुरा सारखा ओरडला म्हणाला “सांगतो, सांगतो साहेब, मारू नका.” पोलिस थांबले.

“बोल जे काही आहे ते नीट आणि खरं सांग नाही तर हे कॉंस्टेबल साहेब येतील तुझ्या बरोबर खेळायला.” – आता इंस्पेक्टर साहेबांनी सूत्र हातात घेतली होती.

“साहेब, रिक्शा कोणी ठरवली ते माहीत आहे, कोण बसलं होतं ते नाही माहीत, मी ओळखत नाही त्याला.” – भास्कर.

“ठीक आहे. कोणी ठरवली?” – पोलिस.  

“वासू आणि किसन.” – भास्कर.

“कुठे राहतात?”” – पोलिस.

“डीपटी सिग्नल” भास्कर.

“चल बस गाडी मधे.” – इंस्पेक्टर साहेब.

डीपटी सिग्नल वरुन  वासुला ताब्यात घेतलं. किसन घरी नव्हता. त्याच्या घरी एका शिपायाला बसवून हे लोक वापस पोलिस स्टेशनला.

“हूं, बोल कशा करता घेतली होती ऑटो रिक्शा?” – पोलिस.

“काही नाही असंच. हा भास्कर आमचा दोस्त आहे साहेब, फिरत होतो त्यांच्या बरोबर.” – वासू.

“फिरत होता? पण रिक्षात तर तुम्ही नव्हता, कोण होतं रिक्षात?” – पोलिस.

वासुला कळलं की तो चुकला, पण आता वेळ निघून गेली होती. कॉंस्टेबल दंडा घेऊन समोर आला. एक फटका खाल्ला आणि वासू बोलायला लागला.

“माहीत नाही साहेब, किसन चा दोस्त होता रिक्षात.” – वासू.

“रिक्शा एवढ्या स्पीड मधे का जात होती?” – पोलिस.

“आम्ही रिक्षात नव्हतो मग कसं सांगणार?” वासू.

“साहेब, हे असे सांगणार नाहीत, माझ्या कडे सोपवा पांच मिनिटे, मग बघा.” एक कॉन्स्टेबल म्हणाला. हे ऐकून वासू आणि भास्कर दोघंही हादरले.

“नको साहेब, सांगतो. साहेब, आम्ही सहज स्टेशन वर गेलो होतो.” – वासू.

“सहज?” आणि साहेबांनी हात उगारला.

“नाही साहेब, काही छोटी मोठी हात सफाई करता येते का ते बघायला गेलो होतो. पण किसन ने पाहीलं की अंगडिया चा माणूस एक मोठा थैला घ्यायला आला होता. मग किसन ने तो थैला लुटण्याचा प्लॅन  बनवला.” वासू म्हणाला.  मग वासूने काय प्लॅन  बनवला होता ते सविस्तर सांगितलं. “भास्कर तिथेच आम्हाला भेटला, आम्हालाही रिक्शाची जरूर होतीच, मग त्याला पण आम्ही यात सामील करून घेतलं. लोकं मागे लागले म्हणून भास्करने रिक्शा जोरात काढली. अपघात झाला नसता तर कोणाला काही कळलं पण नसतं.” – वासू.

“असं काय होतं त्या थैल्या मधे?” – पोलिस.

“नाही माहीत साहेब, किसनचा दोस्त त्यानंतर आम्हाला भेटलाच नाही. किसन त्याला शोधायला गेला आहे.” वासू.

“कोणचा अंगडिया  होता?” – पोलिस.    

“आम्ही थैला बघितलाच नाही म्हणून माहीत नाही साहेब.” – वासू.  

त्यांच्या बोलण्यात तथ्य होतं म्हणून इंस्पेक्टर साहेब, जे आत्ता पर्यन्त मजा बघत होते, ते म्हणाले

“असं कसं, थैला चोरण्याची आयडिया तुझी आणि किसनचीच होती न?”

“हो साहेब.” – वासू.

“आपलयाला सर्वांनाच माहीत आहे की अंगडिया म्हणजे खाजगी पोस्टमन आहे म्हणून. मग तुम्हाला तो पत्रांचा थैला लंपास करावा असं का वाटलं.” – साहेब.

“काही नाही साहेब, आज कुठेच हात साफ करायला मिळाला नाही म्हणून थैलाच चोरला.” – वासू.

“फालतू बकवास नको, सच्ची बात बोल, नही तो हमे आता हैं तुम्हारा मुहँ कैसे खुलवाना हैं. सोच लो एक बार” – साहेब आता जरा जरबेच्या स्वरात म्हणाले. त्यांना आता संशय यायला लागला होता. नक्कीच काही तरी गडबड आहे. चोरांना पक्का अंदाज असतो की कुठे माल मिळेल म्हणून.

वासुने थोडा विचार केला त्याच्या आता लक्षात आलं की सांगितल्या शिवाय आता सुटका नाही. तो म्हणाला “साहेब, आम्हाला दिसलं की अंगडियाच्या माणसाने गाडीतून आलेल्या माणसाला १० रुपयांची नोट दिली. त्या माणसानी नोट तपासली आणि मगच थैला अंगडियाच्या माणसाला दिला. काही तरी मोलाची वस्तु असेल, आणि ती विकून पैसे मिळतील, म्हणून आम्ही त्यावर हात साफ केला. पण खरं सांगतो साहेब, अंदर क्या हैं इसके बारेमे हमको कुछ भी मालूम नहीं, हमारे हाथ मे थैला आयाही नहीं. मॉ कसम  साब.”

इंस्पेक्टर साहेबांच्या लक्षात आता सर्व प्रकार आला. असं जेंव्हा हस्तांतरण होतं तेंव्हा काही तरी मूल्यवान गोष्टी पाठवल्या जातात. मग ते दागिने असोत की महत्वाची कागदपत्रे असोत, साहेबांना याची पूर्ण कल्पना होती. म्हणजे प्रकरण गंभीर असल्याची त्यांना जाणीव झाली. त्यांनी लगेच जीप काढायला सांगितली आणि वासू आणि भास्करला घेऊन  ते डीपटी  सिग्नल कडे निघाले. सगळी वरात किसनच्या घरी पोचली तेंव्हा वासुला दुरून किसन येतांना दिसला.  त्याने पोलिसांना दाखवले. लगेच त्याला घेराव करून पकडण्यात आलं. आता वेळ वाया घालवण्यात अर्थ नव्हता. किसन वर प्रश्नांची सरबत्ती केल्यावर त्यांनी त्याचा मित्र कुठे आहे ते सांगितलं. पोलिस पार्टी तिकडे गेली आणि त्या मित्राला पण घेरलं. थैला त्याच्या घरातच सुरक्षित होता. मग थैल्या सकट सर्व वरात पोलिस स्टेशनला वापस आली. आता पर्यन्त सर्व गोष्टी क्लियर झाल्या होत्या. थैला अजूनही सीलबंद होता. पंचनामा करून त्या थैल्याची नोंद करण्यात आली. सर्व जणांचे बयाण पण नोंदवण्यात आले. थैला मुकेश अंगडियाचा  होता हे स्पष्ट झालं होतं. आता प्रश्न हा होता की चोरी होऊनही संबंध दिवसभरात मुकेश भाईंनी पोलिस स्टेशन मधे तक्रार का नोंदवली नाही. ती केली असती तर आत्ता पर्यन्त शहरातल्या सर्व ठाण्यांना त्यांची माहिती मिळाली असती. रात्र बरीच झाली होती रात्रीचे ३ वाजले होते, म्हणून साहेबांनी विचार केला की उद्या सकाळी सकाळी मुकेश भाईंना बोलाऊन घेऊ. मग सगळ्याच गोष्टी स्पष्ट होतील.

 

क्रमश:.......

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

कथा आवडली असेल तर जरूर लाइक करा