Sahib bibi aur gulam books and stories free download online pdf in Marathi

साहिब बीबी और गुलाम - पुनरावलोकन

सिनेमाचे नाव : साहिब बीबी और गुलाम

भाषा : हिंदी

निर्माता : गुरुदत्त

निर्देशक : अब्रार अल्वी

कलाकार : मीना कुमारी, गुरुदत्त, रेहमान, वहिदा रेहमान, डी. के. सप्रू, धुमाळ आणि मिनू मुमताज

रिलीझ डेट : २९ जुलैई १९६२

 

भारतीय साहित्यामध्ये बंगाली साहित्य सर्वात जास्त दर्जेदार मानले जाते, त्या मागे आहे बंगाली लोकांचे साहित्यवरचे प्रेम. त्यांच्या साहित्यप्रेमाने बंगाली साहित्याला महान साहित्यकार मिळाले. बिमल मित्रा त्या मधील एक. त्यांनी एक कादंबरी लिहिली होती १९५३ मध्ये नाव 'साहेब बीबी गोलाम', त्या कादंबरीचे हार्द होते जमीनदाराशी लग्न करून आलेल्या स्त्रीच्या मनाची व्यथा.

या कादंबरी वर एक बंगाली सिनेमा १९५६ मध्ये बनला होता, ज्या मध्ये बीबीची भूमिका सुचित्रा सेनने वाठिवली होती व भूतनाथची भूमिका उत्तमकुमारने साकारली होती. साहेबचा रोल छबी बिस्वासने केला होता.

गुरुदत्तने पण हि कादंबरी वाचली आणि सिनेमा बनवायच्या आधी त्या कथेवर आधारित नाटक बघायचे ठरविले  आणि त्या साठी ते गीतादत्त (गुरुच्या मागे असलेले दत्त हे नाव होते, मग गीता रॉय चौधरीने दत्त हे आडनावा सारखे का बरे लावले हा अजून प्रश्न उभा च आहे!) व जुन्या मित्र व साथीदार अब्रार अल्वी सोबत कलकत्ताला गेले.  ते नाटक बघून प्रभावित झाले व त्या कथेवर सिनेमा बनवायचे ठरवून मुंबईला परतले.

पटकथाची जवाबदारी अब्रार अल्वी वर होती, पण त्याचे बंगाली खूप चांगले नव्हते, तेव्हा त्याच्या मदतीला आले कादंबरीचे लेखक बिमल मित्रा. त्या दोघांनी मिळून पटकथा लिहिली. त्या मागे एक वर्ष निघून गेले.

या आधी गुरुदत्तने 'कागज के फुल' चे निर्देशन केले होते व तो सिनेमा बॉक्स ऑफिस वर आपटला होता त्या मुळे त्यांचा  स्टुडिओ विकावा लागेल कि काय हि परिस्थिती झाली होती. त्या नंतर गुरुदत्तने ठरविले कि स्वतः ज्या सिनेमाची निर्मिती करणार त्याचे निर्देशन करणार नाही, म्हणून त्यांनी पुढील सिनेमा 'चौदहवी का चांद' चे निर्देशन मोहम्मद सादिक कडे सोपिवले आणि सिनेमा सुपरहिट झाला व त्यांचा स्टुडिओ वाचला.

आता साहिब बीबी और गुलाम च्या निर्देशनची धुरा कुणाच्या हाती द्यायची हा प्रश्न गुरुदत्त पुढे उभा राहिला. पटकथा लिहिणारे अब्रार अल्वीला च त्यांनी कैप्टन ऑफ शिप बनविले. कलाकारांची वर्णी हा सर्वात मोठा प्रश्न गुरुदत्त समोर होता. या भावनापूर्ण कथेसाठी मजबूत कलाकार हवे होते. साहेबाची भूमिकासाठी राजबिंडा चेहरा असणारा रहमान तर ठरलेला होता, पण बीबी आणि गुलामची भूमिका कोण करणार हे ठरत नव्हते. भूनाथच्या भूमिके साठी सर्वात आधी शशी कपूर निश्चित झाला, पण त्याचे नशीब खराब तो मिटिंग साठी अडीच तास उशिरा आला म्हणून त्याची हकालपट्टी केली. त्या नंतर या भूमिकेसाठी बंगाली नाटक मध्ये भूतनाथची भूमिका करणाऱ्या विश्वजित चॅटर्जीला बोलाविले. त्याने बंगाली फिल्म मध्ये त्याची लोकप्रियता वाढत असल्याने नकार दिला. त्याने हा सिनेमा केला असता तर साहिब बीबी और गुलाम हा त्याचा हिंदीचा पहिला सिनेमा असता. (त्या नंतर त्याने बीस साल बाद आणि एप्रिलफूल सारखे अनेक सिनेमे केले.) दोघांनाही नंतर वाईट वाटले असेल हे नक्की. शेवटी ही भूमिका गुरुदत्तने केली.

बीबीच्या रोल साठी लंडन मध्ये राहणाऱ्या छाया आर्यला बोलाविले, पण फोटोसेशन मध्ये ती फेल झाली. वहिदा रेहमान या रोल साठी उत्सुक होती. पण बीबीच्या खंबीर रोल साठी ती लहान आहे असे गुरुदत्तला वाटले म्हणून तिला हा रोल दिला नाही. तिला सिनेमा मध्ये जबाची भूमिका देण्यात आली. शेवटी ही भूमिका मीना कुमारीला देण्यात आली कारण या भूमिकेसाठी गुरुदत्तला तीच श्रेष्ठ वाटली. कमाल अमरोहीने विरोध केला होता, त्याच्या म्हणण्या अनुसार दारू पिणाऱ्या बायकोचा भूमिकेने तिची प्रतिमा खराब होईल अशे वाटले. मीना कुमारीने नवऱ्याचे म्हणणे ऐकले नाही कारण या आधी तिने अश्याच कारणाने देवदास मधील चंद्रमुखीची भूमिका गमावली होती. तिने ही भूमिका केली आणि ही मीना कुमारीच्या कारकिर्दीतली सर्वश्रेष्ठ भूमिका ठरली.

सिनेमाची सुरुवात वयस्कर दिसणाऱ्या भूतनाथ (गुरुदत्त) पासून होते. तो एका हवेली समोर उभा आहे आणि त्या भूतवाडा वाटणाऱ्या हवेलीला तोडून तिकडे नवीन इमारत बनवायचे काम बघत असतो. त्या हवेलीशी त्याचे खूप जवळचे नाते असते. त्याच्या समोर हवेलीच्या भूतकाळ उभा राहतो.

तो एका मोठ्या हवेली समोर उभा असतो. त्याचे भाऊजी मास्टर बाबू (कृष्ण धवन) त्याला त्या हवेली मध्ये असलेल्या चाळीत घेऊन जातात जिकडे हवेली मध्ये काम करणाऱ्या लोकांना राहण्याची व्यवस्था असते. भूतनाथसाठी मास्टर बाबू नोकरी पण शोधतात. मोहिनी सिंदूर बनविणाऱ्या ब्राह्मोसमाजी सुविनय बाबू (नाझीर हुसेन) कडे कारकून म्हणून कामाला लागतो. मोहिनी सिंदूर लावण्याने प्रेमिका व प्रेमी जवळ येतात असे सुविनय बाबुचे म्हणणे असते व बाहेर अशीच जाहिरात देत असतात. गावामधून आलेल्या भूनाथचा आहार जास्त असतो, पण कंपनी मधील महाराज कमी जेवण देत असतो , ही गोष्ट सुविनय बाबुला त्यांची मुलगी जबा (वहिदा रेहमान) कडून कळते. सुविनय बाबू महाराजला कामावरून काढून टाकतात आणि जेवण बनविणायची जवाबदारी जबा वर येते. जबा भूतनाथ कडे आकर्षित होते आणि भूतनाथला पण ती आवडत असते, पण दोघांमधून एकही याची वाच्यता करत नाही.

चाळीमध्ये भूतनाथ सालेबाबू म्हणून ओळखला जात असतो. तो रोज रात्री छोटे बाबू (रेहमान) ला बाहेर जातांना बघत असतो. एक दिवस त्याला हवेली मध्ये बोलाविले जाते. हे बोलाविणे त्याला छोटी बहू (मीना कुमारी) कडून. हवेलीचा बडबड्या नोकर बन्सी (धुमाळ) त्याला गुपचूप छोटी बहू कडे घेऊन जातो. छोटी बहूचे सौंदर्य बघून तो चाट पडतो. छोटी बहू त्याला मोहिनी सिंदूर बद्दल विचारते. ती लग्न करून आल्यानंतर तिचा नवरा छोटे बाबू तिच्या जवळ आलेला नसतो आणि त्याला आकर्षित करायला ती भूतनाथला मोहिनी सिंदूर आणायला सांगते. छोटे बाबू रोज रात्री बाजार मधील तवायफ (मिनू मुमताज, मेहमूदची बहीण) कडे जात असतो. मोहिनी सिंदूर चा छोटे बाबू वर काही परिणाम होत नाही आणि याने छोटी बहू सारखा च भूतनाथ पण निराश होतो. छोटी बहू आणि भूतनाथ मध्ये एक वेगळेच नाते तयार झालेले असते, ज्याला व्यक्त करता येणार नाही. ती स्वतःचे मनोगत भूतनाथ समोर च मांडत असते कारण हवेली मध्ये तिचे ऐकणारे कोणीच नसते.

ती छोटे बाबू साठी काही पण करायला तयार असते अश्यात छोटे बाबू तिला दारू प्यायला सांगतो आणि ती दारू पिऊ लागते. तिला दारूची सवय होते.

या दरम्यान सुविनय बाबुंचे मृत्यू होतो आणि मरायच्या आधी ते जबाला तिच्या बद्दल एक सत्य सांगून जातात. भूतनाथ छोटी बहूची स्थिती बघून तो दुखी असतो. त्याला कळत नसते कि तिने काय करावे कि छोटी बाहूची दारू सुटेल. सामंतवादी हवेली हळू हळू पतन कडे वळते. छोटी बहूचे काय होते? भूतनाथ काय करतो? जबा ला काय रहस्य कळले असते? या प्रश्नांचे उत्तरे तर हा सिनेमा बघितल्या नंतर कळेल.

सामंतवादी आणि इंग्रजांच्या पार्श्व्भूमीवर आधारित असलेल्या या सिनेमाला लगेच यश नाही मिळाले, पण क्रिटिक्सने या सिनेमाला क्लासिक चा दर्जा दिला. या सिनेमाला श्रेष्ठ सिनेमा, श्रेष्ठ निर्देशक, श्रेष्ठ नायिका आणि श्रेष्ठ सिनेमेटोग्राफी असे चार फिल्मफेर एवोर्ड मिळाले. या सोबत श्रेष्ठ सिनेमाचा राष्ट्रीय एवोर्ड पण देण्यात आला, एकेडमी एवोर्ड (ऑस्कर) साठी पण पाठविला गेला, पण तो एवोर्ड नाही मिळाला कारण असे देण्यात आला कि एका स्त्रीला दारूचे व्यसन आहे हे अमेरिकन कल्चर मध्ये लाजिरवाणे आहे. गुरुदत्तला याचे अजिबात वाईट वाटले नाही कारण ते कादंबरीशी इमानदार राहिले होते.

निर्देशक अब्रार अल्वी यांनी निर्देशित केलेला हा एकमात्र सिनेमा. त्याचे निर्देशन बघून अनेक फिल्मरसिकांचे म्हणणे होते कि हा सिनेमा गुरुदत्त यांनीच निर्देशित केला आहे, कारण शैली त्यांचीच होती.

या सिनेमा मधील हेमंत कुमारचे संगीत एकदम दर्जेदार होते. आशा भोंसले यांनी गायलेली 'मेरी बात राही मेरे मन में', 'मेरी जान ओ मेरी जान', 'सखियां आज मुझे निंद नाही आता' आणि 'भंवरा बडा नादान हाय' (हे गाणे माझे फेव्हरेट आहे). गीता दत्तच्या आवाजतली 'न जाओ सैयां, छुडा के', 'चले आओ' आणि एकदम सुमधुर 'पिया एसो जिया में समाई गयो रे' ( हे गाणे मीना कुमारी वर चित्रित केले आहे आणि या गाण्यात तिचे सौंदर्य इतके उठून दिसते हे शब्दांमध्ये नाही सांगता येणार)

या सिनेमा मध्ये हवेली मधील  मजले बाबूची भूमिका डी.के. सप्रू (नेहमी सेकंड लीड व्हिलन चे रोल करणाऱ्या तेज सप्रूचे वडील) ने निभावली आहे आणि क्रूर जमीनदाराच्या भूमिकेत ते शोभतात. तवायफची  भूमिका मिनू मुमताजने निभावली आहे. ही मिनू मुमताज म्हणजे मेहमूदचे बहीण. जबाची भूमिका वहिदा रेहमानने सुंदर रीत्या साकारली आहे, पण हा सिनेमा मीना कुमारीचा होता आणि तिच्या समोर सगळे फिके पडतात अगदी रेहमान आणि गुरुदत्त सुद्धा. या सिनेमा मध्ये त्या वेळेत असलेले कुरिवाज वर पण प्रकाश पाडला आहे. विधवा कश्या जगात होत्या हे अगदी एक दोन सिन मधून प्रभावशाली पद्धतीने दाखविण्यात आले आहे. सरोजिनी नायडूचे भाऊ हरिन्द्रनाथ चटोपाध्याय यांचा हा पहिला सिनेमा आणि या सिनेमा मध्ये अगदी दोन सिन मध्ये आले आहेत. त्या नंतर त्यांनी 'तेरे घर के सामने' सारखे यादगार सिनेमे केले. गुरुदत्तने पण उत्तम कामगिरी बजावली आहे, शशी कपूर त्यांच्या इतका प्रभावशाली भूतनाथ साकारू शकला नसता असे मला पण वाटते. सी. एन. एन. ने श्रेष्ठ पंचवीस एशियन कलाकारांची यादी बनवली आणि त्या यादी मध्ये अमिताभ, प्राण, नर्गिस सोबत गुरुदत्तचे पण नाव आहे.

कादंबरीवर आधारित चांगला सिनेमा बघायचा असेल तर हा सिनेमा युट्युब वर बघता येईल.

 

ज्योतिन्द्र मेहता 

इतर रसदार पर्याय