खौफ की रात - भाग २ jay zom द्वारा भयपट गोष्टी मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

खौफ की रात - भाग २


खौफ की रात

भाग 2

....

लेखक: जयेश झोमटे..

हिंस्त्र श्वापदाच्या मृत्यूच्या जबड्यात किश्याचा मित्र अडकला होता.

त्याची मदत करण्यासाठी किश्याने एक पाऊले पाऊले वाढवली होती- !

पाउले वाढवताच त्याला आपल्या मित्राच रक्ताने माखलेला निर्जीव प्रेतमय चेहरा दिसला.

त्या चेह-यावरचे निर्विकार भाव आणी ते प्राण नसलेले डोळे एकटक त्याच्यावर स्थिरावले होते.
किश्याचा मित्र केव्हाच राम नाम सत्य झाला होता..
आता जर किश्याने त्या हिंस्त्र श्वापदाला डीवचल..तर तो मूर्खपणा होईल..नाही का ?
किश्याने दबक्या पावळांनी मागे मागे जायला सुरुवात केली. पाउले जरी मागे जात असली तरी त्याच सर्व लक्ष पुढे... आपल्या मित्राच्या प्रेतावर ताव मारणा-या त्या हिंस्त्र श्वापदावर होत .

मांसाचा लचका तोडण्यासाठी
ते वाकडतिकड मान वळवत होत..

जिभळ्या चाटल्याचा मांस कच कच खाल्ल्याचा आवाज घुमत होत.


शिकार केलेल्या भक्षाच मांस खाण्यात तो ब्लैक पेंथर इतक गुंतला होता की मागच शिकार हाताततून निसटून जात आहे हे सुद्धा तो विसरला होता..

जरा दूर आल्यावर , ....
किश्याने सावधानता बाळगुन शेवटी आपल्या जिवाचा विचार करुन थेट पळ काढला
अंधा-या रात्री काट्या कूट्यातून तो धावत पळत होता.

त्या भीतीच्या तंद्रीतच त्याने एक चुक केली होती.
जी त्याच्या ध्यानीमणी नव्हती.
ती म्हंणजे गाळपुरच्या शार्टकट रसत्याने तो गेला होता...

जो की कोहराम कब्रस्ताना आतून जात होता

अखंड भीतीपोटी मणुष्य एकवेळ बावरल्यासारखा, वेड्यासारखा वागु लागतो.

भीती ही मेंदूला अक्षरक्ष मुळापासुन
अशी काही जखडून ठेवते की मानवास स्वत:च निर्णय सुद्धा घ्यायला वेळ मिळत नाही.

किश्या अंधा-या वाटेने अक्षरक्ष जीव तोडुन पळत होता. खाली पाय वाटेत येणा-या खडे, साप,विँचु,ह्या सर्वांना अक्षरक्ष तुडवत होता.पंधरा-विस मिनीट अफाट वेगाने पळून झाल्यावर किश्याला धाप लागली , छाती कशी हवा भरलेल्या फुग्यासारखी फुगत होती, श्वास बाहेर पडताच खाली होत होती.

भीतीने कानसुळ्या गरम झाल्या होत्या. हाता पायाला कंप सुटलेला हात थरथरत होते. काहीक्षणापुर्वीच आपल मित्र जिवंत होता. दोघेही छान मस्तपैकी बोलत होते .

पन अचानक त्या अशुभ जागेच विषय निघाल. नी पुढे काय घडल? जणु त्या जागेच नाव सुद्धा अपशकुनी असाव ?
ह्या सर्व घटनेतून एक बोध मिळत, म वेळ काल कस बदलेल कोणिच सांगू शकत नाही! मृत्यु कोठुन कसा येईल, कोणत्या रुपात येईल घात घालेल ..समजन अवघड आहे. दोन मिनीटा अगोदर आपला जिवाभावाचा मित्र आपल्या सोबत होता.आणि आता ह्याक्षणी तो आप्ल्याला सोडून गेला होता.नियतीचा किती विलक्षण खेळ!नाही का? किश्याला हुंदका आवरत नव्हता, त्यातच त्याने आपल पुर्णत शरीर सैल सोडल .आणि धप्पकन खाली बसला., खाली बसताक्षणीच एक विशिष्ट प्रकारचा फळीवर बसल्यासारखा आवाज झाला. त्या आवाजाचा किश्याच्या दोन्ही कानांनी अचूकवेध घेतला, आणी त्याने हळकेच आपल्या एका हाताने खाली काय आहे ते चाचपडायला सुरुवात केली , हाताला काहीतरी फली सारख लागल. त्यासरशी किश्याने गर्रकन आपल डोक खाली वळवल , तसा तो खाडकन जागेवर उभा राहिला .. विस्फारलेल्या नजरेने एका वेड्या सारखा आवासलेल्या अवस्थेत चारही दिशेना जागेवर लोटांगन घालत पाहू लागला. त्याच्या नजरेस चारही दिशेंना मेलेल्या मृत, प्रेतांच्या सफेद लाकडाच्या,मागे क्रॉसच्या आकाराच्या कब्र दिसुन येत होत्या . शेवटी तो त्या कब्रस्तानात पोहचलाच होता . किंवा आणलं होत त्याला? ज्या जागेवर जायला नको होत. शेवटी तो तिथेच
पोहचला होता. किंवा पोहचवला होत त्याला ? एक खाद्य , एक सावज बनवुन? भयाने अक्षरक्ष पिसाळलेल्या कुत्र्यासारखा किश्याला चावा घेतला होता.ज्या कब्रस्ताना बदल किश्याने गौडबंगाळ अघटीत, अक्ल्प्नीय वार्ता ऐकल्या होत्या, त्या अक्षरक्ष मेंदूच्या फुटेजने कोरुन, कोरुन वर वर काढून उफाळून डोळ्यांसमोरुन घालायला सुरुवात केली होती.किश्या आजुबाजूला भेदरलेल्या अवस्थेत पाहत होता, त्याच्या नजरेस फक्त कब्र नी त्या क्ब्रेजवळून जाणार सफेद धुक दिसत होत. रात्रीची स्मशान शांतता जिवघेणी होती. आता कब्रस्तानच ते मानवी अंश कोठून येणार तिथे? अंग गोठावणार थंडावा हाड मांस गोठवत होता, डोक दुखवत होता. किश्याची भेदरलेली नजर चौहीदिशेना घुमत होती.की त्याच्या नजरेस एका क्ब्रेवर एक कंदिल आणि माचिस बॉक्स दिसला.कोणि ठेवला होता पन? तो त्या कबरीपाशी पोहचला .मग
त्याने तो कंदिल माचीस द्ववारे पेटवून घेतला. मग हळुच तो पेटता कंदील आप्ल्या चेह-या जवळ आणला. नी त्या कंदिलाच्या तांबड्या प्रकाशात काही दिसत का ते पाहू लागला.त्याच्या भेदरलेल्या चेह-यावर तो तांबडा प्रकाश पडत होता.त्याच्या त्याच चेह-या मागे उज्व्या बाजुंनी जेमतेम पन्नास मीटर अंतरावर एक मोठ झाड दिसत होत. त्या झाडाजवळून ते श्रापीत धुक लहरींप्रमाणे वाहताना दिसत होत.नी त्याच धुक्यात एक पांढ-या फट्ट चेह-याच्या स्त्रीची ? ती नक्की स्त्री होती का? नाही म्हंणजे स्त्री मानव ह्या सजीवांच्या प्रजाती आहेत! नाही का? बर पुढे पाहू. ती स्त्रीआकृती दिसुन येत होती. तिच्या अंगावर एक ढगाल काळी मेक्सी होती. ज्या ढगाळ काळ्या मेक्सितुन तीचे ते हाडकुले पांढरेफट्ट हात बाहेर आले होते. हाताच्या पंज्यांची ती नख , सामान्य नसुन वाढलेली होती.टोकदार होती. अशी की कोणाच्या पोटात घुसवली तर थेट पोटात घुसणार. तिच्या त्या उभट पांढ-याफट्ट चेह-यावर निस्तेज भाव होते. ते दोन पांढरट बुभळ, त्यात एक बिंदूएवढा काळा टीपका एकटक किसन्याच्या पाठमो-या आकृतीला.पाहत होते. ते ध्यान किश्याची उपस्थीती जाणुन होत. पन किश्याच काय? तो तर अनभिज्ञ होता. न जाणता होता.परंतु निसर्गामार्फत मानवी देहाअंतर्गत दिलेल्या काही विशीष्ट प्रकारच्या इंद्रियांना, चेतातंतुना संदेश मिळाला..ज्या मार्फत त्याला कसलीतरी चाहूल लागु लागली होती. त्या निर्जीव शांततेत, आजुबाजुला वाहणा-या धुक्यात आपल्या मागे कोणितरी उभे आहे! जे एकटक आपल्या कडेच पाहत आहे.त्याच्या मनात काय असेल? त्याच आपल्यावर हल्ला वगेरे करण्याच काही मानस तर नसेल ना? ह्या कब्रस्ताना बदल ऐकल्याप्रमाणे काही विचित्र, अभद्र, ब्याद आपल्या मागे ऊभी तर नसेल? किंवा तोच जंगली श्वापद मागे येऊन ठेपला असेल तर? ते ध्यान त्या झाडाखाली उभ होत.चेहरा जणु स्मशानातल्या कोण्या मृत प्रेताची राख फासल्या सारखा पांढ़रा होता, ओठांना कालपट विष फासल होत, डोळे पांढरट,नी त्यात एक काला टिपका होता, ऊंची सामान्य मणुष्याला लाजवेल अशी आठ नऊ फुट इतकी मोठी होती.एकवेळ जनावर सुखाच मरण देइल हो! पन ती अतृप्त शक्ति? , जनावराच्या कृत्याला ही लाजवेल ती अमानवी शक्ति, कधीच सुखाच मरण देऊ शकत नाही. सावजाला तडफन, तडफवुन मारतील त्याच्या दयनीय अवस्थेवर तोंडात बोट घालुन दात विचकत फ़िदिफ़िदि हसतील! किती ते अमानुष कृत्यअवेचना. म्हणुन अस म्हंटल जात, की जनावर परवडल परंतू ह्या तामसी शक्ति नको. किश्याला चाहूल लागताच त्याने कंदिल मागे-मागे वळवायला सुरुवात केली. आंणि थरथरत तो मागे वळला.. वळताच प्रथमत्याच्या नजरेस धुक्यात अंधुकशी एक एक काले कपडे घातलेली आकृती दिसुन आली. किश्याची त्या आकृतीवर नजर जाताच त्या आकृतीने आपल्या शरीराची हालचाल करत . आपली पाउले उजव्या बाजूला वळवळी आणि त्या झाडाच्या खोडा मागे गेली.
" को ..को....कोण हाय..? "
किश्याच वाक्य त्या पुर्ण कब्रस्तानात घुमल. थंड हवेच्या झोकांमार्फत विव्हल,आवाज दुर घेऊन जाण्याची विशिष्ट प्रकारची शक्ति असते.तिच ह्याला कारणीभुत होती. त्याच वाक्य पुर्ण होताच.वातावरणात खिदळून हसल्यासारखा आवाज घुमला.

" खिखिखीखिखिखीऽऽऽऽ"

क्रमश

लवकरच भेटु पुढील भागात !

तो पर्यंत वाचत रहा , भीत रहा ! ...