खौफ की रात - भाग ४ jay zom द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

खौफ की रात - भाग ४


भाग 4

....

लेखक: जयेश झोमटे..

........


घुबड , निसर्गामार्फत तैयार झालेल एक पक्ष्याच रुप ! पन ह्या पक्ष्याबद्दल समाजात कितीतरी अभद्र तर्क

आस्तित्वात आहेत ! नाही का?

त्याच स्पष्टीकरण तर इथे द्यायलाच नको.

पन त्या गोष्टींत किती तथ्य आहे ?
सत्य की असत्य?
हे कोणालाच ठावूक नाही !

ते सत्य ? की असत्य ? हे एक कोडच आहे ! विज्ञान त्याच्या दृष्टिने तर ते तर्क खोटेच आहेत ..म्हंणायला ते तो मानतच नाही !

माझ्या मते प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात .
चांगली- वाईट, पाप-पुण्य !

एकंदरीत सांगायच झाल तर , विज्ञानाने आजतागायत कित्येक तरी शोध, गुढ , रहस्यमयी गोष्टींच उलगडा केल आहे....करत आहेत .

पन ह्या भुतळावर अश्या काही रहस्मयी गोष्टी आहेत ! असे काही रहस्यमयी गुढ आहेत , की जे कायमचेच गुढहिंत आहेत ,आणि त्या गोष्टींच गुढ हे विज्ञानाला सुद्धा कधीच न उलगडता न येणारी बाब आहे !

विज्ञानाला सुद्धा काही सीमेंवर गुढघे टेकायला लागतात ! कारण प्रत्येकाला सीमा आहे , जी तो ओलांडू शकत नाही ! .

दिवस उजाडून गेल्यावर..उगवलेल्या ह्या अंधाराच्या असीम सीमेपल्याड न जाणे कोणाच जग आहे ? ह्या अंधारात मानवी नजरेआड काय वावरत असेल ! हे मानवाला तरी ठावूक आहे का ?

विज्ञानाची शक्ति विरूद्ध अमानवीय जादू टोणा, करणी भानामती , मुठ मारण , तंत्र-मंत्र हे जर खर आस्तित्वात असतील ,

तर मग हे मान्य करावंच लागेल..

की नक्कीच त्या कब्रस्तानात वावरणा-या घातकी तामसी ..सैतानाने आपल्या अमानवी शक्तिमार्फत निसर्गाने तैयार केलेल्या पक्ष्याच ..एक हिडिस नकली रुप तैयार केल होत. ..

आणी आपल्या सावजाला घाबरवण्यासाठी त्याच वापर सुरु होत..

कारण भीती हेच सुख, भीती हेच आनंद,आणि भीती हेच त्याच कुराख होत.


किश्याने त्या घुबडाला हाकलण्याचा पुरेपूर प्रयत्न केल..! दम दिल, हाकरल, शेवटी दगड मारून सुद्धा पाहिली...पन ते ध्यान काडिचाही न हळता ढब्बू सारख तसंच बसल होत.

त्याच्या गारगोटी काचेच्या लालसर टीपका पिवळेजर्द चकाकत्या बुभळांनी एकटक किश्याच्या

नजरेस नजर भिडवत होत.
ती शुन्यातली थंड नजर ..एन थंडीत किश्याच्या मानेवरचे केस ताठरून गेली..

मनात भीतीचा स्फोट झाला.
लहान लहान भीतिच्या जिवानुंनी मनावर अमळ चढवायला सुरुवात केली....मेंदूला बधिरता आली..

शेवटी भीतीपोटी त्याने हार मानली ..आणी जायला गर्रकन मागे वळला..

आणि जस तो वळला..

त्याच्या एका गिरकीनेच सर्वकाही बदल्ल होत.
विज्ञानाच्या तर्काना एक हादरा बसला, विश्वास अविश्वासाचा कल्लोळ माजला...

किश्या मागे वळताच..
मागुन एक छद्मी हास्य ..आणी हास्याला जोड म्हंणून एक किन्नरी स्वरातला आवाज आला. किश्याचे डोळे विस्फारले.


" ए माटळ्या, .....!"


माटळ्या ही हाक काहीवेळा अगोदर मेलेला धाऊ हाच त्याला मारायचा. त्याच्या व्यतिरिक्त कोणालाही ते नाव ठावुक नव्हत.

" ध...ध..धाऊ ? कुठ आहेस तु?" किश्याची पावल जागेवर थांबली.

पुर्णत कब्रस्तान दुर दुर पर्यंत तो पाहू लागला. जर धाऊ त्या काळ्या श्वापदाकडून सुठला असेल.तर तो इथेच कुठे तरी रक्तबंबाळ अवस्थेत पडला असला पाहिजे. त्याला आपली मदत हवी असेल!" किश्याचे मनोमन विचार.

" अर ए रां××च्या ! इकड तिकड कुठ पाहतो आहेस. इथ वर बसलोय की मी. दिसत नाही का तुला माटळ्या?फिफिफी! खिखिखी..." पुन्हा तोच किन्नरी आवाज आला ...

वर ह्या शब्दांसरशी किश्याने एकवेळ खाली पाहील. हिरवगार गवत , त्यावर त्या मूर्तींचे पांढरे फट्ट पाय दिसत होते. हळुहळु किश्याने मान वर वर आणायला सुरुवात केली. पाय, पुढे कंबर, नी मग हात-डोक, अर्थात शेवटला दिसल ते डोक, नी बाजुलाच खांद्यावर बसलेल ते घुबड जे एकटक किश्याकडेच पाहत होत.
" ध..ध...ध..धाऊ.?" किश्याने चेंडू एवढ्या मोठ्या झालेल्या नजरेने त्या घुबडाकडे पाहिल.

नी पुढे अस काही घडलं ..की ज्याने किश्याच काळीजच पिळवटून गेलं.

" हिहिहिहिही! व्हय!" त्या घुबडाचे लालसर टपोरे डोळे क्षणात एका भयरचनेने भगव्या रंगाने लकाकले. नी त्यातला तो काळा टीपका मात्र अगदी गडदकाळ्या रंगातच दिसत होता. किश्याचे अवसान गळायला अजुन काय , हव होत? हे कब्रस्तान झपाटल आहे ?

मानवाची तर्कशक्ति ज्या पटलावर येऊन अंत पावते. त्या पुढे फक्त माईंड - कल्पनेच मार्ग सुरु होतं. ज्या कल्पनांत ह्या अशा अतर्कनीय गोष्टींचाही समावेश होतो.भुत,पिशाच्च, हड्ळ..!

किश्याने विस्फारलेले डोळे दोन्ही हाताने चोळले.

एकवेळ कानांनी ऐकलेला आवाज अविश्वासनिय , खोट ठरू शकत होत ! पन डोळे? डोळयांनी पाहिलेल द्रुष्य कस फसव असेल?

समोर घडणारी घटना किश्याच मन मानायला तैयार होत नव्हत..की हे सत्य आहे ...थेट घडत आहे .

" फाटली का किश्या फाटली का? रांxxच्या खिखिखिखी , मला सोडून आला ना तू माटल्या आता मी तुला घेऊन जायला आलो ...म्ला जोडीदार पाहिजे ...म्ला जोदिदार पाहिजे..खिखिखिक्जिकीखीक्जी...!" त्या अमानविय ध्यानाचा जबडा बोलतांना कसतरीच वाकडातिकड हळत होत.

नैसर्गिक गुणांनी बनलेल्या पक्ष्याची ..त्या
अनैसर्गिक शक्तिने काय हाळत करून ठेवली होती..खुळेआम थट्टा मस्करी सुरु होती ही तर !

किश्याची पावळे मागे मागे जाऊ लागली..
त्याच्या पायाच्या पंज्यावर पर्यंत धुक्यांची मंद लाट वाहत जात होती.

दूर दर पसरलेल्या पांढरट कबरी मैताचा पांढरा कपडा घेऊन शांत झोपल्या होत्या..

त्यातल्याच एका कबरीतल्या ध्यानाने उठून किश्याच पाऊल पकडल..

खाली धुक्यात बुडालेल्या किश्याच्या पावळास , त्याच धुक्यातून बाहेर आलेल्या त्या हिरव्या रंगाच्या पंज्याने पकडल .

सामान्य मानवी पंज्या पेक्षा मोठ, हिरव्या रंगाच्या त्वचेच, हाताची बोट लांबसडक , त्यात जणू मोठाली हाडे होती..त्यांवर फक्त मांस चिकटलेल..

नख अशी काही धार धार होती की किश्याच्या पायाची त्वच्या फाडून मांसात रूतली ..

लालसर रंगाच रक्त ओघळू लागल..

" आह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह! " वेदनेने कळवलत किश्याने जमिनीच्या दिशेने पाहील..

खाली पाहताच त्याला तो अभद्र पंजा दिसला..
वेदनेपोटी त्याने दुस-या पायाचा पंजा त्या हाताच्या पंज्यावर मारल..

चार- पाच लाथा हानताच त्या पंज्याची पकड सुटली..

पकड सुटताच त्याने खालून नजर काढुन घेत थेट वळुन समोर पहिल..!

नी तेवढ्यात...



तेवढ्यात हवेच्या वेगासरशी समोरुन धुक्याला हवेत उडवत एक पांढरट रंगाच नग्न प्रेत धप, धप, वेगाने धावत किश्याच्या दिशेने आल.

त्या प्रेताचा चेहरा काळा निळा पडला होता. डोक्यावरचे वाढलेले केस दोन्ही बाजुंना भांग पाडले होते...आणी तेच केस खांद्यांवर लोंबत होते..

किश्याचे अर्धवट डोळे विस्फारले होते..

त्याच क्षणाला..

" खिखिखिखिखी!" लहान मुलांच्या खेळण्यातल माकड दोन्ही हातांनी एकासुरात थाली वाजवाव तस तो ध्यान हसला..

आणि धावता धावता किश्याजवळ पोहचताच त्याने त्याच्या हाडकूल्या नासलेल्या हातांना पुढे आणत ..थेट किश्याच्या छाताडावर दोन्ही हातांनी एक धक्का दिला.

वेग नी शक्तिची आघाती मर्यादी मानवी शक्तिला तोडणारी होती, अमानवी शक्ति होती ती....

.

.त्या प्रहाराने किश्या अक्षरक्ष हवेत उडाला नी त्याचक्षणी त्याच्या हातून तो कंदील मागे जात मागे असलेल्या झाडावर आपटला ...

किश्या सुद्धा त्याच झाडावर पाठमो-या अव्स्थेत डोक्यावर आपटला..

डोक्यावर झालेला प्रहार हा मेंदूवर होता..

ज्याने त्या माराने त्याचे डोळे
काहीक्षण आंधळे झाले.

डोळयांच्या उघड्या बुभळांसमोर काळी ,निळ्सर,पिवळी रंगछटा उमटल्या...वाकडीतिकडी वर्तुळ, गोल गोल चक-या दिसू लागल्या..

त्याच्या ह्या वेदनादायी अवस्थेत बाजुलाच फुटलेल्या कंदीळातुन रॉकेल जमिनिवर आणि झाडावर उडालेले... जे की पेटलेल्या वाती मार्फत ...सर्रकन रेषेत पेटल..आणी झाडाला आग लागु लागली.

सरकन एका रेषेत झाड खालून वर पर्यंत पेटल गेल.

डोळे मिचकाऊन किश्या आपली दृष्टी परत आणण्याचा प्रयत्न करत होता .एक दोन वेळा डोळे मिटून,बंद करताच नजरेस सर्व काही दिसु लागल.
डोळ्यांची दृष्टी परत आली, आणि पेटलेल्या झाडाची आग जशी शरीराला जाणवू लागली, त्यासरशी त्याने लागलीच मागे वळूण पाहिल.
मागे अक्षरक्ष निखा-यांची चिता जळावी तस झाड चट, चट आवाज करत जळत होत. झाड कोणत्याही क्षणी जळुन जमीन दोस्त होणार हे
किश्याला.कळुन चूकतात त्याने लहान मुलासारख लागलीच गुढघ्यांवर रेंगाळतच झाडापासुन दुर जाण्यास सुरुवात केली. तेवढ्यात त्या जळणा-या झाडामागुन एक काळ्या रंगाचा , धार धार नख असलेला पंजा पुढे-पुढे येऊ लागला, त्या प्ंज्याने साप ज्याप्रकारे आपल्या मुखाने उंदराला पकडाव त्याचप्रकारे किश्याच्या पायाला पकडल , किश्याच्या पायाला कसलातरी थंड स्पर्श जाणवु लागला , कोणीतरी थंड हाताने पाय पकडल असाव असे.त्याने लागलीच मागे वळून पाहिल .नी त्याला तो अकल्पित मानवाच्या सामान्य कल्पनेला कलाटणी देणारा ह्दयद्रावक द्रुश्य दिसला. भल्यामोठ्या काळ्याकुट्ट धारधार नखांच्या हाताने त्याच पाय पकडल होता, जणु काळ्या सर्पांच्या मुखात अडकल्या सारखा.
किश्याची नजर त्या हाताच्या पंजावर टिकून होती, नी त्याचवेळेस त्या जळना-या झाडामागुन एक अर्धवट चेहरा बाहेर आला, पांढरा फट्ट
चेहरा , विषासारखे चॉकलेटी ओठ, किश्याची नजर त्या झाडामागुन आपल्या दिशेने वाकुन पाहाणा-या त्या सैतानावर पड़ताच त्या सैताच्या कालपट ओठांवर एक दात विचकणार हास्य पसरल, काळ्या रंगाचे ते किडलेले दात नी लाल रंगाची टोकदार जीभ .हे असल कधीही न अनुभवलेल दृश्य पाहुन किश्याची बोबडी वळली, भीतिने अशी काही गाळण उडाली की मुखावाटे एक शेवटची आर्त किंकाळी निघणार की तोच त्या सैतानाने दात विचकून हसत आपल्या अमानवी शक्तिने किश्याला अलगद त्या जळणा-या झाडाकडे ओढल. किश्याच्या त्वचेला ज्यासरशी आगीचा स्पर्श झाला , तशी ती त्वचा गळून पडु लागली.
मांस जळाल्याचा, केस जळाल्याचा, आणी किंकाळ्या फुटणा-या आवाजांनी तो कोहराम कब्रस्तान दणाणून निघू लागला...!

" आह्ह्हह्ह अह्ह्ह वाचवाहाहाहssss!"

हळू हळू आवाज कमी कमी होत गेला शांततेने पुन्हा एकदा आपली जागा घेतली..होती.

काहिवेळाने

रातकिडे किरकिर करू लागले होते ..पेटलेल..झाड जळुन खाक झाल होत..
झाडाची जळून झालेली पांढरट राख त्या राखेतच किश्याच अर्धवट जळालेल धड जसच्या तस तिथे पडलेल दिसत होत...

क्रमश :



क्रमश : ...

सुरुवात..... नव्या पर्वाला.....

नेकस्ट एपिसोड.. दर एकदिवसाआड एक भाग पोस्ट होइल..धन्यवाद
क्ंमेंट रेटिंग नक्की द्या.
कथा आवडल्यास फॉलो , स्टिकर नक्की द्या !.