Kouff ki Raat - 5 books and stories free download online pdf in Marathi

खौफ की रात - भाग ५

भाग ५सदर कथा काल्पनिक आहे !
कथेत भुत ,प्रेत अमानविय शक्तिंचे उल्लेख आहे .
कथेत अंधश्रद्धा आहे परंतू लेखक तिला खतपाणी घालत नाही ... गरज असल्याने तिच वापर केल गेल आहे कृपया भयरसिकांनी कथा आन्ंद मिळाव ह्या उद्दीष्टाने वाचावी .

धन्यवाद...

नवे पर्व सुरु ....

खुप वर्षानंतर .....

वर्ष 2000

थंडीच्या महिन्यातली अमावास्याची काळी रात्र झालेली ...

त्या अमावास्याच्या रातीने आज चंद्राच्या प्रकाशित कायेला आकाशात पसरलेल्या काळ्या ढगांनी आपल्या कालमुखात सामावुन घेतले होते.

.अमावास्या असल्याने
आज चौही दिशेना असा काही अंधार पसरलेला , की त्या अंधारात एकटक टक लावुन पुढे पाहणा-या त्या काळ्या मांजरीस काहीतरी दिसत होत. काय बरे ?

मानवाची कल्पना कधीही तिथपर्यंत पोहचु शकत नाही, असं दृश्य ती काळी मांजर आपल्या पिवळेजर्द वटारलेल्या खूनशी डोळ्यांनी अंधारात पाहत होती.

सामान्य नजरेस पुढे पाहता फक्त काळोख ,धुक दिसुन येईल परंतु त्या मांजरीत असलेल्या विशीष्ट प्रकारच्या शक्तिने तीला त्या कालोखात काहीतर वेगळच रुप दिसत होत.

त्या काळ्याअंधारात पसरलेल्या हाड गोठावणा-या थंडीतल्या धुक्यात , मानवाच्या शरीराच्या आकाराची नक्कल केलेली एक धुक्याच्या पुंजक्याची काळी सावली दिसुन येत होती.

डोळे वटारुन तर कधी
तोंडावाटे गूरगूरत ती मांजर त्या अमानवी लहरींना जणु सुचित करत होती

" की दूर व्हा ह्या जागेतुन! ही जागा तुमची नाही..निघुन जा.."


रातकिंड्यांची किरकिर कानांत स्मशान शांततेला भेदून जणू पैंजणांसारखी वाजत होती.

पांढरट रंगाच धुक जस मेलेल्या प्रेताच
म्ह्ड झाकत, त्या प्रकारे आजुबाजुचा परिसर झाकत होता.

थंडीचा मारा देहावर असा काही घर्षन करत होता,

की ती थंडी हाड मांसात घुसून
गरम रक्त गोठवत होती.


एक मातीने बनलेला सोनेरी रंगाचा रस्ता दिसुन येत होता...

तो मातीचा रस्ता पुढे-पुढे जात,रस्त्याच्या बाजुला एक फळा दिसुन येत आहे

त्या फळ्यावर मोठ्या अक्षरात काळ्या पेंटच्या रंगाने गावच नाव लिहित होत,( रामपुर)त्या फळ्यापासुन जेमतेम वीस मिनीटांच्या अंतरापुढे रामपुर गाव वसलेल.

फळ्याजवळून पाहता पुढे अंधारात गावातल्या घरांबाहेर पेटलेल्या पिवळ्याजर्द बल्बचा प्रकाश दिसुन येत होता,

परंतु त्या प्रकाशात मानवाचा अंश नव्हता.

जणु गावात कोणी मेल असाव? आणी म्हंणूनच त्या प्रेताच्या घरात गावातली सर्व माणस जमली असावीत ...

मोठ-मोठ्याने हेळ काढून रडत असावीत.

तिरडीवर झोपलेल्या प्रेताच्या नाकात कापूस घातला असावा थोडस उघडलेल्या तोंडात ओठांवर तुळस ठेवलेली असावी ..

तिरडीजवळ हळूवारपणे धुर निघणार धुंदेरा मडक ठेवल असाव....

भयंकर कल्पना अक्षरक्ष अंगावर काटा आणणारी कल्पना.

माणुस मेल की गावात काहीवेळापुर्ती एक विलक्षण शांतता पसरली जाते.

त्या शांततेत टाळांचा आवाज ऐकू येतो , जर अंतयात्रा रात्री निघाली असेल तर कधी केव्हाणा कुत्र्यांच्या रडण्याचा आवाज सूद्धा येतो ...आणी ती अनुभवण्याची भीति शब्दांत वर्णन करणे नाही..

रामपुर गाव तस म्हणायला दिडशे - दोनशे घरांच गाव होत.गावातली मुल-मुली शाळेला-कॉलेजला जात होती,

गावात लाईट, फोन, टीव्ही, इंटरनेट , इत्यादी सर्व तंत्रज्ञान युक्त गोष्टींचा ठेवा होता.

म्हणायला गावकाही अडाणी नव्हत, शिकल सवरलेल होत .

रामपुर गावात मधोमध एक मोठ वडाच झाड होतं .

वडाच्या झाडाची आकृती , त्या चित्रविचित्र खाली लोंबणा-या फांद्यांमुळे अंधारात काही वेगळीच दिसत होती.

एका अजस्त्र अवाढ़व्य काळोखाच्या सैतानाची भलीमोठ्ठी मूर्तीच असल्यसारखी . गावक-यां नी वडा खाली बसण्यासाठी एक गोल सिमेंटचा कठडा बनवला होता.

त्या कठड्यावर एक मानवाची , हात कठड्यावर ठेवलेली, पाय कठड्यावरुन खाली सोडून बसलेली , एक आकृती दिसुन येत होती.

त्या अनोळखी इसमाच्या अंगावर एक गुलाबी रंगाचा शर्ट होता, खाली एक काळी पेंन्ट व पायांत पैरागॉन होती.


सफेद व निळ्या रंगाची चप्पल, ती चप्पल थोडी मळलेली होती

.त्या इसमाचे केस वाढलेले होते, न्क्की पाहता केस वाढलेले होते की वाढवलेले होते हे त्यालाच ठावूक.!

तसंही आजकाल केस वाढवण्याची फेशनच झाली आहे आणि ते वाढलेले केस तोंडावर आल्यावर दरवेळेस स्टाईलने मागे सारायची सूद्धा!

तो इसम सुद्धा आपले वाढ़लेले ते काळ्या रंगाचे केस तोंडावर येताच बाजुला सारत होता.

ह्याचा अर्थ त्याने हे केस नक्कीच स्टाईल साठी ठेवले होते ..

वाढलेले केस तोंडावर येत होते आणी ते आले की हा हाताने बाजुला सारत होता .

त्याची हीच क्रिया पुन्हा -पुन्हा घडत होती. अशातच काहीवेळ निघुन गेला.

त्या इसमाने आपल्या हातांनी वाढलेले केस डावी-उजवीकडे वळवले आणि शर्टच्या खिशात हात घालून एक सफेद रंगाची गोल्ड फ्लैक सिगारेट बाहेर काढली,

मग ती सिगारेट तोंडात ठेवून दोन्ही हातांवाटे लाईटर चाचपडू लागला.
पेंटच्या खिशात लाईटर मिळाला, लाईटर हातात घेऊन तो पेटवुन तोंडाजवळ घेऊन जात सिगारेट पेटवली.

सिगारेट पेटवून त्या इस्माने लाईटर पुन्हा खिशात ठेवला. मग डाव्या हातात सिगारेट पकडत एक-एक झूरका मारु लागला.

प्रत्येक झुरक्याला ती सिगारेट निखा-यांसहित चमकली जात होती.

त्या चमकणा-या लहान उजेडाला पाहून जणु अंधारात काही गोडबंगाल चमकत आहे काहीतरी अपवित्र , अपशकुनी असं वाटत होत.

सिगारेटच्या मारलेल्या झूरक्यांसहित ती सिगारेट पेटली जात , त्या इसमाच्या नाका -तोंडावाटे सफेद धुर बाहेर पडत होत,

आणि बाहेर पडून त्या थंडगार धुक्यात मिसळत होत.

त्याची हीच क्रिया पुन्हा घडत होती.

सिगारेटच धुर तो आत घेत होता, आणि ती सिगारेट त्या युवकास आतुन नासवत होती.

त्याच्या शरीरात जाऊन फुफ्फुसे नासवत होती.

सिगारेट पिणा-यास जरी वाटत असेल की आपण तीच प्राशन करत आहोत पीत आहोत, तर ते साफ चुकिच आहे , उलट सत्य हे अकल्पित असत्या उलट आहे , की ती सिगारेट तु पीत नाहीस तर सिगारेट तुला पीत आहे मुर्खा , मृत्युच्या मिठीत, त्या खोल कालोख्या दरीत ढकलत आहे.

असो पुढे !

तो इसम सिगारेट पीत बसला होता, आणि इकडून धुक्याला बाजुला चिरत एक टूव्हीलर हेडलाईट, इंजीनचा खर-खरता आवाज करत त्या वडाच्या कठड्यापासुन थोड दूर येऊन थांबली.

टुव्हीलरची पुढची लाईट चालू होती, त्या लाईटचा पिवळसर प्रकाश त्या इसमाच्या चेह-यावर पडलेला ,

ज्याने इतकवेळ त्या इसमाच तोंड दिसत नव्हत, ते आता त्या लाईटच्या प्रकाशात दिसुन आल होत.

v आकाराचा चेहरा, वाढलेली दाढी, आणि चिनी गोटीसारखे डोळे.
" कोण हाय रे झाकणझुल्या, लाईट बंद कर?"

चेह-यावर हात ठेवून तो इसम म्हणाला.

त्याला नक्कीच त्या हेडलाईटच्या प्रकाशाच त्रास होत असणार. त्या इसमाच्या तोंडून वाक्य उच्चारल गेल त्याचक्षणी टूव्हिलरच्या इंजीनच्या खर-खरण्याचा व पुढील हेडलाईटचा प्रकाश बंद झाला.
" अर ए निळ्याचंद्र (निळचंद्र) ! अर इथ काय करतुस लेका?"
समोरुन चालकाचा आवाज आला.

अच्छा तर मित्रांनो हा आहे निळचंद्र उर्फ

निळ्या रामपुर गावातला एक वीस वर्षीय युवक. त्याच काम म्हंणजे काय?

दिवसभर गाव चपाटन..

इकडून तिकडे फिरत रहाण !

म्हणुनच की काय त्याची ती पैरागॉन चप्पल मळली होती..

शिक्षणाची आवड नसल्याने शाळा जरा कमीच शिकलेली, जेमतेम सातवी पास. त्यातच कमी वयात दारु ,सिगारेट,इत्यादी व्यसन जडलेली. जी की ह्या युगात साहजिकच आहे !

असो पुढे पाहूयात .

" का रे काय झाल..? आता दोन मिनिट एकट पन बसू नाय शकत होय ! "

निळ्याने प्रतिऊत्तर देत सिगारेटचा झूरका मारला..

" अर .. सावकाराची आईस गेली की लेका!
वाड्यात जाऊन बसायच्ं की..?जाम रडारड चालू हाय"

" हो ? मग तुला काय मज्जा वाटते का रे ? "
निळ्याच्या वाक्यावर सोपानने एक दोन क्षण खाली पाहिल आणि निर्लज्जासारखा हसू लागला..

" हिहिहिहिही!"

" अबे सोपान वाईट गोष्ट हाई ही ! असं कोणि मेल्यावर खुष नाही व्हायचं ! माझी आज्जी म्हंणते...कोणी मेल आणि आपन खुष झालो तर यम ..आपन मेल्यावर बम पे फटके देत देत वर नेहतो..!"

निळ्याने डावीउजवीकडे मान हळवली व म्हंणाला.

" काय? " सोपान जरासा भीत ओरडलाच..तसंही सोपान जरासा भित्राच होता.

" नाही नाही मी नाय हसणार बाबा , न्हाईतर पृथ्वी ते स्वारगेट पर्य्ंत बम सूजेल रे माझ ...! "
सोपानने केविलवाणा चेहरा करत निल्याकडे पाहिल..

तसा त्याचा तो कुत्र्यासारखा गरीब चेहरा पाहून निळ्या हसू लागला .

" हा हा हा हा हा !"

" काय झाल निळ्या? हासतो काय? लोक दारु पिऊन येडी होत्यात तू सिगारेट पिऊन झाला का काय?"

निळ्या जरा हसायचा थांबला ...

व पुढे म्हंणाला..
" अरे नाय रे भावा ठिक आहे मी..पन तू लेय भोळा आहे रे लगेच विश्वास ठेवतो ..! भाकड गोष्टींवर
...अरे यम बीम काय नसत रे ...! बिनधास्त जगायचं ....

आता हेच बघ तो सावकार पन मा×××त .आणि ती त्याची
आईसपन बर झाल गचकली म्हातारी. "
निळ्याने नाकावाटे सिगारेटच धुर सोडल व पुन्हा म्हणाला.
" आता त्या म्हातारीसाठी मी काय आयुष्यभर हाय-हाय करत
फिरु का ? मेली कर्माने म्हातारी "
निळ्या सोपानला म्हणाला.

या मित्रहो सोपानबद्दल जाणुन घेऊयात.

सोपान हा रामपुर गावातलाच बर का ! त्याच वय एकोणीस वर्ष.. शिक्षण दहावी पास.त्याचे वडिल रामपुर मध्ये दारुच दुकान चालवतात, पैशांची कमी नव्हती, त्यातच सोपान एकूलता एक लाड तर होणारच. नाही का?..

असो इतक पुरे ...

क्रमश :


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED