खौफ की रात - भाग ६ jay zom द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

खौफ की रात - भाग ६



भाग 6 ( कालोख्या रात्रीचे बोल...
.

सावकाराची आई मेलेल्या रामपूर गावात सुतकाची रात्र सरत होती.

एक एक सेकंद पुढे ढकळत अमुश्याचा काळा अंधार आधिकच गडद होत चालला होता.

आज माणुस मेल्याने विलक्षण अशी कधीही न पाहीलेली शांतता वातावरणात पसरलेली.

गल्लीबोळांमधे असलेले फालतू जनावर घ्साफाडून रडत होती..

सावकाराच्या दुमजली वाड्याबाहेरुन मंद धुक वाहत होत,

वाड्याबाहेर ऊभी असलेली तीन चार भटकी कुत्री वाड्याकडेपाहून गळाफाडून रडत विव्हळत होती.

" कुइं..व्हू..व्हू..व्हुऊ...!"

वाड्याच्या मध्य दरवाज्यातून आत प्रवेश करताच ....

प्रथम ओट्याच अंगण....होत...

अंगणात गावातली मांणस तिरडी बनवण्यात गुंतली होती..

. ....

.. " ए नाथ्या म्हातारीच मईत बघितला का? कसला डेंजर वाटतो लेका ? " एक गावकरी..


" वश्या , म्हातारी जिवंतपनी पन काय कमी होती का? खवचट थेरडी साली! दिवसभर मशेरी चोळत असायची ....! चेटकीणच व्हती साली..मग मेल्यावर डेंजर न्हाई दिसणार व्हीई!"

नाथ्याने तिरडीच एक बांबू बांधल..बाजुलाच त्यांचे सहकारी सुद्धा त्यांच बोलण ऐकत होते..

.

" खर हाये बाबा , नाथ्या ! म्या तर म्हंणतो बरीच झाली मेली बघ ! पन एक सांगू ?"
वश्याने ने जरा भीत सर्वाँकडे एक कटाक्ष टाकला...

" आज अमुश्या आहे ना ? आणी अमुश्या सातला चालू झालीया आणि नेमक सातलाच वाड्यातल घड्याळ बी ब्ंद पडलय आणि...म्हातारी बी तव्हाच मेले ? कय तरी इचित्र आहे वाटत हे !"

वश्याने सर्व गावक-यांकडे पाहिल..त्या सर्वाँच्या चेह-यावर सुद्धा हाच भीतीदायक प्रश्ण उमटला होता.

ओट्याच्या अंगणातू पुढे
वाड्यात प्रवेश करायच मोठ आठफुट उंचीचा दरवाजा होता..

त्या प्रवेश द्वारापासून पुढे हॉलमध्ये ...


खाली फरशीवर सावकाराच्या आईच प्रेत
हिव-या लुगड्यात गुंडाळून जमिनिवर अंथरलेल्या चादरीवर.. तोंडात तुलस ठेवून झोपवल होत.

नाकात चांदीची नथ, गळ्यात खुपसार सोने , आणी कपाळावर गोल लाल भडक कुंकू भरलेला...
पांढरट पिंजारलेले केस, सुरकुतलेला खप्प्ड मोठा चेहरा
आणि त्या ख्प्प्ड चेह-याच्या कपाळावर असलेला तो लाल भडक गोल कुंकू भयानक वाटत होत ते प्रेत ,
जणु जिवंत होऊन गळा आवळेल की काय?

तिरडी बाजुला जरा वर धुंदेरा ठेवला होता..त्यातून मंद पांढरट धुर हळूवारपणे बाहेर निघत होत.

वातावरनात मिक्स होत होत.

.मयताच्या चारही बाजुंना मांणसे जमलेली दिसत होती..

पुरुष उभे होते...तर बायका खाली मांडी घालून बसल्या होत्या...

वाड्यात हॉलमध्ये असलेला भिंतीवरचा काळ्या गोल फ्रेमचा तो घड्याळ सात वाजेवर येऊन तसाच थांबला होता.

किती अशुभ गोष्ट नाही ?

घरात ब्ंद घड्याळ कधीच ठेवू नये? कारण त्यामुळे काळ थांबल जात ! मृत्युयोग उद्भवतो.., काळसर्प , मुठ..मारण करणा-यांना त्याचा खुप फायदा होत असतो...

घरात ब्ंद घड्याळ असेल तर तो उबडा ठेवावा आणि मग सेल चेंज केल्यावरच भिंतीवर लावाव..

वाड्यातल्या एका खोली

देव्हारा होता....

सावकाराची बायको , सासू मेल्याने हे विसरली होती..की..

देव्हा-यातला सोनेरी पितळेचा दिवा विझला होता...
दिव्यातली सफेद वात काळी खरपूस होऊन करपली होती..

दिव्या पुढेच असलेले देव्हा-यातल्या देवांवर काळी काजळी ऊमटली होती. देव नाखूश अपवित्र दिसत होते.. जणू देवांच्या सकारत्मकता नव्हती..शक्ति नव्हती..

आणी ह्या अश्या घरात सात वाजता अमावास्या... प्रारंभ समयी..

एक म्हातारी मृत झाली होती.. ती ही अमावास्याच्या दिवशीच ..


...

xxxxxxxx


काळ्याशार ढगांमधुन दोन्ही पंख फड फडवत ती घुबड कोठेतरी निघाली होती..

असच काहीवेळ हवेत उडून ती पंख हळुवार आपल्या देहात सामावून घेत ....

येऊन हळुच,एका वडाच्या झाडाच्या जाड्जूड फांदीवर बसली ....

आपल्या टपो-या डोळयांनी एकटक खाली पाहू लागली..

तिच्या नजरेस दोन मानवी आकृत्या दिसत होत्या...

त्या झाडाखाली दोन इसम उभे होते.

ते म्हंणजेच सोपान आणि निल्या.

" काय रे सोपान? एवढी धड धाकट म्हातारी कशी गचकली.? " निळ्या म्हणाला.

" अरे माणस बोलत होती ...की अचानक थंडीमुळ अटेक आला अस तस .. आणी वारली थेरडी ...तसही खाऊन खाऊन फुगली होती म्हातारी..."

सोपान गाडिवर बसलेल्या अवस्थेत म्हणाला.

" अस हाय का!" निळ्याने पुन्हा एक झुरका मारला.

त्याच्या ह्या वाक्यावर सोपान ने ही फक्त मान हलवली,

आणि निळ्या पुन्हा म्हणाला.

"बर झाल चल ...! म्हंजे तेराव्याला बुंदी खायला भेटल खुप दिवस झाले बुंदी नाही खाल्ली रे.. हिहिहिही


" काय ? आर कालच तर खाल्ली ना ? "

सोपान मध्येच म्हंणाला.

" अरे भावा ती मिठाईच्या दुकानातली रे..! तिला एवढी चव नव्हती...! मी तेराव्याच्या बुंदीच बोलतोय..तिला जाम चव असते..!"

निळ्याने चेह-यावरचे केस बाजुला सारले.



" अच्छा अस आहे काय? अरे मग अस कस बुंदीच फक्त ! सावकार काय भिकारxx ट आहे का ? गुलाबजाम, पेढा, लाडू पन असतील ना ? तसवी त्याची आवडती आईटम गेली आहे म्हंटल्यावर तेरावा जाम फाई स्टार असणार आहे.. हिहिहिहिहिहिह्ही..."

" हो ना भावा ! " निळ्याने होकार भरला आणि

दोघेही मध्येच एकदम निर्लज्जपणाचा आव आणत मोठ मोठ्याने हसू लागले.

वर झाडाच्या फांदीवर बसलेली ती कुबडी घुबड शुन्य नजरेने त्या दोघांकडेच पाहत होती...

अचानक तिने पंख खोल्ले आणि हवेत झेप घेतली....

........

" फड फड फड..!" .


क्रमश


कमेंट, रेटिंग , देत जा मित्रहो धन्यवाद !

कथेची भाग जस वेळ मिळेल तस प्रकाशीत होतिल.....

आपन सर्वाँनी ह्या कथेचा वाचुन आनंद घ्या...!

धन्यवाद

2023 खौफ की रात

marathi, hindi, english.


@copyrights - jayesh zomate