वृद्धाश्रम का निवडावे लागले...? Vishakha Rushikesh More द्वारा प्रवास विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

वृद्धाश्रम का निवडावे लागले...?

दुनिया बोलते कि मुलगा वाईट आहे. पण खरंच असं असेलच असं कश्यावरून अर्थात दोन मुलं असतील तर त्यांना देणारे सौंस्कार हे आई वडीलांचेच असतात .आई वडिलांनी दोन्ही मुलांना सेम वागणूक दिली पाहिजे, एक माझा आणि एक......? असं नाही केल पाहिजे. जर असं झालंच तर भावा भावानंमध्ये अबोला निर्माण होतो आणि जिथे अबोला निर्माण झाला तिथे नाती तुटायला वेळ लागत नाही. आणि रक्ताची नाती तुटली तिथे घराचे दोन भाग व्हायला वेळ लागत नाही. आणि हीच नाती पुन्हा एकत्र आण्यांचा कितीही प्रयत्न केला तर ते खूप कठीण होऊन बसत. म्हणून नाती जपून ठेवायच्या असतील तर अख्खा कुटुंबाच एक मत असणे गरजेचे आहे. आणि जरी एक मत नसेल तर एकमेकांजवळ संवाद असणे गरजेचे आहे. आणि जर हे संवाद होत नसतील तर घरातील वरिष्ठ माणसांनी जाणीव करून देणे गरजेचे आहे. आई वडिलांनी जर याची जाणीव करून दिली नाही तर दोष हा त्यांचाच याला जबाबदार आपले आई वडील एक मुलगा घरातून बाहेर गेला की त्याच्या वरून बोलणं आणि दुसरा गेला की त्याच्यावरून बोलणं जर हे होत असेल तर लवकरात लवकर थांबवल पाहिजे आणि जर नाही थांबवल तर दोष हा वरिष्ठ्यांचा जर या गोष्टी त्यांनाच कळत नसतील तर दोष हा त्यांचाच हे करताना त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव होत नसेल आणि छान ही वाटत असेल पण शेवटी काय? ज्या व्यक्तीने पैश्यावर जगायला सुरवात केली तिथे अबोला निर्माण झालाचं, पण पैसा हा एकमेव वस्तू आहे त्याने कुटुंब एकत्र राहत, आणि याच कुटुंबाचे दोन भाग ही होतात. अश्या गोष्टी मुलानं पेक्षा आई वडिलांना माहित असतं म्हूणन आई वडिलांनी मुलांना काही भविष्यामध्ये उत्तमाचे उत्तम सल्ले देणे गरजेचे आहे. आणि योग्य त्या वेळी त्यांनी सल्ले नाही दिले तर.... घरातील वरिष्टयाच नियोजन उत्तम नाही तिथे हे होणारच,असं मुलांच्या तोंडातून शब्द बाहेर पडायला वेळ लागत नाही.आपण आई वडिलांना पण दोष नाही दिला पाहिजे नाही मुलांना,दोघांच्या पण दोन्ही बाजू समजून घेतल्या,पाहिजेत आई ने आणि वडिलांनी आपल्या मुलांच्या आणि मुलांनी आपल्या आई वडिलांच्या जर या दोघांमध्ये संवाद असेल तरच पाया मजबूत बनू शकतो. जर असं झालंच नाही तर शेवटी वाद -विवाद होऊ शकतात आई वडिलांमध्ये आणि मुलामध्ये शेवटी तुटातूट होऊ शकते म्हणजे आई आणि वडिलांना नाही मुलाचं वागण पटत नाही मुलांचं आई वडिलांना, अश्या कारणावरून आई वडिलांची मुलांना कट कट वाटू लागते. मग शेवटी मुलं वृद्धाश्रम निवडतात. नाही तर मग वेगळे होतात.अशी किती कारण आहेत ज्या मुळे व्यक्ती वृद्धाश्रम निवडत आहेत.आता जर पाहायला गेलो तर वृद्धाश्रम आणि अण्णाधश्रम यांची संख्या वाढताना दिसते तर या गोष्टीला जबाबदार कोण तर व्यक्तीचे विचार असे विचार करणारे व्यक्ती आज खूप पाहायला मिळतात.जिथे व्यक्तींची विचार करण्याची क्षमताच वेगळी आहे त्याला काय करणार उदा :दगडावर कितीही घाव घाला त्याला काहीच फरक पडत नाही कारण तो निर्जीव वस्तू आहे म्हणून पण माणसाचं तस नाही आहे ना मग या सर्व गोष्टी कश्यासाठी? माणूस तर सजीव आहे मग त्यानेच जर निर्जीव असल्या सारखे केले तिथे या सर्व गोष्टी होणारच,कारण एकाच घरात राहून जर संवाद होत नसेल तर त्या घराला घरपण रहात नाही.असे सिन ज्या घरामध्ये झाले अश्या घराण्याला दुनिया नावं ठेवायला लागते पण ज्याच्या घरात ज्या काही अडचणी असतात त्या ज्याच्या त्याला माहित असतात . म्हणून विनाकारण कोणाला नावं ठेवणं बंद करा, ज्याने त्याने आपलं बघावं, कोणाच्या घरात काय चालाय हे दुनियाला बघायचा अधिकार नाही आहे. नाही त्यांना टोमणे मारायचा. विशाखा ऋषिकेश मोरे (विलास सावंत ) ( दापोली भोपण ) 9137853889