ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड - 10 Abhay Bapat द्वारा गुप्तचर कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड - 10

प्रकरण १०
“सौम्या , प्रणव पालेकर नावाच्या माणसाला शोधायला आपण अत्ता बाहेर पडलोय.”पाणिनी म्हणाला.
“ कसा आहे हा माणूस?” सौम्याने विचारणा केली.
“ भयंकर हट्टी, बैला सारखे डोके , अशी मूर्ती डोळ्यासमोर येते.मी बघितलेलं नाही त्याला अजून ”पाणिनी म्हणाला.
थोड्याच वेळात ते दोघे पालेकर च्या दारात उभे होते.
“ मला पालेकर ला भेटायचं होत. ”पाणिनी म्हणाला.
“ तुमच्या समोर उभा आहे त्या देहाला तेच नाव आहे.”पालेकर म्हणाला. रुंद छातीचा ,भडक कपड्यातला माणूस त्याच्या समोर उभा होता. “ कोण तुम्ही? ”
“ या देहाला पाणिनी पटवर्धन म्हणतात , लॉयर ! ”पाणिनीने त्याच्याच भाषेत उत्तर दिले.
पाणिनी पटवर्धन हे नाव ऐकताच त्याच्या चेहेऱ्या वरचा रगेल पणा उतरला.त्याने आपले हात पुढे केले आणि पाणिनी चे हात हातात घेऊन थोपटले. “ पाणिनी पटवर्धन! ” तो उद्गारला. आपली भेट व्हावी अशी फार इच्छा होती.या कोण आहेत बरोबर? बायको तुमची? “
“ सेक्रेटरी ”पाणिनी म्हणाला.
“ तुम्हाला कशाला लागते सेक्रेटरी? ”
“ती लिहून घेते तिच्या वहीत, जे,जे, बोलले जाते ते. ”पाणिनी म्हणाला.
“ कोणी संदर्भ दिला माझा? ”
“आरक्ता राजे आणि तुमच्यात वाद होता जमीन खरेदीमध्ये , तुम्ही तिच्या शी जागा खरेदीचा करार केलात अगदी नावाला रक्कम दिलीत पण जागा सोडली नाही असं काहीतरी ऐकण्यात आल होत.”पाणिनी म्हणाला.
“ माझा धंदाच आहे तो.माझ्या ताब्यात ती जागा बरीच वर्षे आहे. मीच मालक आहे असे भासवून इतरही काही लोकांशी मी , तीच जागा विकायचा करार केलाय. रोख पैसे घेतलेत . तुम्ही त्यासाठी आला असल तर माझ्यावर दावा ठोका. मी लोकांशी केलेला करार साक्षीदारांसमोर केलेला नाही त्यामुळे मी नाकारीन. तो करार अवैध ठरेल मग मलाच त्याचा फायदा होईल.पुंडशी सुद्धा मी तीच जागा विकण्याचा करार केला होता , त्याच्या कडून पैसे पण घेतले त्यानंतर आणखी एक माणूस आला ती जागा घ्यायला मी त्याला सांगितलं की पुंड ती जागा घेतोय. त्याच्या कडून मी पैसे घेतलेत तू त्याहून जास्त देशील का? तो तयार झाला मी करार केला त्याच्याशी साक्षीदार नाहीत त्याला. मी हे खोटे नाही सांगत.त्याचा गाडी नंबर ८५३६ होता.”
“ मी त्या जमिनी बद्दल बोलायला आलेलो नाहीये अत्ता, मी तुला हे विचारायला आलोय की शनिवारी सकाळी काय घडलं? ”पाणिनी म्हणाला..
“ शनिवारी काय घडलं? मी बोटीवर गेलो होतो ,तर पुंड मेला होता.”प्रणव पालेकर म्हणाला.
“ पुंड बोटीवर असणार हे तुला कसं कळलं? ”
“ मला माहीत होत ते. कारण त्यानेच मला ते सांगितलं होतं.”
“ तू पुंड ला फोन केला होतास?”
“ केला होता आणि त्याला सांगितलं पण की दुसरा माणूस तुझ्या पेक्षा जास्त रोख देतोय.तो म्हणाला ताबडतोब उद्या बोटीवर भेटायला ये.”प्रणव पालेकर म्हणाला.
“ बर, तू तिथे म्हणजे बोटीवर तू पोचलास, काय झालं तिथे? ”पाणिनी म्हणाला..
“ दुसऱ्या छोट्या होडीतून मी त्या बोटीवर पोचलो ती बोट खरं तर चिखलातच होती. बाजूला पाणी होतं पण चिखलात रुतली होती. ”
“ तुला काय दिसलं तिथे?” पाणिनी म्हणाला..
“ केबिनच्या जवळ पुंड चे शव पडले होते.
“ उताराच्या बाजूला?”
“ अर्थातच, ओहोटी मुळे बोट कलली होती.”प्रणव पालेकर म्हणाला.
“ तू हात लावलास का कशाला? ”
“ नाही, अजिबात नाही.”
“ पण तू केबिन मधे गेलास तेव्हा तिथे दरवाजाला हात लागलाच असेल ना.!”पाणिनी म्हणाला.
“ बहुतेक, त्याने काय होणारे पण? मी सकाळी गेलो होतो, तो रात्रीच मेला असेल.”
“ ठशावर लिहिलेलं नसतं की ते किती वाजता उमटले ते.”पाणिनी म्हणाला.
“ मला कशात गुंतवायला बघताय तुम्ही? खुनात? जमीन विक्रीत मी कमावलेले पैसे तुम्हाला हडप करायचेत? ”प्रणव पालेकर ने विचारले. आणि तो त्याच्या केबिन कडे जायला निघाला. “ चालते व्हा तुम्ही दोघे इथून ! ”
“ मला एवढंच विचारायचं .....” पाणिनी बोलायला लागला पण त्याचं ऐकून न घेता प्रणव पालेकर म्हणाला, “ मी जेव्हा असा चिडून आत जातो ना तेव्हा येताना माझ्या हातात बंदूक असते.”
“ सर, मला वाटतंय की तुम्ही त्याच्या कडून तुम्हाला हवी ती सर्व माहिती काढली आहे. निघूया आपण” सौम्या म्हणाली.
“ मला मानस शास्त्राचा एक प्रयोग म्हणून बघायाचच आहे की खरच तो बंदूक घेऊन येतोय का ! ”पाणिनी म्हणाला. दोघांनी बराच वेळ वाट बघितली पण प्रणव पालेकर ने दार उघडलेच नाही.तो घरातच राहिला.पाणिनी आणि सौम्या दोघे गाडीत बसले.
“ सर, पुंड व्यतीरिक्त जो अन्य माणूस जमिनीचा व्यवहार करायला आला होता त्याचा गाडी नंबर ८५३६ होता अस पालेकरम्हणाला होता,ओजसला त्यावरून मालक शोधायला सांगू या का? ” सौम्याने विचारलं
“ काही गरज नाही त्याची, ती गाडी मला माहिती आहे. त्याचं गाडीतून काया प्रजापति मला दोन्ही हॉटेलात घेऊन गेली होती.! ”पाणिनीने बॉम्ब टाकला
त्याचं दिवशी दुपारी पाणिनीने ओजस ला स्वत:च्या ऑफीसात बोलावून घेतलं.
“ पाणिनी पोस्ट मार्टेम करणाऱ्या डॉक्टरांच म्हणण आहे कि पुंड चे डोके बोटीवरच्या आतल्या केबिन आणि बाहेरच्या केबिन मधील दाराच्या उंबरठ्यावर आपटले असावे आणि त्याच्या मृत्यू झाला असावा.”
“ तसे असेल तर तो सदोष मनुष्य वधाचा गुन्हा ठरेल , निर्घृण खुनाचा नाही.” पाणिनीम्हणाला.
“ पाणिनी, ते शेवटी जज्ज वर अवलंबून राहील.पोलीस मात्र , निर्घृण खुन याच दृष्टीने तपास करतील.......” तेवढ्यात एकदम फोन वाजला.तो ओजस साठी होता.ओजस फोन मधे ऐकत राहिला.मधेच तो म्हणाला, “ ठीक आहे त्याला त्या फोन जवळच पाच मिनिट थांबायला सांग.” नंतर पाणिनी कडे वळून तो म्हणाला,
“ माझ्या माणसांनी प्रबोध ला शोधून काढलाय. म्हणजे ज्याने सर्फ अॅण्ड सन मोटेल मधे बुकिंग केले होते तो माणूस. प्रजापतिने सांगितलेल्या हकीगतीशी तो सांगत असलेली गोष्ट जुळते आहे. तो म्हणतोय की त्याने दोन खोल्या बुक केल्या होत्या.चार माणसे येणार होती. पण दोन वाढली नंतर . तो नाव सांगणार नाही कोणाचेही. ”ओजसम्हणाला.
“ तो हे सर्व लेखी देईल?” पाणिनी ने विचारलं
“ माझ्या माणसाला खात्री आहे तो लेखी देईल म्हणून, पण त्यात एक अडचण आहे,प्रबोधच्या म्हणण्या नुसार, शनिवारी दुपारीच ती माणसे निघून गेली. तुझ्या सिद्धांतात ते बसतं का? ”ओजसने विचारलं
“ नाही बसत.सकृत दर्शनी प्रजापति दुपारी चार ते पाच वाजण्या पूर्वी खोली सोडून गेला नाही. तुझ्या माणसाला निरोप दे की नक्की कधी सोडलं होटेल या बद्दल प्रबोध कडून अधिक माहिती घे. त्याला जरा नीट आठवून बघायला सांग.” पाणिनी म्हणाला.
ओजसने तशी व्यवस्था केली.
थोडा वेळ तिघे इकडच्या तिकडच्या गप्पा मारत वाट बघत बसले .पुन्हा फोन वाजला.
“ सर, काया फोन वर आहे. ती विचारत्ये की तपासात काही प्रगती आहे का? ” सौम्याने फोन घेतल्यावर आणि काया शी बोलल्यावर पाणिनी ला विचारले.
“ तिला म्हणावं आम्ही महत्वाच्या फोन ची वाट बघतोय. तिचे वडील कुठे आहेत अत्ता हे तिला विचारायचय, आणि शुक्रवारी दुपारी तिच्या वडिलांनी पालेकर ला का फोन केला होता ते मला जाणून घ्यायचंय. पण तिला ते आत्ताच सांगू नकोस तू, अत्ता तू तिला एवढंच सांग की आम्हाला माहिती मिळाल्या नंतर आम्ही तुला कुठे कळवू?”
सौम्याने तिला तसा निरोप पोचवला.
थोड्या वेळाने पुन्हा फोन वाजला. तो ओजस च्या माणसाचा होता. त्याच्याशी बोलताना ओजस चा चेहेरा गंभीर झाला.
“ पाणिनी माझा माणूस माझ्याशी फोन वर बोलत होता , पुन्हा नंतर तो प्रबोध ला विचारायला गेला तेव्हा प्रबोध गायब झाला होता.माझ्या माणसांनी अधिक माहिती घेतली तेव्हा समजलं की त्याला पोलिसांनी उचलून नेला ! चक्क बेड्या घालून.”ओजसम्हणाला.
“ बेड्या ठोकून ! ” पाणिनीउद्गारला. “ कनक, तुझ्या माणसाना तातडीने परत बोलावून घे. ते अडचणीत नको यायला.”
अस्वस्थ पणे पाणिनी येरझाऱ्या घालू लागला.
अचानक तो थांबला, “ कनक, तुझी एखादी तुझ्या खास विश्वासातील स्त्री गुप्त हेर आहे?”
“ मिळेल ना. कामाचं स्वरूप काय आहे? म्हणजे हाणा मारी करायची आहे की ........? ”
“ अशी स्त्री हवी की जी एका उच्चभ्रू स्त्री जवळ दिवस रात्र राहील.अजिबात तिला दृष्टी आड होऊन देणार नाही.” पाणिनीम्हणाला.
“ मिळेल मला अशी बाई , चार पाच तासात ” ओजसम्हणाला.
“ नाही एवढा वेळ नाहीये हातात आपल्या.” पाणिनी म्हणाला.
“ या पेक्षा लौकर नाही मिळणार मला ”ओजस म्हणाला.
“ सर, मीच ते काम केले तर? ” सौम्याने विचारले.
“ ओह हो ! ” पाणिनीउद्गारला. “ माझ्या हे लक्षातच नाही आलं ! ”
“ काय करू बोला सर.”
“ तू इथून बाहेर पडशील तेव्हा खात्री कर की तुझं पाठलाग होत नाहीये ना. खाली उतरल्यावर लगेचच टॅक्सी करू नको. जरा लांब जाऊन कर म्हणजे तू कुठून आलीस ते टॅक्सी ड्रायव्हर ला कळणार नाही. टॅक्सी मधे बसल्यावर ड्रायव्हर ला स्पष्ट सांग की पाठलाग होत नाहीये ना याची खात्री करा.त्या लोकांना माहिती असते आशा वेळी काय करायचे असते.”पाणिनी म्हणाला.
सौम्याने मान डोलावली.
“ पाठलाग होत नसल्याची खात्री झाली की एस टी स्टॅंड वर जा आणि तिथे काया ला भेट.तिला कोणतीही माहिती देऊ नकोस.आणि तिला सांग की काहीही प्रश्न विचारू नकोस.तिला घेऊन होटेल वुड रिज ला जा तिथला मॅनेजर माझ्या माहितीचा आहे.त्याच्याशी मी बोलून ठेवीन तुम्ही पोचे पर्यंत.तू स्वत:च्या नावाने बुकिंग कर आणि काया चे बुकिंग तिच्या आद्याक्षरा नुसार कर. उदा. क.म.प्रजापति. म्हणजे ते एखाद्या व्यावसायिकाने बुकिंग केल्या सारखे वाटेल , बाईने केलं असं वाटणार नाही. डबल बेड असलेल्या रुम्स घ्या. खोलीचा ताबा घेतल्यावर काया ला तुझ्या खोलीत हलव. मी संगे पर्यंत काया ला संपर्काच्या बाहेर ठेव.”पाणिनी म्हणाला.
सौम्याने मान हलवली आणि आज्ञाधारक पणे बाहेर पडली.
“ मला नाही आवडलंय हे सर्व तू करतो आहेस ते.” ओजसम्हणाला.
“ मला ही नाही आवडलं ” पाणिनी म्हणाला.

(प्रकरण १० समाप्त)