नागार्जुन - भाग ३ Chaitrali Yamgar द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नागार्जुन - भाग ३

" अम्मा..आज तारिख क्या है..." स्वतः चा राग गिळून शेवटी नगमा किचनमध्ये आपल्या आईला मदत करायला आली होती...भांडी घासता घासता ती अचानक बोलते.." अरे हा आज तो रक्षाबंधन होगा ना...भाई बहन का त्योहार ..." तिला परत काहीतरी आठवत तशी ती बोलते आणि तिच्याही नकळत तिच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल येते...

" कितनी बार बोला है तुला नगमा...जे झालं आहे ते विसरून जा आणि नविन आयुष्य जग...पण नही...तुझे करना है वोहीच तू करेगी..." फ्रीजमधील पालेभाजी काढत तिची अम्मा तिला बोलतं होती पण तिचं कुठे लक्ष होतं...ती तर आपल्या स्वप्नांत हरवली होती...


" खुदा क्या करू मैं ईस लडकी का.." अम्मा तिला एक नजर पाहते आणि चिडून भाजी घेऊन हॉलमध्ये जाते...

" आज कोमल दिदु आली असेल ना रक्षाबंधन ला .‌‌..." तोच नगमा बोलते..आणि तिच्या चेहर्यावर वेगळीच स्माईल येते...

" गेल्या दोन वर्षांपर्यंत किती छान चाललं होतं माझं आयुष्य...माझी आणि तुझी पहिली रक्षाबंधन सण...किट्टू माझ्या पेक्षा तुझ्या जवळची कधी झाली होती त्या सहा महिन्यांत हे मलाच काय माझ्या घरच्यांना ही कळालं नव्हतं..." अर्जून बंद दरवाजा ला पाठ टेकून स्वतः शीच बोलत होता...कारण त्याला ही आठवत होती त्या दोघांची पहिली रक्षाबंधन..पहिला सण लग्नानंतरचा...

" लाचो, प्लीज..जरा शांत राहशील का...?? " तोच त्याला कुणाचा तरी खाली आवाज ऐकू आला..." हा तर सुनील चाचा चा आवाज आहे..." तो आवाजाचा अंदाज घेत बोलला...

" नाही हं...आज मी जेठाजींना विचारणार च आहे कि तिला घरात कसं काय घेतलं म्हणून..." ती बाई आपल्या बरोबर आलेल्या माणसाला बोलतच होती कि...

" चाचा..चाची..." अर्जून पळतच दार उघडून खाली आला...समोर चाळीस ते पंचेचाळीस वर्षांची, थोडी जाड, कपाळावर लाल मोठं कुंकू ,खांद्यापर्यंत रूळलेल्या केसांत सिंदूर आणि डोक्यावर भारी किमंतीचा गॉगल अशी पंजाबी ड्रेस घातलेली...अधुन मधुन आपली चुन्नी नीट करणारी एक महिला दिसते..सोबत जरा शरिरयष्टीने लुकडे सुकडे...थोडंसं टक्कल पडलेलं पन्नाशी च्या वयातील एक गृहस्थ ही असतात... अर्जून मग हसुन त्या बाईच्या आधी पाया पडतो..

" जुग जुग जियो मेरे पुत्तर..." ती बाई ही हसत त्याला आशिर्वाद देते...अर्जुन मग आपल्या काकांच्या पाया पडायला जातो पण ते त्याची गळाभेट घेतात...तोपर्यंत कोमल, प्रिती आणि रोहित ही येतात..रोहितला ला आणि प्रितीला पाहून त्या बाईला ही खुप आनंद होतो..

" पुत्तर...ईकडे ये..." ती बाई आपले दोन्ही हात फैलावत बोलते तसं रोहित आणि प्रिती ही आधी जोडीने पाया पडतात आणि परत रोहित आपल्या आईच्या मिठीत शिरतो...हो ती बाई ,लाचो आणि सुनिल म्हणजे च अर्जून चे काका काकी असतात जे लखनौ ला राहत होते...रोहित आणि प्रिती हे त्यांचे मुलगा आणि सुन..

" काय छोटी माँ...मला तर लगेच विसरून गेली..." ख्याली खुशाली एकमेकांची विचारत असतानाच तिथे कोमल, चाचा चाचींना हसत येऊन नमस्कार करते...पण ती जशी आली तसं चाची याने लाचो तोंड वाकडं करतात...आणि थोडं मागे पाय करतात...चाचा पण सेम तसंच करतात..लाचो कडे पाहत....जणू आम्हांला नमस्कार करू नको हे त्यांना सुचवायचे होते...

" तू ...आलीस होय ?? " त्या काहीतरी बोलायचं म्हणून बोलतात...

" अं हो..." कोमल हसत म्हणते...

" लाचो , सुनील भावजी..." तोच अर्जून ची मॉम व डॅड येतात आणि त्या दोघांकडे पाहून हसुन स्वागत करतात...

अर्जुनची मॉम ही त्याच्यासारखी दिसायला सुंदर व राहणीमानाला ही एकदम फुल ऑन टिप टॉप होती...सोनेरी सिल्क साडी ज्याचा एका साइडला पदर ,जो एका हातात पकडलेला...साडी ही अगदी चोपून नेसलेली...त्याच रंगाचा फुग्याच्या बाह्या असलेला थोडा मॉडर्न पद्धतीने शिवलेला ब्लाऊज...पायात हिल्स जे चालताना टिक टॉक आवाज येत होता...चेहरा उभट..कपाळ रूंद ज्यावर लांबट चॉकेलेटी रंगाची टिकली...मोठं मंगळसुत्र ,हातात सोनेरी बांगड्या...आणि खास वैशिष्ट्य...गालावर हसताना पडलेली ती खळी...कायम हसतमुख चेहरा...अशा ह्या अर्जून च्या मॉम आता ही आपल्या देवर आणि देवराणीला पाहून खुश झाल्या होत्या..

" पायलागू भैय्या और भाभी..." लाचो आणि सुनिल जवळ येताच त्या दोघांच्या पाया पडत म्हणतात पण नील आणि सुरभी...त्यांना पाया न पडू देता गळाभेट घेतात...मागे मागे अर्जून , प्रिती ही येतात यांच्या दोघांच्या...

" कशी आहे लाचो...?? आज जवळ जवळ दोन वर्षांनी घराला तुमच्या येण्याने घराला घरपण आलं आहे...." सुरभी ( अर्जुन ची मॉम...) लाचो च्या गालाला हात लावून प्रेमाने विचारपुस करतात..


" कोमल..तू का मागे उभी आहेस ...चल ना..." रोहित कोमल चा हात पकडून बोलतो...ते सहा जण तर आपल्याच गप्पांमध्ये मश्गूल झाले होते कि मागे कोमल व रोहित आहे हे ही त्यांच्या लक्षात आलं नव्हतं...

" अरे कोमल बेटा...तू केव्हा आलीस..??" तोच तिच्या डॅडू चं ,नीलच तिच्याकडे लक्ष जातं आणि ते हसुन तिला आपल्या पाशी यायला हात करतात...पण ईकडे अर्जून, सुरभी व लाचो मात्र तोंड पडतं...पण ते तसं काही दाखवत नाही...

" डॅडू...मघाशीच आले...पाय लागू" म्हणत कोमल ही प्रेमाने आपल्या डॅडूच्या पाया पडते...

" सदा यशस्वी भव..." म्हणत तिचे डॅडू तिला आपल्या मिठीत घेतात...

" चला लाचो आणि सुनिल भावजी .." ती आपल्या मॉमच्या ,सुरभीच्या पाया पडायला जाणार तोच सुरभी तिला ईग्नोर करत सुनिल व लाचो ला बोलते..." तुम्ही आवरून या खाली मग आपण रक्षाबंधनाचा कार्यक्रम उरकून घेऊ..." सुरभी असं दाखवत होती कि कोमल च अस्तित्व तिला जाणवत ही नाही म्हणून...कोमल आपल्या लाडक्या डॅडू कडे पाणावलेल्या डोळ्यांनी पाहते ...ते तिचा खांदा थोपटून तिला आश्वस्थ करतात..

" जा बेटा...तू ही आवरून ये..." ते बोलतात तसं ती हो मध्ये मान हलवते आणि आपल्या डोळ्यांतील अश्रुंना वाट करून देत तिथून पळतच आपल्या खोलीत जाते...

" भाई...हे जे चाललं आहे ते चुकीचं आहे असं तुला नाही वाटत..." ईतका वेळ कोमलाच पाहणारा रोहित ,अर्जून च्या कानात बोलतो..

" काय चुकीचं चाललं आहे...?? काहितरी काय बोलतो तू रोहित..." सर्व कळत असुनही अर्जून मला काही समजलं च नाही हे चेहर्यावर भाव ठेवत ,त्याला बोलतो, " जा ...आज शेरवानी घालायचं ठरवलं आहे ना ...ती घालून ये ...नाही त्या भानगडीत पडू नकोस..." अर्जून त्याला ढकलत च बोलतो तसा नाईलाजाने रोहित आपल्या खोलीत निघून जातो..

" आलेच मी..." म्हणत प्रिती ही त्याच्या मागोमाग जाते...

" लाचो, सुनिल भावजी..तुम्ही ही जा आणि फ्रेश होऊन या..." सुरभी सर्वांची पांगापांग होताच त्या दोघांना बोलते तसं ते दोघे ही आपल्या खोलीत निघून जातात..

" मी आलोच ...माझं जरा काम आहे..." म्हणत तिथून नील ही कल्टी मारतात...

" मॉम..." अर्जून सुरभी जवळ येत म्हणतो..

" अरे अर्जून तू ही जा ना...शेरवानी घालून ये...आज किती दिवसांनी आपण असे एकत्रित सर्व आलोत ...जा कोमल ही आली आहे...ती बांधेल तुला राखी..." सुरभी आपल्याच नादात बोलते,डोळे पाणावले होते...

" मॉम...एवढा त्रास तुला होतो तर तू का बोलत नाहीस तिच्याशी..." अर्जून तिच्यापाशी जाऊन हलकेच अश्रू पुसत बोलतो...

" तुलाही चांगलच माहित आहे कि मी का बोलत नाही...अर्जून.." त्या अचानक कठोर होतात..

" हो मॉम मला चांगलच माहित आहे...पण तिने जे केलं ते माझ्याबाबत केलं ना...मग तू का तिच्याशी बोलत नाहीस..." अर्जून..

" हे बघ अर्जून...मी कुणाशी कसं वागायचं हा माझा प्रश्न आहे... जिच्यामुळे माझं हसत खेळत घर असं झालं त्या व्यक्तीशी मी बोलावं हे तू कसं काय म्हणू शकतोस...आणि मला एक सांग...तू करू शकशील का रे तिला माफ...?? नाही ना ...मग माझ्याकडून ही ती अपेक्षा ठेवू नकोस...जा आता आणि शेरवानी घालून ये..." त्या कडक आवाजातच बोलतात आणि आपल्या खोलीत निघून जातात...अर्जून ही आपल्या खोलीत निघून जातो..




" माझी एक साधी चुक....आज माझ्याच कुंटूंबाची ही दशा करून गेली आहे..." वरून आपल्या आई आणि भावाच बोलणं ऐकत असलेली कोमल अजून मनातून तुटते..." पण भाई ..लवकरच या सर्व गोष्टी मी बाहेर आणणार आहे...मी केलेली चूक मीच दुरूस्त करणार आहे...तुझी नगमा भाई ,तुला या भाऊबीजपर्यंत गिफ्ट म्हणून मी परत तुझ्या आयुष्यात आणणार आहे..." ती आपले डोळे पुसत ,मनाशी ठाम निश्चय करत बोलते आणि परत आपल्या खोलीत निघून जाते..



पात्रांची ओळख

अर्जून पंडित ( कथेचा नायक...)
नील आणि सुरभी पंडित ( नायकाचे आई वडिल,दिल्लीचे मोठे बिझनेसमन )
कोमल पंडित ( नायकाची बहिण )
रोहित व प्रिती पंडित ( नायकाचे कझन व वहिनी कम अर्जून ची मानलेली बहिण)
सुनील आणि लाचो ( नायकाचे काका काकू...रोहितचे मॉम डॅड...)

नगमा शेख ( नायिका )
शबनम शेख ( नायिकाची अम्मा...)

सध्या तरी एवढेच पात्र ..नंतर जसजसे येतील तश तशी ओळख होईलच ..



क्रमशः