Nagarjun - 4 books and stories free download online pdf in Marathi

नागार्जुन - भाग ४

" हं चला आता लाईन मध्ये बसा मोठे...आणि राखी बांधून घ्या..." सुरभी सर्व खाली जमताच बोलते,तिने व लाचो ने ओवाळणी ची तयारी आधीच केली होती...सोबत प्रितो ही होतीच...पण या घरची एकेकाळची लाडकी बहिण, कोमल..किट्टू मात्र जरा दुरच उभी होती...कारण तिथे अर्जून ही होता...

" नील भैय्या...आधी तुमचा मान...तुम्ही बसुन घ्या..." लाचो नील ला बोलते तसं ते हसुन मान डोलवतात आणि सुरभी कडून टोपी घेत तिथेच असलेल्या पाटावर जाऊन बसतात...तसंही लाचो ही हसत त्यांचं औक्षण करते व राखी बांधते...

" आपले उत्सव मुर्ती कुठे गेले...?? ना फोटो नाही , ना दंगा नाही..." तोच डोक्यावरती हात ठेवून असलेले नील ,सर्व ठिकाणी एक नजर टाकत बोलतात...

" रोहित ...रोहित..." तशा लाचो हसुन आपल्या मुलाला हाक मारतात, पाठीमागे अर्जून आणि तो गप्प गप्प उभे असतात..." अरे रोहित मागे काय उभा आहे..." त्या मागे उभ्या असलेल्या रोहितचा एक हात आपल्या एका हाताने पकडत त्याला ओढत समोर आणत म्हणतात,. " चल आता माझा आणि नील भैय्यांचा छान फोटो काढ..." त्या त्याला हसत म्हणतात...

" हो काढतो ना मॉम..." तो बळेच एक स्माईल आपल्या चेहर्यावर चिपकवत हातात मोबाईल घेऊन फोटो काढायला लागतो...पण खरंतर रोहितला बिलकुल मुड नव्हता कारण त्याची लाडाची बहिण जी उदास उदास होती...आणि त्यामुळे त्याचा मोठा भाई सुद्धा...त्याला ही चांगलं माहित होतं कि अर्जून जरी किट्टूवर रागावला असला तरी तिला तो असा उदास उदास नाही पाहू शकत...

फोटोसेशन सुरू झालं तसं अर्जूनला अजूनच गहिवरून आलं आणि तो तिथून कुणी ही पाहत नाही हे बघतच आपल्या खोलीत पळत आला...पण तरी ही किट्टू ने त्याला तसं पाहिलं होतं...ती ही मग धावत आपल्या खोलीत आली आणि दार लावून दाराला आपली पाठ टेकून उभी राहिली ..ईतका वेळ अडवून ठेवलेलं पाणी नको म्हणत असतानाही नकळत वाहिलीच..दोघे ही भाऊ बहिण आपल्या भुतकाळातील रक्षाबंधन ला आठवून हळवे झाले होते.....रात्र कशी सरली हे दोघांना ही कळालं नाही...

" किट्टो ..अगं रात्री मला राखी का बांधली नाही..." सकाळी लवकरच तिचा डॅडा.( नील पंडीत ) मॉर्निंग वॉक करून जस्ट घरी आला च होता कि समोरून येणार्या कोमल ला तो बोलला... ॲक्चुअली तिच्या जन्मापासुन किट्टू आपल्या लाडक्या भैय्या बरोबर लाडक्या डॅडूला ही बांधायची कारण नील आणि सुनिल ला बहिण कोणीच नव्हती...

" डॅडा...ते मी..आपलं..." ती तुटक बोलली पण काय बोलावं हे समजत नसल्याने परत शांत झाली...

" ठिक आहे बाळा...इट्स ऑल राईट...प्रवासामुळे दमली असशील ना..." ते तिच्या गालाला हसुन हात लावत म्हणाले..तसं ती ही त्यांच्या हाताला हात लावून कसंनुस हसली...खोटं पहिल्यांदाच आपल्या डॅडूशी बोलत असल्याने स्वतः चा राग ही येत होताच....." अगं पण इतक्या सकाळी का उठलीस...?? आणि हे काय...ही बॅग काय करत आहे हातात...??" तिच्या हातातील बॅग पाहून नील चांगलेच गोंधळून गेले होते त्यात किट्टूला परिक्षेशिवाय कधीच ईतक्या लवकर जाग यायची नाही हे त्यांना ही चांगलंच माहित होतं...

" ते मी..." परत तिची ततपप व्हायला सुरुवात झाली होती...कारण खोटं तिला स्वतः ला च चालत नव्हतं आणि ती दुसरं कोणी बोलत असेल तर खपवुन ही घ्यायची नाही... त्यामुळे आता परत खोटं बोलताना तिची चांगलीच तारांबळ उडाली होती..

" तू परत कॅनेडा ला जायचा नाही ना विचार करत आहेस...??" तोच निल ला क्लिक झालं कि काल अर्जून ही नव्हता म्हणजे हा तिला काही बोलला तर नाही ना...या विचारानेच त्याने तिच्याकडे रोखून पाहत पण थोड्या मोठ्या आवाजात विचारले...

" ना...ही ..डॅडू...कॅनेडाला नाही पण मी माझ्या मैत्रिणीकडे जात आहे..." आता त्यांना खोट सांगुन उपयोग नाही असा विचार करत तिने खरं काय ते सांगितले...रात्रीच तिने निर्णय घेतला होता कि भाई ला जर तिचा ईतका प्रोब्लेम असेल तर ती या घरात नाही राहणार म्हणून...आणि त्यामुळेच सकाळी सकाळी कुणालाही कळणार नाही ,घरातले जरा लेट उठत असल्याने असा विचार करूनच ती आवरून निघाली होती ...पण झालं वेगळंच..तिच्या डॅडूने नेमकं तिला आता पाहिलं होतं...

" तू खरं बोलत आहेस ना किट्टू ..?? कि...??" परत नजर रोखत नील बोलले, " कि तुझा भाई...." ते पुढे बोलले तसं तिने मान नकारात्मक हलवली..

" नाही डॅडू...अरे खरच ...माझ्या एका मैत्रिणीची एंगेजमेंट आहे...मी तिकडे तिने मला आधी एक महिना रहायला बोलावलं होतं पण ते मी आपलं ईकडे..." ती त्याला अजून एक साफ खोटं बोलते..म्हणजे एंगेजमेंट फ्रेंडची असते हे खरं होतं ,हे ही खरं होतं कि तिने एक महिना आधी बोलावलं होतं तिला भारतात पण तिने त्याचं वेळी तिला नकार ही दिला होता... डायरेक्ट एंगेजमेंटच्या दिवशी येईल असं कंन्व्हिएंस केलं होतं...कारण तिला तिच्या भाईला सरप्राइज द्यायचं होतं..आता दोन वर्षांनी येत आहे आणि सर्व सुरळित चालू आहे म्हटल्यावर तिला आशा होती कि भाई तिला पाहून खुश होईल पण तसं काहिच हिथे आल्यावर झालं नसल्याने ती परत आपल्या मैत्रिणीकडे पंधरा दिवस आधीच चालली होती...


" खरं बोलते ना किट्टू तू...??" नील ने परत विचारलं तसं तिने मानेनेच हो बोलली...

" बरं ठिक आहे ...जा आता..पण एंगेजमेंटच्या दुसर्या दिवशी च तू मला घरात हवी आहेस हं किट्टू...मी ऐकणार नाही त्यावेळी काही तुझं..." ते परत तिला दम भरतात....ती ही हसुन हो म्हणते आणि त्याला बाय करते...ईतका वेळ अर्जून आणि तिची मॉम आपल्या रूमच्या बाहेर येऊन दोघांच्या ही नकळत त्यांच बोलणं ऐकत होते...दोघांना ही समजलं होतं कि किट्टू मुद्दाम च गेली आहे पण ते काही न बोलता आपल्या रूममध्ये निघून जातात...

" सकाळी सकाळी कोण आलं तडमडायला..." ईकडे त्याच वेळी नगमा च्या घराची बेल वाजली ...तसं ती रागात बडबडत उठली...आणि दार उघडायला आली होती...आज नगमाची अम्मा घरी नव्हती...रात्रीच हिने जॉब सोडला ऐकून त्या रागात निघून गेल्या होत्या...

" हैलो...झाली का सकाळ...." दारात एक माणूस उभा राहून तिला वर खाली पाहत बोलला...

" ओह तेरी ...हा आता साला काय करतोय सकाळी सकाळी..." तिने त्या व्यक्तीला बघत मनातच हात कपाळावर मारत बोलली...

" आता घर हे माझं च आहे म्हटल्यावर मी तर येणारच ना दिलरूबा..." तिच्या एकंदरीत एक्स्प्रेशन वरून च त्याला कळालं होतं कि ती मनात काय बोलली असेल म्हणून तो हसत,आपली एका हातातील छत्री ने‌ तिला सरकवत आत जात बोलला... आत जाताना ही त्याची नजर पुर्ण घराकडे ,घरातल्या वस्तूंवर ही पडत होती...आणि तिच्याकडे पाहून आधाशा सारखा हसत होता..

" अम्मी...अम्मी...दिसत नाही..." तो एक अंदाज घेत बोलला..

" अं..हा..." पण त्याला असं आत डायरेक्ट आलेलं बघून ती मनातून चिडलेली ही होती...हे होते तिचे घरमालक...अरविंद खोत....वयाची चाळीशी गाठल्याने डोक्याला टक्कल आणि डोळ्यांना भिंगाचा चष्मा ओघानेच आला होता...लग्न काही पर्सनल कारणांमुळे झालं नव्हतं .... त्यामुळे सोसायटीतील लोक त्याला येऊ देत नव्हती जरी पुर्ण बिल्डिंग त्याच्याच मालकीची असली तरी....पण जशी नगमा व तिची अम्मा हिथे रहायला आले होते तशा मात्र त्याच्या वार्या ही वाढल्या होत्या...

" कुठं बाहेर गेल्यात का अम्मी...." तो मनातल्या मनात खुश होऊन बोलला...इतकी वर्ष तो हीच तर संधी शोधत होता...कारण त्याला नगमा पहिल्या दिवसांपासुन च आवडली होती...पण तीच काय तर तिची अम्मा ही त्याला जादा भाव देत नसल्याने तो जरा तिच्या अम्मीवर कच खाऊनच होता आणि आता ती दिसत नाही म्हटल्यावर तर त्याच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या...

" अं हो..म्हणजे नाही..." ती त्याच्या या प्रश्नाने गडबडली पण परत आपण आपल्याच हाताने आ बैल मार मुझे करत आहोत अम्मी घरात नाही हे सांगून हे लक्षात येताच ती बोलते, " म्हणजे ती ते..." ती डोक्याला एका बोटाने खाजवत बोलते, " ते मॉर्निंग वॉक ला गेली आहे...येईलच आता..." ती सावरून बोलते..

" बरं बरं..असु दे..." तो तसा पटकन उठतो आणि बोलतच चालायला लागतो ही, " ते मी हेच सांगायला आलो होतो कि आजच्या आज घर खाली करून द्या मला नाहीतर उद्याच माझ्याबरोबर बोहल्यावर चढ...." तो चप्पल घालतच बोलतो...

" काय...??" ती तो निघाला म्हणून आपल्या आयडिया वर खुश झाली होती पण त्याच बोलणं ऐकून ती ताडताड उडालीच आपल्या जागेवर...



पात्रांची ओळख

अर्जून पंडित ( कथेचा नायक...)
नील आणि सुरभी पंडित ( नायकाचे आई वडिल,दिल्लीचे मोठे बिझनेसमन )
कोमल पंडित ( नायकाची बहिण )
रोहित व प्रिती पंडित ( नायकाचे कझन व वहिनी कम अर्जून ची मानलेली बहिण)
सुनील आणि लाचो ( नायकाचे काका काकू...रोहितचे मॉम डॅड...)

नगमा शेख ( नायिका )
शबनम शेख ( नायिकाची अम्मा...)

सध्या तरी एवढेच पात्र ..नंतर जसजसे येतील तश तशी ओळख होईलच ..

क्रमशः

काय करेल नगमा आता...?? घर सोडेल कि त्या घरमालकाशी लग्न...?? आणि ईकडे अर्जून आपल्या किट्टू ला कधी माफ करू शकेल का...?? जाणून घेण्यासाठी वाचत रहा एक पाकिस्तानी छोरी,एक भारतीय छोरा यांची प्रेमकथा... नागार्जुन


इतर रसदार पर्याय