बेला 🌿
"बेला अग आवरले का, किती वेळ? उशीर झालाय आधीच पटकन आवरून खाली ये. "
"हो आई आले, "
तिने तिथूनच मोठ्या आवाजात सांगितले, आणि पटकन केसात गजरा माळला. व राहिलेेेल्या
फुलांचा सुगंध तिने श्वासात भरला. आणि तिथेच टेबल वर ठेवून ती खाली आली .भारीच वेड होत तिला मोगऱ्याच्या फुलांच.
"आई आवरले माझे, निघायचे का? "
"हो बाई चल पटकन, अनु कोठे आहे? नाहीतर परत चिडत बसेल तो. "
"आई ते बाहेर आहेत, आणि बाबा पण."
"अग बाई हो का चल पटकन मग."
त्या दोघी बाहेर आल्या ,आज देवदर्शनासाठी मंदिरात सगळे जायचे होते आणि पूजा पण होती .
"काय आई किती उशीर, केव्हा पासून थांबलो आहे मी."
एक रागीट कटाक्ष तिच्या कडे टाकत तो आईला म्हणाला.
"अनुराग चल पटकन नाहीतर उशीर होईल आपल्याला." आई काही बोलायच्या आधीच बाबा म्हणाले.
ओ तर स्वारी खुपच चिडली आहे, बघतेच किती वेळ रागवतो. ती मनातच हसली.
मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतले, पुजा सुरू होण्या साठी अजून वेळ होता.
" अनुराग,पुजा संपल्यानंतर आम्ही दोघे जरा मावशी कडे जाणारा आहोत."
"का बाबा ,अचानक ठरले का जायच?"
"अचानक नाही रे, तुझी मावशी दोन दिवस झाले बोलावते आहे तिला. तुमच लग्न झाल्यापासून भेट झाली नाही तर सहजच भेटायला जाणार आहे. "
"बर मी येतो तुम्हाला सोडून, पुजा झाल्यानंतर. "
"हो ठीक आहे येताना उशीर झाला तर येऊ आम्ही दोघे. तसा कॉल करतो मी तुला. "
दोघात काही तरी बिनसले आहे हे कळले होते, त्याना म्हणून थोडा एकांत देऊ यात हे आई बाबांनी ठरवले होते.
पुजा झाल्यानंतर ते घरी निघाले, बेला ला घरी सोडून अनुराग परत आई बाबांना घेऊन निघाला.
बेला घरी आली, पटकन फ्रेश होऊन तीने कॉफी बनवली व गॅलरीत येउन बसली.
खुपच चिडला आहे हा तर, बोलायला पण तयार नाही. येवढी तयार झाले आज त्याला आवढते तशी पण, नाही नीट बघितल पण नाही.
सकाळी उठले तर कसे जवळ घेऊन झोपले होते. आणि जाग आली तर पटकन उठून बसले. हे बरय आधी सवय लावायची आणि मग अस वागायचे.
गाडी पार्क करून तो आत मध्ये आला, तर बेला तेव्हा किचनमध्ये होती. तिने दुध घेण्यासाठी फ्रीज उघडून दुध बाहेर काढले, आणि मागे वळली तेवढ्यात पाणी घेण्यासाठी आलेल्या अनुरागला तिचा धक्का लागला, त्यामुळे दुध त्याचा अंगावर सांडले.
"काय हे बेला,काय करतेस तु सगळं दुध सांडलस अंगावर.
"सॉरी सॉरी खरच, चुकुन झाल तुम्ही असे अचानक मागे येऊन थांबलात मला कळलच नाही ."
"आत परत कपडे बदलावे लागतील. काय कटकट आहे."
म्हणत तो बेडरूम मध्ये गेला.
तिच्या डोळ्यांत टचकन पाणी आले. तिची चुकी नव्हती तरी तो चिडलेला अजुनच चिडला.
ती पटकन वर त्याला आवडते तशी कॉफी बनवून घेऊन गेली.
उगाच चिडलो का मी इतका, जास्तच अपसेट झाली ती,
स्वःताशी बोलतच तो बाथरूमधधून बाहेर आला, तर कॉफी टेबल वर ठेवलेली होती.
त्याने कॉफी घेतली व बाल्कनीत आला.तर
ती समोर गार्डन मध्ये काही तरी करत होती. कालच आईने आणलेल गुलाबी गुलाबाचे रोपटे , ते लावयची तयारी चालू आहे वाटत.
तो वरूनच बघत होता तिची धडपड.
"हम्म नुसतेच वरून बघतायत, वाटल येतील मदत करण्यासाठी पण नाही ,आम्हाला तर भरपूर राग आला आहे ना ,मी पण कोणाकडून अपेक्षा करतेय."
जाउदे बाई बेला तुलाच कराव लागेल,खडूस कुठला....
"काही तरी बडबड करत काम करायच सुरू आहे वाटत मॅडमच"
त्याला तिची ही मनाशी बोलत काम करण्याची सवय माहिती झाली होती.
पदर खोचलेला, केसाची बट गालावर खेळत होती. उन्हे उतरतीस लागली होती, त्याच पिवळसर केशरी प्रकाश तिच्या चेहर्यावर पसरला होता. खुपच गोड वाटली त्याला ती.
झाल कस रागवायच हिच्यावर यार ,तो बघतच होता तेव्हाच ती मोठ्यणे ओरडली
"अहहा आईगऽऽ"....
खड्डा खोदत असताना बोटाला चांगलेच लागले होते.
"तो वरूनच पळत खाली आला,
बेला काय झालं, किती लागलय हे नीट लक्ष देऊन करता येत नाही का तुला "
तो तिला ओरडत म्हणाला.
आधीच बोटाला लागले होते, त्यात तो तिला ओरडल्या मुळे अजुनच रडायला लागली.
"अग रडतेस काय अशी"
त्याने तिला मिठीत घेऊन शांत केले .
"तुम्ही असे का वागता, माझ्याशी किती रागवले आहात, आता पण किती जोरात ओओरडले"
"अगं वेडाबाई तू आधी शांत हो रडू नकोस बरं त्याने तिचे डोळे पुसले. "
त्याच्या कुशीतून त्याच्याकडे बघून रडत होती ती. रडल्या मुळे गाल, नाकाचा शेंडा लाल झाला होता.
त्याला खूपच गोड दिसली.
"बर राहू दे असंच आपण नंतर लावू रोप,आधी वर चल ड्रेसिंग करायला पाहिजे."
तो तिला वर घेऊन आला,
बोटावर हळूहळू फुंकर घालून तो ड्रेसिंग करत होता.
ती शांतपणे त्याच्याकडे बघत बसली होती .
"एम सॉरी बेला, मी जास्तच चिडचिड केली."
"कसे उगाच लहान मुलांसारखे चिडून बसले होते ,आता मी रुसली आहे, मी पण नाही बोलणार तुमच्याशी"
"खरंच रुसली आहे, पण मला तुजा रुसवा काढायला नक्कीच येतो."
तो हळूच तिला मागून मिठीत घेत कानात कुजबुजला, "काडू तुजा रुसवा सांग? "
त्याच्या अशा जवळ येण्याने ती शहारली होती,
तिच्या मानेत चेहरा घुसळत त्याने तिला पुढे काही बोलूच दिले नाही.
त्याच्या रुसवा काढण्याच्या पद्धतीने ती मात्र केव्हाच मनली गेली होती......
संध्याकाळ जास्तच रंगात आली होती. ❤✨