अनाथ - भाग 1 Ankush Shingade द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अनाथ - भाग 1

अनाथ (कादंबरी) भाग एक
अंकुश शिंगाडे
ती रात्रीची वेळ होती. बहुतेक ती अमावस्येची काळी रात्र होती. बाहेर काळाकुट्ट अंधार पडला होता. वीजा चमकत होत्या. तसा पाऊस सुरु झाला.
बाहेर पाऊस सुरु झाला होता. तो धो धो ही पडायला लागला होता. सदा मात्र आतमध्ये म्हणजेच घराच्या आत पांघरुण घेवून झोपला होता. तो गाढ झोपेत होता. अशातच त्याच्या कानावर लहान बाळाच्या रडण्याचा आवाज आला. तसा तो विचार करु लागला. कोणाचं लहान बाळ रडत असावं एवढ्या काळोख्या रात्री. त्याच्या मनात संभ्रम निर्माण झाला. तसा बाळाचा रडण्याचा आवाज आणखी तीव्र झाला.
तो आवाज काही बंद होत नव्हता. ते पाहून सदानं दरवाज्याची कडी उघडली तर पाहतो काय, तिथं लहानगं बाळ होतं. ते लहान बाळ रडत होतं. तसं त्या बाळाकडे पाहताच वाटत होतं की त्याचा नुकताच जन्म झाला असावा. एवढं ते लहान होतं. ते बाळ कुणीतरी त्याच्या दारासमोर आणून टाकून गेलं होतं.
सदानं दरवाजा उघडला खरा आणि पाहिलं खरं ते लहान बाळ. परंतू त्याला आता विचार येत होता की या बाळाला उचलावं की नाही. तसा विचार करीतच त्यानं त्या बाळाला उचललं. तसं त्या बाळानं आपलं केकाटणं बंद केलं. त्यामुळं की काय, सदाला हायसं वाटलं.
सदा........सदा व त्याची पत्नी राणीबाई दोघंही सुखी होते. दोघांमध्ये कशाचीही कुरकूर ती नव्हतीच. तसं पाहता सदाच्या विवाहाला आज सतरा वर्ष झाले होते. परंतू अद्यापही त्यांना मुलबाळ नव्हतंच. ते पाहून की काय, सदाला ते लेकरु सापडणं म्हणजे जणू परमेश्वरानं दिलेला प्रसादच वाटला. त्यानं ते लेकरु हातात घेतलं. इकडेतिकडे पाहिलं. त्यानंतर त्याला कोणीच न दिसल्यानं त्यानं आकाशाकडे पाहिलं. मनोमन विधात्याचे आभार मानले व त्यानं त्याची पत्नी राणीला आवाज दिला.
"राणे, राणे."
राणी गाढ झोपली होती. दिवसभर शेतात राबू राबू थकली होती बिचारी. तसंच घरी आल्यावर तिनंच स्वयंपाक केला होता. त्यामुळंच ती आणखीनच थकली होती. तसा गाढ झोपेतच तिनं सदाचा आवाज ऐकला व ती म्हणाली,
"काय करतुया. झोपा न् तुमी आन् मले बी झोपू द्या. रात्र निशाचरावाणी जागताय आन् मले बी जागवताय. झोपा मुकाट्यानं आन् आतं मले आवाज देवू नोका."
तो पत्नीचा आवाज. तसा तिचा पारा चढलेलाच होता. त्यातच झोपमोड झाली असल्यानं तो पारा आणखीनच चढला होता. तसा तो विचार करु लागला. तिला उठवावं की नाही. परंतू तो प्रसंग असा होता की तिला उठवणं भाग होतं. त्यामुळं तो उठवीत होता तिला. ती झोपलेलीच होती. तसा परत सदा म्हणाला,
"राणे उठ, तुले देवानं परसाद देलाय. पाय तुही सुनी गोद देवानं कशी भरलेली हाये."
ती राणी, त्या राणीनं तो गोद शब्द ऐकला. तशी ती खडबडून उठली. ती त्या बाहेर वरणीत उभ्या असलेल्या सदाजवळ गेली. म्हणाली,
"काय झालंया धनी?"
"काय नाय. पण पायनं माह्या हातात काय हाये ते? अवं देवानं आपल्याले परसाद देला परसाद. घे याले."
"म्हंजी?"
"अवं लेकरु हाय."
"लेकरु! कोणाचं लेकरु हाय?"
"ते समदं माईत नाय. परंतू ते लेकरु हाय. या धरणी मायनं आन् आकाश बापानं देलेलं लेकरु. जशा गारा येतेत. तसं हे लेकरु पाडलंया देवानं आन् ते बी माह्या या सदाच्या वरणीत. देवानं आपलं आयकलं राणे. आतं कोणी तुले वांजुटी म्हणणार नाय."
'वांझोटी' तो शब्द. राणीला गतकाळातील वांझोटी या शब्दाची आठवण झाली. कोणीतरी तिला पुत्र नसल्यानं वांझोटी म्हटलं होतं. तसा तो त्यावेळी शब्द ऐकताच तिला राग आला होता. परंतू आता तो पुत्र तिला सापडल्यानं कोणी तिला वांझोटी म्हणणार नाही असंही तिला वाटलं व तिनं त्याला हातात घेतलं. त्याचा लाड करीत ती प्रेमानं त्याला कुरवाळू लागली. तसा सदा म्हणाला,
"आतं त्याले भायेरच ठेवशीन का त्याले अंदर नेशीन. वला झाला हाये नं तो."
ते सदाचे शब्द. ते सदाचे शब्द पुन्हा तिच्या कानात चिरुन गेले. तसं तिनं त्याला आतमध्ये नेलं. त्याचं अंग पुसलं. त्याला गरम बारुत्यात गुंडाळून घेतलं व त्याला आपल्या स्तनाला लावलं. तोच एक आश्चर्य. तिला गाईला जसं पान्हा फुटतो आणि जसं वासरु होतं व ते वासरु स्तनाला लागताच ते वासरु जसं गुटगुट दूध पिवू लागतं. तसं ते तिचं दूध पिवू लागलं. तसा तिला पान्हाच फुटला होता. तो पान्हा तिला आश्चर्यात टाकून गेला होता.
ते लेकरु खुप भुकेलं होतं. त्याला स्तनाला लावताच ते कसकसून दूध प्यायलं आणि त्यानंतर ते झोपी गेलं. तशी ती रात्र संपली व दिवस उजळला. दिवस उजाडताच पाऊस थांबला होता. त्यामुळं सदा बाहेर पडला. त्यानं त्याला लेकरु गवसलं याचा काही गाजावाजा केला नाही.
तो सदा. त्याच्या अंगणातूनच रस्ता जात होता. त्याच रस्त्यानं लोकं घरी शौचालय नसल्यानं उघड्यावर शौच करण्यासाठी जात असत. तशी दिवसभर त्याच रस्त्यानं येणाजाणा-यांची वर्दळ असायची. तसं सकाळी सकाळी गावातला एक व्यक्ती मोहन शौच करण्यासाठी त्याच रस्त्यानं जात होता. त्यानं शौचाकडे जाता जाता सदाच्या घरी एका लहान बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकला व तो शौचाकडे न जाता गावात माघारी फिरला व त्यानं धुम ठोकली. तसा तो गावात सांगत सुटलाय. सदाच्या घरी लहान बाळ जन्माला आलंय. मी माझ्या कानानं लहान बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकलाय.
मोहननं तसं सांगताच लोकांनाही आनंद झाला व काही लोकं त्याचेबद्दल चांगला विचार करु लागले. कोणी म्हणू लागले की बरं झालं. बिचारे कित्येक वर्षापासून पुत्रासाठी तरसत होते. तर कोणी म्हणत होते की किती आतल्या गाठीचे आहेत हे. सदाच्या बायकोला दिवस गेले आणि ती बाळंतही झाली तरी काही कळलंच नाही आणि त्यानं सांगितलंही नाही तर कोणी म्हणत होते की तिचं तर पोटच दिसत नव्हतं. मग तिनं बाळाला जन्म दिलाच कसा? परंतू काहीही असो, सर्वांना सदाला झालेल्या पुत्रप्राप्तीचा अतिशय आनंद झाला होता. तसा सदालाही अतिशय आनंद झाला होता.
सदानं आपल्या मुलाचं नामकरण केलं. तसा सदा आपल्या शेतात काम करीत करीत आपल्या लेकराला लहानाचं मोठं करीत होता. अशातच तो शिक्षणाच्या वयातील झाला. तशातच एक दुर्घटना झाली. सदा व त्याची पत्नी दोघंही एका कार अपघातात मरण पावले. तसा तो पुन्हा अनाथ झाला.
सदाचं ते मुल. त्या मुलाचं नाव राघव ठेवलं होतं. सदा व त्याची पत्नी मरण पावताच त्याचं मुल असलेल्या राघवपुढं प्रश्न उभा राहिला, आपण जगावं कसं? कारण आजपर्यंत सदा आणि त्याची पत्नी दुस-याच्या शेतात राबून राबून व मेहनत करुन करुन स्वतःचा उदरनिर्वाह करीत होते. परंतू आता प्रश्न पडला होता की आपण आपलं पोट भरायचं कसं? शेवटी पोटच ते. त्या पोटासमोर भीक मागण्याशिवाय पर्याय नव्हता. तो रस्त्यारस्त्यांवर भीक मागू लागला व जगू लागला.
ते शिक्षणाचं वय. त्या वयात त्याच्या एवढी समवयस्क मुलं शाळेत जात होती. त्यालाही शिकावं वाटत होतं. शाळेत जावंसं वाटत होतं. परंतू शिकवणार कोण? अन् शाळेत पाठवणार कोण? अन् शाळेत जरी जात असलं तरी पोटाला अन्न देणार कोण? सारेच प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभे होते. राघव विचार करु लागला. तसा आपली कैफियतही काही लोकांसमोर मांडू लागला. प्रश्न मोठा बिकट होता.

************************************************

ती रस्त्यारस्त्यावर भिका-यांची टोळी. वय वर्ष सहा ते चौदा. काहींची आई मरण पावली होते अकाली. काहींच्या वडीलांचा पत्ताच नव्हता. त्यांना आई होती. त्या बहुतेक सत्तावीस अठ्ठावीस वर्षाच्या. भीक मागत होते ते सर्व. तीनचार भाऊबहीण होते. काही बहिणींच्या कडेवर लहानसं बाळ. अस्ताव्यस्त केस होते. कपडे मळकट होते. नजर आशेची होती. त्यात राघवही सहभागी होता.
लोकं गाडीनं जात असत. ते जात असतांना या भिका-यांना चार दोन रुपये देत. परंतू कोणीच त्यांच्याकडे द्या वा करुणेनं पाहात नसत. एक दिवस असाच एक पत्रकार त्या रस्त्यानं जात होता. तसे पत्रकार म्हटलं तर विलक्षण बुद्धीमत्तेचे. त्यामुळंच त्याची भुरटी नजर त्या टोळीतील राघववर पडली. त्याच्यासोबत बाकीची मुलं होती. अचानक तो मुलगा त्याचेसमोर आला. त्यानं हात पसरला व म्हणाला,
''एक दोन रुपये द्या ना साहेब. भूक फार लागली हाये.''
ते शब्द........ते शब्द कुणालाही दया आणणारे होते. कुतूहलानं त्या पत्रकारानं आपली गाडी रस्त्याच्या कडेला लावली व म्हटलं,
"मी देणार पैसे. एकदोन नाही जास्त देणार. परंतू माझ्या प्रश्नाचं उत्तर द्याल काय?"
तसा राघव म्हणाला,
"आम्हाले वेळ नाय."
तो त्यांचा प्रश्न...... तो त्यांचा प्रश्न. त्या प्रश्नावर उत्तर देत पत्रकारानं म्हटलं,
"मी तुम्हा सर्वांना जेवणही देणार. परंतू माझ्या प्रश्नांचं उत्तर द्या."
"ईचारा. तुमचे प्रश्न ईचारा. परंतू लवकर ईचारा." राघव लगबगीनं म्हणाला.
तो मोठा मुलगा. बाकी त्या टोळीत सर्वजण लहान होते. त्यात एक मुलगीही होती. तशी ती मुलगीही बोलत होती मधामधात. तसा तो पत्रकारही भराभर त्याचे प्रश्न विचारु लागला व राघवही त्याला भराभर आपली उत्तरं देवू लागला. पत्रकाराचे प्रश्न होते.
"तुम्ही भीक का बरं मागता?"
"काय करणार. उपाय नाय."
"का बरं?"
"आमचं पोट भरत नाय."
"का बरं? वडील काय करतात?"
"..........." तसं विचारताच तो मुलगा इकडं तिकडं पाहू लागला. बहुतेक त्याला वडील म्हटलेलं समजलं नसावं. तसं समजून पत्रकारानं म्हटलं,
"तुमचा बाप काय करतो?"
तो प्रश्न....... तसं त्यानं डोळ्यातून अश्रू काढले. तसा पत्रकार म्हणाला,
"काय झालं?"
"काय नाय." तो राघव अश्रू पुसत म्हणाला.
"मले बाप नाय."
त्याचं ते उत्तर. पत्रकाराला अतिशय वाईट वाटत होतं. तसा तो तरी काय करणार होता त्यांच्यासाठी. फक्त प्रश्नच विचारु शकत होता. बाकी काही नाही. त्यात त्या राघवचा दोष नव्हता. तसा पत्रकारानं पुन्हा प्रश्न विचारला.
"किती भाऊबहीण आहात?"
किती भाऊबहीण. राघव चूप बसला. तसा त्या पत्रकारानं त्या मुलीसमोर प्रश्न केला.
"किती भाऊबहीण आहात?"
त्या पत्रकाराचा तो प्रश्न. तशी ती म्हणाली
"पाच. पाच भाऊबहीण."
पत्रकाराचा प्रश्न. तसं तिचं उत्तर ऐकून सुन्नं वाटलं. पाच. पाच भाऊबहीण. तसं ऐकताच सुन्न वाटणारच. कारण तिची आई काही तेवढी मोठी वाटत नव्हती. ती अगदी लहानच वाटत होती. बहुतेक तो बालविवाह असावा. तसा पत्रकारानं पुन्हा एक प्रश्न विचारला,
"किती बहिणी अन् किती भाऊ?"
"आम्ही बहिणी चार. हा मा भाऊ शेवटचा. जो माह्या कडेवर आहे."
ती मुलगी बोलत होती टोळीतील आणि राघवही तिच्या तोंडाकडं निपचीतपणे पाहात होता. तो मौन बाळगून होता.
ती लहान मुलं. अगदी त्या पत्रकाराच्या प्रश्नांचं उत्तर निर्भीयतेनं देत होती. तसे त्या पत्रकारानं त्या मुलीवर दया दाखवून तिला शंभर रुपये दिले. तसे राघवच्याही हातावर शंभरच रुपये दिले व शेवटचा प्रश्न विचारला,
"बेटा, शाळेत जाता काय?"
"नाय."
"का बरं?"
"आई, शिकवत नाय. कोण शिकवणार?"
"तुमची शिकायची इच्छा आहे का?"
"होय."
तो त्या पत्रकाराचा शेवटचा प्रश्न. त्यातच त्या मुलीचं उत्तर. आम्हालाही शिकायचंय. परंतू आई शिकवत नाही आणि ती आई तरी कशी शिकवणार. तिच्यावरच भीक मागण्याची वेळ. ती साधं आपल्या बाळांना जेवनच पुरवू शकत नाही. मग शिक्षण दूरच.
ती मुलगी शिकू शकत नव्हती. ना तिचे भाऊबहीण. त्यात त्या मुलांचा दोष नव्हता. दोष होता तो त्यांच्या मायबापाचा. परंतू ते तरी काय करणार. त्यात दोष त्यांचाही नव्हता तर दोष होता त्यांच्यातील शिक्षणाचा. कारण ते शिकलेले नव्हते. त्यामुळंच गरज लक्षात न घेता त्या मायबापानं एवढी मुलं जन्मास घातली होती. पत्रकारानं तिला पैसे दिले व तो निघून गेला. परंतू त्याच्या मनात ते प्रश्न तसेच बोलके राहिले. त्याची उत्तरं त्यालाही कधीकधी सुन्न करुन सोडत होती.
त्यानं पैसे दिले त्या मुलीला. ती त्याची चूकच होती. कारण असे पैसे दिल्यानं मुलांना सवय पडते. त्यातच मायबापांनाही वाटते की आम्ही कितीही मुलं पैदा केले तरी आमचं काही कमी होत नाही. आमचं व आमच्या मुलांचं पोट भरतं. देव देतो सर्वांना दाणापाणी. प्रत्येक जन्म घेणारा जीव आपला दाणापाणी घेवूनच जन्माला येत असतो. ही अंधश्रद्धा. लेकरं होणं ही देवाची देणगी. त्यात कुटूंब नियोजन करणं म्हणजे देवाच्या कार्यात बाधा घालणं. असल्या अंधश्रद्धेमुळंच अशी कुटूंब अनेक मुलं जन्मास घालत असतात. मग ते आपल्या मुलाला जन्म देतांना त्यांच्या खानपान, त्यांच्या कपडेलत्त्याचा, त्याच्या शिक्षणाचा वा इतर तत्सम गोष्टीचा विचार करीत नाहीत. कुटुंबनियोजन तर करीतच नाहीत.
आज विचार येतो की भारत देश स्वतंत्र झाला. स्वातंत्र्य मिळून आज छ्यात्तर वर्ष झालीत. परंतू ख-या अर्थानं देशाचा विकास झाला काय तर याचं उत्तर नाही असंच येतं. आज भारत विकासाच्या क्षेत्रात आघाडीवर आहे. देश अवकाशातच नाही तर मंगळावरही पोहोचला आहे. सरकार म्हणतं की देशात गरीबी नाही. कशी दिसणार. कारण ज्यावेळेस सरकारचे देशपातळीवरील नेते जिल्हास्तरावर भेटीस येतात. तेव्हा स्थानीक नेते तेथील रस्ते सुशोभीत करतात. तसेच इतरही देश म्हणतात की भारत एक विकसीत देश असून सुसंपन्न देश आहे आणि तेही म्हणणारच. कारण ज्यावेळेस ते येतात. तेव्हा याच देशातील सामान्य प्रशासन विभागाद्वारे रस्ते सुशोभीकरण केलं जातं. नालेही कापडानं झाकली जातात. तशाच भिंतीही रंगवल्या जातात.
महत्वाचं सांगायचं म्हणजे आजही आपल्या देशाला जगात सुसंपन्न समजलं जातं. परंतू या देशातील सामान्य लोकांकडे पाहिल्यास ख-या स्वरुपात देश सुसंपन्न दिसतो काय? याचं उत्तर नाही असंच येईल. कारण देशात आजही विश्वकोटीचं दारिद्र्य आहे. परंतू दारिद्र्य का आहे याचा विचार आपण करीत नाही. आपल्याला माहीत आहे की देश स्वतंत्र झाला व कायदे बनले. देश कायद्यानुसार चालतो. परंतू खरंच जे कायद्यानुसार चालत नाहीत. त्यांच्यावर आजही देशातील प्रशासन विभागाचे लक्ष आहे काय? याचेही उत्तर नाही असंच येईल. आज देशात विश्वकोटीचं दारिद्र्य तर आहेच, व्यतिरीक्त शिक्षणाचा अभावही आहे. आज याच शिक्षणाच्या अभावानं काही काही परिवारात विवाह होतो तो बालवयातच आणि मुलंही जन्मास घातली जातात बालवयातच. किती मुलं जन्मास घालावी याची मर्यादा पण नाही. तसं पाहता आजही काही काही कुटूंबात मुलगी नकोच म्हटलं जातंय. मुलाच्या जन्मासाठी अनेक मुली जन्मास घातल्या जातात. काही काही परिवारात तर मुलांचा जन्म होवूनही मुलं जन्मास घातली जातात. काही काही महाभाग तर दोष धर्माला देत म्हणतात की मुस्लिम लोकं मुलांना अल्लाची देण मानून मुलं जन्मास घालतात. कुटुंबनियोजन करीत नाहीत. परंतू जे बोलतात त्यांना कळत नाही की आपली चार बोटंही आपल्याकडंच आहेत. आज मुस्लिम समुदाय जरी मुलांना अल्लाची देण समजत असले तरी बरीचसे मुस्लिम लोकं आज सुधारले आहेत. तेही कुटूंब नियोजन मानतात. परंतू जे त्यांना दोष देतात. त्यांच्या धर्मातही आज काय दिसतं? आजही त्यांच्या समाजात कुटूंब नियोजनाचा अभाव दिसतो. आजही बालवयातच बालविवाह होतो. अशी बालविवाह करणारी बरीचशी कुटूंबं आहेत. अन् अशी बरीचशी कुटूंबं देशात आहेत की जी कुटूंब नियोजन न करता अनेक मुलं जन्मास घालतात. त्यांना कुटूंब नियोजन समजावून सांगीतलं तर म्हणतात की ती आमची मुलं. आम्हाला पोषायचा नेट नाही लागत. मग तुम्हाला का वाटावं असं. बरोबर आहे त्यांचं. परंतू देशाला त्यांची मुलं पोषायचा नेट लागतो. ते कोण समजून घेणार? त्यातच मुलं तर आजही एवढी जन्मास घातली जातात की एकाला चड्डी मिळत असते घालायला आणि दुस-याला बनियान. लहान मुलं तर नग्नच असतात बाराही महिने.
अशी मुलं........त्यांच्या शिक्षणाबाबत सांगायचं झाल्यास त्यांच्यात शिक्षणाचा अभाव आहे. शिक्षणाला वाघिणीचं दूध म्हटलं जातं. ते प्यायल्यावर गुरगुरणार. परंतू ते दूध प्राशन करतील तेव्हा ना. कारण बरीचशी अशी कुटूंब देशात आहेत की त्यांचं पिढीजात तेच ते पिढीजात जगणं सुरु आहे. बालविवाह, मुलं जास्तीत जास्त पैदा करणं. त्यांना भीक मागायला लावणं. त्यातूनच कसंतरी जगवणं. शिक्षण अजिबात न शिकवणं. मुली पैदा होत असल्यास भ्रृणहत्या करणं. मुलांच्या जन्माचा उत्सव मानणं. मग लोकसंख्या कितीही वाढो वा काहीही होवो. त्यांना यात काहीही घेणंदेणं नाही. कारण त्यांना काहीच फरक पडत नाही.
त्यांची विचारशक्तीच मरण पावलेली असते. त्यांच्या जीवनात मुलांना कसं पोषावं? कसं वाढवावं? शिक्षण शिकवावं की नाही? या गोष्टीचं काही महत्व नाही. फक्त मुलं जन्मास घालणं एवढंच जाणतात ते. संस्कार अजिबात नाही त्यांच्या जीवनात. मग एक मुलगा मेला काय अन् जीवंत राहिला काय? याचंही महत्व नाही त्यांच्या जीवनात. समजा प्रकृती बिघडलीच तर ते दवाखान्यात जात नाहीत. ते त्या भोंदू वैद्यूकडं जातात. तो तात्पुरती जडीबुटी देतो. त्यावर काही किरकोळ आजार बरे होतात. परंतू काही आजार गंभीर स्वरुपाचे असतात. ते बरे होत नाही व प्रसंगी त्यात ते मरण पावतात. अगदी अकालीच मरण पावतात काही काही लोकं. तसंच ते अनेक मुलं जन्मास घालत असल्यानं आपल्या मागे मरणानंतर असेच सोडतात. जे नाईलाजास्तव रस्त्यारस्त्यावर भीक मागून कसेतरी जगतात. त्यांच्यातही शिक्षणाचा अभाव असल्यानं तेही पुढं तसंच अल्पवयात विवाह करुन मोकळे होतात.
मुलं जन्मास घालणं ठीक आहे. प्रत्येकानं मुलं जन्मास घालावी. तो त्यांचा प्रदत्त अधिकार आहे. परंतू त्यात काही मर्यादा आहे की नाही. मुलं तरुणपण आहे तेव्हापर्यंत अमर्याद जन्मास घातली जावू शकतात. परंतू त्यासाठी देशाचा विचार व्हावा की नाही. कारण आज देशाची लोकसंख्या अधिक आहे. त्यामानानं राहण्यासाठी लागणारी जमीन कमी आहे. अन्नधान्य आहे. परंतू ते तेवढंच कमी आहे. त्यामुळंच लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून विचार करुन लोकांचे पोट पालवत असतांना वा त्या लोकांसाठी सर्वच प्रकारच्या सोई करीत असतांना देशाला कित्येक कोटी रुपयाचं कर्ज घ्यावं लागतं. याचाही विचार होणं गरजेचं आहे. शिवाय त्या लोकांच्या शिक्षणाच्या सोई. त्या इवल्या इवल्या बाळांची मनं. तेही जाणणं गरजेचं आहे. त्यांनाही वाटतं की आम्हालाही शिकता यावं. परंतू शिकवणार कोण? त्यातच काहींचे मायबाप अंधश्रद्धेनं मरतात. अनेक जन्मास घातलेली मुलं मागे सोडून. ती डॉक्टरकडे न गेल्यानं व भोंदूकडं गेल्यानं मरण पावतात. ते जाणारही कसे डॉक्टरकडे? कारण डॉक्टरकडे जायला पैसे लागतात.
महत्वाचं म्हणजे यावर आजच उपाय करण्याची गरज आहे. तो उपाय म्हणजे अशा अनेक मुलं जन्मास घालणा-या लोकांचे सर्वेक्षण व्हावे. त्यांना सरकारनं शेल्टरहोममध्ये टाकावे. त्यांना शिक्षण द्यावे. ते शिक्षण निःशुल्क असावे. तसंच जे अनेक मुलं जन्मास घालतात. त्यांना देशातील कोणत्याही सोईसुविधा देवूच नये. कारण त्यांच्यासाठी सोईसुविधा करण्यासाठी व्यवस्था करीत असतांना त्या सुविधेचा बोझा देशावरच पडतो.
विशेष सांगायचं म्हणजे देशात कुटूंब नियोजनाची प्रक्रिया जबरदस्तीनं राबवावी. कुटूंब नियोजन एक किंवा दोनवरच जबरदस्तीनं करावं. तिसरं अपत्य झाल्यास कोणत्याच सुविधा देवू नये. सुविधा नाकाराव्यात. मग ते उपाशी मरण पावले तरी चालेल. सरकारनंही याबाबत कठोर बनावं. केवळ मतदान मिळतं हा उद्देश ठेवू नये. देशहिताचा विचार व्हावा. तसंच अशी जर मुलं भीक मागत असली तरी त्यांना कोणीही भीक देवू नये. तरंच ती मंडळी सुधारतील. जेणेकरून मुलं जन्माला घालणार नाहीत.
ती भिका-यांची टोळी.........त्या टोळीत अनेक सदस्य होते. त्या टोळीत अनेक महिलाही होत्या. अनेक लहान लहान मुलंही होती. वृद्धही होते. वृद्धांची संख्या जरा जास्तच होती. पुरुषही होते. मात्र पुरुषांची संख्या स्रियांपेक्षा कमी होती. त्याच टोळीत राघवही होता.
ती टोळी शहरात वास्तव्याला होती. परंतू राघव तिथं पोहोचला कसा? त्याचं कारण म्हणजे राघवचं वागणं. राघव जेव्हा लहानाचा मोठा होत होता आणि ज्यावेळेस राघवचं शाळेत नाव टाकायचं वय होतं, त्यावेळेस राघवचे आईबाप म्हणजे सदा व त्याची पत्नी मरण पावली होती. त्यातच लहानाचा मोठा होत असतांना राघवला मोठमोठ्या अडचणीचा सामना करावा लागला. त्याचं वय सहा वर्षाचं होतं, ज्यावेळेस त्याचे वडील मरण पावले. वय वर्ष सहा म्हणजे असं वय होतं की ज्या बाल वयात काय करावं? पोट कसं भरावं? हेही कळत नव्हतं. ते वय म्हणजे शाळेत शिकायचं वय होतं. परंतू राघवला या वयात कोणीच पोषणारं नसल्यानं व कोणीच आधार देत नसल्यानं त्याला त्या वयात भीक मागण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. अशातच तो पोटासाठी भीक मागू लागला.
राघव भीक मागत होता. तसं प्रारब्धही त्याच्या बाजूनं नव्हतं. त्यामुळं की काय, गावात एकदा एका सावकाराच्या घरी चोरी झाली. चोरी कुणी तरी दुस-यानंच केली होती. परंतू नाव राघववर आलं होतं. त्यातच आता पोलीस येतील, आपल्याला पकडून नेतील या भीतीनं राघवनं गावातून पळ काढला. तो शहरात आला होता.
ते नवनवं शहर. ते लहानगं वय. ती रस्त्यावरील वाहनं अन् ती रस्त्यावरील वाहनांची गर्दी. त्या गर्दीत हरवलेला तो राघव. राघवला त्या गर्दीत हरवल्यासारखंच वाटत होतं. त्या वाहनांच्या गर्दीतून पाय कसा काढावा व रस्ता कसा ओलांडावा असा प्रश्न राघवला पडत होता. काय करावं सुचत नव्हतं. अशातच त्याचं लक्ष त्या रस्त्यावरच राहणा-या व भीक मागणा-या कुटूंबाकडं गेली. त्यातच त्याची नजर तिच्याकडे गेली. जी जन्मली म्हणून तिला तिच्या आईसह घरातून हाकलून दिलं होतं तिच्या वडीलानं. होय. मानसी नाव होतं तिचं. मानसी जन्मापुर्वी ती जेव्हा गर्भात सामावली, तेव्हा तिच्या वडीलांना बराच आनंद झाला होता. परंतू जेव्हा तिचा जन्म झाला. तेव्हा मात्र दुःख. पुत्री जन्माचा आनंद नव्हताच तिच्या घरी. उलट ती पुत्री म्हणून जन्मली म्हणून तिच्या वडिलांनी तिला व तिच्या आईला हाकलून देताच काय करावं म्हणून ती व तिची आई रस्त्यावर आली होती व आता त्या दोघीही भीक मागत होत्या. त्यांना आता भीक मागतांना काहीही वाटत नव्हतं. उलट आनंदच वाटत होता त्यांना.
राघव जेव्हा रस्त्यावर आला. तेव्हा मानसीच्याच आईनं त्याला बळ दिलं होतं. मानसीची आई जेव्हा गरोदर राहिली. तेव्हा तिच्या आईच्या चेह-यावर विलक्षण तेज होतं. तिला आनंद वाटत होता. परंतू ज्यावेळी तिला मानसी झाली. तेव्हा तो आनंद दुःखात बदलला. पुत्र जन्माचा आनंद केव्हाच निघून गेला होता व पहिल्याच दिवशी जिथं घरात ओल्या बाळंतीणीची सेवा केली जाते. तिथं मानसीच्या आईला रस्त्यावर यावं लागलं मानसीला घेवून. त्यामुळं दुःख तर होणारच.

**********************************************************
"कुठं राहतोस बाळ." मानसीची आई राघवला म्हणाली.
राघव लहान होता. त्याचं वय सात वर्षाचं होतं. इवल्या वयात तो शहरात आला. तिथं त्याला यशोदानं पाहिलं. तशी दया आली तिला व तिनं काकूळतीनं विचारलं.
यशोदा मानसीच्या आईचं नाव. ती फार दयाळू होती. तसं पाहता यशोदेनं राघवला पाहताच विचारलेला प्रश्न. परंतू राघवनं त्यावर काहीच उत्तर दिलं नाही. ते पाहून यशोदा पुन्हा म्हणाली,
"ये बाळ. इकडं ये."
यशोदेनं तसं म्हणताच राघव जवळ आला. तशी यशोदा परत म्हणाली,
"बाळ तुले मायबाप नाय का?"
यशोदेनं विचारलेल्या गोष्टी. ते पाहून त्याला ती बरी वाटली व तो तिच्याकडे पाहात तो बोबड्या शब्दात बोलायला लागला.
"नाय, मले मायबाप नाय. माह्ये मायबाप मरण पावले."
"कशानं मेले बाळ?"
"एक्सेडन झाला."
"लय वाईट झालं म्हणायचं."
"............" तो तिचं ऐकून गप्प राहिला. तशी ती म्हणाली,
"अरे बोलत का नाय?"
"आतं मले मायबाप नाय."
"मग आतं जेवनखावण"
तो प्रश्न. त्यावर तो गप्पच होता. ते पाहून यशोदा म्हणाली,
"चिंता करु नगं. मी हाय. मी तुले लेकरागत पालवीन."
राघवला यशोदेनं आपल्या जवळ घेतलं. कुरवाळलं व कुरवाळत ती म्हणाली,
"आता यापुढं मले दोन लेकरं हाईत. मी तुले मानसीसारखंच लहानाचं मोठं करीन. अन् पालनपोषण बी करीन."
तिचे ते शब्द. ते शब्द जणू तिचं वचनच ठरलं होतं. मानसीच्या आईनं म्हणजेच यशोदेनं त्याला जवळच घेतलं नाही तर सांभाळलंही.
राघव यशोदेच्याच आस-यानं राहात होता. दिवसभर भीक मागत होता. जे काही लोकांकडून चार दोन आणे मिळायचे, ते तो यशोदेला द्यायचा व त्यात यशोदा त्याला चारायची. आज मात्र तशी भीक मिळणंही मुश्कील झालं होतं. कारण लोकं फक्त जे म्हातारे असायचे, त्यांनाच भीक देत असत. तरुण किंवा लहान बाळांना सवय लागते, म्हणून त्यांना भीक देत नसत.
राघव जसा यशोदेला पैसा द्यायचा. तशी ती त्याला सांभाळायची आणि त्यानंही त्या लहान वयात तिला अंतर दिलं नाही. तिला तो प्रत्यक्षात आपली आई मानू लागला होता व तिही त्याला आपला दत्तक पुत्रच. तसा तोही मानसीचा सांभाळ करायचा.
दिवसामागून दिवस जात होते. तसा कोरोना आला व ही कोरोनाची लाट जगभर पसरली होती. माणसंच्या माणसं पटापट मरण पावत होती. काय करावं सुचत नव्हतं. स्मशानातही भरपूर रांगा लागल्या होत्या.
कोरोना श्रीमंतांच्या घरी पोहोचला होता, जे कागदालाही हात लावल्यास हात धुवायचे. जेवनही करायचे असेल तर हात धुवूनच. जी मंडळी फार काळजी घ्यायचे.
लोकं जास्त संख्येनं मरतात आहे, हे पाहून सरकारनंही बरीच खबरदारी घ्यायचं ठरवलं. त्यातच सरकारनं स्मशानातील रांगा पाहून कोरोना पसरु नये, म्हणून लॉकडाऊन लावलं.
ते लॉकडाऊन.........कोणीच घराच्या बाहेर पडत नव्हते. साध्या साध्या कामालाही बाहेर पडायला सरकारनं बंदी घातली होती. सारेच कामधाम ठप्प झाले होते. शिवाय घरीच बरेच दिवस बसून खावं लागल्यानं होता नव्हता घरचा बराच पैसा खर्च झाला होता. त्यातच विजेचा आणि कराचा सर्व पैसा जनतेला भरावा लागत होता. त्यामुळंच त्याच खर्चानुसार लोकांना स्वतःचं पोट भरणं कठीण जावू लागलं होतं. काय करावं सुचत नव्हतं.
कोरोनाचा जसा प्रभाव लोकांवर पडला. तसाच प्रभाव यशोदेवरही पडला. लोकं बाहेरच पडणं कठीण झाल्यानं तिला आणि तिच्या या लेकरांना भीक मिळत नव्हती. शिवाय एखादा व्यक्ती बाहेर पडलाच तर तोही काही भीकेच्या स्वरुपात पैसा देत नव्हता. चार दोन आणेही नाहीच. कारण लॉकडाऊन असल्यानं व जवळ पैसाच नसल्यानं, तसंच हाताला काम नसल्यानं व त्यांचीच उपासमार होत असल्यानं ते जवळचा एक रुपया का असेना, देणार कसे? त्यामुळं भीक मिळणं बंद झाली होती. अशातच ही मंडळी श्रीमंतांसारखी स्वतःची काळजी घेत नव्हती. ती सतत हातपाय धूत नव्हती. अंघोळही रोज करीत नव्हती. त्यातूनच कोणाच्या तरी संपर्कात येवून यशोदेला आजारानं जखडलं.
यशोदेला झालेला कोरोनाचा आजार. या आजाराचा उपचार करणं तिला शक्य झालं नाही. शिवाय जवळ भीक मागणं हा तिचा धंदा असला तरी भीक न मिळाल्यानं तिच्याजवळ पैसे नव्हते. त्यामुळंच ती स्वतःचा उपचार कशी करेल! उपचाराला साधारणही पैसा लागत होता, ती तो कुठून आणणार होती. त्यामुळं मानसी व राघवच्या डोळ्यासमोरच तिचा जीव गेला अतिशय तडफडत. त्यामुळं पुन्हा एकदा अनाथ होण्याची पाळी राघववर आली.
सदाला तो सापडण्यापुर्वी ज्या आईनं त्याला जन्म दिला होता. त्या आईनं त्याचा जन्म ती कुमारीका असल्यानं जन्म दिल्यानं व आपली बदनामी होवू नये या धाकानं तिनं ते इवलंसं बाळ जन्मतःबरोबर टाकून दिलं सदाच्या दारात. एकदा अनाथ करुन टाकलं त्याला. बरं झालं की त्याचं नशीब चांगलं होतं आणि सदाला जाग आली. तसंच सदानं दार उघडलं म्हणून. नाहीतर त्या अंधा-या रात्री व धो धो पाऊस कोसळत असतांना व सदाला जर जागच आली नसती तर ते बाळ रात्रीच्या त्या भयाण अंधारात कुत्र्याच्या तोंडात पडलं असतं.
राघववर दुस-यांदा अनाथ व्हायची वेळ तेव्हा आली. जेव्हा सदा व त्याची पत्नी कार अपघातात मरण पावले. तेव्हा तो सहाच वर्षाचा होता. आता राघवला यशोदेनं आधार दिला होता. परंतू यशोदेनं आधार किती दिवस दिला. फक्त एकच वर्ष. तो सातच वर्षाचा असतांना कोरोनानं तिही मरण पावली व पुन्हा राघववर अनाथ व्हायची पाळी आली.
यशोदा मरण पावली होती. आता तो एकटा नव्हता. त्याचेवर अवघ्या आठ वर्षाच्या काळात एक जबाबदारी आली होती मानसीची. मानसी लहान होती. तसा तो तिला कसा अंतर देणार. कारण याच मानसीच्या आईनं त्याला सांभाळलं होतं.
यशोदा मरण पावली होती. कोरोना सुरुच होता. तसे ते भीक मागतच होते आणि भीक मिळतही नव्हती. परंतू पोट. मानसी व राघव या दोघांनाही पोट होतंच. पोटाला अन्न हवं होतं आणि अन्न म्हणून काहीतरी पोटात टाकणं गरजेचं होतं. ते अन्नं.........त्या अन्नाला आज किंमत आली होती.
अन्न.......पुर्वी लोकं शिळं अन्न खात नव्हते. ते शिळं अन्न आजार पसरवतं असा लोकांचा कयास होता. उरलंसुरलेलं ते शिळं अन्न, लोकं कचऱ्याच्या डब्यात वा गाई म्हशी वा डुकरांना टाकत असत. ज्यावेळी ते शिळं अन्न लोकं कच-याजवळ उघड्यावर टाकत. तेव्हा त्याच शिळ्या अन्नावर परीसरातील गाई, कुत्रे आणि डुकरं यासारखी जनावरं यथेच्छ ताव मारत. परंतू आज त्या अन्नाला लोकं पारखे झाले होते. कोरोनात लॉकडाऊन असल्यानं व असा दुष्काळ निर्माण झाल्यानं ते अन्नही लोकं उघड्यावर फेकत नसत तर ते अन्न शिळं जरी असलं तरी आवडीनं खात असत.
ती यशोदा, ती ज्यावेळेस मरण पावली, त्यावेळेस तिनं राघवकडून वचन घेतलं होतं की त्यानं तिला सांभाळून घ्यावं. तसं वचन त्या बाळबोध वयात राघवनं देताच ती सुखानं मरण पावली होती. यशोदा तर मरण पावली होती. तसंच आज तोच सांभाळत होता तिला. वणवण भटकत होता तो अन्नासाठी. कारण आता भीकेत पैसे मिळणं कठीण झालं होतं. अन्नाला किंमत आली होती. किल्लतही होती अन्नाची फारशी. तरीही काही काही श्रीमंत वस्तीत काही लोकं आजही अन्न उघड्यावर कच-याजवळ फेकत असत. जे अन्न बुरशी लागलेलं असायचं. ज्याला परिसरातील गाई, म्हशी वा कुत्री, डुकरंही तोंड लावायचे नाहीत. तेच अन्न राघव गोळा करीत असे व ते अन्न मानसी व तो स्वतःही खात असे. कधीकधी भूक खुप लागायची आणि असं अन्न मिळायचं नाही. तेव्हा मात्र त्याची आबाळ होत असे व तेव्हा ते दोघंही जण तेच अन्न मिळत नसल्यानं झाडाचा पाला खात असत व कसेतरी जगत असत. आज या कोरोनाच्या साथीत स्वतःला जगवणं महत्वाचं होतं.
कोरोनाची ही साथ. या साथीत फक्त यशोदाच नाही तर अशी बरीचशी कुटूंबच्या कुटूंब उध्वस्त झाली. काहींचे मायबाप दोघंही मरण पावले तर काही ठिकाणी मायबापापैकी एक. परंतू कालचक्र फिरलं होतं. कोरोना गेला होता आणि ज्यानं पुर्ण थैमान माजवलं तो लॉकडाऊनही. आज परिस्थिती चांगली झाली होती. राघव मानसीला सांभाळत होता.
कोरोना संपला होता. आज परिस्थितीही चांगली झाली होती. लोकं भीकही देत होते भरभरुन. अशातच एक दिवस पोलिसांची गाडी आली व त्या सर्व भिका-यांना ती गाडी राघव व मानसीसह घेवून गेली.
मानसी आणि राघवचं वय कमी होतं. पोलिसांनी त्या दोघांनाही सुधारगृहात सुधारायला पाठवलं. त्यातच ते सुधारगृहात गेले.
ते सुधारगृह........ते सुधारगृह वाटत नव्हतं. कारण ते वेदनागृह होतं. तिथं त्या बालकांना दरवेळी धाकात ठेवलं जात असे. त्यांना शिक्षण दिलं जात नव्हतं तर त्यांच्याकडून बरीच कामं जबरदस्तीनं करुन घेतल्या जात होती. त्या सुधारगृहात त्यांच्याकडून वेगवेगळ्या वस्तू बनवून घेतल्या जाई. ज्या वस्तू विकून सुधारगृहाचा खर्च भागविण्यात येई.
सुधारगृहाचा एक मालक होता. जो मालक मोठा जालीम होता. तो ती मुलं चांगली वागली नाही तर चांगले चाबकाचे फटके देत असे. मुलांना शिक्षा करीत असे. चांगल्या कडक. शिवाय ती मुलं एवढं काम करुनही त्यांना जेवनखावण बरोबर मिळायचं नाही. भाजी तर जास्त पाणी टाकलेली असायची. त्यात तिखटमीठ कमी असायचं. ती भाजी पाणकट वाटायची. तिला चव नसायची. शिवाय पोळ्यांची संख्या मर्यादीत असायची. जेवढी भूक आहे, तेवढ्या पोळ्या मिळायच्या नाहीत. त्या कचरट लागायच्या. भातही फक्त वाटीभरच मिळायचा. त्यातही कचकच लागायची.
जेवनखावण दर्जेदार नसायचं. त्यातच दररोज जेवण पोटभर मिळत नसल्यानं दररोजच अर्धपोटी राहावं लागायचं. व्यतिरीक्त काम भरपूर करावं लागायचं. सुधारगृहात जेवनखावण पाहिजे तेवढं खास नव्हतं. तरीही ती भूक होती. त्यामुळं त्यांना जेवावं लागायचं.
ती मंडळी पुर्वी भीक मागत होती. त्यातून ती उदरनिर्वाह करीत असतांना जर जास्त पैसे आलेच तर त्या पैशात ते चांगले पदार्थ खात असत. त्या पदार्थांना चव असायची आणि कमी आले तर घरीच फुटपाथवर चूल मांडून स्वयंपाक. तो स्वयंपाकही या सुधारगृहातील स्वयंपाकापेक्षा चवीचा असायचा. अशाच परिस्थितीत राघव आणि मानसी मोठे होत होते.
एक दिवस या सुधारगृहात कोणीतरी दांपत्य आलं. त्यांना मुलबाळ नव्हतं. ते दांपत्य मुल दत्तक घेण्यासाठी आलं होतं. ते दांपत्य आलं. त्यांची नजर मानसीवर गेली. तसं त्यांनी मानसीला पसंत केलं आणि ते मानसीला घेवून जाणार, तोच मानसी रडायला लागली.
मानसी रडत होती. कारण तिला जायचं नव्हतं राघवला सोडून. तिचं वय लहान होतं. तसं पाहता आतापर्यंत तिला राघवनंच तिची आई कोरोनात गेल्यापासून सांभाळलं होतं.
मानसीला त्या दांपत्याने दत्तक घेतलं होतं. चांगलं सुसंस्कृत घराणं दिसत होतं ते. ते मुळात भारतीय वंशाचेच वाटत होते. कारण ते देशीय भाषा बोलत होते.
मानसी रडत होती. तशी मानसी रडू लागताच त्या सुधारगृहाचा प्रमुख म्हणाला,
"वेडी झाली का पोरी, तुझी जिंदगी इथंच होणार काय? कधी ना कधी कोणाच्या ना कोणाच्या घरी जावंच लागल की."
त्या सुधारगृहाच्या प्रमुखानं बोललेलं बोलणं. त्या नादान मानसीला कळत नव्हतं. कारण तिचं वय अगदी लहान होतं. ती बहुतेक सहा वर्षाची असेल.
मानसी अतिशय जोरजोरात रडत होती. ती राघवला बिलगून होती. राघवलाही काय करावं सुचत नव्हतं. अशातच त्या सुधारगृहाचा प्रमुख म्हणाला,
"असं काय झालं की तू रडतेय. ए समजव ना तिला. तिला म्हणावं की जा येथून. येथं काय पुरी जिंदगानी होणार हाय का?"
राघव थोडा मोठा होता. त्याला तो सुधारगृहाचा प्रमुख काय म्हणतो ते कळत नव्हतं. परंतू ते थोडंफार कळलं होतं. ते भल्याचीच गोष्ट करीत होते. तसा तो ते बोलणं समजून घेत म्हणाला,
"जा ना मानसी. तुह्या भल्याचाच ईचार करताय हे लोक. जा."
राघवनं मानसीला म्हटलं. परंतू मानसी काही जायला तयार नव्हती. तशातच राघव विचार करु लागला. विचार करु लागला की मी मानसीला तरी केव्हापर्यंत बघणार. एक ना एक दिवस हे लोकं मलाही कुणाला दत्तक देवून टाकणार मानसीसमोरच. मग मी तरी कसा वाचविणार मानसीला. आज तिला माझ्यासमोरच दत्तक देतात आहे. तेव्हा मलाच तिला जाण्यासाठी मजबूर करावं लागेल. त्याशिवाय ती कदापिही जाणार नाही.
मानसीला जाण्यासाठी मजबूर करण्यासंदर्भात तो विचार करु लागला. परंतू त्याला काहीच मार्ग सापडत नव्हता. शेवटी असाच मानसीला पाठविण्यासाठी मजबूर करीत असतांना त्याला आठवलं. आपण मानसीचे लाड करु नये. तिला मारावं. किंचीतही दया न दाखवता.
राघवचा तो विचार. मानसीला मारायची त्याची मुळातच इच्छा नव्हती. परंतू तो तरी काय करणार होता. त्याला तिला पाठविण्यासंदर्भात मजबूर करण्यासाठी ते पाऊल उचलणे भागच होते. शेवटी त्यानं तिला पाठविण्यासाठी ते पाऊल उचललेच. मानसी रडत असलेली पाहून त्यानं तिला दोन चार जोरात थापटा मारल्या व अतिशय रागावून म्हटलं.
"जाते की नाही. जा. नाहीतर अजून मारीन."
राघवनं मानसीला दोनचार थापटा जोरात मारल्या होत्या. तशी मानसी अजिबात जिथं जायला तयार झाली नव्हती. तिथं आता तिनं जास्त केकाटणं सुरु केलं होतं. परंतू ती जे त्याला बिलगली होती व नाहीचा पाढा करीत होती. ते तिनं बंद केलं होतं. मात्र ती आताही रडतच होती.
मानसीला दत्तक म्हणून विकत घेतलं होतं त्या दांपत्यांनी. त्यानंतर करारनामा लिहिल्या गेला व रितीनुसार तिला कारमध्ये बसवून ती मंडळी घेवून गेली. त्यानंतर काही दिवस असेच गेले. काही दिवसानंतर पुन्हा एक दांपत्य आलं. त्या दांपत्यांनी राघवलाही दत्तक घेतलं व त्यालाही ते घेवून गेले. मात्र ते त्याला दत्तक घेणारे भारतातील नव्हते तर ते विदेशातील होते.

**********************************************************

सुधारगृह........त्या सुधारगृहातील मुलं लोकं दत्तक म्हणून नेत असत. तसंच ब-याच सुधारगृहातील प्रथा होती की त्या मुलांची ते शहानिशा करीत असत. ते काय करतात? त्यांना ते कुटूंब कसं वागवतं? याबद्दल चौकशी करीत असत. मात्र या सुधारगृहातून दत्तक जाणारी मुलं कशी आहेत? त्यांना त्रास होतो का? याबाबत साधी चौकशीही या सुधारगृहातील प्रमुख करीत नसे. त्याला वाटत असे की करारनाम्यानुसार लोकं घाबरुन त्यांना चांगले वागवतील. परंतू ते खरं नव्हतं. यातील मुलींची गत तर वेगळीच होती. काही मुलींकडून जबरदस्तीनं वेश्याव्यवसाय करुन घेतला जात असे तर काही मुलींना दत्तक घेणारे एवढा त्रास देत असत की त्या स्वतःच वेश्याव्यवसाय पत्करीत. काही लोकं येथील मुलींना आपल्या घरची घरगुती कामं करण्यासाठी मोलकरीण म्हणून नेत असत. एकदोनच मंडळी अशी असायची की जी त्या मुलांना स्वलेकरासारखी वागणूक द्यायची. मात्र ब-याच मुलींना या सुधारगृहातून नेल्यानंतर ब-याच लोकांनी वेश्याव्यवसायाला लावले होते. मानसीही त्याचीच शिकार झाली होती.
मानसी दत्तक गेली होती. तसं पाहता मानसीला दत्तक ज्या परीवारानं घेतलं होतं. ते तरुण होते. त्यांना बरेच दिवसपर्यंत मुलं न झाल्यानं आपल्याला मुलं होणार नाही असा विचार करुन त्यांनी मानसीला दत्तक घेतलं. तशातच मानसीचे दोन वर्ष चांगले सुखात गेले. परंतू दोन वर्षानंतर मानसीला त्रास सुरु झाला. असा त्रास की जो भोगणे कठीण जात होते.
साधारणतः एक वर्ष झाला होता मानसीला दत्तक घेवून. अशातच मानसीच्या दत्तक आईला दिवस गेले. जिचं नाव सुहासीनी होतं. सुहासीनी मानसीशी एक वर्षपर्यत चांगली वागली. परंतू जेव्हा ती गरोदर राहिली. तेव्हा तिनं मानसीचा लाड करणं बंद केलं. आता मानसीला सतत कामाला लावणं तिनं सुरु केलं होतं.
मानसी आज आठ वर्षाची झाली होती. ती दुसरीत गेली होती. परंतू जशी सुहासिनी गरोदर राहिली. तिनं तिची शाळा बंद केली. त्यातच ती आता दिवसभर तिच्याकडून मोलकरणीची कामं करुन घ्यायची. कपडे धुणे, भांडी घासणे, फरशी पुसणे आदी कामं करीत असतांना तिचे रात्रीला आंगपाय दुःखायचं. आपली आई समजून सुहासिनीला म्हटल्यास ती बदबद मारायची मानसीला. त्यातच असे बोलणे बोलायची की ते बोलणे ऐकतांना जड जात असे तिथं राहाणं.
ते मानसीचे खेळण्या बागडण्याचे वय होते. तसंच ते तिचं शिक्षण शिकण्याचंही वय होतं. परंतू त्या वयात तिची त्या दांपत्यांनी शिक्षणाची आस मुळातच बंद केली. तसंच तिला घरी मोलकरीणीच्या कामाला लावलं. त्यातच एखादं काम केलं नाही तर तिला बदबद मार खावा लागायचा. तेव्हा विचार यायचा आणि राघवची आठवणही. परंतू आता तिच्यासमोर काहीच उपाय नव्हता.
मानसी असाच त्रास सहन करीत करीत लहानाची मोठी होत होती. तिला आता त्या त्रासाची सवय पडली होती. शेवटी काय करावं हे सुचत नव्हतं. ती मजबूर होती. म्हणून ती ते सगळं सहन करुन राहात होती आणि लहानाची मोठी झाली होती आणि समजदारही तेवढीच झाली होती. आज तिला ते सगळं समजत होतं.
मानसीला त्या दांपत्यांनी शिकवलं नाही.याचा अर्थ असा नव्हता की तिचा मेंदू सक्षम झाला नव्हता. ती आज वयात आली होती व तिला या वयात कळत होता तो मार आणि कळत होता तो अत्याचार. तसा तो प्रसंग घडला.
असाच तो दिवस. त्या दिवशी एका किरकोळ कारणावरुन मानसीचं तिच्या दत्तक आईसोबत कडाक्याचं भांडण झालं. त्यातच सुहासीनीनं माझ्या तुकड्यावर जगते असं म्हणून तिला घराबाहेर काढले व तिला अजिबात घरात घेतलंच नाही. शेवटी भुकेची कळकळ तिला मजबूर करुन गेली व ती तेथून पळून गेली. ते तरुण वय. पळून पळून तरी ती कुठपर्यंत जाणार. तशी तिला भूक लागली होती.
मानसीच्या पोटात कावळे ओरडत होते. तिला पुढं एक रेस्टॉरेंट दिसलं. जवळ पैसा नव्हता. परंतू भूक भागवणं आवश्यक होते. तशी ती त्या रेस्टॉरंटच्या काऊंटरवर गेली. म्हणाली,
"भैय्या, जेवन द्या ना. मी कोणतेही काम करायला तयार आहे."
"कोणतेही काम?"
"होय. रुपये पण नाय घेणार."
ते हॉटेल. सुरुवातीला त्या हॉटेल मालकानं तिला हुसकावून लावण्याचा विचार केला. परंतू नंतर त्यानं ठरवलं. तिच्याकडून ते काम करवून घ्यायचं. जे त्याला हवं होतं.
मानसी तरुण झाली होती. तसं त्यानं तिला आतमध्ये बसायला लावलं. तशी त्याची वाईट नजर तिच्यावर पडली. तसा तो विचार करु लागला. आपण हिला विकलं तर....... आपल्याला भरपूर पैसे मिळू शकतील. यापुर्वी त्यानं अशाच भरपूर मुली विकल्या होत्या. ज्यावेळेस त्याच्या त्या रेस्टॉरेंटमध्ये कोणत्याही तरुण मुली नाश्ता करण्यासाठी येत. त्यावेळी तो त्यांच्या प्लेटमध्ये नशील्या वस्तू मिळवून त्यांना बेहोश करीत असे आणि विकून टाकत असे त्यांना. येणा-या तरुण मुलींना कधी जेवनखावण देवूनही नशेली वस्तू मिळवून बेहोश करुन विकल्यानंतर त्याला भरपूर पैसे मिळत व त्या मुली बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दाखल होवूनही पोलीस शोध लावत नसत. आज त्यानं मानसीलाही पाहिलं होतं तसंच आणि विकूनही टाकलं होतं मानसीला. तिच्या जेवनात बेहोश करणारी औषधी टाकून.

**********************************************************
राघवचंही जीवन अगदी तसंच नव्हतं. त्याचं जीवन निराळं होतं. त्याला एका विदेशी दांपत्यानं विकत घेतलं होतं, ज्याला मुलं नव्हती. ते दांपत्य त्याला जीवापेक्षा जास्त जपत असत.
राघवचं त्या दांपत्यांनी उशिरा का होईना, त्याचं नाव शाळेत टाकलं होतं. ते त्याला शिकवीत होते. तसा काळ हळूहळू सरकत होता. मानसीप्रमाणे तोही लहानाचा मोठा होत होता. मात्र आजही त्याच्या मनात मानसीची आठवण जोर धरुन होती.
तो विदेशी देश. ते विदेशी विचार. लहानपणापासूनच त्याच्या शाळेतील मुलं बिघडली होती. ती मुलं वात्रटसारखी वागत होती. मग राघव वात्रटपणे वागणार नाही कशावरुन? कारण त्याच्याजवळ संपत्तीच तेवढी होती. शिवाय त्याच्या मायबापाला तो दत्तक का होईना, एकच मुलगा असल्यानं ते त्याचा लाड जास्त करीत असत. त्यामुळंच तो बिघडला होता. तसं पाहता त्याच्यासमोर प्रश्न होता. तो प्रश्न म्हणजे त्याला काही स्वतःचे मायबाप नव्हते. ते मायबाप होते. ज्यांनी त्याला दत्तक घेतलं होतं. ते त्याचे खरे मायबाप नव्हते. तसं पाहता ते जरी त्याचेवर प्रेम करीत असले तरी त्याचं तेवढं प्रेम त्या मायबापावर नव्हतं.
राघवचं प्रारब्ध फारच कठीण होतं. आज ज्या मायबापानं त्याला दत्तक घेतलं होतं. ते दोघंही वीज कोसळून मरण पावले होते. त्यामुळं तो पुन्हा एकदा अनाथ झाला होता आणि पुन्हा त्याचेवर दुःखदायी जगणं आलं होतं. तोच दिवस होता की त्या दिवशी पुन्हा एकदा त्याच्या अनाथाचं जीवन वाट्याला आलं होतं. तोच दिवस. त्याचदिवशी पुन्हा संकट आलं होतं.
राघव ज्या ठिकाणी दत्तक गेला होता. त्या घरी त्या दांपत्याजवळ संपत्ती भरपूर होती. गाडी बंगला सर्वकाही होतं. नोकरचाकर भरपूर होते. त्याला ते मायबाप मरुनही त्यामानानं भरपूर सुख होतं. परंतू मायबाप नसल्यानं सगळं काही अपुरं वाटत होतं.
राघवजवळ मायबाप नव्हते ना मानसी होती. आज त्याला मानसीची आठवण सतावीत होती. मानसी कुठे असेल? कशी असेल वैगेरे गोष्टी त्याला सतावत होत्या. तसं पाहता तो हळूहळू मोठा होवू लागला होता. मात्र आज त्याला टोकायला कोणीच नसल्यानं त्याचा स्वभाव हळूहळू बदलत गेला. एक शहंशाही व खुंखारी स्वभाव त्याचा बनत चालला होता. तसे त्याचे व्यसनंही वाढत चालले होते.
राघवच्या मायबापाचा मोठा व्यवसाय होता. सर्व व्यवहार पाहण्यासाठी मॅनेजर होते. तसं पाहता पैशाची काहीच त्याच्या जीवनात कमी नव्हती. अशातच त्याची भेट एका झरीना नावाच्या मुलीशी झाली. झरीना दिसायला पाहिजे तेवढी सुंदर नव्हती. मात्र समजदार होती व सुशीलही तेवढीच होती. ती त्याला समजावीत असे व आधारही तेवढाच देत असे. राघव दहावीत गेला होता. परंतू त्याला जीवन म्हणजे काय? ते विचार करायला अवधी नव्हता.
राघवचा एक नोकर होता जितू. त्याचा तो एक नोकर. तो इमानदार होता. तोच एक विश्वासू सेवक होता त्याच्या मायबापाचा. त्यालाच त्याचे मायबाप सर्व काही गोष्टी समजावून सांगत असत. तसं पाहता सर्वच गोष्टी सांगत असत. त्याला राघवला दत्तक घेण्यापासून तर त्याच्या मोठे होण्यापर्यंतच्या सर्वच गोष्टी माहीत होत्या. त्यातच त्याला आता जडलेली वाईट व्यसनाची सवयही माहीत होती. तसा तोच एक त्याचा विश्वासू असल्यानं व इमानदार असल्यानं त्याला नेहमी वाटायचं की राघवला वाईट व्यसन जडू नये. नाहीतर त्याच्या वाईट व्यसनानं तो अठरा वर्षाचा होताच ही मॅनेजर मंडळी त्याला गुंगीची औषधं पाजून त्याची स्वाक्षरी घेतील व त्याला देशोधडीला लावतील. तसं पाहता त्यांचं एकप्रकारे बरोबरच होतं. कारण त्याच्याजवळ पैसे अमाप असल्यानं त्याला कोणीही फसवू शकत होता.
ते अठरा वर्ष. अठरा वर्षापूर्वीही ते मॅनेजर ती मालमत्ता आपल्या नावावर करु शकत होते. परंतू त्याच्या या दत्तक मायबापानं मरणापूर्वी ती मालमत्ता त्याच्या नावावर केली होती. त्यांना त्यांच्या डोळ्यासमोर मरण दिसत होते की काय कुणास ठाऊक. त्यामुळंच त्या मॅनेजर मंडळींना ती मालमत्ता आपल्या नावावर करता आली नाही. मात्र तो त्यांचा तसाच डाव होता.
राघव अठरा वर्षाचा व्हायचाच होता. तरीही ती मॅनेजर मंडळीं त्याला नशेचे पदार्थ चारत असत. हे त्या इमानदार नोकराला खपत नसे. त्यावर तो विरोध करायचा. परंतू एकदा तंबी मिळाली होती की जर तो तसं बोललाच तर त्याला ती मॅनेजर मंडळी यमसदनास पाठवतील. त्यामुळंच आता तो त्यांना बोलत नव्हता. तर तो राघवला कधीकधी लपून छपून समजावून सांगत असे. तरीही राघव त्यांचं ऐकत नसे. ते पाहून तो नोकर हताश झाला होता.
कसातरी तो दहावी पास झाला आणि तो महाविद्यालयात शिकायला गेला. इथंच मिळालेली झरीना.
झरीना राघवची मैत्रीण. महाविद्यालयात मिळालेली. ती गरीब होती. पाहिजे त्या प्रमाणात राघवएवढी श्रीमंत नव्हती. त्यामुळंच की काय, ती त्याचेवर प्रेम करु लागली होती.
ती राघवसोबत कधीकधी त्याच्या घरीही यायची. त्यावेळेस जितू तिला त्याचेबाबत समजावून सांगायचा आणि त्याला व्यसनापासून दूर कर. नाहीतर ही मालमत्ता त्याचे मॅनेजर हडपून टाकतील हेही सांगीतलं. कारण त्याला वाटत होतं की ही झरीना त्याला समजवेल व तिचं तो ऐकून व्यसनं सोडेल.
झरीना त्याला समजावून सांगत होती. ती त्याला समजावीत होती की त्यानं व्यसनं करु नये. परंतू तो तिचं ऐकेल तेव्हा ना. तिनं आणि त्या जितूनं त्याला कितीही समजवलं तरी तो तिचं आणि जितूचं ऐकत नव्हता. शेवटी जे व्हायचं तेच झालं.
राघव आज अठरा वर्षाचा झाला होता. कायद्यानुसार तो त्या मालमत्तेचा मालक बनला होता. आता त्याला पुरेपूर व्यवहार करता येत होता. परंतू तो व्यवहार त्याला करता येईल तेव्हा ना.
तो आता बारावी पास झाला होता. परंतू त्याला पुरेपूर ज्ञान आलं नव्हतं. त्याला मालमत्तेबाबत काही कळत नव्हतं. मात्र काल मालमत्तेबाबत जी स्वाक्षरी त्याचे तर्फे मॅनेजर मारत होते. आज ती मारता येत नव्हती. त्यामुळं मॅनेजरला प्रत्येक फाईल त्याचेकडे स्वाक्षरीसाठी आणावी लागायची. त्या प्रत्येक फाईलला तो बारकाईनं न पाहता अगदी डोळे लावूनच स्वाक्षरी करायचा. अशातच त्या मॅनेजरनं जो विचार आधी केला होता. तोच विचार आजही केला व एक दिवस त्यांनी मालमत्तेची कागदपत्र बनवली. तशी ती मालमत्तेबाबतची कागदपत्र.........ती मालमत्तेबाबतची कागदपत्र बनवली होती त्याच्या मॅनेजरनं व एक दिवस ती कागदपत्र त्याचे समक्ष ठेवली.
राघव आपल्या दत्तक बापाच्या कृपेनं श्रीमंत होता. परंतू थोडीशीही त्याला बुद्धी नव्हती वा तो बुद्धीचा वापर करीत नव्हता. तसं पाहता एक दिवस त्याच्या मॅनेजरनं त्याच्यासमक्ष ठेवलेली कागदपत्र त्यानं न वाचता वा त्या कागदपत्राची शहानिशा न करता त्या कागदपत्रावर त्यानं सह्या केल्या. त्यानंतर त्याच मॅनेजरनं त्याला जबरदस्तीनं घराबाहेर काढलं. व्यतिरीक्त त्याला अंगावरील कापडाव्यतिरीक्त काहीही दिलं नाही.
राघव एवढ्या मोठ्या मालमत्तेचा मालक असूनही आज रस्त्यावर आला होता. तो अनाथ तर झाला होता. व्यतिरीक्त आज आपल्या स्वतःच्याच मालमत्तेतून वंचीतही झाला होता. आता तो पुन्हा फुटपाथवर भीक मागू मागू जीवन जगू लागला होता. त्याचं शिक्षणही गेलं होतं. तसा आज तो चोवीस वर्षाचा झाला होता.
झरीना आजही त्याला भेटत होती. त्याला गतकाळाची आठवण देत होती आणि सांत्वनही तेवढीच देत होती. आज त्याला कळत होतं की आपण काय करायला हवं आणि काय करायला नको. आज त्याला मालमत्तेबाबतच्या गोष्टी कळत होत्या. परंतू उपाय नव्हता. कारण वेळ निघून गेली होती. तसं पाहता न्यायालयात खटला दाखल करतो म्हटल्यास जवळ पैसा नव्हता. त्यामुळंच तो खटलाही न्यायालयात दाखल करु शकत नव्हता. तसा तो विचार करीत होता. शेवटी त्यात काहीच पर्याय न निघाल्यानं तो हताश झाला.
राघवनं न्यायालयात खटला दाखल केला असता, परंतू तो मालमत्तेबाबतचा खटला होता. फार मोठ्या मालमत्तेच्या. त्यात साल्वंशीच कितीतरी रुपये भरावी लागत होती. तसं काय करावं सुचत नव्हतं. त्यामुळं शेवटी तसा विचार करुन त्यानं मालमत्तेबाबतचा आपला नाद सोडून दिला. तसं आज त्यानं आपलं व्यसनही सोडलं होतं.
झरीनाही आज चोवीस वर्षाची झाली होती. ती त्याचेवर प्रेम करु लागली होती. तसंच ती त्याच्याशी विवाह करु पाहात होती. परंतू त्याच्या मालमत्तेबाबतचा काहीच ठावठिकाणा नव्हता. तसा त्याच्या विवाहही करण्याचा विचार नव्हता. मग ती मुलीची जात. ती केव्हापर्यंत थांबणार. तिनं आपला विवाह केला व ती आपला विवाह करुन मोकळी झाली.
झरीनाचा विवाह झाला होता. ती त्याचेपासून दूर गेली होती. तसा तो आणखीनच हताश व निराश झाला. त्या देशात आता त्याला करमेनासं झालं. तशी त्याला आपल्या देशाची आठवण येवू लागली. तो फुटपाथ आठवू लागला आणि आठवू लागला ते फुटपाथवरील जीवन. ज्या फुटपाथवर त्यानं आपल्या आयुष्यातील कितीतरी वर्ष काढली होती. त्याला वाटत होतं की या देशातील फुटपाथवर असं कुढत कुढत आयुष्य काढण्याऐवजी आपल्या देशात जावून जगलेलं बरं. तसा तो त्याचा विचार करु लागला. विचारांती त्याला समजलं की आपण आपल्या देशात जायचं कसं? त्याला लागणारा पैसा आणायचा कुठून? शेवटी तो हताश निराश होवून जितूजवळ येवून पोहोचला. जो त्याचा एकेकाळी नोकर होता. जितूकडे येताच त्यानं आपली कैफियत त्याचेजवळ मांडली.
जितू त्याचा नोकर. त्याच्याकडे कैफियत मांडत असतांना तो म्हणाला,
"आता काही माझी या देशात राहायची इच्छा नाही. माझे डोळे उघडलेले आहेत. मी आता माझे व्यसनंही सोडलेले आहेत व आता मला माझ्याच देशात मायदेशी जायचे आहे. प्रश्न हा आहे की मला माझ्या देशात जायला पुरेसा पैसा नाही. काय करावं सुचत नाही. कदाचीत मला वाटते की मी माझ्याच देशात जावून सुखी होईल."
तो बोलला. तसं जितूनं त्याचं ऐकलं. त्याला त्याची दया आली. तशी त्याला जाणीव झाली की याच्या मायबापानं आणि याचे मायबाप गेल्यानंतर यानंही आपल्याला पारखं केलं नाही. आजही तो आपल्याकडे सल्ले मागायलाच आला. हा आपल्या अंगाखांद्यावर खेळला. तसं पाहता आपण याचे काहीतरी देणे लागतोय. तेव्हा आपण हवी तशी याला मदत करावी. विचारांचा अवकाश. तो म्हणाला,
"तुला आपल्या देशात जायचं आहे? मायदेशात जायचं आहे? तर मग ठीक आहे. मी करणार मदत तुला. जा तू आपल्या देशात. तुझ्यासाठी तोच देश बरा. हा देश पुष्कळसा चांगला नाही. या देशातील माणसं चांगले नाहीत. तुझं म्हणणं खरं आहे की तुझा या देशात श्वास कोंडतोय. तुझा जीव घुटमळतोय. मला माहीत आहे की मी जर तुझ्या जागेवर असतो तर माझीही परिस्थिती तीच राहिली असती. आज मला कळतंय की तुझ्यावर काय वाईट परिस्थिती बेतत आहे. ठीक आहे. मी देणार पैसे." जितू म्हणाला. तसा चूप बसला.
परिस्थितीनुसार आज राघवच्या भाषेत बदलाव आला होता. ती भाषा सुधारली होती. तसंच त्याच्या बोलण्यातही कडकपणा आला होता.

**********************************************************

जितूनं त्याला पैसे दिले. तसा राघव आपल्या देशात आला. आपला देश त्याला आता आवडत होता. परंतू ती जी जखम होती मालमत्तेची. ती त्याच्या मनाच्या कप्प्यात खोल रुतून बसली होती. त्या जखमेची जेव्हा जेव्हा त्याला आठवण येई, तेव्हा तेव्हा तो बेचैन होत असे.
राघव आपल्या देशात आला होता. तो फुटपाथवरच राहात होता. कधीकधी तो गतकाळातील घडलेल्या घटना आठवत असायचा. तसा एक दिवस विचार करीत असतांना त्याला मानसीची आई यशोदा आठवली व ती मानसीही आठवली. तसा त्यानं विचार केला. आपण मानसीला शोधावं. कदाचीत ती आपल्याला गवसलीच तर आपलीही करमणूक होईल.
ते लहान वय होतं की ज्या वयात त्याला दत्तक घेतलं होतं त्या विदेशी कुटूंबानं आणि त्याला या देशातून नेलं होतं. आता ते बरोबर आठवत नव्हतं. तो ताण देत होता आपल्या मेंदूवर. तसा बराच विचार केला त्यानं. तरीही त्याला ती जागा आठवत नव्हती. तसा अचानक काही काळ गेला. तसं एकदम त्याला त्याचं गाव आठवायला लागलं. तसं ते शहरंही. लागलीच तो त्या शहरात आला.
ते शहर आज भव्यदिव्य झालं होतं. त्या शहरात भव्यदिव्य मोठमोठ्या इमारती बनल्या होत्या. तसं पाहता त्या शहराचा विस्तारही झाला होता.
राघव त्या शहरात पोहोचताच तो तेथे असलेल्या सुधारगृहांना भेटी देवू लागला. तेथील सुधारगृहामध्ये शोध घेवू लागला. तसा तो त्या सुधारगृहात शोध घेत असतांना त्याला जाणवलं की ज्या सुधारगृहात ते दोघंही जण होते. ते सुधारगृह बंद झालंय. कोणीतरी गतकाळातील माणसानंच आक्षेप घेत ते सुधारगृह बंद केलं होतं. तसं माहीत होताच त्यानं तेथील माहीती कुठं हस्तांतरीत केली याचा शोध लावला. विचारांती त्याला समजलं की तेथील माहिती एका सरकारी सुधारगृहात हस्तांतरीत झाली आहे. तशी माहिती मिळताच राघव त्या सरकारी सुधारगृहात रवाना झाला. त्यानं संबंधीत कागदपत्राचा शोध घेतला व त्यांच्या येण्याची वा दाखल होण्याची नोंद घेतली. त्याला त्याच्या दाखल होण्याची नोंद सापडली. परंतू मानसी. मानसीचा रेकॉर्ड काही सापडत नव्हता.
मानसीच्या नोंदीचा शोध घेत असतांना बरीच त्रेधातिरपीट उडाली. तसं एका पानावर पुसटशा अक्षरात ती नोंद दिसलीच. ते पाहताच त्याला अगदी हायसं वाटत होतं.
ते रजिस्टर.........त्या रजिस्टरमध्ये असलेली मानसीची नोंद. ती नोंद घेवून राघव वासरासाठी एखाद्या हपापलेल्या गाईसारखा तिच्या मागावर निघाला. मजल दरमजल करीत तो तिला ज्या दांपत्यानं दत्तक घेतलं होतं, तिथं येवून पोहोचला. त्यानं त्या घरी मानसीबाबत विचारणा केली व म्हटलं की तो तिचा नातेवाईक असून तिचा शोध घेत आहे व तो थोडा खोटेच बोलत म्हणाला की मानसीच्या आजोबांनी बरीच मालमत्ता तिच्या नावावर सोडली असल्यानं तिचा तो शोध घेत आहे. ती जर मिळाली तर त्यातील काही मालमत्ता तो त्यांनाही देईल.
मालमत्ता लोभी असलेली मानसीची दत्तक आई. ज्या आईनं तिला जाणूनबुजून जबरदस्तीनं घरातून हाकलून लावलं होतं. ती म्हणाली,
"आम्ही मानसीला दत्तक घेतलं नक्की. परंतू ती तरुण होताच कुठं निघून गेली हे कळायला मार्ग नाही. आम्ही परस्पर शोधाशोधही घेतला. तरीही ती मिळाली नाही. शेवटी आमची निराशा झाली व आम्ही तिचा शोध घेणं बंद केलं."
मानसीच्या दत्तक आईचं ते बोलणं. त्यावर तो म्हणाला,
"जर मानसी आपली स्वतःची मुलगी असती तर......?"
तो विचारलेला प्रश्न. तो प्रश्न स्तब्ध करणारा होता. तसा तो त्या घरातून बाहेर पडला. त्याला मानसी काही केल्या सापडलीच नाही.
राघव मानसीच्या दत्तक मायबापाच्या घरुन बाहेर पडला. त्याला मानसी काही सापडली नाही. तरीही तो मानसीचा शोध घेत होता. त्यानं संबंधीत सर्व सुधारगृह पाहिले. काही विकलांगलय पाहिली. परंतू मानसी कुठेही गवसत नव्हती. मात्र विकलांग वस्तीला भेट देतांना त्याला वाईट अनुभव आला. लोकं विकलांग लोकांना व विकलांगलयांना वाईट म्हणतात. हीन दृष्टिकोन बाळगतात. का म्हणतात व का हीन दृष्टिकोन बाळगतात ते कळायला मार्ग नव्हता.
आज आपण पाहतो की रस्त्यारस्त्यावर वा मंदीर परीसरात आपल्याला काही लोकं भीक मागतांना दिसतात. त्यात वयोवृद्ध व काही विकलांग लोकं असतात. विकलांग याचा अर्थ मतीमंद (वेडसर), आंधळे, अपंग (लंगडे), मुके, बहिरे. का त्यांचं विकलांग असणं हा शाप आहे काय?
विकलांग बाळ. विकलांग या गटात अनेक प्रकार मोडतात. ज्यांना बरोबर बोलता येत नाही. म्हणजेच ज्यांच्यात वाचा दोष आहे. ज्यांना बरोबर ऐकता येत नाही. म्हणजेच कर्णदोष आहे. ज्यांना बरोबर डोळ्यांना दिसत नाही. दृष्टिदोष आहेत. ज्यांना बरोबर चालता येत नाही. म्हणजेच जे अस्थीव्यंग आहेत. तसंच ज्यांची बरोबर बुद्धी विकसीत नाही. ते मतीमंद. मतीमंद असणं हा एक अभिशापच मानवी जीवनाला लागलेला आहे. मतीमंद बाळ होणं हा काय जन्म घेणा-या बाळाचा गुन्हा असतो काय किंवा विकलांग बाळ जन्माला येणं हा तरी त्या बाळाचा गुन्हा असतो काय? तर याचं उत्तर नाही असंच आहे. मतीमंद बाळ निपजणं हा बाळाचा गुन्हा नाही वा विकलांग बाळ जन्माला येणं हाही बाळाचा गुन्हा नाही.
मतीमंद बाळ याचा अर्थ असा की ते असे बाळ की ज्या बाळाचे सर्व अवयव हे सक्षम असतात. त्यांना बरोबर ऐकायला येतं. बरोबर पाहता येतं. मात्र बुद्धी तेवढी सक्षम नसते. असे बाळ. विकलांग या प्रकारात हे सर्व दोष मोडत असतात. तसंच हे दोष कोणत्याही व्यक्तीला असू नयेत. कारण असे दोष ज्या व्यक्तीमध्ये असतात. त्या लोकांवर त्यांचा मुळातच दोष नसतांनाही दोषारोपण केलं जातं. कोणी तर त्यांना मागील जन्माच्या पापाचा परिणाम मानतात. म्हणतात की मागील जन्मात पाप केलं असेल, म्हणून हा असला जन्म मिळाला.
हे सर्वच दोष वाईटच. हे दोष कोणात असू नयेत. परंतू त्याहीपेक्षा सर्वात वाईट दोष आहे मतीमंद असणं. कारण आंधळा, मुका, बहिरा, अस्थीव्यंग या सर्व प्रकारात सर्वच व्यक्तींचा मेंदू शाबूत असतो. त्यामुळं अशा व्यक्तीला घर परिवारानं कुठंही नेवून सोडून दिल्यास तो व्यक्ती परत आपल्या घरी येवू शकतो किंवा ज्यानं कोणं त्याला जिथं सोडून दिलं. त्याला तो पोलिसात तक्रार देवून धडा शिकवू शकतो. परंतू मतीमंद या प्रकारात त्या व्यक्तीचा मेंदूच शाबूत नसतो. त्यामुळं त्याला कोणीही कुठंही सोडून दिलं तर तो व्यक्ती ज्या व्यक्तीनं सोडून दिलं, त्याची पोलिसात तक्रार दाखल करून त्याला धडा शिकवू शकत नाही वा तो व्यक्ती परत आपल्या घरी येवू शकत नाही.
मतीमंद या प्रकाराला पर्यायानं सांगायचं झाल्यास वेडसर व्यक्ती म्हणता येईल. वेडेपणा हा व्यक्तीच्या अंगात कधी जन्मापासूनच असतो. म्हणजेच काही व्यक्ती जन्मापासूनच वेड्या असतात तर काही व्यक्ती या जीवनाच्या कोणत्याही वयात वेड्या होवू शकतात. त्या वेडेपणाला वेळ व काळ लागत नाही. बाकी दोषाचं मात्र असं नाही. क्वचितच प्रसंगी तसे दोष उद्भवू शकतात.
शारीरिक विकलांगता हा काही दोष. या दोषावर लोकं दोषारोपण करतात. तसंच त्या विकलांगपणाला शाप समजतात. त्यामुळंच बरीचशी पालक मंडळी अशा व्यक्तींकडून जबरदस्तीनं भीक मागून घेतात. कधीकधी त्या व्यक्तींचे मायबाप जिवंत असतात. तेव्हापर्यंत बरं असतं. त्यानंतर अशा विकलांग व्यक्तींचे हालहाल करुन टाकतात काही नातेवाईक.
विकलांग व्यक्तीचा जन्म घेतांना कोणताही गुन्हा नसतो ना त्यांचं कोणतं पाप असतं. जर असे लोकं जन्मापासूनच विकलांग असले तर त्यांचा जन्म हा जनुकीय बदलातून झालेला असतो. परंतू जन्माच्या वेळी जे धडधाकट असतात. परंतू जे जन्मानंतर विकलांग होतात. त्यांचं विकलांग होणं हे त्यांच्यावर त्यानंतर आलेल्या संकटाचा परिपाक असतो. ते संकट जेवढं तीव्र, तेवढी विकलांगता तीव्र.
अलीकडे विकलांगता हा एक अभिशापच ठरलेला आहे. कारण या प्रकारात ग्रासीत असलेल्या लोकांना समाज खुप छळत आहे. त्यांचं जगणं समाजानं असह्य करुन टाकलेलं आहे. त्यांना केवळ नावबोटंच ठेवत नाहीत लोकं तर त्यांना भीक मागायला मजबूत करीत असतात. तसंच अतिशय मेहनतीची कामंही करुन घेत असतात. याही पुढे जावून काही काही मंडळी अशा विकलांग लोकांना दूर असलेल्या मंदीर परीसरात नेतात व त्यांना काही बहाणे सांगून तेथून पळ काढत असतात. त्यानंतर यात काही काही लोकं घरी परत न येता तिथंच स्थिरावतात. कसंतरी जगावं म्हणून फुटपाथवर भीक मागून जगतात. काही मात्र सज्ञान असल्यानं परत येतात. परंतू जे विकलांगतेच्या प्रकारानुसार मतीमंद असतात. ते मात्र आपल्या घरी परतच येवू शकत नाहीत. कारण त्यांना तेवढी बुद्धी नसते. ते तिथंच असलेल्या मंदीराच्या पायरीवर बसून राहतात. त्यातच भूक ही माणसाची मोठी गरज असल्यानं त्याच मंदीराच्या पायरीवर बसून भीक मागतात. त्यांना आपल्या प्रारब्धावर रडणंही जमत नाही.
अलीकडील काळात विकलांगता शाप जरी असला, तरी काही काही लोकांना तो शाप वाटत नाही. आजचा काळ पाहता मंदीर परीसरात एक अशीही टोळी सक्रीय झाली आहे की मानवतस्करी करीत आहे. यात महिलांचीच तस्करी होत आहे. हे एका प्रसिद्ध दैनिकानं म्हटलं. परंतू त्यावरुनच सांगायचं झाल्यास या मानवतस्करीत विकलांग लोकांचाही समावेश नसेल कशावरुन? त्यांचीही तस्करी होत असेलच ही शक्यता नाकारता येत नाही. जी मंडळी या मंदीर परीसरात फिरत असतात. त्यांचा कोणी वाली नसल्यानं त्यांची मानवी तस्करी होतच असावी. कशासाठी तर आजच्या काळात काही श्रीमंत लोकांना किडनी, यकृत आणि इतर शरीर अवयवाची गरज असते व ते मन मानेल तेवढे पैसा देवू शकतात म्हणून. परंतू त्यांचा कोणीच वाली नसल्यानं त्यांचं काही वर्तमान पत्रात नामोल्लेख दिसत नाही वा कोणी त्याबद्दल बोलत नाहीत.
महत्वाचं सांगायचं म्हणजे व्यक्ती विकलांग असणं हा गुन्हा आहे काय? तो व्यक्ती विकलांग आहे म्हणून त्याला कुठंही सोडून देणं वा सोडून जाणं हे बरोबर आहे काय? त्या विकलांग व्यक्तीला अर्थपुर्ण जीवन जगण्याचा अधिकार नाही काय? तसाच त्याचा जन्म काही मागील जन्माच्या शापाचा परिणाम आहे काय? या सर्वांची उत्तरं नाही अशीच आहेत. परंतू ते कोण समजून घेणार. कारण आज लोकांकडे वेळच उरलेला नाही कुणाच्या भावभावना समजून घ्यायला. जिथं आपल्याला जन्म देणा-या मायबापाचीच आपण सेवा करु शकत नाही. तिथं हे विकलांग. मग त्यांची सेवा आपण का करणार? आपण फक्त एवढंच करु शकतो की ते दिसले तर त्यांना एकदोन रुपये देवून मोकळे होणे.
राघवला वाटत होतं की ते विकलांग आहेत हा काही त्यांचा गुन्हा नाही. ते विकलांग आहेत हा त्यांच्या मागील जन्मातील पापपुण्याचा लेखाजोखा नाही आणि ते विकलांग आहेत, म्हणून आपल्यालाही त्यांचा फायदा घेण्याचा अधिकार नाही. आपण एक मानव म्हणून त्यांच्या कवना समजून घ्याव्यात. जगू द्यावं स्वाभीमानानं. हवं तर सरकारनं त्यांच्यासाठी शेल्टर होम काढावेत नव्हे तर त्यांची कोणी छेड काढणार नाही याकडे विशेष लक्ष असावं. सरकारचं आणि आपलंही. त्यातच कोणी त्यांची मानवतस्करी करणार नाही याकडेही सरकारनं, आपण व प्रशासनानं बारकाईनं लक्ष पुरविण्याची गरज आहे. त्यांनाही स्वाभीमानानं जीवन जगता येईल व स्वातंत्र्याचा पुरेपूर उपभोग घेता येईल यात शंका नाही. जेणेकरुन त्यांनाही वाटावं की भारत माझा देश आहे व सारे भारतीय माझे बांधव आहेत. राघवला वाटत होतं की तेही देशातच जन्मलेले जीव आहेत. त्यांना देशात राहण्याचा अधिकार आहे. समानतेनं त्यांनाही राहता यावं. जेणेकरुन त्यांना त्यांचा देश पराया वाटणार नाही व त्यांच्या त्यांच्या देशाबाबत स्वाभीमान वाटेल.
राघव शोधत होता तिला. शोधता शोधता कोणाला काय करावं असं विचारत होता. त्यातच कोणीतरी सांगीतलं की त्यानं कजली पाहावी.
कजली........कजली हा भानामतीचा एक प्रकार होता. त्यानुसार जमीनीत गाडलेलं गुप्त धन मिळत असतं असा लोकांचा मानस. तसं कोणीतरी म्हणालं की या कजली प्रकारात जिथं जमीनीत शेकडो फुट खोल गड्ड्यातील धन बाहेर येतं व ते धन लोकांना मिळतं. तशी मानसीलाही ही पद्धती शोधून देणार नाही कशावरुन? या पद्धतीनं मानसीलाही नक्कीच शोधता येईल.
विचारांचा अवकाश तो एका तांत्रिकाकडे गेला. त्याला आपली कैफियत सांगीतली व त्याच तांत्रिकानं दिलेल्या पोकळ आश्वासनानुसार तो मानसीला त्या तांत्रिकाच्या मदतीनं शोधू लागला.
मानसी एक हालचाल करणारा सिद्धहस्त घटक. ती काही वस्तू होती की जी एका ठिकाणी पडून राहील आणि शोधल्यावर त्याच ठिकाणी मिळेल. तसं पाहता राघवनं मानसीला शोधण्यासाठी अवलंबलेली ही कजली पद्धत वाईट होती. परंतू त्याची अवस्था ही एका हपापलेल्या गाईसारखी होती. तो तरी काय करणार. त्यातच मग जो कोणी जसा सांगेल, तसा तो वागत होता.
कर्मकांड अंधश्रद्धेवर कोणीच बोलू नये. असं जग सांगत होतं. नेहमीच वर्तमानपत्रात तसं छापून येत होतं. तसंच तांत्रिकही तसंच सांगत होते की तो आमचा प्रश्न आहे.
हे तांत्रीकांचे भ्रामक विचार. परंतू आज विज्ञानयुग होतं. या काळात चंद्र, सुर्याला देव मानण्याचा काळ नव्हता. कारण आज संशोधन झालं होतं व संशोधनानुसार सिद्ध झालं होतं की चंद्र, सूर्य हे देव नाहीत तर चंद्रावर दगड आहेत आणि सुर्यावर आग. तरीही आज काही काही महाभाग त्यांना देव मानत होते. त्यामुळंच वाद होत असत व वाद एवढे विकोपाला पोहोचत असत की त्यातून भांडणं होत असत. मग त्यातूनच एकमेकांचे खुन, बलात्कार आणि सारंच काही घडत असे. असं घडू नये म्हणून त्यावर अंजन घालण्यासाठीच काही समाजसुधारक व्याख्याने देत, बाजू मांडत व समाजजागृती करीत असत.

**********************************************************

कर्मकांड, अंधश्रद्धा, देवधर्म ह्या युगानयुगे चालत आलेल्या गोष्टी. या गोष्टी माणसाला माणूसकीच्या पलीकडे नेत असतात. त्यानुसार जो वागतो, ज्याला लाभ होतात. त्याला कोणी दैवी महापुरुष सुद्धा म्हणत असतात.
कर्मकांड, अंधश्रद्धा किंवा देवधर्म ह्या गोष्टी केवळ आजच्याच नाही तर त्या गोष्टी पुरातन काळापासून अस्तित्वात असून ज्यांना त्या गोष्टी पटल्या नाहीत, त्या लोकांनी आपआपली चूल वेगळी मांडली. त्या चूलीलाच धर्म अशी संज्ञा दिली गेली. कोणी म्हणतात की धर्माच्या या कल्पनेत वैदिक धर्म प्रथम आला तर कोणी म्हणतात की धर्माच्या या संज्ञेत वैदिक धर्म अस्तित्वातच नव्हता.
वैदिक धर्म.........मुळातच ह्या वैदिक धर्माला पुरातन काळापासून वैदिक धर्म म्हणतात किंवा सनातन धर्म असंही म्हटलं जातं. सनातन धर्माबाबत सांगायचं झाल्यास अलीकडे एका व्यक्तीनं सनातन धर्म की जय असा नारा दिला. त्यावरुन वादळ उठलं. कोणी म्हटलं की सनातन धर्म की जय म्हणत असल्यानं पुरातन मनू संस्कृती पुन्हा लागू होईल. परंतू असं कधीच होणार नाही. त्याचं कारण असं आहे की प्रत्येकच काळानुसार लोकांनी येथील सनातन धर्म टिकविण्यासाठी सनातन धर्म की जय म्हटलेलं आहे व प्रत्येकचवेळी काही व्यक्ती विरोधात गेलेले आहेत. त्यात ते सनातन धर्माच्या विरोधात गेले नाहीत. तर त्या त्या काळात त्या त्या विपरीत परिस्थितींच्या विरोधात गेले. ज्या ज्या गोष्टी त्यांना पटलेल्या नव्हत्या. त्यामुळंच आजही कोण काय म्हणतं यावर विचार करण्याची गरज नाही. याबाबत उदाहरण द्यायचं झाल्यास तथागत गौतम बुद्ध, वर्धमान महावीर, गुरु गोविंद सिंग व प्रभू येशू ख्रिस्त तसंच मोहम्मद पैगंबरांचं देता येईल. तसंच डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर, महात्मा फुले, वीर सावरकर, राजा राम मोहन रॉय आणि इतर असंख्य महापुरुषांचं देता येईल. तसंच संत ज्ञानेश्वर, संत रविदास वा इतर अनेक संतांचंही देता येईल.
तथागत भगवान गौतम बुद्धाचं उदाहरण देतांना नेमकी गोष्ट प्रकर्षाने जाणवते की जेव्हा तथागत गौतम बुद्ध वनविहारासाठी राजवाड्याच्या बाहेर पडले. तेव्हा त्यांनी एक वयोवृद्ध, एक प्रेत व एक जराजर्जर आजारी व्यक्ती पाहिला. ते पाहून त्यांना वाईट वाटलं. दुःख झालं व ते दुःख कुणाला होवू नये म्हणून त्यांनी त्यावर मार्ग शोधण्यासाठी त्यांनी घरादाराचा व संसाराचा त्याग केला. त्यात त्यांनी पिंपळाच्या झाडाखाली तपश्चर्या करुन ज्ञान प्राप्त केले. ते ज्ञान म्हणजेच बुद्ध ज्ञान होय व त्यानंतर त्यांचं ज्ञान वृद्धिंगत होत जावून त्यातून बौद्ध धम्म स्थापन झाला. हे बुद्धज्ञान तत्कालीन त्यांनी पाहिलेल्या दुःखापेक्षा वेगळंच होतं. तेच घडलं वर्धमान महावीरांबद्दल. त्यांनाही ज्या गोष्टी पटल्या नाहीत, त्या गोष्टीवर अव्हेरुन दुसरा धर्म त्यांनी स्थापन केला. अशाच प्रकारच्या गोष्टी इतर धर्म स्थापन करतांना इतर धर्माच्या संस्थापकांनी केल्या.
कर्मकांड, जातीयता व जातीजातीत भेदभाव, माणसाला माणसासारखी वागणूक न मिळत असलेली पाहून न आवडलेल्या डॉ. बाबासाहेबांनी पुढे जावून त्याच विपरीत परिस्थितीविरुद्ध लढा दिला व समाजातील अस्पृश्यता निश्चितच दूर केली. त्याच गोष्टी इतरही महापुरुषांनीही केल्या. संतांनीही केल्या. जे त्यांना पटले नाही. ते त्यांनी स्वतः तर त्यागले. व्यतिरीक्त त्यागायला लावले. यालाच पुढे जावून समाजसुधारणा म्हटल्या गेली.
आज ज्यांना वाटते की अशी समाजसुधारणा होवू नये. झालेला बदल स्विकारावासा वाटत नाही. तशाच मनोवृत्तीची मंडळी जुन्या गोष्टीचा अट्टाहास करतात. कर्मकांड, अंधश्रद्धा, भुतप्रेत व देवधर्म याबाबतीत आजच नाही तर पुरातन काळापासून महापुरुष, तत्वज्ञ तत्वज्ञान मांडत आले आहेत. चांगलं व अद्ययावत असलेलं तत्वज्ञान. तरीही शंभर प्रतिशत समाज सुधारणा झाली का? तर याचं उत्तर नाही असंच आहे. त्यातही ब-याच लोकांना त्या अंधश्रद्धा पटल्या नाहीत, म्हणून नवीन तत्वज्ञान प्रतिपादन केलं.
महत्वाचं म्हणजेच असे कर्मकांड, देवधर्म, भुतप्रेत व अंधश्रद्धा दूर करता याव्यात म्हणून ब-याच लोकांनी सुधारणावादी संघर्ष केला. परंतू असा सुधारणावादी संघर्ष त्या महापुरुषांच्या हस्ते झाला असला तरी शंभर प्रतिशत सुधारणा न झाल्यामुळेच आजही असे कर्मकांड, देवधर्म, अंधश्रद्धा व भुतप्रेत समाजात सुरु आहेत. काही लोकांनी आपआपल्या विचारानुसार ज्यांनी ज्यांनी त्यांचं ऐकलं, त्याच अनुयायांना घेवून वेगळा पक्ष काढला. त्याला धर्माचं नाव दिलं. काहींनी जे तत्वज्ञान मांडलं. त्याला वेगळंच नाव दिलं.
अलीकडे कर्मकांड, देवधर्म, भुतप्रेत व अंधश्रद्धा या गोष्टी थोतांड गोष्टी वाटतात. कारण अलीकडील काळात ज्या चंद्र, सुर्याला देव मानत होतो आपण. त्याचा शोध लागला आहे व ते देव नसून केवळ तिथं मातीचे ढिगारे व आगीचे गोळे आहेत हे सिद्ध झाले आहे. विज्ञानानं एवढे शोध लावले आहेत की आज माणसाला कर्मकांड अंधश्रद्धा, भुतप्रेत व देवधर्माचा प्रकार नेमका काय आहे? हे लोकांना माहीत झाले आहे. त्यामुळं आज पाहिजे त्या प्रमाणात अंधश्रद्धा राहिलेल्या नाहीत. देवधर्मही नेमकं काय ते ओळखता येतं. तसच भुतप्रेत आज भूतलावर नसून त्यावरही कोणी विश्वास ठेवावा असं पदचिन्हं दिसत नाहीत. कर्मकांडापासून काही माणसं कोसो दूर आहेत. परंतू हे जरी खरं असलं तरी आजही काही माणसं अंधश्रद्धा पाळतात, देवधर्म मानतात, भुतप्रेतही मानतात आणि कर्मकांडही. तसेच त्यातच नेहमी गुरफटून राहतात.
महत्वाचं म्हणजेच या कर्मकांड, देवधर्म, अंधश्रद्धा आणि भुतप्रेत ह्या गोष्टी कितीही समाजसुधारणा झाल्यात तरी दूर होणा-या गोष्टी नाहीत. यातून काही लोकं सुधारतील. जेणेकरुन जे सुधारतील, ते वेगळंच करतील अर्थात वेगळा धर्म स्थापन करतील. बौद्ध, जैन, शिख तसेच कोणी कोणी संप्रदाय स्थापन करतील. वारकरी, सुफी, नाथ असे गरजेनुसार. परंतू कोणीही शंभर प्रतिशत समाजसुधारणा करु शकणार नाहीत. म्हणून जर कोणी आज सनातन धर्म की जय असा सूर जर काढला वा देवधर्म, अंधश्रद्धा, कर्मकांड वा भुतप्रेत आहेत असं मानलं तर त्यात कोणाला वावगं असू नये. कोणी वावगं ठरवू नये. ते म्हणणारच आणि जर कोणी कर्मकांड, अंधश्रद्धा, देवधर्म, भुतप्रेत जगात नाहीत असंही म्हटलं तरीही कोणी आक्षेप घेवू नयेत. कारण विचार तेवढ्याच प्रवृत्ती. आपण लोकांची मनं दाबू शकत नाही. लोकांना गुलामही बनवू शकत नाही. तसंच लोकांची तोंडही बंद करु शकत नाही. प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. बोलण्याचा अधिकार आहे. बोलण्यावर कुणी बंधन घालू शकत नाहीत. त्यामुळं ते लोकं काय करतात हे पाहू नये तर त्याकडं दुर्लक्ष करावं व आपली दिशा ठरवावी. तसंच उगाचंच कोणाला चीड येईल असं पाऊलही कोणत्याही धर्मानं घेवू नये. हे तेवढंच सत्य आहे. मग ते कोणतेही धर्म का असेना. त्यांनी एकमेकांच्या विचारशक्तीचा आदर करावा व परस्परांशी बंधुत्वानं वागावं म्हणजे झालं. त्यानंच प्रेम वाढीस लागेल. जे प्रेम देशहिताच्या लायक असेल यात शंका नाही.
आज जसजसा तंत्राचा शोध लागत आहे. तसंतसं जग विज्ञानयुगाकडे वाटचाल करीत आहेत. त्यातच गुप्तधन प्राप्त होणं वा ते करणं या भ्रामक कल्पना. तरीही बरेच लोकं आजही गुप्त धनाच्या मागं लागतात व आपला संसार उध्वस्त करुन बसतात.
कजली हा असाच प्रकार आहे. गुप्तधन काढण्याचा. या प्रकारानुसार तांत्रिक लोकं जमिनीच्या खोलवर भागातून तंत्र आणि मंत्राच्या सहाय्यानं गुप्त धन बोलावत असतात आणि त्याला बाहेर काढून मालामाल होत असतात. म्हणतात की हे धन मिळतं. परंतू त्यासाठी साधकानं त्या धन काढण्याच्या जागेवर काहीतरी नरबळी अवश्य द्यावा. कोणी कोंबड्या बक-याचा बळी द्यावा असंही सांगतात.
गुप्तधन मिळवणं ही भ्रामक कल्पना असली तरी आजही जे बरेच लोकं त्या पाठीमागं लागलेले आहेत. ते लोकं ते धन मिळत अगर न मिळो. परंतू त्यासाठी नरबळी द्यावा लागतो असा विचार करुन ते नरबळी शोधतात. मग या नरबळीत निवड करायची झाल्यास रस्त्यारस्त्यावरील निवास करणारी वेडी माणसं, वेड्या स्रिया की ज्यांचा कुणीच वाली नाही वा ज्याचं अपहरण केल्यास आपण सापडणार नाही. तसंच ती वेडी असल्यानं त्यांचं कोणी अपहरण केलं. ते त्याला सांगता येणार नाही. तसंच खेळणारी घरादारातील लहान मुलं की ज्यांचे वयोमान जास्त नाही वा ज्याला आपला पत्ता नीट सांगता येत नाही. कारण या नरबळी देणा-यांना माहीत असतं की प्रसंगी एखाद्या वेळी न पडणारी धाड पडलीच आणि आपण जर पळून जाण्यात यशस्वी झालोच तर हे वेडे किंवा ही लहान मुलं आपलं नाव व पत्ता नीट सांगू शकणार नाहीत व आपण सिताफीनं सुटू शकू. यासाठीच तो प्रयत्न असतो त्यांचा. अशा वेड्या माणसांचा शोध घेत असतात वा अनाथ मुलांचा शोध घेत असतात.
गुप्तधनासाठी समजा नरबळी दिलाच तर धन मिळते काय? तर याचं उत्तर नाही असंच आहे. तरीही शेकडो लोकं आजही त्यामागं लागलेले आहेत व तांत्रिकाच्या नादाला लागून रात्री अपरात्री गुप्तधनासाठी फे-या लावत आहेत. कधीकाळी एखादी टोळी रंगेहाथ पोलिसांच्या जाळ्यात सापडलीच तर ते पोलीसवाले त्यांना पकडून तुरुंगात टाकतात. परंतू असं त्यांना तुरुंगात टाकणं हा त्याचेवरील उपाय नाही. कारण ते काही काळानंतर आरोप सिद्ध न झाल्यानं सुटतात.
महत्वाचं सांगायचं म्हणजे ते सुटणारच. कारण ती वेडी माणसं आणि ती लहानगी मुलं त्यांना तरी कशी ओळखणार? ती ओळखूच शकत नाहीत. तसं लहान मुलांचं वय लहान असतं आणि वेडी ती वेडीच. शिवाय त्यांनी जर ओळखलंच तर त्यांना निर्घुणपणे न्यायालयाच्या बाहेर मारण्याचीही व्यवस्था करतात हे लोकं. पुराव्यात समजा साक्षीदार बोललेच तर त्यांनाही संपवून टाकण्याची धमकी. मग कोण बोलणार? हा प्रश्न आहे.
विशेष सांगायचं म्हणजे समाजात अशा घटना वाढत आहेत. अपहरणाचीही प्रकरणं वाढली आहेत. गुप्तधनच मिळविण्यासाठी नाही तर इतरही अनेक कारणानं. कळायला मार्ग सापडत नाही. तसंच गुप्तधन मिळत जरी नसलं तरी गुप्तधनाच्या मागं फिरणा-यांची संख्याही वाढत आहे. यात एका ठिकाणी ऐकलंय की एका व्यक्तीनं त्याच्या घरातच गुप्त धन मिळवलंय. ते त्या गुप्तधनाच्या जागेवर दारु टाकून. म्हणतात की त्या माणसाला दररोज दारु पिण्याचा छंद होता. तो दारु प्यायचा व त्या दारुतील दोन थेंब त्या जागेवर टाकायचा. कधी कधी कपभर दारु ओतायचा त्या जागेवर. अशातच ती गुप्तधनाची देवता प्रसन्न झाली व तिनं त्याला भरभरून धन दिलं.
गुप्तधनाचा हा प्रकार निरक्षर, तसेच आदिवासी व अस्पृश्य समाजात जास्त होता. कुटूंबच्या कुटूंब हा प्रकार जाणत होते. आता इतरही समाजात याचे लोण पसरत असून तेही यात लिप्त होत आहेत. अलीकडे विज्ञानानं एवढे शोध लावले तरी त्या शोधावर त्यांचा विश्वास नाही. घरी कामधाम करुन मेहनतीनं पैसा कमविण्याऐवजी काही मंडळी निव्वळ गुप्तधनाच्या नावानं व्यापार करीत आहेत.
महत्वाचं म्हणजे गुप्तधन मिळत नाही. ती आपली एक भ्रामक कल्पना आहे. या कल्पनेचा मोरक्या असलेला तांत्रिक हा गुप्तधन मिळवून देण्याची आस प्रत्येक जनमाणसात निर्माण करतो. ती आस तो दाखवतो. म्हणूनच आपण त्यांच्या मागं लागतो ना. आपल्यातही ती आस निर्माण होते. कारण आपल्याला त्या माध्यमातून लाखो रुपये कमवायचे असतात. मग हळूच तांत्रिक एक पिल्लू बाहेर काढतो पैसे लुबाडण्याचं. तो सतत सांत्वन देत असतो की लाखो रुपये तुला मिळणार आहेत. परंतू तू आता खर्च करशील तर........त्यातच साधक त्याचेवर विश्वास ठेवून तो पैसा लुटलूट लुटत असतो. ज्या पैशाचं मोजमाप नसतं.
विशेष सांगायचं म्हणजे असं गुप्तधन कधीच मिळत नाही. आजच्या विज्ञानयुगात तरी नाही. ती एक अंधश्रद्धा आहे. त्यामुळं त्यावर आपण विश्वास ठेवू नये आणि त्यावर विश्वास ठेवून आपला संसारही उध्वस्त करु नये. कारण यामागे फिरतांना काही काही लोकांचे संसार उध्वस्त झाले आहेत हे तेवढंच सत्य आहे. तसंच आज ज्या घरात महिला या गुप्तधनाच्या पाठीमागं लागतात. त्या बाईचे पती गुप्तधन नाकारतात आणि ज्या बाईचे पती अशा गुप्तधनाच्या पाठीमागं लागतात, त्या महिला गुप्तधन नको गं बाई म्हटल्याशिवाय राहात नाहीत हेही तेवढंच सत्य आहे यात शंका नाही.
तो कजली प्रकार. त्या कजली प्रकारानं आपल्याला मानसी मिळेल असं त्याला वाटत होतं. परंतू ती अंधश्रद्धा आहे असं त्याला वाटत नव्हतं.
ती मानसी. त्या मानसीचा शोध घेण्यासाठी तो त्रेधातिरपीट करीत होता. त्याला मानसीचा शोध लावणं ही तारेवरची कसरत होती. तांत्रिक त्याला मानसीचा शोध लावून देतो असं आश्वासन देत होते. परंतू कितीतरी पैसा खर्च करुनही त्याला मानसी काही सापडली नाही. त्यामुळं त्यानं त्या तांत्रिकपणाचा नाद बंद केला.
आज तांत्रिक विद्या अस्तित्वात होती. परंतू ती सक्षम अशी विद्या नव्हती. ती विद्या मानसीला शोधू शकत नव्हती. तसं पाहता मानसी कुठं असेल हे एक कोडंच होतं.
मानसीचा ध्यास लागलेला राघव........त्याला आज असह्य झालं होतं. त्याला आज मानसीचीच नाही तर झरीनाचीही आठवण येत होती. ती आठवण येताच त्याला राहावणं असह्य होतं. आज ती मानसी तसेच झरीना त्याला गवसल्या नव्हत्या. तशी ती तरुणाई. त्या तरुणाईत स्वाभाविक होतं झरीनाची आठवण येणं. झरीना अशी व्यक्ती होती की जिच्यामुळं तो स्थिरावला होता. तिनं त्याला समजावले होते. जेव्हा त्याची मालमत्ता गेली तेव्हा. त्यावेळी तो तिच्यामुळेच सवरला होता. मात्र त्यानं विवाह करीत नाही म्हटल्यानं तिचं वाढणारं वय तिनं लक्षात घेवून तिनं आपला विवाह करुन टाकला होता. तेही तो स्थिरावल्यावर. ती जर त्याला मिळाली नसती तर कदाचीत त्यानं आत्महत्याच केली असती. मात्र आज तो झरीनामुळं जिवंत राहिला होता नव्हे तर त्याचं जिवंतपण हे तिचेच उपकार होते.
आज त्याला झरीनाची आठवण येताच त्याला अगदी कासावीस वाटत होतं. तसं त्याला राहावलं न गेल्यानं तो ज्या शहरात वास्तव्यास होता. तेथील वेश्यालयात तो गेला.
ते वेश्यालय........ते वेश्यालय एक वेदनागृहच होते. त्या वेश्यालयाच्या आजूबाजूला माणसाची गर्दी होती. त्यातच काही वेश्या काही माणसाजवळ उभ्या होत्या. त्या काहीतरी सौदा करीत होत्या आपल्या देहाचा. तसं त्यानं पाहिलं की त्या वेश्या स्वतःला लोकांना भुलविण्यासाठी मेकअप लावून आहेत. काही वेश्या नैसर्गिकरित्या सुंदर आहेत आणि काही वेश्या ह्या मेकअपनं सुंदर आहेत.
राघवनं पाहिलं की बरेच पुरुष त्या वेश्याजवळ जात होते. भावताव करीत होते. त्यानंतर त्या वेश्या त्या पुरुषांना एका बंद कम-यात नेत होत्या. राघवनं तसं पाहताच तो एका वेश्येजवळ गेला. तिच्याशी बोलणी केली. भावताव केला व तिनं त्याला त्या बंद कम-यात नेलं.

**********************************************************

"आपलं नाव राघव आहे काय?" ती वेश्या म्हणाली.
राघवला त्या वेश्येनं विचारलेला प्रश्न. तसा राघव आश्चर्यचकीत झाला. त्याला वाटलं की हिला माझं नाव कसं कळलं असावं. तसा कुतूहलानं तो म्हणाला,
"होय, माझं नाव राघवच. परंतू आपण माझं नाव कसं जाणता?"
ती मानसी होती. बालपणाची त्याची मैत्रीण. मैत्रीण नाही तर बहिणच. तिनं राघवला ओळखलं असेल. म्हणूनच तिनं विचारलेला प्रश्न. तसं पाहता राघवच्या चेह-यावर जास्त बदल झाला नव्हता. मात्र तिचा चेहरा बराच बदलला होता. त्यामुळं ती ओळखू येणं शक्य नव्हतं.
राघव विचार करु लागला. या देशात आपल्याला ओळखणारे असे कुणीच नाही. मग ह्या मुलीनं अन् तेही एका वेश्येनं आपल्याला ओळखलं कसं असावं? प्रश्न होता. आपण तर या वेश्यालयात पहिल्यांदाच आलो. तरीही या वेश्येनं ओळखलं आपल्याला. ही विचार करण्यालायक बाब आहे. तो विचारच करीत होता. तशी मानसी म्हणाली,
"आपण सुधारगृहात होते काय?"
"होय. का बरं?"
"आपण मानसीला ओळखता काय?"
"होय, का बरं? आपण मानसीला ओळखता काय? जर ओळखत असाल तर मला तिचा पत्ता द्या म्हणजे झालं आणि आपण मानसीला कसे ओळखता?"
"आपण राघव आहात ना?"
"होय. परंतू? कदाचीत तुम्हीच तर मानसी नाही?"
ती विचार करु लागली. एकतर तिनं त्याला राघव आहात काय? म्हणून विचारलं तर होतं. परंतू ती विचारात पडली होती की आपण त्याला ओळख दाखवावी की नाही. क्षणभर विचार करीत असतांना तोच म्हणाला,
"आपण मानसीच आहात. कारण या देशात मला मानसीशिवाय दुसरा कोणी ओळखूच शकत नाही. बरोबर की नाही?" ती पुन्हा बोलली नाही. निःस्तब्ध होती ती. तसा तोच म्हणाला,
"बोला ना. आपण मानसी आहात की नाही. आपण मानसी जरी असल्या तरी मला काही फरक पडणार नाही. माहीत नाही आपल्याला. मी किती शोधलं मानसीला. परंतू मला मानसी मिळालीच नाही. माहीत आहे, आपल्या तोंडून मानसीचं नाव ऐकताच माझ्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. एकतर आपण मानसी आहात हे कबूल करावं, नाहीतर आपण मानसीचा पत्ता तरी सांगावा."
राघवचे ते बोल. आतापर्यंत मानसी स्तब्धपणे ऐकत होती. तिच्या भावना मरण पावल्या होत्या वेश्याव्यवसाय करतांना. तो व्यवसाय तिनं स्वतः स्विकारला नव्हता तर तिला मजबुरीनं स्विकारावा लागला होता. त्यात तिला मजबूर केलं गेलं होतं वेश्याव्यवसाय करण्यासाठी. राघवचं ते संभाषण. ते संभाषण ऐकताच मानसीच्या डोळ्यातून नकळत अश्रूधारा वाहायला लागल्या. तसा तो म्हणाला,
"बोल मानसी, काय झालं? मला माहीत आहे की तूच मानसी आहेस. कारण मानसीशिवाय कोणी दुसरी माझ्या बोलण्यानं रडूच शकणार नाही."
त्याचे ते शब्द. ते शब्द तो बोलताच ती रडतरडत म्हणाली,
"होय. मीच मानसी. परंतू मी आज तुझ्यापासून फार दूर गेली आहे. तुला कधीही न सापडण्यासाठी."
"मानसी धीर सोडू नकोस. अगं आपल्या प्रारब्धात जे लिहिलं होतं, तेच घडलं. आता माझंच पाहा. मी कोणाचा मुलगा ते मलाही माहीत नाही. ज्यानं मला वाढवलं, ते माझे आईवडील अगदी लहानपणीच वारले. जेव्हा शहरात आलो आणि तुझ्या आईनं धीर दिला. परंतू तुझी आईही दोन वर्षातच गेली आपल्या दोघांना सोडून. मग कसंतरी मी तुला सांभाळण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ती मुनसीपार्टीची गाडी आली आणि आपल्याला घेवून गेली. मग पोलिसांनी अशा सुधारगृहात पाठवलं की जिथं त्रासच जास्त होता. अन् तेथूनही तुला आणि मला दत्तक दिलं. तिथंही तुला आणि मला त्रासच झाला. तू एक वेश्या बनली व मी असा भिकारी. माहीत आहे, आजही मी रस्त्यारस्त्यावर भीकच मागतो आहे."
"का? का बरं आजही भिकारी अवस्थेत आहे तुम्ही?" ती म्हणाली. तसा तो आपला पुर्ण भुतकाळ तिच्यापुढं ओतू लागला.
"मला ज्यांनी दत्तक घेतलं. तू विदेशातील लोकं. खुप श्रीमंत होते ते. परंतू ते अकाली मरण पावले, जेव्हा मी सातवीत होतो. त्यावेळेस मरतांना त्यांनी वसीयत लिहिली होती की मी जेव्हापर्यंत अठरा वर्षाचा होत नाही, तेव्हापर्यंत ती वसीयत कुणालाही आपल्या नावावर करता येणार नाही. परंतू मला ते कळत नव्हतं. त्यातच मी अल्पवयात निरनिराळ्या व्यसनाच्या आहारी गेलो होतो. त्याचाच फायदा घेतला आमच्या कार्यालयातील मॅनेजरांनी. मी अठरा वर्षाचा होताच त्यांनी माझी नकळत स्वाक्षरी घेतली मालमत्तेच्या कागदपत्रावर व मला वनोधारी लावलं. मला हाकलून लावलं त्यांनी. बरं झालं की मला मायदेशाची आणि विशेष करुन तुझी आठवण आली व मला आमच्या नोकरानं मदत केली. म्हणून मी इथंवर तरी पोहोचलो."
"नोकरानं म्हणजे?"
"आमचा एक इमानदार नोकर होता. जो मला वारंवार समजवायचा. परंतू मी लक्षच द्यायचा नाही त्यांच्या त्या बोलण्याकडं. परंतू ज्यावेळेस माझी पुर्ण मालमत्ता गेली. तेव्हा तेच कामी आले."
"हो काय."
"होय. त्यांनी मला पुरेसे पैसे दिले व मी इथं आलो. इथं येवून मी तुझा बराच शोध घेतला. वेगवेगळे सुधारगृह फिरलो. परंतू तू गवसली नाहीस. तसंच वेगवेगळे शेल्टर होम फिरलो. तरीही तू दिसली नाहीस. कजलीही पाहिली. कर्मकांडावर माझा विश्वास नसतांनाही कर्मकांडावर विश्वास ठेवून भानामतीही अनुभवली. परंतू मला काहीच फायदा झाला नाही. शेवटी तुझी आस सोडली व आज वेश्यालयात आलो. माहीत आहे इथं येण्याचं कारण? विचार केला की कदाचीत तू इकडं तरी सापडू शकतेस आणि सापडलीच तू मला इकडं. परंतू मला कळलं नाही की तू इथं कशी पोहोचली. जरा विस्तारानं सांगतेय का?"
"माझी कहाणी मोठी लंबी कहाणी आहे."
"जरा सांग तर."
"ठीक आहे. ऐक तर." असे म्हणत मानसी त्याला आपली कर्मकहाणी सांगू लागली. ती तिची कर्मकहाणी नव्हती तर ती एक कैफियतच होती.
"मीही दत्तक गेली होती त्या घरी. सुरुवातीला त्या लोकांनी मला चांगलं वागवलंं, परंंतूू जेव्हा माझ्या त्या दत्तक आईला दिवस गेले, त्यानंतर मला वाईट दिवस आले. असे वाईट दिवस की मला प्रत्येकच दिवस सहन होत नव्हता.
मला ती माझी आई जेवायलाही देत नव्हती. अन् माझ्याकडून कामही जास्त घेत होती. एक दिवस तर तिनं कहरच केला. त्यातच तो कहर असा होता. मला त्या दिवशी माझ्या त्या दत्तक आईनं किरकोळ कारणावरुन घराच्या बाहेर काढलं.
मी बाहेर पडले. त्यानंतर मी रस्त्यारस्त्यावर भटकत राहिले. मी अशी भटकत असतांना मला भूक फार लागली होती. त्यामुळं मी एका रेस्टॉरेंटवर भीक मारण्यासाठी गेले.
तो रेस्टॉरेंटवाला मला आधी दयाळू दिसला. त्यानं मला जेवन दिलं. त्यानंतर मला त्यानं जेवन तर चारलं. परंंतू माझ्या जेवनात त्यानं काय टाकलंं कुणास ठाऊक. मला नशा आली होती. त्यानंतर मी बेशुद्ध झाले आणि मला जेव्हा होश आला. ते थेट वेश्यालयात आल्यावरच.
हे वेश्यालय. मला आज बरं वाटतंय इथंं. परंतू केवल मला जेव्हा वेश्या बनवलं गेलं. तेव्हा मला अगदी बेकार वाटत होतंं. परंतू आता तो अत्याचार वाटत नाही." ती म्हणाली.
"आता व्यवस्थीत आहे ना?"
"होय. आता व्यवस्थीत आहे आणि तू कसा आहेस?"
"मिही व्यवस्थीतच. परंतू एक शल्य आहे."
"कसलं?"
"मला त्या मॅनेजरना धडा शिकवायचा आहे.?
"मग शिकव ना. कोणं थांबवलं."
"अगं ती सोपी गोष्ट आहे का?"
"म्हणजे?"
"त्याला काही पाहिजे की नाही."
"काय पाहिजे?"
"धन."
"म्हणजे?"
"अगं पैसा."
"पैसा! कशासाठी पाहिजे पैसा?"
"तू वेडीच आहेस."
"अरे ती मालमत्ता मिळवायला पैसा लागतो की नाही?"
"तेच तर विचारत आहे मी की त्याला पैसा कशाला लागतो ते?"
"मालमत्ता अशीच मिळेल काय? त्यासाठी कोर्टकचे-या कराव्या लागणार नाही काय?"
"हो. लागेलच की. माझ्या ते ध्यानात नाही आलं. मग लाव ना पैसा?"
"कुठून लावू?"
"म्हणजे?"
"माझ्याजवळ नाही आहे पैसा."
"हो का." असे म्हणत ती चूप बसली. तसा थोडा वेळ गेला. तसा तो म्हणाला,
"अगं एक विचारु का?"
"विचार."
"तू देशील का पैसा? आहे काय तुझ्याजवळ पैसा? मी परत करील व्याजासह."
"ती थोडा वेळ थांबली. तसा तो म्हणाला,
"अगं काय झालं? कसला विचार करतेय. अगं नसेल द्यायचा पैसा तर नाही म्हण सरळसरळ. मी तुला काहीही म्हणणार नाही."
"तसं नाही रे. परंतू?"
"काय परंतू?"
"काय परंतू? परंतू काय?"
"माझा पैसा चालेल का तुला?"
"म्हणजे?"
"म्हणजे हा देहविक्रयातून आलेला पैसा आहे. हा पैसा चालेल तुला?"
"का बरं चालणार नाही?"
"अरे तुझा खटला सत्य विकत घेण्याचा आहे. तुला सत्य अगदी खेचून आणायचं आहे. मग चालेल का तुला तो पैसा?"
"हो, चालेलच. अन् का बरं चालणार नाही? का बरं चालू नये. तू अशी वारांगणा, आज जर लोकांना चालते, तर तुझा पैसा का चालू नये लोकांना आणि मला. तू काही खोटं काम करुन मिळवते का पैसा? सत्यानंच मिळवते ना. मेहनत करते तू अपार. देह विकते. अतिशय त्रास सहन करतेस तू. तुला वेदना किती होत असतील याची कल्पनाही कोणी करु शकत नाहीत. जिथे विवाहाचा एका दिवसाचा एकच पुरुष त्याच्या विवाहीत पत्नीला जड होतो, तिथं तूझा तर अनेक पुरुषांशी येणारा संबंध. मग त्यातून मिळालेला पैसा. हा पैसा खरंच खोटा कसा आणि यात भ्रष्टाचाराचा लवलेशही नसतांना हा पैसा भ्रष्टाचारी कसा? अगं वेश्येच्या अंगणातील मातीनंही आमचं अंगण पवित्र होतं. तिथे तो तुझा पैसा आहे. मला माहीत आहे. तो तुझा इमानदारीचा आणि अतिशय मेहनतीनं कमविलेला पैसा आहे. मी बेईमान होणार नाही आणि समजा मी पचवलाच तुझा पैसा. तरी तो मला फलणार नाही. फलदायी ठरणार नाही."
"तर मग ठीक आहे. हा पैसा तुला जर चालतो आणि या पैशानं एखादं सत्य जर बाहेर येत असेल तर त्या पुण्यासारखं दुसरं पुण्य नाही. मी तुला देतो पैसा."
"मी तुला यातील पाई पाई परत करेल."
"अं, नाही दिला पैसा परत तरी चालेल. हा माझा पैसा दान म्हणून समज. मी माझी आई मरण पावल्यानंतर तू मला आधार दिला. दोन वर्ष सांभाळलं. त्याची परतफेड समज. घे हा पैसा आणि परत करायची गरज नाही. तू तुझी मालमत्तेची लढाई लढ व जिंक म्हणजे झालं आणि अजून लागेल तर हा फोन नंबर ठेव. एक स्मार्टफोन घेशील. मला फोन करत राहशील. अपडेट सांगत राहशील व जेव्हा जेव्हा आवश्यकता पडली. तेव्हा तेव्हा मला मागशील पैसे. नि:संकोच मागशील. संकोच करशील नको." असे म्हणत तिनं घरातून पैशाची बॅग आणली व ती त्याच्या हातात दिली. तसंच त्याला आपला एक फोननंबरही दिला. तसा तो म्हणाला,
"मानसी, मी तुझे कधीच उपकार विसरणार नाही. मी केस जिंकताच लवकरच या देशात परत येईल. तुझी पाई पाई देईल मी."
"बरं, जा तू दादा आता. अन् लवकर चांगला समाचार मिळू दे."
'दादा' ती त्याला दादा म्हणाली होती. त्याला अगदी बरं वाटलं होतं. तसा तो तिचा दादाच होता. तिच्या आईनंच सांभाळलं होतं त्याला. अगदी स्वतःच्या लेकरासारखं. काहीच अंतर दिलं नव्हतं त्याला. आज त्याचेवर तिच्या आईनं उपकार केले होते आणि आता तिनं. तो विचार करु लागला. विचारांती तो म्हणाला,
"हो आणि एक बोलतो. ते तू ऐकायला हवं."
"काय?"
"मी परत येताच तुला माझ्यासोबत चालायला हवं."
"नाही, ते शक्य नाही. इथं येण्याचा मार्ग आहे. जाण्याचा मार्ग नाही."
"ते वैगेरे काही नाही. तू मला दादा मानतेस ना? मी तुझा दादा आहे ना. मनातून मला दादा म्हटलं ना? मग माझ्यासोबत चालायलाच हवं. ठीक आहे."
"ते नंतरच नंतर बघू. आधी तू तुझी मालमत्ता मिळव म्हणजे झालं." ती म्हणाली.
"ठीक आहे. येतो मी." तो म्हणाला.
"ठीक आहे." ती म्हणाली. तसा तो रवाना झाला व तो रवाना होताच त्याच्या पाठमो-या आकृतीकडं ती निपचीतपणे पाहातच होती. तो ओझल होईस्तोवर. आज ब-याच दिवसानं आपलं मानणारं आपल्याच नात्यातलं असलेलं कोणीतरी भेटलं होतं. याचा आनंद तिच्या चेहर्‍यावर होता. तो आनंद आज तिच्या चेहर्‍यावरुन ओसंडून वाहात होता.
राघव मानसीला तिथंच सोडून निघून गेला. तसा तो विदेशातही गेला. तो विमानात प्रवासात होता. तसा त्याला विचार आला. मानसी कुठली कोण? परंतू तिनं मला मदत केली. हा मायबापाच्या पुण्याईचा परिणाम. त्यांनी मला जन्म दिला नाही. परंतू काहीतरी पुण्य नक्कीच केलं असावं. हे सत्य आहे.
मायबाप देवच असतात. ते आपल्याला जन्माला घालतात. म्हणूनच आपल्याला जग बघता येतं. त्यांनी जर जन्मच दिला नसता तर आपल्याला जगही पाहता आलं नसतं आणि त्याचबरोबर देव धर्मही. हे निर्वीवाद सत्य आहे. मायबाप होते, म्हणून आपण आहोत. मायबाप नसते तर आपणही नसतो हेही तेवढंच खरं.
आज स्पर्धाकाळ आहे. या स्पर्धाकाळात आपल्याला नोकरीची अत्यंत आवश्यकता आहे. तेही गलेलठ्ठ नोकरीची. कारण आजच्या परिस्थितीत तुटपुंज्या वेतनात काहीच भागत नाही. म्हणून आपण गलेलठ्ठ वेतनाची नोकरी शोधत असतो. मग अशी नोकरी जिथं मिळेल तिथं आपण जात असतो आणि आपले पोट भरीत असतो. मग त्यात आपला देश का असेना किंवा विदेश का असेना.
आपला देश असा की ज्या देशात माणूसकी आहे. माणूसकी आजही टिकून आहे. आजही आपल्या देशानं माणूसकी सोडलेली नसून आजही आपल्या देशातील लोकं आबालवृद्धांची सेवा करतात. त्यातच मायबापाचीही सेवा करतात. परंतू काही काही महाभाग आजही असे आहेत की जे मायबापांच्या पोटातून जन्म घेतात. त्यांचे उपकार घेतात. लहानाचे मोठे होतात. प्रसंगी सरकारी नोकरीवर लागतात. परंतू ते उपकार विसरतात व त्या उपकारावर कोणी काही बोलल्यास त्याला अपशब्द बोलतात वा अपमान करतात. आज बरेच असे महाभाग आहेत की जे सरकारी नोकरीवर मोठ्या पदावर आहेत. ते मोठ्या पदावर मायबापामुळंच गेलेले असून ते उपकार विसरल्याचे निदर्शनास येत आहे. जेव्हा त्यांचे मायबाप म्हातारे झाले, तेव्हा अशा ब-याच जणांनी माणूसकी विकून आपल्या मायबापाला वृद्धाश्रमात टाकलेले आहे. हे वृद्धाश्रमातील भेटीदरम्यान दिसून येते.
त्यानं मानसीचा शोध घेतांना वृद्धाश्रमही पाहिलेले होते. त्यावेळेस त्याला काही अनुभवही आलेले होते. एक प्रसंग असा होता की त्यावेळेस अक्षयतृतीयाचा पर्व पार पडला. त्यात एक पोस्ट आली होती एका व्यक्तीच्या व्हाट्सअपवर. जी त्यानं पाहिली होती. कशाला आज मायबापांना पुजताय? मथितार्थ असा होता की मायबाप जेव्हा जीवंत होते तेव्हा ज्यांनी सेवा केली नाही. त्यांना मायबापाचे पुजन करण्याचा अधिकार नाही. वास्तविक ही पोस्ट बरोबर होती. ज्यांनी मायबापाची सेवाच केली नाही आपल्या संबंध आयुष्यात. त्यांना सेवेचा अधिकार कशाला? परंतू या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया आल्या होत्या. त्यात कशाला अशा पोस्ट करताय? असाच हेतू होता सा-या लोकांचा. बहुतेक तो नोकरीवर असलेल्यांचाच ग्रुप असावा. ज्यांचे मायबाप त्यांच्याजवळ नसावे आणि ज्यांनी आपल्या नोकरीसाठी आपल्याच मायबापांना वृद्धाश्रमात टाकलेलं असावं. होय, नोकरी करणा-या मंडळींची हीच गत आहे. जिथं नोकरी करणारी मंडळी आपल्या मुलांनाच दाईकडं सोपवून त्या नोकरीवर जातात. तिथं ती दाई आपल्या मुलांसोबत कसला व्यवहार करते याकडेही ही मंडळी ढुंकून पाहात नाही. ती काय मायबापांना सांभाळणार उतार वयात. याबाबत त्यानं एका बहात्तर वर्षाच्या व्यक्तीला विचारलं,
"काका, आपली मुलं दिसत नाहीत. कुठं आहेत?" त्यावर तो दुःखी अंतःकरणानं म्हणाला,
"मी विनाकारणच शिकवलं माझ्या मुलाला. माझी दोन्ही मुलं आज विदेशात स्थायीक झालेली आहेत. ते इथं येत नाहीत. जास्त पैसा कमवतात ना." त्यावर तो म्हणाला,
"तुम्ही त्यांच्याकडे का राहात नाही? पोषत नाहीत का ते?" त्यावर ते म्हणाले,
"पोषतात. परंतू आम्हास तिथं करमत नाही. आजारी पडतो आम्ही. तेथील वातावरण आम्हाला लाभदायक होत नाही. मग कशाला ओझं व्हायचं मुलांवर? मला वाटतं की मी फालतूच शिकवली मुलं. नसती शिकवली तर ती मुलं आजही माझ्याजवळच राहिली असती."
म्हातारपण मोठं भारी. म्हाता-यांची ही कैफियत. बरीच अशी म्हातारी मंडळी मिळत होती त्याला आणि आपल्या आटलेल्या वेदना सांगत असत. अशीच एका शेतक-यांची गोष्ट त्याला माहीत होती. या शेतक-यानं आपल्या मुलाला शिकवलं. तो मोठा ऑफिसर बनला. त्यानंतर मुलगा ऑफिसर बनताच त्याचा शेतकरी बाप त्याला भेटायला गेला. जेव्हा तो भेटायला गेला. तेव्हा भेटीदरम्यान तिथं सभा चाललेली होती. विचारलं, 'कोण हे?' उत्तर मिळालं, 'माझ्या घरचा नोकर.'
जन्म दिलेला बाप. त्या मुलांना वाढवतांना भोगलेल्या वेदना. उन्हातून सावलीत नेतांना झालेल्या अडचणी. कधी पीक होईना, तरीही शिक्षणात खंड पडू दिला नाही. सारेच प्रॉब्लेम. तरीही त्या शेतक-यानं आपल्या मुलाला शिकवलं. त्या शेतक-याचा तो अपमानच होत होता. अतिशय लाज वाटत होती आपल्या लेकराची. परंतू काय करणार. उपाय नव्हताच. शेवटी तो निराश होवून घरी परत आला. पुन्हा मुलाच्या घरी कधीही न जाण्यासाठी.
खरी परीक्षा मुलांची असते मायबापाच्या म्हातारपणीच. ती कशी वागतात? आपल्याला सांभाळतात का? की आपली दुर्दशा करतात. ती चांगली जर निपजली तर सारंच मिळवलं व ती चांगली निघाली नाही तर सारंच गमावलं. याबाबत दुसरा एक प्रसंग त्याला आठवत होता. त्या शेतकऱ्यासारखाच तो प्रसंग. परंतू अपमान करणारा नव्हता. अलीकडेच ती एक पोस्ट व्हायरल होत होती. फरक एवढाच की तो शेतकरी नव्हता. तो मजूर होता. तो मजूरही तसाच त्या मुलाला भेटायला गेला. तेव्हा त्याच्या जिल्हाधिकारी पदावर असलेल्या मुलानं त्याला आपल्या खुर्चीवर बसवलं व त्याचा आदरसत्कार करुन त्याचं स्वागत केलं. त्याचा व्हिडिओ बनवून तो व्हायरल केला.
राघवला वाटत होतं की असे असावेत ऑफिसर. आपल्या मायबापांना न विसरणारे. आपल्या मायबापांचा यथोचीत सन्मान करणारे अन् आपल्या मायबापाच्या उपकारांची जाणीव ठेवणारे. अलीकडे याच प्रकाराची वानवा होती. लोकं आपल्या मुलांना शिकवत. त्यांनी आपल्या पायावर उभं राहावं म्हणून. ते आपल्या पायावर उभे राहत. परंतू ज्यावेळेस ते आपल्या पायावर उभे राहत. तेव्हा ते केलेले उपकार विसरुन गेलेले असत.
राघवला वाटत होतं की आज मुलांनी असला व्यवहार करु नये मायबापासोबत. ते होते, म्हणून आपल्याला जग पाहता आलं. ते तेवढंच सत्य आहे. त्यांनी आपल्या रक्ताचं पाणी करुन शिकवलं आपल्याला आणि आपण आज ते रक्तच विसरलो तर आपल्या जगण्याला काहीच अर्थ उरत नाही. तसंच त्यांची सेवा न करता आपण देवधर्म कितीही पुजले तरी ते पुण्य ठरत नाही. मायबापाची सेवा हीच इश्वरसेवा आहे. ते होते म्हणून आपल्याला देव कळला. देवाचा आकार कळला. ते जर नसते तर आपला जन्मही झाला नसता, आपल्याला देवही कळला नसता व देवाचा आकारही.

*********************************************************

बरीचशी अशी लेकरं आहेत की मायबाप जीवंत असतात, तेव्हा किंचीतही सेवा करीत नाहीत आणि ते नसल्यावर त्यांची सोनेरी रंगात भव्यदिव्य फोटो बनवतात. अशी फोटो बनवतात की जी सुबक व सुंदर असते. सारखी पाहाविशी वाटते. तसेच ते महाभाग आपल्या मायबापाला आपल्या मायबापाची सेवा न करता ते मरण पावल्यावर त्यांची दरवर्षी नित्यनेमानं पितृमोक्ष अमावस्या व अक्षयतृतीयेला पुजा करीत असतात. खरंच याला काय म्हणावे? दिखाऊपणा की आत्मीयता. याबाबत काही बोलल्यास नक्कीच राग येतो अशा उभययंतांना. हा दिखावाच असतो. त्यात आत्मीयता नसतेच. लोकांनी आपल्याला नावबोटं ठेवू नये म्हणून. म्हणतात की ती प्रथा आहे. मग मायबापाची सेवा करणं ही प्रथा नाही का? काही काही मायबाप तर मायबापाच्या मृत्यूनंतर भिंतीवर त्यांची आठवण म्हणून फोटोही लावत नाहीत.
महत्वाचं म्हणजे काही काही लोकं असेही असतात की जे आपल्या स्वतःच्या मायबापाची सेवा करीत नाहीत. परंतू इतरांची जास्त सेवा करतात. परंतू कोणाची वा इतरांची सेवा नाही केली एकदाची तरी चालेल, ज्यानं जन्म दिला. त्या मायबापाची सेवा करावी. त्यांच्या सेवेनच सातजन्माचं पुण्य लाभतं. जो सेवा करेल, तो मेवा खाईल या वृत्तीप्रमाणे ती सेवा केल्यास असं पुण्य लाभतं की त्या पुण्यातून आपण सदैव सुखी होतो. आपलं आयुष्यही सुखदायक होतं आणि आपल्याला आजार पाजार होत नाहीत. पर्यायानं सांगायचं झाल्यास आपण आपलं व आपल्या मुलाबाळाचं आयुष्य त्या पुण्यानं मंगलमय बनवू शकतो हे तेवढंच खरं आहे.
राघवनं आपल्या मायबापाची सेवा केली नव्हती. परंतू त्याला वाटत होतं की लोकांनी आपल्या मायबापाची सेवा करावी. ज्यातून सर्वच प्रकारचं पुण्य मिळतं.
तो विचार करु लागला की मानसीची आई ही काही त्याची सख्खी आई नव्हती वा विदेशातील त्याचे मायबाप काही त्याचे सख्खे मायबाप नव्हते किंवा सदा हाही त्याचा सख्खा बाप नव्हता. परंतू त्याला वाटत होतं की मागील जन्मात त्यानं त्यांची सेवा केली असेल की ज्यातून त्याला आज पुण्यस्वरुपात सर्व मिळालं होतं. त्यांनी काही पुण्य केले असेल. म्हणूनच त्याच्याजवळ मालमत्ता आली होती आणि त्याचं काही पापकर्म असेल की त्याची मालमत्ता त्याच्या हातातून निसटून गेली होती. तसं पाहता त्याचा पापपुण्यावर व मागील जन्मावर व मागील जन्मातील पापपुण्यावर विश्वास होता.