राधा प्रेम रंगली - भाग २ Chaitrali Yamgar द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

राधा प्रेम रंगली - भाग २

" गुलाबाची फुलं घ्या ना ताई...तुमच्या नवर्याला ..." मुंबई च्या एका सिग्नल वर एक बारा वर्षांची मुलगी गाडीतल्या एका बाईला आपल्या हातातील गुलाबाची फुले देऊन ते विकत घेण्यासाठी मजबुर करत होती...

" ऐ पोरी, पुढे जा...आम्हांला नाही घ्यायचं ..हो बरं पुढे..." ती गाडीतील महिला तिच्यावर खेकसत बोलते..पण तरी ही ती छोटी मुलगी दटून तिला ते फुल घेण्यास प्रवृत्त करत होती...

" एकदा सांगितलेलं कळत नाही का...जा म्हणून..." आता तर गाडीतला ड्रायव्हर ही तिच्यावर ओरडतो आणि त्याचवेळी सिग्नल सुटतो...ती मुलगी गाडीखाली जाणार कि इतक्यात तिला एक जण खसकन तिच्याकडे ओढतो आणि रस्त्याकडच्या दुसर्या बाजुला नेतो.


" ऐ पोरी मरायच आहे का..?? " तो तिला आपला दांडुका दाखवत तिच्यावर ओरडतो...ती त्या माणसांकडे पाहते..तर तो पोलिस हवालदार असतो....

" काका,मला सोडा...माझी काय पण चुक नाही..." ती मुलगी ओरडत असते ...

" अगं काय झालं ...?? का अशी ओरडत आहेस...?? स्वप्न पाहिलं का.." एक सव्वीस वर्षांची मुलगी , बेडवर झोपून ओरडत असलेल्या तिच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान असलेल्या ,मुलीला बोलते...

" ताई, ताई ..तु हिथे काय करतेय...मी तर ..त्या तुरूंगात...ते पोलिस हवालदार..." ती मुलगी झोपेतुन गडबडून उठत बोलते...

" रिलॅक्स... शांत हो बाळा..." ती मुलगी तिच्या शेजारी बसुन तिला आपल्या मिठीत घेत तिला शांत करण्यांचा प्रयत्न करते..." बाळ त्या घटनेला , १२ वर्षांचा कालावधी उलटला आहे...आणि तु आता घरात ,आपल्या घरात सुरक्षित आहे..." ती तिच्या सिल्की केसांवरून हात फिरवत शांत करते..

" पाणी घे..." म्हणून तिला पाण्याचा ग्लास देत ती बोलते..तशी ती घाबरलेली मुलगी पाण्याचा ग्लास घेऊन गटकन पाणी पिते..." बरं मी आता जाते.. तुझ्यासाठी आवडीचा शिरा बनवला आहे..लवकर ये आवरून..." ती तिच्या कपाळावर किस करत बोलते...

" हो ताई.." म्हणत ती तो पाण्याचा ग्लास टेबलवर ठेवते...ती मुलगी परत जाताना तिच्या गालावरून हात फिरवत डोळ्यांनीच शांत हो म्हणून सांगते तसं ती मुलगी ही डोळ्यांनीच तिला विश्वास देते कि हो म्हणून ...


" काय गं किर्ती,आज पण ओरडत उठली ना राधा..." ताटात शिरा वाढत एक बाई बोलते...

" हो गं आई...तिचा भुतकाळ तिची काही केल्या पाठ सोडत नाही गं...किती प्रयत्न आपण करतोय गेली बारा वर्षे...यातुन तिला काढण्यासाठी पण ती मात्र विसरत नाही गं..." किर्ती कळजीत बोलते...


" हम्म पण आता तिला सर्व विसरून नविन आयुष्य सुरू करायला हवं..आज पासुन तिचं नविन आयुष्य सुरू होत आहे...एक नविन आध्याय..." आई हि खुप काळजीत बोलते...


" हो ना...आज तिचं इतकी वर्ष पाहिलेलं स्वप्न पुर्ण होत आहे...इंटर्नशिप साठी खास तिला सिटी हॉस्पिटल मिळालं आहे जे तिला खुप मोठा डॉक्टर बनण्यासाठी,तिच्या स्वप्नांजवळ घेऊन जाणार आहे..." किर्ती खुश होत बोलते...


" ताई लवकर वाढ नाष्टा..आज मला जायला उशीर झाला ना तर माझी इंटर्नशिप आजच संपली म्हणून समज...असं ऐकलं आहे कि सिटी हॉस्पिटलमध्ये असलेले सिनियर डॉक्टर खुप कडक आहे..." तीच चोवीस वर्षांची मुलगी, पांढर्या रंगाच्या चुडीदारात ,किचनमध्ये येत बोलते...जिने हातात सिल्वर ,नाजुक अशा दोन दोन बांगड्या घातल्या होत्या... ओठांवर हलकीशी लिपस्टिक लावली होती...डोळ्यांत काजळ घातलेलं होतं आणि कानांत मोठे मोठे झुमके ....


" खुप गोड दिसत आहेस आज राधे तु...आज कुणाची नजर न लागो माझ्या लाडोला.." आई सुमन तिच्यासमोर येत आपल्या डोळ्यांतील काजळाचा तिट तिच्या मानेवर लावत बोलते...

" हम्म लवकर जावई मिळाला तर चालेला ना आई..‌" राधा ला कोपरा मारत किर्ती आपल्या आई ला बोलते...

राधा, आपल्या कथेची नायिका..आपल्या आई सुमन व दोनच वर्षांनी मोठी असलेल्या किर्ती बरोबर राहत होती...वडिल तिच्या लहाणपणीच दारूच्या आहारी जाऊन देवाला प्रिय झाले होते... त्यामुळे घराची जबाबदारी पुर्णतः किर्ती ताईवर आली होती...आई सुमन ने धुण भांडी करुन दोन्ही मुलींना चांगलं शिक्षण देऊ इच्छित असल्याने किर्ती ताई व राधा दोघीही हातभार लावत होत्या ...राधा ही गुलाबाची फुले ,गजरा,हार विकून आपल्या शिक्षणासाठी पै न पै जमा करत होते..त्यातच ती बारा वर्षांची असताना तिच्या आयुष्यात अशा दोन गोष्टी घडल्या ज्याचं सावट अजुनही तिच्या मनावर होतं...


आजपर्यंत तरी ही तिने आपल्या मनातल्या भितीवर थोड्या काळासाठी का होईना मात करत ती आज एम बी बी एस झाली होती..आणि कॉलेज मध्ये असलेल्या कँपस इंटरव्ह्यू मधुन सिटी हॉस्पिटलमध्ये ईन्टर्न म्हणून तिचं सिलेक्शन झालं होतं...आणि गेले कित्येक वर्षे पाहत असलेल्या स्वप्नांजवळ ती खुप नजदिक पोहचली होती...


" शंतनु ,प्रेम...तयारी झाली ना... आजपासून नविन ईंटर्न येत आहेत आणि त्यांना कम्फर्ट करण्याची जबाबदारी तुमच्या दोघांवर आहे...आणि हो ,आजच्या फ्रेशर पार्टीची ..." माँसाहेब दोघांजवळ येत बोलतात...

" हो माँसाहेब...तुम्ही बिलकुल काळजी करू नका...सर्व तयारी झाली आहे ....बस आता नविन ईंटर्न चाच फक्त ईंतजार आहे..." माँसाहेबांच्या खांद्यावर हात ठेवत प्रेम बोलतो..

" गुड...मला तुझ्या कडून व शंतनु कडून हिच अपेक्षा आहे..." त्या दोघांच्या गालावरून हात फिरवत बोलतात..

" कुल डाऊन माँसाहेब.... तुमच्यासाठी तर हे आता दरवर्षी होत तरी तुम्ही एवढ्या पॅनिक का आहात...आणि ते ही तुमचा उजवा व डावा हात ,मी व प्रेम असताना..." शंतनु माँसाहेबांच्या पाया पडत बोलतो..

" हो मला माहित आहे कि हे दरवर्षीच क्षण येतात माझ्या आयुष्यात...पण काय आहे ना ,मला माझे करन अर्जुन माहित आहे ना ...माझे जरी उजवा डावा हात असले तरी गेल्या वर्षभरात मी आता चांगले ओळखते त्यांना..." त्या नमस्कार करण्यासाठी वाकलेल्या शंतनुचा एक कान पकडत बोलतात...." गेल्या फ्रेशर पार्टीचे किस्से अजुनही मला चांगले आठवतात बरं का शंतनु.."


" आ माँसाहेब...त्यात आमची काय चुक होती..." तो कसंबसं कान सोडवत बोलतो..." आमचे सिनियर ही काही कमी नव्हते माँसाहेब...कसं कसल्या गोष्टी करयाला सांगत होते आम्हांला..."


" अरे शंतनु, कुणाला सांगतोय...?? माँसाहेबांना...??" प्रेम हसत बोलतो, " अरे ,तिला तर कायम आपले सिनियर च आवडत होते...त्यांनी किती ही वर्षभर आपल्याला त्रास दिला तरी तिला तेच प्रिय होते... आठवतंय ना , डांस करताना त्या राघव ने मला पाडलं होतं चीट करून तरी माँसाहेबांनी मात्र मलाच रागवल होतं..." प्रेम तक्रार करत बोलतो....



" प्रेम...जे झालं ते झालं...आता विसर सर्व..." माँसाहेब त्याच्या पाठीवर हात ठेवून बोलल्या...

" हं...पाहिलंस शंतनु...अजुनही.." प्रेम तिरकसपणे बोलतो..

" प्रेम...बास झालं आता...ईंटर्न कधी ही येतील...आपल्याला आवरायला हवं..." शंतनु त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला कंट्रोल करत बोलतो....

" हम्म चल...मी होतो पुढे...तु ये मागुन ‌....." प्रेम बोलून तिथून निघून जातो...


" माँसाहेब... रिलॅक्स...मी पाहतो त्याला..." शंतनु माँसाहेबांच्या हातावर आपल्या हाताने थोपटत बोलतो आणि डोळ्यांनीच काळजी करू नका म्हणून...आश्वासन देतो...त्याही हसुन डोळ्यांनीच ओके बोलतात...

" हाय मी राधा..." सिटी हॉस्पिटलमध्ये येताच ,लॉकर रूममध्ये असलेल्या एका मुलीला बोलते...जिचे डोळे चॉकलेटी रंगाचे असतात आणि केस कुरळे...निळ्या रंगाची सलवार कमीज तिने घातली होती...सोबत तिच्या अजुन एक मुलगी असते...ती जरा बोल्ड कपड्यांमध्ये असते...शॉर्ट गुलाबी रंगाचा क्रॉप टॉप आणि काळ्या रंगाची जीन्स तिने घातली होती..केस ही शॉर्ट होते...

" ओ हाय...न्यू ईंटर्न...??" तिच्यासमोर हात करत बोलते, तशी राधा मानेनेच हो बोलते, " मी व ही सुद्धा...हाय मी स्नेहा आणि ही माझी बालमैत्रिण , प्रिती...आणि न्यू ईंटर्न ...."

.

" हाय.." राधा स्नेहा च्या हातात हात देत शेकहॅंड करत प्रितीला ही ग्रीट करत बोलते....

" हाय ..." ती ही हसुन तिला ग्रीट करते...

" हाय हैलो झालं असेल तर आता आपण ड्युटी बद्दल ही बोलायचं का...??" तिथं येऊन पाच मिनिटे वाट पाहत असलेली.. त्या तिघींची एक सिनियर येऊन उभी राहिलेली बोलते...


" य्येस...य्येस ..मॅडम..." तिघींची धांदल उडते...त्या तिघी कसं बसं बोलतात..


" ओके, थॅंक्स ...मला बोलायला संधी दिल्याबद्दल..." ती उगाच हसत बोलते, " तर मी तुमची सिनियर डॉक्टर...जी ड्युटी ईनचार्ज ही आहे तुम्हा ज्युनिअर ची...,डॉक्टर मनवा...." ती आपली ओळख करून देत बोलते...


" हैलो मॅडम..." तिघी ही हसुन ग्रीट करतात...


" आज तुमचा पहिला दिवस आहे...सो आज तुमची कोणतीच शिफ्ट नसेल ..." मनवा बोलताच तिघी एकमेंकीकडे हसुन रिलॅक्स होतं पाहतात, " ईतकं खुश व्हायची गरज नाही...कारण तुम्हांला शिफ्ट नसली तरी आज पुर्ण हॉस्पिटल पाहुन , पेशंट ची हिस्ट्री ओळख यांचा अभ्यास वैगेरे सर्व ..आज तुम्ही दिवस भर कराल...रात्री फ्रेशर पार्टी आहे ...आणि उद्या ..उद्या तुम्हांला यावर प्रश्न विचारले जातील... त्यामुळे बी रेडी...पार्टी आहे म्हणून फक्त मजा नाही करायची...आणि हो ,उद्या एक सर्जरी आहे महत्वाची त्याची ही तयारी करून घ्या...आता तुम्ही जाऊ शकता..." एवढ बोलून मनवा
निघून ही जाते...



मनवा गुप्ता...शंतनु ,प्रेम च्या बॅच ची...मनवा, प्रेम, अतुल व शंतनु हे एकाच बॅचचे...वेगवेगळ्या शहरातुन आलेले हे चार... ईंटर्न असताना आपल्या या सिटी हॉस्पिटलमध्ये खुप वर्षभर धमाल केली होती त्यांनी ...चौघे ही वेगवेगळ्या स्वभावाचे पण तरी आता वर्षभरात चांगले कलिग पेक्षा मित्र झाले होते...मनवा ही तशी बोल्ड...टॉमबॉय म्हणायला हरकत नाही...हिचं शाळेत असल्यापासूनच कधीच मुलींशी पटलं नाही...आयदर तिने कधी ते पटवुन घेतलं नाही...कायम मुलांच्यात राहायची सवय...तो फॉर्मल शर्ट ....फोल्ड केलेल्या बाह्या ...जीन्स आणि कायम केसांची पोनी....बोलण..चालणं वागण अगदी पुरूषी....अहं पण ती स्ट्रेट होती...तिला मुलं आवडत होती हं...आणि मॅडम एकट्याच या तिघांबरोबर होत्या बॅच मध्ये...

शंतनु हा सिटी हॉस्पिटल ला चांगलाच ओळखत होता लहान पणापासुन हे तर आपल्याला माहित आहे...सिटी हॉस्पिटल चे स्वतः चे असे अनाथाश्रम ही होते..जिथे शंतनु वाढला होता..शंतनु हा शांत स्वभावाचा...लहान वयातच आपले आई वडिलांना गमावल्याने मॅच्युरिटी आली होती....आणि प्रेम...आपला हिरो.. त्याच्याबद्दल ही आपल्याला माहित आहेच पण हा एक अजून आहे आपल्या नायक ची खासियत...यांना म्हणे राग खुप लवकर येतो तसा लवकर जात ही नाही म्हणे...आणि कामाच्या वेळी फक्त कामच पाहिजे असे ही साहेबांची एक सवय...

राहिला अतुल भारद्वाज... प्रसिद्ध बिझनेसमन चा एकलुता एक मुलगा..जबरदस्तीने एम बी बी एस केलं होतं आणि आता ही , तो जबरदस्तीने च हिथे इंटर्नशिप करायला आला होता... फ्लर्टी टाईप होता ज्याची सध्या एक गर्लफ्रेंड होती ,जी ह्याच हॉस्पिटलमध्ये आली होती...न्यू ईंटर्न म्हणून....आता ती कोण आहे हे कळेलच ... शिवाय आपल्या राधा प्रेम ची पहिली भेट कशी असेन ...ते पहाण्यासाठी वाचत रहा , राधा प्रेम रंगली


क्रमशः