Radha Prem Rangli - 5 books and stories free download online pdf in Marathi

राधा प्रेम रंगली - भाग ५

# @ पार्टी @ #

" खुप सुंदर दिसत आहेस..." सिस्टर मारिया राधा ला येताच बोलल्या ...राधा आज दिसत च होती खास....लेमन रंगाचा कुडता आणि त्या खाली सेम त्याच रंगाचा शरारा...तिच्या गोर्या कांतीवर खुलून दिसत होता...केस तिने सरळ केलेले जे खाली कर्ल केले होते...कानात मोठे झुमके घातलेले होते...ओठांवर पिंक शेड रंगाची लिपस्टिक...डोळ्यांत काजळ ...लांब सडसडीत बोटांच्या नखांना लेमन रंगाची च नेलपॉलिश...पायात सॅंडल...खुप गोड दिसत होती त्या पेहरावात...

" बघ तुला म्हणत होते ना , तु आज अप्सरा पेक्षा ही कमी दिसत नाहीस ते..." कोपरा मारत स्नेहा बोलते...


" चल काहीतरीच तुझं.." राधा मात्र तिच्या या वाक्यावर गोड लाजली..आणि समोरून येणारा प्रेम तिला पाहून ठेचकाळला...

" डॉक्टर महाशय..आज लक्ष कुठेय तुमचं...?? " मागुन येणारा शंतनु त्याच्या खांद्या थोपटत बोलतो..

" अरे ते..." तो उगाच आपल्या केसांना नीट करत इकडे तिकडे पाहत बोलतो...

" ऐ हाय बॉईज.." त्याचवेळी मनवा दोघांकडे पाहत ,लांबुनच हात करत मोठ्याने बोलते..

" ओह तो किसी कि नजर कही और अटकी थी..." शंतनु हलका खांद्याला पुश करत त्याला बोलतो..


" तसं काही नाही..तु जे..." प्रेम परत राधा कडे पाहत बोलतो...

" मग कसंय ते नाही तर..अं..बोल.." तो परत खांद्या ला खांदा लावुन बोलतो...

" काही नाही...तु झालाय पागल..." तो तिच्याकडेच पाहत बोलतो..

" ऐ गाईज, चला ना पार्टी सुरू करूयात..." मनवा आता दोघांजवळ येत बोलते...दोघं ही मग तिच्या बरोबर जातात...मनवा चं ॲकरिंग करणार असते त्यामुळे ती स्टेजवर जाते ..

" ऐ तो हॅंडसम हंक बघ ...तुझ्या ओळखीचा आहे ना..." स्नेहा राधा च्या खांद्याला टॅप करत म्हणते..ती कुणाला म्हणत आहे हे पाहण्यासाठी बघते तर तिकडे प्रेम तिला दिसतो...शंतनु खाली वाकलेला असल्याने तो काही तिला दिसत नाही...

" ऐ तो काही माझ्या ओळखीचा नाही..." ती , " आणि तु असा हात दाखवत जाऊ नकोस गं...उगाच गैरसमज होतात लोकांचे..." ती पुढे दटावतच बोलते...

" अरे मघाशी तर तु त्याच्याशी गोड गोड बोलत होतीस आणि आता , उगाच भाव खात आहेस काय..." स्नेहा चिडवत बोलते...

" मघाशी ...?? मघाशी कधी...?? अरे हो ,पण तो नव्हता...शंतनु होता आपले सिनियर डॉक्टर..." तिला आठवत ती शंतनु शी आल्यावर बोलत होती.... हिने पाहिले नसेल कदाचित शंतनु ला....आणि तिचा गैरसमज झाला असावा असा विचार करून तिला सांगते...

" अगं हो ..मी ही त्याच्या बद्दल च बोलत आहे..." ती शंतनु कडे बघत बोलते तसं आता राधा ला तो दिसतो...

" ज्युनिअर डॉक्टर , तुमचं या आपल्या फॅमिली त स्वागत आहे‌..." माँसाहेब स्टेजवर येऊन बोलते.." ईंजोय युअर पार्टी " एवढ च बोलुन त्या निघून ही जातात..मग पुर्ण चार्ज मनवा घेते ..‌

" थोड्याच वेळात आपण काही गेम्स खेळून पार्टीला सुरूवात करत आहोत..." मनवा माईक वरून पुढे बोलते....स्नेहा व राधा खुप उत्सुक असतात...गेम्स खेळायला...सर्व सिनियर ही खेळात सामील होतात...

" चल आपण ही जाऊयात..." स्नेहा राधा चा हात पकडून त्या सिनियर जवळ जातात...तेवढ्यात एका निळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेस मध्ये प्रिती येते...हातात गोल्डन पर्स आणि गळ्यात डायमंड चा बारिक नाजुक नेकलेस, मनगटात सिल्वर घड्याळ घालून ती आपले हाय हिल्स टाकटाक वाजवत , गुर्मीत आली....

" हाय गर्लस..." त्या दोघींना पाहत रूडली बोलली...

" हाय..." यावर दोघी ही हसत तिला ग्रीट करतात खरंतर त्यांना तिचं असं वागणं पटत नव्हतं पण त्या काही बोलू इच्छित नव्हत्या...

" तू दुपारी कुठे होतीस प्रिती...?? सिस्टर मारिया आपल्याला हॉस्पिटल चा ईंट्रो देत होत्या..." स्नेहा ने तिला एका बाजुला घेऊन विचारलं.

" दॅट्स नॉट युअर बिझनेस स्नेहा...आपली जितकी औकात आहे तितकं चं बोलावं..." स्नेहा च्या हाताला झटका देत ती परत आपल्या तोर्यात बोलते....." यु नो बेटर...हा ही नाहीतर जॉब जायचा..." ती कुत्सित हसत शेवटचं वाक्य बोलते..


" सो गाईज....आपण आपली पार्टी सुरू करत आहोत...आधी होईल डांस...." तेवढ्यात मनवा ने अनाउंस केलं...तसे हळुहळु सर्वजण आपल्या पार्टनर बरोबर डांस फ्लोअर वर गेले... स्नेहा व प्रिती एकीकडे असल्याने राधा मात्र ज्युस काऊंटर जवळ जाऊन उभी राहिली...

" हे प्रिन्सेस, डिड यू लाइक टू डांस विथ मी...??" एक आवाज कानी तिच्या ऐकु आला तशी तिने मागे वळून पाहिले...खाली शंतनु बसला होता आपल्या गुडघ्यावर आणि तिच्या समोर हात धरत त्याने हसत तिला विचारले...तसं तिने संपुर्ण हॉलवर नजर टाकली कारण काही सेकंदासाठी तिला ऑकवर्ड वाटलं होतं त्याचं असं वागणं...



" हे,मी ईतका ही अनोळखी नाही कि तुला ऑकवर्ड व्हावं..." शंतनु उठून तिच्या एका बटाला मागे करत बोलला...तो खुप जवळ होता ,ईतका कि तिची होणारी धडधड त्याला ऐकु जात होती, " कम ऑन....एक डांस तर करू इच्छितो...." त्याने परत तिच्या समोर हात केला तसं तिने समोर पाहिलं...प्रेम दोघांना च पाहत होता...तिची नजरानजर होताच तिला कसंतरीच झालं कारण त्याच्या डोळ्यांत तिला स्पष्टपणे राग दिसुन येत होता...


" हा का बघतोय असा ...??" त्याच्या अशा बघण्याने ती कंन्फ्युज ही तेवढीच झाली होती जितकी ती अस्वस्थ होती...पण परत शंतनु च्या रिक्वेस्ट मुळे तिने त्याच्या हातात हात दिला आणि डांस फ्लोवर वर गेली...


क्रमशः


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED