तिथली परिस्थिती हे सर्व काही काल्पनिक असून .. वाचकांनी ही कथा ,त्यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत सर्वच्या सर्वच परिस्थिती काल्पनिक नजरेने पाहावी- आणी
फक्त मनोरंजन व्हावा ह्या हेतूने कथा वाचावीत🙏
ह्या कथेत लेखकाने गरज असल्याने भूत,प्रेत, अंधश्रद्धा दाखवली आहे - पन, लेखकाचा ह्या कथेवाटे समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही. जर कोणी लेखकाला पर्सनल मेसेज करून आक्षेपार्ह वागणूक दिली- तर कायद्यानूसार कारवाई करून कडक, एक्शन घेतली जाईल!
..कथा सुरु....
वेळ संध्याकाळ
7:30 pm...
" हेल्लो आनिषा!"
रिया धाप लागल्यासारखी बोलत होती.
नाकातून गरम श्वास बाहेर पडत होते. कानसुळे तापली होती@ अंगावर रोमांचकारक काटा येत होता...
तिला अस झाल होतं, की केव्हा एकदाच ते सत्य ती आनिषाला सांगते - की ह्या हवेलीत नरहरपंतांचा आत्मा वावरत आहे, त्यांना मोक्ष मिळाल नाही आहे.
" हेल्लो रिया !"
आनिषा हॉस्पिटलच्या गार्डन मध्ये उभी होती.
तिच्या पाठीमागे दहा- मजली हॉस्पिटलची इमारत दिसत हीती. संध्याकाळ झाल्याने हॉस्पिटलचे सर्व दिवे लावले होते.
आनिषा जिथे उभी होती- खाली हिरवशार गवत होत - आणी पूढे वीस पावलांवर केंटीन दिसत होती.
केंटीनमध्ये एक टेबल धरून आर्यंश आणि तीचे आई- वडील बसले होते -
तिच्या आई आणी वडीलांच्या आर्यंश सोबत हसत-गप्पा सुरु होत्या.
" हेल्लो रिया, बोल !"
आनिषा पुन्हा म्हंणाली.
:" अंग आनिषा ,अंग मला तुला काहीतरी सांगायचं आहे - अंग सकाळी मी जी व्हीडीओ बनवली होती बघ , कावळ्याची पितृपक्ष नैवेद्य ग्रहण करतानाची , अंग त्या व्हीडीओमध्ये ना , मला काहीतरी भलतंच दिसत आहे."
रिया पटपट म्हंणाली.
परंतु समोरून प्रतिउत्तर येतच नव्हत.
" हेल्लो आनिषा अंग ऐकतेस का तू? हेल्लो..!'
" हेल्लो रिया..! ईथे नेटवर्क प्रोब्लेम आहे वाटतंय - हेल्लो..ऐकलं का? हेल्लो रिया..!"
दोन्ही कडून फोन कट झालं.
रिया काय म्हंणली ते सुद्धा आनिषाला ऐकू गेल नव्हत.
"काय झाल रिया? सांगितलंस तिला ! काय म्हंणाली ती !" निशाबाईंनी विचारल.
" आई अंग नेटवर्क प्रोब्लेमने फोन कट झालं ! "
" काय?तू वापस ट्राय करू बघ ना बाळा !"
" हो हो!" रियाने अस म्हंणतच पुन्हा कॉल केल.
परंतु फोन काही लागल नाही.
" शट..! नाही लागत आहे कॉल!"
रिया त्रासिक सुरात म्हंणाली.
" आता काय करायचं? आपण जायचं का तिकडे?" निषाबाई म्हंणाल्या.
" हो आई बरोबर बोलतीयेस तू, आपण जाऊयात, चल !"
दोघिंनीही देवीला नमस्कार केला .
देव्हा-याची वेस ओलांडली आणि जशी वेस ओलांडली..देवी समोरच्या दोन्ही समई झपकन विझल्या..- अशुभ झाल.
डायनिंग टेबल मागे सोडून दोघिही बाहेर जायच्या दरवाज्यासमोर आल्या.
दोन झापांचा दरवाजा बंद दिसत होता.
निशाबाईंनी दोन्ही हात वाढवून दरवाज्याच हेंडल पकडल आणि दरवाजा उघडला नाही.
हो , दरवाजा बाहेरून बंद होता ? की एका अद्यात अलैकीक शक्तिच्या हूकमाने आपो- आप बंद झाला होता.
जो पर्यंत ती शक्ति त्या दरवाज्यास उघडण्याच हुकूम सोडणार नव्हती-तो पर्यंती तरी तो उघडणार नव्हता.
" दरवाजा उघडत का नाहीये? " निशाबाईंनी रियाकडे पाहिल.
" काय ? असं कस होऊ शकत ! थांब मला पाहू दे जरा !" रियाने सुद्धा दरवाजा उघडायचं प्रयत्न केला...परंतू दरवाजा जाम झाला होता - जागेवरून हळतच नव्हता.
" रिया - निशा !"
त्या दोघींच्या कानांवर रघुवीररावांचा आवाज पड्ला.
दोघींनीही एकदाच मागे वळून पाहिल.
जिन्याच्या पाय-यांवरून रघुवीर चालत येत होते.
" बाबा ! " अस म्हंणतच रिया रघुवीररावांच्या दिशेने धावली.
" अहो " निशाबाई सुद्धा जिन्यापाशी आल्या.
जिन्याच्या पाय-या उतरून रघुवीरराव खाली आले
" बाबा मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे !काहीतरी खुपच भयानक -ज्यावर तुमचं विश्वासच बसणार नाही ."
" माहीतीये मला !"
रघुवीर मान जराशी ताठ करत थंड स्वरात म्हंणाले.
त्यांच्या बोलण्याचा रोख ह्या दोघींनाही कळाल नाही. मुळीच कळाल नाही!
" म्हंणजे ? अहो काय बोलताय तुम्ही !"
निशाबाई म्हंणाल्या.
" सर्व महितीये मला , आणी तुम्हा दोघिंच भल ही ह्यातच आहे- की आपल तोंड बंद ठेवायचं!"
रघूवीररावांची मान तशीच वर होती- डोळे त्या दोघिंकडे पाहत नव्हतेच- दोन्ही हातांची मागे घडी घातली होती.
रिया - निशाबाई दोघिंनाही रघुवीरराव काय म्हंणत आहेत काहीच कळंत नव्हत.
" अहो तुम्ही काय म्हंणताय काहीच कळंत नाहीये , मला ! "
" कळेल कळेल , पाहायचं तुला ?"
रघुवीररावांच्या चेह-यावर छद्मी हास्य पसरल.
ओठ कुत्सिकरीत्या हसले- त्यांच्या त्या चांगूलपणाच्या मुखवटामय चेह-यावर ते हास्य एका काळ्या डागा सारख अपशकूनी दिसत होत.
निशाबाईंनी पहिल्यांदाच त्यांना अस भयाण हसतांना
पाहिल होत - रियाची सुद्धा काही वेगळी दशा नव्हती
" तसही त्या व्हीडीओमधून तर तुम्हाला कळलंच आहे ! आता ख-या अर्थाने पाहायचं आहे."
रघूवीररावांनी डोळे वटारले - त्या वटारलेल्या डोळ्यांखाली काळ काजळ पोतळ होत.
दोघिंनाही रघुवीररावांच हे वागण, रूप आश्चर्यकारक ,अनोळखी होत.
" पंत ,ओ पंत ! अहो ऐकलत का ? तुमची सून आणि लाडकी नात तुमची आठवण काढतीये ! भेटायला येताय ना ? येताय ना ?"
शेवटचा स्वर किती लाडीक होता ? जस कोणी लहानग्या मुलाला प्रेमाने हाक मारावी आणि तो दुडू - दुडू धावत यावा.
रघुवीररावांनी जागेवर उभ राहूनच पुर्णत हॉलभर नजर फिरवली. ती काजळाची काळीभोर नजर भीतिला छेडत होती.
त्या शेवटचा तो लाडीक स्वर , त्या शब्दाला जर
होकार मिळाला तर? रिया - निशाबाई दोघांनीही एक चोरटा कटाक्ष अवतीभवती टाकल..
मेलेल माणुस ह्या हवेलीत आत्मा होऊन फिरतय ! आणी जर ते असंच अचानक हिडिस- फिडिस रुपात डोळ्यांसमोर आल तर? आपल मन ते दृष्य पेळेल ना ? की एका झटक्यात आपण गतप्राण होऊ.
" बा..बा..बाबा.! अहो....म...म..मस्करी पुरे हं!" रिया काफ- या स्वरात म्हंणाली तिला अद्याप वाटत होतं की आपले वडील आपल्या सोबत मजाक मस्ती करत आहेत.
" मस्करी? " रघुवीररावांनी कसतरीच वेड्यासारख रियाकडे पाहिल.
" मस्करी करतोय मी! म्हंणजे तुम्हाला अजुन पटलेल दिसतच नाहीये तर? की तुम्ही जे व्हीडीओत पाहिल ते खर आहे. ? आणि तो म्हातारा हळकट मेला नहरपंत ,अजुन ह्या हवेलीत भटकतोय ."
रघुवीररावांच्या वाक्यावर हवेलीतल्या हॉलमध्ये पेटलेला काचेचा झुंबर - प्रथम चर्रचर्र करू लागला.
मग हॉलमध्ये जितके लाईटचे दिवे होते ते सर्व एकसाथ चरचरू लागले.
प्रकाश अंधाराचा लपंडाव सुरु झाला -आणि एकदाच सर्व दिवे विझले - झपकन अंधार पसरला.
प्रकाशावर -कालोखाने झडप घातली.
पुर्णत दिशेला अंधार माजला होता.
.
रघूवीररावांच्या ठिक मागे नरहरपंतांचा आत्मा अवतरला , तोच तो काळा कोट - त्या आत सिल्कचा पांढरा सदरा - ,खप्पड चेहरा,डोक्यावर गांधी टोपी...खाली पांढरट विजार.
" ए रघ्या ..रांxxxच्या ,म्हातारा कोणाला म्हंणतो!" नरहरपंतांच्या चेह-यावर निळसर प्रकाश पडला होता. त्यातच ते खेकसले.
" अहो पंत ते सोडा , अहो तुमची लाडाची नात बोलावतीये तुम्हाला ! "
" काय म्हंणतो?" नरहरपंतांच्या चेह-यावर निळ्या रंगाचा प्रकाश पडला होता - त्यातच ते दात विचकत हसले.
" कुठ आहे माझी मात ? "
" मात नाही हो पंत , नात बोला नात !"
" बर -बर , नात! पन आहे कुठ ती ?"
" ही काय समोर ?"
झपकन दिवे पेटले हवेलीतली रोषणाई परत आली. रघुवीररावांनी समोर पाहिल...त्यांच्या चेह-यावरचा रंग उडाल होता...कारण समोर ........
कारण समोर ..आता कोणीही उपस्थीत नव्हत.
XXXXXXXXXXXX
भ्रतांर...
पिवळ्या मातीच्या मूरमाची खाण दिसत होती.
त्याच खाणीत कुठे जमिनीतून पाषाण उगवून वर आलेले दिसत होते.
तर कुठे दोन- तीन खराब शेवाळ लागलेल्या पाण्याचे मोठ- मोठे डबके साचलेले दिसत होते.
त्याच डबक्यांबाजुला जरा दुर पाच काळया रंगाचे पायघोळ झगे घातले सैतानाचे मजुर लोक- हातात पाषाणी फावडे ,कूदळ घेऊन खालच्या मूरमाची माती उकरत होते.
त्यांच्या प्रत्येक घावावर मातीतून खच,खच
आवाज निघत होता - जणू त्या आघातांनी जमिनीला वेदना होत होती आणि त्या वेदनेने ती ओरडत होती.
" अरे ए सैतानी बोकडांनो चालवाना हात पटापट! किती उशीर लावताय हं ! चांगला एका रेड्यावर ताव मारलात ना मगाशी, तरी फुसक ते फुसकच .
साला एक घंट व्हायल आल..माती शिवाय तुमच्या फावड्याला अजुन..काय...लागणा झालंय! इथून खाली हात परतलो ना , तर मालक देवपाडच्या मसणातल्या , ..चिंचच्या झाडाला मुंडक लटकवतील आपल...मुंडक.. "
त्या सहामांणसांपासून जरा दुर म्हातारा जखोबा
उभा होता.
अंगयष्टीने काडी , हातापायाच्या काड्या झालेला, - अंगात एक फुल बाह्यांचा - राखाडी कुर्ता घातलेला होता - डोक्यावर फेटा नव्हता - म्हंणून ती
भुईसपाट कटप्पासारखी डोक्याची जामिन दिसत होती.
सुर्याच्या प्रकाशाने चमण गोट्यासारखी चकाकत होती.
दोन्ही डोळे उन्हात एका विशिष्ट लयीच्या चमकेने चकाकत होते.
जखोबा म्हंणाला आणि तोच त्याचवेळेस एका मजूराच्या फावड्याला ..
" ठन!" आवाज करत काहीतरी लागल- स्पर्शल गेल.
म्हाता-या जखोबाच्या काळसर ओठांवर आसुरी हास्य पसरल.. डोळ्यांत चमक आली..त्याने सुखलेल्या काळ्या ओठांवरून जीभ फिरवली..
आनंदाने उड्या मारत तो त्या मजूरांजवळ आला.
" मार.. मार ..खोद.. खोद ! काढ बाहेर काढ...काढ..!हिहिहिहिह..किकिकी"
जखोबाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
सोन्याचा घबाड की खजिना? नक्की काय भेटल होत त्या वाममार्गी मेल्यांना ?
सर्वाँनी मिळुन खोदायला सुरुवात केली.
खच,खच,खच.. आवाज होऊ लागला..
माती उकरून बाजुला फेकली जाऊ लागली..
चार फुट लांबीचा खड्डा खोदला होता.
आणी त्या खड्डयात चौकोनी सोन्याचा पेटारा होता.
पेटा-यावर मोडी-लिपीत काही मजकूर छापले होते
काही आकृत्या रेखाटल्या होत्या.
" ए..हात लावा..हात लावा.. ! बाहेर काढ़ा..त्या पेटा-याला." तीन फुट उंचीचा सोन्याचा पेटारा होता .तोच पेटारा दोन जणांनी खड्डयात उतरून बाहेर काढला, मिनीवर ठेवला.
पेटा-याला कुलुप नव्हत - पन कडीलावून बंद केल होत.
सुर्याच्या प्रकाशाने तो सोन्याचा पेटारा सोनेरी रंगाने चमकून ऊठला होता.
त्या सोन्याच्या पेटा-यावर रेखाटलेले काळ्या शाहीने मोडी लिपीतली अक्षरे अजुनच गड़द दिसत होती.
" बाजुला व्हा , बाजुला व्हा सगळे.."
जखोबा पुढे झाला - त्या पेटा-यासमोर आला.
खाली गुढघ्यांवर बसला...
" हिहिहिही,किखिखिखिखी..!"
बारीकसे पिवळसर दात दाखवत तो खवचट हसला.
त्याने पेटा-याची कडी उघडण्यासाठी हात वाढवल ..
कडीपासून तीन इंचावर हात येताच त्याने मध्येच हात थांबवल-हाताची मुठ झाकली .
" काही खतरा असला तर? नाही नाही..आपण
हे उघडायचं नाही, ह्यांच्यातल्याच कोणाला तरी सांगूयात!" मनातल्या मनात जखोबा म्हंणाला.
गर्रकन वळून त्याने मागे पाहिल. त्याची चकाकती नजर त्या सर्वाँवर फिरली.
काळे पायघोल झगे घातलेले सैतानाचे मजूर तिथे उभे होते. जखोबा त्यातल्याच एकाला बकरा म्हंणून वापरणार होता.
" ए तू , इकडे ये?" जखोबा राकीट स्वरात म्हंणाला.
त्या सहाजणांमधला , एक जण हळुच चालत पुढे आला.
" हा पेटारा खोल!" जखोबाने हुकूम सोडला.
जरास घाबरतच त्या सैतानी मजुराने आपला हात त्या पेटा-याच्या कडी जवळ नेहायला सुरुवात केली- त्याचा थरथरणारा हात धोक्याची ,मृत्युची चाहुल लावून देत होता.
" ए थांब, खोलू नको त्या पेटा-याला ! "
एक किन्नरी आवाज आला.
तसे सगळ्यांनी मागे वळून पाहिल.
मागे एका पाषाणी दगडावर गबलू उभा होता.
" ए पोरा ? कोण रे तू ? आणि इथ काय करतो ? तुझी आई कुठे आहे."
जखोबा म्हंणाला.
" ए म्हाता-या ,पोरगा कुणाला म्हंणतो ! आं?
मी गबलू आहे ,गबलू! सत्याचा रक्षक आहे मी..
दिव्यप्रकाश चमुचा मेंबर आहे मी मेंबर आं!"
गबलू आपल्या किन्नरी स्वरात म्हंणाला.
त्याच्या त्या वाक्यावर जखोबाने दोन सेकंद त्याच्याकडे कसतरीच पाहिल... मग न पाहिल्यासारख करत पुन्हा मागे वळला.
" ए तू खोल रे ? कुणाच पोर आहे ते, त्याची आईस गवसत असेल त्याला..! तू खोल, तो पेटारा खोल..!" गबलूच्या ईज्जतीचा फुल ऑन पचका झाला.
त्या सैतानी मजदूराने पुन्हा एकदा पेटारा खोलण्यासाठी हात वाढवला..
" थांबा ! " ह्यावेळेस आवाज आला.
त्या आवाजाला भारदस्त कड्याची जोड होती- आज्ञाधारक, हूकमी- स्वर होत..आवाजात भारदस्त व्यक्ति महत्वपणा असल्याची लय जाणवत होती.
त्या कठोर- गंभीर, भारदस्त अवाजाचा धनी कोण होता हे पाहण्यासाठी पून्हा एकदा सर्वाँचे डोके मागे वळले.
गबलू ज्या दगडावर उभा होता -त्याच दगडामागून चालत समर्थ पुढे आले.. त्यांच्या मागून मेनका सुद्धा चालत आली.
ह्या तिघांच्या आकृती मागे सुर्याचा गोळ तप्त
गोळा तेवत होता.
समर्थ, मेनका, गबलू तिघांच्याही आकृत्या काळसर दिसत होत्या.
तिघांचेही चेहरे , हात पाय दिसत नव्हते...
तोच समर्थांनी त्या दगडावरून खाली जमिनिवर उडी घेतली..
xxxxxxxxx
पंतांच्या हवेलीत .
प्रथम हॉलमध्ये , सर्वत्र दिवे पेटले होते.
सोफा - खुर्च्या- टिपॉय, फुलदाणीचे टेबल सर्वकाही भिंतीवरच्या काही पेंटीगज सर्वकाही नजरेस पडत होत.
हॉलमध्ये रघुवीरराव उभे होते - आणी त्यांच्या मागे मृत नरहरपंतांचा आत्मा , एका अतृप्त इच्छेने मोक्ष प्राप्तीपासून दूर वंचित राहिलेला - पिशाच्छ आत्मा !
" कुठे गेल्या ह्या दोघी?" रघुवीरराव स्वत:शीच म्हंणाले.
" मला वाटत आपल्या सोबत आंधळीकोंशीबीर
खेळतायेत !" नरहरपंतांचा घोगरा - म्हातारलेला आवाज.
त्यांचे ते मृत घारे डोळे हॉलमध्ये तिरकस नजरेने आजुबाजुला पाहत होते.
" अच्छा , म्हंणजे लपाछपी खेळतायेत तर!"
रघुवीरराव ....
" हो , आणी मला लपाछपी खेळणारे खुप आवडतात!"
हॉलमध्येच एका सोफ्यामागे रिया- निषाबाई लपल्या होत्या -त्यांच्या कानांवर तो म्हातारलेला खर्जातला घोगरा - आवाज पडत होता.
दोघींच्याही भीतिने गळ्याला दुष्काळ पडला होता - कपाळावरून घामाची द्रवबिंदू खाली पडत होती.
ह्दयाचे ठोके धड,धड बंदुकीच्या आवाजासारखे वाजत होते. डोळ्यांत भीती बसली होती.
हॉलमध्ये विझले पाहताच दोघीही अंधाराचा फायदा घेऊन , सोफ्यामागे येऊन लपले होत्या ..
पन पुर्णत हवेलीत ज्याच अंश होत - ज्याच्या हूकमाने हवेलीतली एक वस्तु सुद्धा जागेवरून हळत नव्हती..
त्याला ह्या दोघि सोफ्या मागे दबा धरून- लपून बसल्या आहेत हे कळू शकणार नव्हत का?
" रिया, हे खुपच भयानक आहे ग ! आणी ह्या सर्वाँमागे तुझ्या बाबांचा हात आहे - मला विश्वासच बसत नाही आहे !" निषाबाई हळूच पुटपुटत म्हंणाल्या.
आणी तोच त्या सोफ्यामागून दोन पावळ चालत ह्या दोघींच्या समोर आली- दोघींनीही एकदाच त्या बुटांपासून वर पाहिल समोर रघुवीरराव उभे होते..
" विश्वास ठेव मग !" म्हंणतच रघुवीररावांनी निषाबाईंच्या हाताला धरून त्यांना खालून वर उठवल.
" हे पहा दोघीही , जिवंत रहायचं असेल ना ? तर गप्प बसाव लागेल , नाहीतर ..मी हे विसरून जाईल , की रिया तू माझी मूलगी आहेस आणि तू माझी बायको .. !" रघूवीरराव डोळे वटारून निषाबाईंकडे तर कधी रियाकडे पाहत होते.
ती काळीभोर काजळ घातलेल्या डोळ्यांची नजर भयाण भासत होती- निषाबाईंच्या उरात जरब बसवत होती- मूग गिळून निषाबाई जागेवरच गप्प बसल्या होत्या..
रिया आपल्या वडीलांचा हा बदलावमय रुप पाहून हळू हलू मागे जात होती- तोच तिची पाठ कशाला तरी स्पर्शली- तो स्पर्श अगदी निर्जीव , बर्फाच्या थंड लादीसारखा होता - एम्बूलेंस मध्ये बर्फाच्या लादीवर प्रेत झोपवतात तशी बर्फाची लादी -
रियाने मागे वळून पाहिल..
" बहादूर काका!" अस म्हंणतच ती बहादूरच्या मागे लपली.
" बहादूर काका वाचवा आम्हाला !"
" बहादूर !" निषाबाईंनी रघूवीररावांचा हात झटकला . रिया - निषाबाई दोघीही बहादूरच्या मागे लपल्या.
" बहादूर वाचव आम्हाला , हे सर्व वाममार्गी मांणस आहेत. हे ह्यांनी काय केलंय तुला माहीतीये का? !"
" क्या केलाय मेमशाहाब ? " बहादूर म्हंणाला.
रघुवीर कुत्सिक हसत होते. त्यांना ठावूक होत बहादूर तर केव्हाचंच राम नाम झालेला आहे - हा फक्त त्याच निर्जीव देह - एक सांगाडा आहे - आणी त्या देहातली आत्मा मात्र नरहरपंतांची आहे , जी त्या बहादूरच शरीर एका कळसुत्री बाहुलीसारख चालवत आहे.
" अहो बहादूर काका , अहो तुम्हाला माहीती नाही ..अहो ह्या हवेलीत..!"
" भुत हिंडतात का ! " मध्येच बहादूर म्हंणाला.
रिया- निषाबाई दोघींनाही बहादूरच्या अंगातून
घाणेरडा वास जाणवत होता - देहातून थंड वाफ बाहेर येतांना जाणवत होती- मानेभोवतालची त्वचा, हाता -पायांची त्वचा सर्वच पांढरी प्रेताड पडल्यासारखी वाटत होती.
" हो ..हो बहादूर काका ईथे भुत आहे..!" रघुवीरराव कमरेवर हात ठेवून हसत होते.
" भुत , कोणाच ?"
" आजोबा ! " रिया म्हंणाली आणि
" हो !" बहादूरच्या तोंडून खर्जातला आवाज बाहेर पडला - आणी गर्रकन त्याची मान 360 च्या अंशात मागे फिरली.
निषाबाई - रिया दोघांच्याही अंगावर निवडुंग फुटले- भीतीच्या विंचवाने डसल- आणी अंगावर लकवा मारला..
डोळे- तोंड दोन्ही विस्फारले, आणी दोघिही एकाच वेळेस धप्प आवाज करत जमिनिवर कोसळल्या, बेशुद्ध झाल्या.
" ए रघ्या ! ह्या दोघींना सत्य सांगून आपण चुक तर नाही केली ना ?" बहादूरच्या देहात घुसलेले नरहरपंत बोलले.
" चूक !" रघुवीर उर्मटपणे म्हंणाले." आता मला काहीचंच , कसलंच फरक पडत नाही, कारण आता फक्त उद्याचा दिवस राहिला आहे बस्स- एकदा का उद्याची रात्र उजाड़ली, की मग माझी विद्या सफळ होणार - मला अखंड उर्जास्तोत्राची शक्ति मिळणार ,
मग मी हव ते करू शकतो, हव ते ! मग मला ह्या दगडातच्या मुर्तीला सुद्धा घाबरायची गरज नाही पडणार." काजळ पोतलेल्या डोळ्यांना वटारत - दात दाखवत रघुवीर बहादूर उर्फ नरहपंतांकडे पाहत हसत होते.
" ह्या दोघींना तिस-या मजल्यावरच्या गुप्त खोलीत घेऊन जा !पाहूदेत तर दोघींनाही कशी चालते सैतानी पुजा..! हिहिही हिहिहिहिज!"
रघुवीरराव हसले..त्यांच्या बरोबर बहादूर उर्फ नरहरपंतांच्या आत्म्याने सुद्धा साथ दिली.
पुर्णत हॉल त्या भयानक हास्याने थरथरून ऊठला..
लाईट चर्रचर्र करू लागल्या....झुंबर कोणीतरी त्यावर बसल्याप्रमाणे हेळकावे खाऊ लागला..
Xxxxxxxxx
वेळ रात्री 8:30..pm
हॉस्पिटलच्या केंटीनमध्ये एका टेबलामागे असलेल्या खुर्चीवर श्रीसंथराव, त्यांच्या बाजुला मीराबाई - आणी त्यांच्याही बाजुला आनिषा बसली होती. आणी त्या तिघांसमोर आर्यंश बसला होता.
" आर्यंश, माझ्या मुलीला त्या गुंडापासून वाचवलस त्याबद्दल मी तुझे पुन्हा आभार मानतो."
श्रीसंथराव म्हंणाले.
त्यावर आर्यंश काहीच म्हंणाला नाही, फक्त गालात हसला ..आणी होकारार्थी मान हळवली. आर्य्ंश ह्या तिघांसमोर बसला होता- आणी ह्या तिघांच्याही मागे हॉस्पिटलची मागची बाजू दिसत होती.
हॉस्पिटलच्या सर्व मजल्यांच्या बाहेरील खिडक्यांतून पांढ-या शुभ्र ट्यूब लाईटसचा प्रकाश पडला होता.
श्रीसंथरावांच्या वाक्यावर आनिशाने एका चोरट्या
नजरेने आर्यंशकडे पाहिल..आणी हळुच कपाळावर आलेल्या केसांची बट मागे सरली- तिची ही क्रिया आर्यंशने पाहिली..होती ..
तेवढ्यात त्याची नजर आनिशाच्या मागे हॉस्पिटलच्या मागच्या भिंतीवर गेली...
केंटीनपासून पुढे हिरव्या गवताची बाग होती- बागेतून पुढे ब्लॉकची रांग होती- तिथेच दोन तीन लाईटसचे पेटलेले खांब होते..आणी त्या खांबावर पेटलेल्या शुभ्र लाईटसचा प्रकाश एका , ठराविक सीमेपर्यंत भिंतीवर पडला होता..आणी त्याच ठराविक सीमेतल्या उजेडात आर्यंशला ते दृश्य दिसल होत.
एक काळसर रंगाची, मानवी उंचीपेक्षा मोठी आकृती , उभट भिंतीवर एका पाळीसारखी चिकटून हात-पाय हळवत वर वर जात होती.
" माय गॉड..!"
आर्यंश खुर्चीतून हळकेच ऊठला ..विस्फारलेल्या नजरेने , आ-वासलेल्या तोंडाने समोर पाहू लागला..
वाकड तिकड पाय हलवत तो आकार हळू हळू वर चढत होता.
तोच अचानक त्या आकाराची हाळचाल थांबली-
डोक्यावर पांढ-या रंगाच प्रेताड टक्कल होत.
त्याखाली पुर्ण अंगावर एक काळ्या रंगाचा झब्बा होता.
तो आकार जागेवरच थांबला होता - हळूच त्याच्या टक्कल पडलेल्या डोक्याची हालचाल झाली.
ते पांढरट प्रेताड टक्कप पडलेले डोक हळू हळू मागे वळत होत.
त्याच बिभित्स- अभद्र थोबाड आर्यंशच्या नजरेस पडणार होत.
हळू हळू ती पांढरट कवटी वळत होती. सशासारखे टोकदार कान आले, मग बिनभुवयांचे पिवळेजर्द चकाकते डोळे , त्यात एक मीरी एवढ़ा कालसर ठीपका - गाळ आत खड्डे पडल्यासारखे खेचले होते.. नाक चेटकीणीसारख टोकदार होत..
आर्यंशची सामान्य नजर आणि कुठे ती पिवळेजर्द असामान्य नजर ? जशी त्या दोघांची नजर झाली -
ते झटकन ओळख असल्यासारख दात विचकत हसल...चौकलेटी बुता-याच्या काठीसारखे टोकदार दात भसकन बाहेर आले..
" ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हह्ह्ह्ह, मसालाsss !"
त्या अभद्र उपद्रवाच्या तोंडून एकच आवाज निघाला.
तेवढ्यात आर्यंशच्या हाताला मुंगी चावल्यासारखी जाणिवली झाली...आणी खाडकन त्याने डोळे उघडले...
त्याला जोराची धाप लागली होती.- कपाळावर घाम साचला होता..
" ह, ह , ह, ह, " थांबून थांबून मोठ मोठ्याने
छाती फुगवत तो श्वास आत भरत होता.
" आर्यंश आर यु ओके..!"
त्याच्या थोड बाजुला बसलेली, आनिशा त्याच्या हातावर आत ठेवत म्हंणाली.
त्याने झटकन वळुन हॉस्पिटलच्या मागच्या भिंतीकडे पाहिल..
त्या खांबावरच्या दिव्यांचा प्रकाश जसच्या तस स्व्पनात पाहिल्या प्रमाणे पडला होता - पन ते ध्यान मात्र तिथे दिसत नव्हत.
" आर्यंश..?" आनिशाने पून्हा आवाज दिल.
" हं..?" त्याने न समजुन विचारल.
" यु ओके..! " आनिशाच्या स्वरात काळजी होती
" हो... मी ठिक आहे! "
" काही वाईट स्वप्न पाहिलंस का?"
श्रीसंथराव बारीक प्रश्नार्थक नजरेने आर्यंशकडे पाहत होते.
त्यांच्या त्या वाक्यावर तो काहीच म्हंणाला नाही.
त्याच्या डोळ्यांसमोर फक्त त्या सैतानाच भिंतीवर पाळीसारख चिकटून बसलेला आणि आपल्याकडे दात विचकत हसणारा चेहरा दिसत होता.
" आर्यंश ! मला वाटत तू - आनिशा आणि मीरा तिघेही घरी जावत!मी एकटा आजची रात्र ..थांबतो ईथे..!" श्रीसंथराव म्हंणाले.
" अहो - मी इथून कुठेही जाणार नाही ! .."
" हो , मी ही!" आनिशा..
" हो हो..मी..मी सुद्धा "आर्यंश जरास चाचरत म्हंणाला.
" अंग पन इतके जण रात्रीच्या वेळेस ईथे नाही राहू शकत - हॉस्पिटल परवानगी नाही देणार."
" अहो त्याची काळजी तुम्ही नका करू , मी बोलते सरोदे भावोजिंशी! " मीराबाई म्हंणाल्या.
मीराबाईंनी फोन वरून डॉ: सरोदेंना कॉल केल.
चार -पाच मिनिटे फोनवर सविस्तरपणे बोलण करत त्यांच्याकडुन आजच दिवस हॉस्पिटलमध्ये स्टे करण्याची परवानगी घेतली .
" थँकयु सो मच सरोदे भाऊजी!" म्हंणत मीराबाईंनी फोन ठेवून दिल होत.
" परवानगी मिळाली आहे.!" मीराबाई हसत म्हंणाल्या.
चौघ्ही हॉस्पिटलच्या दिशेने जाऊ लागले.
नियतीच्या मनात काय आहे आणि काय नाही, हे फक्त पुढे सरकणा-या वर्तमान घटनांनीच कळू शकत , नियतीने ह्या चौघांच्या पुढ्यात हॉस्पिटमध्ये काय वाढुन ठेवल आहे..त्या खत-यापासून हे चौघेही अजाण - अलिप्त होते.
लवकरच तो थरार ह्या सर्वाँना चाखायला मिळणार होता.
आर्यंशने पाहिलेल ते स्वप्न नक्की स्व्प्नच होत ना? की पूढे घडणा-या घटनांचंच एक आविभाज्य भाग होत?
स्व्पनावाटे त्याला कसले संकेत तर मिळत नव्हते ना ? ..
या पाहूयात पुढील भागांत..
xxxxx
गबलू ज्या पाषाणाच्या दगडावर उभा होता -त्याच दगडामागून चालत समर्थ पुढे आले.. त्यांच्या मागून मेनका सुद्धा चालत आली.
ह्या तिघांच्या आकृती मागे सुर्याचा गोळ तप्त
गोळा तेवत होता.
ज्याने समर्थ, मेनका, गबलू तिघांच्याही आकृत्या काळसर दिसत होत्या.
तिघांचेही चेहरे , हात पाय दिसत नव्हते...
तोच समर्थांनी त्या दगडावरून खाली जमिनिवर उडी घेतली..
कोल्हापुरी मातीच्या चपलेने खालच्या जमिनीव
माती हळकेच वर उडाली.
अंगात फुल बाह्यांचा भगवा कुर्ता - खाली
सफेद शिवलेली पेंट , पायांत कोल्हापूरी चपला-
V आकाराच तेजस्वी चेहरा , टोकदार नाक, टपोरे डोळे-बारीकसे ओठ- डोक्यावरच्या केसांचा उज्व्या बाजुला भांग पाडला होता.
कपाळावर भुवयांमधोमध लाल रंगाचा टिळा होता.
जखोबाने समर्थांकडे डोळे बारीक करून पाहिल.
समर्थांच्या नुसत्या चेह-यावरूनच त्याला त्यांच्या शक्तिची प्रचिती आली होती.
हा माणुस? नक्कीच साधारण नाही?
हे त्याला कळून चुकल होत.
" कोण ? कोण ? आहात तुम्ही लोक? आणि आमच्या कामात का अडथळा निर्माण करताय?"
जखोबा उर्मट स्वरात म्हंणाला.
" हेच तर आम्ही विचारायला हव ना तुम्हाला!
की ह्या भ्रतांरवर तूम्ही लोक फावडे कूदळ घेऊन काय करताय? " मेनका त्याच उर्मट स्वरात उत्तर देत म्हंणाली.
" ए पोरी, बाप्यांच्या नांदी नको लागू..! बाईची जात आहे तर गप्प रहा."
" ए म्हाता-या , तुझ्या तर..!"
मेनका रागात म्हंणाली.
ती दोन पावळ उचलत पुढे गेली होती तोच मध्येच तिला समर्थांनी थांबवल.
" मेनका !"
समर्थांच्या वाक्यावर ती जागेवरच थांबली.
" हे पहा , तुम्ही कोण आहात, हे मला तुमच्या कपड्यांवरून पाहता चांगलंच कळालंय? आणि तुम्ही ईथे काय शोधताय ते सुद्धा मला चांगलंच माहीतीये.(समर्थांच्या नजरेस तो पेटारा पडला) तुम्हा सर्वाँच भल ह्यांतच आहे, की तो पेटारा माझ्याकडे सोपवावत."
समर्थांच्या वाक्यावर जखोबा अगदी मळूल
नजरेने समर्थांकडे पाहत होता. त्यात दया,याचनेची भिक होती..पन अचानक त्याच्या चेह-यावर कुत्सिक भाव पसरले...जणू तो समर्थांची टर उडवत होता...मज्जाक -मस्ती करत होता.
" अरे काय येडा समजतो का येडा..! तु बोलशील पेटारा दे आणि मी लगेच देइल..आ..हिहिहिहिही..खिखिखी..! "
जखोबाने दोन्ही हातांची कंबर मागे वाकवून टाळी वाजवली... वेड्यासारखा हसू लागला.
" अरे तू आमची भलाई नको पाहू , तू तुझ बघ..! कारण " जखोबाने कमरेत खोवळेली बंदुक बाहेर काढली.
" माझी सटकली ना तर इथून तुझ म्हढ पन जाणार नाही - आणी आत्मा पन ! कारण ही सैतानाची औलाद मांणसाच्या मांसाची लैय हवरट आहेत ." जखोबाने त्या ब्ंदुकीकडे पाहिल..
त्याला वाटल होत की बंदुक पाहून ही तिघे इथून पसार होतिल..घाबरतील , मृत्युची भीक मागतील .
पन नाही! समर्थ एकटक जखोबाकडेच पाहत होते.
ती टपो-या डोळ्यांची नजर जखोबाचे अवसान गळवत होती.
जखोबाने भीतच आवंढा गिळला.
मग त्याने त्या सैतानी मजूर लोकांकडे पाहिल..
" ए बघता काय जेवायला आला आहात का? मारा साल्यांना ! हाडांचा खूळ खुला बनवा एकेएकाचा जा !"
जखोबाने त्या सर्व सैतानी मजुरांना हुकूम सोडला.
" आsssss ssss!" सर्व सैतानी मजुर ओरडले..
समर्थ, मेनका , गबलू तिघांनाही त्या सैतानी मजुरांनी गोल घेरा घातला होता.
गबलू हळुच त्या घे-यातून बाहेर पडला- तसंही त्याच तिथे काही काम नव्हत.
हातात फावडे कूदाळी नाचवत ते समर्थकृणाल, आणी मेनका ..दोघांवर
हल्ला करण्यासाठी तैयार झाले होते.
" मेनका ,तैयार ..? ! " समर्थ म्हंणाले.
मेनकाने मानेनेच होकार दर्शवला..
आणी तोच हल्ला झाला.
एका सैतानी मजूराने आपल्या हातातली कूदळ समर्थांवर उगारण्यास नेहली- परंतु समर्थांनी तिचा वार चुकवला - तस वरून येणारी कुद्ळ जमिनीवर आदळली.
हीच संधी साधून समर्थ कृणाल ह्यांनी त्या सैतानाच्या थोबाडावर एक मुक्का लगावला.
त्या मुक्क्याने समोरच्या सैतानी मजुराची जागेवरच सफेद राख झाली.
ही सैतानी मजुर म्हंणजे बाहुल्या होत्या बाहुल्या..
त्यांच रुप काया सर्वकाही फसव होत ..
मेनकाला नवि शक्ति मिळाली होती. तिच उपयोग करण्यासाठी ती खुपच उत्सुक होती -
एकसाथ दोन जणांनी मेनकावर कूदळ- फावड्यासहित वार केला...
" आssss!" ओरडत ती खाली वाकली-एक हात वर हवेत आडवा धरला.
फावडा कुदळ दोन्ही शस्त्रांची धारधार पात हाड मांसात घुसली.
समर्थ कृणाल ह्यांच्या पाठिवर एक कुदळ येऊन आपटली ..त्या वाराने ते खाली जमिनिवर तोंडावर कोसळले.
" कृणाल, मेनका.. ! " गबलू ओरडला... .
जखोबाने पाहिल त्या दोघांनाही सैतानी मजुरांनी अडवून धरल होत.
हिच संधी - हिच वेळ होती ईथुन पळून जाण्याची!
तो मागे वळला - त्याने हातातली बंदुक समोर धरली - खाली जमिनीवर तो पेटारा होता.
त्या पेटा-याच्या बंद कडीवर नेम धरून त्याने ट्रिगर सोडला..
"धाड " आवाज करत बंदुकीतून गोळी सुटली-
" ठण " आवाज करत ठिणग्या उडाल्या कडी तुटून खाली पडली ..!
आवाज इतका मोठा होता , की जमिनिवर तोंडावर पडलेले समर्थ-
खाली जमिनीवर एक ढोपा वाकवून जमिनिवर बसलेली मेनका -दोघांनीही वळुन
जखोबाकडे पाहिल.
" हिहइगिग...!"
लहान मूल खुद्दकन हसाव तस जखोबा त्या दोघांकडे पाहून हसला.
जे होइल ते होइल अस मानत त्या जखोबाने दोन्ही हातांनी पेटा-याच झाकण उघडून पुढे ढकळून दिल...दोन सेकंद तो मागेच थांबला ..परंतु काहीही झाल नाही ..
समर्थ कृणाल ह्यांनी दोन्ही हात जमिनीवर ठेवले आणि खाडकन जागेवर एक उडी घेत उभे राहिले.
मेनकाने आपले दोन्ही डोळे बंद केले , तिच्या हातावर एक फावडा आणि कुदळेचा वार झाला होता..आणी त्याच फावडा कुदळेच्या धारधार पातिचा दाब ते दोन सैतानी मजुर मेनकाच्या हातावर देत होते.
फावडा आणि कुदळेच्या वाराने तिच्या हाताची चामडी फाटली होती- त्यातून घळाघला रक्त बाहेर पडत होत.
फावडा कूदळेची धारधार पात मांस चिरून हाडांत घुसू पाहत होती.
वेदनेची मर्यादा आता सहन करण्या पलिकडे निघुन गेली होती.
मेनकाच्या सहनशक्तिचा अंत लोप पावला होता .तिच्या सहनशक्तिच्या मर्यादे पल्याड रागाची ज्वालामुखी होती..
वेदना त्या रागाच्या ज्वालामुखीला ठोकर बसवत तिला डिवचत होती.
बंद डोळ्यांच्या काळ्या पटळांवर तेच ते नरकातल दृष्य पुन्हा दिसू लागल- तीच ती काळी कुट्ट डोंगराची धगधगती ज्वालामुखी , तोच तो काळ्या झग्यातला - कंडार ..
हातात ती काळसर काठी घेऊन तप्त निखा-याच्या डोळ्यांनी तिच्याकडेच पाहत होता..
" स्वत:ला ओळख पोरी! " त्याचा घोगरा आवाज मेनकाच्या कानांत घुसत होता.
" तुझ्यातल्या शक्तिला ओळख पोरी - जागृत कर तिला ! ह्या राखेच्या बाहुल्यांना संपवून टाक , उघड पोरी.....डोळे उघडssssss!" मेनकाच्या बंद डोळयांआड कंडारची आकृती गोल- गोल भिंगली..त्याचा आवाज हळू हळू कमी होत गेला..
आणी शेवटच्याक्षणाला- तिच्या बंद डोळ्यांतून एक अश्रु ओघळत खाली आला...काळया रंगाचा..अश्रु..!
झपकन तीने डोळे उघडले..
दोन्ही डोळ्यांच्यात काळया रंगाची शाही ओतळी होती..दोन्ही बुभळे काळसर रंगात रंगली होती.
कट- कट मानेच हाड मोडल्याचा आवाज करत
तीने मान वर करून त्या दोन्ही सैतानी मजुरांकडे पाहिल..
ती काळीशार शाहीची नजर पाहून त्या दोघांची भीतीने जागीच फाटली.. हातातले कुदळ- फावडे गळून खाली पडले..
समर्थांनी आपल्या हातातले दोन्ही रुद्राक्ष कड्यांमधला एक रुद्राक्ष कडा बाहेर काढला...
तर्जनीत तो ठेऊन तो गोल गोल भिंगवला...
तीन सेकंदात त्या रुद्राक्ष कड्याने सूदर्शन चक्रासारखी गती पकडली..
" जा !" अस म्हंणतच समर्थांनी तो रुद्राक्ष कडा समोर उभ्या सैतानी मजुरांच्या दिशेने सोडला..
हवेत सूदर्शन चक्राप्रमाणे तीव्र वेग - आणी तप्तता धारण करत तो रुद्राक्ष कडा त्या दोघांच्या दिशेने पोहचला ..
सप - सप आवाज करत एकाच्या पोटातून तर दुस-याच्या छाताड़ातून आरपार होत बाहेर आला..
क्षणार्धात त्या दोन्ही सैतानी हस्तकांची जागेवरच राख झाली..
काम होताच.. रुद्राक्ष कडा पुन्हा समर्थांच्या हातात येऊन बसला.
" आहहह हाह्घ्र्ह्र..र्घे..रघ..आ "
एका दैत्याने आरोळी ठोकावी तसा आवाज आला.
समर्थांनी त्या आवाजाच्या दिशेने पाहिल.
ती मेनका होती-तिच्या देहातून काहीवेळा सारखच
सोनेरी रंगाच धुर बाहेर येत होत -
केस हवा - वाहत नव्हती तरी सुद्धा वर उडत होते.
दोन्ही हातांच्या पंज्यांतून सोनेरी रंग उजळत होता ..
त्या हातांतून नक्कीच शक्तिचा उर्जास्तोत्र बाहेर पडणार होता.
तोच तिने हाताची हाळचाल केली..
क्षणभर गबलु- जखोबा दोघांचे डोळे दिपवणारा तप्त तेजेचा शक्तिस्तोत्र तिच्या हातांतून बाहेर पडला...
समर्थ विस्फारलेल्या नजरेने मेनकाची ती शक्ति पाहत होते.
सोनेरी रंगाच्या त्या शक्तिस्तोत्रांमध्ये अणुबाँबमध्ये असलेल्या रसायनांची जणु मिळवामिळव होती..की काय? ..त्या शक्तिस्तोत्राची रेष एक सेकंदासाठीच त्या सैतानी मजुरांच्या अंगावर पडला होती.
पन त्यांचा जागीच सेकंदात हवेतच चुरा झाला होता , इतकच नाही तर त्यांची पांढरट राख सुद्धा खाली जमिनीवर पडली नव्हती.
राख सुद्धा हवेतच जळुन नाहीशी झाली होती.
जखोबाने डोळे उघडले , समोर पेटा-यात पाहिल.
एक चौकोनी खोका होता - तोच त्याने पटकन उचल्ला ..छातीशी कवटाळून धरला.
" ए शुक..शुक..!".. त्याने समर्थांकडे पाहिल..व शुश्कारला..अंगातली मस्ती म्हातार चाळे! अजुन काय?
समर्थांनी मागे वळून पाहिल..
" हिहिहिहिही. राम.. राम मंडळी.. ! पुन्हा भेटु..?" तो हसत दात विचकत म्हंणाला. मग लागलीच त्याच्या चेह-यावरचे भाव बदलले.
भुवया ताणून तो उर्मट स्वरात म्हंणाला.
" बिल्कुल नका भेटू !"
जखोबाने खिशातून एक काळ्या रंगाचा लिंबू बाहेर काढला.
" एssss !" मेनका पुन्हा ओरडली..तिचा आवाज इतका प्रचंड होता की कानाचे पडदे फाटतील..गबलूने तर कानांवर हातच ठेवल.
जखोबाने मेनकाकडे जरा भीतच पाहिल..
आणी तो हातातला लिंबू खाली फ़ेकला..
मेनकाच्या पायांना जणू अमानवीय वेग आल होत..
तिने वेगाने आपल सर्व शरीर अलगद सेकंदाच्या वेगाने जागेवरून हळवल..
खालच्या वाळूवर तिचे पाय इतक्या वेगाने धप- धप -धप आवाज करत पडत होते की मातीचे लोट हवेत उडू लागले..
जखोबाला आपल्या समोरून तपकीरी मातीची
एक हवेत उडणारी रेष वेगाने येताना दिसत होती..त्याच्या घशात श्वास अडकला होता..कपाळावरून घामाचा द्रवबिंदू हळुच खाली आला डोळ्यांत घुसला आणि मरणाच्या भीतिने त्याने डोळे मिटले..
पण तेवढ्यात तो काळ्या रंगाचा लिंबू जमिनिवर पडला..एक काळ्या रंगाच्या धुराचा लोट उडाला.
मेनका त्या काळ्या धुरातून आरपार जात पूढे निघुन गेली...
समोरच एका पाषाणाच खडक होत..ते खडक फोडत ती आत घुसली..
" कृणाल ssssss!" अचानक गबलूची एक मदतीची किंकाळी ऐकू आली .
समर्थांनी मागे वळून पाहिल.
उर्वरीत एका सैतानी मजुराने गबलूला पकडल होत - त्याच्या गळ्यावर सुरा ठेवला होता.
" ए भटा, तुझ्या हातातले ते कडे दे मला !"
अस म्हंणतच त्या सैतानी मजुराने गबलूच्या बरमूड्याच्या खिशातून तो सोन्याचा जादूई जलचा ग्लास सुद्धा बाहेर काढला.
" हा भारीये भारीये जाम पैशे भेटतील. "
समर्थ त्या मजुराकडे पाहतच होते.
त्यांना हव असत तर एका सेकंदात त्याच्या देहाची त्यांनी राख केली असती , पन त्यांच्या हुशारी डोक्यात काहीतरी वेगळंच सुरू होत.
" हे कडे हवे आहेत तुला."
" हा दे चल लवकर , नाहीतर ह्या बुट्याचा बिनकामाचा बाहुला बनविल मी!"
" बनव मग ! तसंही त्याच काही फायदा नाही मला !" समर्थ म्हंणाले.
" कृणाल sss !" गबलू ओरडला.
" काय कृणाल? तू आम्हाला एकटा सोडून पळालास , काही कामाच नाहीस तू. ए बाबा मारून टाक ह्याला..!"
" कृणाल हं.हं..हं..हं.हं..!" गबलू हूंदके देत किन्नरी स्वरात रडू.. लागला.
" अरे तुला हे कडे हवे आहेत ना ?" समर्थांनी डाव टाकल.
" हो हो..!"
" ठिक आहे , देतो मी तुला. पन एका अटीवर !"
" अट? कसली अट?"
" अट! तर अट ही आहे , की हा जो म्हातारा माणुस होता..तो कोण होता.. ? कोठून आला होता तो? का आला होता ईथे? आणि त्या पेटा-यात काय होत? हे मला सांगितलंस तर हे जादूचे कडे तुझे ..!"
" जादूचे कडे !" त्या मजूराने जिभळ्या चाटल्या.
" हो तुझे , ह्याने तू काहीही करू शकतोस हव तेवढ सोन मागवू शकतोस, हव ते करू शकतोस. पन मला माझ्या प्रश्नांची उत्तर दे , आणी मग हे जादूचे रुद्राक्ष कडे तुझे झाले समज !"
" ठिक आहे , पन चालाखी नाही हं!"
" नाही नाही मुळीच नाही..!" समर्थांनी दोन्ही हात वर केले.
" बर ऐक ! तो माणुस कोन होता हे मला माहिती नाही- तो ईथे काय शोधत होता हे सुद्धा मला माहिती नाही. पन हा , त्याचा एक मालक आहे अस तो म्हंणाला...आणी त्याने कोणत्यातरी पृथ्वीवरच्या गावाच नाव घेतल..! " तो सैतानी मजुर आठवू लागला..आणी त्याला आठवल सुद्धा ..तस तो म्हंणला.
" देवपाड..हो..हो..देवपाड..!"
" देवपाड? " समर्थ हळुच पुटपुटले.
" चल आता ते कडे दे ..!"
" थांब, आधी त्या गबलूला ईकडे पाठव."
" ए जा रे !" त्याने गबलुला सोडल..तसा बारिकसा गबलू तुरु तुरु चालत समर्थांजवळ चालत आला.
" हा चल दे आता !"
" हो ..! " समर्थ गालात हसले.
त्यांनी दोन्ही हातातले कडे काढले..
" महादेवा..क्षमा करा..!"
समर्थांनी दोन्ही कडे कपाळांना लावले..आणी अलगद त्या सैतानी मजुराच्या दिशेने फ़ेकले..
त्या रुद्राक्षांचा अपमान व्हायला नको म्हंणूनच समर्थांनी माफी मागितली होती.
त्या सैतानी मजुराने ते कडे आपल्या हातात पकडले..
आणी जस त्याने ते कडे हातात पकडले...
तप्त विस्तव पकडल्याची त्याला जाणिव झाली..
हातातला एक नी एक कडा तपकीरी ज्वालामुखीच्या लाव्ह्यासारखा उजळून निघाला होता.
हे कडे साक्षात शिव - महाकाल, काळ भैरव , महादेवाच्या गळ्यातील माळेचे होते..
वाईट वाममार्गी क्रूरताने भरलेल्या पापीने जर ते हाती घेतले तर त्याची जागेवरच राख होइल..
त्या सैतानी मजुराच्या देहाला असंख्य भुकंप आल्यासारख्या चिरा पडल्या-त्यातून लाव्ह्याच्या विस्तवासारखी चमक बाहेर पडली..
" आह्हाह्ह्ह्ह्ह्ह!" डोळे, कान, नाक ह्या सर्वाँतून धुर निघाल जात त्याच्या देहाच जागीच एक स्फोट झाल..
दोन्ही रुद्राक्ष कडे खाली मातीवर पडले.
समर्थांनी हलूच हात वाढवून ते उचळले.
पुन्हा हातात घातले.
" समर्थ..!" मेनका डोक्याला हात लावत त्यांच्या जवळ आली.
" काय झालं ईथे? आणि तो वात्रट म्हातारा, कुठे गेला तो?" मेनकाला पुन्हा काहीच आठवत नव्हत.
" पळाला तो !"
" पळाला, पन कुठे?"
मेनकाच्या वाक्यावर समर्थ दोन पावळे चालत पुढे आले.. गबलू मेनका समर्थांकडे पाहत होते..
" देवपाडा..!" समर्थ आपल्या सर्वाँकडे पाहत..म्हंणाले.
क्रमश:
.........