Yakshini - 2 books and stories free download online pdf in Marathi

यक्षिणी - भाग 2

त्या वासाने मात्र हळू हळू तिच्या मनाचा ताबा घेतला. तिची अवस्था कस्तुरी मृगासारखी झाली.
मन मोहित करणारा वास तर येतोय पण कुठून हे कळत नव्हते.
तो वास तिला क्षणभर का होईना तिचं दुःख विसरायला लावतो.

कशीतरी घरी पोहोचते. आजच्या प्रसंगाबद्दल घरी मात्र ती कोणालाच काही सांगत नाही . स्वतःच यावर काहीतरी उपाय शोधायचा असा मनोमन विचार करून झोपून जाते.

आज घरी बसलो तर सासूबाईंना आणि मुलांना कळेल हा विचार करून ती घरी न बसता संध्याकाळी बाहेर पडते. आजूबाजूला असलेल्या ओळखीच्या दुकानदारांशी , तिथल्या भाजीवाल्या बायकांशी बोलून काय मार्ग निघतोय का याची चाचपणी करते.

तिथल्या लोकांना तिची परिस्थिती माहीत असल्याने ते तिला धीर देतात. काहीजण तर थोडीफार आर्थिक मदतही देऊ करतात.

पुन्हा रात्री ती तिथून घरी परतत असताना तोच उग्र वास नाकामध्ये शिरतो ..आज मात्र ती ठरवते की तिथे काय आहे ते पाहूया . कोणते झाड आपल्याला इतकं आकर्षित करतेय.

तिथे झाडांची इतकी दाट गर्दी असते की तिला नेमकं हवे असलेलं झाड कोणते ते आजही समजत नाही.

आजही तो सुगंध तिच्या दुःखांवर फुंकर घालण्याचे काम करतो. तिचं मन नकळत का होईना साऱ्या वेदना विसरते.

दुसऱ्या दिवशी मात्र ती सकाळीच तिथे कोणतं झाड आहे हा सोक्ष मोक्ष लावायचाच हा निर्धार करून त्या ठिकाणी येते . सकाळची कोवळी उन्हं सगळीकडे पसरलेली असतात . ऑक्टोबर महिना असल्यानं हवेत एक प्रकारचा गारवा जाणवत होता. शरद ऋतूची चाहूल निसर्गावर पसरली होती. अशा अल्लाददायक वातावरणात तिचं मन एकदम शांत झालं. आजूबाजूची सर्व झाडे कोवळ्या उन्हाची सोनेरी शाल घेऊन अर्धवट झोपेत होती जणू. काहीजण मात्र एकाद्या अवखळ पोरासारखी लवकर उठून उगाचंच पानांची सळसळ करत होती.

तेवढ्यात एक झाड तिला या सर्वांपेक्षा खूप वेगळे भासते. हिरव्यागार लांबट पानांचा गुच्छ आणि इवली इवली पांढुरक्या रंगाची फुलं. असं वाटावं की हिरव्या पानांच्या कोंदणात पांढरा खडा बसवला आहे.

ती अजून जवळ जाते . पुन्हा तोच सुगंध!! ती त्याच्याकडे प्रेमळ नजरेने पाहत राहते. त्याच्या खोडावरून मायेने हात फिरवते.
तिला उगीच वाटतं की त्यानेही आपली एक फांदी हळूच खाली तिच्या डोक्यावर झुकवून तिला जणू आशीर्वाद दिला.
आपले मायेचं कोणी भेटल्यासारखे ती त्याला मनातील गुजगोष्टी सांगते.

आता त्यांचं भेटणं रोजचं होऊन जाते. तिलाही मन मोकळे करण्यासाठी एक हक्काची जागा मिळते आणि तो रस्ताही तसा जास्त वर्दळीचा नसल्यानं काही गर्दुल्ले सोडले तर कोणी त्यांच्या गप्पामध्ये येत नव्हते. तिथले गर्दुल्लेही हळू हळू "अपने जैसी कोई पागल है "असा मनात विचार करून दुर्लक्ष करत.

असेच दिवस चालले होते. मधेच एकदा भावाने येऊन थोडी आर्थिक मदत केलेली . त्यावर आणि नवऱ्याच्या पेन्शन वर घर कसेबसे तग धरून होते.

पुन्हा आपला धंदा सुरू व्हावा म्हणून तीही तिच्या परीने धडपडत होती.

आज ती नेहमीप्रमाणे ती धंद्याच्या ठिकाणी जाते तर तिथले दुकानदार पेढे हातात घेऊनच तिची वाट बघत असतात .

"अहो ताई एक आनंदाची बातमी आहे त्या भिमाला पोलीस पकडून घेऊन गेले त्याच्यावर कसली तरी केस होती .गुंडच ना शेवटी तो ! आता काही येत नाही बघा सात आठ वर्ष बाहेर . तुम्ही सुरू करा तुमचा धंदा उद्यापासून . आम्ही आहोत सगळे तुमच्याबरोबर .


तिला आकाश ठेंगणं होते. सर्वांचे आभार मानून घरी जाताना मात्र नेहमीसारखी आपल्या त्या झाडाजवळ थांबते आणि मनातलं आनंद त्याला सांगू लागते.


तिची खुशी बघून त्याच्या पानांची जोरात सळसळ होते. तिला एक कळतं की यालाही भावना आहेत यालाही आपला आनंद कळतोय .




इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED