कोण? - 8 Gajendra Kudmate द्वारा थरारक मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कोण? - 8

भाग – ८
त्याचा परिणाम स्वरूप सावलीचा मानसिक उपचार सुरु झाला होता. तिला डॉक्टरांनी वेगवेगळ्या औषधी दिल्या होत्या ज्यांचे सेवन ती करू लागली होती. शरीराने स्वस्थ असून मानसिक आजाराचा औषधी घेतल्याने आता सावलीचा डोक्यावर आणि मेंदूवर आणखीनच अतिरिक्त ताण निर्माण होऊ लागला होता. त्यामुळे सावली आता आधीपेक्षा अधिक जास्त चीड चीड करून रागात येऊ लागली होती आणि गंमत अशी होती कि त्या रागाचा भारात ती बेशुद्ध व्हायची याचे तिलाच माहित नाही रहायचे. काही वेळाने ती सामान्य अशी वागायची. सावलीचा सोबत एवढे काही घडत होते तरीही ती सतत कोमलचा विचार करत रहायची. असेच सुरु असतांना एके दिवशी कोमलला शुद्ध आली आणि तिने डोळे उघडले. तिने आईला हाक मारली तर तिची आई तीचाजवळ गेली आणि म्हणाली, “ कोमल माझा बाळ.” तितक्यात सावलीसुद्धा तेथे गेली आणि म्हणाली, “ कोमल तू बरी आहेस ना आता कसे वाटतय तुला.” तेवढ्यात तेथे इन्स्पेक्टर कदम येऊन ठेपले होते. त्यांनी सावलीला म्हटले, “ मिस सावली तुम्ही जो नंबर दिला होता त्याचा पत्ता आम्हाला मिळाला आहे आणि आम्ही आता त्याला अटक करण्यासाठी जात आहोत. तुम्हाला आम्ही उलट पळताळणीसाठी बोलावू शकतो तर तुम्ही कुठेही जायचे नाही.” असे म्हणून ते निघून गेले.
गवसलेल्या पत्त्याचा शोध घेत इन्स्पेक्टर कदम त्या पत्त्यावर पोहोचले तर तो एक आलिशान बंगला होता. कदम साहेबांनी त्या बंगल्याचा मालकाला बोलावण्यास गार्डला सांगितले. गार्डने फोन करून त्याचा मालकाला माहिती दिली आणि त्या बंगल्याचा मालक बंगल्याचा बाहेर आला. त्या दोघांची नजर भेट झाली आणि अनयास दोघांचा हि चेहरयावर हसू आले. ते दोघेही एकमेकांना ओळखत होते. तसा इन्स्पेक्टर कदम यांचा रेकॉर्ड हा फार चांगला नव्हता. त्यांची मोजणी हि भ्रष्ट अधिकर्यात होत होती. पैशांसाठी ते कुठल्याही तळाला जाण्यास तयार असत सर्वथा. त्याचा अनुषंगाने तो बंगल्याचा मालक आणि आता त्याचा वाया गेलेला राजकुमार मुलगा हे सुद्धा वाईट लोक होते. त्याचबरोबर इन्स्पेक्टर कदम हे वाईट लोकांचे आणि पैशांचे मित्र होते. तो बंगल्याचा मालक कदम साहेबांना बंगल्याचा आत घेऊन गेला आणि त्यांचात एका बंद खोलीत चर्चा झाली. जवळ जवळ एका तासाने कदम साहेब त्या बंद खोलीचा बाहेर निघाले आणि म्हणाले, “ तुम्ही काही काळजी करू नका, मी सगळा व्यवस्थित सांभाळून घेईन आणि त्या मुलीला सुद्धा. तीचाबाद्द्ल तुमचा मुलाला काही काळजी करू नका म्हणून द्या आणि विशेष म्हणून आता हे सगळ त्याला बंद करायला सांगा. आधीच त्याचाकडून एक फार मोठा हत्या करण्याचा प्रयत्न करण्याचा गुन्हा घडलेला आहे. देवाचा कृपेने ती मुलगी मरण नाही पावली नाहीतर आणखीच त्रास झाला असता तुम्हाला. तर चला मी चलतो दोघांची हि काळजी घ्या.” असे ओठांवर हसू आणत आणि हातातील पैशांचा लिफाफ्याचे चुंबन घेत कदम साहेब बंगल्याचा बाहेर निघाले.
तेथून निघून ते थेट इस्पितळात गेले जेथे सावली आणि तिची आई त्यांची वाट बघत होती. त्यांनी सावलीला सांगितले, “ आम्ही सदर पत्त्यावर जाऊन तपासणी केली तर आम्हाला तेथे कुणीच सापडले नाही शिवाय त्या ठिकाणी कुणीतरी आधीच आग लावली होती त्यामुळे सगळे पुरावे जाळून राख झाले आहेत. आता आम्ही काहीच करू शकत नाही.” असे म्हणून ते निघू लागले तेव्हा सावलीने त्यांना म्हटले, “ असे कसे काहीच करू शकत नाही तुम्ही.” तेव्हा इन्स्पेक्टर कदम आवाज उंचावून बोलले, “ पोलीस तुम्ही आहात कि आम्ही आमचे काम आम्हाला शिकवू नका मिस सावली. मी म्हटल्याप्रमाणे आता काहीच करू शकत नाही आणि तुम्ही सुद्धा दुसऱ्यांचा फाटक्यात आकारण आपले पाय टाकत जाऊ नका नाहीतर असे प्रसंग तुमचावर आणि तुमचा परिवाराचे सदस्यांवर ओढावू शकतात,” असे म्हणून ते लगबगीने निघून गेले. सावलीला आता फारच राग आलेला होता तरीही तिने समजदारीने काम घेतले आणि थेट सावंत साहेबांना फोन लावला. सावंत साहेबांनी सावलीचा फोन उचलला आणि बोलले. तेव्हा सावलीने घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगितला आणि इन्स्पेक्टर कदम त्यांचे बोलने आणि त्यांचे वागणे याबद्दल हि सविस्तर माहिती त्यांना दिली. त्यानंतर तिने सावंत साहेबांना एक विनंती केली. ती म्हणाली, “ साहेब मला तुमचा कार्यशैली आणि तुमचा कर्तुत्वावर १०० % विश्वास भरवसा आहे. तुम्हीच मागे आम्हाला आधार आणि हिम्मत दिली होती. तुम्ही स्वतः या प्रकरणाचा तपास लावा याची माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे.” तेव्हा सावंत साहेबांनी पुन्हा सावलीला विश्वास दिला आणि फोन ठेवला. सावंत साहेबांना इन्स्पेक्टर कदम यांचा बद्दल आणि त्यांचा रेकोर्ड बद्दल परिपूर्ण माहिती होती म्हणून त्यांनी त्यांचे खास शिपाही इन्स्पेक्टरवर नजर ठेवण्यासाठी ठेवले होते. सावंत साहेबांना इन्स्पेक्टरवर भरवसा तर नव्हताच पण आज घडलेल्या प्रकारामुळे त्यांची याची शाश्वती सुद्धा त्यांना झाली होती. इन्स्पेक्टर कदम यांनी सावलीने जे सांगितले त्याचा उलट माहिती सावंत साहेबांना त्यांचा खास शिपायाकडून कळली. त्याच अनुषंगाने सावंत साहेबांनी आपली कार्यवाही सुरु केली होती. त्यासाठी ते स्वतः त्या बंगल्यावर गेले होते. तेथे जाऊन त्यांनी त्या बंगल्याचा मालकाला आणि त्याचा मुलाला अटक करणार तोच ते दोघेही तेथून पसार झाले होते कारण इन्स्पेक्टर कदम यांनी त्यांना तसे करण्यास सांगितले होते.
शेष पुढील भागात...............