एकापेक्षा - 1 Gajendra Kudmate द्वारा हास्य कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
शेयर करा

एकापेक्षा - 1

नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा तुमचा भेटीला आलेलो आहे. मी नेहमीप्रमाणे तुमचासाठी काहीतरी घेउन आलेलो आहे. आज मी माझ्या शालेय जीवनात ज्या काही खोड्या आणि त्यांचा निगडित घटना घडल्या त्या तुमचा सबत शेअर करणार आहे. तर माझ्या जिवनातील त्या खोडकर आठवणी खर तर आजन्म माझ्या सोबत राहतील आणि जेव्हा जेव्हा मी कधी उदास किवा निराश झालेलो आहे. मात्र त्यावेळेस या आठवणींचा फार मोठा सहारा म्हणा की आश्रय मला मिळाला. मी आज ही जेव्हा जेव्हा कधी एकटाच स्वतःचा सोबत असतो त्यावेळेस जर मी या घटणेतील एकाही घटनेला आठवले तर माझा तो क्षण अत्याधिक आनंदित असा क्षण बनुन जातो. तर मित्रांनो, त्यातील काही चांगले क्षण मी
तुमचा सोबत शेअर करण्याचा प्रयत्न करतो.
तर या यादीतील पहिला क्षण मी तुम्हाला आधी सांगतो. तर मित्रांनो, झाले असे की मागील काही वर्षापासून म्हणजे मी गोष्ट करतोय सन १९७८ चा जेव्हा माझा जन्म झालेला होता. तर माझा जन्म झालेला होता त्यावेळेस जी काही परिस्थिति होती त्यानुसार आपल्या वर पाश्चात्य परेपरा परंपरा आणि रुढी यांचा फारसा तेवढा प्रभाव नव्हता, त्यावेळेस आपण सगळे आपले सण मोठ्या आनंदाने साजरे करत होतो. त्या सणात एक सण म्हणजे नव वर्षाचे स्वागत. तसे आपल्या मराठी नवीन वर्षाचा प्रारंभ हा गुर्ढीपाडवा या सणाचा दिवसापासून होतो. त्याच
प्रमाणे इंग्रजी कैलेडर नुसार त्यांचा नवीन वर्षाचा आरंभ हा १ जानेवारीला होतो. तर मी माइ्या १८ वर्ष पूर्ण झाल्या नंतरचा कालची गोष्ट सांगतो आहे. तर ते वर्ष होते १९९६ त्यावेळेस माझे कॉलेज मध्ये पदार्पण झालेले होते मी सी पी एंड बेरार कॉलेज , रविनगर, नागपुर येथे शिक्षण ग्रहण करत होतो. तेव्हा त्यावेळेस मात्र नवीन पीढ़ीवर पाश्चात्य परंपरा आणि रुढी यांचा प्रभाव वाढला होता. तर डिसेम्बर महिना सुरु झालेला होता.
तेव्हा आम्ही घराचा जवळील मित्रांनी ठरवले की आपण नविन वर्षाचे स्वागत बाहेरील देशांचा लोकांप्रमाणे करूया. माझा आयुष्यातीलि हा पहिलाच क्षण होता. माझी सुद्धा ती नविन तरुणाई होती. म्हणून मी सुद्धा त्यांचा निर्णयात सामिल झालो. तर आता हा कार्यक्रम कुणाचा घऱी
किंवा कुणाचा घराचा गच्चीवर करायचा. तर सगळ्यांनी एकमताने म्हटले की हा कार्यक्रम कमलेशचा घराचा गच्वीवर करायचा.
तर आम्ही सगळे याचा तयारीला लागलो होतो. आधी वर्गणी गोळा करायची ती केली आपापल्या आई वडिलांच्या पासून लपून, यात सगळ्यात महत्वाची आणि धक्कादायक गोष्ट अशी होती की ३१ डिसेम्बरचा रात्रीला कुणीच आपल्या घरी जाणार नव्हते. कारण की त्या रात्रीला
ड्रिंक करण्याचा सगळ्यांचा बेत होता. त्यामुळे त्या गोष्टीची तयारी आमचा मित्र मंडळी यांनी आधीच केलेली होती. त्यांनी सगळ्यात आधी जाऊन वाईन आणि बिअरची व्यवस्था केली होती. मग रात्रीला झोपण्यासाठी बिछायत केंद्रातून गादया सांगितलेल्या होत्या. तर तो कार्यक्रम एका
दिवसाला येउन ठेपला होता, म्हणजे ३० डिसेम्बर हा दिवस उजाडला होता, तर सकाळी सकाळी कमलेश मला बोलवायला आला. त्याने सांगितले की तू काही मित्रांना बोलाव आणि मी काही मित्रांना बोलावतो काहीतरी महत्वाचे बोलायचे आहे. तर आम्ही सगळ्यांना बोलावले कमलेशचा घरचा गच्चीवर. तेथे गेल्यावर कमलेश आम्हाला सांगू लागला, " माझ्या आईने आणि तिचा महिला मंडळ मधील स्त्रियांनी माझाघराचा गच्चीचा शेजारचा गच्चीवर नविन वर्ष साजरा करण्याचा कार्यक्रम ठेवला आहै. तर आपला हा कार्यक्रम आपल्याला एकतर रदद करावा लागेल अथवा येथून कुठेतरी हलवावा लागेल," त्यावेळेस आमचा सगळ्यांचे बाबा हे ऑ्डनेन्स फैक्टरी नागपुर येथे काम करत होते आणि आम्ही सगळे सरकारी क्वार्टरमध्ये राहात होतो. तेथे एका कवार्टर मध्ये आठ परिवार राहत होते. सगव्यांची गच्ची ही शेजारी शेजारी होती. म्हणून
आम्हाला प्रश्न पडला की आता कार्यक्रम कुठे करायचा, कारण की कार्यक्रमाला लागणारे साहित्य हे आधीच आणून ठेवले होते शिवाय बिछायत केंद्रातून गादया येवून होत्या. मटन वाल्याला पैसे देवून ठेवले होते, आता काय करायचे.
तर आता नविन वर्षाचा कार्यक्रम स्थगित होवू शकत नव्हता. म्हणून त्या सगळ्यांनी मला विचारले की तुझ्या घराचा गच्चीवर आपण कार्यक्रम करू शकतो काय, कारण की मी कमलेशचा कवार्टरचा शेजारचा क्वार्टर मध्ये रहात होतो. मी म्हटले की मी आधी घरी जाऊन बाबांना
विचारतो आणि सांगतो. तर मग मी आणि कमलेश माझ्या घरी गेलो आणि बाबांना विचारले की आम्ही आपल्या गच्चीवर कार्यक्रम करू शकतो काय, तर माझा आईने विचारले जेवणात काय ठेवले आहे. तर आम्ही खोटे बोललो की आम्ही पनीरची भाजी बनवत अहोत, जेव्हा की आम्ही
मटनची भाजी बनवणार होतो. कारण की माझ्या घरी कुठल्यातरी बाबांची सेवा होती म्हणून आमचा घरी मांसाहारी जेवण बनवता येत नव्हते. मग कमलेश आणि त्याचा बाबांना चांगल्या रितीने माझे बाबा ओळखत होते म्हणून त्यांनी परवानगी दिली. परवानगी मिळताच माझे सगळे मित्र
आनंदित झाले होते. आता दुप्पट गतीने सगळे आपापल्या कामाला लागले होते. तर मग तो दिवस उजाडला आणि ३१ डिसेम्बर ची पहाट झाली. आम्ही सगळे मित्र कामाला लागले होतो. ज्याला जे काम दिले होते तो ते काम करण्यास सरसावले होते. तर मला माझी गच्ची छान झाडून स्वच्छ
करण्याचे आणि विकास सोबत मिळून लाईटिंग लावण्याचे काम दिले होते. कमलेश मटन आणण्यासाठी गेलेला होता अशाप्रकारे आम्ही सगळे पंधरा ही मित्र कामाला लागलो होतो,
तर सगळे आपापले कार्य संपवुन माझ्या गच्चीवर येउन ठेपले होते. मग दोघे जण कमलेश सोबत जाऊन त्याचा घरून स्वयंपाक करण्यासाठी लागणारे भांड़े आणि गॅस शेगडी वगैरे घेउन आले. आता सायंकाळचे पाच वाजत आले होते आणि आम्ही आता स्वयंपाक करायला सुरुवात केली होती. तर कमलेश आणि विकास हे दोघेही छान भाजी बनवायचे म्हणून भाजी बनवायचे काम त्यांना देण्यात आले
उरलैले आम्हीं काही जण चपाती आणि भात करू लागलो. तेवढ्यात विकास म्हणाला," अरे यार सुखा सुखा काम करने में मजा नहीं आ रहा तो एक एक पेग हो जाये,." तर मग त्यांनी वाईनची बॉटल उघडली आणि ग्लासात ती वाईन टाकन प्याले. त्यांचा बरोबर एक दोन मित्रांनी सुद्धा घेतला, पंधरा लोकाचा मध्ये आम्ही पाच जण बिअर पिणारे होतो म्हणून आम्ही म्हटले की आम्ही रात्रि जेवणाचा विळेस पिऊ. तर मग जेवण तयार करता करता काही काही अंतराने दारू पिता पिता कमलेश आणि विकासला छान दारू चढ़ली होती. तरी ते दोघेही नियंत्रण मध्ये होती. तेवढ्यात विचित्र घटना घडली होती, ती म्हणजे अचानक त्यावेळेस पाउस सुरु झाला होता.
शेष पुढील भागात ......१