एकापेक्षा - 3 Gajendra Kudmate द्वारा हास्य कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

एकापेक्षा - 3

तर ठरल्याप्रमाणे आम्ही सगळे बरोबर साढ़े आठ वाजता ग्राउंडवर येवुून ठेपलो होतो. परन्तु नेमका प्रफुल हा आलेला नव्हता म्हणून आम्ही त्याची वाट बघत होतो. कारण की ती मुलगी कोणती आहे हे फक्त त्यालाच माहीत होते. तो यायला उशीर करत होता आमच्यातील दोन मित्र त्याचा घरी गेले आणि त्याला बोलावले तर तो पाच मिनिटे म्हणून आम्हाला वाट बघत ठेवू लागला. मग तो शेवटी बरोबर नऊ वाजता बाहेर आला आणि हसू लागला. सगळे मित्र त्याची वाट बघून वैतागुन गेले होते आणि तो एकतर उाशिरा आला आणि आमचावर हसू लागला. मग तेव्हा विकास त्याचा इंग्रजी भाषेत बोलला, "...... साले हमको चुतिया समझा है क्या कबसे राह देख रहे है और दात दिखा रहा है." (येथे.........म्हणजे शिव्या) तर मग तरीही तो सारखा हसतच होता. मग तो बोलला, " तुमको इतने जल्दी आने को किसने बोला था. मैंने तो नऊ बजे बोला था." असे म्हणुून तो शेफारू लागला होता. मग कमलेश ने विकासला एक इशारा केला आणि त्याला शांत राहण्यास सांगीतले. आता नऊ वाजून दहा मिनिटे झालेली होती. तर तो बोलला, " अबे वो साढ़े नऊ बजे तक आती है. अब चलो गरीबो." असे म्हणून तो पुढे निघाला. तर आम्ही सगळे सद्धा निघालो, तर कमलेश आणि विकास यांचात काहीतरी खुसर पुसर सुरु होती. ते आता काय आणि कसे करणार होते ते त्यांनी कुणालाच सांगितले नव्हते. तर आम्ही सगळे तोलानी चौक मध्ये पोहोचलो. त्यावेळेस घड्याळ नऊ वाजून वीस मिनिटांची वेळ दाखवत होते. तर आम्ही तिचा येण्याची प्रतीक्षा करू लागलो होतो.

तर आमचा डिफेंसचा परिसर ऑर्डनेन्स फैक्टरी अम्बाझरी नागपुर हा सम्पूर्ण आर्मीचा परिसर होता. तेथे फैक्टरी असल्यामुळे सगळीकड़े परिसर हा स्वचछ आणि रोशणाईने जगमग असा असायचा आणि असतो. तर तेथील तोलानी चौक हा आमचा आणि सगळ्या फैक्टरीचा परिसरातील एक मुख्य असे स्थान होते. तेथे सगळी बाजारपेठ होती, महामंडळची बस सुद्धा तेथेच यायची कारण की तेथे बस स्टॉप होता. तर आमचा तोलानी चौक सगळ्यात जास्त सुशोभित आणी भव्य असा होता. त्या चौकात एकदम मध्य स्थानी छान मोठ मोठे हॅलोजन लाईट लावले होते. त्यामुळे त्या चौकात त्या रस्त्यावर एक छोटीशी सुई जरी पडली तरी ती स्पष्पणे शोधू शकतो. तर आता तो गमतीदार प्रसंग तुम्हाला सांगतो, तर झाले असे की तो उन्हाळ्याचा दिवस होता आणि ती रात्र सुद्धा उन्हाळ्याची होती. म्हणून सगळे लोक जेवण झाल्यानंतर फिरायला तोलानी चौक पर्यत यायचे तर रात्रीचे नऊ वाजून पंचेविस मिनिटे झालेली होती आणि तेवढ्यात प्रफुल म्हणाता, " अबे गरीबों तयार हो जाओ वह आ रही है ग्रीन ड्रेस पहनकर." आम्हा सगळ्यांचा नजरा आता त्या ग्रीन ड्रेसवाल्या मुलीकडे वळल्या होत्या. आम्हाला ती दिसली तर ती चौकाचा लांब होती आणि सावकाश चौकाचा जवळ येत होती. तेव्हा विकास म्हणाला, " बे प्रफ़ूल चल उसको एकदम करीब से देखते हैं और तू उसपर फ्लॅश मारना." असे म्हणून त्याने प्रफुलला चण्याच्या झाडावर चढवले. मग आम्ही सगळे त्या मुलीचा दिशेने पुढे पुढे वाढू लागलो होतो.

तर तेव्हा त्या चौकाचा मध्य स्थानी शुभ्र पांढरा हॅलोजन लाईटचा प्रकाश जगमगला होता. तो चौक असल्यामुळे तेथे सर्वत्र अवतीभवती स्त्रिया मुली या सगळ्या उपस्थित होत्या, तर ती मुलगी एकदम चौकचा मध्य स्थानी येऊन पोहोचली होती. नेमका प्रफुल आणि सोबत आम्ही सुद्धा तेथेच पोहोचलो होतो. तर मग प्रफूल तिला बघून त्याचा केसांत हात फिरवून तिचावर फ्लॅश मारण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात अचानक चमत्कार घडला होता, तेथे अचानक त्या क्षणी गजानन महाराज अवतरित झाले होते. त्यांना बघून ती मुलगी आणि तिचा मैत्रिणी पोट धरून हसु लागल्या आणि अबाउट टर्न घेउन त्यांचा घराचा दिेशेने पटपटा चालू लागल्या. चालतांना मात्र त्यांना हसू हे काही आवरत नव्हते. त्याच प्रमाणे तो चौक असल्याने तेथे चारही दिशेने स्त्रीया आणि मुली ज्या चौकाचा दिशेने चारही बाजूने चालून येत होत्या. त्या सगळ्या सुद्धा हसून अबाउट टर्न घेउन परतु लागल्या होत्या. असे करता करता सगळीकडे गजबजलेल्या तोलानी चौकावर पुढील एका मिनिटात शुकशुकाट झालेला होता. तेथे उरलेलो होतो आम्ही त्याच बरोबर दोनचार इकडली तिकडली मूल आणि आमचे गजानन महाराज, आमचे तर हसून हसून हाल बेहाल होते. आम्हाला तर त्या क्षणी वाट् लागले होते की आम्ही मरतो आता हसून हसून. आता तुम्ही ही विचार करत असाल तेथे असे काय घडले असेल. तर आता मी तुम्हाला माझे हसू आवरून सांगतो काय झाले होते म्हणून.

तर आम्ही चौक वर पोहोचलो आणि प्रफुल त्या मुलीचा डोळ्यांत बघून त्याचा केसांत हात घालून फ्लॅश मारत होता. नेमका त्याच क्षणी विकास याने प्रफुूलचा बरमुडा हा एका झटक्यात खाली ओढला. ते इतक्या अचानक झाले होते की कुणाला काहीच कळले नव्हते. तर गंमत तेथेच थांबली नव्हती, तर प्रफूलने त्या दिवशी अंडर वियर ही घातलेली नव्हती. तर त्याचा बरमूडा खाली झाला आणि तो भर चौकात एकदम गजानन महाराज होऊन गेला. इकडे हळूहळू तोलानी चौक रिकामा होत राहिला आणि आमचा प्रफुल त्याचे डोळे बंद करून तसाच उभा राहिला होता. मग तितक्यात प्रफूलचा आवाज आला, " अबे सालों सब गये क्या." आम्ही म्हटले, " हा सब चले गये." मग त्याने त्याचे ड़ोळे उघडले आणि पटापट त्याचा बरमूडा वर सरकवून घातला. मग त्याने जोरात म्हटले, ".......साले विकास ." परन्तु विकास आणि कमलेश हे आधीच पडून गेले होते. आता मात्र तो लगबगीने तेथून पळ काढून त्याचा घरी गेला. आम्हाला तर चालणे होत नव्हते इतके आम्ही हसून हसून थकलेलो होतो. तर माझ्या आयुष्यातील हा आणखी एक अविस्मरणीय असा प्रसंग होता जो मी तुमचा सोबत शेअर केला.

याचप्रमाने आणखी पुष्कळ असे प्रसंग आहेत त्यातील निवडक असे प्रसंग मी तुमचा सोबत शेअर करतो आहे. कारण की संपूर्ण सांगायला बसलो तर त्या सम्पूर्ण मध्ये काही असे प्रसंग आहेत जे मी माझ्या आई बहिन आणि मैत्रिणी याचा समोर सांगू शकत नाही आणि तुम्ही ते ऐकू शकत नाही. इतके ते लाजिरवाणे प्रसंग आहेत, तर माझा निवडक आशा प्रसंगातील आणखी एक प्रसंग मी तुमचा सोबत शेअर करतो आणी त्या नंतर तुमचा निरोप घेतो. तर माझा आयूष्यातला आणखी एक हास्यास्पद आणि न विसरणारा प्रसंग आहे तो आमचा एका मित्राचा ज्याच नाव संजय होते. तर आधी संजय बद्दल थोड़ी माहिती देऊ इच्छितो, तर संजय हा आमचा एक मित्र त्याचे नाव नितेश होते त्या मित्राचा मित्र होता. मीं आधीच सांगितल्या प्रमाणे आम्ही रोज संध्याकाळी क्रिकेट खेळायचो तर संजय सद्धा नितेश सोबत आमचा सोबत खेळायला यायचा. रोजच आमचा सोबत खेळल्याने त्याची आणि आमची मैत्री झालेली होती म्हणून आम्ही त्याचा सोबत आमचा मित्रांचा सारखी चेष्टा मस्करी करू लागलो होतो. संजय मध्ये एक विशिष्ट गोष्ट होती ज्यामुळे तो हास्यास्पद क्षण निर्माण झाला होता.
शेष पुढील भागात.......