एकापेक्षा - 2 Gajendra Kudmate द्वारा हास्य कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

एकापेक्षा - 2

यकायक पाउस आल्यामुळे आमची सगळी धांदल उडून गेली होती, गच्चीवर गादया होत्या त्या ओल्या नाही झाल्या पाहीजे म्हणून आम्ही पटापट त्या उचलून जिण्याचा आत आणून ठेवले, सगळे जेवण सद्धा जिण्याचा आत आणून ठेवले. असे करता करता रात्रीचे आम्हाला अकरा वाजले होते म्हणून आम्ही आता बसलो होतो बिअर पिण्यासाठी. तर तिकडे कमलेश आणि विकास हे आधीपासुनच पीत होते म्हणून त्या दोघांना चांगलीच चढ़ली होती. तर आता त्यांची शुद्ध इंग्रजी आणि त्याचात घाण शिव्यांची मिसळ ही सुरु झालेली होती. आम्ही आता सगळे
गच्चीवर नाही तर माझा घराचा लगतचा जिण्याचा आत बसलेलो होती आणि त्या दोघांची अमृतवाणी ही आमचा घराचा दाराचा पर्यंत पोहोचू लागली होती. म्हणून त्यांचा आवाज लपवण्यासाठी आम्ही म्युजिक सिस्टम सुरु केला आणि त्याचा आवाज वाढवला. बाहेर गच्चीवर पाउस हा
संथ गतीने सुरु होता म्हणून आम्ही जीण्याचा आत अडकलो होतो. गाणे वाजू लागले तर ते दोघेही नाचू लागले होते. त्यातल्या त्यात त्यांनी आमचा बिअरची एक बॉटल घेतली आणि ते दोघेही ती बिअर प्याले. कॉकटेल झाल्यामुळे त्यांना दारू आता फारच जास्त चढली होती की दुसऱ्या शब्दात म्हटले तर त्यांचा डोंगा फाटला होता. ते दोघेही वेगवेगळे ताल करू लागले होते आणि शिवाय रात्रीचे बारा वाजत आले होते म्हणून आम्ही जेवण करायला तेथेच बसलो होतो.

तर कमलेश आणि विकास हे दोघेही जिण्याचा दाराचा शेजारी गच्चीवर बसले होते. तेथे गंमत अशी झालेली होती की आमचा क्वार्टचा गच्चीवर पाणी गळत होते म्हणून तेथे काम सुरु होते आणि गच्चीवर एका ठिकाणी गिट्टी आणि रेती ही पड़लेली होती. या दोघांचा नाचन्याणे त्या कोपऱ्यातली गिट्टी ही गच्चीवर पसरली होती. तर ते दोघेही नेमके त्याच ठिकाणी जेवण करायला बसले होते. आम्हा पाच मित्रांना सोड्न बाकीचे सगळे टूल्ल होते, मग त्या दोघांना जेवण वाढले तर त्यात विकास हा ताटाचा वेगव्या दिशेने तोंड करून बसला. त्याने ताटाचा शेजारी फरशीवर हात टाकला आणि गच्चीवरिल एक गिट्टी उचलून दाताने जोरात चावा घेतला. जसा त्याने गिट्टीला दातात दाबले तो वेदनेने किंचाळला आणि म्हणाला, ".......अपने थाली में बोटी डाली है और मेरे थाली में हड्डी."(......याचा अर्थ घाण शिव्या.) मग त्याने हातात चपाती घेतली आणि ती चपाती गच्चीवरील घाण पाण्यात बुडवून खाऊ लागला. पुन्हा तो म्हणाला, " ...... कमलेश नमक डाला के नही तूने," आता कमलेश चपाती हातात घेउन तोंडात न टाकता तोंडाचा शेजारी टाकतो आहे आणि तोंडात स्वतःचे बोट टाकतों आहे. तेव्हा त्यांचे ते ताल बघून आम्ही पोट धरून हसलो तर खरे परन्तु याचे गंभीर परिणाम उद्याला आम्हाला कळणार होते. तर असे त्यांचे ताल सुरु होते आणि त्यांचा बरोबर उरलेल्या बेवडयांचे तसेच हाल होते. पंधरा लोकांचा स्वयंपाक केलेला होता आणि त्यात फक्त आम्ही पाच जण जेवलो आणि सगळ जेवण वाया गेले, आम्ही जिण्यात पायरीवर गादया टाकलेल्या होत्या तर ते सगळे काहीच न जेवता तसेच झोपून गेले.

आता माझा पुढे प्रश्र होता यांनी केलेली घाण सकाळी केव्हा आणि कशी साफ़ करायची. म्हणून आम्ही पाच मित्र रात्रभर झोपलो नाही. शेवटी रात्रीचा चार वाजता पाउस थांबला आणि आम्ही पाच ही मित्रांनी पटापट ते उरलेले अन्न नेऊन नाल्यात टाकले आणि मग परत येवून ते
भांडे धुवून सगळी स्वच्छ करून ठेवली. मग त्या बेवडयांना उठवून त्यांना त्यांचा घरी पाठवले होते. मग सकाळ झाली तर आम्ही जातीने सगळी गच्ची फिरून बघितले की अंधारात कुठे तरी या बेवडयांनी काही साक्ष आमचा खोट्यापणाची सोडली तर नाही. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा होता की त्या बेवडयांनी दारूचा नशेत मटनाची हाडं गच्चीवर इकडे तिकडे फेकली असतील तर आम्ही खोटे बोललो होतो हे माझा आईला
माहीत होऊन जाईल, मग सम्पूर्णपणे शाश्वती करून ते माझे मित्र आणि मी घरी पोहोचलो. मग आई मला म्हणाली, " अरे रात्रीला फार आवाज येत होता. तुम्ही दारू पीले होते काय" आता मात्र माझी घाबरगुंडी झालेली होती. मी काहीच नाही बोललो आणि सरळ आंघोळ करण्यासाठी
बाथरूम मध्ये निघून गेलो. म्हणतात ना, " सत्य को कितना भी छुपाओ तो वह कही से भी प्रकट होता है." त्या अनुषंगाने आमचे खोटारडेपण माझ्या आईने पकडून घेतले. तर झाले असे की आम्ही सम्पूर्ण गच्ची निरखून बघितली तर आम्हाला मटनाचे हाड़ कुठेच भेटले नाही आणि ते
भेटणार ही नव्हते कारण की ते तेथे नव्हते. ते होते त्या ठिकाणी जेथे कोणी स्वप्रात सुद्धा विचार करू शकत नव्हते.

तर माझ्या आईने आंघोळ करून देव पूजा केली आणि ती सूर्यदेवाला जल अर्पण करायला गच्चीवर गेलेली होती. मग तिने सूर्यदेवाला जल अर्पण केले आणि ती अगरबत्ती लावण्यासाठी तुळशीचा कुंडीचा जवळ गेली. ती अगरबत्ती तेथे लावणार तोच तिची नजर तेथे त्या कुंडीत गेली. तर तिला दिसले की तुळशीचा कुंडीत मटनाचे हाड़ टाकुन ठेवले होते त्या बेवडयांनी. मग आईने मला विचारले तर मला खरे बोलावे लागले आणि मग तेव्हा पासून माझे नविन वर्षाचे स्वागत करण्याचे कार्यक्रम सम्पूर्णपणे बंद करण्यात आले. ती गोष्ट आईने बाबांना सांगितली नाही परन्तु मला चांगलीच अद्दल घड़वली होती. तर आशा प्रकारचा ही एक घटना माझा जिवनातील घड़ली होती जी मला शिकवून गेली की सत्य हे कधी लपत नाही.

आता माझा आयुष्याचा एक आणखी दुर्मिळ असा प्रसंग सांगतो, तर आमचा क्वार्टरचा शेजारचा क्वार्टर म्हणजे कमलेश जेथे राहत होता त्या क्वार्टर मध्ये कमलेशचा खालचा ब्लॉक मध्ये एक पाटिल काका रहायचे. ते फैक्टरीत गाड़ी चालवायचे म्हणजे ते डाईवर होते.
तर ते काका दोन वर्षाचा पुर्वीच गेले कारण की ते दारू खुप प्यायचे. तर त्यांची दोन मूल आणि दोन मुली अशी चार लेकर होती. तर त्या लेकरात सगळ्यात लहान मुलगा होता त्याचे नाव प्रफुल हा आमचा वयोगाटाचा होता म्हणून तो आमचा सोबतच रहायचा. विशेष म्हणजे आमचा नविन वर्षाचा पार्टीत हा सुद्धा टूल्ल होता पिऊन, तर हा गमतीदार प्रसंग असा घडला की आम्ही सगळे मित्र संध्याकाळी कॉलेज मधून आल्यावर क्रिकेट खेळायचो, तर क्रिकेट खेळून झाल्यानंतर आम्ही ग्राउंड वर १ तास म्हणजे अंधार होत पर्यंत बसायचो. तर तेव्हा आमचा गप्पा गोष्टी करायचो.
तर तेव्हा आम्हाला प्रफूल याने सांगितले की त्याचा कॉलेज मध्ये एक मुलगी आहे आणि ती मला म्हणजे प्रफुलला लाईक करते. तर मग सगळ्या मित्रांनी विचारले की ती रहाते कुठे. तर त्याने सांगितले की ती तोलानी चौकचा पलिकडे सेक्टर ७ मध्ये एका क्वार्टर मध्ये रहाते. तिचे बाबा फॅक्टऱी मध्ये साहेब आहे. तर त्याने पुढ़े सांगितले की ती रात्रि ९ वाजता जेवण केल्यानंतर तोलानी चौक पर्यत तिचा सोबतचा मैत्रिणी मैत्रिनीं सोबत फिरायला येते. तर आम्ही सगळ्यांनी तिला बघण्याचा कार्यक्रम निर्धारित केला. मग आम्ही सगळे तेथून थेट आपापल्या घरी निघून गेलो आणि
सगळ्यांनी ठरवले की आपण जेवण करून साढ़े आठ वाजता ग्राउंड मध्ये भेटायचे.