एकापेक्षा - 4 Gajendra Kudmate द्वारा हास्य कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

एकापेक्षा - 4

तर प्रसंगाची सुरुवात अशी झाली की आम्ही क्रिकेट खेळून ग्राउंड वरती बसलेलो होतो. तर आमचा गप्पा सुरु झालेल्या होत्या. तुम्हाला आधीच सांगितले मी की संजय मध्ये एक विशेष गोष्ट होती, ती म्हणजे तो थोड़ासा बहेरा होता. त्याला कमी ऐकायला येत होते. आता तुम्ही म्हणाल की कुणाचा शारीरिक कमी वर मी हसतो आहे. तसे नाही या गोष्टीची जाण मला सुद्धा आहे, परन्तु संजयचा बाबतीत वेगळ होत. संजयला दुसऱ्या व्यर्थ आशा गोष्टी कमी ऐकायला येत होत्या, परन्तु त्याचा हेतु असलेल्या गोष्टी आधी ऐकायला येत होत्या. म्हणजे तो मतलबी बहेरा होता. तर आम्ही बसलेलो असतांना आमचा घोळक्यात नितेश आणि आणखी एक आमचा मित्र हरीश हा बसलेला होता. संजयला आम्ही जेवढे बारकाईने आणि जवळून ओळखत नव्हतो तेवढे आणि त्याहून ही जास्त जवळून नितेश आणि हरीश त्याला ओळ्खत होते. तर ही चेष्टा म्हणा की मस्करी त्या दोघांनी म्हणजे नितेश आणि हरीश यांनी सुरु कैलेली होती. त्या दोघांना संजयचा मजबूत पक्ष आणि त्याचा सगळ्यात कमजोर पक्ष म्हणजे त्याची कमजोरी माहीत होती. तर त्या संध्याकाळी आम्ही बसून गप्पा गोष्टी करू लागलो होतो. तर नितेश आणि हरीश हे आमोरा समोर बसले होते. मग हरीशने नितेशला बघून बोलता बोलता डोळा मारला आणि तो बोलू लागला होता. हरीशने आम्हाला सुद्धा डोळा मारून त्यांचा
मस्करीत सामिल करून घेतले होते म्हणून आम्ही फक्त आणि फक्त त्यांचे बोलणे आणि संजयचा हालचालीवर लक्ष करून होतो.

तर हरीशने बोलायला सुरु केली, तो म्हणाला, " अरे यार तूने वह सनी लिओनी की नई मूवी आयी है वह देखी क्या" हरीश बोलत असतांना संजय हा हरीशचा शेजारी परन्तु दोन फुटाचा अंतरावर बसलेला होता. आधी आम्ही इकडचा तिकडचा गोष्टी करत होतो तेव्हा संजय सारखा रस्त्यावर लक्ष पुरवून होता. कारण की त्यावेळेस ट्युशन सुटलेली होती आणि मुली तेथून निघून जात होत्या. तर मग हरीशने हुशारीने वयस्क गोष्टी करायला सुरुवात केली होती. तर त्याने संजयची कमजोर नस दाबलेली होती, कारण की त्याला वयस्क आणि उत्तेजित करणाऱ्या गोष्टींत फार इंटरेस्ट यायचा. तर मग हरीशने सनी लिओनीची गोष्ट काढताच संजय जो रस्त्यावर बघत होता त्याने पटकन आमचाकड़े नजर फिरवली. मग तो मोठ्या आवाजात सांगू लागला त्या मूवी मध्ये असे दाखवले आहे तसे दाखवले आहे. तर आता मात्र संजय सम्पूर्णपणे त्या दोघांचा शब्दांचा जाळ्यात अडकू लागला होता. त्याच बरोबर नितेश आणि हरीश या दोघांचे डोळ्यांचा डोळ्यात इशारे होऊ लागले. मग हरीशने आणखी जास्त उत्तेजित करणारे शब्द काढने सुरु केले. तर मात्र आता संजय सम्पूर्ण चित्त आणि मनाने त्यांचा गोष्टी ऐकण्यात तल्लीन होवून गेला. या संभाषणात त्या दोघांनी एक आणखी चतुराई केलेली होती. ती म्हणजे ते दोघे एकमेकांचा डोळ्याने इशारा करायचे आणि हरीश त्याचप्रमाणे हुशारी करू लागला होता. मग नितेशने इशारा केला आणि हरीशने त्याचा आवाज थोड़ा कमी केला, परन्तु त्याचा उत्तेजित करणाऱ्या गोष्टी या सुरूच ठेवल्या.

हरीशने थोड़ा आवाज कमी केला तर संजयला कमी ऐकायला येत होते म्हणून तो थोडा हरीशचा दिशेने सरकून त्याचा थोड्या जवळ आला. मग हरीश पुन्हा पुन्हा त्या विषयाचा निगडित बोलू लागला आणि संजयला उत्तेजित करू लागला. तेव्हा हरीश आणि नितेश या दोघांचा नजरा एकमेकांचा वर त्याच बरोबर संजय याचावर सुद्धा होत्या. उरलेले आम्ही सगळे त्यांची ही हुशारी मोठ्या उत्सुकतेने बघत होतो. तर मग नितेशने इशारा केला आणि हरीशने पुन्हा आवाज कमी केला परन्तु तो बोलत राहिला. मग संजय पुन्हा हरीशचा आणखी थोड़ा जवळ सरकला. मग काही वेळाने हरीशने नितेशचा इशारा मिळताच त्याचा आवाज कमी केला. आता मात्र संजय हरीशचा एकदम जवळ सरकून बसला. मग पुन्हा थोड्या वेळाने हरिशने नितेशचा इशारा मिळताच त्याचा आवाज कमी केला. यावेळेस मात्र संजय हरीशला एकदम खेटून बसला आणि गोष्टी ऐकू लागला. आम्ही सगळे संजयची हालचाल बघून आपले हसू रोखून ती गंमत एन्जॉय करू लागलो होतो. तर आता हरीशने आणखी जास्त उत्तेजित करणाऱ्या गोष्टी सांगण्यास सुरुवात केली होती. त्याच अनुषंगाने संजय आता फारच उत्तेजित होऊन गेला होता. तर आता हरीश
आणि नितेश याने शेवटची हुशारी केली. नितेशने हरीशला पुन्हा एकदा इशारा केला आणि यावेळेस हरीशने चक्क काहीच न बोलता फक्त आणि फक्त त्याचे ओठ हलवणे सुरु केले होते. तो फक्त ओठ हलवत होता आणि काहीच बोलत नव्हता. मग आम्ही सगळेच म्हणजे नितेश, हरीश आणि आम्ही सगळे हे चोरट्या नजरेने संजयकड़े बघू लागलेलो होतो.

संजयचा कानावर आवाज ऐकू येत नव्हता म्हणून तो बेचैन झालेला होता. मग तो हरीशकड़े बघू लागला त्याने बघीतले की हरीश हा बोलत आहे परन्तु मला आवाज येत का नाही. म्हणून त्याने नितेश आणि आमचाकड़े बघीतले. तर नितेश आणि आम्ही सुद्धा हरीश सारखे नुसते आपले ओठ हलवत होतो. ते बघुन तो आणखीन जास्त बेचैन झाला. यावेळेस हरीशने आणखीनच जास्त हद्द केली होती. त्याने ओठ हलवता हलवता तसेच वेगवेगळे हातवारे करने सुरु केले होते. ते बघून संजय फारच आधी उतावीळ आणि मग रागात आला होता. तो आमचाकड़े बघत होता. तर आम्ही सगळे आपले ओठ हलवत असायचो. त्यानंतर तो पिसाळल्या सारखा त्याचा कानात बोट टाकुन हलवू लागला. मग तो थेट हरीशचा तोंडाचा समोर कान घेऊन गेला. तरीही त्याला काहीच ऐकू येत नव्हते म्हणून तो पुन्हा कानात बोट टाकुन हलवू लागला होता. आता मात्र त्याची उत्कंठा ही एकदम अनावर झाली आणि तो जोराने ओरडला, "...... जोर से बोलो ना बे सालो मुझे कुछ सुनाई नही दे रहा है." (......म्हणजे शिव्या) तो ओरडू लागला आणि आम्ही सगळे पोट धरून हसू लागलो. जेव्हा आम्ही हसलो तेव्हा संजयला ऐकायला येऊ लागले होते. तो एकसारखा आमचाकड़े बघू लागला आणि आम्ही त्याचाकड़े बघून हसू लागलो. त्याला ते शेवटी पर्यत कळले नाही आणि आम्ही त्याला काही सांगितले नाही, त्यानंतर आम्ही सगळे आपापल्या घरी निघून गेलो तसेच हसत हसत.

तर मित्रांनो, माझ्या आयुष्यातील हे काही निवडक असे प्रसंग मी तुमचा सोबत शेअर केले. मला खात्री आहे की त्या परिस्थित तुम्ही स्वतःला जेव्हा ठेवून हे प्रसंग वाचाल तर अनयास तुमचा ओठांवर हसू हे येईल नाहीच तर खीळखीळून येईल. तर असेच हसत आनंदित रहा. माझ्या आयुष्यातील आणखी काही क्षण मी आठवून तुमचा पुढे पुन्हा एकदा येईल. तेव्हा पर्यंत रजा घेतो परन्तु तुमचे विचार माझ्या लिखानाबद्दल हे नक्की कळवा तुमचा कमेंट द्वारे तर आता रजा घेतो.

नमस्कार.

🙏 गजेन्द्र गोविंदराव कुडमाते 🙏