मला ना अक्षरशः लाज वाटते तुला आई म्हणायला ???
असच काहीबाही पंखुडी विनिताला बोलत होती आणि तिच्या कानात गरम तेल ओतल्यासारखं विनिताला होत होत . तिची विचारशक्ती अगदी शीण झाली होती. आजपर्यंत फक्त हिच्यासाठी एवढं केलं केलं आणि हिलाच आज माझी लाज वाटते . मला वाटलं होत कि माझी लेक मला समजून घेईल काहीही झालं तरी........ पण.....पण इथे उलटच घडत होत अगदी. विनिताने आज पर्यंत खुप चढउतार तिच्या आयुष्यात पहिले होते . पण आज पहिल्यांदा तिला हरल्यासारखं वाटत होत . तिच्या डोळ्यासमोरून तिचा भूतकाळ झरकन जात होता.
साधारण सहा महिन्यापूर्वी,
त्या दिवशी ती खुप थकलेली असते, तिच्या अंगात कामासाठीच काय पण काहीही करण्याची हिम्मत नसते. तरी कशीतरी उठून ती गॅल्लरी मध्ये उभी असते. का तर आज गिऱ्हाईक आलं तर त्याची सेवा करायला पण तिची त्या साठी अजिबात इच्छा नसते. पण तिच्या इच्छेला कुठे तिथे महत्त्व होत.
" क्यू रे आज उदास है तू , ? ये सडेला मुह लेकरं बैठी है ???"
तोंडातील पान थुंकून तिच्या इथे तिच्यासारखाच काम करणारी तिची मैत्रीण करुणा विनिताला बोलते.
" नाही गं आज खुप थकल्यासारखं झालं आहे."
विनिता उदास चेहरा करून पोटावर हात ठेऊन म्हणाली.
करुणा ही पण तिच्यासारखीच सेक्सवर्कर असते, पण खूप सुंदर ,गोरीपान. चुकून ह्या उकिरड्यावर आलेली . भडक रंगाचा मेकअप करून तिने कमरेच्या खाली साडी नेसलेली . केस मोकळे सोडलेले. आणि नेहमीप्रमाने तोंडात पान कोंबून कोंबून भरलेला जे ती फक्त चघळत होती. स्वभावाने मात्र विनितापेक्षा वेगळी... ती स्वतःवर तर अन्याय होऊन देत नव्हती पण दुसऱ्यावर झालेल्या अन्यायाची सुद्धा तिला चीड यायची. आज परिस्थिती मुळे तिच्यावर ही वेळ आली होती.
" सून तू एक काम कर,जाके आराम कर !"
ती विनिताला म्हणाली .
" अब्बे पागल जैसा मत बोल तेरेको पत्ता है ना अम्मा चिल्लयेगी. "
विनिता दीनपणे तिला बोलते.
तस करुणा तोंडातलं पान खाली पचकण थुंकते, आणि तिच्या कडे बघून बोलते,
" अभि तू क्यूँ पागल जैसा बोल राही है , डोक्यावर पडलीस का ? बघ स्वतःकडे किती थकली आहेस नि म्हणे आराम नको मला ! मुझे बता जान से ज्यादा कुछ है क्या ? "
" तू चिंता मत कर ,बरं वाटेल मला, तस पण सकाळ पासुन म्या ऐकबी गिऱ्हाईक नाही घेतलं बघ हिशेब देताना अम्मा कितना सुनायेगी पत्ता है ना "
विनिता काकुळतीला येऊन बोलते.
" ते काय बी नाय, तू जा बे.......म्या समजायेगी अम्मा को !"
एवढं बोलून करुणाने विनिताला तिच्या रूम मध्ये जबरदस्ती ढकललं आणि जुन्या खाटेवर झोपवून तिच्या अंगावर दिल आणि ती रूम च्या बाहेर जायला निघाली.
पण नशीब एवढं खराब कि तेवढ्यात तिथे एक झोकांड्या देत गिऱ्हाईक येत,
" ये लडकी तुम दोनो में मेरी आज कि हसीना डार्लिंग विनिता कौन है ? "
विनिताच्या रूममध्ये येऊन ती व्यक्ती करुणाच्या चेहऱ्यावरून हात फिरवत विचारते.
दारात डुलत आत आलेली ती व्यक्ती म्हणजे विनिता साठी अम्माजी ने पाठवलेला एक गिऱ्हाईक होता , ज्याला बघूनच किळस यावी एवढा तो अंगाने बलदंड . रंगाने काळा आणि धारदार मिशी, पोट सुटलेला. लालभडक डोळे आणि त्यातून वखवखणारी घाणेरडी नजर तोंडातून येणारा देशी दारूचा वास.
" में हू .. "
असं बोलून विनिता उठून उभी राहते. तेव्हा करुणाला तिचा प्रचंड राग येऊन ती चिडते.
" अम्मा ने भेजा है क्या तेरे को ? "
करुणा त्या माणसाला विचारते.
त्याने होकार भरल्यावर ती परत त्याला म्हणते ,
" तो तु वो साईड वाले खोली मे चल, आज विनिता ला नाही जमणार.
"क्यू नही जमेगा उसको , और ऊस बात से मुझे फरक नाही पडता जिसके लिये पैसे दिये है वही चाहिये मेरे को ... समझा तुझे अब साईड हो जा. "
असं म्हणून त्याने तिला ढकलून दिले आणि त्याने रूम मध्ये प्रवेश करून विनिताच्या दिशेने पाऊल टाकले.
" ये ******, तेरे को समझ में नाही आता क्या ? वो क्या अलग करणे वली है क्या???. मी काय न ती काय तुझं कामं झाल्याची मतलब !"
असं बोलून ती त्याला आपल्याकडे ओढते .
पण तो माणूस सुद्धा ऐकत नसतो . तो तिला परत ढकलतो आणि विनिता कडे येतो , म्हणून विनिता मध्ये पडत करुणाला म्हणते कि ,
" करुणा ... तु जा ....माझ्या मुळे तुला त्रास नको ...एक माझं.......जाऊ दे .तो ऐकणार नाही आणि परत अम्मा चिडेल ते काही वेगळंच "
" अग ये...भेजा है ना तेरे को तो समझ ना ???? आज त्रास होतोय का तुला गेले कित्येक दिवस तुला बरं नाही. वाटत. तब में क्या बोली क्या तेरेको ???? आज बोलते कारण तुझी ती कंडिशन नाय . "
करुणा विनिता ला समजावणाच्या स्वरात बोलते .
केव्हापासून त्या दोघींची मचमच ऐकून आधीच वैतागतलेला तो माणूस अजूनच भडकतो, विनिताच्या हाताला घट्ट पकडून तिला जोरात खाटेवर ढकलतो.तिच्या पोटात कळ मारते आणि ती कळवळते.
क्रमश :-