Ti ek Veshya - 1 books and stories free download online pdf in Marathi

ती एक वेश्या - भाग 1




"का ........का .......केलास तू असं ????
हा दिवस मला बघायला मिळण्यापेक्षा तू मला मारून टाकायचं होत ना ......"

असं जोरात म्हणत , ओरडत ती हात आपटत समोरचा फ्लॉवर पॉट आणि समोर येईल ते फेकून देत होती . जोरजोरात रडत होती ती . रागाचा उद्रेक होत होता तिचा .अक्षरशः थरथरत होती ती .स्वतःच्या आई बद्दल समजल्यावर तिला स्वतःची किळस येत होती कि आपली आई असं काम करते आणि एवढी वर्ष त्याबद्दल आपल्याला काहीच माहित नव्हतं . आपल्या आई ने एवढी वर्ष आपल्यापासून लपवलं आणि आपण त्यावर विश्वास ठेवला हेच आठवून आठवून तिला स्वतःची चीड येत होती .


तिच्या आईने हजारदा बजावून सुद्धा ती तिथे आली होती आणि हे भयानक सत्य आज तिच्या समोर आलं होत . ज्याची तिला कल्पना सुद्धा करवत नव्हती. जिच्या शिवाय तिला राहवत नव्हतं आज त्याच आई च तोंड तिला बघायची तिची इच्छा होत नव्हती.

तिच्या आईने तिला ती एक सोशल वर्कर असल्याचं सांगितलं होत , पण तस काहीही नसून ती एका ती एका रेड लाईट एरिया मध्ये सेक्सवर्कर चं कामं करत होती. आणि जेव्हा एवढ्या वर्षा नंतर तिला हे भयानक सत्य समजलं होत जे तिला पचत नव्हतं.

अठरा वर्षांची पंखुडी आपल्या आई ला विनिता ला जाब विचारात होती . काय सांगणार होती विनिता तिला . तिच्या वर हि परिस्थिती का आली होती आणि तिने हा मार्ग का निवडला होता . ज्या मुलींसाठी तिने हे सगळं केल आज तीच तिला समजून घेत नव्हती.

पंखुडीला विनिता ने स्वतःपासून खूपच लवकर वेगळं ठेवलं होतं. खूप लहान वयात तिला आधी पाळणाघर आणि नंतर हॉस्टेल ला ठेवलं होत . ह्या दलदली पासून तिला वेगळं ठेवून खूप शिकवून मोठं करायचा तिचं ध्येय होत. आपली मुलगी आपली घृणा करेल, आणि तीच भविष्य नीट व्हावं म्हणून तिने हे सत्य तिच्यापासून एवढी वर्ष लपवलं होत. पण आज अचानक तिच्या समोर हे आलं आणि तिच्या प्रश्नांची उत्तरे काय द्यावीत हे मात्र तिला समजत नव्हतं .

ती विचारत होती आणि तिकडे विनिता सुद्धा हतबल होऊन रडत होती .

पंखुडीला काही दिवसापूर्वीच त्यांचं फोन वरच बोलणे आठवलं ,

"पंखुडी , तुला मी हजारदा सांगितलं आहे तुला , इथे मला न कळवता येत जाऊ नकोस. आणि . मी तुला फोन केल्याशिवाय मला तू करू नकोस ."

विनिता फोन वर तिला ओरडत होती.

" अगं ममा असं काय करतेस , काय झालं मी तुला भेटायला आले तरं ? मम्मूडी मला खुप आठवण आली तुझी !" पंखुडी लाडात येऊन बोलते.

" अगं, तुला जेव्हा आठवणं येईल तेव्हा आपण बाहेर भेटत जाऊ. किंवा मग तुझ्या हॉस्टेलवर ! पण इथे नको. "
विनिता पंखुडी ला समजावत बोलते.

" अगं पण मम्मा तु मग हे कामं का सोड ना आणि जवळच इकडे दुसरं बघ म्हणजे आपण एकत्र राहू ? "

पंखुडी विनिता ला नेहमीचा एकच तो प्रश्न विचारते.

" हो ग माझ्या राणी ,सोडणार आहे पण सध्या तरी नको. तु तुझ्या पायावर उभी राहिलीस की मी कामच करणार नाही फक्त आराम करेन मग तर झालं ! "

विनिता सुद्धा नेहमीप्रमाणे उत्तरली.


" जाऊदे तु नाही ऐकणार माझं. "

पंखुडी नाराजीत बोलते.

"हो रे माझं गुणी बाळ ते मम्मा ला पण तुझी खूप आठवण येते, पण आता मला खूप कामे आहेत. ती करायला हवीत ना...???"
ती मान डोलावून होकार भरते.


" मग आता शहाण्या मुलीसारखी तुझ्या हॉस्टेल ला जा बर वेळेवर...!"

हुंकार भरून, बाय बोलून दोघीनी कॉल कट केला .

विनिताला पंखुडीची नाराजी आणि काळजी दोन्ही कळत असते. आल्यापावली पंखुडी तिच्या हॉस्टेल ला परतली तर विनिताकडे तस वागण्याशिवाय पर्याय नसतो, आणि ती ते काम पण सोडू शकत नव्हती कारण आता पर्यन्त पंखुडीचा सर्व खर्च तिने हेच कामं करून केलेलं असतं.

आता पंखुडीला काळात होत कि तिची आई तिला भेटायला नकार का देत होती .

नकळत दोघीही भूतकाळात जाऊन पोहचल्या होत्या.

क्रमश :-

इतर रसदार पर्याय