Josephine - 2 books and stories free download online pdf in Marathi

जोसेफाईन - 2

मागच्या भागात आपण जोसिफाईन,तिचा बॉयफ्रेंड आणि तिचा बॉस ह्यांबद्दल आणि त्यांच्या विचित्र वागण्याबद्दल पाहिलं पण त्यांचं असं वागणं का आणि केव्हा सुरू झालं ते आपण ह्या भागात पाहणार आहोत.

एका प्रसिध्द सोसायटीत एक जोडपं नवीनच राहायला आले होते. लिफ्ट मधून त्यांच्या सामानाची ने आण सुरू झाली. वरचा मजला असल्याने बराच वेळ लागत होता.
एकदाचं त्यांचं बस्तान बसलं.

सुरुवातीपासूनच हे जोडपं वागायला थोडं विचित्र होतं. दिवसरात्र त्यांच्या घराचे पडदे बंद असत. घरात सतत अंधार करून ते बसलेले असत. कुठल्याश्या सायबर security वर आधारित असलेल्या गुप्त कंपनीत ते काम करीत असत. असं हे जोडपं होतं जोसिफाईन आणि तिचा बॉयफ्रेंड अनिल चे.

कंपनीत जाताना जोसे. हातात बरेच सामान घेऊन घाईघाईत बाहेर पडायची. गुप्तकंपनित असल्याने किंवा अजून काही कारणाने ती तिचे नाव सतत बदलायची. तिला आणि तिच्या बॉस ला वाटायचे की आपण एखादे रॉ एजंट आहोत असाच त्यांचा आविर्भाव असायचा पण होते ते अश्याच एका साध्या कंपनीत.

अश्या ह्या जोस. आणि अनिल त्याचप्रमाणे त्यांचा बॉस तन्मय ल सवय होती अती ड्रिंक्स घायची ते सतत ड्रिंक्स घ्यायचे.

एकदा अश्याच शनिवारच्या रात्री, सगळे सोसायटीतील लोकं दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने निवांत होते. कोणी टीव्ही बघत होते तर कोणी ड्रिंक्स घेत घेत Netflix बघत होते. हळूहळू रात्रीचा एक वाजत आला. आणि अचानक एका फ्लॅटमध्ये जोरात काहीतरी पडल्याचा आवाज आला. कोणीतरी जोरजोरात विचित्र आवाजात ओरडत घरातील वस्तू फरशीवर जोरजोरात आपटत होते. एका स्त्रीचा आणि पुरुषाचा भसाडा आवाज येऊ लागला. तो आवाज होते जोस. आणि अनिल चा.

अनिल म्हणत होता,"आर यू गोइंग Mad?"

"Yes I am Mad", जोस. ओरडली.

त्यानंतर जोस. च स्फुंदून स्फुंडून रडणे सुरू झाले आणि ती म्हणू लागली
अनिल मला मूल हवंय...
मला मुल हवंय .....
मला मुल हवंय....

ह्या जोस. च जो बॉस तन्मय होता तो दिसायला जरा यथातथा च होता आणि टकला होता. तो आणि त्याची बायको सविता,त्याचा मुलगा आणि आई वडील यांच्यासोबत Josephine ज्या फ्लॅट मध्ये राहायची त्याच्याच समोरच्या अपार्टमेंट मध्ये राहायचा.

जसे Josephine आणि अनिल लिव्ह इन मध्ये राहत होते त्याचप्रमाणे तन्मय आणि सविता सुध्धा काही वर्षे लिव्ह इन मध्ये राहिले आणि नंतर त्यांनी प्रेमविवाह केला.

सुरुवातीला तन्मय चे रुप पाहून सविता त्याच्याशी लग्न करण्यास तयार नव्हती पण तन्मय सविताच्या गालावरची खळी पाहून तिच्यावर फिदा झाला होता. त्यामुळे त्याने तिच्या आईबाबांना आधी convince केले मग तिच्या आईबाबांनी सविताला कंविंस केले. अखेर तन्मय आणि सवितचे लग्न पार पडले. सविता रोज घरची कामे करताना, बाल्कनीत भिंतीवर कपडे वाळवताना शॉर्ट्स घालून छान तन्मय ला ऑफिस मध्ये जाताना बाय बाय करायची.

इकडे Josephine चे आणि अनिल चे सुध्धा बरे चालले होते. पण दैवाला ते पाहवले नाही आणि अचानक कोरोना येऊन धडकला. अनेकांचे व्यवसाय,कामधंदे बंद पडले. Josephine आणि तन्मय ची कंपनी सुध्धा चालेनाशी झाली. अनिल ची कंपनी तर ठप्प च झाली.

झालं त्यांना खायचे फाके (वांधे) होऊ लागले. मग तन्मय च्या डोक्यात किडे वळवळले. त्याने त्याची आयडिया Josephine आणि अनिल यांस सांगितली. Josephine आणि अनिल ह्यांच्या डोक्यातील किड्यांना सुध्धा ती आयडिया आवडली. त्यांनी आपल्या गुप्त कंपनीत आणखी एक गुप्त कंपनी उघडली. त्या कंपनी अंतर्गत ते आसपासच्या आणि स्वतः राहत असलेल्या बिल्डिंग मधील लोकांच्या बेडरूम chya खिडक्यांना रात्री लाइट्स बंद झाले की ड्रोन लावू लागले. त्यातून ते आक्षेपार्ह माहिती गोळा करू लागले.

Josephine आणि अनिल त्यांच्या बाल्कनीतून ड्रोन ऑपरेट करत असत तर तन्मय त्याच्या घराच्या बाल्कनीतून कोणी बघत तर नाही ना हे लक्ष ठेवत असे.

पण ते डोक्याने थोडे अर्धवट असल्याने drone ले आवाज ही असतो हे त्यांच्या लक्षात येत नसे त्यामुळे काही ठिकाणी तो आवाज ऐकून लोकं जागरूक व्हायचे आणि खिडकी कडे बघायचे की लगेच घाबरून तन्मय Josephine आणि अनिल ले इशारा करायचा की ते दोघे घाबरून drone वर उडवायचे. अश्या तऱ्हेने त्यांचा असा गुप्त व्यवसाय सुरू होता.

क्रमशःइतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED