जोसेफाईन - 9 Kalyani Deshpande द्वारा भयपट गोष्टी मराठी में पीडीएफ

Featured Books
शेयर करा

जोसेफाईन - 9

"काय माहित? जे असेल ते त्या परमेश्वरालाच माहित!", आत्या

"पण एवढ्या लवकर दुसरीकडे कुठे जागा मिळणार?", सुमित विचारात पडला.

काहीवेळ विचार करून सुपर्णा सगळ्यांकडे बघत ठामपणे म्हणाली,"सुमित ही जागा मिळवायला आपल्याला बरेच कष्ट पडले आहेत. अशी चांगली सोसायटी आपल्याला शोधून सापडणार नाही. त्यामुळे मी एक विचार केला आहे."

"काय विचार केला आहेस तू?", तिघेही काळजीच्या सुरात म्हणाले.

"माझ्या माहितीत एक गुरुजी आहेत. 'प्रभंजन शास्त्री ' त्यांचे नाव. ते ह्या समस्येवर आपल्याला नक्की काहीतरी तोडगा सांगतील.", सुपर्णा निश्चयाने म्हणाली.

"ठीक आहे लगेच संपर्क कर त्यांच्याशी, बघू ते काय म्हणतात ते ", सुमित

सुपर्णा ने लगेच गुरुजींना फोन केला.

"हॅलो गुरुजी मी सुपर्णा"

"पलीकडून आवाज "

"गुरुजी आम्हाला एक समस्या आली आहे....", असे म्हणून तिने त्यांना सविस्तर माहिती दिली.

परंतु ते बाहेरगावी असल्यामुळे लगेच येऊ शकणार नव्हते. त्यांनी गावाहून आल्यावर लगेच यायचं कबूल केले तेव्हा कुठे सुपर्णा चा जीव भांड्यात पडला.

"काय झालं? काय म्हणतात गुरुजी?", सुमित

"ते सध्या शहरात नाहीत, गावी गेलेत पण यायला कितीही वाजले तरी ते इथे येणार आहेत.", सुपर्णा

"तोपर्यंत इथे राहणं कठीण आहे रात्रीचे दोन वाजायला आले आहेत.", श्वेता

"आता सध्या काही आवाज येत नाहीये आणि बाळही शांत झोपली आहे तेव्हा आता आपणही थोडं शांत बसून गुरुजींची वाट बघू असं मला वाटते.", सुपर्णा

सगळेजण फक्त श्वेता सोडून (कारण श्वेता नास्तिक होती )देवाचा जप करत बैठकीत बसले. बाळ श्वेता च्या मांडीवर च होतं. पहाता-पाहता पहाटेचे तीन वाजले. सुपर्णा सारखी फोन ची वाट बघत होती. आत्या सारख्या घड्याळाकडे बघत होत्या. सुमित बैठकीत उगीच येरझरा घालत होता. तेवढ्यात श्वेताचा हसण्याचा आवाज आला म्हणून सगळेजण तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागले.

"धीरे से आजा री अखियन में नींदिया आजा री आ.......", श्वेता अंगाई गात होती. तिचा आवाज पूर्णपणे बदलला होता. अत्यंत भेसूर आवाजात ती गात होती आणि मधून मधून जोरजोरात खिदळत होती. तिचा तो आवाज ऐकून बाळ रडायला लागलं ते पाहून आत्या बाळाला घ्यायला तिच्या जवळ गेल्या की तेवढ्यात "ए.... बुढीया!! चल जा! मेरे पास आना नही, चल हट"

तिचा तो अविर्भाव बघून आत्या मनातून चरकल्या आणि चार पावलं मागे झाल्या.
तेवढ्यात श्वेता म्हणजे श्वेताच्या अंगातील जोसेफाईन बाळाला घेऊन उठून उभी राहिली. सगळेजण तिच्याकडे ती आता काय करते ह्या विचारात एकटक बघू लागले.

एकाएकी श्वेता "अरे! अरे! अरे! तौबा! तौबा! तौबा! मुन्ने" असं म्हणत बाळाला उंच उंच फेकू लागली.

सगळेजण घाबरले आणि हवालदिल नजरेने तिच्याकडे बघू लागले तेवढ्यात सुपर्णा ची फोन ची रिंग वाजली. गुरुजी खाली सोसायटीत आले होते. म्हंटल्या प्रमाणे साडे तीन वाजले तरीही ते आले होते. तिने लगेच वॉचमन ला गुरुजींना वर येण्यासाठी अनुमती दिली. गुरुजी येईपर्यंत आत्या, सुमित आणि सुपर्णा ची एक लक्ष श्वेता कडे तर एक लक्ष दाराकडे लागलं होतं.

अखेर दाराची बेल वाजली आणि सुपर्णा ने धावत जाऊन दार उघडलं. गुरुजींचा पाय घरात पडताच इकडे श्वेता विजेचा करंट लागल्या सारखी हादरली आणि चक्कर येऊन खाली पडली. बरं त बरं आत्याने आधीच बाळाला आपल्या ताब्यात घेतलं होतं. बाळाला आत्याने आंजारल्यावर-गोंजारल्यावर कुठे बाळ शांत झालं.

गुरुजींनी सर्वत्र आपली भेदक नजर फिरवली.
"चल मला सगळं घर दाखव ", त्यांनी सुपर्णा कडे पाहून म्हंटल.

गुरुजी संपूर्ण घरात फिरून आले. एका कोपऱ्यात ते थोडावेळ थांबले आणि त्यांनी वर फॅन कडे बघितलं. ती सुमित -सुपर्णा ची बेडरूम होती.

त्यानंतर ते बैठकीच्या खोलीत येऊन बसले. त्यांनी एक दोन जणांना फोन केले आणि मग ते शांत पणे बसून राहिले.

क्रमश :