जोसेफाईन - 10 Kalyani Deshpande द्वारा भयपट गोष्टी मराठी में पीडीएफ

Featured Books
शेयर करा

जोसेफाईन - 10

काही वेळातच त्यांचे दोन शिष्य फ्लॅट नंबर 1002 मध्ये आले. त्यांच्या हातात दोन पिशव्या होत्या. गुरुजींनी त्यांना नजरेनेच खुणावले तशे ते भराभर कामाला लागले. बैठकीत त्यांनी पिठाने एक रिंगण तयार केलं. त्या मध्ये एक लाकडी पाट मांडला. त्यानंतर त्यांनी एका बाटलीतील अभिमंत्रित पाणी त्या रिंगणाभोवती शिंपडलं.

आता गुरुजी त्या रिंगणा बाहेर एक पाट मांडून बसले. त्यांनी काही क्षण डोळे मिटून काही मंत्र म्हंटले. काहीवेळातच त्या बैठकीत उग्र घाण वास येऊ लागला. सगळ्यांनी नाकाला हात लावला. आता त्या रिंगणात एक धूसर आकृती निर्माण होत होती आणि काही क्षणातच तिथे जोसेफाईन उभी राहिली.

अत्यंत विद्रुप दिसणारी जोसेफाईन गुरुजींकडे न बघता खाली बघत होती. ती जोरजोरात भेसूर आवाज काढत होती. त्यामुळे सगळ्यांना भीती वाटायला लागली. गुरुजींनी श्वेता ला बाळाला घेऊन आत जायला सांगितलं पण ती एकटी जायला तयार होईना म्हणून आत्याही तिच्या बरोबर आतल्या खोलीत गेल्या.

इकडे गुरुजींनी लगेच जोसेफाईन कडे मोर्चा वळवला.
"नाव सांग..", गुरुजींनी मोठ्याने जोसेफाईन ला उद्देशून म्हंटले.

" जो.. जो.. से फाईन ", ती हडळ अडखळत म्हणाली.

"का धरलं ह्या घराला?", गुरुजी जरबेने म्हणाले.

ती हडळ विचित्र आवाज करत डोलू लागली.
ती उत्तर देत नाही हे बघून गुरुजींनी तिच्या अंगावर अभिमंत्रित पाणी शिंपडलं. तशी ती जोर्रात किंचाळली.

सुमित सुपर्णा च्या अंगावर सरसरून काटा आला.

"सांग!! का धरलं ह्या घराला??", गुरुजी ओरडून म्हणाले.

"बच्चा!! मुझे बच्चा चाहिये!! बच्चा चाहिये मुझे!!!", जोसेफाईन घोगऱ्या आवाजात म्हणाली.

"बच्चा मिलेगा तो छोडेगी इस घर को??", गुरुजींनी असं म्हणताच आता पुढे काय होते ह्या विचाराने सुमित सुपर्णा चिंतेने एकमेकांकडे बघू लागले. इकडे आतल्या खोलीत गुरुजी हडळीला द्यायला आपलं बाळ मागतात की काय ह्या विचाराने श्वेता चे हृदय जोरजोरात धडकू लागले. आत्याला सुद्धा कमालीचे टेन्शन आले होते.

"बच्चा!! बच्चा चाहिये!! बच्चा! बच्चा!!", ती पिशाचिनी पुन्हा पुन्हा तेच तेच बोलू लागली. ते पाहून गुरुजींनी पिशवीतून एक छोटी बाहुली काढली. ती हडळी च्या हातात देत त्यांनी म्हंटल,"ये ले बच्चा! और जा अब यहांसे "

हडळीने ती बाहुली घेतली आणि ती तिला मांडीवर थोपटू लागली. पुन्हा ती तिच्या भेसूर आवाजात अंगाई म्हणू लागली, " धीरे से आजा री.......... निंदिया आजा...... "
त्या शांत आणि घनगंभीर वातावरणात तिचा तो भेसूर स्वर अंगावर काटा आणणारा होता. थोड्या वेळ ती अंगाई म्हणत राहिली आणि अचानक तिने ती बाहुली जोरात वर उंचावून फेकून दिली.

"ए sss ये क्या किया तुने? बच्चा क्यों फेका?", गुरुजी तिच्यावर रागावत म्हणाले.

"आ sss बच्चा चाहिये मुझे.....बच्चा!!!", जोसेफाईन ओरडत म्हणाली.

"बच्चा तुने फेक दिया, अब बच्चा नही मिलेगा तुझे. समझा!! और बता तुझे क्या चाहिये?",गुरुजींनी असं म्हणून तिच्या अंगावर ते पाणी शिंपडलं तशी ती भीतीने थरथरली.

"बोल, बोल क्या चाहिये तुझे??"

"अ... नि... ल "

"कौन अनिल?", गुरुजी

"अ.. नि.. ल... चा..हि.. ये ", असे म्हणत ती गोल गोल डोलू लागली.

गुरुजींनी एका कागदावर काहीतरी लिहून त्यांच्या शिष्याला दिलं. ते वाचून शिष्य सुमित जवळ आला आणि त्याने त्याला काहीतरी सांगितलं. ते ऐकून त्याने दोन क्षण विचार केला आणि त्याच्या घरमालकाला फोन लावला.

"हॅलो "

"पलीकडून त्रासिक आवाज "

"हॅलो मला कळतंय की मी ऑड वेळेला फोन केलाय पण आधी सांगितल्या प्रमाणे प्रकरण गंभीर आहे त्यामुळे मी जे विचारतो त्याचे उत्तरं द्या ", सुमित

"पलीकडून आवाज "

"ही जोसेफाईन आणि अनिल कोण आहेत?", सुमित

काही क्षणानंतर पलीकडून उत्तर आलं

"जोसेफाईन आणि अनिल आता कुठे आहेत?", सुमित

पलीकडून जे उत्तर सुमित ला मिळालं ते ऐकून त्याचा चेहरा पांढरा फट्ट पडला. काही वेळ तो गप्प बसला आणि नंतर त्याने काही विचारले आणि उत्तर मिळाल्यावर फोन ठेवून दिला.

क्रमश :