कोण? - 13 Gajendra Kudmate द्वारा थरारक मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कोण? - 13

भाग – १३
मग ती मुलगी पुढे म्हणाली, “ त्यांनी माझे कागदपत्र त्यांचाकडे ठेवून घेतले आणि ते म्हणाले, कि दिवस सरत्या शेवटी जेव्हा सगळ्या मुली जातील तेव्हा आम्ही तुला आमचा निर्णय कळवू तोपर्यत तू बाहेर प्रतीक्षा कर आम्ही तुला जेव्हा आत बोलावू तेव्हा तू ये.” हे ऐकताच दुसरी सुंदर मुलगी मध्येच बोलली, “ अग त्यांनी माझे पण कागदपत्र ठेवून घेतले आणि मला सुद्धा सगळे गेल्यानंतर बोलावले आहे. शिवाय मला तर तुझाप्रमाणे प्रश्न विचारलेच त्यांनी मला त्यांचा समोर वॉक करण्यास सांगितले. सगळी वेळ ते फक्त आणि फक्त माझ्या शरीराकडे वेगळ्याच नजरेने बघत होते. त्यांचा त्या नजरी बघून मला तर फारच किळसवाने होत होते. मी तर बाई अशा निर्लज्ज आणि वाईट लोकांचा ऑफिस मध्ये कधीच काम करणार नाही. मी तर फक्त माझे कागदपत्र जे त्यांचाकडे अडकले आहेत ते घेण्यासाठी थांबली आहे. त्याचबरोबर मी माझ्या भावाला सुद्धा येथे बोलावले आहे जेणेकरून त्यांनी माझ्याशी काही गैर वर्तणूक करण्याचा प्रयत्न केला तर मी त्याला तुरंत बोलावणार. तसे मी त्याला माझ्या सोबतच आत केबिनमध्ये नेणार आणि त्यांचा तोंडावर सांगणार कि मला तुमचा ऑफिस मध्ये काम करायचे नाही. मी तर तुम्हाला सुद्धा हेच सांगणार कि तुम्ही तुमचे कागदपत्र सोबत नेऊ नका अन्यथा तुम्हाला सुद्धा माझ्यासारखा त्रास होईल.”

त्या मुलीचे बोलने ऐकून बाकी मुलींचे मन परिवर्तन झाले आणि त्या तशाच उठून निघून गेल्या. सावली मात्र तेथेच बसून राहिली. तेव्हा ती मुलगी सावलीला म्हणाली, “ मला वाटते आहे कि तुला फारच आवश्यकता आहे या कामाची. परंतु सावधान बाई हे लोक फार वाईट आहेत. यांचा बरोबर काम करतांना तुला फार सांभाळून रहावे लागेल काय जाने केव्हा आणि कसा तुझा घात करतील.” तेव्हा सावली उत्तरली, “ असे काही नाही ग मला अशा नालायक लोकांचा हाताखाली काम करण्याची कसलीही गरज किंवा लाचारी नाही आहे. मला फक्त त्यांचा भांडाफोड करायचा आहे. ते मला नाही ओळखत या आधी यांचापेक्षाही मोठ्या नराधमाला मी कोठडीत पाठवून चुकले आहे. तू म्हटल्याप्रमाणे असेच घडणार आहे, ते तिघेही कागदपत्र देण्याचा नावावर तुला आणि आपल्यासारख्या मुलींना सगळे गेल्यानंतर आत बोलावणार आहेत आणि आपल्या लाचारीचा लाभ उचलण्याचा प्रयत्न करणार आहेत. मला फक्त त्यांचाच भाषेत त्यांना चांगला धडा शिकवायचा आहे.” मग सावलीने तिचा सोबत आणलेला तिचा फोन काढला आणि त्यातील रेकॉर्डिंगचे ऑप्शन सगळ्यात वर आणून ठेवले जेणेकरून जेव्हा तिला आवश्यकता भासेल तेव्हा ते सुरु करून त्यांचा सगळ्या गोष्टी त्यांचा चित्राचा सोबत रेकॉर्ड करून घेईल.

उरलेल्या सगळ्या मुली गेलेल्या होत्या म्हणून आता सावलीचा क्रमांक होता. तर ती तेथे ऑफिस मध्ये जाऊन बसली. ते तिघे हि ऑफिसर पुन्हा तेथे परतले आणि पुन्हा इकडे तिकडे बघू लागले. ते बघून ते आश्चर्यचकित झाले कि सगळ्या मुली कुठे गेल्या. तेथे सावली एकटीच बसून दिसली तर ते तिला बघत बघत आत केबिनमध्ये शिरले. त्यांनी बेल वाजवून चपराश्याला बोलावले आणि मग तो चपराशी बाहेर येऊन सावलीला म्हणाला, “ चला आता तुमचा नंबर आहे तुम्हाला आत केबिनमध्ये साहेबांनी बोलावले आहे.” तेव्हा सावली आत जाण्यासाठी निघाली तोच चपराशी बोलला, “ तुम्ही तुमचा फोन येथे बाहेर ठेवून जा. आत मध्ये साक्षात्कार होत असतांना व्यत्यय निर्माण होऊ शकतो.” तेव्हा सावली म्हणाली, “ कुणाचा भरवशा वर मी फोन ठेवू, माझा फोन मी बंद करते आणि मग नेते.” तेव्हा तो चपराशी हट्ट करू लागला कि तुम्ही फोन बाहेर ठेवा. तेव्हा सावली उत्तरली, “ मला फोन आत मध्ये नेऊ देणार असाल तर मी आत जाते नाहीतर मी परत चालले आपल्या घरी.” तेव्हा चपराशी म्हणाला, “ मी साहेबांना विचारतो आणि येऊन सांगतो.” तो आत गेला आणि काही वेळाने विचारून बाहेर आला आणि म्हणाला, “ साहेब म्हणाले कि मी स्वतः तुमचा फोन बंद करून तुम्हाला आत पाठवतो.” तर त्याने सावलीचा फोन बंद केला आणि तिला आत पाठवले. सावलीने आधीच हुशारी केलेली होती तिचा फोन तिने टायमरवर टाकलेला होता म्हणून तो बंद केल्यानंतर आपोआप काही वेळाने सुरु होऊन त्यातील कॅमेरा सुरु होऊन सगळ काही रेकॉर्ड करेल.

तर सावली आत गेली तर त्या तिघांनी तिला आत येण्यास सांगितले. तेथे जाऊन त्या तिघांनी तिला त्यांचा मध्यभागी एका खुर्चीवर बसण्यास सांगितले. त्यांनी सावलीला तिचे नाव आणि शिक्षण विचारले आणि मग ते आपल्या मूळ औकातीवर आले. कामाविषयी विचारणे सोडून त्यांनी सावलीला तिचा खासगी गोष्टी विचारायला सुरवात केली. तितक्यात सावलीचा फोन हि आपोआप सुरु झाला होता आणि सगळ रेकॉर्ड करू लागला होता. त्यातील एकाने सावलीला विचारले, “ अहो तुम्ही जिमला वगैरे जाता काय?” तेव्हा सावलीने उलट प्रश्न केला, “ का बर कशावरून तुम्ही असे विचारले.” तेव्हा तो म्हणाला, “ काही नाही तूंची छाती फार मोठी दिसते आहे म्हणून म्हटले.” आणि ते तिघेही फक्त आणि फक्त सावलीचा छातीकडे एकटक बघत हसू लागले होते. सावली आता हळू हळू तापू लागली होती.
शेष पुढील भागात.........