सिद्धनाथ - 5 Sanjeev द्वारा भयपट गोष्टी मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सिद्धनाथ - 5

सिद्धनाथ ५ (भेट)
सिद्धनाथाच्या पावलांचा वेग आता वाढला होता , अजून थोडं चाललं की तो श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे पोहोचणार होता, ज्या ठिकाणी त्याची भेट नाथ संप्रदयाचे मुख्य प्रवर्तक आदिनाथ किंवा देवाधिदेव महादेव व त्या संप्रदायाचे गुरुपद भूषवणाऱ्या श्री गुरुदत्तात्रेयांची भेट होणार होती, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग म्हणजे ज्या ठिकाणी भगवान शंकर त्रिगुणात्मक दत्तात्रेय स्वरूपात विराजमान आहेत
त्र्यंबकेश्वर हे शहर भारत देशाच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यात नाशिक पासून साधारणत: १८ ते २२ km कि.मी. अंतरावर असलेल्या ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आहे. मुंबई पासून १६५ कि.मी.अंतरावर असून जाण्यसाठी कसारा घाटातून इगतपूरी मार्गे तसेच भिवंडी - वाडा मार्गे खोडाळ्यावरून जाता येते. जव्हार मार्गे सुद्धा एक रस्ता त्र्यंबकेश्वरास येऊन मिळतो हे शहर समुद्रसपाटीपासून ३००० फूट उंचीवर आहे.
"गोदावरीतटी, एका ठायी नांदताती, ब्रह्मा, विष्णू, महेश ।। वैकुंठचतुर्दशी, त्रिपुरीपौर्णिमा आणि महाशिवरात्रीस, भक्त लोटती, भावे भजती त्रिनेत्र ज्योतिर्लिंगास ।। त्र्यंबकेश्वर महती जगती वर्णावी किती... असा उल्लेख आढळतोच आणि ते खरं देखील आहे.
ब्रह्मगिरी पर्वताच्या निसर्गरम्य परिसरात वसलेले त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र असल्याने तेथे बाराही महिने भाविकांचा मोठा राबता असतो. श्रावण महिन्यात ही गर्दी अधिकच वाढते. श्रावणी सोमवारांना त्र्यंबकेश्वरी लक्षावधी भाविक हजेरी लावतात. श्रावण महिन्यातील पहिल्या तीन सोमवारी त्र्यंबकेश्वरास भाविकांची गर्दी वाढत जाते. ह्या क्षेत्रीच निवृत्तीनाथांची व गहनी नाथांच्या अश्या संजीवन समाध्या आहेत.
तीर्थ क्षेत्रातील स्मशाना ना महास्मशान अस म्हणतात, त्या पैकी एक त्र्यंबकेश्वर क्षेत्री आहे, ज्योतिर्लिंगातून सतत ऊर्जा ही दाही दिशांना प्रवाहित होत असते त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग ची ऊर्जा ही ४० मैल त्रिज्येच्या (radius) परिसरा पर्यंत पोहोचते तर काशीविश्वेश्वर ज्योतिर्लिंग काशी, ५०० km तर उज्जैन महाकाल ज्योतिर्लिंग हे time व space च्या मर्यादेच्या पलीकडे असल्याने तुम्ही कुठे का असेनात ती ऊर्जा तुम्हाला ग्रहण करता येते, अर्थात त्या करता साधने शिवाय दुसरा मार्ग म्हणजे त्या ज्योतिर्लिंगाच्या प्रत्यक्ष सान्निध्यात रहाणे, ही माहिती कुठल्या ग्रंथात सापडत नाही, महात्म्यांच्या कृपेने समजली ती share केली.
भारतीय आध्यत्मिक बाबतीत अतिशय समृद्ध आहेत, भारतात १०० पेक्षा जास्त (पाठ भेदा मुळे विविध संख्या आढळतात उदा० १०८ / १२० इत्याद) अशी ज्योतिर्लिंगे किंवा भगवान शंकराची मंदिर आहेत त्या पैकी १२ प्रमुख मानली जातात. शिवलिंग विशिष्ठ पद्धतीने स्थापन केल जात, त्याचा उद्देश अगदी सामन्यातील सामान्य माणूस मग तो आस्तिक असो किंवा नास्तिक त्या ठिकाणी आल्यावर त्याला शिवलिंगातून बाहेर पडणाऱ्या दैवी शक्ती चा लाभ होऊन त्याची सर्व प्रकारे उन्नती प्रगती व्हावी (ह्यात भौतिक व अध्यात्मिक समृद्धी आलीच)
राशी परत्वे राशी संबंधित ज्योतिर्लिंगाच्या साधना आपल्या ज्योतिष शास्त्रात आढळतात उदा0 मिथुन राशी महाकाल उज्जैन, कन्या भीमाशंकर पुण्या जवळ इ0 परंतु आता पर्यटन ह्या दृष्टीने हे सगळं बघितलं जात, अंधश्रद्धा इ0 लेबल त्यावर लावली जातात त्याला दैवगती पेक्षा दुसरं काय म्हणणार ! असो
सिद्धनाथ आता मंदिरात येऊन पोहोचला होता, भगवान देवाधिदेव महादेव ह्यांच्या दत्तात्रेय स्वरूपातील दर्शनामुळे त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले,
"आदेश", नकळत त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले
"गाभाऱ्यातून आलेला "आदेश", न तर त्याला भरून आलं, डोळ्यातून घळाघळा वाहणारे अश्रू आवरण कठीण होऊन बसले, बद्रिकेदार येथे साक्षात आदिनाथानी (भगवान शंकराने) आपल्या सद्गुरूंची (गोरक्षनाथ) तपस्या नीट व्हावी म्हणून प्रत्यक्ष होऊन केलेली धावपळ, भगवान दत्तात्रेय यांचं गिरनारहुन वारंवार आगमन, गोरक्षनाथ भगवान दत्तात्रेयांचे तर लाडाले होते, सगळे प्रसंग झरझर डोळ्या समोरून तरळून गेले.
दर्शन घेऊन सिद्धनाथान मंदिरात आसन जमवलं आणि क्षणात तो समाधीत लिन झाला.
शास्त्रीबुवा सिद्धनाथा ला नीट बघत होते, सकाळी स्वामी महाराजांनी दृष्टांत देऊन सांगितलेला बैरागी हाच असावा ह्याची खात्री त्यांना पटली होती, त्र्यंबकेश्वराच दर्शन घेऊन शास्त्रीबुवा सिध्दनाथा ची वाट बघत मंदिरात बसून राहिले.
शास्त्रीबुवाची ड्युटी सकाळची असे संध्याकाळी अगदी गरज पडली तर ते मंदिरात येत, शास्त्रीबुवा विषयी इतर गुरुजींना खूप आदर वाटे, वयाने अधिकाराने सगळ्याच गोष्टीत ते ज्येष्ठ होते येणारे जाणारे गुरूजी त्यांना नमस्कार करून येत जात.
"शास्त्रीबुवा आज संध्याकाळी..?"
बाळा शास्त्रींनी विचारलं
"काही विशेष नाही, सहज आलो होतो, म्हटलं पाच मिनिटे बसावं न निघावं.."
सिद्धनाथान जसे डोळे उघडले तसं शास्त्रीबुवा नी त्याला नमस्कार केला व म्हणाले
"महाराज, स्वामींनी सांगितल्या प्रमाणे मी आलोय.."
सिद्धनाथान त्यांना वरच्या वर धरलं होत नमस्कार करू दिला नव्हता
"शास्त्रीबुवा, अहो आदिनाथाच्या सेवेत सदैव रुजू असलेले हे हात नमस्कारा साठी नाहीत आशिर्वचना साठी आहेत, उलट मीच तुम्हाला नमस्कार करतो, आशीर्वाद द्या.."
शास्त्रीबुवा गोंधळले होते
"पण..."
"शास्त्रीबुवा, हे माझं मत नव्हे, ही माझ्या सद्गुरूंची आज्ञा आहे, स्वामींच्या इच्छे नुसार च सगळं होईल ", म्हणत सिद्धनाथान वाकून शास्त्रीबुवा ना नमस्कार केला.
शास्त्रीबुवा बरोबर सिद्धनाथ त्यांच्या घरी पोहोचला होता, जेवण झाली, सिद्धनाथाची व्यवस्था शास्त्रीबुवानी स्वतंत्र खोलीत केली होती,
"महाराज.., एक विचारायच होत"
"शास्त्रीबुवा", गुरुगोरक्षनाथांच्या कृपेने आम्ही सगळं जाणतो, दीक्षेची वाट बघत आहात तुम्ही, तुमचा सद्गुरूंचा शोध अजून संपला नाही असं तुम्हाला वाटतय, आणि गुरू भेटीची ओढ, पण प्रत्यक्ष आदिनाथांच्या सेवेत असल्याने सगळ्या गुरूंचे गुरू अश्या स्वामींची कृपा तुमच्यावर झालेली आहेच त्या मुळे आता कुठल्याही वेगळया दीक्षेची गरजच काय...?, आणि तुमच्या घराण्याला गोरक्षनाथ गहनीनाथ, निवृत्तीनाथ अशी गुरू परंपरा लाभलेली आहेच त्या मुळे अगदी निश्चिन्त असा अस म्हणत सिद्धनाथान शास्त्रीबुवा च्या छातीला स्पर्श केला,
शास्त्रीबुवा गोंधळले होते आता ते त्यांच्या शरीरा बाहेर होते, क्षणभर त्यांना भीती वाटली, आपण मेलो बहुतेक अस वाटून ते अधिकच घाबरले
"शास्त्रीबुवा चला", सिधनाथाच्या आवाजाने ते भानावर आले. हेच लिंगदेह प्रक्षेपण असावं हे आता त्यांना उमगलं होत, विदेही अवस्थेत सिद्धनाथ व शास्त्रीबुवा क्षणात निवृत्तीनाथांच्या संजीवन समाधीस्थानी आले
"अलख निरंजन ओम नमो आदेश गुरूजी को आदेश"
समाधीतून "अलख" शास्त्रीबुवा नि स्पष्ट ऐकला, दुसऱ्या क्षणी ते निवृत्तीनाथांच्या संजीवन समाधीच्या आत होते,
निवृत्तीनाथांनी डोळे उघडले, सस्मित प्रसन्न मुद्रेने त्याने सिद्धनाथा कडे बघून आशीर्वादात्मक अभय मुद्रा केली
"बाळा सिद्धनाथा.."
दोघांनी निवृत्तीनाथांना नमस्कार केला
"शास्त्रीबुवा सिद्धनाथान तुम्हाला योग्य ते उत्तर दिलेलं आहेच, प्रत्यक्ष दत्तात्रेय व भगवान आदिनाथ शिव ह्याच्या एकत्रित अश्या स्वरूपाची सेवा तुम्ही करत आहात त्या मुळे स्वामीकृपेच भाग्य तुम्हाला लाभलं, लवकरच स्वामीं प्रत्यक्ष होऊन तुम्हाला कृतार्थ करतील, तेव्हा निश्चिन्त असा, तुमचे खापरपणजोबा कृष्णराव आमचे लाडके शिष्य, गहनी नाथांनी नाथ सांप्रदाय भगवान श्रीकृष्ण भक्तीत किंवा पांडुरंगाच्या सेवेत प्रवाहित करावा हे जे कार्य आमच्यावर सोपवलं होत, त्यात त्यांनी खूप मोठं कार्य केले, स्वामी महाराज नेहमी
"नमामी शंकर शिवहर शंकर हे शंकर शंभो । हे गिरीजापते भवानी शंकर शिव शंकर शंभो।।" हा श्लोक म्हणत असत ती गूढ भाषा लोकांनी समजून घेतली नाही, आता हा श्लोक स्वामीभेट होई पर्यंत सदैव ओठी असावा", एवढं बोलून निवृत्तीनाथ थांबले.

**************
टीप:
पणजोबा - आजोबांचे किंवा आजीचे वडिल
खापर पणजोबा - पणजोबांचे किंवा पणजीचे वडिल
****************
दोघांनी परत एकदा नमस्कार केला, हळूहळू निवृत्तीनाथांचा देह निळसर प्रकाशात परावर्तित होत त्या स्थानी सगळीकडे निळसर प्रकाश पसरून राहिला होता, दुसऱ्या क्षणी दोघे संजीवन समाधीतून बाहेर पडले, निलांबरी पर्वतावर अंबिकेच दर्शन घेऊन क्षणात दोघे परतले होते, शास्त्रीबुवा नी डोळे उघडले तेव्हा ते स्वतः चा शरीरात होते, सिद्धनाथ मंद स्मितहास्य करत त्यांच्या कडे बघत होता
"शास्त्रीबुवा तुमचे खापरपणजोबा निवृत्तीनाथांचे अगदी लाडके शिष्य होते, त्या मुळे महायोगी निवृत्तीनाथ महाराजांचे आज्ञे नुसार मी तुम्हाला तिथे घेऊन गेलो आता पुढील कार्याची जबाबदारी स्वामींकडे आहे", इतकं बोलून सिद्धनाथ थांबला.
संजीवन समाधीत असणारे महात्मे हे प्रकाश स्वरूपात (light body) असतात, समाधी घेतल्यावर आपला देह योगसमर्थ्याने ते पंच तत्वात विलीन करून टाकतात, आणि light body स्वरूपात तिथे असतात, गरज पडल्यास ते सगुणात येतात. Light body विषयी भरपूर साहित्य उपलब्ध आहे ते जिज्ञासूंनी जरूर वाचावं. कृपया त्या वर प्रश्नउत्तर करू नये ही नम्र विनंती.
(महातम्यांच्या सहवासात १३- निवृत्तीनाथ) जरूर वाचा.

शास्त्रीबुवा आज खूप खुशीत होते खूप दिवसांनी कितीतरी दिवसा पासून असलेली एक अनामिक हुरहूर आता संपली होती, शास्त्रीबुवा सिद्धनाथा ला रहाण्याचा आग्रह करत होते पण
"शास्त्रीबुवा, मला पण आवडलं असत ह्या क्षेत्रात रहायला, पण माझ्या सद्गुरू गुरुगोरक्ष नाथांच्या आज्ञेनुसार मला अमरकंटक ला ज्या ठिकाणी नर्मदे चे उगमस्थान आहे तिथे जण गरजेचं आहे त्या मुळे फार तर उद्याचे दिवस मी राहीन, परवा मात्र ब्रम्हमुहूर्ता वर मी निघेन"
दुसऱ्या दिवशी सिद्धनाथान शास्त्रीबुवा च्या साधना मार्गातील शंका, पतंजली ची योगसुत्रे, भगवान गोरक्षनाथ लिखित गोरक्ष शतक इ0 विषयी काही गुह्य गोष्टी सांगितल्या व त्या विषयी च्या शंका च निवारण केलं होतं, सिद्धनाथा मुळे त्या वाड्याला एक आगळी वेगळी शोभा आली होती. बुवांच्या नातवांची सिद्धनाथा शी चांगलीच दोस्ती झाली होती, ते त्याला अरे तुरे म्हणत, शास्त्रीबुवा एकदोनदा रागावले देखील!!!
"शास्त्रीबुवा अहो त्यांना नका रागावू, त्यांचा भाव शुद्ध आणि निर्मळ असतो मोठ्या माणसा पेक्षा",म्हणत सिद्धनाथान त्यांची समजूत घातली होती

निवृत्तीनाथ महाराजांच्या आज्ञेनुसार शास्त्रीबुवाना सिद्धनाथान, लिंगदेह प्रक्षेपणाचा अनुभव तर आणून दिला होताच आणि त्या अनुभवातूनच लिंगदेह प्रक्षेपण पण शिकवलं होत.
सिद्धनाथ च्या सान्निध्यात दिवस कसा संपला हे कळलं च नाही, ब्रम्हमुहूर्तावर सिद्धनाथान शास्त्रीबुवा बरोबर त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगा ची अर्चना करून शास्त्रीबुवा ना नमस्कार करून त्र्यंबकेश्वर सोडलं. बुवांना गलबलून आलं, मोठ्या कष्टाने त्यानी अश्रू आवरले.
त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगा भोवती निळसर रंगाची वर्तुळ बघून त्यांना एकदम कालच्या निवृत्तीनाथ भेटीची आठवण झाली तिथे ही हाच निळसर प्रकाश होता, म्हणजे देवाधिदेव महादेव ह्यांनी नवनाथ पोथीत सांगितल्या प्रमाणे निवृत्तीनाथ रूपात मी त्र्यंबकेश्वर सन्निध समधीस्थ होईन हे आपलं वचन सत्य केलं होतं.
नवनाथ पोथी त अनेक रहस्य व मंत्र दडलेले आहेत, उदा० द्यायचं झालं तर प्रत्येक युगात त्याच गोष्टींची परत परत कशी पुनरावृत्ती होते हे मच्छिन्द्र व मारुती च्या संवादात आहे, वीरभद्रा सारख्या दैवी शक्तींचा उल्लेख पण पोथी वाचणाऱ्या च मन भरकटत असत मग ह्या बारीक बारीक गोष्टी उमजत नाहीत...
शास्त्रीबुवाचे विचार धावत होते, म्हणजे ज्यांची आपण इतके दिवस अर्चना करत होतो त्या देवाधिदेव महादेवाचं दर्शन आपल्याला प्रत्यक्ष होऊन व त्यांनी सूचक "नमामी शंकर..." सुचवून सुद्धा आपल्या त्या क्षणी लक्षात कस आलं नाही हे आठवून एकदम भगवद्गीतेतील
भगवान श्रीकृष्णा च "मम माया दुरत्तत्या..." हे वचन आठवल्या शिवाय राहील नाही. मंदिराच्या पायऱ्या उतरून ते मंदिराच्या बाहेर आले, दूरवर क्षणभर दिसणारी सिद्धनाथा ची पाठमोरी आकृती रस्त्यावरील रहदारी त दिसेनाशी झाली.
"अलख"

अविनाश
@स्वामी@