सिद्धनाथ - 4 Sanjeev द्वारा थरारक मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सिद्धनाथ - 4

सिद्धनाथ ४ (दानव)
पंचगंगेंच्या घाटावर स्नान करून सिद्धनाथ अंबाबाईच्या मंदिराच्या दिशेने निघाला तेव्हा पहाटेचे साडेतीन वाजलेले होते. "शिवगोरक्ष शिवगोरक्ष ....." जप करत सिद्धनाथ झपाट्यानं चालत होता, जवळ जवळ दीड ते दोन km अंतर होत. हवेत कमालीचा गारठा होता. अगदी पहाटेची वेळ असल्याने रस्त्यावर वर्दळ नव्हतीच. मंदिरात पोहेचतो पहाटेचे चार वाजलेले होते.
सिध्दनाथाने आंबाबाई चे दर्शन घेतले.
"या चंडी मधुकैटभादि दलिनी या महिशोन्मुलिनी ...." . सिध्दनाथाच्या तोंडून उत्स्फूर्त पणे देवीभागवतातील मार्कण्डेय ऋषींनी रचलेले जगदंबिकेचे स्तुतीपर श्लोक बाहेर पडले. जगदंबेच्या त्या अलौकिक स्वरूपाकडे बघता बघता त्याच देहभान हरपलं होत.
"आई", इतकेच शब्द त्याच्या तोंडून बाहेर पडले..... लोकांची वर्दळ आता वाढायला सुरुवात झाली होती,सिद्धनाथां न देवीला भानावर येत नमस्कार केला, गिरनार क्षेत्रात काली खप्पर (संदर्भ सिद्धनाथ 2) येथे साधने ची सांगता करताना अचानक एक स्वामी समर्थ महाराज तिथे प्रकट झाले होते, गौर गुलाबी अंगकांती असणारे स्वामी अत्यंत तेजस्वी दिसत होते.
"अलख....", खणखणीत आवाजात स्वामींनी अलख जागवला.
" स्वामी महाराज.. तुम्ही.!!!!.", सिध्दनाथाने स्वामींच्या पायावर डोकं ठेवलं,स्वामींनी प्रेमान उठवून त्याला आलिंगन दिल आणि मग त्याच्या हातात हिरे जडीत कर्णभूषणे दिली.
"सिद्धनाथा.. कोल्हापुरास आंबाबाई स भेटून हे तिला हे द्यावेत .....!!! , आणि मग ती सांगेल त्या प्रमाणे करावे." ,
इतकं बोलून स्वामी अदृश्य झाले, उदा चा मंद सुंगध दरवळत राहिला
"जशी आपली आज्ञा स्वामी ..!"
सिद्धनाथ मंदिराच्या आवारात एका कट्ट्या वेळ बसला होता. गिरनार च्या त्या रम्य आठवणी, माते च तिथे झालेलं दर्शन..... अचानक नऊवारी हिरवे जर्द लुगडं नेसलेली कपाळा वर रुपया एवढं ठसठसीत कुंकू, हातात हिरव्या बांगड्या, गळ्यात एक सौभाग्यलंकार तर पायात पैंजण अश्या स्वरूपात एक अतिशय रूपवान स्त्री सिद्धनाथा समोर मंद स्मितहास्य करत उभी होती!!!!!!.
"आई...!", सिध्दनाथा ला भरून आलं. सिध्दनाथाने जगदंबेच्या पायावर डोकं ठेवलं.
"माते...हे स्वामी महाराजांनी तुझ्या करता दिल आहे", म्हणत स्वामींनी दिलेली आभूषणे देवीच्या हातात ठेवली.
"सिद्धनाथा पंचगंगेच्या नदी पात्रात तू गडबड बघितली असशील च... पूर्वी देखील हा प्रयत्न झाला होता तेव्हा मी स्वतः च हस्तक्षेप करून ते प्रकरण निस्तरलं होत पण आता नवरात्री जवळ येत चाललं आहे. मला मंदिरात थांबणं गरजेचं आहे...."
"माते , तुझ्या इचछेनुसार होईल आशीर्वाद दे म्हणजे झालं!!!"
देवी न अभय मुद्रेने सिध्दनाथाला आशीर्वाद देत, सिध्दनाथाच्या हातात एक अंगुलिका (अंगठी) ठेवली आणि जागेवरच अदृश्य झाली.
दूर वरून महेश पुजारी निरखून सिद्धनाथा कडे बघत होता. इतक्या पहाटे आलेली ह्या स्त्री च बैराग्या जवळ काय काम असावं असा विचार त्याचा मनात आला. खरं तर तो मंदिराच्या गाभारया च्या दिशेने निघालेला होता.
"बाळू....!, गुरुजींना सांग मी ५ १० मिनिटात आलो ...", असं त्यानं बाळू नावाच्या एका मंदिरात काम करणाऱ्या एका ट्रस्ट च्या माणसाला सांगितलं आणि तो सिद्धनाथा कडे निघाला.
पण तिथे नऊवारी लुगडं नेसलेली स्त्री पण नव्हती आणि नाथपंथी बैरागी पण नव्हता. महेश न ज्या ठिकाणी सिद्धनाथ बसलेला त्यानं पाहिलं होत तिथं जाऊन बघितलं पण कोणीच नव्हतं , महेश ला आश्चर्य वाटलं, पण तो भास नक्कीच नव्हता. सिद्धनाथ मंदिरातून बाहेर पडला होता. ज्योतिबा च्या डोंगराची वाट त्यानं धरली होती साधारणा १५ km तरी त्याला चालावं लागणार होत, अर्थात सिध्दनाथाला अश्या गोष्टींची सवय होती
ज्योतिबास ज्योतिर्लिंग, केदारलिंग, रवळनाथ, सौदागर अशा विविध नावांनीही उल्लेखतात. कोल्हापूरच्या वायव्येस १४.४८ किलोमीटर अंतरावर ज्योतिबाचा डोंगर आहे. या डोंगरावर ज्योतिबाचे मंदिर आहे. ज्योतिबाला केदारेश्वर-केदारलिंग असेही म्हणतात. सपाट प्रदेशात एक हजार फूट उंचीवर, शंखाकृती, हत्तीच्या ‘सोंडे’सारख्या पसरलेल्या ज्योतिबाच्याडोंगराला वाडी रत्नागिरी म्हणतात. ज्योतिबा हे दैवत शिव व सूर्याचे रूप मानण्यात येते. ज्योतिबासंदर्भात एक कथा आहे. प्राचीन काळात कोल्हापूर परिसरात दैत्यांनी हाहाकार माजवला होता. येथील जनता त्यांच्या छळाला कंटाळून गेली होती. कोल्हापूरच्या अंबाबाईलाही या दैत्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली. या राक्षसांच्या छळापासून लोकांची मुक्तता करण्याकरिता अंबाबाईने तपश्चर्या करून केदारेश्वराला या दैत्याचा संहार करण्याची विनंती केली. केदारेश्वराने राक्षसांशी युद्ध करून प्रमुख राक्षस रत्नासुराचा वध या डोंगरावर केला म्हणून या डोंगराचे नाव वाडी रत्नागिरी पडले. रत्नासुराच्या वधानंतर अंबाबाईने अशी प्रार्थना केली, की ‘पुन्हा असे संकट येऊ नये म्हणून तुझी दृष्टी सदोदित माझ्यावर असू दे’ म्हणून अंबाबाईच्या रक्षणाकरिता ज्योतिबाचे मंदिर कोल्हापूरच्या दिशेला दक्षिणाभिमुख आहे.ज्योतिबाची मूर्ती काळ्या घोटीव पाषाणात घडविलेल्या या चर्तुर्भुज मूर्तीच्या हातात खड्ग, पानपात्र, डमरू व त्रिशूळ आहे. शेजारीच ज्योतिबाचे उपवाहन शेष आहे. ज्योतिबाचा शरीररक्षक काळभैरव बाहेरच्या बाजूस असून तेथे मूळ ज्योत तेवत असते. ज्योतिबाचे दर्शन घेण्याअगोदर काळभैरव व ज्योतीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. ज्योतिबाची भार्या यमाई हिची मूर्ती दगडाची असून या मूर्तीला शेंदूर लेपलेला असतो. येथील वाडी रत्नागिरी गावात पुजारी व दुकानदारांची घरे आहेत. नाथपंथात ह्या स्थानाला अत्यंत महत्व आहे हे फारच थोड्या लोकांना माहिती असेल.
सिध्दनाथाने मंदिरात जाऊन ज्योतिबा च दर्शन घेतलं. आणि कालभैरव स्वामी समोर आसन जमवलं, क्षणात त्रिकालदर्शी सिध्दनाथाची समाधी लागली, कालभैरव स्वामींवर देहरक्षणाची कामगिरी सोपवून सिध्दनाथाचा विदेही आत्मा पंचगंगे च्या घाटा च्या दिशेने निघाला. पंचगंगा नदी पात्रात अनेक मंदिर दिसतात, नुसती मंदिर आहेत आत देवी किंवा देवता नाहीत अश्याच एका मंदिरात ते चार बैरागी बसलेले होते , त्यात एक डॉ तारकेश्वर होता समोर हवनकुंड होत,त्यात आहुती पडत होत्या "ल्कर्ह्रीं टं ठं डं ढं णं क्षं भस्मासुराय स्वाहा, तारकासुराय स्वाहा..... असुर वेदातील मंत्रोच्चार...." सिद्धनाथा ला आश्चर्य वाटलं.
"सिध्दनाथा.... अरे येत्या काळात तुला खूप विलिक्षण गोष्टी बघायला मिळतील...", हे आपल्या गुरु गोरक्षनाथांचं वाक्य त्याला आठवल्या शिवाय राहील नाही .
वीरभद्राशी युद्ध करताना आपल्या गुरु ने सगळे दानव जिवंत केले पण मग भगवान विष्णू नि समजूत घातल्यावर उत्पन्न होणारे दानव परत नाहीसे केले ही कथा त्याला आठवली, मालूकवी ज्यांनि नवनाथ भक्तिसार ग्रंथात ह्याचा उल्लेख केला त्या मालू कवींस निश्चित च नाथांच वरदान असावं त्या शिवाय असली अलौकिक प्रासादिक पोथी लिहीण केवळ अशक्य.
आपलं जस विश्व आहे तशी अनेक विश्वे ही आपल्या पृथ्वीवर आहेत ज्याला parallel universe म्हणतात, जी वेगळ्या frequencies वर स्पंदन पावत असतात जास्त माहिती करता अभिनवगुप्त ह्यांनी लिहलेला स्पंदकारिका हा ग्रँथ जरूर वाचावा.
त्या मुळे बऱ्याच वेळेस प्रश्न पडतो की सगळी पृथ्वी हादरली, समुद्र आटला, पर्वतांनी आपली जागा सोडली हे नक्की कुठे घडलं असावं कारण नाथाचा कालावधी इस पूर्व ७००० वर्षा पासून ते १० व्या शतका पर्यंत दाखवला जातो तर त्याच उत्तर वरील parallel जगतात दडलेलं आहे, पण हे सांगणारे भेटत नाही, मग श्रद्धा डळमळीत होते, कोणी प्रश्न केले तर जवळ उत्तर नसतात. मात्र समांतर जगतातील देवाण घेवाण ही चालू असतेच.
डॉ तारकेश्वर ह्याचा तंत्र मंत्राचा अभ्यास दांडगा होता, नवनाथ पोथीतील गुरू गोरक्षनाथांची हिच गोष्ट वाचून त्यानं lower astral शी connectivity असुरवेदा ने करता येते हे ओळखून हा प्रयोग मांडला होता. कारण सगळं जग हे जर फक्त vibrations of different frequencies असेल व पूर्वीचे दानव गोरक्षनाथ जिवंत करू शकला तर आपल्याला पण शक्य आहे, त्या करता रावण संहिता , पिशाचवेद , असुरवेद आदी ग्रंथ तर श्रीलंकेतून काही दुर्मिळ हस्तलिखित पोथ्या त्यानं आणून हा खळे मांडला होता, उजाड मंदिर त्याला पंच गंगेच्या पात्रात सापडली होतीच ज्यात भग्न शिवलिंग देखील मिळाल होत, भग्न वास्तूत नकारात्मक ऊर्जा ओढली जाते विशेषतः अश्या वस्तूत ती मोठ्या प्रमाणात store करता येते, त्या मुळे त्यानं हा खळे इथे मांडला होता.
सिद्धनाथ क्षणात आपल्या देहात परत आला होता, कालभैरव स्वामींच्या ठिकाणची विभूती घेऊन त्यांच रुद्र स्वरूपात ध्यान करत तो पंचगंगेच्या दिशेने निघाला. पोहोचे पर्यंत संध्याकाळ होत आली होती, घाटा वर वर्दळ अशी नव्हतीच, सिध्दनाथाने घाटावर पोहोचल्या पोहोचल्या अंबिकेने दिलेली अंगठी करंगळीत धारण केली, फरपूर्वी सत्ययुगाच्या देखील आधी, भंडासूराचा वध करताना करांगुली च्या नखातून अंबिकेने विष्णूच्या दहा हि अवताराना उत्पन्न करून भंडासूरा ने निर्माण केलेलं दानव नष्ट केले होते. त्याच प्रतीक म्हणून अंबिकेने ती अंगठी सिध्दनाथा ला दिली होती. सिध्दनाथा न २२ अक्षरी दक्षिणकाली चा मंत्र जो त्याने काली खप्पर (संदर्भ सिद्धनाथ 2) येथे सदगुरुंच्या आज्ञेने सिद्ध केला होता त्याच पल्लव लावत त्रैलोक्य मोहन कवचाचा पाठ करायला सुरुवात केली. हवन करणाऱ्या त थोडी गडबड झाली होती मंदिर नदीतून वाहत जातंय , मंदिरात पाणी भरतय , मंदिरात सुसरी सरपटत आत येत आहेत मन विचलित करणारी दृश्य, मंदिर, होडीत बसल्यावर होडी ने डोलाव तस डोलत आहे असा भास वाढत चालला होता..... अचानक हवन कुंडातून उदयाला आलेली भीषण आकृती क्षणभर हवनकुंडावर स्थिर झाली अन सिद्धनाथा वर झेपावली, हवन करणार्यांपैकी तारकेश्वर जाम खुश होता एक दैत्य तर उत्पन्न झाला होता.....!!!!!!, पण ह्या कार्यात विघ्न कोणी आणल ह्याचा शोध हवन मधेच सोडून शोध घेणं शक्य नव्हत.
सिद्धनाथां न त्याच्या दिशेने येणारा असुर बघितला होता त्याच दक्षिणकाली मंत्राचे संपुट लावत, महाकाल भैरव ह्यांच स्मरण करत त्यानं कालीप्रत्यांगीरेचा भीषण आघात त्या असुरा सकट त्या चौघांवर केला हवन कुंडातील अग्नीच्या ज्वाळा काळपट लालसर झाल्या होत्या, तारकेश्वराच्या हृदयात न एक असह्य कळ आली. प्रतिघात करायची संधी त्याला मिळाली नव्हती. उरलेले तिघे आधीच ह्या विविध भास दृश्य ह्यांनी घाबरलेले होतेच, परत फिरलेला असुरां न त्या तिघांना आपल्या कवेत घेत मोठा हुंकार भरत हवन कुंडात उडी मारली , हवना चा अग्नी एकदम लखकन् वीज चमकावी तसा प्रकाशमान झाला, शिवाजी पूला वरून जाणाऱ्या येणार्यांना क्षणभर पंचगंगेचं पात्र प्रकाशान उजळललेल दिसलं,
सिध्दनाथाच्या हातातील अंगठी सुद्धा नाहीशी झाली होती. सिध्दनाथान एकदा शोधक नजरेनं पात्र बघितलं पण सर्वत्र शांतता होती पौर्णिमेच्या चंद्र बिंबात ह्या घटनेचा साक्षी असलेला जवळ जवळ १४० वर्ष जुना शिवाजीपुलावरन हलक्या वाहनांची वाहतूक नेहमीच्या प्रमाणे चालू होतीच. आंबाबाई च्या मंदिरातील भगवती ची मूर्ती आज नेहमी पेक्षा जास्तच सुंदर व प्रसन्न दिसते आहे हे महेश पुजारी व नेहमीच्या दर्शनार्थी लोकांना वाटत राहील.
"अलख निरंजन....."
अविनाश
@स्वामी@