"अलख निरंजन"
अलख जागवत, त्यानं मारुती च छोटस मंदिर तिथंच पडलेल्या झाडून, झाडून काढलं, वडाच्या पारावरील वाळकी पान, धूळ, कचरा, फुटक्या नारळाच्या करवंट्या, सगळंच साफ केलं , नदीवर स्वच्छ हातपाय धुतले, झोळीतून लोटा काढला पाण्यानं भरला त्या छोट्याश्या मारुतीला मोठ्या प्रेमान स्नान घातलं
"अतुलितबलधामं हेमशैलाभ देहं.."
बैराग्याच्या खणखणीत आवाजातील मंत्रांनी वातावरणातील मळभ एकदम नाहीस झालं होतं, का कुणास ठाऊक अलका ला वाटलं कदाचित ह्याची काहीतरी मदत होऊ शकेल
सिध्दनाथान तिथेच मारुती समोर आसन मांडल, डोळे मिटले
"अलख", खणखणीत आवाजात अलख जागवत सिद्धनाथ समाधीत लिन झाला,
तिन्हीसांजा होत आल्या होत्या, सोडियम व्हेपर चे उदासीन पिवळा प्रकाश टाकणारे दिवे वातावरणात अजून च भकास पणा आणत होते,
"बघितलास का तो जोगी.?",
"बघितला....", आशाळभूत नजरेने सिध्दनाथला न्याहळत लासवट म्हणाली
सिद्ध नाथाचा विदेही आत्मा एक क्षणभर मारुतीच्या पारावर स्थिर झाला, पिशाच सृष्टी त्याला काही नवीन नव्हती, ह्याच्या पेक्षा विचित्र सृष्टी त्याने अनेकदा अनुभवली होती, स्मशानाकडे नजर फेकत तो गावाच्या दिशेने निघाला.
भुऱ्या, समोर ती दोघे बसली होती, तोंडानं काहीतरी पुटपुटत भुऱ्या ची पूजेची तयारी पूर्ण होत आली होती, अमावस्या, त्यात शनिवार, त्यात आश्लेषा नक्षत्र सगळं जुळून आल होत.
पारो ला लागोपाठ मुलीचं झाल्या होत्या , सासर चे वैतागलेले होते, पारो चा नवरा महादबा पण वैतागला होता, खर तर ह्यात तिची तरी काय चूक होती, पण कोणी समजून घेण्याचा अवस्थेत नव्हतं.
पारो दिसायला देखणी होती, दोन पोरींची आई असून सुद्धा पोरगेलशीच वाटे, चांगली गच्च भरलेली होती, भुऱ्या च्या खूप दिवसापासून ती नजरेत होती.
भुऱ्याला गावातले, जवळच भागातले लोक भगत म्हणून म्हणूच ओळखायचे, तो कधी काय करील ह्याचा नेम नसायचा, शक्य तो गावातले लोक त्याच्या पासून लांब रहात, अगदीच गाठ पडली, भुऱ्या न हटकल तर राम राम घालत अन सटकत.
गावातल्या गरीब लोकांना भुऱ्या फुकट औषध, झाडपाला, जडिबुटी द्यायचा त्याचा गुण तर हमखास येई पण दुसरी कडे हे विचित्र उद्योग पण चालू असायचे, पैसा, नशा आणि बाई चा भुऱ्याला नाद होता त्या करता वाटेल त्या थराला जायची त्याची तयारी असे, पोहोचलेला मांत्रिक होता तो.
शेवटी साधना चांगली असो की वाईट, देवतांची असो की भूतप्रेतादी दैवतांची कष्ट तर करावेच लागतात भुऱ्या न ह्या करता अतोनात कष्ट केले होते, बाहेर गावाहून लोक येऊन त्याच्या कडून काम करून घेत, त्यात कधी कधी राजकारणी माणस पण दिसत अर्थात भुऱ्या चा संबंध फक्त पैसा, स्त्री, दारू, मटण ह्यांच्याशी होता, ज्यांच्यावर प्रयोग केले ती माणस सज्जन होती की गरीब होती, त्यांची बाजू बरोबर होती की चूक, एखाद्या निरपराध माणूस तर आपल्या प्रयोगात बळी जात नाही ना इ0 गोष्टींशी त्याला काही घेणेदेणे नव्हतं
त्या मुळे चांगल्या वाईट प्रवृत्तीच्या लोकांन नटलेल्या ह्या जगात दुष्टप्रवृत्ती चे लोक भुऱ्या च्या संपर्कात असायचे, त्याला पैसा, दारू, मटण, बाई पुरवायचे, शेवटी प्रयोगाच्या तिव्रतेवर त्याची किंमत ठरायची, भाऊबंदकी, शेतजमिनीची वाटणी, इस्टेट, जुन वैर, द्वेष, लफडी, इतरांचं चांगलं न बघवणे इ0 अनेक वृत्तीतुन लोक त्याच्या हातून काहीतरी उलट सुलट प्रयोग करून घाययचे, लतामावशी ही त्या पैकीच एक, तीनच पारो च्या सासु सासरे यांच्या डोक्यात भरवलं भुऱ्या न काही केलं तर नक्कीच मुलगा होईल
भुऱ्या संधीची वाट च बघत होता, लतामावशी ला त्यानं ह्या कामाचे बरेच पैसे दिले होते, लतामावशी म्हातारी होती, देह थकत चालला होता तरी तिचे रिकामे उद्योग चालू असायचे, गावातल्या सगळ्या बातम्या असायच्या, नवरा रग्गड पैसा मागे ठेवून मेलेला. कोणी म्हणायचं तिनेच मारला, भुऱ्याशी तिचे अनैतिक संबंध पूर्वी होते एक ना अनेक गोष्टी, खर खोट कोणालाच माहिती नव्हत.
भुऱ्या न शेंदूर फसलेला एक दगड त्याच्या पिशवीतून काढला, तोंडानं काहीतरी म्हणणं चालू च होत, दोघां कडून पूजा करवून घेतली, भुऱ्या न स्वतः च्या हाताने आरवणार कोंबड कापून त्या सेंद्रिय देवते पुढे बळी दिला होता, क्षणात सगळा दगड लाल भडक रक्तानं भरून गेला होता, पारो ला बघूनच कसंस झालं होतं, सोबत आणलेली दारू ची बाटली त्यानं त्या दगडा वर रिकामी केली.
"महादबा ह्याची पारो च्या हातून रोज पूजा करून करायची, अमावस्येला कोंबडा कपायचा, दारू व्हायची, देशी पण चालेल मग बघ सहा महिन्यात पोरगा होतो की नाही.."
भुऱ्या न एक पैसा ही घेतला नव्हता, त्याच काम झालं होतं, आता पारो फक्त त्याचीच होणार होती, थैली पाठीवर टाकत तो बाहेर पडला होता, नेहमी सोबत असणारे चेले चपाटे तो कधी बाहेर पडतो त्याची वाट च बघत होते
सिध्दनाथा चा विदेही आत्मा हे सगळं बघत होता, सिद्धनाथाच अस्तित्व भुऱ्या ला लगेच जाणवलं होत.
"बाल्या...गावात कोणी नवीन आलं काय ह्या एकदोन दिवसात..?"
"एक बैरागी आहे, पण तो गावच्या बाहेर उतरलाय"
भुऱ्या त्याच्या झोपडी कडे निघाला. चेले चपाटे बरोबर होतेच.
त्रिकालदर्शी सिद्धनाथान डोळे उघडले, खर तर तो गिरनार कडे निघालेला होता, कधी एकदा गिरनार क्षेत्र गाठतो आणि आपल्या गुरू गोरक्ष नाथांना भेटतो अस खर तर त्याला झालेलं, खर तर ह्या गावात मुक्काम करण्याचा त्यांचा विचार असा नव्हताच, थोडी विश्रांती घेऊन तो पुढं निघणार होता, पण आता पारो करता त्याला थांबावं लागणार होतं, त्या निष्पाप जीवा करता थांबण्या शिवाय गत्यंतर नव्हतं. एव्हाना गावात पारावर कोणी तरी बैरागी आला म्हणून लोक कुतूहलाने बघून गेले होते, एक दोघे सिद्धनाथ कधी डोळे उघडतो ह्याची वाट पहात थांबले असावेत.
पारो ला जरा विचित्र वाटत होतं, कस तरी तीन संध्याकाळ ची जेवण, भांडी, इतर अवरसावर, केली, सहज तिची नजर अंगणातल्या त्या पूजलेल्या दगडा कडे गेली, त्या रक्तानं भरलेल्या दगडाची आठवण होऊन तिला कसंस च झालं होतं.
कधी तरी तिला जाग आली, सगळे गाढ झोपलेले होते तर पारो च्या शरीरात वासनेचा डोंब उसळला होता, तीन शेजारी गाढ झोपलेल्या महादबा कडे बघितलं, त्याच्या जवळ सरकली, पण शेतीच्या कामान तो इतका थकला होता की पारो न विविध प्रकारे त्याला जाग करून पहायचा केलेला प्रयत्न व्यर्थ होता
हळू हळू पारो ची वासना भडकत चालली होती, बिछान्यात तळमळणारी पारो अचानक उठून बसली, घराच्या बाहेर पडली, केस मोकळे, पदराच भान नव्हतं, झप झप पावलं टाकत ती भुऱ्या च्या झोपडी च्या दिशेने कोणी तरी ओढत न्यावं तशी निघाली होती,
चंद्र प्रकाशात दूरवर भुरया ची झोपडी दिसायला लागली होती, दारू चे घोट घेत भुऱ्या चंपा ची वाट च बघत होता, खूप दिवसाची चंपाची मला झाड हवं म्हणून चाललेली कटकट त्यानं मिटवली होतीच आणि पारो पण त्या निमित्ताने गवसली होती.
"अलख", वरवरणात उमटलेला ध्वनी, झपझप चालणारी पारो एकदम जमिनीला पाय चिकटल्या गत उभी राहिली
"सोड जोगड्या"
"चंपा तूच ह्या झाडाला सोड", सिद्धनाथ गरजला
"तू कोण मला सांगणार...?","तूच ये माझ्या संग....मस्तीला", अंगाला अळोखेपिळोखे देत चंपा उर्फ झपाटलेली पारो म्हणाली
"ओम नमो आSदेश, गुरुजी को आSदेश...ओम नमो हनुमान वर्ष बारह का जवान, हात मे लड्.डू..मुख मे पान, आव बाबा हनुमान.... ... ......"
सिद्धनाथच मारुतीरायाच आवाहन उकळत पाणी कोणी तरी आपल्या अंगावर ओततय अस क्षणभर चंपा ला वाटलं तीन पारो चा देह सोडला. भुऱ्या दचकून उठला होता, हातातला दारूचा ग्लास खाली पडला होता, घरात जाऊन त्यानं धुनी पेटवली होती, गावात आलेल्या जोगड्या च तो बंधन करणार होता
पारो भानावर आली, घरातून आपण एकदम इथे रस्त्यावर कस आलो तिला काही उमजत नव्हतं, अचानक समोर सिद्धनाथा ला बघून ती चांगलीच घाबरली होती.
"माई, काळजी करू नकोस", झोळीतून विभूती काढून त्यानं पारो च्या हातात दिली, "घरभर टाक, आणि त्या भुऱ्या ने मांडलेल्या देवस्की वर टाकुन ते सगळं नदीत फेकून दे"
"या वेळेस नक्की तुला मुलगा होईल", म्हणत सिद्धनाथ एकदम नाहीसा झाला, भाबवलेली पारो घरी आली होती, तो पर्यंत घरातले सगळे उठून बसले होते, पारो न जे झालं ते सांगितलं होतं..सिध्दनाथाच्या विभूतीत असीम सामर्थ्य होत, समोरच्या माणसाची मनोरचना बदलून टाकण्याची शक्ती होती.
पारो च्या शरीरातून बाहेर पडलेल्या चंपा ला , त्या क्षणी तिला जाणवलं आपण भुऱ्या च्या बंधनातून मुक्त झालो आहोत, ती मुक्त झाली होती, सिध्दनाथला वंदन करून तिचा वासनादेह हवेत विरघळून गेला, पुढील प्रवासा साठी.
भुऱ्या च हवन चालू होतं, हातात बाहुली घेऊन मंत्र म्हणत त्यानं बाभळी चा काटा त्या बाहुलीच्या छातीत खुपसला होता, जिवाच्या आकांताने आता ओरडण्याचा आवाज ऐकू येईल असं त्याला वाटलं होतं पण घडलं भलतंच होत सिद्धनाथ त्याच्या घराच्या दरवाज्यात उभा होता,
"भुऱ्या, अजून ही वेळ गेलेली नाही, ही विद्या सोड...."
भुऱ्या न एकदा तुच्छ पणे सिद्धनाथकडे बघत, स्मशान जागरण करण्या करता मंत्र म्हणायला सुरुवात केली पण .....
"अलख", सिद्धनाथान अलख जागविला होता, गुरू गोरक्ष नाथांच स्मरण करत, त्यांना आवाहन केलं होतं
भुऱ्या ची धुनी विझली होती, मंत्र आठवत नव्हते, सगळी मंत्र शक्ती एका क्षणात आपल्याला सोडून गेली एवढं त्याला समजलं होत, भुऱ्या न बांधून ठेवलेले बद्ध जीव मोकळे झाले होते, भुऱ्या च्या मांत्रिक तुरुंगातून सुटका झालेले कैदी, आता सूडाच्या भावनेने पेटून भुऱ्या वर च कोसळले होते, घशातून चित्र विचित्र आवाज करत डोळे फिरवत भुऱ्या जमिनीवर कोसळला होता.
एव्हाना पहाट झाली होती, काहीच झालं नाही अश्या थाटात सिद्धनाथन सगळं आवरलं, मारुती ला अभिषेक केला, अलकाच्या वासना देहाची त्याला कल्पना होती, दोनक्षण मारुतीराया समोर आसन घालून ध्यानस्थ सिद्धनाथान अलका शी संपर्क साधला
"माई, जीवहत्या करण बरोबर नाही"
"महाराज, तुम्ही सिद्ध, तुम्हाला सहज शक्य आहे"
"चुकलं, महाराज, पण मला सोडवा ह्यातून"
"माई आत्महत्या, तर घडून गेली, आणि असा ही २ वर्षांनी दुर्दैवाने अपघात योगात तुझा मृत्यू होताच, आता अजून राहिलेली दीड वर्ष वाट पहाणे, दुसरा पर्याय नाही"
"तो पर्यंत....."
"ह्या झाडावर राहण्या पेक्षा, घरात दिपू जवळ रहाण्याची व्यवस्था मी करून देतो, मात्र कोणाला दिसायचं नाही, दिसलीस तर परत इथे येऊन लटकाव लागेल...."
अलकाच्या वासनादेहान संमती दर्शक मान हलवली, सिद्धनाथान काही मंत्र उच्चारत, तिची त्या बांधलेल्या जागे पासून सुटका केली, सिद्धनाथन ध्यान संपवून मारुतीला नमस्कार केला