एकापेक्षा - 8 Gajendra Kudmate द्वारा हास्य कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

एकापेक्षा - 8

माइया शालेय जिवनातील काही निवडक प्रसंग तुमचा सोबत शेअर केले होते. तर आज पुन्हा अजुन काही निवडक असे प्रसंग मी तुमचासाठी घेऊन आलेलो आहे. तर आजचा प्रसंगाचा क्रमवारीतील पहिला प्रसंग आहे तो राकेश या आमचा मित्राचा. तर त्यापूर्वी मी राकेशची थोड़ी ओळख करुन देत आहे. तर मीत्रांनो, मी बारावी नापास झाल्यावर आय टी आय मध्ये प्रवेश घेतला होता दहावीचा बेसवर, बारावी नापास झाल्यावर मला कुठेतरी जाणवू लागले होते की शिक्षण आणि अति शिक्षण हे माझा सामान्य बुद्धीचा सामर्थ्याचा पलिकडचे आहे. म्हणून मी आय टी आय मध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला होता तांत्रिक शिक्षण घेण्यासाठी. ज्याची मदत आज मला माझे आणि माझ्या परिवाराचे उदरनिर्वाह करण्यासाठी झालेली आहे. त्या तांत्रीकी शिक्षणाचा बळावर मी आज सरकारी कारखान्यात काम करतो आहे. तर जेव्हा मी आय टी आय मध्ये प्रवेश घेण्याची गोष्ट आई बाबांना सांगितली तर त्यांनी मला पुढ़े शिक्षण घेण्यास सांगितले होते. परन्तु बारावीचा शिक्षणाचा दरम्यान माझया बाबांचा पैशांची जे हाल होते माझ्या आल्प बुद्धिमुळे तेच नुकसान आणखी मला मान्य नव्हते, शिवाय मला तांत्रिक कामात मला बालपनापासून गोड़ी किवा आवड ही असल्यामुळे नकळत माझे पाऊल त्या क्षेत्राकडे वळले. तर त्याचा परिणाम म्हणून मला शासकीय आय टी आय नागपूर येथे माझा दहावीचा अंकांचा जोरावर प्रवेश हा अखेर मिळाला होता.

तर मित्रांनो, माझे आय टी आय मध्ये आता नियमित शिक्षण सुरु झाले होते, माझे प्रथम वर्ष होते तर माझा सोबत आणखी पुष्कळ मुलांचे आणि मुलींचे सुद्धा आय टी आय मध्ये आगमन झालेले होते. तर माझा वर्गात त्याच मुला मुलिंमधुन राकेश हा सुद्धा आमचा वर्गात आलेला होता. आमचा वर्गात सगळ्या वयोगटातील विद्यार्थी होते, काही तर लग्न आणि मूल बाळ झालेले विद्यार्थी सुद्धा होते. तर राकेश हा आमचा पेक्षा लहान आणि एकदम कोवळ्या वयाचा मुलगा होता. तो फक्त दहावी झात्यानंतर तेथे प्रवेश घेऊन आलेला होता. राकेशचे पूर्ण नाव राकेश अहिरकर होते आणि माझा हा प्रसंग जर माझा मित्र राकेश अहिरकर हा जर चुकून ही वाचून घेईल किंवा घेत असेल तर मला फारच आनंद होईल राकेश हा त्याचा आई वडिलांच्या एकमेव पुत्र होता असे नाही की त्याला बहिणी नव्हत्या. राकेशला तीन बहिणी होत्या आणि त्या तीन बहीणीत राकेश हा सगळ्यात लहान होता. त्याचा कोवळ्या शरीराचा प्रमाणे त्याचे कोवळे मेंदू ही अधिक भोळे होते. त्याचा मेंदुचा काहीतरी लोचा होता आणि त्यामुळेच तो अविस्मरनीय क्षण घडून आलेला होता. तर मित्रांनो, वर सांगितत्या प्रमाणे आमचे शिक्षणाचे नियमित तास सुरु झाले होते. आम्ही सगळे नविन असल्याने लवकरच मित्र झालेलो होतो, आय टी आय मध्ये आमचे सकाळी आठ ते दुपारी बारा वाजत पर्यंत प्रात्याक्षिक आणि दुपारी एक वाजेपासून पाच वाजेपर्यत थेअरीचे तास असायचे. सकाळी आम्ही लेथ मशीनवर कार्य करून वेगवेगवळ्या प्रकारचे जॉब बनवायचो. तेव्हा आमचासाठी पाच मशीन उपलब्ध होत्या आणि आम्ही विद्यार्थी पंधरा एका वर्गात होतो. म्हणून एक नम्बर ते पाच नंबर पर्यंतचे विद्यार्थी आधी मशीनवर काम करायचे आणि त्यानंतर उरलेले विद्यार्थी त्याच क्रमाने मशीनवर काम करतील असा नियम आमचा मेश्राम सरांनी बनवलेला होता. तर त्याच अनुशंगाने माझा नंबर पहिल्या पाच विद्यार्थ्यांत असायचा म्हणून सकाळी आल्यावर लवकर आम्ही पाच विद्यार्थी आपल्या कार्याला लागुन जायचो आणि उरलेले विद्यार्थी अभ्यास तर नाहीच म्हणु शकतो ते फक्त गप्पागोष्टी आणि टाइम पास करत असत. कारण की आय टी आय म्हणजे उरले सुरले लोकांचे एक ठिकाण अशी धारणा लोकांचा मस्तिष्कात घर करून गेलेली होती. लोकांना वाटत होते की, फक्त नापास झालेले, शिक्षण सोडलेले, रिकामटेकड़े, निरर्थक अशी मूल आणि मुली तेथे शिक्षण घेण्यासाठी येतात.

जसे संपूर्ण जगात आपत्याला विभिन्न प्रकारचे लोक मिळतात त्याच प्रमाणे सात घाटातील पाणी पिऊन आलेले मूल आणि मुली मात्र आय टी आय मध्ये आम्हाला भेटले. ते सुद्धा एकापेक्षा एक धुरंदर असे होते. तर माझे मशीनवरील कार्य संपल्यावर मी सुद्धा उरलेले विद्यार्थी त्यांचा सोबत जाऊन तेथे बसलो. आमचा नंतरचा क्रमांक दुसर्या ग्रुपचा म्हणजे राकेश याचा ग्रुपचा होता. तर राकेश याने सगळ्यात मागील आणि एकंतातील मशीन निवडली होती त्याचे कार्य करण्यासाठी. आमचे काम झालेले होते आणि उरलेल्या विद्यार्थ्यांचा क्रमांक यायचा होता म्हणून सगळे निवांत बसले होते. राकेश सुद्धा त्याचे कार्य करण्यासाठी मशीन जवळ गेलेला होता. आम्ही बघीतले की बाकीचे चार जण मशीन सुरु करून त्यांचे जॉब बनवू लागले होते परन्तु राकेश हा मशीन बंद ठेवून काहीतरी वेगळेच करत आहे. ते बघून आम्हा सगळ्यांना आश्चर्य कमी परन्तु आमचा ओठांवर हसू अवश्य आले. तर त्यानंतर आम्हा सगळ्यांचा नित्यकर्म होवून गेलेला होता आपले कार्य बाजूला ठेवून राकेशची ती गंमत बघायचा. याबाबतीत मात्र राकेश सुद्धा तेवढा चपळ आणि हुशार होता तो आधी आम्हा सगव्यांचाकड़े एक नजर बघायचा आणि संपूर्ण खात्री करून घ्यायचा की आम्ही सगळे दुसऱ्या कार्यात व्यस्त आहोत मग तो आपले ते वेगळेच कार्य करायचा. परन्तु मी आधीच सांगितल्याप्रमाणे आमचाकड़े सात घाटातील पाणी प्यायलेले नगीत्तर होते, तर ते सारखे राकेशचा प्रत्येक हालचालीकड़े लक्ष पुरवून होते. राकेशची नजर आमचाकड़े वळली की त्याला सामान्य भासण्या पर्यंत त्याचा नजरेला नजर मिळवायची नाही आणि एकदाचा तो निश्विन्त झाला तर त्याची गंमत बघायची. असे काही दिवस निघून गेले आता मात्र त्या गंमतीत सामील होण्यास आम्ही सगळे आतुर होवून गेलेलो होतो आणि ती संधी काही आम्हाला मिळत नव्हती. परन्तु एकेदिवशी अचानक आमचाकड़े ती संधी चालून आली.

तर त्या दिवशी असे घडून आले होते की आम्ही सकाळी आमचा वर्क शॉपला जाऊन पोहोचलो आणि मेश्राम सरांची प्रतीक्षा करु लागलेलो होतो. घड्याळात आठचे नऊ होवून गेले होते तेव्हा शेजारचे धांडे सर येऊन आम्हाला म्हणाले, " मुलांनो आज मेश्राम सर येणार नाही आहेत, तर तुम्हाला जे कार्य त्यांनी दिले होते ते तुम्ही पूर्ण करा. काही समस्या असेल तर मला सांगा मी शेजारी बसून आहे. धांडे सरांचा तोंडून ते वाक्य ऐकून आम्हा सगळ्यांना आनंद झाला आणि आमची इच्छा म्हणा की उत्कंठा पूर्ण होत असतांना आम्हाला दिसू लागली होती. तर त्याच क्रमाने आम्ही आमचा कामाला लागलो होतो. माझा ग्रुपचे कार्य संपवून आम्ही आतुरतेने राकेशची आणि त्याचा त्या गमतीची प्रतीक्षा करु
लागलो.
शेष पुढील भागात........