घर बांधणे आहे Ankush Shingade द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

घर बांधणे आहे

घर बांधणे आहे

घर बांधणे आहे असा ध्यास प्रत्येकांच्या मनात असतो. प्रत्येकाला वाटत असतं की आपण मानव जन्म घेतला ना. मग एकतरी घर बांधावं. घर मोठं जरी नसलं तरी चांगलं असावं. त्यासाठी कोणी कर्ज काढत असतात आणि घर बांधत असतात.घर बांधण्यासाठी कोणी चो-याही करतांना पाहिले. कोणी सर्रास चोरीही करीत असतात.
घर बांधणा-यांच्या गर्दीत हवसे, नवशे व गवसेही असतात. हौसेे म्हणजे हौशीनं घर बांधणं. याचाच अर्थ असा की ज्यांना घर बांधण्यात आनंद वाटत असतो असे. नवशे अर्थात असे की जे माझंं घर बनावं यासाठी देवाजजवळ साकडे घालतात असे आणि गवसे म्हणजे ज्यांना घर बांंधायची इच्छा नसते, परंतू जवळ जो पैसा असतो. त्या पैशाचा वापर कुठे करायचा असा प्रश्नन असतो त्यांच्या मनात. तो पैसा खर्च करण्यासाठी अशी मंडळी घर बांधत असतात. घर बांधण्यातून अशा लोकांचा पैसा खर्च होत नाही. उलट काही काळानं जशी जागेची किंमत वाढते. तशी त्यांच्या घराचिही किंमत वाढत असते.
घर बांधण्यासाठी सर्वात प्रथम पकडावा लागतो इंजिनीयर. हा इंजिनीयर कोणतेच काम करीत नाही. फक्त नकाशा बनवतो व त्याला डिग्रीची एक सांक्षांत्कीत प्रत लावून तो नकाशा पास करुन देतो. बदल्यात एकूण रकमेतून टक्केवारीनं पैसे घेतो. तो शिकलेला असतो. त्याला काळ्याचं पांढरं कसं करायचं व पांढ-याचं काळं कसं करायचं ते सर्व समजतं. असा इंजिनीयर जेव्हा घराचं बांधकाम रितसर आहे की नाही याची पाहणी करतो. तेव्हा जे बांधकाम अवैध असतं. तेही मोजत असतो व जे बांधकाम अवैध असेल, ते तोडायला लावतो. या तोडफोडीमध्ये मालकाचं अतोनात नुकसान होते कधीकधी.
इंजिनीयरनंतर ते बांधकाम बिल्डरच्या हातात जातं. ह्या बिल्डरकडे मजुरांची रांग असते. सा-याच प्रकारचे मजूर असतात त्याचेकडे. हे मजूर निष्णांत असतात. ह्या मजूरांसमोर इंजिनीयरनं बनवलेला बिल्डरकरवी नकाशा मिळताच तो नकाशा त्यांच्या अगदी तोंडपाठ होतो.
मजूरांमध्येही काही घटक असतात. सर्वात मोठा मजूर म्हणजे ठेकेदार. या ठेकेदाराकडे अनेक मिस्री असतात. जसे. सेंट्रींगचे मिस्री. जुळाईचे मिस्री, प्लॉस्टरचे मिस्री, प्लॉयवुडचे मिस्री, इलेेक्ट्रीकचे मिस्री, नळलाईनचे मिस्री, पेंटींगचे मिस्री, टाईल्सफिटींगचे मिस्री, रेलिंगचे मिस्री, पी ओ पीचे मिस्री. इत्यादी स्वरुपाचे मिस्री. हे सर्व मिस्री ठेकेदाराचे आदेश काटेकोरपणे पाळत असतात. कारण त्यांचं काम थोडंसं जरी चुकलं की त्यांचे पैसे कापलेे जातात त्यांच्या पगारातून.
या मिस्रीनंतर त्यांच्यनंतरचा असतो सामान्य मजूरवर्ग. ज्यांना कल्पकता मुळातच समजत नाही आणि समजतही असते तरी त्यांच्या कल्पकतेचा या घर बांधण्याच्या धंद्यात काहीही उपयोग नसतो. ते फक्त राबराब राबत असतात. त्यांच्याबाबत ठेकेदाराच्या मनात कोणतीच दयामाया नसते.
जेही श्रीमंत वा शिकले सवरले लोकं असतात. ते असे,इंजिनीयर पकडून घर बांधण्याची कामं करीत असतात. घर बांधण्याला हे लोकं डोकेदुखी समजत असून कोण आपल्यामागं अशी डोकेदुखी लावेल, याचा विचार प्रत्येकजण करीत असतो. यामुळंच ते घराचं बांधकाम इंजिनीयर लावून करीत असतात. काही लोकं बिल्डरला देत असतात तर काही लोकं ठेकेदाराला. घर बांधण्याच्या शर्यतीत कोणीही आपल्या पाठीमागं डोकेदुखी लावत नाहीत. ही सत्य बाब आहे. या शर्यतीत काही लोकं असेही असतात की जे आपल्या मागं डोकेदुखी लागू नये म्हणून फ्लँट विकत घेत असतात आणि त्या फ्लँटमध्ये विनाडोकेदुखीनं अगदी स्वतंत्र्यपणे राहात असतात. परंतू अशी फ्लँटमध्ये राहात असलेली मंडळी आपल्या घराच्या वरच्या मजल्याचं बांधकाम करु शकत नाही. कारण त्यांना जागाच सिमीत असते. असे फ्लँट श्रीमंत लोकंच विकत घेत असतात. काही मात्र गरीब असतात आणि जे गरीब असतात. ते लहानशी का होईना, जागा विकत घेत असतात व त्यावर बांधकाम करीत असतात. त्यातच अशा गरिबांच्या वाट्याला ती मंडळी जास्त पुढे जावू नये म्हणून त्यांचे पाय ओढणारे शेजारी भरपूर असतात. ते विनाकारणच्या काड्या करीत असतात त्यांच्या घर बांधण्यात. त्यांनी परवानगी मागितली की नाही, ते घर वांद्यात तर नाही, तसेच त्यांचं बांधकाम कसं थांबवता येईल. यासाठीही ते प्रयत्न करत असतात. त्यांच्याबाबत सांगायचं झाल्यास नकटीच्या विवाहाला सतरा विघ्न अशी त्यांची अवस्था असते.
पर्यायाने सांगायचं झाल्यास घर बांधणे हे काम अति सोपे वाटत असले तरी ते सोपे काम नाही. त्यातच त्या कामात जबाबदारी असते. कधीकधी घर बांधकाम करताना कर्ज काढावं लागतं, त्यावेळी कर्जाचे हप्ते वेळीच चुकवता न आल्यानं कर्जदार दारात येतात. तकादा लावतात व तसे कर्जाचे हप्ते वेळीच न चुकविल्यास किंवा न चुकवता आल्यानं घर निलामी करतात. त्यामुळे ज्या घरासाठी आपण एवढी त्रेधातिरपीट केली, ते घर अगदी डोळ्यासमोर विकलं जातं आणि आपल्या डोळ्यासमोर आपल्या हातून जात असतं.
महत्वाचं सांगायचं झाल्यास घर बाधावं आपण, बांधकाम करु नये असं नाही. परंतू घर बांधकाम करताना सर्व बाबी विचारात घ्यायला हव्यात. जेणेकरून ते बांधल्यानंतर आपल्याला अडचण येणार नाही व ते व्यवस्थीत बांधता येईल. तसेच कोणीही आपल्या दारात कर्ज मागण्यासाठी येणार नाही याची खबरदारी घेतलेली बरी. तसेच ही देखील काळजी घ्यावी की कोणी ठेकेदार वा इंजिनियर आपल्याला चिंताग्रस्त करणार नाही.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०