नसीब Shilpa Sutar द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

नसीब

नशीब

©️®️शिल्पा सुतार

सतीश हताशपणे ऑफिसच्या खुर्चीवर बसला होता. तिथे तो आज इंटरव्यूसाठी आला होता. थोड्या वेळापूर्वी तिथल्या रीसेपशनिस्टने सिलेक्टेड लोकांची लिस्ट वाचून दाखवली. त्यात त्याच नाव नव्हतं. नेहमीच आहे हे. काय लिहिल आहे माझ्या नशिबात ते समजत नाही. सगळीकडे नकार. तो उठला. रीसेपशन जवळ गेला.

"मॅडम काय प्रॉब्लेम आहे. माझ शिक्षण या पोस्टसाठी सगळ्यात जास्त आहे. अपेक्षा ही विशेष नाही."

"तुम्हाला अनुभव नाही, म्हणून घेतल नाही."

"कोणीतरी काम करायचा चान्स द्यायला हवा ना? त्या शिवाय कसा अनुभव येईल. मी एकदा आत जावून साहेबांना भेटू का?"

" सॉरी सर. तुम्ही आमचा वेळ घेत आहात. तुम्ही जावू शकता."

तो बाहेर आला. टपरीवर उभ राहून चहा घेत होता. काय सांगणार आता घरी. आई बाबांचे थकलेले चेहरे समोर येत होते. बिकट परिस्थितीत त्यांनी मला इंजिनिअर केल. पुढे एमबीए झालो.

कर्जाचा डोंगर उभा आहे. बाबा रिटायर झाले तरी घर चालवण्यासाठी अजूनही लायब्ररी मधे काम करतात. आई चिवडा लाडुचे ऑर्डर घेते. किती कष्ट आहेत त्यांच्या नशिबात. देवा काहीतरी कर.

घरी गेल की ते अपेक्षेने विचारतील. माझा ना काही उपयोग नाही. सगळीकडे निराशा हातात येते.

तो चालत निघाला. घरी जायची घाई नव्हती. विचार करत तो बागेत आला. चारी बाजूने फुलझाडे, मधे पाण्याचा तलाव होता. अतिशय प्रसन्न वातावरण होत. बरेच लोक बसलेले होते. काही जोडपी गोड बोलण्यात व्यस्त होते.

तिथे बाकावर बसून पुढे काय करायच ते तो ठरवत होता. अजून एप्लीकेशन द्यावे लागतील. पगाराची अपेक्षा टाकू का की अजून काही स्किल्स लिहू तो विचार करत होता.

त्याच्या समोरून एक मुलगी पळत गेली. तारेच कंपाऊंड ओलांडून तिने पाण्यात उडी मारली. एकच गोंधळ उडाला. बरेच लोक बोलत होते पाणी खोल आहे. कोण रिस्क घेईल.

तो उठला मागचा पुढचा विचार न करता पाण्यात उडी मारली. ती गटांगळ्या खात होती. तिला आधार दिला. तो पर्यंत बाकीच्या लोकांनी मदत केली. दोघ बाहेर आले.

ती मुलगी लाॅनवर बसली होती. तिने ओढणी अंगावर गुंडाळली होती तो ही कपडे झटकत तिच्या बाजूने उभा होता.

"काय पोर आहेत आजचे? काही मागचा पुढचा विचार आहे की नाही?"

"हे जिवन अस सहजासहजी मिळत का? का बर आत्महत्या करत होतीस."

" तुझा नाही घरच्यांचा तरी विचार करायचा. " आजूबाजूचे लोक विचारत होते.

"तुझ्या घराचा फोन नंबर दे पोरी. कुठून आली? घर कुठे आहे?" एक बाई विचारत होती.

ती गप्प बसुन होती. त्याने खुणावले मी बघतो.

तो तिच्या जवळ बसला. तिने मान फिरवली. ती रडत होती.

" काय झाल आहे? "त्याने हळूच विचारल.

" मला का वाचवल. मला एकट सोडा. "

" एवढा टोकाचा निर्णय घेतेस. तू एकटी आहे का? घरचे कुठे आहेत. काय मूर्खपणा आहे हा? समजत का काय म्हणतोय. काय नाव तुझ?"

" मी सांगितल ना. मला एकट सोडा. जा इथून. " ती ओरडली.

" मी तुला अस एकट सोडू शकत नाही. घरच्यांचा नंबर दे ते आले की मी जाईन."

"नाही मला कोणी नको. मी इथे थांबते. या जगात कोणी चांगल नाही. माझ्या मनाप्रमाणे काही होत नाही." ती म्हणाली.

ती दिसायला सुंदर होती. ड्रेस चांगल्यातला वाटत होता. लहान वाटत होती. बहुतेक कॉलेज मधे असेल.

"दुःख कोणाला नसत प्रत्येकाच वेगळ असत. " तो म्हणाला.

तिने त्याच्या कडे बघितल. " तुला काय माहिती माझ्या बाबतीत काय झालं ते. "

" काय झालं? सांग तरी. बॉयफ्रेंड नाही म्हणाला? लग्न मोडल? नापास झालीस? "

" ज्याच्यावर प्रेम होत तो दुसर्‍या मुलीसोबत आहे. मला धोका दिला."

"म्हणून आत्महत्या करायची? आई बाबांसाठी जगू शकत नाही का? ते ही किती प्रेम करतात. त्यांना काय वाटेल साध एवढा विचार तू करू नये म्हणजे काय? " तो खूप बोलला ती ऐकत होती.

" तू नीट अभ्यास कर. छान रहा. जे गेल ते तुझ नव्हतच. तू मृगजळा मागे होतीस. सोड ते. लहान आहेस. छान रहा. आई बाबा म्हणतील ते कर. नशीब मी तिथे होतो नाहीतर काय झाल असत. " त्याला तिचा राग आला होता.

"अस बोलायला सोप असत. तुला काय माहिती किती त्रास होतो. " ति खाली बघत म्हणाली.

" माझ्या इतक तर काही झाल नसेल ना? माझ तर अस्तित्व धोक्यात आहे. नोकरी नाही म्हणून लग्न होत नाही. आई बाबांसमोर रोज मी कस जात असेल. "तो सावकाश म्हणाला.

" काय झाल. हा एवढा मोठा प्रश्न आहे का?" तिला आश्चर्य वाटल.

" हो श्रीमंत लोकांना काय समजणार? एवढ शिकून नोकरी मिळत नाही. घरचे अपेक्षा लावून आहेत. पैसे नाहीत. खाणार काय. बरोबरीचे मित्र सक्सेसफुल आहेत. माझ काय होत असेल. खाली मान घालून फिरतो. रोज अपेक्षा असते आज काम होईल उद्या काम होईल. कधी कधी वाटत सोडून द्याव सगळ स्वतःला संपवावा. पण नाही, आई बाबा कसे जगातील माझ्या शिवाय. मी त्यांना एवढी मोठी शिक्षा देवू शकत नाही. "

" असा विचार करू नकोस जे आहे त्यातून चांगल कर. " ती म्हणाली.

" तुला ही हा नियम लागु होतो ना." तो तिच्याकडे बघत म्हणाला.

ती एकदम शांत झाली.

" घरचा नंबर दे. नाव सांग. "

पूजा.. तिने फोन नंबर दिला. त्याने फोन केला. घरचे आले.

तिचे बाबा खुप घाबरले होते. ते बर्‍याच वेळ त्याच्याशी बोलत होते.

" खूप धन्यवाद. आज तुम्ही नसते तर काय झाल असत. "

" बाबा एक मिनिट." ती काहीतरी हळू हळू बोलत होती. ते सतीश जवळ आले. त्यांच कार्ड दिल.

"उद्या पासून जॉईन व्हा."

तो आश्चर्याने बघत होता. "माझ शिक्षण इतर माहिती विचारणार नाही का? मला कामाचा अनुभव नाही."

"तुम्ही प्रसंगावधान दाखवून माझ्या लेकीला वाचवल. ती अतिशय हट्टि आहे. तिला समजावल. म्हणजे कोणतही अवघड काम तुम्ही करू शकता."

" खूप धन्यवाद."

ते दोघ गेले.

तो आनंदाने घरी गेला. नशीब मी त्या बागेत गेलो.

" काय रे असा भिजून आला. इंटरव्ह्यूच काय झाल?" आईने विचारल.

" झाल काम आई. उद्या पासून ऑफिस. "

घरचे खुश होते.

मी प्रामाणिक पणे काम करेल. तो तयारीला लागला.

दुसर्‍या दिवशी तो दिलेल्या पत्त्यावर पोहोचला. अतिशय आलिशान ऑफिस होत. तो आत गेला त्याला वरती ऑफिस मधे पाठवल.

" मला माहिती नव्हतं तुम्ही एवढे मोठे लोक आहात. मी काय काम करू. "

त्याला अवघड काम मिळालं. त्याने काम सुरू केल. अतिशय हुशार, चांगले डीसीजन घेणारा, शंभर टक्के रिजल्ट देणारा म्हणून तो प्रसिद्ध झाला. लगेच प्रमोशन मिळाल.

आई बाबां सोबत सतीश मोठ्या फ्लॅट मधे शिफ्ट झाला. स्वतःची कंपनी समजून तो खूप मेहेनत करत होता.

पूजा चांगल्या मार्काने पास झाली. ती रोज ऑफिस मधे येत होती. ती सतीशच्या हाताखाली कामाला होती. तिने सगळ काम शिकून घेतल.

"बाबा मला तुमच्याशी बोलायच आहे." तिने तिच्या मनातली इच्छा सांगितली. बाबांनी होकार दिला. सतीशला आत बोलवलं. लगेच लग्न जमलं. वाजत गाजत लग्न झाल. ते दोघ फिरायला आले.

" मला कस पसंत केलस?" त्याने विचारल.

"तु माझ आयुष्य बदलल. तुझ्यामुळे मी नीट अभ्यास करायला लागली. आयुष्यात सिरियस झाली. त्या दिवशी तू भेटलास तेव्हा पासून तू आवडत होतास. अतिशय समजूतदार आणि चांगला आहेस तू. माझ्याबद्दल तुला काय वाटत?" तिने विचारल.

" मला ही तु खूप आवडतेस. तू माझ्या टीम मधे काम करत होतीस तेव्हा समजल तू किती चांगली आणि हुशार आहेस. आणि माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे. "

" मग आधी का नाही सांगितल?"

"तु मालक मी तुझ्या इथे काम करणारा एप्लाॅई."

"आता? "

"मी राजा, तू राणी ."

ती खूप हसत होती .

त्याने तिला मिठीत ओढून घेतल. दोघ खूप खुश होते.

संयम ठेवा. कोणाच नशीब कस बदलेल ते सांगता येत नाही.