कोण? - 17 Gajendra Kudmate द्वारा थरारक मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कोण? - 17

ऑफिस मधील स्टाफ तो आवाज ऐकून मात्र फार चिंता ग्रस्त झाले होते. मग जेवणाची वेळ झाली आणि सावली जेवण्यास बसली होती. तेच केबीनचा बाहेरील घंटा वाजली आणि चपराशी तसाच आत गेला. थोड्या वेळाने तो बाहेर आला आणि त्याने सावलीला आत जाण्यास सांगीतले. तेव्हा सावली तीचा डबा तसाच ठेवून आत गेली तर त्या तीघांतील एकजण म्हणाला, “ काय म्हणता मिस झाशीची राणी, कसे वाटले मघाशी. कसा अपमान केला आम्ही तुझा.” तेव्हा सावली म्हणाली, “ कुठला आणि कसला अपमान मी तर काहीच ऐकले नाही.” असे म्हणत तीने स्मित से हसू आणले ओठांवर. तीचे ते हसू बघून मात्र तीघांचा डोक्यात आगीचा भभका भरून दिला होता. तर त्यांनी मोठ्या आवाजात “Get Out” म्हटले आणि सावलीला जाण्यास सांगीतले. सावली तशीच हसत बाहेर आली आणि तीचा डबा उघडून जेवण करू लागली होती. संयोगाने तेथील एक वरीष्ठ वयाचा स्टाफ टेबलावर जेवण करत बसलेला होता. तर त्याने सावलीला तीचा हसण्याचे कारण विचारले, तेव्हा सावली म्हणाली, त्यांनी जोक मारला होता आणि मी हसले नाही म्हणून ते चीढले आणि मला जाण्यास सांगितले.
असे एक एक दिवस सावलीचा बरोबर घडत होते आणि सावली त्यांचा नाकात दम करू लागली होती. एकमेकांसोबत काम करता करता आता सावलीची ओळख त्या ऑफिस मधील बाकीचा स्टाफ सोबत झाली होती. शिवाय सावली एक मिळून मिसळून रहाणारी मुलगी आहे याची सगळ्यांना जाणीव होऊन गेली होती. त्या सगळ्यांची आता सावली बरोबर चांगलीच गट्टी जमायला लागली होत. सावलीला सुद्धा आता कळू लागले होते कि त्या तीघांना सोडले तर संपूर्ण स्टाफ हा खूपच चांगला आणि एकमेकांस मदत करणारा आहे. तर याच संधीचा लाभ आता सावलीला घ्यायचा होता. सावलीने बनवलेल्या त्या लेटर मुळे तीला जी अपमानास्पद वागणूक त्या तीघांनी दिली होती. तेच लेटर सावलीने मुद्दाम करून तेथील सगळ्या स्टाफला दाखवले. तेव्हा तेथील वरीष्ठ आणि समजदार अशा व्यक्तींनी तीचा लेटरचे फारच कौतुक केले. त्यांना त्या लेटर मध्ये कसलीच चूक किंवा उणीव दिसली नाही. तेव्हा त्यांनी सावलीला विचारले, “ सावली हे लेटर तर एकदम उच्च दर्जाचे आणि बरोबर आहेत. तर मग त्या दिवशी तुझा तेवढा अपमान त्यांनी का बर केला.” तेव्हा सावलीने तेथील चपराशीला सुद्धा तेथे बोलावले आणि मग तिने आतापर्यंत घडलेला सगळा प्रकार त्यांना मन मोकळेपणाने सांगीतला. याचा प्रत्यक्ष गवाह म्हणून त्या चपराश्याची साक्ष सुद्धा त्या लोकांना मिळवून दिली.
सावलीने मात्र एका दगडाने दोन नहीतर अनेक पक्षी मारले होते. तीने तीचा त्या प्रामाणिकपणामुळे सगळ्यांचे रुदय जिंकले होते. याचा लाभ आता तीला कधीहि आणि कसाही होणार होता. असेच सुरु राहिले आणि अचानक एके दिवशी सावलीचा बसण्याची जागा आता बदलण्यात आली. तीला आता त्या तीघांचा केबीनमध्ये त्यांचा नजरे समोर बसण्यास सांगीतले. कारण कि तीला पर्सनल सेक्रेटरी म्हणून कामाला ठेवण्यात आलेले होते. तर सावली आता त्यांचा केबीनचा आत मध्ये बसू लागली. याचे कारण असे होते कि त्या तीघांचा नजरेत सावलीची अन्य स्टाफ सोबत वाढत असलेली मैत्री होती. तर आता त्या तीघांनी त्यांचा घाणेरडा प्लान कार्यान्वित करण्यास सुरुवात केली. सावली तीचा कॉम्पुटर वर कार्य करत असतांना ते तीघेही वेगळ्या विषयावर चर्चा करू लागले. त्या चर्चेमध्ये जाणून ते तीघेही अश्लील भाषेचा उपयोग करू लागले होते. तेथे एक स्त्री महिला कर्मचारी उपस्थित असून सुद्धा ते तसे वर्तन करत होते. तेव्हा सावली उठून बाहेर येण्यासाठी नीघाली तर त्यांनी तीला रोखले आणि विचारले, “ कुठे जात आहेस तू काम सोडून.” तेव्हा सावलीने वाशरूमचे कारण सांगितले. तेव्हा त्यातील एकाने निर्लज्जा सारखे तीला तेथेच करण्यास सांगीतले. तेव्हा सावली चीढली आणि उठून केबीनचा दाराजवळ आली. तीने केबीनचे दार उघडले आणि मग ती म्हणाली, “ तुम्ही काय समजता स्वतःला. तुम्ही तुमचा बहिणीला तुमचा समोर वाशरूम करायला सांगा आणि बघा तीला. हलकट कुठले यांना लाज वाटत नाही एखाद्या स्त्री पुढे कसे बोलावे आणि वागावे. येथे मला केबीनमध्ये बसवून माझ्या सबोर नुसते अश्लील गोष्टी आणि चाळे करत आहेत हे नराधम.” हे बोलतांना सावलीचा आवाज मात्र फारच उंचावला होता आणि सगळा स्टाफ त्या दाराचा पुढे उपस्थित होता.

सगळा स्टाफ हे ऐकत आहे हे बघून त्या तीघांची आधी फजिती झाली आणि मग त्यातील एकाने आवाज उंचावून स्टाफला म्हटले, “ कसली गर्दी लावली आहे येथे. काय येथे तमाशा होत आहे ? चला लागा आपापल्या कामाला.” तेव्हा मात्र सगळा स्टाफ एक झाला आणि त्यांनी त्या तीघांनाच चांगली अद्दल घडवली आणि त्याचबरोबर सावलीचा बसण्याची जागा आता पूर्ववत त्यांचा मध्ये करवून घेतली. ते ऐवढ्यात थांबले नाहीत तर त्यांनी आता सरळ त्या तीघांचा विरोधात रणशिंग फुंकले होते. सगळ्या स्टाफने त्या तीघांचा विरुद्ध लीखित तक्रार वरचा आणि त्याचाही वरचा कार्यालयात पोहोचवली होती. ते सगळे आता संपावर जाऊन बसलेत. त्यांची मागणी होती कि या तीघांना येथून दुसऱ्या ऑफिस मध्ये पाठवा अन्यथा आम्ही राजीनामे देतो. आता तर सगळा माहोल तापला होता.

शेष पुढील भागात............