" आय जस्ट हॉप की बॉसचा होणारा नवरा त्यांच्यावर भरभरून प्रेम करेल.. की त्यांना कधी कोणा इतराची गरज भासणार नाही... ", इकडे आदित्य गाडीवर घरी जाताना मनातच त्याच्या बॉस साठी बेस्ट विश करत होता.. अगदी मनापासून...
....
" आई.... ", आदित्य घरात येताच आईला बिलगतो...
" काय रे... काय झालं..?? ", आईही त्याच्या पाठीवरून हात फिरवत विचारू लागल्या...
" काही नाही गं.. मिठी मारावीशी वाटली... ", तो म्हणाला आणि मिठी घट्ट केली...
आपल्या बॉसच्या तुलनेत आपण किती नशीबवान आहोत हे त्याला समजले होते... भले त्याच्याकडे मोठा बंगला नव्हता... गाड्या नव्हत्या... मोठं नाव नव्हतं... पण त्याच्या कडे त्याची आई होती... जी त्याच्यावर जीव ओवाळून टाकते.... जिच्याशी तो आयुष्याचे सुख दुःख वाटू शकतो... रडू आल्यावर तिच्यासमोर रडू शकतो.. थकलो जरी कधी.. तरीही आई होती धीर द्यायला.. आजारपणात काळजी घ्यायला... त्याच्यासाठी देवाकडे मागणे मागण्यासाठी.. ! आणि तो खरंच देवाचा आभारी होता...
पण वेदांशी मात्र या प्रेमाला मुकली होती... तिची काहीही चुकी नसताना...
" आता सांग.. काय झालं..?? अचानक तर मिठी नाही मारणार तु... एकतर उदास असशील... किंवा आनंदाची बाब असेल... ", त्याची त्याला विचारते...
तसा तो गालात हसतो... किती चांगली ओळखते ना आपली आई आपल्याला...
" आई... थँक यू माझ्यावर भरभरून प्रेम करण्यासाठी.... ", तो आईचे हात हातात घेत म्हणाला...
" अरे... त्यात काय थँक यू..?? कोणती आई आपल्या बाळावर प्रेम करणार नाही..?? प्रत्येक आई करते... ", आई काहीशी हसून म्हणाली...
" नाही आई... सगळेच नाही प्रेम करत आपल्या मुलांवर...", आदित्य म्हणाला... तसं आईने काहीसं गोंधळून पाहिले त्याच्याकडे... तसं आदित्यने सुस्कारा सोडत वेदांशी आज त्याला जे काही तिच्याबद्दल म्हणाली... ते सगळं काही सांगितलं त्याने आपल्या आईला...
तसं आईच्या डोळ्यांत पाणी आले... वेदांशी बद्दल ऐकून... आदित्यचाही आवाज सांगताना पुन्हा एकदा जड झाला होता...
" एवढं काही सहन केलं तीने..?? मानसिक रित्या किती खचली असणार ती..!! आपली व्यक्ती असूनही आपल्यावर प्रेम करत नाही म्हंटल्यावर त्या मुलीच्या मनावर किती आघात झाले असणार..???", आई डोळे पुसत म्हणाली...
" हो ना.. पण आज सांगताना पण त्या खचल्या नाही... म्हणजे किती सहन केलं असणार त्यांनी.. की आता डोळ्यातून अश्रूही येत नसतील त्यांच्या...", आदित्य...
" पण तुला माहितीये... आज त्या खळखळून हसल्या.. आणि खरं सांगू आई.. हसताना खूप सुंदर दिसत होत्या त्या... त्या म्हणाल्या.. की उद्या त्यांचा होणारा नवरा येणार आहे त्यांच्याकडे... केवळ त्यांच्या जीवनाचा जोडीदार तरी त्यांना सुखात ठेवणारा असावा... म्हणजे त्यांचं पुढचं आयुष्य तरी सुखकारी होईल... आणि हो..त्यांनी उद्या दोन माणसाचे जेवण मागवले आहे... उद्या दोन जणांचे जेवण बनव... ", आदित्य म्हणाला...
" हो रे.. नको काळजी करुस.. तुझ्या बॉसच्या आयुष्यातही चांगले दिवस नक्कीच येतील... आता मी जेव्हा देवाकडे प्रार्थना करेन ना.. तेव्हा तुझ्या बॉस साठी पण करेल... ", आई आदित्यच्या केसातून हात फिरवत म्हणाल्या...
तसं आदित्यने हसून मान डोलावली...
....
आदित्य दुसऱ्या दिवशी ऑफिसला आला... महत्वाच्या मीटिंग होती... म्हणजे एक प्रोजेक्ट होता.. ज्यांच्याकडून तो प्रोजेक्ट घ्यायचा होता त्यांना एक प्रेसेंटेशन करून दाखवायचे होते...
आणि यावेळी प्रेसेंटेशन वेदांशी स्वतः देणार होती..
त्यासाठी आदित्य सगळं काही तयार करणार होता .. प्रेसेंटेशन साठी त्यांना दुसऱ्या कंपनी मध्ये जायचे होते...
आदित्यने सगळी व्यवस्था केली होती.. वेदांशी पण कामात गर्क झाली होती... काम म्हणजे तिला अगदी चोख लागायचं... कामात अगदी प्रमाणिक होती ती..! थोडीशीही चुक तिला नको असायची.. आणि म्हणूनच आदित्यही सगळं काही अचूक करण्याचा प्रयत्न करायचा.... आधी जास्त चुका व्हायच्या त्याच्याकडून... पण हळू हळू प्रयत्न करत.. त्याच्या बॉसचा ओरडा खात झाला तोही आता काही प्रमाणात परफेक्ट..!!
वेदांशीकडून बरंच काही शिकून घेत होता तो..
" आदित्य... सगळं तयार आहे ना..?? पेनड्राईव चेक केली का पुन्हा एकदा..?? नीट तयार ठेव सगळं.. जर थोडी जरी चुक केलीस ना.. तर ओरडाही खाशील आणि पगारही एका आठवड्याचा कट करेन.. कारणं ऐकून घेणार नाही मी.. ", वेदांशी तिच्या लॅपटॉप वरून नजर हटवत आदित्यला पाहत म्हणते..
" डोन्ट वरी बॉस... सगळं काही ओके आहे.. ", आदित्य निश्चयाने म्हणाला.. तसं वेदांशीने मान डोलावली...
दोघेही खाली पार्किंग लोट मध्ये आले.... आदित्यने तिच्यासाठी पाठी मागचा दरवाजा उघडला... तशी ती आत जाऊन बसली...
आदित्य पुढे ड्राइव्हरच्या बाजूच्या सीट वर बसला...
थोड्याच वेळात ते एका कंपनीमध्ये आले... आणि त्यांची मिटिंग चालू झाली...
" हॅलो मिस भोसले.. नाईस टू मिट यु..", समोरील व्यक्तीने हात पुढे करत वेदांशीला म्हंटले.... तसं वेदांशीने पण हलके स्मित करत त्याच्या हातात हात दिला..
" nice to meet you too मिस्टर पाटील.. ", वेदांशी म्हणाली...
ते दोघे काहीवेळ बोलत होते..
" हे मिस्टर पाटील जरा विचित्र नजरेने बॉसला पाहत आहेत असं नाही वाटत..??", आदित्यने मिस्टर पाटील कडे पाहत मनोमन प्रश्न केला..
"मिटिंग चालू करायची..??", वेदांशीने विचारलं... तसं मिस्टर पाटीलने होकार देत मीटिंगला सुरवात केली...
थोड्यावेळ महत्त्वाचे बोलून झाल्यावर वेदांशी उठतच होती... मिस्टर पाटील मध्येच बोलले...
" मिस भोसले.. तुमच्या पी.ए. ने प्रेसेंटेशन दिले तरी चालेल... आम्हाला विश्वास आहेच की प्रेसेंटेशन चांगलेच असणार..
मिस्टर पाटील असं अचानक म्हणाले.. तसं आदित्यने चमकून पाहिले वेदांशी कडे... तिच्यासाठी पण हा धक्काच होता...
" मला आवडेल प्रेसेंटेशन द्यायला.. ", वेदांशी म्हणाली... पण मिस्टर पाटील काही ऐकण्याच्या स्थितीतच नव्हते... त्यांना नेमकं काय झालं काय माहित म्हणून शेवटी वेदांशीचा नाईलाज झाला.. ती तिकडे आरग्यू करू शकत नव्हती... म्हणून मनात नसताना तीने आदित्य कडे पाहिले...
" आदित्य... प्रेसेंटेशन दे... ", ती म्हणाली... आणि डोळ्यांनीच आदित्यला आधार दिला... कारण तो थोडा काचकूच करत होता... जे केवळ वेदांशीला समजले...
तसं त्यानेही मान डोलावली... आणि पुढे झाला...
वेदांशीला जरा टेन्शन आले होते... प्रोजेक्ट महत्वाचा होता... आणि तीने स्वतःहून प्रेसेंटेशन द्यायचे म्हणून तयारी केली होती... अशी वेळ येईल म्हणून तिलाही काही कल्पना नव्हती...
पण कुठेतरी तिला आदित्यवर विश्वास होता...
मिटिंग रूम मधल्या सगळ्या लाईट्स ऑफ झाल्या... तसं आदित्यने देवाचे नाव घेत प्रेसेंटेशन द्यायला सुरवात केली... तसं वेदांशीच्या ओठांवर हलके हसू पसरले... कारण आदित्य चांगला प्रेसेंटेशन देत होता... जणू त्याने तयारी केली होती...
आदित्यने पूर्ण प्रेसेंटेशन वर आधीच नजर फिरवली होती... नीट सगळं काही समजून घेतलं होतं... त्यानेही नीट अभ्यास केला होता... आणि तो सहजपणे सगळं काही नीट एक्सस्प्लेन करत होता...
त्याचा तो क्लियर आणि तेवढाच भारदस्त आवाज त्या मिटिंग हॉल मध्ये घुमत होता... एकंदरीत त्याचे प्रेसेंटेशन सगळ्यांनांच आवडले... होते...
सगळ्यांचे लक्ष आदित्यकडे होते... केवळ मिस्टर पाटीलला सोडून..!
तो केवळ एकटक वेदांशीला पाहत होता...!!
ती त्याच्या बाजूच्या सीटवरच बसली होती... आणि त्यामुळे तो तिला जवळून पाहू शकत होता... तिचा औरा.. तिचं appearance त्याला आवडलं होतं.. अगदी मनाला भिडलं गेलं होतं.. म्हणून त्याने हट्ट धरला की तिच्या पी.ए. ने प्रेसेंटेशन द्यावे.. जेणेकरून ती त्याच्या साईड वरून उठूच नये.. आणि त्याला आणखी काहीवेळ तिला असं एकटक मनसोक्त पाहता येईल...
प्रोजेक्टरची लाईट तिच्या चेहऱ्यावर पडत होती.. आणि त्यामुळे ती आणखीनच खुलून दिसत होती..!
वेदांशीला आदित्याचं कौतुक वाटत होतं म्हणून मध्ये मध्ये तिच्या ओठांवर हसू फुलत होतं... आणि मिस्टर पाटील अजूनच मोहात पडत होता तिच्या...
मिस्टर पाटील म्हणजे जवळ जवळ तीस एकतीस वर्षांचा तरुण होता... वडिलांची कंपनी आता तो आणि त्याचा धाकटा भाऊ असे दोघेजण सांभाळत होते.. आणि तो थोड्यामोठ्या प्रमानात प्लेबॉय होता..
आणि त्याची नजर आता वेदांशी वर पडली होती...
काहीच वेळेत प्रेसेंटेशन संपले तसं लाईट ओन होताच सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या...
एकंदरीत सगळयांना आवडलं होतं..!
डील साईन झाली... तसं काहीवेळ बोलून वेदांशी तिच्या चेयर वरून उठली.. तसं आदित्य पण उठला...
" Then see you Mr. Patil.. ", वेदांशी हात पुढे करत म्हणाली... तसं मिस्टर पाटीलनेही लगेच हात पुढे केला... आणि तिचयाशी हात मिळवला..
" you can call me by my name.. Its suhas.. ", तो म्हणाला... पण काहिश्या flirtarious way मध्ये...
तशी वेदांशी केवळ ओठांच्या एका कोपऱ्यात हसली... काहीही न बोलता..!
आदित्याला सुहासचे इंटेशन चांगलेच समजले... कारण एक पुरुष दुसऱ्या पुरुषाला चांगलाच समजू शकतो...
" काम करायचं टाकून फ्लर्ट करत बसलाय.. ", आदित्य मनातच म्हणाला सुहासकडे पाहून...
" आम्ही निघतो आता.. उशीर होतोय.. ", वेदांशी म्हणाली...
" इट्स ऑलरेडी लंच टाइम... सोबत लंच करूया.. व्हॉट से..??", सुहासने विचारले..
" सॉरी मिस्टर पाटील.. माझा होणारा नवरा घरी येणार आहे.. सो मला लवकर घरी जायचे आहे.. ", ती म्हणाली... तसं सुहासचा चेहरा पाहण्यासारखा झाला...
आदित्यला तर त्याचा चेहरा पाहूनच हसायला आलं.. पण तो शांत राहिला...
नंतर मात्र सुहास काही बोलण्याआधीच वेदांशीने सगळ्यांचा निरोप घेतला...
आदित्य आणि वेदांशी सरळ त्यांच्या कंपनीत आले...
.... क्रमश :
कथा आवडल्यास कमेंट नक्की करा...