एकापेक्षा - 10 Gajendra Kudmate द्वारा हास्य कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • अनुबंध बंधनाचे. - भाग 18

    अनुबंध बंधनाचे.....( भाग १८ )एक दिवस प्रेम च्या ऑफिस मधे त्य...

  • रहस्य - 4

    सकाळी हरी आणि सोनू गुजरात ला पोचले आणि पूढे बस ने संध्याकाळ...

  • आर्या... ( भाग १ )

    आर्या ....आर्या ही मुलगी तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी...

  • गया मावशी

    गया मावशी ....    दिवाळी संपत आली की तिची आठवण हमखास येते…. ...

  • वस्तीची गाडी

    वसतीची  गाडी     

       
                 जुन 78 ते  जुन 86 या  का...

श्रेणी
शेयर करा

एकापेक्षा - 10

सर पुढे म्हणाले, " तर चला मी तुम्हाला एक कवीता शिकवतो." मग त्यांनी आम्हाला मराठीचे पुस्तक बाहेर काढण्यास सांगीतले आणि आमच्यातील एका विद्यार्थ्याची पुस्तक त्यांनी स्वतःचा हातात घेतली, आता त्यांनी कवीता शिकवायला घेतली, ती कविता होती धरणी माता
हिचावर आधारीत. तर आमचे सर पुस्तक हातात घेऊन आम्ही जेथे जेथे बसलेलो होतो त्या बेंच जवळ येऊन इकडून तिकड़े फिरून फिरून कावीताचा ओळी वाचून सांगू लागले आणि त्यानंतर त्या ओळींचा अर्थ समजावू लागले. तर त्यांचा चेहऱ्याची बनावट मी आधीच सांगीतली आहे त्या नुसार ते ज्या क्षणी जेथे उभे राहून बोलत असायचे त्या क्षणी त्यांचा समोर असलेल्या बेंचवरील विद्यार्थ्यांचा तोंडा अंगावर निरंतर कारंजे उडत राहायचे आणि ते म्हणजे त्यांचा तोंडातून निघणाऱ्या थूंकेचे. ते त्यांचा शिकवणीत एवढे तल्लीन होऊन गेले होते की त्यांचा आवाज आणि ते त्यांचा तोंडातून निघणारे फव्वारे हे निरंतर आमचावर वर्षाव करत राहिले होते. आम्ही त्या असमय झालेल्या पावसाचा वर्षावापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी इकडे तिकड़े स्वतःला सारत होतो. आमचा सगळ्यांचे मन आणि चित्त त्या क्षणी फ़क्त आणि फ़क्त स्वतःचा बचाव करण्याचा मागे लागलेले होते. त्या कवीतेकडे तर कूणाचेच लक्ष नव्हते. त्यातल्या त्यात एक गंमत झाली होती. ती म्हणजे आमचा वर्गात काही अती हुशार आणि सर्वथा परीक्षते पहिले येणारे विद्यार्थी होते. त्या विद्यार्थ्याचा मध्ये मुलींचा वाटा हा फारच होता म्हणजे त्या हुशार विद्यार्थयात मुली सगळ्यात जास्त होत्या. त्यामुळे त्या मुली सगळयात पहिल्या बेंचवर बसून होत्या. आमचा सरांचा तोंडून निघणाऱ्या अनगीनत वर्षावात सुद्धा त्या एक चित्ताने तेथे स्वतःला टिकवून ठेवून त्या कवीतेला शिकण्यासाठी कटिबद्ध झालेल्या होत्या.

त्या मुलींमध्ये एक मुलगी होती, तीचे नाव नाही घेणार मी. तर ती मुलगी फारच हळवी आणि तब्येतीने नाजुक कोमल अशी होती. तर गंमत अशी झाली की कवीतेत एक ओळ होती आणि ती ओळ सरांनी त्यांचा कवीतेचा आवेश आणि मोठ्या आवाजात ती ओळ त्या मुलीकडे बोट दाखवून, खुनाणावुन आणि तिचा डोळ्यात डोळे घालून म्हटली. तर सरांनी म्हटले, " तु मला जन्म दे !" आणि सर त्या मुलीचा डोळ्यांत डोळे घालून तीला बोलले आणि त्याच बरोबर त्यांचा तोंडून नीघणारे कारंजे तीचा चेहऱ्यावर संपूर्ण उडवले होते. त्या क्षणी ती मुलगी एवढी घाबरून गेलेली होती की तीने तेथेच बेंचवर सु केली आणि एकदम बेशुद्ध झाली. त्यावेळेस त्या गोष्टीचे गांभीर्य आमचा कुणाचा लक्षात आले नाहीं परन्तु थोड्याच वेळाने शेजारचा मुलीने सामर्थ्य एकवटून सरांना त्याबद्दल सांगीतले, तेव्हा सरांनी तात्काळ शिकवणी बंद केली आणि शेजारचा वर्गाचा एका शिक्षिकेला बोलावून त्या मुलीला इस्पितळात दाखल केले होते. त्या क्षणा नंतर आम्ही सगळ्यांनी शपथ घेतली की पुन्हा प्रिन्सिपल सरांचा तासाला चुकूनही बसायचे नाही. तर मित्रांनो, माझ्या शालेय आयूष्यातील आणखी एक क्षण, प्रसंग मी तुमचा सोबत शेअर केला. त्या दरम्यान मी कुणाबद्दल काही वाईट बोललो असेल तर मला कृपा करून क्षमा कराल.

तर मित्रांनो, माझा शालेय जिवनातील काही निवडक असे प्रसंग मी तुमचा सोबत शेयर करतो आहे. त्याच क्रमात आता मी आणखी एक प्रसंग तुमचा पुढे सांगायला सुरुवात करतो. तर हा प्रसंग आहे माझा दहाव्या वर्गात असतांनाचा काळाचा. त्यावेळेस आम्ही इंग्रजी मीडियमचा वर्गात होतो. तेथे आम्हाला एक सर होते शिक्षक म्हणून मी त्यांचे नाव येथे घेणार नाही. हा प्रसंग त्यांचा सोबत एका अनपेक्षित चुकीमुळे घडून आला. तो प्रसंग विध्वंसकारी तर होताच परन्तु हास्यास्पद सुद्धा होता. तर ग्यादरिंग सुरु झालेली होती आम्ही आणि शाळेतील संपूर्ण मूल मुली ज्यांनी खेळात भाग घेतला होता नव्हता ते सगळे ग्यादरींगचा आस्वाद घेण्यात व्यस्त होते. त्याला कारण सुद्धा असेच होते ग्यादरिंगचा दरम्यान कुठल्याही वर्गाचा तास होत नव्हता फक्त आणि फक्त खेळ आणि मज्जाच मज्जा असायची. तर इकड़े आम्ही सगळे ग्यादरिंगचा आनंदात वावरत होतो तेवढयात आमचा शाळेचा सार्वजनीक मुत्रीघरातुन बॉम्ब फुटण्याचा आवाज आला. तो आवाज आल्याबरोबर सगळीकड़े भीतीचे वातावरण निर्माण झालेले होते. आम्ही सगळी मूल एकदम घाबरून गेलेलो होतो. तेव्हा शाळेतील शिक्षकांनी आम्हाला धीर दिला आणि आम्हाला शांत केले. मग काही शिक्षकांनी साहस करून बॉम्ब जेथे फुटला तेथे जाऊन बघीतले तर तेथे ते सर मुत्रीघराचा मोरीत उताने झोपलेले त्यांना आढळले. त्या शिक्षकांनी त्या सरांना तेथून उचलले तर ते एकदम ओरडून उठले,"बॉम्ब कोणी फोडला." त्यांचा बोलण्याने उरलेल्या शिक्षकांना कळत नव्हते की काय करावे. एकतर ते सर संपूर्ण स्वस्थ होते त्यांना काहीच इजा झालेली नव्हती फक्त आणि फक्त त्यांना फार आणि त्यापेक्षा ही फार जास्त राग आलेला होता. कारण की ते मुत्रीघराचा आत शिरले आणि नेमका त्याच वेळेस बॉम्ब फुटला. त्यामुळे घाबरून ते मुत्रीघराचा मोरीत पड़ले आणि त्यामुळे त्यांचा कपड्यांवर आणि सर्वागावर घाण लागलेली होती.

ते सर बाहेर आले तेव्हा त्यांचा तो अवतार हा बघण्यासारखा होता त्यांचा चेहरा हा संपूर्ण घाणीने भरून होता आणि त्यांचा सर्वगातुन ती घाण दुर्गंध येत होती. आपण सगळ्यांना सार्वजनीक या शब्दाचा आणि या नावाखाली उघडलेल्या आणि स्थापीत केलेल्या संडास आणि मुत्रीघर यांची काय दशा आणि दुर्दशा असते हे माहीत आहे. तर ते सर अशा गलीच्छ अवस्थेत शिव्या देत होते म्हणून प्रिंन्सिपल सरांनी त्या सरांना घरी जाण्यास सागीतले. मग ते सर त्यांचा घरी नीघून गेले आणि आम्ही सगळे त्या प्रकरणाची चर्चा करत राहिलो. आमचातील काही जणांना त्या सरांचा बद्दल वाईट वाटत होते परन्तु पुष्कळ जणाना हसू आले होते आणि फारच बरे वाटले होते. तुम्ही म्हणाला मी पुन्हा एखाद्या मनुष्याची थट्टा करतो आहे. तर तसे नाही कारण की त्या सरांची कारकीर्दीच तशी होती. ते एक शिक्षक असून त्यांचा मेंदूत आगळे वेगळेच वीचार यायचे. ते एक शिक्षक असून सारखे कॉलेज मधील मुलांचा प्रमाणे मुलीचा समोर शेफरायचे. मुलांना तर ते जाणुन मुलींचा समोर त्रास, शिक्षा द्यायचे ते ही वीनाकारण, आता त्या सरांचा आणि सगळ्यांचा संशय हा होता शाळेतील त्या दोन मुलांचावर, कारण की त्या दोन मुलांचे आणि सरांचा छत्तीसचा आकड़ा होता. त्याबद्दलची थोड़ी माहिती सविस्तर देतो, तर मला आठवते त्यानुसार आमचा शाळेतील दोन मुले यांचात त्यावेळेस सॉलिड राडा सुरु होता. तो राडा होता एका मुलीसाठी ते दोघेही एकाच मुलीचा मागावर होते. तर त्या मुलीमुळे त्या दोघांत काही चकमकी झालेल्या होत्या. त्यामुळे त्या दोघांना त्या सरांनी सगळ्या शाळेतील विद्यार्थ्यांचा समोर अपमानीत केलेले होते आणि त्यांना शिक्षा केलेली होती. त्याच बरोबर ते सर त्या मुलीला वारंवार त्या प्रेम त्रिकोणाबद्दल विचारून सारखे हैराण करत होते म्हणून त्या दोघांनी त्या सरांना शाळा सुटल्यावर धमकावले होते. म्हणून त्या दोघांचा वर त्या सरांचा आणि शाळेतील शिक्षकांना संशय होऊ लागला होता. तर आता त्याचा सोक्षमोक्ष लावण्याची वेळ आलेली होती.

शेष पुढील भागात.........