कोण? - 18 Gajendra Kudmate द्वारा थरारक मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कोण? - 18

भाग - 18
त्याचा परीणाम हा झाला कि वरचा कार्यालयातील त्या तीघांचा चाहत्यांना सुद्धा ताबडतोब नीर्णय घ्यावा लागला. त्या तीघांचा तबादला दुसऱ्या एका अती दुर्गम अशा स्थळी करण्यात आला आणि त्यांना लवकरात लवकर ते ऑफिस सोडण्याचा फरमान जाहीर करण्यात आला. सबंधित आदेशाची एक प्रत ऑफिस मध्ये येऊन झडकली आणि सगळ्यांचा चेहरयावर आनंदाने हसू आले. सगळ्या स्टाफने त्यांचे आंदोलन संपवून त्यांचा कामाला सुरुवात केली होती. वीशेष करून एक गोष्ट चांगली झालेली होती कि त्या ऑफिस मधील वरीष्ठ अशा स्टाफला त्या तीघांचा जागेवर प्रमोशन देऊन साहेब बनवले होते. आता कुठलाच नवीन साहेब तेथे येणार नव्हता आणि सावलीला ते नरकामय आयुष्य आणखी जगावे लागणार नव्हते. सावलीचा धैर्याचा आणि तीचा हिंमतीचा आज विजय झाला होता. त्या तीघांना त्यांचा वाईट कर्माचे आणि सावलीला तीचा सत्कर्माचे फळ हे मीळालेले होते. त्यातल्या त्यात तीला आणखी एक भला मोठा परीवार मीळालेला होता. तर सावलीचे चांगले दिवस पुन्हा एकदा सुरु झाले होते. तर एके दिवशी अचानक त्यांचा ऑफिसचे नवीन साहेब सावलीला बोलले, “ सावली तुझे मी खूप खूप धन्यवाद करतो.” सावलीला काहीच कळले नाही म्हणून तीने त्यांना विचारले, “ सर कशाबद्दल बोलत आहात तुम्ही.” तेव्हा त्यांनी त्यांची व्यथा सांगीतली. कसे त्या तीघांनी त्यांचा ओळखीचा बळावर आधी त्यांचा अधिकार मारून ते वरचे पद मीळवले आणि सावलीचा आधी सुद्धा असेच एका मुलीचा आयुष्यांच्या सोबत ते असेच खेळले होते.
त्यावेळेस त्या मुलीने सावली सारखा प्रतीकार केला नाही आणि तीने स्वतःचे आयुष्य संपवून घेतले. त्या दुष्कर्माचे ते साक्षी होते. परंतु सावलीचा अथक प्रयास आणि तीची जिद्द, चलाखी आणि आत्मवीश्वास हे बघून त्यांना सुद्धा बळ मीळाले आणि सावलीचा लढ्यात ते सामील झाले. या सगळ्या गोष्टींसाठी ते आणि सगळा स्टाफ सावलीचे धन्यवाद करत आहेत. तर आता सावलीचे काम सुरळीतपणे चालले होते. परंतु कुठेतरी आणि कधीतरी काही अनपेक्षित घडणार आहे हे सावलीचा मेंदूतील सहावी इंद्री तीला वारंवार संकेत देत होती. यावेळेस सावली आधीसारखी निश्चिंत न होता अधिकच सावध होती. तर तीने विचार केलेला होता तसे घडले. एके दिवशी सावलीचा घरचा आवारात कुणीतरी एक लीफाफा आणून टाकला होता. सावलीचा आईने तो उचलून ठेवला होता. मग सावली संध्याकाळी ऑफिस मधून घरी गेली तेव्हा तीचा आईने तो लिफाफा तीला दिला आणि म्हणाली, “ बाळा हा लिफाफा आपल्या घराचा आवारात पडला होता. मी तो उचलून ठेवला परंतु कुणाचा असेल म्हणून मी तो उघडला नाही. बघ तर जरा कुणाचा आहे तो.” तेव्हा सावलीने त्याला आलटून पालटून बघितले. तर त्याचावर कुणाचेच नाव किंवा पत्ता लिहिलेला नव्हता. आता तो उघडावा कि नाही ती याचाच विचार करू लागली होती. तेव्हा तीची आई बोलली, “ बाळा कुणाचा आहे ग, कळले काय तुला.”तेव्हा सावली उत्तरली, “ नाही ग आई मला सुद्धा कळत नाही आहे कि हा कुणाचा आहे. यावर कुणाचे नाव आणि पत्ता काहीच लिहिले नाही.”
मग आता हा कुणाचा असावा हा विचार सावली करू लागली होती. तीची सहावी इंद्री तीला सारखी संकेत देत होती. मग सावलीने स्वतःला वीचारले हा लिफाफा माझ्या घराचा आवारात पडला आहे. तर तो माझ्याच घरातील कुणाचा किंवा कुणासाठी असेल. तर मी याला आता काय आहे यात ते बघतेच. असे म्हणून तीने तो उघडला आणि काय बघते तर त्या लिफाफ्यात आणखी एक लिफाफा आहे. तीने तो लिफाफा बाहेर काढला तर त्यावर “Surprise ” असे लिहिले होते. परंतु त्याचावर कुणाचे नाव नाही लिहिले होते. आता सावलीला विचार करावा लागला हा किंवा हि कोण असू शकते. तो किंवा ती ओळखीचा किंवा अनोळखी असू शकतो. शेवटी सावलीने गहरा श्वास घेतला आणि तो लिफाफा सुद्धा उघडला. त्या लिफाफ्यात काही फोटो होते सावलीचे. त्या फोटोत विशेष गोष्ट अशी होती कि ते फोटो नीलेशचा अंतिम क्षणाचे आणि त्या निर्जन स्थळावर सावली आणि नीलेशचे होते. नीलेश आणि सावली एकमेकांशी भेटून बोलत असतांना कुणीतरी त्यांचे फोटो चोरून लपून काढले होते. त्या फोटोचा मागे एक फोनचा नंबर लिहिलेला होता आणि त्याच बरोबर “Call ” असे लिहिले होते. आता सावलीला कळून चुकले होते कि सावली आणि नीलेशचा भेटीचा आणखी एक तीसरा साक्षीदार आहे. आता सावली समजली कि तीची सहावी इंद्री तीला कशाबद्दल संकेत देत आहे तर.
सावली आता भीतीने थोडी कासावीस होऊ लागली होती. तीचा मागील आयुष्याचे हे गुपीत कुणाचा तरी ताब्यात आहे, हे आता तीला कळून चुकले होते. ती आता विचार करू लागली होती कि नेमका हा व्यक्ती आहे तरी कोण. तीला आता त्या व्यक्तीचा सोक्ष मोक्ष लावायचा होता आणि तीला तो लावावाच लागणार होता. म्हणून सावलीने निर्णय घेतला आता या संकटाला तीला सामोरे जावेच लागेल. त्याशिवाय यातून तीची सुटका होणार नाही आणि वीनाकारण तिचा गळ्याला फास म्हणून ते आयुष्यभर तसेच लटकत राहील. म्हणून सावलीने त्या नंबरवर फोन केला. शेष पुढील भागात..........