ओढ प्रेमाची.... - 5 Madhumita Lone द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

ओढ प्रेमाची.... - 5

कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये.....
किती वेळ झाला माया अजून कशी नाही आली , ऋचा हातातील घड्याळाकडे बघते.

हो, आज पर्यंत कधी इतका वेळ नाही लागला तिला, जरा फोन लाऊन बघतेस का? प्राची शितल विचारते.

मी केला होता फोन पण ति उचलत नाही, मी तिला msg करते वेळ मिळाला की करेल मग msg, शितल msg टाईप करते.

मला खूप काळजी वाटते तिची, अचानक इतकं सगळं घडलं .

हो ,ना ऋचा किती विश्वास होता तिचा त्या मुलावर आणि त्याने काय केलं तिचा विश्वासघात,सांवी रूचाकडे बघून तीलां सावरते.

चला लेक्चरची वेळ झाली, msg आला की सांगते मी, असं बोलून शीतल बाकी सगळ्यासोबत क्लासरूममध्ये जाते.

थोड्यावळाने शीतलचा फोन वाजतो, तसे सगळ्यांचे काने टवकरतात.
शीतल बघ ना काय लिहलय msg मध्ये, जरा लवकर वाच.
हो वाचते मी, थोडा थांबा. शीतल msg vachte Ani सगळ्यां सांगते.
अग ती तिच्या गावी गेली आहे, आपल्यालां सांगण्याच विसरली, दोन दिवसांनी ती येणारं आहे.

आता थोडे बरं वाटतं आहे, सगळ्यांनी आपल्या मनाची समजूत घालून लेक्चरलां गेल्या.

*************

दोन दिवसांनी "सृष्टी मानसोपचार केंद्र" मध्ये.....

आत येऊ का काका??

माया, ये तुझीच वाट बघत होतो.
कशी आहेस, तुझी ट्रीप कशी झाली, डॉक्टर सुरेश मायाला बसायला सांगतात.

काय काका तुम्ही पण माझी मस्करी करत आहात का? ती ट्रीप होती का?

अगं, तसं नाही पण तुझे बाबा म्हणाले आम्ही मायाला दोन दिवस गावालां ट्रिप ल नेत आहे , म्हणून आपलं विचारलं.

Hmm, कशी असणार तुम्हाला तर माहिती आहे आजी असती गावाला आमच्या तिला मी आणि माझा वागणं कधीच नाही आवडत.तिच्या मते त्या accident मध्ये दादाच्या ऐवजी मी जावं असं वाटतं होत, मला पण वाटतं दुःख दादाच्या जाण्याचं पण आता त्याला दहा वर्ष झाली तरी आजी माझ्या वर राग करते. कधी कधी वाटतं मीच गेले असते तर बर झालं असतं.

माया , तुझी स्थिती समजू शकतो मी, पण तुला आता positive विचार करावा लागेल. मला सांग तू गाडीतून जाताना बाहेरील निसर्ग नाही पहिला का??

हो, काका मी पाहिलं हिरवीगर झाडे, छोटे मोठी गावे तेथील माणसं त्यांचे हावभाव अगदी तुम्ही सांगितल्या प्रमाणे सगळ्यांची मने वाचण्याचा प्रयत्न केला, हाच प्रसंग मला खूप आवडला.

बसं मग अजून काय पाहिजे तुला, तू छोट्या मोठ्या गोष्टींसाठी आपला वेळ वाया नको घालू तू फक्त तुझा आनंदाच्या गोष्टी लक्षात ठेव.

थँक्यू काका , तुम्ही किती ग्रेट आहात.

मग सांगा आता काय झालं आहे, तू उदास का आहेस.

तुम्हाला कसं कळालं की मी उदास आहे.

माया , मी सायकोलॉजिस्ट आहे हे माझं कामच आहे समोरील व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे जाणण्याचे.

म्हणूनच तर मला तुमच्या सारखं ग्रेट सायकॉलॉजिस्ट बनायचं आहे.

तू माझ्या पेक्षा ग्रेट सायकोलॉजिस्ट बनावं हि माझी इच्छा आहे. आता सांग काय झालं आहे ते.

फार काही नाही झालं काका, ते.......

काही प्रोब्लेम आहे का, कॉलेज मध्ये काही घडलं का, तू जास्त स्ट्रेस नको घेऊ तू प्रॉब्लेम सांग आपण उपाय शोधून काढू.

काका मागे मी तुम्हाला किरण बदल सांगितलं होत ना त्याची माझी फ्रण्डशिप तुटली. Actually मला वाटतं यात चूक माझीच आहे , मी त्याला मैत्रिपेक्षा जास्त importance देत होते ते पण त्याचा मर्जी विरुद्ध .

Very good, maya तू स्वतः हि गोष्ट मान्य केलीस , त्यामुळे तुला याचा फार त्रास नाही होणार.

हो काका मे मान्य केल पण तरी मला याचं खूप वाईट वाटतं.

हळूहळू तू या गोष्टी विसरून जाशील. त्यामुळे तू जास्त काळजी करू नकोस ,तू तुझ्या अभ्यासावर कॉन्सन्ट्रेशन कर आणि तू म्हणाली होतीस तसं तुझ्या कॉलेजच्या फ्रेंड्स आहेतच तुला हेल्प करायला.

हो, काका माझा कॉलेज मधील ग्रुप आहे मला खूप छान सांभाळतात. आणि मी अभ्यासाला सुद्धा लागली यावर्षी स्कॉलरशिप मिळवायचे.

ऑल द बेस्ट तुला पुढच्या जर्नी साठी.

ठीक आहे काका आपण पुन्हा भेटूयात आता मी निघते.

इतक्या लवकर तुला माझ्यासोबत आज पेशंट अटेंड नाही करायचे का.

सॉरी काका आज नाही जमणार आजी आली ना आमच्या सोबत घरी ती वाट बघत असेल लवकर नाही केले की तिचे प्रश्नांची तोफ चालू होईल.

ओके माया काळजी घे आणि कोणत्याही गोष्टीत टेन्शन घेऊ नकोस.