कसे दोन दिवस निघून गेले कळलं पण नाही, मायाला शर्वरी एका कॅफे बाहेर तिला मिठीत घेऊन बोलते.
Hmm... I miss you. मला तुझी खुप आठवण येईल, तू तुझी काळजी घे.
आज शर्वरीला परत दिल्लीला निघायचे होते, म्हणून तिने मायाला भेटून एअपोर्टला जायचं असं ठरवून ती मायाला एका कॅफेत बोलवून घेतलं.
शर्वरी तिथून निघताच जोरात पाऊस सुरू झाला म्हणून मायाने काही वेळ तिथेच थांबायचा विचार केला. तेवढ्यात तिला तिथे राकेश दिसला.
आता हा इथे कशाला आला असेल, असे मनातल्या मनात म्हणत त्याचा कडे दुर्लक्ष करू लागली.
Hiii, तू इथे कशी. चल एक कॉफी घेऊ, राकेश तिला एका टेबल कडे हात दाखवून म्हणाला.
नाही, नको . मला उशीर होतोय. माया थोडी चाचपळत म्हणते.
इतक्या पावसात कोठे जाणार आहेस. मी bill pay करतो.
नाईलाज असल्यामुळं माया आत जाते. राकेश ऑर्डर देतो आणि माया समोर येऊन बसतो.
काय झालं, इतका उदास चेहरा का केलायस, काही झालाय का. ती कोण होती.
ते........ मायच वाक्य पूर्ण होण्या आधीच कॉफी येते.
ते तू मला का सांगशील म्हणा, पण आपलं असच विचारलं.राकेश तिला म्हणाला.
ती माझी मैत्रीण होती, ती दिल्लीला परत चाली आहे म्हणून मे उदास आहे.
Ohh , तुझी bff होती का?
Bff... म्हणजे.
अरे best friend forever.
Hmmm...
तशी तर तू फार बोलतेस , आणि माझ्या समोर का इतकी शांत असतेस.
मी अनखोळखी लोकांसोबत जास्त बोलत नाही.
अच्छा, ठीक आहे, चल हात समोरकर .
का, कश्यासाठी????
राकेश मायाचा हात हातात घेऊन तिला फ्रण्डशिप बँड बांधतो.
बघ आता आपण फ्रेंड्स झालो .
माया आपल्या हातातल्या बँड कडे बघते आणि राकेश कडे बघते. आणि हसायला लागते.
बघ आता कशी हसताना गोड दिसतेस. राकेश तिला हसताना एकटक बघत असतो.
माया त्याच्याकडे बघून अचानक हसण्याचे थांबवते.
काय झालं का थांबलिस.
पाऊस कमी झालय निघते मी, असं म्हणून माया निघणार तेवढ्यात राकेश तिचा हात धरतो.
आता आपली मैत्री पक्की ना.
राकेश हात सोड.
आधी सांग ...
माझ्या हातात तुझ बँड अजून आहे म्हणजे हो.
खरच....., ठीक आहे असं म्हणून त्याने तिचा हात सोडला.
पण राकेश हे कॉलेजमध्ये काही सांगू नको. आपण कॉलेज बाहेरील फ्रेंड आणि कॉलेज मध्ये अनोळखी...
ठीक आहे जस तू म्हणशील तस.... चल निघुयात . तुझा पाठलाग करत इथे आलो आणि लेक्चर पण मिस् झाले .
काय, काय म्हणलास तू. तर तू माझा पाठलाग करत इथे आलास.तू माझा पाठलाग करत होता.
सॉरी, पण तुझ्या सोबत मैत्री करण्ासाठी आलो इथ पर्यंत. आता मोबाईल नंबर एक्सचेंज करूयात.
का कशासाठी??
मग आपण बोलणार कसे कॉलेज बाहेर.
आताच नाही , वेळ आल्यावर देईल नंबर. निघूयात आता.
ओके. तू म्हणशील तसं.
दोघे ही आपापल्या गाडीने कॉलेजेला निघतात. मायाच्या मागे राकेश होता. गाडी पार्क करून माया कॅन्टीन मध्ये जाते. आणि तिच्या मागे राकेश सुद्धा कॅन्टीन मध्ये जातो. मायाच्या मैत्रिणी तिथेच असतात . आणि राकेश आपल्या मित्रांकडे जातो. दोघेही आता अनोळखी वाटतं होते. जे काही वेळापूर्वी एकत्र होते.
तुम्ही लेक्चर का बंक केलं आज.माया ग्रुप ल म्हणते.
हे सांग आधी तू कुठे होतीस इतक्या वेळ. पावसात कुठे थांबली होती.
तुम्हाला सांगितले होते की शर्वरी निघते आज तिला भेटून येत होते आणि पाऊस चालू झाला मग तिथेच बसले थोड्या वेळ .
मनातल्या मनात मायाला घडलेला प्रसंग आठवत होता.ती त्याचात हरवून गेली.
माया हे बँड किती चांगल आहे, कोणी दिलं. मायाचा हाथ हातात घेऊन शितल सगळ्यांना बँड दाखवते.
कोणी काय शर्वरीने दिलं असेल, हो ना माया...., प्राची मायकडे बघते.
मायाला काय बोलावं कळेना.. तिने होकार अर्थी मान हलवली. आणि हळूच मागे वळून राकेश कडे बघितलं आणि नकळत राकेश ने सुद्धा तिच्या कडे बघितलं, दोघांची नजरानजर झाली. दोघंही मनातल्या मनात हसू लागले.