शेती व्यवस्थापन - भाग 2 Ankush Shingade द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

शेती व्यवस्थापन - भाग 2

पावसाळ्यातील शेतीचं व्यवस्थापन

पाऊस........ पाऊस जास्त आला की लोकांच्या मनात शांसकता निर्माण होते वाटतं की हा येणारा पाऊस जमीनीचं अतोनात प्रमाणात नुकसान करुन जाईल आणि तो जातोच आणि पाऊस आलाच नाही तरीही शासंकता मनात निर्माण होते वाटतं की आता पीकं पेरता येणार नाही व आपल्या शिवारात आता कोरडा दुष्काळ पडेल.
दुष्काळाचे नेमके दोन प्रकार आहेत. पहिला म्हणजे ओला दुष्काळ व दुसरा कोरडा दुष्काळ. हे दोन्ही दुष्काळ शेतकऱ्यांच्या जीवनात येत असतातच नव्हे तर ते शेतकऱ्यांच्या पाचवीला पुगलेले असतात. असे दुष्काळ शेतीत आल्यास शेतकऱ्यांना आत्महत्याच कराव्या लागतात. कारण शेतीचं त्यामुळंच अतोनात नुकसान होत असतं.
शेतीचं होत असलेलं यामुळं नुकसान. हे नुकसान बरंच होत आलेलं आहे, होत चाललेलं आहे आणि भविष्यात होणार आहे. त्यावर कधीच उपाय शोधला गेला नाही आणि उपाय काढलाही गेला नाही. मात्र काही लोकं आता शेती करतांना अशा पावसाच्या जास्त पाण्यानं शेती बुडू नये म्हणून वरुन प्लॉस्टीकचं आवरण देतांना दिसत आहेत.
शेती ही शेतकऱ्यांची आई आहे. असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. कारण तीच त्या शेतकऱ्यांना पोषत असते. त्यांना आधार देत असते. तशीच तीच आई त्यांनाच पोषण्याव्यतिरीक्त इतर सर्व जन्म घेणाऱ्या जीवांनाही पोषत असते. मग ते अतिशय अल्प बॅक्टेरिया का असेना. ती त्यांचीही आई असतेच. परंतु ते आपल्या शेतीला त्रासदायक असल्यानं आपण त्यांच्यावर फवारणी करुन मारत असतो.
कोणी म्हणतात की पावसाळ्यात केलेली शेती परवडत नाही. परंतु पाऊस जर नसेल तर शेतीही करता येत नाही. कारण पाऊस हे शेतीसाठी वरदान आहे. म्हणूनच पावसाळ्यात शेती परवडत नसली तरी करावी लागतेच. तसंच कोणी म्हणतात की शेती करण्याचे सुत्रही असते. जी मंडळी अशा सुत्रानुसार शेती करतात. ते कधीच बुडत नाही वा त्यांचं कधीच नुकसान होत नाही. परंतु काही लोकं हेही म्हणतात की जावे त्यांच्या वंशा, तेव्हा कळे. जो शेती करतो, त्यालाच साऱ्या समस्या माहीत असतात. तरीही सुत्रानुसार आपण वागलो तर भवतीर थोडासा तरी पार करता येईल. जसे म्हणतात की गणिताच्या जंगलातून जातांना सुत्राची बंधूक हाती असते. त्याशिवाय गणिताचं जंगलंच पार करता येत नाही. तसंच आहे शेतीचं. शेतीही सुत्रानुसार केली तर निश्चीतच यश मिळू शकतं.
बरीचशी मंडळी शेती करतांना आपल्या शेतात एकच पीक लावत असतात. उद्देश असतो की हे पीक पिकलं तर नगदी पीक हातात येईल. मग पावसाळा आला की ते जास्त पाऊस येईल असा अंदाज करुन जास्त पावसाची पीकं लावतात. मग पाऊसच येत नाही व शेत बुडतं. तसंच काही लोकं यावर्षी पाऊस कमी येणार. म्हणून कमी पाऊस लागणारी पीकं लावतात. पाऊस येतो तो जास्त आणि पीक बुडतं. शिवाय जमीनीही शेतकऱ्यांच्या समतल नसतात. त्यामुळंच जास्त पाणी गोळा राहिलेल्या भागातील जमीनीवर कमी पाऊस लागणारी पीकं पेरली तर नक्कीच नुकसान होईलच आणि जिथं पाऊस जमाच राहात नाही. तिथं जास्त पावसाची पीकं पेरली तरीही नुकसान होईलच. हे साधं सुत्र आहे.
विशेष सांगायचं झाल्यास जास्त पावसाची पीकं ज्या जमीनीत होवू शकतात. तिथं पाऊस येवो की न येवो, ती लावलेली बरी आणि ज्या जमीनीत येणारा पाऊस अजीबात थांबत नाही. तिथं कमी पावसाची पीकं पेरलेली बरी हे साधं सुत्र आहे. परंतु माणसाचा हव्यास. माणूस पेरणी करतांना नगदी पीकांचा विचार करतो की जी पीकं विकताबरोबरच नगदी स्वरुपाचा फायदा होईल. ती मंडळी आपल्याकडील संपुर्ण जमीनीत एकच पीक लावतात व गणित इथंच चुकतं आणि नुकसान होतं. याबाबत महत्वपुर्ण बाब ही लक्षात घ्यायला हवी की जर आपण जास्त पाऊस ज्या पिकांना लागते आणि तीच पीकं लावली. त्यानंतर त्या वर्षी कमी पाऊस आला तर पीक बुडेलच. याउलट एखाद्या वर्षी कमी पाऊस येईल असा विचार करुन कमी पाऊस पडेल, असे वाटून जर कमी पाऊस येणारी पीकं लावली आणि त्यावर्षी जास्त पाऊस आला तर नुकसान होईलच. हे साधी व कळणारी बाब आहे. तेव्हा विचार करुन पिकांच्या पेरणीचं नियोजन करतांना शेतीचंही नियोजन करावं लागेल व संपुर्ण शेतीचे चार भाग पाडावे लागेल. जणू त्याला तुकडे म्हणता येतील. असे तुकडे जमीनीच्या स्तरानुसार पाडावे लागतील. जसे, पानथळ भाग, कमी पाणी लागणारा भाग, उशिरा पीक पेरणी करण्याचा भाग व माळव्याचा भाग.
पानथळ व ओलावा धरणारी जमीन ज्याठिकाणी आहे. त्या जमीनीत जास्त पाऊस येणारी पीकं लावावीत. त्या जमीनीला आरे करावे. जेणेकरुन पावसाचं येणारं पाणी साठवून ठेवून त्या पाण्यात ते पीक चांगलं वाढू शकेल. शिवाय जास्त जरी पाऊस आला तरी पिकांचं नुकसान होणार नाही व कमी देखील पाऊस आला तरीही शेतीचं नुकसान होणार नाही. या जमीनीत धानासारखी पिकं आपण घेवू शकतो. तसेच दुसरा भाग जमीनीचा असा करावा की कमी प्रमाणात त्यावर्षी पाऊस जरी आला तरी पीकाचं नुकसान होणार नाही. या शेतीत ज्वारी किंवा बाजरी यासारखी पीकं घेवू शकतो. कारण त्यांना जास्त पाणी लागत नाही व अवर्षणातही ते पीक टिकून राहातं. तिसरा भाग असा असावा की त्या भागात उशिरा बियाणं पेरावं वा दुसरं एखादं पीक पेरावं. या जमीनीचेही दोन भागात वर्गीकरण करुन एका भागात सर्वात पहिलं पीक पेरावं व दुसऱ्या भागात थोडं उशिरा. जेणेकरुन पावसाच्या लंपडावात ती पीकं वाचू शकतील. या जमीनीत सोयाबीन, कापूस अशी नगदी पीकं घेता येतील. तसाच चवथा भाग शेतीचा असा असावा की त्या भागात केवळ माळवा अर्थात भाजीपालाच पिकवावा. जेणेकरुन आपली रोजची गरज भागू शकेल.
महत्वाचं सांगायचं झाल्यास शेती आपली आई आहे. आईच्या अंगावर लेकरं कुठंही खेळतात. तरीही तिला राग येत नाही. तसंच जमीनीचं आहे. परंतु कधीकधी आपल्या मुलांच्या वात्रट वागण्याचा आईला राग येतो. तसंच जमीनीचंही आहे. तिलाही आपल्या वात्रट वागण्याचा राग येतो. जसं पाणी लागणारी पीकं पानथळ जागेत न लावणे किंवा उथळ जमीनीत पाणी लागणारी पीकं लावणे. असं आपलं वागणं पाहून शेती नावाची आपली आई रागावते. ती एवढी रागावते की आपलं अतोनात नुकसान होतं. त्याची परियंती पीक बुडण्यात होते व मग आत्महत्या घडतात. म्हणूनच असं होवू नये म्हणून शेतीचं वरील पद्धतीनुसार व्यवस्थापन व नियोजन योग्य त्या पद्धतीनं होणं आवश्यक आहे. जेणेकरुन शेतीचं नुकसान होणार नाही व आत्महत्या करण्याची पाळी येणार नाही. यात शंका नाही. हेच तत्व रब्बी पीक पेरतांनाही लागू होवू शकतं हेही तेवढंच खरं.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०