शेती व्यवस्थापन - भाग 3 Ankush Shingade द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

शेती व्यवस्थापन - भाग 3

झाड लावण्याचा उत्सव साजरा करावा?
*छंद वाढवा, झाडं लावा, झाड लावण्याचा छंद वाढवा, हवं तर सेल्फी काढा, प्रसिद्ध व्हा. असे बरेच जण म्हणतात. परंतु केल्याने होत आहे रे आधी केलेचि पाहिजे असं कोणीच करीत नाहीत. महत्वपुर्ण बाब ही आहे की झाडं लावणं ही आपली महत्वपुर्ण गरज आहे. ती जर आज पुर्ण होत नसेल तर येणाऱ्या काळात तापमानवाढीचा व जीवसृष्टी विनाशाचा संभाव्य धोका टाळता येणे अशक्य आहे.*
अलिकडील काळात लोकांना बोलणं आवडतं. प्रसिद्धीही आवडते. त्या प्रसिद्धीसाठी लोकं प्रसंगी काय काय करतात. हे न सांगीतलेलं बरं. प्रसिद्धी मिळविण्यासाठी काही लोकं आपले छंद जोपासत असतात. ज्यात कोणाला नाणे गोळा करण्याचा छंद आहे. तर कोणी वर्तमानपत्रातील चांगले आर्टीकल गोळा करुन त्याचं जतन करीत असतात तर कोणी कोणतं काही. शाळेतही मुलांना असे छंद जोपासायला लावून त्यांचा आनंद द्विगुणित केला जात नाही तर त्यांचा उत्साहही वाढीस लावला जातो किंवा लावला जावू शकतो.
छंदाबाबत सांगतांना एक व्यक्ती असाही दिसला होता एकदा की त्याच्या जवळ एक दैनंदिनी होती व त्या दैनंदिनीत अनेक गाजलेल्या लोकांच्या स्वाक्षऱ्या होत्या. मग त्यात सलमान खान का असेना, सचीन तेंडुलकर का असेना. आज तो म्हातारा व्यक्ती जीवंत आहे की नाही हे माहीत नाही. एक तर असा व्यक्ती आहे की जो आपल्या शरीरावर खेळून छंद जोपासतांना दिसला. तो छंद म्हणजे टॅटू काढणे. त्यानं आपली नोंद ग्रीनीच बुकात करण्यासाठी शरीरावर एवढे टॅटू गोंदवले की ज्याची हद नाही. तेही शरीराला होत असलेल्या सर्व वेदना सहन करीत. त्यातच असाही एक व्यक्ती आहे की ज्यानं आतापर्यंत नव्वद वेळा रक्तदान केलं. तो व्यक्ती डॉ. राजेश नाईक.
महत्वपुर्ण गोष्ट ही की ह्या स्वाक्षऱ्या गोळा करणं वा रक्तदान करणं वा शरीरावर टॅटू काढणं हे छंदाचेच नमुने. असाच एक छंदप्रेमी नागपूरमध्येही आहे. ज्याचं नाव रुपकिशोर कनोजीया आहे व जे महालला राहतात. या व्यक्तीजवळ असे असे नाणे व वस्तू आहेत की जे आपण पाहिलेले नाहीत. शिवाय लहानात लहान बायबल, कुराण व भगवदगीताही तसेच धुमकेतूचे तुकडेही आहेत. दुसरा एक छंदप्रेमी व्यक्ती हा पंढरपूरात आहे की जो वर्तमानपत्रातील चांगल्या चांगल्या लेखांची व लेखकांची प्रकाशित कात्रणे गोळा करतो. त्याचं नाव संतोष चौंदावार आहे.
छंद जोपासणारे व्यक्ती भरपूर आहेत. गुगलवर शोधल्यास काहींची अगदी सहज माहिती मिळते आणि काहींची माहिती मिळत नाहीत व ते प्रकाशझोतात येत नाहीत. परंतु असा छंद जोपासण्यातून बराच मोठा फायदा होतो. उदा द्यायचं झाल्यास चार्लस डार्वीनचं देता येईल. ज्यानं उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडला. परंतु हा सिद्धांत मांडण्यापुर्वी त्याला एक छंद होता. तो छंद म्हणजे समुद्रकिनाऱ्यावरील दगडधोंडे, शंख शिंपले, हाडे गोळा करणे. एकदा त्यांना एक विशालकाय मानवी सांगाडा सापडला. त्याचं परीक्षण केलं असता तो मानवासारखाच दिसला. परंतु त्याचे काही अवयव मानवापेक्षा भिन्न दिसले. पुढं असेच लहानमोठे मानवी अवशेषांचे सांगाडे त्यांना सापडत राहिले व त्यातूनच त्यांना पुढे जावून उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडता आला.
जॉन ग्रेगर मेंडेल असाच एक शास्रज्ञ. त्यांनाही एक छंद होता. तो छंद म्हणजे वनस्पतींचं निरीक्षण करणं. महत्वपुर्ण बाब ही की छंदामुळं माणसं मागं जात नाहीत. ते पुढेच जात असतात. म्हणूनच एखादा छंद असावाच. ज्या छंदातून लोकांना पुढं जाता येईल.
छंद असावा....... छंद असा असावा की त्या छंदातून लोकांचा फायदा होईल. तसाच एक छंद म्हणजे सेल्फी काढणे. सेल्फी काढणे या छंदातून लोकांना स्वतःला प्रसिद्ध होण्याचा फायदा होत असतो. शिवाय अलिकडील काळात जोपासण्यासारखा व लोकांना फायदा देण्यासारखा छंद म्हणजे झाडं लावणे. लोकांनी झाडं लावण्याचा छंद जोपासावा. कारण अलिकडील काळात झाडं लावण्याची गरजच आहे.
झाडं लावणे हाही एक छंद असायला हवा लोकांना. तसं पाहिल्यास तोही एक छंद प्रसिद्ध होण्यासाठी जोपासलेला बरा. लोकांनी झाडं लावावी. तोही एक छंद वाढवावा. हवं तर सेल्फी काढावी आणि प्रसिद्ध व्हावं. कारण त्या छंदातून फायदेच फायदे आहेत. ते म्हणजे सेल्फी काढून प्रसिद्ध होणे. पर्यावरणाला मदत करणे, जीवसृष्टीला जीवनदान देणे, पर्यावरणाचे संतुलन, संवर्धन व संरक्षण करणे, हवेतील ऑक्सिजनची मात्रा वाढवणे, शेतकऱ्यांना चांगलं पीक यावं यासाठी मदत देणे, पांथस्थाला उष्णतेच्या दाहापासून वाचवणे, उन्हामुळे होणारे अकाली मृत्यू टाळणे, पाऊस पडण्यास सहाय्य होणे, अन्न वस्र निवाऱ्याची सेवा उपलब्ध करण्यास सहाय्य होणे, शिकणाऱ्या लोकांना विचारवंत होण्यास मदत करणे.
महत्वाचं सांगायचं झाल्यास असे बरेच फायदे आहेत झाडं लावण्याचे. कदाचीत असंख्य झाडं लावण्यातून आपले नावही ग्रीनीच बुकात नोंदवले जावू शकते. परंतु त्यासाठी आधी झाडं लावावी लागतील. शिवाय ग्रीनीच बुकात केवळ झाडे लावून नावे येणार नाहीत तर ती झाडं तेवढी जगायलाही हवीत.
झाडं लावण्याचा प्रयत्न नव्हे तर तो उपक्रम सरकारनंच राबवावा असं गृहीत धरण्याऐवजी तो उपक्रम लोकांनी स्वतः राबवावा. तशीच त्या गोष्टीची नोंद वर्तमानपत्र, ग्रीनीच व लिम्का बुक तसेच इतर सर्वांनी घ्यावी. कधकधी झाडं लावून पर्यावरणाचं संरक्षण जो करीत असेल, त्याचा सत्कारही करावा. जेणेकरुन लोकं त्याच गोष्टीपासून बोध घेतील, प्रेरणा घेतील व झाडं लावतील आणि जेव्हा अशी अनेक झाडं लागतील, तेव्हाच खऱ्या अर्थानं पृथ्वी होणाऱ्या तापमान वाढीच्या नुकसानीपासून वाचेल याबाबत शंका नाही.
झाडं लावणे व त्यांचं संगोपन करावं ही काळाची गरज आहे. ती ओळखून कार्य घडणं तेवढंच गरजेचं आहे. म्हणूनच कोणी छंद म्हणून तर कोणी आपल्याला पुरस्कार मिळेल म्हणून तर कोणी ग्रीनीच, लिम्का बुकात नाव येईल म्हणून तर कोणी वर्तमानपत्रात नाव प्रसिद्ध होईल म्हणून तर कोणी सेल्फी प्रसिद्ध करता येते म्हणून येणाऱ्या पावसाळ्यात झाडं लावावीत व झाडं लावण्याच्या उत्साहात सहभागी होवून आपला आनंद द्विगुणित करावा म्हणजे झालं.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०